नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
25-06-2024
आमदार डॉ देवरावजी होळी
गडचिरोली येथे २५ जून आणीबाणी एक काळा दिवस या कार्यक्रमाचे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन
दिनांक २५ जून २०२४ गडचिरोली
लोकसभा निवडणुकीत "रायबरेली" मतदार संघातून तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांनी मतदारांना लाच देणे, सरकारी प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे, व सरकारी संसाधनाचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे, अशा प्रकारचे आरोप सिद्ध झाल्याने गैरप्रकार करून निवडणूक जिंकली म्हणून इलाहाबाद न्यायालयाने इंदिराजी गांधी यांना अपात्र करून ६ वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घातली. त्या निर्णयाचा विरोध करून इंदिराजीनी नेहरू- गांधी घराण्याची सत्ता वाचवण्यासाठी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर केली. त्या आणीबाणीचा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.
गडचिरोली येथे २५ जून आणीबाणी एक काळा दिवस या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे भाजपा जिल्हाध्यक्ष तर प्रमूख वक्ते नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांतजी देशपांडे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे , रमेश जी भूरसे ,रवींद्र ओल्लारवार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महामंत्री सौ.योगिताताई पिपरे तर आभार प्रदर्शन विलास पाटील भांडेकर यांनी केले.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ गीताताई हिंगे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेशजी बारसागडे , धानोरा तालुकाध्यक्ष सौ लताताई पुंगाटी, प्रामुख्यानं उपस्थित होते.
आणीबानीमुळे संविधाना नुसार चालणारा देश काँग्रेसच्या हुकूमशाहीवर चालू लागला. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आणली, सरकारविरुद्ध भूमिका घेणाऱ्यांना जेल मध्ये टाकण्यात आली. विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. संपुर्ण देशात सर्वसामान्य जनतेचे हक्क संपुष्टात आणल्या गेले. वृत्तपत्र कार्यालयाची विद्युत कापली, सिनेमा जगतवर सक्ती केली. अशी दडपशाही तत्कालीन काँग्रेस सरकारने केली त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments