रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
19-06-2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात, पूर्व विदर्भ संपर्क नेते, आमदार मा. श्री. भास्कर जाधव साहेब, पूर्व विदर्भ समन्वयक मा. श्री. प्रकाश जी वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री मा महेश जी केदारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, अहेरी विधानसभा सभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख मा. श्री. रियाज भाई शेख यांच्या नेतृत्वात आज आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळेस गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मा. श्री महेश जी केदारी साहेब यांनी तालुका प्रमुख यांना परस्पर विचारणा करत तालुक्यातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बुथ प्रमुख, शाखा प्रमुख यांचा आढावा घेतला तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागा असे ताकीद दिले. लोकसभे मध्ये आपण ज्या प्रमाणे काम केले त्याच पद्धतीने नियोजन बद्ध काम येणाऱ्या काळात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी सुद्धा करायचे आहे आणि शिवसेनेचा भगवा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये फडकवायचा आहे असे प्रतिपादन दिले. त्यानंतर मा. श्री. रियाज भाई शेख जिल्हा प्रमुख अहेरी यांनी मार्गदर्शन करताना विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ घालवण्या पेक्षा तसेच आपसी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढवण्याकरिता गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा मंत्र ध्यानात ठेवून एकजुटीने काम करावे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यानंतर विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष देऊन जोमाने कामाला लागावे. पक्षाचा आदेश ज्या प्रमाणे येणार त्याच प्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांना सोबत घेऊन काम करण्यात यावे असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. या संपूर्ण पदाधिकारी बैठकीचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख श्री अक्षय पुंगाटी यांनी पार पाडले. यावेळेस बैठकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना अंगीकृत सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments