समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
17-06-2024
शेतकऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन
रिडिंग मध्ये फसवणूक करून दलाल लाभ घेत असल्याचा केला आरोप
दलालावर तातडीने कारवाई करा, कारवाई न केल्यास आंदोलन
दिनांक ८ जून चामोर्शी
सुभाषग्राम परिसरातील कृषी(A G ), घरघुती (D.L.), व व्यवसायी कनेक्शन ( C.L) रिडिंग करताना रिडिंग कमी असताना जास्त दाखवून व जास्त असलेल्यांची रिडिंग कमी दाखवून दलालाच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांना फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे .त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व दलालाची चौकशी करून यातील दोषींना अटक करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे केली.
सदर प्रकरण अतिशय गंभीर असून रिडिंग संदर्भात असलेल्या प्रकरणाची व आर्थिक लाभ घेवून फसवणुकीचे काम करणाऱ्या दलालाची चौकशी करून कारवाई करावी त्याचेवर कारवाही न केल्यास या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी रवींद्र कीर्तीलिया ,बिंद्रावन मल्लीक महेश मंडल , पंचानन सरकार ,विधान मंडल, पानिपत सरकार, प्रशांत सरकार, विश्वनाथ मल्लीक, निरंजन बाछाड पंकज रॉय, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments