ProfileImage
87

Post

2

Followers

0

Following

PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 29, 2024

PostImage

जिल्हा क्रीडांगण व चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या बांधकाम संदर्भात मंत्रालयात होणार बैठक


 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून क्रीडा मंत्र्यांनी केली बैठकीची सूचना

पुढील आठवड्यात मंत्र्यांच्या दालनात बैठक

दिनांक २९ जून मुंबई
गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या व चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकाम संदर्भात आपल्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी क्रीडामंत्र्यांकडे  पत्राद्वारे केली असता क्रीडामंत्री ना . संजय जी बनसोडे यांनी बैठक आयोजित करण्याबाबत आपल्या विभागाला निर्देश  दिले आहेत. त्यामुळे  पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून  अतिशय संथगतीने सुरू असून, त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे.  वनविभागाच्या ताब्यात असलेल्या स्टेडियमच्या  जागेचा ताबा घेऊन बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. चामोर्शी  तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला गती मिळावी , चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून काम सुरू करणे  आवश्यक आहे. त्यात कॅनलला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी जलसंपदा  विभागाची परवानगी घेऊन  बांधकाम सुरू करणे करिता  आपल्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन होणे गरजेचे असून  त्यात जलसंपदा विभागाच्या सचिवांनाही बोलवावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
याकरिता आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्राद्वारे मंत्री महोदयांना केली असता त्यांनी या संदर्भात बैठकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 27, 2024

PostImage

मातृशक्तीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे   सौ बिणाराणी होळी


 

 

हॉटेल लॉंडमार्क गडचिरोली येथे महिलांच्या स्नेह मिलन व सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

 

दिनांक २६ जून गडचिरोली

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी आणला असून त्यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. जिल्ह्यातील माता भगिनींसाठी त्यांनी अनेक रोजगार विषयक उपक्रम राबविले असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे .त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मातृ शक्तीने आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिनाराणी देवराव होळी यांनी गडचिरोली लँडमार्क येथे आयोजित महिला स्नेहमिलन व सुसंवाद कार्यक्रमाच्या प्रसंगी केली.

 

यावेळी जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, माजी जि. प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर, शहर अध्यक्षा कविताताई उरकुडे, माजी जि. प. सदस्या रंजिताताई कोडापे, धानोरा तालुका अध्यक्षा लताताई पुंघाटे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका निताताई उंदीरवाडे, बेबीताई चिचघरे, वर्षाताई शेडमाके, शहर महामंत्री पल्लवीताई बारापात्रे, शहर महामंत्री रश्मी बागमारे, यांच्या सह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 25, 2024

PostImage

देशात आणीबाणी लागू करून संविधानाचे महत्त्व समाप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा तीव्र निषेध


 

आमदार डॉ देवरावजी होळी

गडचिरोली येथे २५ जून आणीबाणी एक काळा दिवस या कार्यक्रमाचे आमदार डॉ देवरावजी होळी  यांचे हस्ते उद्घाटन

दिनांक २५ जून २०२४ गडचिरोली
लोकसभा निवडणुकीत "रायबरेली" मतदार संघातून तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांनी  मतदारांना लाच देणे, सरकारी प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे, व सरकारी संसाधनाचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे, अशा प्रकारचे  आरोप सिद्ध झाल्याने गैरप्रकार करून निवडणूक                                जिंकली म्हणून  इलाहाबाद न्यायालयाने इंदिराजी  गांधी यांना अपात्र करून ६ वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घातली. त्या निर्णयाचा विरोध करून इंदिराजीनी नेहरू- गांधी घराण्याची सत्ता वाचवण्यासाठी २५ जून १९७५ रोजी  आणीबाणी जाहीर केली. त्या आणीबाणीचा  निषेध करावा तेवढा कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.

गडचिरोली येथे २५ जून आणीबाणी एक काळा दिवस या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ देवरावजी होळी  यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे भाजपा जिल्हाध्यक्ष तर प्रमूख वक्ते नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांतजी देशपांडे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी,  ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे , रमेश जी भूरसे ,रवींद्र ओल्लारवार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महामंत्री सौ.योगिताताई पिपरे तर आभार प्रदर्शन विलास पाटील भांडेकर यांनी केले.

यावेळी मंचावर  भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ गीताताई हिंगे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेशजी बारसागडे , धानोरा तालुकाध्यक्ष सौ लताताई पुंगाटी, प्रामुख्यानं उपस्थित होते.

आणीबानीमुळे संविधाना नुसार चालणारा देश  काँग्रेसच्या हुकूमशाहीवर चालू लागला. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आणली, सरकारविरुद्ध भूमिका घेणाऱ्यांना जेल मध्ये टाकण्यात आली. विरोधी पक्षातील  सगळ्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले.  संपुर्ण देशात सर्वसामान्य जनतेचे हक्क संपुष्टात आणल्या गेले.  वृत्तपत्र कार्यालयाची विद्युत कापली, सिनेमा जगतवर सक्ती केली. अशी दडपशाही तत्कालीन काँग्रेस सरकारने केली त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 25, 2024

PostImage

गावभेटीतून विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी  साधला नागरिकांशी संवाद  गाव कट्ट्यावर बैठका तक्रारी जाणून घेत केले समस्यांचे  निराकरण


 


ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्तरावर विविध समस्या भेडसावत असतात. त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकासकामां संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात. त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ मार्गी लावल्या.  यामध्ये झिलबोडी(परसोडी), धामणगाव, तुलन्हानमेंढा, गायडोंगरी, परसोडी(तु.) या गावांचा समावेश आहे.
सोबतच ब्रम्हपूरी मतदारसंघात गावांगावात सुरू असलेली विकासकामे, जनसेवा याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या "विजयदुत" या उपक्रमाबाबत माहिती देऊन शासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी विजयदुत यांच्या कडून कामे करून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी दिलेली निवेदने तातडीने मार्गी लावून पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सथस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, अतुल राऊत, रवी पवार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सरपंच निता शेंडे, सरपंच सचिन लिंगायत, मंगेश शेंडे, कैलाश खरकाटे, रवी शेंडे, अमर गाडगे, प्रमोद भर्रे, धनराज मिसार, संदीप राऊत, सुशील शेंडे, भगवान ठाकरे, ईश्वर कुथे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 25, 2024

PostImage

चामोर्शी शहरातील ५१ कोटी रुपयांच्या  विकास कामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी


 

ग्रामीण रुग्णालय  २१.३० कोटी ,तहसील कार्यालय १७.५० कोटी न्यायालय ७.५० कोटी ,नगर पंचायत भवन ५ कोटी गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह २०  लक्ष

दिनांक २५ जून चामोर्शी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून चामोर्शी शहरांमध्ये विविध विकासकामे सुरू असून त्यातील ग्रामीण रुग्णालय   ,तहसील कार्यालय ,दिवाणी नायालय  नगर पंचायत भवन , गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह अशा ५१ कोटी रुपयांची बांधकाम काम सुरू आहेत या बांधकामाची पाहणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्षा जयश्री वायललवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापूरे, दिलीप चलाख, महिला बाल कल्याण सभापती गीताताई सोरते, पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम नगरसेविका स्नेहा सातपुते, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख युमो जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, सतीश भांडेकर, विलास पिपरे, प्रदीप भांडेकर, राजू धोडरे, विजय गेडाम रामचंद्र वरवाडे, अंशुल दासरवार, यांचे सह बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय  २१.३० कोटी ,तहसील कार्यालय १७.५० कोटी न्यायालय ७.५० कोटी ,नगर पंचायत भवन ५ कोटी गोंड मोहल्ला येथे स्थानिक निधीतून सभागृह २०  लक्ष रुपयांची कामे सुरू असून या कामांची पाहणी आमदार डॉक्टर देवरावजी  होळी यांनी केली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नियोजित वेळेत कामे पुर्ण करण्याचे निर्देश दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 24, 2024

PostImage

महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण करा आमदार डॉ देवरावजी होळी यांची अधिकाऱ्यांना सूचना


 

निर्माणाधीन बांधकामाची आमदार डॉ देवरावजी होळी  यांनी केली पाहणी

दिनांक २४ जून गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान महिला व बाल रूग्णालयावर पडत असलेला आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार लक्षात घेता नविन बांधकाम सुरू असलेल्या महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण करावे अशी सूचना आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नवीन  निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करतांना केली.

यावेळी महीला रूग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर आखाडेजी, इंजिनिअर  कोहळे यांचे सह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैद्यकीय महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. १०० बेडेड वाढीव रुग्णालयाच्या बांधकामा संदर्भात काय  कारवाई झाली?  त्यात काय तांत्रिक अडचणीं आहेत ? याबाबत उपस्थितीतांना विचारना केली. यावेळी काही आवश्यक त्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात व नियोजित वेळेत काम पूर्ण करावे असे निर्देश दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 24, 2024

PostImage

विद्यार्थ्यांनो, दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा! ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद


 

गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

चंद्रपूर, दि.२४ - आमच्या काळातील पिढीवर शिक्षण घेताना जो ताण होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आजच्या पिढीवर आहे. आजची पिढी स्पर्धेच्या युगात धडपडत आहे. प्रत्येक गोष्ट वेगाने बदलते आहे. आम्ही शाळेत शिकायचो तेव्हा शिक्षक सांगायचे की बारा कोसावर भाषा बदलते. आजचे शिक्षक सांगतात की बारा दिवसांमध्ये तंत्रज्ञान बदलते. मुंबईत उद्योजकांच्या परिषदेत गेलो असता एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की, पूर्वी एक उद्योग सत्तर वर्षे एकाच तंत्रज्ञानाच्या आधारावर चालायचा, मात्र आता दरवर्षी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर उद्योग चालत नाहीत. त्यामुळे या बदलत्या काळात आपण दररोज नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
चंद्रपूर येथील आर्य वैश्य स्नेह मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट अॉफ फंडामेंटल रिसर्च येथील शास्त्रज्ञ प्रो. डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष विजय गंपावार, सचिव नीरज पडगिलवार, कोषाध्यक्ष मनोज राघमवार, जयंत बोंनगीरवार, अभय निलावार, विलोक राचलवार, राजेश पत्तीवार, सागर मुक्कावार, राजेश्वर चिंतावार, शंकर गंगशेट्टीवार, अविनाश उत्तरवार, गिरीधर उपगन्लावार, वैभव कोतपल्लीवार आदींची उपस्थिती होती.

 यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवंत विद्यार्थ्यांना आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हावे, असा आशीर्वाद कन्यका मातेकडे मागतो, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने, परीश्रमाने गुणपत्रिकेत गुणवंत हा शिक्का लावला आहे, याचा अभिमान आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाकडून या विद्यार्थ्यांचा गौरव केला जात आहे. मात्र प्रत्येक पावलावर गौरव होईल, समाजाला आपला अभिमान वाटेल, यादृष्टीने कष्ट घ्या. आपले हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये बदलले पाहिजे, एवढी भरारी घ्या,’ असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले. 

‘आई, आजी आणि शिक्षक आपल्याला अनके छोट्या छोट्या कथा सांगतात. त्या कथांचा मतितार्थ समजून घ्यावा. कारण त्यातूनच आपल्या जीवनाला दिशा मिळत असते. यशस्वी लोक वेगळे काम करीत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करीत असतात. ज्याने बल्बचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसनला प्रयोग यशस्वी होण्यापूर्वी ५० हजार प्रयोग करावे लागले होते. त्यानंतर त्याचा प्रयोग यशस्वी झाला. बल्बचा शोध लागल्याची माहिती पत्रकारांना देत असताना एका पत्रकाराने प्रश्न केला की ‘५० हजार प्रयोग केल्यानंतरही यश आले नसते तर तुम्ही काय केले असते?’ त्यावर एडिसनने उत्तर दिले की ‘अपयश आले असते तर मी इथे तुमच्यापुढे बसलो नसतो, पुन्हा एकदा पुढच्या प्रयोगाची तयारी सुरू केली असती.’ आपले जीवन असे असले पाहिजे. न थांबता, हताश न होता, यशापयशाची चिंता न करता सदैव प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार विद्यार्थ्यांना म्हणाले. 

दहीहंडीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा’
एकदा एका माणसाने जहाजामध्ये खेकडा भरलेले टोपले ठेवले आणि त्यावर काहीच झाकले नाही. लोक म्हणाले झाकण लावा, नाहीतर खेकडे बाहेर येतील. त्यावर तो म्हणाला ‘हे सगळे महाराष्ट्रातील खेकडे आहे. ते एकमेकांचे पाय ओढतील आणि कुणालाही वर येऊ देणार नाही.’ ही कथा आपण ऐकली आहे, पण ही अर्धवट आहे. याच महाराष्ट्रात दहीहंडीसाठी लोक एकमेकांना आधार देतात आणि त्यांच्यातील एक जण हंडी फोडून सर्वांना प्रसाद देतो. हाच आदर्श आपल्याला डोळ्यापुढे ठेवायचा आहे आणि आयुष्याचा प्रवास करायचा आहे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 23, 2024

PostImage

विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी


 

आ.डॉ.देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत कुनघाडा - तळोधी जिल्हा परिषद सर्कल  बैठक संपन्न* 
दिनांक २३ जून  कुनघाडा

विधानसभा निवडणुकांची हलचल सुरू झाली असून  भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपणही या निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी कोळी यांनी कुनघाडा - तळोधी जिल्हा परिषद सर्कल  बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी प्रामुख्याने जिल्हा सचिव दिलीप चलाख,जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भाजपचे जेष्ठ नेते बंडुजी चिळंगे, श्रीधर मांदाडे, किशोर गटकोजवार, भाजपा युवा नेता उमेश कुकडे, जितू कुणघाडकर, यांचे सह जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथ प्रमुख, बूथ पालक व शक्ती केंद्र प्रमुख परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जनतेमध्ये खोटे व निराधार भ्रम पसरवून  विजय मिळवलेला आहे . परंतु आता जनतेचा भ्रम  दूर होत आहे. या विधानसभा निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी आहे त्यामुळे का*विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आ.डॉ.देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत कुनघाडा - तळोधी जिल्हा परिषद सर्कल  बैठक संपन्न* 
दिनांक २३ जून  कुनघाडा

विधानसभा निवडणुकांची हलचल सुरू झाली असून  भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपणही या निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी कोळी यांनी कुनघाडा - तळोधी जिल्हा परिषद सर्कल  बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी प्रामुख्याने जिल्हा सचिव दिलीप चलाख,जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भाजपचे जेष्ठ नेते बंडुजी चिळंगे, श्रीधर मांदाडे, किशोर गटकोजवार, भाजपा युवा नेता उमेश कुकडे, जितू कुणघाडकर, यांचे सह जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथ प्रमुख, बूथ पालक व शक्ती केंद्र प्रमुख परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जनतेमध्ये खोटे व निराधार भ्रम पसरवून  विजय मिळवलेला आहे . परंतु आता जनतेचा भ्रम  दूर होत आहे. या विधानसभा निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून लोकांचे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 23, 2024

PostImage

काँग्रेसच्या खोट्या प्रचारावर मात करून मोदीजींचा विजयी शंखनाद!


 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विजय उत्सवात व्यक्त केल्या भावना

चंद्रपूर, दि.२३ - मोदीजी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्लीम, आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या. पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 ‘देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. 

ते पुढे म्हणाले, ‘सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले. आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म ( गॅरंटी गार्ड )घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला'.भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार
ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. 

टायगर अभी जिंदा है’
निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले. 

‘मी थकणारा आणि थांबणारा नाही’
लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  


आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन
विजयी उत्सव सभेपूर्वी बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे काम जिल्हा स्तरावरील नगरोत्थान योजनेतून २२ लक्ष रुपये खर्चातून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर नगरपरिषद अग्निशमन विभागाला जिल्हा अग्निशमन योजनेतून मिळालेल्या अग्निशमन वाहनाचेही यावेळी लोकार्पण झाले. हे वाहन अरुंद गल्लीबोळातून जाण्यास सक्षम असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 23, 2024

PostImage

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर गडचिरोलीत लोकसभा क्षेत्राची भाजपची समीक्षा बैठक संपन्न


 

मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने अभिनंदनाचा ठराव व विरोधकांच्या अपप्रचारामुळे पराभव- अशोक नेते

दि.२३ जून २०२४

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी रविवारी दुपारी गडचिरोलीच्या विश्राम भवनात बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि धर्मपाल मेश्राम, तसेच भाजपचे प्रकोष्ठ संयोजक तथा चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद कानडे यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पराभवामागील कारणे जाणून घेतली.

सर्वप्रथम जनसंघाचे संस्थापक,थोर विचारवंत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून बैठकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी एकमताने प्रतिसाद दिला. 

यावेळी नेते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी मागील १० वर्षात प्रगतीशिल, विकासशिल भारत घडविण्यासाठी अनेक योजना आणल्या. दीन-दलित, शोषित, वंचितांपर्यंत त्या योजनाही पोहोचवण्यात आल्या. देशाला विकासाची दृष्टी देण्यासोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली. परंतू विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत संविधान बदलविणार असल्याचा अपप्रचार केला. त्यात 'अब की बार, 400 पार'च्या नाऱ्यामुळे मतदारांच्या मनात आणखी शंकेला वाव मिळाला. मात्र गेल्या 10 वर्षात संविधानाच्या आधारेच एनडीए सरकार चालविण्यात आले आणि भाजप नेहमीच संविधानाचा सन्मान करत राहणार, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मेहनत घेणार्‍या लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त करत भाजपाच्या संघटनेचे व पुढील वाटचालीत जनतेच्या हिताची कामे सुरूच ठेवणार असल्याचे ते सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मान.संजयजी भेंडे यांनी समिक्षा बैठकीला जय - पराजय होणे साहाजिकच आहे.पराजयाला हार न मानता व पराभवाचे कारण मिमांसा न शोधता भाजपा संघटनेच्या जोरात कामाला लागा.असे विस्तृत मार्गदर्शन भाजपा संघटनेबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांना केले.तसेच माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, धर्मपालजी मेश्राम,प्रशांत वाघरे, अँड. येशूलालजी उपराडे यांनी सुद्धा समिक्षा बैठकीला विस्तृत व उत्कृष्ट पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी समिक्षा बैठकीला मंचावर प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष संजयजी भेंडे,धर्मपाल जी मेश्राम,मिलिंद कानडे,मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, आ.डॅा.देवरावजी होळी, आ.कृष्णाजी गजबे, गडचिरोली-गोंदियाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,ॲड.येशूलालजी उपराडे, माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर,माजी आमदार संजयजी पुराम,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भूरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे,प्रमोद संगिडवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गिताताई हिंगे, जिल्हाअध्यक्षा वंदना ताई शेंडे, तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 23, 2024

PostImage

शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानानेच  आज  एक देश, एक विधान व एक प्रधान आमदार डॉ. देवरावजी होळी


 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले अभिवादन

दिनांक २४ जून २०२४ चामोर्शी

एक देश मे दो विधान, दो प्रधान ,दोन निशान नही चलेंगे" चा नारा देणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर भारताच्या संविधानाने चालावे, काश्मीर चां ध्वज वेगळा नसावा, देशात एकच प्रधान असावा यासाठी मागणी लावून धरली यासाठी त्यांनी आपल्या  प्राणाची आहुती दिली . त्याच प्रेरणेतूनच आज काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे शक्य झाले. परिणामी देशाचे संविधान पूर्णपणे काश्मीरलाही लागू झाले आहे . त्यांच्या ह्या बलिदानामुळेच  आज हे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी बलीदान दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत,बिधान बेपारी, बैरागी सर, बादल शहा, विमल सेन, सुनिल मंडल, दिपक दास, सुनिल दास , कृष्णा मंडल, स्वप्नील चलाख उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 23, 2024

PostImage

पिक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी घेतला कृषी व संलग्नित विभागांचा आढावा


 

चंद्रपूर, दि. 22 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) दिले.

नियोजन सभागृह येथे कृषी व कृषी संलग्न विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालीका प्रिती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, रामपालसिंग व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी विशेष शिबिर घेऊन कर्जवाटप करावे. कर्जवाटपासाठी बँकेत अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय कमी आहे. यात सुधारणा करावी. 20 ते 22 ग्रामपंचायती संलग्न असलेल्या एखाद्या बँकेत केवळ 80 शेतक-यांना कर्ज वाटप होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. व्यवस्थापक किंवा एखाद्या संबंधित व्यक्ती उपलब्ध नसला तर सदर कार्यभार दुस-या कर्मचा-यांकडे सोपवून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सोयीची करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बँकांना दिले. 

गतवर्षीपासून शासनाने 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. यापूर्वी केवळ 50 ते 60 हजार शेतकरी या योजनेत सहभागी होत होते. मात्र गतवर्षी जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले. ही चांगली बाब असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी खरीप हंगाम 2024-25 चे नियोजन, बियाणे व खतांची उपलब्धता, गुणनियंत्रणाबाबत कार्यवाही, अनधिकृत कापूस बियाणे विक्रीविरुध्द कार्यवाही, प्रधानमंत्री पीक विमा योजना, 2023-24 मध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत खरीप व रब्बी मध्ये पिकांचे झालेल नुकसान, नुकसानभरपाईचे अनुदान वाटप, पीक कर्ज वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित कृषी पंप जोडणी यासोबतच आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा आढावा घेतला.   

सादरीकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी सांगितले की, सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीपाचे हंगामाकरिता 777 कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 62.14 टक्के इतकी आहे.आतापर्यंत सर्वाधिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 94 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे . उर्वरित जून अखेरीज वाटप करण्या बाबत सर्व बँकाना निर्देश पालकमंत्री महोदयांनी यांनी दिले आहे.

पीक विमा योजने अंतर्गत 91 कोटी 62 लाख मंजूर झाला असून आतापर्यंत 25 कोटी 45 लाख पीक विमा शेताकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.आजच 17 कोटी रुपये  पीक विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम जून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत ओरियंटल विमा कंपनीला निर्देश दिले आहे .

जिल्ह्यात एकूण लागवडीलायक क्षेत्र 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर असून सर्वसाधारण खरीपाचे क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 857 हेक्टर (83.01 टक्के)  आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये 1 लक्ष 91 हजार हेक्टरवर भाताची लागवड, 1 लक्ष 80 हजार हेक्टरवर कापूस तर 75 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत 41 हजार 918 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 20 जून 2024 पर्यंत 76 हजार 263 मे.टन बियाणे उपलब्ध झाले असून यापैकी 49 हजार 663 मे.टन बियाणांची विक्री झाली आहे. तर 88 हजार मे. टन खते जिल्ह्यात उपलब्ध आहे. बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे श्री. तोटावार यांनी सांगितले.


‘शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही याची काळजी घ्या’
गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होतील, यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. केवळ 1 रुपयात या योजनेत सहभागी होता येत असले तरी काही ठिकाणी कागदपत्रांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन शेतक-यांना अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 22, 2024

PostImage

२३ जून रोजी  कुनघाडा तळोधी जिल्हा परिषद क्षेत्राची गण निहाय बैठक    बैठकीला उपस्थित राहण्याची आमदार डॉ देवरावजी होळी यांचे आवाहन


 

दिनांक २२ जून गडचिरोली

 २३ जून रोजी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा तळोधी जिल्हा परिषद क्षेत्राची गण निहाय बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

तळोधी पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत कार्यकर्त्यांची दुपारी २ वाजता ग्रामपंचायत भवन तळोधी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून कुनघाडा क्षेत्राअंतर्गत पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक दुपारी ३ वाजता किसान भवन कुनघाडा येथे आयोजित करण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 22, 2024

PostImage

ओबिसी विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह तत्काळ सुरू करा. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची उपमुख्यमंत्री  तथा पालकमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना साकडे


 

गडचिरोली: राज्य शासनाने दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आतापर्यंतच जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू झालेले नाहीत. यावर्षी तरी शैक्षणिक सत्राच्या सुरवातीपासून वसतिगृह सुरू करून जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यभरातून ओबिसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मुली व मुलांसाठी प्रत्येकी एक असे वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ओबीसी वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी शासकीय जागेची शोधमोहीम सुरू केली होती. कॉम्प्लेक्स परिसरात जागाही निश्चित करण्यात आल्याचे ऐकण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत कुठेही प्रत्यक्षात वसतिगृहाचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील खासगी इमारत भाडेतत्वावर घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  
जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनेक कार्यालय खासगी इमारती भाडेतत्वावर घेऊन कामकाज चालविला जात आहे. त्याच धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंंजूर असलेल्या वसतिगृहासाठी खासगी इमारत भाडेतत्वावर घेऊन वसतिगृह सुरू करावे, अशीही मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष वाघरे यांनी केली आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील विद्यार्थी पदवी, पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येत असतात. त्यांना राहण्याची सुविधा नसल्याने अनेक अडचनीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा मुख्यालयात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी तालुका मुख्यालयात येऊन शिक्षण घेत असतात. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने इतर संवर्गातील विद्यार्थ्यांसोबतच ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही तालुका स्तरावरही वसतिगृह निर्माण करण्यात यावे, अशी मागणीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 22, 2024

PostImage

गडचिरोली शहराच्या विकासासाठी  मोठ्या प्रमाणावर निधी आमदार डॉक्टर देवरावजी होळी


 

गडचिरोलीतील सिताराम नगर व झाशी नगर  येथील  ७० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आ.डॉ.देवरावजी होळी यांनी केले लोकार्पण

दिनांक २२ जून गडचिरोली

गडचिरोली शहराच्या विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून भूमिपूजन केलेल्या कामांचे आज लोकार्पण करीत असल्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावजी होळी यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील  सिताराम नगर व झाशी नगर येथील ७० लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करताना केले.

 याप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे, युवा मोर्चाचे  मधुकरराव भांडेकर , शहराच्या महिला आघाडी अध्यक्ष कविताताई उरकुडे ,नगरसेवक केशवजी निंबोड ,  माजी नगरसेवक विजयराव गोरडवार, वासुदेवराव  बट्टे,  शहर महामंत्री विनोद भाऊ देवोजवार ,महामंत्री विवेकजी बैस, राजू शेरकी,  श्याम  वाढई ,  अर्चनाताई निंबोड,  स्वातीताई चंदनखेडे, स्थानीक रहिवासी संदीप बोदलकर, राहुल मेश्राम, मोहन मस्के,  बाबुरावजी लोंढे, सपना कन्नाके ,भास्कर कानपल्लीवार, विकास सातपुते, मायाताई सातपुते, रवी गायकवाड अरविंद पेद्दिवार यांचेसह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 22, 2024

PostImage

वडसा (देसाईगंज) जि.गडचीरोली येथे गोंडवाना गोटूल भूमी समिती, ऑल इंडिया आदिवासी एम्पलोयी फेडेरेशन शाखा देसाईगंज व सर्व समाज संघटना द्वारा आयोजित सत्कार


 समारंभात लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान व सहकार्य केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी सर्व समाज संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
         या प्रसंगी त्यांनी संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यावर लक्ष देणार असल्याचे सांगून समाजाच्या समस्या सोडवीन्याकडे प्राथमिकता देणार असल्याचे स्पष्ट केले. 
          यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली मनोहर पाटील पोरेटी, माजी पंचायत समिती सभापती परसरामजी टिकले, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस नेते रामदास मसराम, काँग्रेस कार्यकर्ता पिंकू बावणे, काँग्रेस कार्यकर्ता सहजादभाई शेख, संजय करमकर, छगन शेडमाके, जावेदभाई शेख, लीलाधर भरे, नदीम नाथांनी, मडावी मॅडम, सौ. मंदाताई होते पेनद्रे, सौ.मीनाताई कोडापे, सौ.रजनी आत्राम, सीमाताई कोचकाडे गणमान्य मंडळी पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात "चिखल फेक" आंदोलन


 

महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन.

गडचिरोली :  राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. 
महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येते भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत,अ. जा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली शंकरराव सालोटकर,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे,  जिल्हासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली सुनील चडगुलवार,महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली देवाजी सोनटक्के, सोशलमीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली संजय चन्ने, रवी  मेश्राम,दिवाकर निसार, पुष्पलताताई कुमरे, अपर्णाताई खेवले, आशाताई मेश्राम, ममताताई मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुमताई आलाम, छायाताई कोव्हे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर,काशिनाथ भडके, श्रीनिवास तडपल्लीवार, सुरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत भाऊ, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबुराव गडसूलवार, उमेश उईके, सुरज मडावी,प्रशांत कापकर, अनुप सिकंदर,भरत येरमे, नंदू वाईलकर,हंसराज उराडे, दिगंबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार सह जिल्ह्यातील काँग्रेस सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

चनकाई नगर गडचिरोली येथील सांड पाण्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावा


 

चनकाई नगरला भेट देत आमदार डॉ देवराव जी होळी यांनी परिसराची केली पाहणी* *स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार नगर परिषद प्रशासनाला दिले निर्देश

निर्देश देताच घटनास्थळी पोहचले नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी* *दिनांक २१ जून गडचिरोली

गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रांतर्गत असणाऱ्या चनकाई नगर येथे नाल्यांची योग्य व्यवस्था जुळलेली नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी लोकांच्या घरांमध्ये घुसले . यामुळें नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे ही बाब चनकाई नगर वासियानी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना अवगत करून दिली व याबाबत तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली असता आमदार डॉ देवरावजी होळी यांनी तात्काळ चनकाई नगरला भेट देऊन परिसराची पाहणी केली व यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश नगरपरिषद प्रशासनाला दिले.

 निर्देश मिळताच नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम सूरू केले*. *यावेळी स्थानिक नागरिक डंबाजी मस्के, मंदाबाई भोयर, वासुदेव नैताम, गौराबाई भांडेकर, मीनाक्षी जेंगठे, नामदेव सुरणकर, सुनीता सुरणकर, किरण जेंगठे आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

संघर्ष काळातील अनुभव हेच खरे यशाचे मार्गदर्शक  - विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार  ब्रम्हपुरी येथे युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर


 

आयुष्यात यश मिळवण्यासाठी सातत्य, इच्छाशक्ती व मेहनत फार महत्वाची आहे. यशाकडे वाटचाल करतांना अनेकदा आपल्याला अपयश येऊ शकते तेव्हा खचुन न जाता यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत राहा. कारण आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसतो असे मौलिक विचार राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपूरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटीव्हेशनल स्पीकर डॉ. वैदेही जंजाळे, प्रा. आकाश मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता प्रतीनीधी मुकेश मुंजनकर, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य आर.वानखेडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्ननील कावळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेश डांगे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, १० वी व १२ वीचे वर्ष हे आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतात. यावेळी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे ज्या क्षेत्रात जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतात ते क्षेत्र निवडावे. एकवेळ उपाशी राहा पण शिक्षण पुर्ण करा. कारण आयुष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. चीन देश विकसित राष्ट्र आहे. तेथील युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःसह राष्ट्राच्या विकासासाठी केला आहे. त्यामुळे ह्याबाबतीत आपण सर्व विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करून एक सजग नागरिक बनावे असे देखील यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन रत्नदीप रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना द्वारे आयोजित सत्कार समारंभात उपस्थित उपस्थित राहून सत्कार स्वीकारतांना व मार्गदर्शन करतांना नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान


हलबीटोला ता. सालेकसा जि.गोदिया येथे .   खासदार डॉ.नामदेव किरसान 

यावेळी आमदार सहेशराम कोरोटे, केंद्रीय अध्यक्ष खासदार डॉ.नामदेव किरसान/हलबी समाज आर.एस.नायक, अध्यक्ष ऑल इंडिया एम्पलॉइज फेडरेशन माधवराव गावड, ॲड.दुष्यांत किसान, मूलचंद गावराने, पूर्व महामंत्री किसन मानकर, बी.के. गावराने, वाय.सी.भोयर, यशवंत मलाये, हेमराज राऊत,

दुर्गाप्रसाद कोकोडे, महेंद्र कोटेवार, बी.टी. राऊत, जगन घासले, रमण सलाम, सौ.नलीनीताई किसान, सौ.सुनिताताई राऊत, सौ.आरतीताई चवारे, नरेंद्र कुथिरकर, आर.एल.पुराम, सावंतबापू राऊत, आर.एम.कोजबे, हिरालाल फाफणवाडे, विलास भोगारे, राधेशाम टेकाम, सौ.अर्चनाताई मडावी, हिरालाल भोई, जनार्दन कोल्हारे, मधु दिहारे, राहुल येल्ले, देवराव मरसकोल्हे सर्व आदिवासी हलबी/हलबा समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

तरुणांचे करिअर घडविण्यासाठी महायुती सरकारचा नेहमीच पुढाकार


 

आमदार डॉ देवरावजी होळी

शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा पुढाकार

दिनांक २१ जून गडचिरोली

राज्यातील शिंदे - -फडणविस -अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने राज्यातील तरुणांचे करिअर घडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा शक्तीचे करिअर घडविण्यासाठी महायुती सरकारचा उपक्रम कौतुकास्पद आहे.यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेसह  मंत्री मंगल प्रभात लोढा यांचेही आभार मानले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार! नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रतिपादन


 

देसाईगंज / मोहित अत्रे-
     देशात लोकशाही विरोधी शक्ती डोके वर काढुन बहुजनांचे अबाधित अधिकार संपवण्याच्या मार्गावर होते. यामुळे संविधान धोक्यात येण्याची शक्यता बळावली असतांना बहुजनांनी पार पडलेली लोकसभा निवडणुक आपल्या हातात घेऊन बहुजनांच्या अधिकारांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून भरघोस मताने निवडून दिलात.तो टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी केले.
    ते देसाईगंज येथील गोंडवाना गोटूल भुमी समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजच्या वतिने आयोजित सत्कार संभारंभाला उत्तर देतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजचे अध्यक्ष किशोर कुंमरे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम,मनोहर पोरेटी,छगन शेडमाके,पिंकु बावणे,संजय करंकर,लिलाधर भर्रे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
    दरम्यान डाॅ.किरसान पुढे बोलतांना म्हणाले की आदिवासी संस्कृती ही जगातील आदर्श संस्कृती असुन देशातील जल,जंगल जमिनीचे संरक्षण व संवर्धन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींच्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न केल्या जात असुन संविधानीक मिळालेल्या ७.५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणे तर दूरच आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासूनच रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्याच धर्तीवर ओबीसींना देखील डावलण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.हा संभाव्य धोका ओळखून समस्त बहुजनांनी एकवटू आपल्या न्याय हक्काची लढाई स्वत: लढली,त्याचाच परिणाम म्हणून लोकप्रतिनीधी पदी वर्णी लागली असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
    कार्यक्रमाचे संचालन रतन सलामे यांनी,प्रास्ताविक अनिल मडावी यांनी तर आभार धिरजशाह मडावी यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासीच्या एकुण १७ विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या


 

 आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैयक्तिक रित्या पार्टीकडे केली मागणी

मागील ३०-४० वर्षांपासून पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देण्याची केली विनंती.

दिनांक २१ जून २०२४ गडचिरोली

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ११ जागांची निवड होणार असून त्यामध्ये १ जागा गडचिरोली जिल्ह्याला देऊन  मागील ३०-४० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी व इतर   समाजातील नेत्यांना संधी द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैयक्तिकरित्या पार्टीकडे केली आहे.

गडचिरोली जिल्हा हा लोकसभा व विधानसभेसाठी आदिवासी समाजासाठी  आरक्षित असल्याने इतर समाजाच्या नेत्यांना आमदार खासदार होण्याची संधी नाही. तरीही मागील अनेक वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.  आमदार खासदार होता आले नाही तरीही ते अत्यंत निष्ठेने पार्टीचे काम करीत आहेत. करिता या विधान परिषदेच्या निमित्ताने १ सीट ओबीसी व इतर समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांना  द्यावी अशी वैयक्तिकरित्या मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी पार्टी नेतृत्वाकडे केली आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा


व्यस्त जीवनात योगासन करणे काळाची गरज.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे

दिनांक:- २१/०६/२०२४

गडचिरोली :- आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिर कॅम्प एरिया गडचिरोली येथे योगासन करण्याचे आयोजन करण्यात आले. 
  
  जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना योगासनाचे धडे दिले व त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, या व्यस्त जीवनात योग ही काळाची गरज असून ती लोक चळवळ झाली पाहिजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या देशाने संपूर्ण जगाला योग आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील अनेक राज्य,जिल्हा व मंडळांनी एकत्रपणे योग करण्याचे आयोजन केले आहे.  यावेळी सर्वांना योगासन करून निरोगी राहण्याचे आव्हान प्रशांत वाघरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून योगासन केले.

त्याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेशजी भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खटी, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे, डॉ. नितीनजी कोडवते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, कामगार आघाडी प्रदेश सदस्य गोवर्धनजी चव्हाण, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेठकर, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, शहर महामंत्री केशव निंबोड,विनोद देवोजवार, नरेश हजारे, मा. खासदार अशोकजी नेते यांचे स्वीय सहाय्यक रवींद्रजी भांडेकर, सुरेशजी कुकडकर, चंदूजी देवाडकर, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, प्रतीमा सोनवाणे, सुनीता आलेवार, भारती खोब्रागडे, वैष्णवी डोंगरे, भूमिका बेर्डे, स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

२१ जून योग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉ देवरावजी होळी


योग हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र

उपस्थित सोबत योग करून कार्यक्रमात घेतला सहभाग 

दिनांक :- 21 चामोर्शी

भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अनन्य  साधारण महत्त्व असून योगामुळे माणसाचे शरीर निरोगी राहत असल्याचे विज्ञानातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग केले पाहिजे योग हा आपल्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र  असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी  ग्रामीण रुग्णालयात आयोजित योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

याप्रसंगी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किलनाके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पेद्दला, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, यांचे सह ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 21, 2024

PostImage

विशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू : सुधीर मुनगंटीवार


 

भर पावसात किल्ले रायगडावर हजारोच्या उपस्थितीत जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ना. सुधीर मुनगंटीवार यांचे भरभरून कौतुक

रायगड, ता. 20 : छत्रपती शिवाजीमहाराज या नावातच इतकी ऊर्जा आणि शक्ती आहे कि रयतेच्या हितासाठी एकदा केलेला संकल्प पूर्ण होतोच, हा माझा अनुभव आहे; त्यामुळेच प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण काढले, महाराजांच्या दरबारात जी इच्छा मावळ्यानी मनात बाळगली ती पूर्ण होतेच. रायगडावर आलेल्या विशालगडप्रेमी मावळ्यांना हे सरकार निराश होऊ देणार नाही, विशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हजारो शिवाभक्तांना आज दिली.धो-धो पावसात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या दिमाखदार शिववराज्याभिषेक  सोहळ्यात "विशालगड मुक्तीच्या" घोषणा सुरु असताना ना. मुनगंटीवार यांच्या धडाकेबाज भाषणाने आणि आश्वस्थ शब्दांनी परिसर दुमदूमून गेला.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात तिथीनुसार आज छत्रपती शिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा प्रचंड पाऊस आणि धुक्याचे वातावरण असतानाही अत्यंत शिस्तीत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे हजारो धारकरी "जय भवानी, जय शिवराय" च्या घोषणा देत असतानाच सुस्पष्ट मंत्रोच्चारात, पवित्र वातावरणात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद "याची देही, याची डोळा" हजारो शिवभक्त घेत होते. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे,आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

 यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, केवळ खुर्चीसाठी मोह म्हणून सत्तेत बसलेले हे सरकार नसून छत्रपती शिवरायांची आन बाण आणि शान राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने रयतेचे कल्याण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले राज्य चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवरायांचे कर्तुत्व आणि विचार हेच आमचे आदर्श असून मतांसाठी लांगुलचालन पत्करणाऱ्यांपैकी आम्ही नाही.छत्रपती शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले याचे मला मनापासून समाधान आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजलखानाच्या कबरी भोवतीचे अतिक्रमण काढण्यात याच सरकारला यश आले याचा मनापासून आनंद होतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, त्यांचा विचार आणि कर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा कर्तुत्ववान नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला याचा शिवप्रेमिना आनंद आहे, आणि याच आनंदाच्या उर्जेवर आम्ही आमचा संकल्प पूर्ण करणार आहोत असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. 

 ना सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच, त्यांच्या प्रत्येक वाक्यावर शिवप्रेमींनी टाळ्या देत, शिवरायांचा जयजयकार करीत सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ना सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, "सुधीर भाऊ आगे बढो, मी तुमच्या सोबत आहे " अशी ग्वाही दिली.

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कमी बोलतो आणि काम अधिक वेगाने करतो, विशाळगडाचा प्रश्न असो की आणखी कुठला तो वेगाने मार्गी लागेल अशी ग्वाही देतो. छत्रपती शिवरायांचा धनुष्यबाण हातात असलेला जगातील पहिला पुतळा उमरखिंडी येथे उभारण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.. रायगडाच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढाकारामुळे 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात आले असे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
किल्ले रायगड दुमदुमले
पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा  मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या  मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली.  ढोल -ताशे,शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते.

लोककलांचे सादरीकरण
रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचे होते.

श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती, संलग्न संघटनांचा सहभाग

या सोहळ्यानिमित्त  जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

सावली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत


 


दिनांक :- २० जुन २०२४

सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सावली शहरातील ३ नागरिकांना आर्थिक मदत देण्यात आले यात दुर्दर आजाराने दुःखद निधन, कॅन्सरग्रस्त रुग्ण व स्लॅब वरून पडून हात पाय निकामी झालेल्या व्यक्तिचा समावेश आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,युवा शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तिवार यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, सावली येथील तरुण स्व.नागेश दौलत निकुरे वय ३८ वर्षे रा.वॉर्ड क्र.११ हे काही दिवसापूर्वी तबेत बरी नसल्यामुळे दवाखान्यात भरती होते उपचारा दरम्यान दुर्दर आजाराने मृत पावले हे घरातील कमवते व्यक्ती होते त्यांच्या पश्यात बराच मोठा परिवार आहे. तसेच श्री.मारोती गुरुनुले वय ४२ वर्षे रा.वॉर्ड क्र.११ हे उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले आणी वॉर्ड क्र.६ येथील श्री.सुनील धोंडुजी भंडारे वय ४२ वर्षे हे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते परंतु घरातील स्लॅब वर काम करीत असताना तोल जाऊन ते खाली पडले यात त्यांचा हात व पायला जबर मार बसला व दोन्ही हात पाय निकामी झाले हे  घरातील कमवते व्यक्ती ,भूमिहीन व घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने उदर्निवाहासाठी जे मिडेल ते काम  करून कुटुंब चालवीत होते,पण नशिबाला वेगळेच मान्य होते, निकुरे,गुरुनुले व भंडारे कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून लाटेलवार कुटुंबीयांना सदर मदत मिळवून दिली.

आर्थिक मदत देताना नगरसेविका सौ.साधनावाढई, सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,नगरसेवक मा.सचिन संगीडवार,शेतकरी सह.कार्य.सोसायटी अध्यक्ष मा.मोहन गाडेवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,युवा कार्यकर्ते मा.प्रकाश लोणबले,मा.राजू बुरीवार,मा.कुणाल मालवनकर,मा.सौरभ बोरकर  आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

डॉ. मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड..


 

दिनांक :- २०/०६/२०२४

गडचिरोली :- येथील नामांकित स्पंदन फाउंडेशनचे संचालक डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टी गडचिरोली व आदिवासी आघाडी मोर्चाच्या प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी डॉक्टर मिलिंद जी नरोटे यांना नियुक्तीपत्र देऊन जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती केली. 
  त्यांना नियुक्तीपत्र देताना उपस्थित जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे , किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे , जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष चेतन जी गोरे, शहर महामंत्री विनोदजी देवोजवार , भैय्याजी शुदलवार , पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे


 यावे - आयुषी सिंह

गडचिरोली दि. २० : दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या 10 जोडप्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे 50 हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र, धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याप्रमाणे दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या विवाहीत जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती सिंह यांनी दिली. 
किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ दिला जातो.  वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा अशी पात्रतेची अट आहे. 
    या योजनेंतर्गत प्रत्येक जोडप्यास रुपये २५ हजार चे बचत प्रमाणपत्र, रुपये २० हजार रोख स्वरुपात व रुपये ४ हजार ५०० चे संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल. तर रुपये ५०० स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येतात.
कार्यक्रमाला गायत्री सोनकुसरे, पुष्पा पारसे, रतन शेंडे, निलेश तोरे, निखील उरकुडे, माया गायकवाड व समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


 

नवं उपासक-उपासिकास दिले शुभाशीर्वाद..!!

📝मूलचेरा:तालुक्यातील पुल्लीगुडम येथील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदराव चांदेकर यांचा मुलगा उपासक.सूर्यप्रकाश यांचा विवाह हरिदास दुर्गे यांची मुलगी उपासिका.स्नेहल यांच्याशी मरकल येथे मंगल परिणय सोहळा संपन्न झाला..!!
 
     या निमित्य पुल्लीगुडम येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या स्वागत समारंभ कार्यक्रमास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं उपासक-उपासिकास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

        यावेळी आनंदराव चांदेकर,टिळक चांदेकर,भुमेश्र्वर चांदेकर,नीलप खोब्रागडे,बापू कांदो,पुरशोत्तम दुर्गे,नरेश रापंजी,अजित कुळयेटी,माजी सरपंच मारोती पल्लो,पंकज खोब्रागडे,गाव पाटील रामजी कांदो,वैशाली दुर्गे सरपंच बोलेपल्ली,नीरज कोठारे,राजू वैरागडे,अमर वैरागडे,भगवान चापले,नरेश चापले,प्रवीण वाकडे,पांडू गोटा,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,महेश सडमेक सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

नपं उपध्यक्षाची माजी जिप अध्यक्ष कंकडालवार यांचेशी शहर विकासत्मक बाबीवर चर्चा


 

बबलू पाशा यांनी घेतली अजयभाऊ कंकडालवार यांची भेट

सिरोंचा - सिरोंचा नगर पंचायतचे उपध्यक्ष बबलू पाशा यांचेसह नगरसेवकानी काल 18 जून रोजी माजी जिप. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या घरी भेट घेतले.
    या भेटीदरम्यान सिरोंचा शहर विकासत्मक बाबीवर चर्चा केली.
       याभेटीमध्ये नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी नगर पंचायत हद्दीत सुरु असलेल्या विकासत्मक कामाची माहिती दिली. तसेच भविष्यात आयोजित विविध* विकासत्मक कामाबाबत चर्चा केली. विशेष म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बद्दल सविस्तर 
चर्चा करण्यात आली असून सिरोंचा तालुक्यात विधानसभा निवडणुकीबद्दल रणनीती तयार करण्याबाबत या दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली.
    यावेळी नपं उपध्यक्ष बबलू पाशा,नगरसेवक नरेश अलोणे, स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, मारोती गणपूरपूसह सिरोंचा शहरातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 20, 2024

PostImage

गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार


 

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संबंधितांना याबाबत निर्देश

अखेर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसनजी मुस्लिम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

दिनांक २० जून २०२४ मुंबई

गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मेडिकल कॉलेजच्या या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आज मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संबंधितांना निर्देशित केले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये गडचिरोली येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेसोबतच बांधकामा संदर्भात ,पदभरती संदर्भात, व यासंदर्भात राहिलेल्या अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
 बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव,  कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण  संचालक, आयुक्त , अधिक्षक अभियंता यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 19, 2024

PostImage

मेडिकल कॉलेजच्या प्रवेश  प्रक्रिया संदर्भात मंत्रालयात २० जून रोजी बैठक


 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश

यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांना दिले होते पत्र

दिनांक १९ जून २०२४ मुंबई

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  यावर्षीपासून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सातत्याने शासनाकडे लावून धरली. यासंदर्भात बैठक आयोजित करावी याबाबत वैद्यकीय शिक्षण ना. मंत्री हसनजी मुश्रीफ यांना पत्र दिले असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात २० जून रोजी दु १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भातील आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी संबंधिताना दिले असून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला आमदार डॉ देवरावजी होळी यांचेसह, राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण  संचालक, आयुक्त , अधिक्षक अभियंता यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 19, 2024

PostImage

पोलीस भरती (मैदान चाचणी) ला येणाऱ्या उमेदवारांकरीता  राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था


 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

पटेल मंगल कार्यालय गडचिरोली येथे दिनांक २० जून पासून ही व्यवस्था सुरू होणार

 दिनांक १८ जून २०२४ गडचिरोली

आपल्या गडचिरोली जिल्हा केंद्रावर १९ जून पासून पोलीस भरतीची मैदान चाचणी परीक्षा घेण्यात येत असून या मैदान चाचणीला बाहेरून येणाऱ्या  उमेदवारांकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राहण्याची व सायंकाळी मोफत जेवणाची व्यवस्था उभी केली आहे. आपल्या गडचिरोलीतील चंद्रपूर रोडवरील पटेल मंगल कार्यालयामध्ये दिनांक २० जून पासून ही व्यवस्था सुरू होणार  आहे. तरी गरीब गरजू उमेदवारांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर आपल्या  मैदान चाचणीच्या दिनांकासह नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
उमेदवारांनी येताना खालील सूचनांचे पालन करावे
 १ ) कपडे, अंथरूण-पांघरूण ,टावेल, ब्रश, साबुन ई. दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य सोबत आणावे
२) हॉल तिकीट ची झेरॉक्स.
३) ओळख पत्र( आधारकार्ड, ई.)झेरॉक्स
 खालील  दिलेल्या नंबर वर आपले नाव नोंदवून घ्यावे

सूरज मस्के आमदार जनसंपर्क कार्यालयीन सहकारी - 9022163191
राजू शेरकी भाजपा शहर उपाध्यक्ष - 9579474414
हर्षल गेडाम भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष  -8668403959
तुषार सातपुते पी ए - 94238 41481


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 19, 2024

PostImage

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आगामी विधानसभा/जि.प./पं.स. निवडणुका संदर्भात आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी आढावा बैठक पार पडली


 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात, पूर्व विदर्भ संपर्क नेते, आमदार मा. श्री. भास्कर जाधव साहेब, पूर्व विदर्भ समन्वयक मा. श्री. प्रकाश जी वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री मा महेश जी केदारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, अहेरी विधानसभा सभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख मा. श्री. रियाज भाई शेख यांच्या नेतृत्वात आज आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळेस गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मा. श्री महेश जी केदारी साहेब यांनी तालुका प्रमुख यांना परस्पर विचारणा करत तालुक्यातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बुथ प्रमुख, शाखा प्रमुख यांचा आढावा घेतला तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. येणाऱ्या  विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागा असे ताकीद दिले. लोकसभे मध्ये आपण ज्या प्रमाणे काम केले त्याच पद्धतीने नियोजन बद्ध काम येणाऱ्या काळात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी सुद्धा करायचे आहे आणि शिवसेनेचा भगवा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये फडकवायचा आहे असे प्रतिपादन दिले. त्यानंतर मा. श्री. रियाज भाई शेख जिल्हा प्रमुख अहेरी यांनी मार्गदर्शन करताना विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ घालवण्या पेक्षा तसेच आपसी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढवण्याकरिता गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा मंत्र ध्यानात ठेवून एकजुटीने काम करावे.  येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यानंतर विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष देऊन जोमाने कामाला लागावे. पक्षाचा आदेश ज्या प्रमाणे येणार त्याच प्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांना सोबत घेऊन काम करण्यात यावे असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. या संपूर्ण पदाधिकारी बैठकीचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख श्री अक्षय पुंगाटी यांनी पार पाडले. यावेळेस बैठकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना अंगीकृत सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 18, 2024

PostImage

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा  बँकर्स आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


 

गडचिरोली दि 18: शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे तसेच कीटकनाशकांची उपलब्धता वेळेवर व्हावी याकरिता खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी बँकाना दिले. तसेच शेतकऱ्यांनी देखील कर्ज मागणीसाठी बँकेकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
    श्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्जाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच घेण्यात आला, यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत घोंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नारायण पौणीकर, भारतीय रिझर्व बँकेचे क्षेत्रीय अधिकारी श्री गणवीर, आरसेटीचे संचालक कैलास बोलगमवार, युवराज टेंभुर्णे,  तसेच विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     श्री भाकरे यांनी पुढे सांगितले की पाऊस पडायला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांकरिता पुढील तीन-चार आठवडे महत्वाचे असून बँकानी त्यापुर्वी  विशेष मोहिम राबवून खरीप पिक कर्ज वाटप पुर्ण करावे. राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांतर्फे पीककर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्जासोबतच बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांतर्गत प्राधान्यक्रम क्षेत्रात (कृषी, कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, गृह कर्ज, शिक्षण, वनीकरण इत्यादी ) कर्जवाटपाचे जास्तीत काम करण्याचे व चालु आर्थिक वर्षासाठी मागील वर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्याचे त्यांनी सांगितले. 
जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षात एकूण 1770 कोटी वार्षिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी कृषीसाठी एकूण 650 कोटी त्यात खरीप पीक कर्जासाठी३३५ कोटी व रब्बी साठी 50 कोटी  व कृषी मुदत कर्जासाठी 265 कोटीचे उद्दीष्ट आहे. याशिवाय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमइ) 420 कोटी, इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 150 कोटी व प्राथमिक क्षेत्र वगळून 550 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 31 मे 2024 पर्यंत 76 कोटीचे खरिप पीक कर्ज वाटप झाले आहे. 
मागील आर्थिक वर्षात एकूण 1675 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते यात जिल्ह्याने 1941.17 कोटीचे कर्जवाटप करून चांगली कामगिरी करत 115.89 टक्के उद्द‍िष्ट साध्य केले. त्यात पीक कर्जासाठी 375 कोटीच्या उद्दिष्टापैकी 189 कोटी 63 लाख खरिप व 14 कोटी 7 लाख रब्बीसाठी असे एकूण 203 कोटी 70 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सादर केली.
खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर नको
खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यासाठी रामागुंडम येथील नॅशनल फर्टीलायझर कंपनीद्वारे जिल्ह्याभरात रोड वाहतूक द्वारे खत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित कंपनीस पत्र देण्याचे तसेच वडसा रेल्वे स्टेशनवरील खतरॅकपॉईंटला पावसापासून बचावासाठी छत बांधून बंदिस्त खोली वाढविण्याकरिता विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांना सुद्धा पत्र देण्याच्या सूचना श्री भाकरे यांनी दिल्या. 
तक्रार निवारण कक्ष सक्रीय ठेवा
बी-बीयाणे, खते, किटकनाशक व पीककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी स्थापण करण्यात आलेले तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष सक्रीयपणे कार्यरत राहण्याची   दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची कर्ज प्रकरणे, आरसेटी अंतर्गत प्रशिक्षणाच्या कामकाजाचा तिमाही आढावा घेतला.
बैठकीला संबंधीत अधिकारी व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 17, 2024

PostImage

गडचिरोली शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर आमदार डॉ. देवरावजी होळी


 

 गडचिरोली शहरातील १ कोटी रुपयांच्या कामांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

दिनांक १७ जून २०२४ गडचिरोली

 गडचिरोली शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोलीतील शाहूनगर, विवेकानंद, व कार्मेल शाळेच्या मागील परिसरातील १ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते बंदिस्त नाली इत्यादी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.

याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, देवाजी लाटकर, संजय बर्वे, रामकृष्ण ताजने सर, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, राजू कांबळे, अरबाज शेख वालदे सर, आकरे जी, वराठे जी समीर ताजने, आशा शेंडे, विद्या उईके, टेभुर्णे जी, हिम्मतराव खरवडे, पंकज शृंगारपवार, योगेश कोडापे, विपुल येल्लट्टीवार, शामराव रामटेके, मोहन येरमे, गौरव येणप्रेड्डीवार उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 17, 2024

PostImage

सुभाषग्राम परिसरातील  कृषि, घरघुती व व्यवसायी मीटर रिडिंगमध्ये  दलालाच्या मार्फत होणाऱ्या  गैरप्रकाराची चौकशी करा


 

शेतकऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन 

रिडिंग मध्ये  फसवणूक करून  दलाल लाभ घेत असल्याचा केला आरोप

दलालावर तातडीने कारवाई करा, कारवाई न केल्यास आंदोलन

दिनांक ८ जून चामोर्शी

सुभाषग्राम परिसरातील कृषी(A G ), घरघुती (D.L.), व व्यवसायी कनेक्शन ( C.L) रिडिंग  करताना  रिडिंग कमी असताना जास्त दाखवून व जास्त असलेल्यांची रिडिंग कमी दाखवून  दलालाच्या मार्फतीने  मोठ्या प्रमाणामध्ये  फसवणूक करण्यात येत आहे.  यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांना  फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे .त्यामुळे   या संपूर्ण प्रकरणाची व दलालाची चौकशी करून  यातील दोषींना अटक करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे केली.

सदर प्रकरण अतिशय गंभीर असून रिडिंग संदर्भात असलेल्या प्रकरणाची व आर्थिक लाभ घेवून फसवणुकीचे काम करणाऱ्या दलालाची चौकशी करून कारवाई  करावी त्याचेवर कारवाही न केल्यास या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी रवींद्र कीर्तीलिया ,बिंद्रावन मल्लीक महेश मंडल , पंचानन सरकार ,विधान मंडल, पानिपत सरकार, प्रशांत सरकार, विश्वनाथ मल्लीक, निरंजन बाछाड पंकज रॉय,  यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 17, 2024

PostImage

गडचिरोली पोलीस भरतीची (२०२३-२४)ची  शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळ्यानंतर घ्या


 

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे जिल्ह्यातील उमेदवारांची निवेदनाच्या माध्यमातून  मागणी.

दिनांक १७ जुन २०२४ गडचिरोली

  गडचिरोली पोलीस भरती (२०२३-२४) ची शारीरिक परीक्षा आणि मैदानी चाचणी प्रक्रिया दि.  १९ जून २०२४ पासून घेण्यात येत असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु आता पावसाळ्याला सुरुवात होत असून  दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतो व जिल्ह्यातील असंख्य मार्ग अनेक दिवस बंद पडतात तसेच पावसाळयात  उमेदवारांना राहण्याची व ईतर सोयीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहे परिणामी  भौतिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेपासून या उमेदवारांना वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.करिता सदर  चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.
यावेळी  अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष कुणाल कोवे,  उमेश उईके, सुरज मडावी, स्वप्निल मडावी, भारत अलाम , निखिल वाकडे, रुपेश चौधरी, प्रज्वल गेडाम, यांच्या नेतृत्वात  सहभागी उमेदवारांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांना निवेदन दिले .याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , प स माजी उप सभापती विलासजी दशमुखे प्रामुख्याने उपस्थित होते.

 एक दिवस आधी भरतीच्या ठिकाणी जाणाऱ्या मुलांना पावसाळा राहिल्यास झोपायला अडचण निर्माण होईल.  मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील उमेदवारांसाठी रस्ते व मार्ग बंद पडतात .  दळणवळणाची साधनेही  बंद राहतात परिणामी चाचणीच्या ठिकाणीं वेळेवर पोहचणे कठिण होईल. वर्षभर जमिनीवर १०० मीटर धावण्याचा सराव केल्यानंतर, रस्त्यावर चाचणी घेतल्यास पाय अडकल्यामुळे गुडघा आणि पायाला कायमची दुखापत होऊ शकते.  पावसात चेंडू फेकल्याने चेंडू कोरडा राहू शकत नाही, प्रगतीशील चेंडू हातातून निसटू शकतो किंवा दुखापत होऊ शकते.  कधी पाऊस पडतो तर कधी नाही, मुलांना समान संधी मिळत नाही.  भेदभाव होईल आणि गुण कमी जास्त येतील.  तसेच, मैदानी चाचणी पावसात घेतल्यास १६०० मीटर धावणे आणि शेतात चिखल असल्यास १०० मीटर धावणे शक्य होणार नाही.  तसेच मैदानी चाचणीच्या तयारीनुसार येणाऱ्या गुणांपेक्षा पावसात घेतल्याने मुलांना खूप कमी गुण मिळतील.  हा मुलांवर अन्याय होईल.

 करिता ही  शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आपली मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून आपल्यावर अन्याय होणार नाही या संदर्भात पत्र व्यवहारद्वारे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी निवेदकाना दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 17, 2024

PostImage

येणारी  निवडणूक जिंकायचीच या हेतूने कामाला लागा


 

आ. डॉ. देवरावजी होळी यांचे फराडा-विक्रमपुर जिल्हा परिषदेच्या  सर्कल बैठकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन


दिनांक १६ जून २०२४ चामोर्शी

राज्यात लवकरच निवडणुका लागणार असून ही निवडणुक  आपणाला  जिंकायची आहे. त्या दृष्टीने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी फराडा-विक्रमपूर जिल्हा परिषदेच्या सर्कल निहाय बैठकीच्या प्रसंगी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.*
*यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, उपसरपंच प्रभाष सरकार, उपसरपंच शेषराव कोहळे, उपसरपंच जुनघरे, विष्णू ढाली, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, भाजपचे जेष्ठ नेते भाऊजी पाटील दहेलकर, युमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी, राजू पोटे, अरुण बेजंकीवार, रवी पाल, रामचंद्र वरवाडे राजूभाऊ मोगरे, मारोती उमलवार, जानकीराम आभारे, भुजंग आभारे, नरेश पाल,हृदय बाला, दिपक दास, जैराम चलाख,  ज्ञानेश्वर कुणघाडकर, देव्रत बिश्वास, बादल डे, भावेन मंडल, अजय मंडल, प्रदीप सरकार यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

मा.खा.श्री.अशोक जी नेते यांची खरपुंडी येथे तेरवी कार्यक्रमाला भेट देऊन नैताम परिवारांचे केले सांत्वन.दिं.१६ जून २०२४
गडचिरोली:-खरपुंडी येथील
भाजपाचे तालुका महामंत्री रमेश जी नैताम यांचे मोठे बंधू स्व.योगेश देवनाथ नैताम हे दि.४ जून ला श्री.बुट हाऊसचे मालक रवी वासेकर यांच्या मृत्यूच्या अंत्यविधीला गेले होते.पण अचानक हादसा होऊन गाडी उतारावरून खाली आल्याने अडविण्याच्या नादात त्यांचा अचानक पणे हादसा होऊन जागीच मृत्यू झाला.या संबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांना  माहिती मिळाल्यावर तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून  त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत दुःखात सामील होऊन नैताम परिवारांचे सांत्वन केले.

यावेळी तेरवी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश चिटणीस रमेशजी भुरसे,डाँ. चंदाताई कोडवते,डाँ. नितिन जी कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, रमेश जी नैताम,निलेश सोमनकर तसेच गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

महायुती सरकारच्या दुर्लक्षित व असंवेदनशील धोरणामुळे दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे.


गडचिरोली जिल्हा रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना उद्भवणार त्रास व जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधा बाबत मिळालेल्या तक्रारी याबाबत अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत आज रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक गंभीर त्रुटी माझ्या निदर्शनास आल्या.

गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे, प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे, रात्रपाळी वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे , फायर ऑडिट होऊन देखील योग्य खबरदारी घेतलेली नसणे, रुग्णालयातील रिक्त पदे व कोविड मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढणे अशा विविध गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन याबाबत सुद्धा अनेक तक्रारी आहे. अग्निशमनाबाबत कामे रेंगाळलेली आहे, अग्निशमना संदर्भात ठप्प असलेली कामे त्वरित पूर्णत्वास आणण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एम आर आय, एनजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सुविधा नसल्याने गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत असून अशा दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खोरी यातच सरकार गुंतले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असून देखील गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला योग्य न्याय मिळत नाही आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

प्रत्येक क्षण विकासासाठी.....!  प्रत्येक क्षण जनतेसाठी....!


 

आमदार डॉ. देवरावजी होळी

2.30 कोटी विविध योजनेतंर्गत  विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

दि. 16 जून 2024 चामोर्शी

चामोर्शी : विक्रमपुर पं. स. गणातील ग्रामपंचायत विक्रमपुर अंतर्गत कृष्णनगर 1.90 कोटी रु.  जयनगर 10.00 लक्ष रु. विक्रमपूर 20.00 लक्ष रु. नवग्राम 10.00 लक्ष रु. येथील एकंदरीत 2.30 कोटी रु. निधीचे विकास कामांचे विविध योजनेतर्गत मंजूर कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले 

यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, उपसरपंच प्रभाष सरकार, उपसरपंच शेषराव कोहळे, विष्णू ढाली, हृदय बाला, दिपक दास, जैराम चलाख, ज्ञानेश्वर कुणघाडकर, देव्रत बिश्वास, बादल डे, भावेन मंडल, अजय मंडल, प्रदीप सरकार उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

सावतेली समाज भवनाच्या नाम फलकाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते अनावरण


 

याप्रसंगी स्थानिक आमदार निधीतून किचन शेड बांधकामासाठी 10.00 लक्ष रु. देण्याचे आश्वासन पूर्ण करणार

दि. 16 जून 2024 चामोर्शी

चामोर्शी : सावतेली समाज भवनाच्या बाजूला समाज भवन बांधकासाठी 13 लक्ष रु. निधी उपलब्ध करून दिला होता दिलेला शब्द पूर्ण करत समाज भवन बांधकाम पूर्ण झाले. तालुक्यात सावतेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात असून या समाज भवनात लग्न सोहळा, नामकरण, वाढदिवस असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात त्यामुळे समाज भवनाच्या खुल्या जागेत किचन शेड बांधकामासाठी 10. 00 लक्ष रु देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी समाज बांधवानी आमदार महोदयांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. 

यावेळी प्रामुख्याने गजानन भांडेकर, शिलाताई वैरागडे, प्रा. रमेशजी बारसागडे शामराव दूधबळे, नानाजी बुरांडे, परशुराम दूधबावरे, बाबुराव कुकडे, वासुदेव भांडेकर, दिलीप चलाख, जयराम चलाख, काशिनाथ बुरांडे, विनोद खोबे, बंडुजी नैताम किशोर गव्हारे, सुरेश शहा, अरुण गव्हारे, या अनावरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांची काँग्रेस व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेट.   चामोर्शी येथे डॉ. किरसान यांनी महिला कॉग्रेस अध्यक्ष रजनी तन्नेरवार, प्रमोद सावकर वायलारवार, नगराध्यक्षा जयश्री वायलारवार, नगर सेवक नितिन वायलारवार, सभापती वैभव भिवापूरे, नगर सेवक वर्षा 
भिवापूरे, निकेश गद्देवार, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, गुरुदेव सातपुते, सभापती स्नेहा सातपुते, नगर पंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, नगरसेवक सुमेध तुरे,  डॉ. तामदेव दूधबळे, राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गाण्यारपवार यांचे निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देऊन निवडणुकीत मोलाचे योगदान व सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. सर्वांनी खासदार साहेबांचे औक्षण करुन शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन स्वागत केले.
       यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, तालूकाध्यक्ष प्रमोद भगत, माजी जि. प. सदस्य कविता भगत, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, शंकरराव सालोटकर, नदीम नाथानी, माणिकराव तुर्रे, अनिल कोठारे, के. डी. मेश्राम, वैशाली कोमलवार, महिला सचिव आचल चलकलवार, शितल चलकलवार, राखी पालारपवार, मुमताज सय्यद,पंकज वायलालवार,विजय शतलवार, कृष्णा नेताम, यशवंत त्रिकांडे, दिवाकर कोहळे, धनराज वासेकर, प्रफुल बरसागडे व मंडळी उपस्थित होते.

 

 

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही आमदार डॉ. देवरावजी होळी


 

 

 

 

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील 21.00 लक्ष रु. व गौरीपूर 79.00 लक्ष रुपयाचे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

दि. 16 जून 2024 चामोर्शी 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील सोनापूर 21.00 लक्ष रु. व गौरीपूर 79.00 लक्ष रुपयाचे येथील विविध विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले 

याप्रसंगी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, उपसरपंच शेषराव कोहळे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, अरुण कुणघाडकर, राजू वरगंटीवार, महानंद हलदार, विशाल मंडल, देव्रत बिश्वास, भवतोष मिस्त्री, रीना बाईन बाला, अमरीश बाला तथा ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 16, 2024

PostImage

आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ जी साळवे यांच्या मुलाच्या स्वागत समारंभात भेट


 

धानोरा येथील श्री. साईनाथ जी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळ्या निमित्त स्वागत समारंभात उपस्थिती

 दिनांक 15/06/2024 गडचिरोली

धानोरा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ जी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा निमित्त स्वागत समारंभ गडचिरोली येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल व लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला निमित्ताने स्वागत समारंभात आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिला.

यावेळी प्रामुख्याने परिवारातील साईनाथ जी साळवे, शशिकांत जी साळवे, गजानन जी साळवे अनंत जी साळवे, सारंग साळवे यांच्यासह आमदार कृष्णाजी गजबे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, कृ. उ. बाजार समिती संचालक बापूजी फरांडे, भाजपा युवा नेते पंकजभाऊ खरवडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लोमेशजी कोलते याप्रसंगी पदाधिकारी,  कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 15, 2024

PostImage

मृतक सुरज बाला यांच्या परिवाराचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सांत्वन


 

बहादूरपूर येथील सुरज बाला यांचे नुकतेच उपघाती निधन

दिनांक  15 जून 2024 बहादूरपुर

बहादूरपूर येथील मृतक सुरज बाला यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने बाला परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिवारातील कमवता पुरुष गेल्याने परिवाराची मोठी हानी झाली. आपल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत असे म्हणत.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बाला परीवारातील  सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी प्रामुख्याने  ज्योतिका बाला, मुलगी नेसा बाला वय 10 वर्ष, मुलगा साहिल बाला वय 8 वर्ष यांच्या परिवारातील सदस्यांसह  अमित बाला, सुनील बाला, कांतोराम मंडल, जगन्नाथ हलदार, उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 15, 2024

PostImage

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते मोबाईल शौचालय व्हान चे लोकार्पण


 

दैनिक देशोन्नती वृत्त पत्रातील बातमीची दखल जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे मोबाईल शौचालय व्हान उपलब्ध

जिल्हा स्टेडियम वर येणाऱ्या महिला व पुरुषांना मोबाईल शौचालय व्हान सकाळ व सायंकाळ उपलब्ध असणार
  

दि. 14 जून 2024 गडचिरोली

गडचिरोली : जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने व्यायाम व खेळण्याकरिता येणाऱ्या व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या  युवक, युवती व वयोवृद्ध यांची गैर सोय दुर करण्याकरिता मोबाईल शौचालय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना सोय उपलब्ध झाल्याने जिल्हा स्टेडियम येथील दुर्गंधी दुर होईल याप्रसंगी आमदार महोदयांनी मोबाईल शौचालय व्हानचा हजारो महिला व पुरुषांना वापर करता येईल

यावेळी प्रामुख्याने नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी पं. स. उपसभापती विलासभाऊ दशमुखे,  शुभम भरडकर, शास्वत भरडकर उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 14, 2024

PostImage

जावाहर वार्ड परिसराला लागून असलेला इटियाडोह पाठ्बंधारे विभाग परिसरातील कचरा साफ करा..- सीमा ताई डोंगरे


 

समाजवादी पार्टी  महिला महासभा जिल्हा अध्यक्ष सीमाताई डोंगरे यांनी इटियाडोह पाठ्बंधारे विभागाला दिले निवेदन...सफाई नं झाल्यास उभा करणार आंदोलन - 

देसाईगंज :- 
             देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड कमलानगर आणि जुनी वडसा रोड परिसरात  बिबट्याच्या धुमाकुळ ने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत जवाहर वार्ड ला लागून इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग चे कार्यालय आहेत याच ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात मोठं मोठी झाडे असल्याने बिबट्याने याच ठिकाणी आपले बस्तानं मांडले आहे.

  जावाहर वार्ड हा इटियाडोह पाठ्बंधारे विभाग ला लागून आहे आणि याच परिसरात बिबट नागरिकांच्या निदर्शनास आला आहे आणि याची परिसरात झाडे आणी मोठ्या प्रामानात कचरा आहे तरी हा कचरा साफ करावा अशी मागणी आज समाजवादी पार्टी महिला सभा जिल्हा अध्यक्ष सीमा ताई डोंगरे यांनी इटियाडोह पाठ्बंधारे विभागाकडे निवेदनातून केलेली आहे साफ सफाई नं झाल्यास इटियाडोह पाठ्बंधारे विभागासमोर समाजवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्याचा ईशारा या वेळेस देण्यात आला आहे सदर निवेदन देताना समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी सदस्य जिब्राईल शेख,प्रमोद करंडे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 14, 2024

PostImage

जावाहर वार्ड परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या बिबट्याचा तात्काल बंदोबस्त करा - इलियास खान


 

समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी वनविभागाकडे केली मागणी.

देसाईगंज :- 
             देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड कमलानगर आणि जुनी वडसा रोड परिसरात  बिबट्याच्या धुमाकुळ ने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत जवाहर वार्ड ला लागून इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग चे कार्यालय आहेत याच ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात मोठं मोठी झाडे असल्याने बिबट्याने याच ठिकाणी आपले बस्तानं मांडले आहे.रोज जावाहर वार्ड परिसरात येऊन कुत्रे आणि घरातील पाळीव प्राणी बिबट्या उचलून नेत आहे मागील काही दिवस पूर्वी झेंन लॉन परिसरात बिबटयाचा वावर असलेले सि्सिटिव्ही विडिओ प्रसार माध्यमावर वायरल झाले होते - नुकताच जवाहर वार्ड येथील नागरिकांनी परिसरात बिबट असल्याचे फोटो वायरल केले आहेत  जवाहर वार्ड कमलानगर येथील नागरिक बिबट्याच्या  ह्या आतंक मुळे दहशतीत आहेत. सदर बिबटया चा योग्य बंदोबस्त नं केल्यास भविष्यात मोठी घटना घडू शकते यामुळे सदर हिंसक बिबटयाचा योग्य बंदोबस्त करा अशी  मागणी समाजवादी पार्टी चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष आणि पत्रकार इलियास खान यांनी वनविभागाकडे केलेली आहे,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 13, 2024

PostImage

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहलचे नीट परीक्षेत यश


 
 वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल भारतीय स्तरावर आयोजित नीट परीक्षेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहल इंदिरा विनोद झोडगे  हिने नीट परीक्षेत यश संपादन केले आहे. तिने परीक्षेत ७२० पैकी ५९४ गुण प्राप्त केले आहे.ती कम्युनिस्ट पक्षाचे  जिल्हा कार्यकारिणी सदक्ष तथा आयटक राज्य सचिव  विनोद झोडगे यांनी मुलगी  असून स्नेहल हिने दहावी मध्ये ९६ टक्के  तर बारावी  ८९ मध्ये टक्के घेऊन उतीर्ण झाली होती. तिच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांनी  अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा अभिनंदन केले.तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.ड्रॉ. महेश कोपुलवार ,रिपब्लिकन पक्ष खोरीपा शहर शाखेचे अध्यक्ष प्रशांत डांगे ,महाराष्ट्र सरचिटणीस जीवन बागडे, तालुका अध्यक्ष नरेश रामटेके, पद्माकर रामटेके, तसेच देवराव चवळे,अँड जगदीश मेश्राम, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, मिलिंद भन्नारे ,सूरज शेंडे यांनी स्नेहल चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील मावशी तसेच गुरुजनांना दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 13, 2024

PostImage

गंजीवार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती..!!


अहेरी :तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती,सेवानिवृत्त वनपाल लक्ष्मणजी गंजीवार यांची मुलगी चि. सौ.का.लेखणी यांचा विवाह लक्ष्मणजी बलकी यांचा मुलगा चि.अमोल यांच्याशी आलापल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!
 
     या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

        यावेळी लक्ष्मणजी गंजीवार,सौ सरोजाताई लक्ष्मणजी गंजीवार, माजी सरपंच दिलीप गंजीवार, मदन भूपेल्लीवार,आशालू तोगरवार,सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर तोंम्बरलावार,अशोक सल्लम,प्रभाकर आणकारी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख विनोद कावेरी,मिलिंद अलोने सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 13, 2024

PostImage

११ जुन रोजी वादळी पावसाने छत हिरवले! छगन शेडमाकेंनी अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरले


देसाईगंज-
     तालुक्यातील अनेक गावांत ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावले. याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोका चौकशी करून अस्मानी संकटात सापडलेल्या अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या कुटंबियांच्या डोक्यावरील छत टाकुन देत कुटुंबीयांना सावरल्याने परिसरात शेडमाके एकच चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.
     देसाईगंज तालुक्यातील चिखली(रिठ)येथील विनोद विठ्ठल दुमाने या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या गरीबाचे ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने छत हिरावले. घरावरील संपुर्ण कवेलु उडाल्याने दुमाने कुटुंबियांना रात्र काढण्यासाठी दुसऱ्याच्या घराचा आधार घ्यावा लागला. देसाईगंज तालुक्यात विहीरगाव,पिंपळगाव,चिखली (रिठ)या परिसरातील घरांना वादळी वाऱ्यासह पावसाचा जबर तडाखा बसल्याचे निदर्शनास येताच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गावांकडे धाव घेऊन मोका चौकशी केली मात्र ठोस उपाययोजनेवर भर दिला नसल्याने राहायचे कुठे?असा गंभीर प्रश्न दुमाने कुटुंबीयांसमोर उभा ठाकला होता.
     दरम्यान देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतिने मोका चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.मात्र दुमाने कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था होईस्तोवर दुसऱ्याच्या घराचा आधार घेऊन राहावे लागेल,ही बाब गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. चौकशीत सदर कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत असल्याचे निदर्शनास येताच शेडमाके यांनी तत्काळ घरावर छत टाकुन देण्याची संपुर्ण व्यवस्था करून दिली.यामुळे शेडमाके परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागले असुन नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावून आल्याने भारावलेल्या कुटुंबियांनी शेडमाके यांचे आभार व्यक्त केले.यावेळी विनोद दुमाने, वत्सलाबाई पर्वते,बळीराम बादशाह,भुमेश शिंगाडे, हरिदास बगमारे,अजय मेश्राम आदी चिखली येथील नागरिक उपस्थित होते.

शेडमाकेंनी यापूर्वीही अनेकांना केली मदत
     कुठलाही राजकीय वारसा लाभला नसलेले छगन शेडमाके सामाजिक बांधिलकी जोपासण्यात सदैव अग्रेसर राहात असुन त्यांनी यापुर्वी अनेकांना नगद रोख रक्कम आर्थिक मदत देऊन नैसर्गिक संकटात धाऊन जाण्यात मौलिक भुमिका बजावली आहे.समाज व्यवस्था बळकट करण्यात काँग्रेसच सक्षम असल्याचा ठाम विश्वास असल्याने पक्षाची विचारधारा सोबतीला घेऊन शेडमाके आपली जबाबदारी ओळखून अनेकांना मदतीचा हात देत आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 13, 2024

PostImage

विरोधी पक्षनते वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंचाचे उपोषण मागे चौकशी करून कारवाईचे आदेश - गावगुंडांच्या त्रासाने पत्करला उपोषणाचा मार्ग


सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप बाबुराव ठाकरे यांनी गावगुंडाकडून ग्रामपंचायतीच्या कचरा कुंड्या मालमत्तेची तोडफोड, वारंवार धमक्या व झालेले हल्ले या विरोधात पोलिसात तसेच पंचायत समिती स्तरावर लिखित तक्रार देऊ नये कारवाई न झाल्याने दि.12 जून पासून आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तात्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. सदर आश्वासनानंतर सरपंच ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नींबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

आपले गाव स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी राहावे याकरिता सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप ठाकरे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावात कचराकुंड्या तयार केल्या. मात्र गावातील काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली. सोबतच गावातील मुख्य पानंद रस्त्यावरुन वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने जाऊन रस्त्याची दुर्दशा करण्यात आली. तरी या विरोधात आवाज उठवणाऱ्या सरपंच संदीप ठाकरे यांचे वर सलग दोनदा हल्ला झाला. याची वारंवार तक्रार पंचायत समिती स्तरावर तसेच पोलिसात देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने व गाव गुंडांकडून जीविताचा संभावित असल्याने अखेर न्यायासाठी सरपंच ठाकरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांनी कालपासून सिंदेवाही पंचायत समिती तथा तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार संघातील दौरा दरम्यान थेट उपोषण मंडपाला भेट दिली व सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत सदर मागण्यांची सखोल चौकशी करून खड्डेमय मार्गांची दुरुस्ती, व संपूर्ण मागण्यांची पूर्तता करावी असे वेळीच निर्देश दिले. यावर समाधान व्यक्त करीत मरेगाव (तुकुम )सरपंच संदीप ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही तहसीलदार पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडने, कृउबा संचालक नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, सचिन नाडमवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 13, 2024

PostImage

आढावा बैठकीत विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश .


 लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. 

आयोजित आढावा बैठकीस  उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, तहसीलदार उषा चौधरी, नगरपरिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही, काँग्रेस नेते प्राचार्य देविदास जगनाडे, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत व सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन बांधकाम याची इतंभुत माहिती घेतली. पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना मध्ये एकाच कंत्राटदाराला बहुतांश कामे दिल्याने अपूर्ण व सुरु न झालेल्या पाणीपुरवठा योजना कामे त्वरित करण्यात यावी अन्यथा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग , जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, कंत्राटदारांनी केलेल्या चुका,  झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा  विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक काळात आचारसंहिता लागू  होती. त्यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणार  नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 11, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेविसाव्या सत्रात सौ. संगीता संतोष ठलाल विजयी


 गडचिरोली :          
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे तेविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २४  कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री सौ. संगीता संतोष ठलाल यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "भृणहत्या" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
             सौ. संगीता संतोष ठलाल या मौजा-  कुरखेडा (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री, समिक्षक, स्फूट लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तीन हजार च्या जवळपास कविता व इतर साहित्याचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता, लेख , समिक्षणे प्रकाशित झालेली आहेत. व्हॉट्सॲप गृपवरुन सुरू असलेले त्यांचे स्वरचित विचारधारा हे सदर विशेष लोकप्रिय असून जवळपास १०००चा टप्पा या सदराने पार केलेला आहे. त्यांना अनेक ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे  तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या तेविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने, वंदना सोरते, अजय राऊत, माधुरी अमृतकार, मधुकर दुफारे,  सुनील मंगर, नरेंद्र गुंडेली, तुळशीराम उंदीरवाडे, पुनाजी कोटरंगे, सुरज गोरंतवार, गणेश रामदास निकम, प्रभाकर दुर्गे, विलास जेगठे, संगीता ठलाल,  सुजाता अवचट,  पी. डी. काटकर, मुरलीधर खोटेले, संतोष कपाले,  पुरुषोत्तम दहिकर,  खुशाल म्हशाखेत्री, रेखा दिक्षित, डॉ. मंदा पडवेकर, ज्योत्स्ना बंसोड, व जयराम धोंगडे  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

     - चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार - खा.अशोक नेते, विजय आपलाच असल्याचा व्यक्त केला विश्वास.


दि.०३ जून २०२४

गडचिरोली : आपल्या राजकीय जीवनाचा उपयोग मी आतापर्यंत समाजाच्या सेवेसाठीच केला, पुढेही करत राहणार, असे सांगत महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांनी उद्याच्या निकालात विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतमोजणी प्रतिनिधींच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. 

येथील सुमानंद सभागृहात झालेल्या या बैठकीत खा.नेते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लावण्यात मला यश आले. त्यामुळे मतदार मला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार तथा लोकसभा प्रमुख अतुलभाऊ देशकर, भाजपा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, गोंदिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अँड. येशूलाल उपराडे,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,माजी आमदार संजय भाऊ पुराम,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंब्बेवार, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, डॉ.मिलींद नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे,किसान आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश जी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, माजी जि.प.सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार,तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------
सेमाना देवस्थानात सकाळी पुजा

मतमोजणीसाठी रवाना होण्यापूर्वी खासदार अशोक नेते सकाळी साडेसहा वाजता गडचिरोलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थानातील हनुमान मंदिरात सहकुटुंब पूजा करतील. त्यानंतर ते मतमोजणी केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणीगडचिरोली, दि.3 : 4 जून रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांचेकडून करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. 4 जून रोजी येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी श्री. राहुलकुमार यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत  त्यांनी सूचना दिल्या.

मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या : 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळ्या कक्षात होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल लावण्यात आले आहेत. तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी 12 टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) साठी एक टेबल असे एकूण 97 टेबल मतमोजणीसाठी लावण्यात आले आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या, आरमोरी 22 फेऱ्‍या, गडचिरोली 26, अहेरी 21, ब्रम्हपुरी 23 आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या होणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 5 व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

मनुष्यबळ : मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण 117 मतमोजणी पर्यवेक्षक, 130 मतमोजणी सहायक, 120 सुक्ष्म निरीक्षक व इतर 101 सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्याव्यतिरिक्त 20 टक्के कर्मचारी अतिरिक्त राहणार आहेत. तर प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी, इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे 97 टेबलसाठी 97 प्रतिनिधी  नेमता येणार आहे.

सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली तब्बल 900 सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत. 

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीकरिता कृषी विद्यालयाच्या उजव्या बाजूला वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे. 

एकूण मतदार व झालेले मतदान : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लक्ष 17 हजार 207 मतदारांची नोंद आहे. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 315 पुरुष मतदारांनी (73.07 टक्के), 5 लक्ष 67 हजार 156 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के) तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 476 (71.88 टक्के) मतदारांनी 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदान पक्रियेत मतदानाचा हक्क बजावला आहे. 

टपाली मतपत्रिका :  85 वर्षावरील वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान प्रथमच गृहभेटी देवून टपाली मतपत्रिकेवर घेण्यात आले होते. त्यांचे व अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या एकूण 4939 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच सेनादलात कर्तव्यावर असलेल्या मतदारांच्या 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतपत्रीकांची मतमोजणी करण्यात येणार आहे. आजरोजीपर्यंत सेनादलातील मतदारांच्या 793 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. 

मतदान केंद्र : लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण 1891 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. यात आमगाव 311, आरमोरी 302, गडचिरोली 356, अहेरी 292, ब्रम्हपुरी 316 तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 314 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. 

उमेदवार : 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातून एकूण 10 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांचे  नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.  अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती), धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन),  विनोद गुरुदास मडावी, अपक्ष (अंगठी).

सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज), आदित्य जीवने (अहेरी), कविता गायकवाड (आमगाव) व इतर संबंधीत अधिकारी यावेळी मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात आमदार कृष्णाजी गजबे यांची कार्यकर्त्यांसमवेत घेतली आकस्मित भेट


आरमोरी:- आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन आमदार कृष्णाजी गजबे यांनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली  यादरम्यान रुग्णांनी त्यांना जाणवत असलेल्या समस्यांचा पाढा आमदारांसमोर वाचला असता आमदार गजबे यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी करून येथील डॉक्टर व नर्स यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व त्या रुग्णांना होत असलेल्या अडिअडचणी निदर्शनास आणून दिल्या व थेट जिल्हा शल्यचिकित्सक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सूचना दिल्या.* 

यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा भाजपा सचिव नंदूजी पेट्टेवार, आरमोरी शहराचे माजी नगराध्यक्ष पवनजी नारनवरे, तालुका अध्यक्ष पंकजजी खरवडे, आरमोरी न.प.चे माजी नगरसेवक भारतजी बावनथडे,  भाजपा शहर तालुका अध्यक्ष विलासजी पारधी, सामाजिक कार्यकर्ते नंदूजी नाकतोडे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अमोलजी खेडकर,  मुकुलजी खेवले, थामेश्वर मैंद, सुरज कारकुरवार व आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.*


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन


जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन

.    सायकल रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य – 300 हून अधिक पोलीस अधिकारी / अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक / युवती व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग.

.    जिल्हयातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर    
     सायकल रॅलीचे आयोजन.

    संयुक्त राष्ट्रसंघाने सन -2018 पासुन 03 जुन हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणुन घोषीत केलेला आहे.  तेव्हा पासुन 03 जुन हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणुन जगभरात साजरा केला जातो. जागतिक सायकल दिनाचे अनन्य साधारण महत्व मागील दोन दशकांपासून संपूर्ण जगाने मान्य केले आहे. सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकुल अशी शाश्वत वाहतुकीचे साधन आहे. तसेच नेहमीच सायकल चालविणे शरीर स्वास्थासाठी फायदेशिर आहे. लोकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलीचा वापर करावा यासाठी दरवर्षी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. 
 
    जागतिक सायकल दिनाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दि. 03 जुन 2024 रोजी सकाळी 06.00 वा. पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते इंदिरा गांधी चौकपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सायकल रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी सर्व सहभागी सायकलस्वरांना पोलीस दलाकडुन सहभागी प्रमाणपत्र देऊन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, सायकल दिन आहे म्हणुन सायकल चालवावी हा हेतु नसून सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही मोठ¬ा प्रमाणात संरक्षण होते. तसेच दररोज अर्धातास सायकल चालवले तरी आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते.  यात प्रामुख्याने लठ्ठपणा, ह्द्यविकार, मानसिक आजार या आजारांपासुन रक्षण होते. याबाबत सायकलीचे महत्व पटवुन दिले आणि सर्वांना आपल्या निरोगी जिवनासाठी सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहीत करुन जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर सहभागी सभासदांना अल्पोपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासोबतच जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली जिल्ह्रातील संपुर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर व पोस्टे, उपपोस्टे, पोमके स्तरावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत मोठ¬ा संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता.

        सदर कार्यक्रमाप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप हे उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

ग्राम काँग्रेस कमिटी कुणघाडा द्वारा आयोजित आभार सभा पार पडली


कुणघाडा ता.चामोर्शी जि. गडचिरोली येथे ग्राम काँग्रेस कमिटी कुणघाडा द्वारा आयोजित आभार सभा पार पडली सभेत कुणघाडा  क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेल्या निवडणुकीत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सदर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच येथील नवनिर्मित माता मंदिर ला भेट देऊन पाहणी केली. 
            यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई अलाम, पितांबर वासेकर, पांडुरंग टिकले, आनील  कुनघाटकर, सरपंच वसंत चलाख, श्रीकृष्ण कुंनघाटकर, दिलीप उडाण, अशोक भांडेकर, रामभाऊ सातपुते, लालाजी सातपुते, संदीप कुंनघाटकर, प्रेमचंद वासेकर, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, विनोद दुधबळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

नाट्यश्री चे आगळे वेगळे कवी संमेलन.


   स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ कवी, गायक व कव्वाल वामनदादा गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध स्तंभलेखक
विनायक ऊईके यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले.  प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कवयित्री कुसुमताई आलाम,  ज्येष्ठ कलावंत गोविंदराव बानबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      या कवि संमेलनात झाडीपट्टीतील एकूण पासष्ट कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. यावेळचे नाट्यश्रीचे कविसंमेलन आगळेवेगळे होते. सर्व कविंना एक विषय देण्यात आला होता.‌तो विषय म्हणजे "जोडीदार". 
             प्रत्येक कवी/ कवयित्रींच्या आपल्या जोडीदारावरील प्रेम, भावना, चीड,  राग -लोभ, आशा -अपेक्षा व्यक्त करणारे हे कविसंमेलन होते. विषय एक, संकल्पना एक, शिर्षक वेगळे, भावना वेगळ्या अशा या नाविन्यपूर्ण कविसंमेलनास ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच नवोदित कवींनी हजेरी लावून आपापल्या बहारदार रचना सादर केल्या. व संमेलनात चांगलीच रंगत आणली.
          भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार प्रा. ज्ञानेश्वर हटवार यांच्या 'प्रिये' या प्रेमकवितेने संमेलनाची सुरुवात झाली. तर ब्रम्हपुरी येथील बाल कवयित्री जोशा भर्रे व जिज्ञासा भर्रे या भगिनींचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ब्रम्हपुरीच्याच शिल्पा पाटील यांनी प्रसिद्ध कामगार कवी नामदेव ढसाळ यांना जोडीदार कल्पून सादर केलेल्या रचनेने संमेलनास वेगळाच रंग आणला. भंडारा येथील मेघा चेटूले यांनी 'जिवलग' तर गडचिरोलीच्या वंदना सोरते यांनी 'त्याची ती जोडीदार ' सादर केली.  पुन्हा भंडाऱ्याच्या हर्षा भुरे यांनी 'जोडीदार' तर  चामोर्शीच्या भावना रामटेके यांनी 'स्वप्न बघते तुजसंगे' म्हणत नवोदित प्रेयसींना स्वप्नात घेवून गेल्या. गडचिरोलीच्या सुनीता आकनूरवार यांनी 'अलवार नाते' उलगडून दाखवले तर वंदना मडावी यांनी 'ऋणानुबंध' जपण्याचा प्रयत्न केला. डोंगरगावच्या बाळकृष्ण ठाकूर यांनी 'लग्नगाठ' बांधण्याचा प्रयत्न केला, तर धानोऱ्याच्या सोपानदेव म्हशाखेत्री यांनी 'सहचिरिणी'च्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध कलावंत सुनील चडगुलवार यांनी त्यांच्या जीवनात लिहीलेल्या पहिल्याच 'कवितेने प्रेमात पडलो केंव्हा' या प्रश्नाची उकल केली,तर वडसा येथील नवोदित कवयित्री प्रियंका ठाकरे ने भावी 'जोडीदाराकडून अपेक्षा' व्यक्त केल्या. आयशा अलीची गझल बहारदार झाली तर भाजीपाला विकून कवीसंमेलनास आलेले कवी विलास जेंगठे यांनी 'माझी जोडीदार ती' कवितेद्वारे आपल्या जोडीदाराचे कौतुक केले. नुकतेच पतीचे निधन झालेल्या वर्षा गुरनुले या कविता सादर करतांना भावूक झाल्या आणि अक्षरशः संपूर्ण कवीमंच हळहळला. उपस्थित प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. गजानन गेडाम यांनी 'ती' सादर केली. नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी 'यासाठी केला होता अट्टाहास' सादर करुन त्यांची जोडीदार कुंदा यांच्यासह व्यतीत झालेल्या जीवनाविषयी आनंद व्यक्त केला. तर संमेलनाचे अध्यक्ष वामनदादा गेडाम यांनीही ते शिक्षक असून आपल्या अडाणी जोडीदारासोबत घालविलेल्या क्षणांची आठवण करून संपूर्ण कवीमंडळींना हसवून सोडले. 
         'नाट्यश्री' ने माझा योग्य तो सन्मान केला तसेच पारंपारिकतेला फाटा देऊन कायम स्मरणात राहील, असे वेगळे कवी संमेलन  आयोजित केले ' असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष वामनदादा गेडाम यांनी केले, तर 'नाट्यश्री' चे  संमेलन दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असते, असे मत आदिवासी साहित्यिक कुसूमताई अलाम यांनी व्यक्त केले.
     या कविसंमेलनात ज्ञानेश्वर हटवार, जोशा भर्रे, जिज्ञासा भर्रे, शिल्पा पाटील, हर्षा भुरे, मेघा चेटूले, बाळकृष्ण ठाकूर, रेश्मा बावणे, वसंत ताकधट, उज्वला नगराळे, भावना रामटेके, प्रियंका ठाकरे, सुनीता आकनूरवार, वंदना सोरते, मंगला कारेकर, वंदना मडावी, रंजना चुधरी, सोपानदेव म्हशाखेत्री, लता शेंद्रे, स्वप्नील बांबोळे, भिमानंद मेश्राम, उपेंद्र रोहनकर, राजरत्न पेटकर, राजीव जुमळे, विलास जेंगठे, सुनील चडगुलवार, वसंत चापले, खेमदेव हस्ते, पुरुषोत्तम ठाकरे, तुळशीराम उंदीरवाडे, गजानन गेडाम, पुनाजी कोटरंगे, वर्षा गुरनुले, सुरेखा बारसागडे, मुरलीधर चुनारकर, नागोराव सोनकुसरे, निळकंठ रोहनकर, आयशा अली, विजया पोगडे, प्रशांत भंडारे, कुसूमताई अलाम यांचेसह नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथील ६५ कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या.
          कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गजानन गेडाम यांनी केले. कवींचा व पाहूण्यांचा परिचय प्रा. अरुण बुरे यांनी करून दिला. तर संमेलनाची संपूर्ण जबाबदारी कविसंमेलन प्रमुख योगेश गोहणे यांनी सांभाळली. सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
        कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, गुणवंत शेंडे, मारोती लाकडे, निरंजन भरडकर, वसंत चापले, राजू चिलगेलवार, दादा चुधरी, दिलीप मेश्राम व राजेंद्र जरुरकर यांनी मेहनत घेतली.

     चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 4, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकविसाव्या सत्रात कु . प्रियंका ठाकरे विजयी


गडचिरोली :          
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे एकविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३३ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री कु. प्रियंका ठाकरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "बोल कळावे जोडीदारास" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
             कु . प्रियंका ठाकरे या गांधीनगर  (ता. वडसा, जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून नवोदित कवयित्री आहेत. ५० च्या जवळपास कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांचे दै. देशोन्नती व इतर वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत .  एखाद्या संस्थेतर्फे पुरस्कृत होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. त्या बी.ए. च्या तृतीय वर्षाला शिकत आहेत . 
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे  तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या एकविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने मुरलीधर खोटेले, जयराम धोंगडे, वंदना सोरते, भिमानंद मेश्राम, नरेंद्र गुंडेली, संतोष पाटील,  मनिषा हिडको, सोनू अलाम, डॉ. चंद्रकांत लेनगुरे,  तुळशीराम उंदीरवाडे,   प्रभाकर दुर्गे, सुजाता अवचट, पांडूरंग मुंजाळ, डॉ. मंदा पडवेकर, कु. मंदाकिनी चरडे,  रेखा दिक्षित,  प्रब्रम्हानंद मडावी, मनोहर दुधबावरे,  रोशन येमुलवार, नागोराव सोनकुसरे,  पुरुषोत्तम दहिकर,  संतोष कपाले,  विलास जेंगठे, प्रियंका ठाकरे,  
उपेंद्र रोहनकर, खुशाल म्हशाखेत्री, चरणदास वैरागडे, गजानन गेडाम,  संजय बन्सल, मधुकर दुफारे , संगीता अनील धोटे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

नवदांम्पत्यास शुभाशीर्वाद


आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी धानोरा हेटी येथील लालाजी उसेंडी यांची कन्या चि. सौ. का. स्नेहा व चि. प्रमेश यांचा विवाह सोहळ्यात भेट आणि लालाजी उसेंडी यांचे चि. पंकज व  चि. सौ. का. स्वरस्वती यांचा विवाह सोहळा आज दि. 2 जून 2024 रोजी धानोरा हेटी येथे संपन्न झाला उसेंडी व दुगा परिवारातील सदस्यांची भेट घेऊन नव वधू वरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात. 

यावेळी प्रामुख्याने लालाजी उसेंडी व दुगा यांच्या परिवारातील सदस्यांसह डॉ. बागराज धुर्वे, गणेश भूपतवार उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

उत्तम गुणवत्तेने स्वतः सोबतच जिल्ह्याचेही नाव मोठे कराआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

चामोर्शी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सत्कार

३० गुणवंत विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ व मिठाई देऊन गेला गौरव

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

दिनांक २ जून २०२४ चामोर्शी

प्रत्येक  विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात त्यांनी  त्या आपल्या  गुणवत्तेनुसार  स्वतःसोबतच जिल्हयाचेही नाव मोठे करावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित चामोर्शी तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी  केले.या समारंभात चामोर्शी तालुक्यातील  ३० गुणवंत विद्यार्थ्यांचा   आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते शाल श्रीफळ व मिठाई देऊन  सत्कार केला.

चामोर्शी तालुक्यातील शिवाजी शिवाजी हायस्कुल, जा. कृ. बोमनवार हायस्कुल, कृषक हायस्कुल, यशोधरा विद्यालय, कॉरमेल अकॅडमी, प्रेसिडेंसी इंग्लिश स्कूल, जि. पं. हायस्कूल, लोकमान्य माध्यमिक, राजश्री शाहू महाराज या विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी राकेश खेवले सर, दिलीप सोमणकर सर, विलास सर, उंदीरवाडे सर, संजय कुणघाडकर सर, लडके सर, दिलीप चलाख,  जयराम चलाख, प्रतीक राठी, उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी श्री. देविदास दुधबळे यांच्या कडील दागोबा देवस्थान येथील पारिवारिक कार्यक्रमाला भेट दिली.


आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी श्री. देविदास दुधबळे यांच्या कडील दागोबा देवस्थान येथील पारिवारिक कार्यक्रमाला भेट दिली. 

यावेळी प्रामुख्याने श्री. देविदास दुधबळे यांच्या परिवारातील सदस्यांसह जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी, विनोद पेशंट्टीवार उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

कोर्ट चौक ते इंदिरा गांधी चौक व शासकिय विश्राम भवन ते आय.टी.आय चौक मार्ग दिनांक 04 जुन ला रहदारीसाठी बंद


जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने गडचिरोली-चिमुर (12) लोकसभा मतदार संघातील मतमोजनीची प्रक्रिया दि. 04/06/2024 रोजी कृषी महाविदयालय (अॅग्रीकल्चर कॉलेज) सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडणार आहे. सदर मतमोजनी चे ठिकाण गडचिरोली-चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे मतमोजनी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते मोठया संख्येने येण्याची शक्यता आहे. मतमोजनी दरम्यान सदर महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणुन सदर  महामार्गावरील वाहतुक दि. 04/06/2024 चे सकाळी 05.00 ते रात्री 12.00 वाजे पर्यंत बंद करण्यात येत आहेे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी सदर मार्ग बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.
श्व्    पर्यायी वाहतुक मार्ग व्यवस्था  पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
1)    जड वाहने - इंदिरा गांधी चौक - चामोर्शी रोड - सेमाना देवस्थान - आंनदानगर कॉलनी– कोर्ट चौक – चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील
2)    हलके वाहने - आय.टी.आय चौक – एल.आय.सी. चौक - मा.सी.ई.ओ. बंगला चौक- शासकिय विश्राम गृह (सर्कीट हाउस) –जिल्हा सामाण्य रुग्णालय मार्गे चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील
 
मतमोजनीसाठी येणा­या उमेदवार व पक्षांचे कार्यकत्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय जिल्हा परिषद च्या खुल्या मैदानात केलेली आहे.  तरी याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

ब्रम्हपुरी तालुक्यातील 121 रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन चे वाटप


ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे.       सार्वजनिक वितरण प्रणालीत ई-पॉस मशीन चे महत्व मागील काही वर्षात अनन्य साधारण आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राशन वितरण प्रणाली पारदर्शकता ही ई-पॉस मशीन मुळे शक्य झाले आहे. 2016 मध्ये दिलेल्या मशीनमध्ये कालांतराने अद्यावत करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर मशीन मध्ये 4G नेटवर्क असून त्यामध्ये जिओ व व्हि आय कंपनी चे सिम आहे सोबत ज्यांचे अंगठे लागत नाही त्यांच्या करिता डोळे स्कॅनर सुद्धा देण्यात आले आहे अशा अद्यावत ई-पॉस मशीन दि.31 मे 2024 रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील 121 रास्त भाव दुकानदारांना तहसीलदार श्रीमती उषा चौधरी व अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले. नवीन ई-पॉस  मशीनद्वारे गतिशील नेटवर्कने लाभार्थ्यांना धान्य वितरण करणे आणखी गतिशील होणार आहे व ज्या वयोवृध्द लाभार्थीचे अंगठे लागत नाही त्यांना सुद्धा डोळे स्कॅन करून धान्य मिळेल. रास्त भाव दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीनचे वितरण करताना तहसीलदार उषा चौधरी, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे पुरवठा विभागाचे सपन गड्डमवार, दिलीप मेश्राम, दशरथ फुलझेले तसेच इट्रेगा कंपनीचे रोशन मडावी, सागर अगडे, अविनाश गणवीर व इतर कर्मचारी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते ‌.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

June 2, 2024

PostImage

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले यांनी शंभर टक्के निकाल लावून इतिहास रचला


महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले तालुका ब्रह्मपुरी येथील एस. एस. सी. मार्च 2024 चा निकाल 100 टक्के लागला. ब्रह्मपुरी प्रतिनिधी ‌ अनिल कांबळे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन सोहळा पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी श्री सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव भोसले ,श्री हेमराज कांबळी माजी उपसरपंच, श्री दादाजी कांबळे पालक, श्री निलकंठ देशमुख पालक ,ज्येष्ठ शिक्षक श्री मस्के सर, श्री पुरी सर, कुमारी अंशुल राऊत मॅडम यांचे उपस्थितीमध्ये गुणवंतांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .विद्यालयामध्ये एकूण 75 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 25 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये 35 विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीमध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयातून प्रथम कुमारी सानिया हेमराज कांबळी 86.60%, द्वितीय निलेश अतुल धोटे 84.20% तृतीय कुमारी उज्वला नीलकंठ देशमुख 83.60%,कुमारी चैताली दीपक इंदूरकर 82.80%,वैष्णवी शेषराज ठाकरे 82.40%, साहिल रवी मैंद 82.20% पूर्वा हिवराज नंदेश्वर 81.80%, निकीता लोमेश बन्सोड 80.60% रणवीर सुधीर गायधने 80.40%,पायल विनोद ठाकरे 80%, क्रिश विनोद शेंडे 80 %गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री पुरी सर यांनी केले. कार्यक्रमाला पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 14, 2024

PostImage

संत तुकारामांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी- डॉ. नरेंद्र आरेकर


"संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता" विषयावर व्याख्यान

निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण

गडचिरोली, दि. 13: संतांचे जन्म आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र, संतांची भुमी म्हणून ओळखला जातो. तुकारामांनी भक्ती, साहीत्य व अंभगाद्वारे  समाजात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य केले. अंधश्रद्धा, नितीमुल्ये, वैज्ञानिक दृष्टीकोन आदी विषयांचा उहापोह तुकारामांनी अभंगगाथेतून केला. तसेच अनेक अभंगातून प्रयत्नवाद व आशावादाचा पुरस्कार केला आहे. त्यांचे विचार परखड स्वरुपाचे असून समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. 

निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण आणि "संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता" या विषयावर विद्यापीठ सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून कुरखेडा येथील श्री. गो. मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. हेमराज निखाडे, प्रा. डॉ. धनराज पाटील, डॉ. प्रीती पाटील, मराठी विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सविता गोविंदवार तसेच विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मागदर्शन करतांना प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर म्हणाले, धार्मिक संप्रदाय, पंथ आणि संत यांचा विचारांचा प्रभाव कमी झालेला नाही. संताचे विचार आजही आहे. संताचे विचार मागे पडले नसून त्यांच्या विचारांचे सामर्थ्य लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच धर्म आणि श्रद्धा यांचा अनन्यसंबध आहे, तो भक्तीच्या मार्गाने सिद्ध होतो. जनता अधंश्रद्धेच्या मार्गाने जाणार नाही याची खबरदारी तुकारामांसह सर्व संतांनी घेतली. तुकारामांचा जनकल्याणाचा कळवळा कोरडा नव्हता तर त्याला कृतीचा सुगंध होता. जनसामान्यापासून अज्ञगण आजही तुकारामांचे अभंग गातात. तुकारामांचे विचार हे समाजातील अनेक वर्गांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ.आरेकर म्हणाले.

आपण जन्माला आलो, तर व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपल्या कार्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहीजे, हे एकदंरीत सतांच्या जीवनकार्यातून शिकायला मिळते, असे सहायक प्राध्यापक डॉ. सविता गोविंदवार म्हणाल्या.

प्रास्ताविकेत बोलतांना, संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध मागविण्यात आले होते. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकता यावा. त्यांचे विचार तळागळातील नागरीकांसह, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत हा दृष्टीकोन ठेवून सदर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पाहूण्यांचा परिचय मराठी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सविता गोविंदवार यांनी करून दिला. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण: 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ब्रम्हपूरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. स्नेहा विलास बनपुरकर हिला रोख रु.4 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी कॉमर्स विभागाची विद्यार्थीनी कु. हिमाद्री भूपती गाईन हिला रोख रु 3 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांक प्राप्त चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल हस्तक झाडे यास रोख रु. 2 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 
त्यासोबतच, प्रोत्साहनपर बक्षिसांमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी इतिहास विभागाची विद्यार्थिनी सायली मधुकर पालथिया, नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी डेझी निखारे तसेच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल आनंदराव निकोडे यांना संत तुकारामाची चरित्रगंगा व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 14, 2024

PostImage

सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी! परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात,पिंकु बावणेचा आंदोलनाचा इशारा


देसाईगंज / मोहित अत्रे-
      शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरीकांच्या कराच्या उत्पन्नातुन कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतांनाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असुन यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यथाशिघ्र उचलुन विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्याने नगर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
      देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावेत करीता शहराच्या सर्व्हे नं. २४/५ मध्ये ८ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात.मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु ठरू लागले असुन परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे.
     दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगतच्या परिसरात  पसरला आहे.हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे कठिण होऊ लागले आहे.अनेकांना मळमळ, पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत.ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी केली असुन समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत नगर प्रशासन काय कारवाई करते याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 14, 2024

PostImage

जिल्हा परिषदेंतर्गत रद्द पदभरतीचे परिक्षा शुल्क परत मिळणार उमेदवारांनी माहिती अद्यावत करण्याच्या सूचना


गडचिरोली दि. १३ मे : जिल्हा परिषद अंतर्गत मार्च-2019 व ऑगस्ट-2021 मधील गट-क व आरोग्य विभागाच्या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022  अन्वये रद्द करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. 5 सप्टेंबर 2023 पासुन सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरावी. त्या अनुषंगाने परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी यापुर्वी माहिती भरलेली आहे. अशा उमेदवारांनी स्वत:चे बँक खाते क्रमांक नमुद करुन माहिती अद्यावत करावी. 
उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत न झाल्यास जिल्हा परिषद, जबाबदार राहणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांकडुन प्राप्त कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषद पदभरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे. 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 14, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकोणिसाव्या सत्रात पत्रू हनुमंतू गोरंतवार (सुरज) विजयी


गडचिरोली :          
  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे एकोणविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी पत्रू हनुमंतू गोरंतवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या " प्रारंभ" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
             पत्रू हनुमंत गोरंतवार हे  पोंभुर्णा (जिल्हा- चंद्रपूर) येथील रहिवासी असून १०० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांचे नविन कविता संग्रह प्रकाशनाचे मार्गावर असून नुकत्याच प्रकाशित झालेल्या "रानगर्भ फुलत आहे" या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.  अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित असून सातत्याने कविता लेखनाचे  कार्य करीत आहे.  
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या एकोणिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम घोंगडे, संतोष कपाले, वंदना सोरते, सुरज गोरंतवार, राहूल शेंडे,  वसंत चापले, भिमानंद मेश्राम, हरिष नैताम, स्वप्नील बांबोळे,  नरेंद्र गुंडेली, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, जितू निलेकार,  मारोती आरेवार, गणेश रामदास निकम, तुळशीराम उंदीरवाडे,  चरणदास वैरागडे, पुरुषोत्तम दहिकर,  विलास जेंगठे, मिलींद खोब्रागडे, खुशाल म्हशाखेत्री, रेखा दिक्षित, डॉ. मंदा पडवेकर, सुजाता अवचट, मुर्लीधर खोटेले, पी.डी.काटकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
 
     - चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 12, 2024

PostImage

गोमनी परिसरातील अवैध रेती चोरीवर आळा घाला: अन्यथा आदोलन; सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे


गोमानी :-  मुलचेरा तालुक्यातील गोमनी परिसरातील अवैध रेतीच्या चोरीवर आळा घाला अन्यथा दिनांक १६/०५/२०२४ ला वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते त्योगाजी कुडवे यांनी आज दिनांक ११/०५/२०२४ रोजी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. 

 सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे कि मुलचेरा तालुक्यातील गोमनी परिसरात गोमनी,आंबटपल्ली व गोविंदपूर या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे.या तीन हि ग्रामपंचायती मार्फत विविध विकासकामे चालू आहेत. 

सदर जिल्ह्यात अजून पर्यंत एकही रेती घाटाचे लिलाव झाले नाही कुठेतरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राटदार साठगाठ करून रेतीचोरी जोमात करीत आहेत.

असे कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगमत केल्याने शासनाच्या महसुलाला कोट्यावधी रुपयांचा चुना लागत आहे.

अश्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने नियमित कारवाही करावी व तात्काळ निलंबित करून ज्या ठिकाणी अवैध उत्खनन व विकास कामे झाले त्या ठिकाणांची चौकशी करून मोका पंचनामा करावा व संपूर्ण अवैध उत्खनन झाले आहे, यास अधिकारी,कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्या पगारातून झालेल्या उत्खननाचा दंड वसूल करावा अन्यथा दिनांक 16/05/2024 रोजी वन परिक्षेत्र कार्यालय गोमणी समोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 12, 2024

PostImage

भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरभाऊ ढोलगे यांची नियुक्ती


गोमनी;- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष  शंकर  ढोलगे यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांचा नेतृत्वातखाली 

 निवड करण्यात आली आहे.अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आंदोलन करून उघडकीस आणणारे श्री शंकर ढोलगे.गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे 

यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांनी शंकर ढोलगे यांची निवड केली आहे 
 त्यांच्या या नियुक्तीमुळे शंकर ढोलगे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिवंदनाच्या वर्षाव होत आहे 
 संघटनेमार्फत जनतेची गोरगरिबांची. कामे करून तसेच अन्यायाविरोधात व अत्याचाराच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याची आश्वाती त्यांनी यावेळी दिली.
 त्यांच्या या नियुक्तीमुळे श्री. पंडितराव तिडके प्रदेश अध्यक्ष 
 अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तसेच श्री वसंतरावजी देशमुख प्रदेश कार्यकारिअध्यक्ष भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी शंकर ढोलगे यांची नियुक्ती करून जिल्हास्तरावर जिल्ह्यातील गरीब निराधार लोकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाऱ्याचा भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांना प्रतिकार करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याची. त्यांना पुन्हा एक संधी देण्यअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 11, 2024

PostImage

आयपीएल वर सट्टा लावणे भोवले पोलिसांनी ठोकला बेड्या


पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.

 


त्या पाश्र्वभुमीवर दि. 27/04/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा., पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. श्री. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅपच्या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला होता. 

 करिता सदर गुन्ह्राचा अधिक तपास केल्यानंतर आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गेे, 2) आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6) अक्षय गनमुकलवार, 7) फरमान शेख, 8) फरदिन पठाण, 9) इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे अप. क्र. 126/2024 कलम 420 भादवी. सह कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार बंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सदर गुन्ह्राचा अजुन बारकाईने तपास केला असता, आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि अहेरी दशरथ वाघमोडे यांनी दिनांक 08/05/2024 रोजी तेलंगणा राज्यातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवून ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी नामे 1) शेख जमशेद पाशा बशीर शेख, वय 32 वर्षे रा. बिबरा पो. दहिगाम तह. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) व बुकी नामे 2) रवि लसमय्या गडीरेड्डी वय 28 वर्षे रा. मुत्तमपेठ तह. कवटाला, जि. कुमरामभिम (तेलंगणा) यांना ताब्यात घेतले असता सदर दोन्ही आरोपी यांनी ऑनलाईन वेबसाईट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेटच्या सट्टयाचा जुगार खेळवित असल्याचे दिसून आले.  यावरुन पोस्टे अहेरी येथे अप क्र. 126/2024 या गुन्ह्रामध्ये नमूद दोन्ही आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांस नमूद कलमान्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा.यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. श्री दशरथ वाघमोडे, सपोनि. विजय चव्हाण, मपोउपनि. करीश्मा मोरे, पोउपनि. साखरे, पोउपनि. मरस्कोल्हे सह पोहवा./लोहंबरे, पोहवा/शेंडे, पोअं/पानेम, मपोअ./कुमराम व चापोअं/सिडाम यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 11, 2024

PostImage

अवैध रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुस्क्या


चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 09.05.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या बोथली नदी घाटातुन ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक करुन सावरी, गिरोला व आबमक्ता परीसरात करणार आहेत अश्या गुप्त माहिती वरून पहाटे 07.30 वा. दरम्यान सावरी ते गिरोला रोडवर कर्मविर शाळेजवळ सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळुन आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती बोथली नदीघाट येथुन चोरुन आणुन मौजा सावरी, गिरोला परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं. 15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 18,00,000/- असा एकुण 18,15,000/-रु. (अठरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) सुनिल शालीक गायकवाड वय 30 वर्षे रा. खानगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर 2) रविंद्र अंबादास काळसर्पे वय 35 वर्षे रा. बेंबडा ता. वरोरा 3) नितेश नथ्थुजी झाडे वय 33 वर्षे रा. अमरपुरी ता. चिमुर व मालक नामे 4) प्रविण शंकर मोहारे वय 35 वर्षे रा. गिरोला ता. वरोरा 5) दामोघर ताराचंद शेंडे वय 51 वर्षे रा. गुजगव्हाण ता. चिमुर पाहीजे आरोपी नामे 6) प्रशांत उर्फ माकोडा जनार्धन शामकुळे वय 40 वर्षे रा. खडसंगी ता. चिमुर यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 11, 2024

PostImage

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा­ऱ्या आरोपीस 25 वर्षाचा सश्रम कारावास


गडचिरोली येथील मा.विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री उत्तम एम.मुधोळकर यांचा न्यायनिर्णय 

 


सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील मौजा गोकुलनगर येथे दिनांक 27/01/2020 रोजी फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय 15 वर्षे ही नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असता, पिडीत मुलीचे नातेवाईक आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले वय 34 वर्षे रा. विवेकानंद नगर, गडचिरोली याने पिडीतेला सायंकाळी 06/00 वा. दरम्यान मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणून फुस लावली व बाजारातुन परत येत असतांना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे पिडीतेस झाडाझुडपात जोर जबरदस्तीने नेऊन जोर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले, आरोपी यांने पिडीतेला कोणाला काही सांगितले तर मी तुझ्या आईला, भावाला व तुला जादुटोना करुन मारतो अशी धमकी दिली, त्यानंतर दिनांक 28/01/2020 रोजी सकाळी 10.00 वा. पिडीता ही दुकानात जात असतांना, आरोपी याने पिडीतेला पाहुन तुझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. इकडे ये असे बोलुन घरात कोणी नसतांना पिडीतेला घरात ओढत नेऊन, तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी 07/00 वा. आरोपीच्या पत्नीने पिडीतेला व भावाला जेवायला बोलावून, जेवन करुन झाल्यानंतर आरोपीची पत्नी दुकानात व पिडीतेचा भाऊ घराबाहेर गेला असता, आरोपी नातेवाईक याने घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन पिडीतेचा तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली.  फिर्यादी हे नागपूर येथे कामा निमीत्त गेले असता व लॉकडाऊन असल्याने काम वरुन दीर्घ कालावधीने पर आल्यानंतर पिडीत मुलगी ही गर्भवती आढळुन आल्याने सदर घटना पिडीतेने फिर्यादीला सांगितल्याने फिर्यादी यांनी आपले मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत कायदेशिर कार्यवाही होणे करीता पोस्टे गडचिरोली येथे पिडीतेसह येऊन हकीकत सांगितली.

फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे गडचिरोली येथे दिनांक 05/09/2020 ला अप क्र. 401/2020 अन्वये कलम 376 (2) (एफ), (आय), (जे), 376 (3), 506 भादवी तसेच सहकलम 4,5,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012, कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दिनांक 06/09/2020 रोजी अटक करुन, तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 86/2020 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 09/05/2024 रोजी आरोपी शंकर सुधाकार टिंगुसले वय 34 वर्षे, रा. विवेकानंदनगर, गडचिरोली यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 376 भादवी, सहकलम 4,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावास व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा, कलम 506 भादवी मध्ये दोषी ठरवुन 05 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.  दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री.अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मा.सहा.पोलीस निरीक्षक पूनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधित प्रकारणात साक्षदारांशी समन्वय साधून प्रकारणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

 

 

 

 

 

 

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 9, 2024

PostImage

तहसीलदारांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध देण्यात आले.


आरमोरी :-  आरमोरी विधानसभा निवोचन क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम साहेब यांचा आरमोरी वळसा येथील तहसीलदारांना घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलबद्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी मा. दैने यांच्याशी माजी आमदार आनंदराव गेडाम साहेब यांनी दिनांक ८/५/२०२४ ला भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व १२ तालुक्याच्या तहसीलदारांची तातडीची बैठक लाऊन घरकुल लाभार्थ्यांनी रेती उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश व पत्र दिल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देश व पत्राचे घरकुल लाभार्थ्यांना रेतीची उपलब्ध  कशा पद्धतीने करण्यात आली.  या संदर्भात दिनांक ९/५/२०२४ ला आरमोरी वळसा तहसीलदार यांच्याकडून आढावा घेण्यात आला.  या प्रसंगी सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य पी.आर.आकरे ग्रामपंचायत सदस्य भोलेनाथ धानोरकर , रेमंचाद निकुरे आणि सर्व घरकुल लाभार्थी .


PostImage

खबरदार महाराष्ट्र

May 9, 2024

PostImage

शासकीय कामांसाठी अवैद्य रेती उत्खनन जोमात , महसूल विभाग व वन विभाग मात्र कोमात