संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
21-06-2024
व्यस्त जीवनात योगासन करणे काळाची गरज.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे
दिनांक:- २१/०६/२०२४
गडचिरोली :- आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिर कॅम्प एरिया गडचिरोली येथे योगासन करण्याचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना योगासनाचे धडे दिले व त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, या व्यस्त जीवनात योग ही काळाची गरज असून ती लोक चळवळ झाली पाहिजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या देशाने संपूर्ण जगाला योग आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील अनेक राज्य,जिल्हा व मंडळांनी एकत्रपणे योग करण्याचे आयोजन केले आहे. यावेळी सर्वांना योगासन करून निरोगी राहण्याचे आव्हान प्रशांत वाघरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून योगासन केले.
त्याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेशजी भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खटी, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे, डॉ. नितीनजी कोडवते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, कामगार आघाडी प्रदेश सदस्य गोवर्धनजी चव्हाण, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेठकर, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, शहर महामंत्री केशव निंबोड,विनोद देवोजवार, नरेश हजारे, मा. खासदार अशोकजी नेते यांचे स्वीय सहाय्यक रवींद्रजी भांडेकर, सुरेशजी कुकडकर, चंदूजी देवाडकर, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, प्रतीमा सोनवाणे, सुनीता आलेवार, भारती खोब्रागडे, वैष्णवी डोंगरे, भूमिका बेर्डे, स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments