RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
01-05-2024
कूरखेडा -कोरची मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदी वरील मोठ्या पूलाचे बांधकाम तांत्रिक अडचणी मूळे मागील २ महिण्यापासून बंद होते त्यामूळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होत मोठी समस्या निर्माण होणार होती मात्र या क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यानी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांचाकडे पाठपूरावा करीत व त्यांची व्हिडीओ कांन्फरेंस द्वारे संयुक्त बैठक घेत चर्चा केली व निर्माण झालेली तांत्रिक अडचण मार्गी लावली. यानंतर मागील २ महिण्यापासून बंद असलेले सदर पूलाचे बांधकाम पून्हा सूरू झाल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपुर ते रायपुर मंजूर नविन राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सद्या ब्रम्हपूरी ते वडसा, कूरखेडा,कोरची या मार्गाचे रूंदीकरण मजबूतीकरण तसेच या मार्गातील पूलाचे महामार्गाला अनूसरत आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येत आहे या अंतर्गत कूरखेडा सतीनदीवरील जूना मात्र व्यवस्थीत असलेल्या पूलाला तोडत याच ठिकाणी उंच व मजबूत नविन पूलाचा बांधकामाला सूरवात करण्यात आली होती मात्र सदर बांधकाम हे वनविभागाचा जमीनीवर असल्याने ४.९८ हेक्टेयर आर जागा वनविभागाकडून वळती करून घेण्याकरीता प्रस्ताव सादर करीत पर्यायी वनीकरणाकरीता ३१ मार्च २०२४ रोजी २७ लक्ष ९९ हजार २७ रूपयाचा भरणा राष्ट्रीय महामार्ग यांचा वतीने वडसा वनविभागाकडे करण्यास मान्यता देण्यात आली मात्र या खात्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामूळे रक्कम जमा करता आली नाही या तांत्रिक अडचणी मूळे सदर बांधकाम बंद होते.
सती नदी वरील हा पूल अत्यंत महत्वाचा आहे कूरखेडा ते कोरची, मालेवाडा,वैरागड याना जोडणारा आहे तसेच नदी पलीकडील अनेक लहान मोठी खेडी गावे या पूलाने तालूका मूख्यालयाशी जोडलेली आहेत.सद्या बांधकाम सूरू असलेल्या पूलाचा बाजूने कच्चा रपटा तयार करीत येथून वाहतूक सूरू आहे मात्र हा कच्चा रपटा पावसाळ्यात वाहून जाण्याची पूर्ण शक्यता असल्याने नविन पूलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास हा मार्ग बंद होत नागरीकांची मोठी अड़चन होत त्यांचात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.तालूक्यात या मार्गाला पर्यायी असलेले मार्ग फेर्याचे तसेच लहान पूल,गाव खेड्यातून गेलेले अरूंद व नागमोडी रस्ते यामूळे हा मार्ग धोक्याचा व जडवाहतूकी करीता अशक्य आहे त्यामूळे या नविन पूलाचे बांधकाम यूद्धपातळीवर करीत पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक सूरळीत करण्याकरीता आ.गजबे यानी पूढाकार घेत मूख्य वनसंरक्षक गडचिरोली, उपवनसंरक्षक वडसा तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता गडचिरोली यांचाशी संयुक्त व्हिडीओ कांन्फरेंस द्वारे चर्चा करीत हा प्रश्न मार्गी लावला तसेच बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणी मंगळवार रोजी आमदार कृष्णा गजबे व भाजपा तालूका अध्यक्ष चांगदेव फाये यानी प्रत्येक्ष भेट देत बांधकामाची पाहणी केली व तिथे उपस्थीत प्रोजेक्ट अभियंता नागा बाबू यांचाशी चर्चा करीत यूद्ध पातळीधर सदर बांधकाम पूर्ण करण्याचे तसेच पर्यायी बांधकाम करण्यात आलेल्या रपट्याचे मजबूतीकरण व उंचीकरण करण्याची सूचणा केली आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments