समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
29-06-2024
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून क्रीडा मंत्र्यांनी केली बैठकीची सूचना
पुढील आठवड्यात मंत्र्यांच्या दालनात बैठक
दिनांक २९ जून मुंबई
गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या व चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकाम संदर्भात आपल्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी क्रीडामंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असता क्रीडामंत्री ना . संजय जी बनसोडे यांनी बैठक आयोजित करण्याबाबत आपल्या विभागाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू असून, त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या स्टेडियमच्या जागेचा ताबा घेऊन बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला गती मिळावी , चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून काम सुरू करणे आवश्यक आहे. त्यात कॅनलला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी घेऊन बांधकाम सुरू करणे करिता आपल्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन होणे गरजेचे असून त्यात जलसंपदा विभागाच्या सचिवांनाही बोलवावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
याकरिता आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्राद्वारे मंत्री महोदयांना केली असता त्यांनी या संदर्भात बैठकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments