रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
17-06-2024
आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे जिल्ह्यातील उमेदवारांची निवेदनाच्या माध्यमातून मागणी.
दिनांक १७ जुन २०२४ गडचिरोली
गडचिरोली पोलीस भरती (२०२३-२४) ची शारीरिक परीक्षा आणि मैदानी चाचणी प्रक्रिया दि. १९ जून २०२४ पासून घेण्यात येत असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु आता पावसाळ्याला सुरुवात होत असून दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतो व जिल्ह्यातील असंख्य मार्ग अनेक दिवस बंद पडतात तसेच पावसाळयात उमेदवारांना राहण्याची व ईतर सोयीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहे परिणामी भौतिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेपासून या उमेदवारांना वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.करिता सदर चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष कुणाल कोवे, उमेश उईके, सुरज मडावी, स्वप्निल मडावी, भारत अलाम , निखिल वाकडे, रुपेश चौधरी, प्रज्वल गेडाम, यांच्या नेतृत्वात सहभागी उमेदवारांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांना निवेदन दिले .याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , प स माजी उप सभापती विलासजी दशमुखे प्रामुख्याने उपस्थित होते.
एक दिवस आधी भरतीच्या ठिकाणी जाणाऱ्या मुलांना पावसाळा राहिल्यास झोपायला अडचण निर्माण होईल. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील उमेदवारांसाठी रस्ते व मार्ग बंद पडतात . दळणवळणाची साधनेही बंद राहतात परिणामी चाचणीच्या ठिकाणीं वेळेवर पोहचणे कठिण होईल. वर्षभर जमिनीवर १०० मीटर धावण्याचा सराव केल्यानंतर, रस्त्यावर चाचणी घेतल्यास पाय अडकल्यामुळे गुडघा आणि पायाला कायमची दुखापत होऊ शकते. पावसात चेंडू फेकल्याने चेंडू कोरडा राहू शकत नाही, प्रगतीशील चेंडू हातातून निसटू शकतो किंवा दुखापत होऊ शकते. कधी पाऊस पडतो तर कधी नाही, मुलांना समान संधी मिळत नाही. भेदभाव होईल आणि गुण कमी जास्त येतील. तसेच, मैदानी चाचणी पावसात घेतल्यास १६०० मीटर धावणे आणि शेतात चिखल असल्यास १०० मीटर धावणे शक्य होणार नाही. तसेच मैदानी चाचणीच्या तयारीनुसार येणाऱ्या गुणांपेक्षा पावसात घेतल्याने मुलांना खूप कमी गुण मिळतील. हा मुलांवर अन्याय होईल.
करिता ही शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आपली मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून आपल्यावर अन्याय होणार नाही या संदर्भात पत्र व्यवहारद्वारे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी निवेदकाना दिले.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments