नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
11-05-2024
गडचिरोली येथील मा.विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री उत्तम एम.मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील मौजा गोकुलनगर येथे दिनांक 27/01/2020 रोजी फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय 15 वर्षे ही नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असता, पिडीत मुलीचे नातेवाईक आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले वय 34 वर्षे रा. विवेकानंद नगर, गडचिरोली याने पिडीतेला सायंकाळी 06/00 वा. दरम्यान मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणून फुस लावली व बाजारातुन परत येत असतांना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे पिडीतेस झाडाझुडपात जोर जबरदस्तीने नेऊन जोर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले, आरोपी यांने पिडीतेला कोणाला काही सांगितले तर मी तुझ्या आईला, भावाला व तुला जादुटोना करुन मारतो अशी धमकी दिली, त्यानंतर दिनांक 28/01/2020 रोजी सकाळी 10.00 वा. पिडीता ही दुकानात जात असतांना, आरोपी याने पिडीतेला पाहुन तुझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. इकडे ये असे बोलुन घरात कोणी नसतांना पिडीतेला घरात ओढत नेऊन, तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी 07/00 वा. आरोपीच्या पत्नीने पिडीतेला व भावाला जेवायला बोलावून, जेवन करुन झाल्यानंतर आरोपीची पत्नी दुकानात व पिडीतेचा भाऊ घराबाहेर गेला असता, आरोपी नातेवाईक याने घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन पिडीतेचा तोंड दाबुन जबरदस्तीने शारिरीक संबंंध केले व कोणालाही काही सांगितले तर तुला व तुझे भावाला, आईला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी हे नागपूर येथे कामा निमीत्त गेले असता व लॉकडाऊन असल्याने काम वरुन दीर्घ कालावधीने पर आल्यानंतर पिडीत मुलगी ही गर्भवती आढळुन आल्याने सदर घटना पिडीतेने फिर्यादीला सांगितल्याने फिर्यादी यांनी आपले मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत कायदेशिर कार्यवाही होणे करीता पोस्टे गडचिरोली येथे पिडीतेसह येऊन हकीकत सांगितली.
फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे गडचिरोली येथे दिनांक 05/09/2020 ला अप क्र. 401/2020 अन्वये कलम 376 (2) (एफ), (आय), (जे), 376 (3), 506 भादवी तसेच सहकलम 4,5,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012, कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दिनांक 06/09/2020 रोजी अटक करुन, तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 86/2020 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 09/05/2024 रोजी आरोपी शंकर सुधाकार टिंगुसले वय 34 वर्षे, रा. विवेकानंदनगर, गडचिरोली यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 376 भादवी, सहकलम 4,6 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावास व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा, कलम 506 भादवी मध्ये दोषी ठरवुन 05 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री.अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मा.सहा.पोलीस निरीक्षक पूनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधित प्रकारणात साक्षदारांशी समन्वय साधून प्रकारणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments