ProfileImage
49

Post

1

Followers

0

Following

PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 9, 2024

PostImage

चुडाराम बल्हारपुरे यांना मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचा पुरस्कार जाहीर


गडचिरोली -                

              जगप्रसिद्ध असलेल्या व गेल्या सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे  या संस्थेतर्फे  दरवर्षी मराठी साहित्यिकांना त्यांच्या विविध उत्कृष्ट  वांड्.मय निर्मीतीसाठी श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना नामवंत मराठी साहित्यिकांचे हस्ते  सन्मानित करण्यात येते. 
        महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या  पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास नाट्यलेखनाचे  पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील कार्यवाह तसेच पुरस्कार समिती सदस्य व साहित्यिक चांगदेव काळे यांनी पत्राद्वारे कळविले असून दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर, वा.अ.रेगे सभागृह , पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम),  येथे होणाऱ्या संस्थेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार सरस्वती पुरस्काराने सन्मानित मा. श्री शरणकुमार लिंबाळे, सुप्रसिद्ध साहित्यिक यांचे हस्ते अनेक मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. 
      या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र  असे आहे. विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी साहित्य सेवा प्रज्ञामंच , पुणे यांचा 'उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार -२०२३'  प्राप्त झाले आहे.
      यापुर्वी त्यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास नाट्यलेखनाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील 'गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार - २०२३ ', मौजा फलटण (जिल्हा- सातारा येथील धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार- २०२४ झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा- गडचिरोली यांचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४ इ. पुरस्कार प्राप्त झाले आहे . या नाटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात  या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
             चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
                चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे,  दै. पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),  मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),  व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 29, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत ऊकंडराव नारायण राऊत विजयी


   गडचिरोली 

          स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे एकोणचाळीसावे  सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी श्री. ऊकंडराव नारायण राऊत यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "अर्धांगिनी" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          श्री. ऊकंडराव नारायण राऊत हे पोर्ला (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद गडचिरोली येथून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना भजनाची व गाण्याची विशेष आवड असून नवोदित कवी आहेत. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गीते तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या एकोणचाळीसाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी. एस. बनसोडे, पुनाजी कोटरंगे, गजानन गेडाम,  अजय राऊत,  गणेश रामदास निकम, संगीता ठलाल,  तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे, रेखा दिक्षित, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, सोनाली रायपुरे - सहारे, डॉ. मंदा पडवेकर, लता शेंद्रे, मुरलीधर खोटेले, रोहिणी पराडकर, वंदना मडावी, वंदना सोरते, सुरेश गेडाम, यामिनी मडावी, कृष्णा कुंभारे, सुभाष धाराशिवकर, सुनिल चडगुलवार, सिध्दार्थ गोवर्धन, सोनू अलाम, विलास टिकले, ऊकंडराव नारायण राऊत, पुरुषोत्तम दहिकर, चरणदास वैरागडे,  शैला चिमड्यालवार, ज्योत्स्ना बंसोड, केवळराम बगमारे,  खुशाल म्हशाखेत्री, पी.डी.काटकर,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024

PostImage

जरावंडी ग्रामपंचायतचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर


जारावंडी परिसरातील अत्यंत ज्वलंत समस्या घेऊन व मागण्यान्ची पूर्तता व्हावे.या भावनेने मा. मुकेशभाऊ कावळे ग्रा. पं. सदस्य जारावंडी यांच्या पुढाकारातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे  विवीध मागन्या साठी निवेदन सादर करण्यात आले व काही ग्राम पंचायत स्थरावरील समस्यांसाठी CEO गडचिरोली  याना सुद्धा निवेदन देण्यात आल

ग्रामपंचायत जाराववंडी तर्फे आठवडी बाजार भरतो त्या बाजारात पावसाळ्याच्या वेळेस गड्डे पडून त्या खड्ड्यामध्ये पाणीच भरतो आणि चिखलाचे पण साम्राज्य असते त्यामुळे ग्राहकांना आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे. जवळपास 15 ते 20 गावांचा त्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून त्यावेळेस दुकानदारांना ग्राहक मिळत नसल्यामुळे दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत .

     हे निवेदन सादर करताना जारावंडी परिसरातील प्रतिष्ठित नागरीक जिल्हा कार्यालयात उपस्थित होते त्यात प्रामुख्याने मान. जयेंद्रजी पवार, अध्यक्ष आ.वि.का. संस्था जारावंडी,संतोष मडावी उपसभापती (आ.वि.का. संस्था) हरिदासजी टेकाम माजी सरपंच, दयाराम सिडाम,गुरुदास टींगुसले, रेश्मा सुरपाम,शीतल शेडमाके,मालता मोहूर्ले सह जारावंडी तिल बहुसंख्येने महिला 
उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024

PostImage

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळावे- मा.खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन


 

दिं. २६ सप्टेंबर २०२४

आष्टी:-  युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. २६ सप्टेंबर ला श्री..छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था,व श्री.छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल क्लब आष्टी द्वारा भव्य  फुटबॉल सामन्याचे आयोजन महात्मा ज्यो.फुले हाँय.च्या पटांगणात करण्यात आले होते.

माजी खासदार अशोकजी नेते यांनी फित कापुन व दीपप्रज्वलन करत  पायाने फुटबॉल उडवून सामन्यांचे उद्घाटन केले. या फुटबॉल सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे.कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस  मोबाईल मध्यें व्यस्त असतांना दिसते अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही.यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आपण हा फुटबॉलचे सामन्यांचा खेळ एक हप्ता चालतोय आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या फुटबॉल प्रतियोगितेचे प्रथम पुरस्कार मा.खा.श्री. अशोकजी नेते यांचेकडून ५१,००१/- व शिल्ड पोलीस निरीक्षक काळे यांचेकडून द्वितिय पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे यांच्याकडून ३१,००१/- व शिल्ड तृतीय पुरस्कार आमदार देवरावजी होळी यांचेकडून २१,००१/- व शिल्ड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे ह्यांचेकडून चतुर्थ पुरस्कार ॲड.विश्वजीत कोवासे यांचेकडून ११,००१/-व शिल्ड एफ.डी. सी एम यांचेकडून अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले.

यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव जी कोहळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे,आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे,पांडे सर,बैस सर, प्राचार्य साहेब व शिक्षकवृंद, रतन पोतगंटवार,अशित बैरागी,योगेश बिशवास, शुभम हावलादार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024

PostImage

मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला गती देण्यासाठी पुरातत्व विभागासोबत आढावा बैठक संपन्न



दिं.२५ सप्टेंबर २०२४
गडचिरोली : विदर्भातील आणि संपूर्ण राज्यातील भाविकांची आस्था असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा बुधवारी मार्कंडा येथे आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक यांनी हे काम पुरातत्व विभागाच्या नियमावलीप्रमाणेच करावे लागत असल्याने वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर या कामाला गती देण्यासाठी कुशल कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना मा.खा.नेते यांनी केली.

मार्कंडा देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मलिक यांनी कार्यपद्धती सांगितली. इतर कोणत्याही कामासाठी मनु्ष्यबळ आणि मशिनरी वाढवून ते काम लवकर करता येते, पण हे पुरातन नक्षीकाम असल्याने दगडांवर कोरीव काम करून ते तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करण्यासाठी याची खात्री करूनच करावे लागत आहे. या नक्षीकामासाठी मोजकेच कारागीर असल्याने वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम थोडे उशिरा होत असले तरी चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावर नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना अशोक नेते यांनी केली.

या आढावा बैठकीपूर्वी सर्वांनी कामाची पाहणी केली. दगडांवर नक्षीकाम करण्यासाठी असलेले कारागिर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत. त्यांच्या कामाची नेते यांनी प्रशंसा करत कामाला गती देण्यास सांगितले.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, देवस्थानचे सचिव मृत्युंजय गायकवाड, आदिवासी नेते रेवनाथ कुसराम, भाजपचे युवा नेते नरेश अल्लसावार, अमोल आईंचवार, सेविकांत आभारे, देवस्थानचे सहकारी शेंडे, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात पुन्हा सुरू झाले काम

गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेले हे मंदिर जीर्णोद्धाराचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट स्थितीत थांबलेले होते. तत्कालीन खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे काम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया केली. त्याचवेळी मंदिराच्या कामाला सुरूवात करण्यावरून हरणघाटचे मुरलीधर महाराज व नागरिक उपोषण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र अशोक नेते व तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी हे काम पुन्हा सुरू करण्यासंबंधी प्रक्रिया झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुरलीधर महाराज मंदिराच्या आवारातच अन्नत्याग करण्यासाठी बसले होते. पण अशोक नेते यांनी एप्रिल महिन्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याला गती देण्यासाठी माजी खा.अशोक नेते यांनी ही बैठक घेतली


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 25, 2024

PostImage

पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी


 

दिं.२५ सप्टेंबर २०२४

गडचिरोली :-अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी,एकात्म मानवतावादांचे प्रणेते,पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज माजी खासदार अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे माजी खासदार तथा  भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी पं. दीनदयाल उपाध्याय 
यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस  माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रामुख्याने महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जी दत्ता, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ता.महामंत्री बंडू जी झाडे,रमेश नैताम,विजय कुमरे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे,ओबीसी चे नेते दिपक सातपुते,शामभाऊ वाढई,पत्रकार माहेश्वरी जी,रेखाताई महाजन, भुपेश कुळमेथे,श्रीकांत पतरंगे, सुधाकर वैरागडे,अरुण नैताम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 22, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत सुनिल चडगुलवार विजयी


 गडचिरोली:          

             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे अडतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी श्री. सुनिल चडगुलवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "वेदना " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          श्री. सुनिल चडगुलवार हे गडचिरोली येथील रहिवासी असून ते प्रसिद्ध नाट्य कलावंत, नाटककार, दिग्दर्शक व नवोदित कवी आहेत. त्यांच्या 'राजीनामा' या एकांकिकेला अनेक पारितोषिके प्राप्त झालेली असून नाट्यश्रीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेत सलग तीन वर्षे त्यांनी पुरस्कार पटकावले आहेत. स्थानिक राजवी प्राडक्शनचे संचालक असून गडचिरोली तालुका झाडीपट्टी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. नुकतेच कविता लेखनास त्यांनी प्रारंभ केला आहे.
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या अडतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी.एस. बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे,  स्वप्नील बांबोळे, जयराम धोंगडे, अजय राऊत, गणेश रामदास निकम, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर,  रोहिणी पराडकर, सोनाली रायपुरे, पुनाजी कोटरंगे, वंदना सोरते,  प्रभाकर दुर्गे, ज्योत्स्ना बन्सोड, मुर्लीधर खोटेले, जयराम धोंगडे, यामिनी मडावी, विलास जेंगठे,  राजेंद्र यादवराव सोनटक्के, रेखा दिक्षित, लता शेंद्रे,  शैला चिमड्यालवार,  उकंडराव नारायण राऊत, नरेंद्र गुंडेली, ज्योती म्हस्के, वामनदादा गेडाम,  प्रिती ईश्वर चहांदे, मधुकर दुफारे, सुनिल चडगुलवार, केवळराम बगमारे, खुशाल म्हशाखेत्री, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 17, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत सौ. शैला चंद्रकांत चिमड्यालवार विजयी


 

  गडचिरोली-:      
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे सदतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवयित्री सौ. शैला चंद्रकांत चिमड्यालवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "गौतम बुद्ध" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          सौ . शैला चंद्रकांत चिमड्यालवार या सावली (जिल्हा चंद्रपूर) येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत. ५० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केले आहे. कविता क्षेत्रात अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या सदतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने राजेंद्र सोनटक्के, संतोष कपाले, वंदना सोरते, प्रा. पंढरी बनसोडे, रोहिणी‌ पराडकर, पुनाजी कोटरंगे, वामनदादा गेडाम, अजय राऊत, गजानन गेडाम, चरणदास वैरागडे,  संगीता रामटेके, उकंडराव नारायण राऊत, लता शेंद्रे, तुळशीराम उंदीरवाडे, संगीता ठलाल, कृष्णा कुंभारे, सौ. प्रिती ईश्वर चहांदे,  नरेंद्र गुंडेली, सुभाष धाराशिवकर, मुरलीधर खोटेले, ज्योती म्हस्के, सुरेश गेडाम,पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम,माधुरी अमृतकर, मिलींद खोब्रागडे,वसंत चापले, सुनील चडगुलवार, शैला चिमड्यालवार, खुशाल म्हशाखेत्री, सुजाता अवचट,केवळ बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 16, 2024

PostImage

विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा थाटामाटात आयोजित


दिनांक १४ सप्टेंबर 2024 शनिवारला झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका गडचिरोली तर्फे विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक झाडपट्टी रंगभूमीवरील दादा कोंडके नावाने प्रसिद्ध असलेले झाडीपट्टीच्या कलाकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावसाकडे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून  प्राध्यापक राजेश कात्रटवार शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, सुरेंद्र गोंगले गटविकास अधिकारी गडचिरोली, आबाजी सावकार समर्थ, प्रवीण भाऊ मुक्तावरण, देवा शेडमाके, नवनाथजी धाबेकर हे उपस्थित होते.  झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सल्लागार दादा चुधरी  ,संघटनेचे अध्यक्ष  जितेंद्र उपाध्याय ,उपाध्यक्ष सुनील चडगुलवार यांना मानाचा स्थान देण्यात आले , उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, उपाध्यक्ष सुनील चडगुलवार, सचिव राजेंद्र बोबाटे व झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे सर्व सभासद सदस्य यांच्यावतीने मान्यवरां चे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले या , उद्घाटनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व सभासद आयशा अली यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सुनील चडगुलवार यांनी केले.

       तर माणसात कला असावी, कलाकारांनी कलेसाठी जगाव व या कलेसाठी जगता जगता कलावंताने या कलेतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा असे प्रतिपादन  प्रवीण भाऊ मुक्तावरण यांनी केले. झाडीपट्टीच्या रंगभूमीला दीडशे वर्षाचा इतिहास आहे पण झाडीपट्टीचा रंगभूमीला राज्यात फारसं महत्त्व दिले जात नाही. त्याला विविध कारणे आहेत तरी मला या झटपट्टीचा रंगभूमीने आकाशाला गवसनी घालून जिल्ह्याचे नाव लौकिक देशात करण्याची संधी दिली असली तरी मला वडील, काका, भाऊ यांच्याकडून पिढी जात कलावंताचा वारसा लाभला असला तरी मला सुर कधीच गवसला नाही. अशी खंत या गीत गायन स्पर्धेचे उद्घाटक  पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी  व्यक्त केली. पद्मश्री च्या हस्ते या गीत गायन स्पर्धेच्या मंचावर झाडीपट्टी जेष्ठ कलावंत दादा चुधरी, ज्येष्ठ कलावंत सुनील चडगुलवार, ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्लारपुरे, ज्येष्ठ नाट्य निर्माता आबाजी सावकार समर्थ यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना जिल्हा गडचिरोली तर्फे पद्मश्री  डॉक्टर परशुराम खुणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      गीत गायन स्पर्धा सुरू होण्याअगोदर  दिलीप मेश्राम यांनी गायक स्पर्धकांनी नाट्य संगीतच सादर करावे असे सांगून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकाची नोंद करण्यात आली आणि 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन सिद्धार्थ गोवर्धन, आयेशा अली, वर्षा गुरनुले, दिलीप मेश्राम यांनी केले या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिवाकर बारसागडे,  केवलजी बगमारे व  संगीत शिक्षक संजय धात्रक यांनी परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. 

    प्रथम क्रमांक श्याम शिंदे यांना रोख 5000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक अपर्णा दर्डे यांना रोख 3000 रुपये व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक कार्तिक मसराम यांना रोख 2000 रुपये व  प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रोत्साहन बक्षीस एकूण तीन होते यात योगेश्वरी देऊरमले, राजू ठाकूर व हर्ष घ्यार यांना सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मानचित्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर तिन्ही परीक्षकांचा मान सन्मानाने आदर करून त्यांना मंचावर स्थान देण्यात आला हा सर्व गीत गायनाचा कार्यक्रम सुरळीत चालण्यासाठी झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सर्व कार्यकारिणी सभासद पदाधिकारी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. 

      या कार्यक्रमात नोंदणी विभाग  भगवान गेडाम, सदानंद उईके, हेमंत कावळे, उमाजी भरले यांनी सांभाळला. तसेच हे कार्यक्रम सुरळीत व्हावे म्हणून वर्षा गुरनुले, उषाताई मुळे, प्रकाश मेश्राम  मेश्राम, तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, राजू चिलगिलवार, नवीन शेंडे, विवेक दांगट, महेंद्र ठाकरे, टीकाराम  सालोटकर तसेच संस्थेसाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्याचे कार्य प्रकाश लाडे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 8, 2024

PostImage

झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली यांच्या वतीने सर्वसाधारण सभा संपन्न


आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना संस्था गडचिरोली यांच्या वतीने सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला विदर्भ स्तरीय गीत गायन स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहे त्यासंबंधी त्या गीतगायन समारंभाचा नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली या सभेमध्ये झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे अध्यक्ष  जितेंद्र वासुदेव उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. प्रथमता कार्याध्यक्ष  सिद्धार्थ गोवर्धन यांनी आपले विचार मांडले. नियोजन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. त्यानंतर झाडीपट्टी कलावंत संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ चडगुलवार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेले जितु भाऊ यांनी सुद्धा कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल कोणाकडे कोणकोणती जबाबदार राहील ही माहिती त्यांनी दिली. गीत गायन स्पर्धेचे त्या दिवशी चे सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ गोवर्धन व आयेशा अली यांच्यावर सोपविण्यात आली. नोंदणी विभागाची जबाबदारी श्री भगवान गेडाम व सदानंद उईके यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच स्टेज मॅनेजमेंट यांची जबाबदारी उषा मुळे, वर्षा गुरूनुले दिलीप मेश्राम, प्रकाश मेश्राम आणि राजेंद्र बोभाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. आभार प्रदर्शनाची जबाबदारी  विवेक मून यांच्याकडे सोपविण्यात आली. पाहुण्यांचे नियोजन हे सुनील चडगुलवार व राजेंद्र चिलगिलवार यांच्यावर सोपविण्यात आली .तसेच भोजन व्यवस्था पाणी व्यवस्था व त्या कार्यक्रमास लागणारी जी काही व्यवस्था असेल ती जितेंद्र जी उपाध्याय व तुळशीरामजी उंदीरवाडे यांच्याकडे सोपविण्यात आली प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रकाश लाडे व वसंत चापले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली व या कार्यक्रमास वेळेवर आलेली जबाबदारी त्याची व्यवस्था संपूर्ण झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका च्या सदस्य हे अचूक बजावतील असे ठरविण्यात आले या सभेला जितेंद्र वासुदेव उपाध्याय,  सुनील चडगुलवार,  दिलीप मेश्राम , राजेंद्र बोबाटे , विवेक मून , भगवान गेडाम,  टिकाराम सालोटकर,  सिद्धार्थ गोवर्धन , प्रकाश मेश्राम, तुळशीराम उदिरवाडे, सदानंद उईके, उषा मुळे आयेशा अली, वर्षा गुरनुले, अशोक सूत्रपवार ,राजेंद्र  चिलगिलवार, वसंत चापले,आणी प्रकाश लाडे इत्यादी कलावंत बंधू हजर होते.  


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 7, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा शिक्षक सेल तर्फे शिक्षक दिन साजरा


 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने जिल्हा कार्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी  डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण  यांना अभिवादन करून सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हूणन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे,काँग्रेस नेते हसनभाई गिलानी,  महासचिव देवाजी सोनटक्के, शिक्षक सेल दत्तात्र्यय खरवडे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, नदीमभाऊ नाथानी, काशिनाथ भडके, शिक्षक सेल कार्याध्यक्ष दीपक रामने,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष  कल्पनाताई नंदेश्वर, शंकरराव सालोटकर,सुनील चडगुलवार, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षन विभाग भरत येरमे, माधवराव गावड,जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे, शालिग्राम विधाते,मिथुन बबनवाडे , सरपंच नीलकंठ निखाडे,पुष्पलताताई कुमरे, डॉ. सोनलताई कोवे, अपर्णाताई खेवले,निवृत्ताताई राऊत, रिताताई गोवर्धन, पोर्णिमाताई भडके, संध्या रामने,संगीताताई बारसागडे, निर्मलाताई आदे, शोभाताई कापडे, उत्तम ठाकरे, अनिल डोग्रा, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने,छत्रपती मडावी, लहूकुमार रामटेके, प्रफुल आंबोरकर,चारुदत्त पोहाणे,दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, ढिवरू मेश्राम, रामदास टिपले,कवडू उंदीरवाडे, प्रभाकरराव वासेकर, नां. मो. ठाकरे, विलास म्हस्के,आय.बी.शेख, डी. एन. मडावी, प्रशांत राऊत, संदीप राऊत, अशोक बोहरे, जितू पोटे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत,करकाळे, पंकज कावळे,अशोक पेदापल्लीवार, परशुराम तलांडे, संजय कुमरे, सुनील करपते, संतोष पेदापल्लीवार, दिलीप झाडे, भारत मोहुर्ले, गजानन सोनटक्के, नाजूक कावडे, रमेश राणे, प्रकाश शिंदे, लोमेश  म्हशाखेत्री, जालिंद भोयर, नारदेलवार, गुलाबराव मडावी, हंसराज उंदीरवाडे, ईश्वरदास राऊत, प्रदीप भैसारे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 5, 2024

PostImage

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना सामाजिक संघटनांचे साकडे


गडचिरोली -:

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध अध्यासन केंद्राचे काम सुरू झाले आहे.त्यांचेमार्फत नेहमी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.परंतू आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन झाले असुनही गोंडवाना विद्यापीठाला वारंवार पत्रव्यवहार करून,भेटी देऊन सुद्धा आदिवासींच्या व विशेषत महिलांच्या विकासासाठी अजुन कोणताही उपक्रम राबवलेला नाही.आदिवासी महिलांचे स्वतंत्र अध्यासनाची मागणी आदिवासी महिला संघटनांनी वारंवार केली.सतत भेटी चर्चा केल्या पण  त्याकडे दूर्लक्ष केले जाते यावर महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली.आदिवासी महिला विकासासाठी कार्यक्रम घेऊन  आदिवासी महिला अध्यासनाचे उद्घाटन व्हावे व आरोग्य शिक्षण रोजगार आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीचे संशोधन व्हावे यासाठी मा कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई चौधरी, ज्योती मेश्राम महिला राजसत्ता आंदोलन समन्वयक, कुसुम ताई अलाम माजी जि प सदस्य तथा साहित्यिक, सुधाताई चौधरी, उपेंद्र रोहनकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती,आशा ताई वेलादी, सुनिता उसेंडी उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 5, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील पस्तिसाव्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी


 

             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे पस्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "जीवनाची संध्याकाळ " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत. ते
नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. आजवर त्यांनी १०० च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.  
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या पस्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले,  प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे,पुनाजी कोटरंगे, रविंद्र गेडाम,  संगीता ठलाल, पी. डी. काटकर,  प्रेमिला अलोने, लता शेंद्रे, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, वसंत चापले, सुरज गोरंतवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, राजेंद्र यादवराव सोनटक्के,  नरेंद्र गुंडेली, राजरत्न पेटकर, भिमानंद मेश्राम, मुरलीधर खोटेले,  उकंडराव नारायण राऊत, वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर,  रेखा दिक्षित, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, हरिष नैताम,  उत्तम प्र. गेडाम, मिलींद बी. खोब्रागडे,  गजानन गेडाम, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम,  विलास जेंगठे, मधुकर दुफारे, सुरेश गेडाम,  केवळराम बगमारे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे असे चुडाराम बल्हारपुरे यांनी कळवले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 5, 2024

PostImage

नागपुरात 100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय


दिनांक 4 सप्टेंबर – चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.  मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी  विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.                                         पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.  मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 2, 2024

PostImage

रानटी हत्तीचा बंदोबस्त करा - खासदार नामदेव किरसान


गडचिरोली जिल्यात आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीनीं घातलेल्या धुमाकूळा बाबत मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांना अवगत करुन देऊन रानटी हतींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची कारवाई करावी याबाबत सूचना देतांना व तसे पत्र देतांना खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, काँग्रेस कार्यकर्त्ता रामदास मसराम, नेताजी गावतुरे, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, नितीन राऊत पदाधिकारी व कार्यकर्ते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 2, 2024

PostImage

महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर मध्ये  सहभागी होहून मार्गदर्शन करतांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते तसेच यावेळी  माजी खासदार मारोतराव कोवासे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष  सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई मोहरकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, शँकरराव सालोटकर, प्रा. राजेश कात्रटवार, रामदास मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष  वसंत राऊत, तालुकाध्यक्ष  आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष  वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष  चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग अब्दुलभाई पंजवानी, जिल्हाध्यक्ष किसान विभाग वामनराव सावसाकडे,  अ. जा. विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग  संजय चन्ने,  रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार,शिक्षक विभाग  दत्तात्रय खरवडे,  परिवहन विभाग अध्यक्ष रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस  नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी  बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनिल कोठारे,  देवाजी सोनटक्के, प्रभाकर वासेकर, परसराम टिकले, सुनिल चडगूलवार, घनश्याम वाढई, नेताजी गावतुरे, नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, माधवराव गावड, काशिनाथ भडके, जयंत हरडे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, राकेश रत्नावार, मिथुन बाबनवाडे, उत्तम ठाकरे, गिरीधर तीतराम, योगेंद्र झंझाड, कल्पना नंदेशवर, पुष्पलताताई कुमरे, मंगलाताई कोवे, डॉ. सोनलताई कोवे, वर्षाताई आत्राम, कविताताई भगत,  किशोर उईके, अमोल उंदीरवाडे, दिलीप घोडाम, कुमदेव गायकवाड,  गोविंदा झरकर, दीपक उंदीरवाडे, अभिजीत उंदीरवाडे, जितेंद्र मुनघाटे, रोशन कोहळे , सुरज मडावी, प्रशांत कापकर, विलास रामटेके, उद्धवराज खोब्रागडे, प्रफुल आंबोरकर, रमेश कोठारे, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 1, 2024

PostImage

शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉ. देवराव होळी


शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉक्टर देवरावजी होळी

दिनांक ३१ ऑगस्ट गडचिरोली

विद्यार्थी ,युवक युवतिंनी  आपल्या  जीवनामध्ये  ज्ञानार्जना सोबतच विद्येची  देवता माता सरस्वती  व आध्यात्मिकतेला आदर्श ठेवून विद्यार्जन केल्यास शिक्षणात तसेच जीवनात  नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना मार्गदर्शन करताना केले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजीत करण्यात झाला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी या समारंभाला उपस्थित राहून सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.

 यावेळी ते म्हणाले की, आजची पिढी वाईट व चुकीच्या दिशेने जात असल्याचे आपणाला दिसून येत आहे. ही पिढी केवळ भौतिक वादाला महत्त्व देत आहे. त्यामूळे  विद्यार्थी  युवक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिकतेचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासोबतच अध्यात्मिकतेची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे.  करिता आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण सर्वाँनी आध्यात्मिकतेला महत्व  द्यावे असे  आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 31, 2024

PostImage

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर



प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..

'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची..

आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय.

घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं
एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं... सगळं आयुष्य  वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात... लग्न वगैरे काही भानगडच नाही... 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...

'कलेक्टर व्हायचंय....'
नगरमधली राजश्री काळे... लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी... आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी... व्यवसायानं तमाशा कलावंत... तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं...  तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं... त्यात पोराबाळांची परवड होते... शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेलला. लहानपणापासून पोराला समजावलेलं, तुला कलेक्टर व्हायचंय... पोरानंही आईच्या कष्टांचं सोनं केलं... आज अमित यूपीएससी उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय.   

यशात माऊलीचा हात... 
अमित मारुतराव काळे... यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव... कोल्हाटी समाज हा तसा  कायमच शिक्षणापासून कोसो दूर... पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच, हा या माऊलीचा निश्चय... 

लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री काळे यांचा गौरव झालाय... पण, आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टाहास...  तिच्या कष्टांची आज फुलं झालीत...


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 28, 2024

PostImage

खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जंगली हत्तीने घातलेल्या धुमाकूळीने ग्रस्त गावांला दिली भेट


देलोडा (बु) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे जंगली हत्याचा धुमाकूळ घातला आहे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले त्याची माहिती मिळताच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी या गावाला भेट देऊन नुकसान झालेले शेतकरी देवराव कोडाप, आबाजी कोवे, योगाजी कोवे, श्यामराव सरपे, एकनाथ सरपे यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. तसेच किशोर म्हशाखत्री यांच्या इथं दही काल्याला निमित्त उपस्थिती दर्शविली. त्याच प्रमाणे जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली व त्यांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले.*
          यावेळी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनराव सावसाकडे, माजी सभापती तुलारामजी गेडाम, माजी पंचायत समिती सदस्य देवरावजी कोडाप, काँग्रेस कार्यकर्ता उद्धवजी हुलके, उपसरपंच देलोड प्रभाकर भोयर, काँग्रेस कार्यकर्ता जगदीश ढोलणे, वामन राऊत, भुपेश कोलते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 28, 2024

PostImage

जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी उभा राहणार - सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही


चंद्रपूर,दि.२८- जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.*

जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा वरोरा येथे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जनआक्रोश संघटनेकडून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘विकासरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ना. मुनगंटीवार यांना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य संघटक अविनाश काकडे, संस्थापक ॲड. अमोल बावणे, नरेंद्र पडाल, भाजपा वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजूरकर,जिल्हाध्यक्ष विनोद काळे, जिल्हा सचिव  राजेंद्र मुगले, संजय बोधे, राहुल दडमल, कल्पनाताई क्षीरसागर, योगिताताई लांडगे, विलास खोड, मायाताई पेंदोर, भूपेंद्र बुरीले,राजमाता जिजाऊ फॉउंडेशनचे महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारताना जनआक्रोश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. संताजी जगनाडे महाराजांचे जन्मस्थळ सुदुंबरे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे उद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. राजकारणात मिळालेल्या जनसेवेच्या संधीमुळे शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो याचे समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र राज्याचा मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून मच्छीमार बांधवांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याचा उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. मच्छीमार बांधवांकरिता विकासाची कामे करतानाच त्यांच्या अडचणी सोडविणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचे देखील कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माणुसकीचे विचार सर्वदूर प्रवाहित व्हावेत या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्या-छोट्या गावांमध्ये सभागृहांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक विशेषत: काँग्रेसकडून सुरू असलेल्या अफवांचाही त्यांनी समाचार घेतला. पुढील काळात योजना अधिक विस्तारीत होईल, पण बंद होणार नाही, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी दिला.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 28, 2024

PostImage

गडचिरोली शहरात विविध ठिकाणच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्याने आयोजित दहीहंडी उत्सव साजरा



दिं. २७ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली लांजेडा/इंदिरानगर यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव अभिनव लाँन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...  

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,विश्व हींदु परिषदेचे रामायणजी खटी,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी,पत्रकार तिलोत्तमा हाजरा,हर्षल गेडाम,बंटीभाऊ खडसे,तसेच मोठ्या संख्येने बालगोपाल व नागरिक जनता उपस्थित होते. तसेच
 विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड गडचिरोली, विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस षष्ठी पुर्ती  वर्ष निमित्ताने दहीहंडी उत्सव देवकुले पटांगणात भव्य दिव्याच्या रोषणाईत मोठ्या आनंदोत्सवाने आयोजित करण्यात आले होते.

या दहीहंडी कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...

याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, सिमा कन्नमवार,आशिष रोहनकर, आशिष कोडापे,विरेंद्र बोपचे,अनुप असाटी,बालाजी भांडेकर,धनंजय सहादेवकर, सरदार,तसेच मोठ्या संख्येनी बालगोपाल, युवावर्ग,नागरिक जनता उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 27, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


 

  एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील जाजावंडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक मांत्तय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यात बेंडके सरांचा समावेश आहे.. कायम नक्षल्यांच्या वावर असलेल्या या गावातील शाळेत खुप कमी पटसंख्या होती.. मात्र बेंडके सरांनी या गावातील व लगतच्या गावातील पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली व शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली.. दिवसभर जंगलात हुंदडायची सवय असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून शाळेत नियमित येण्याची सवय रुजविली.. व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केली... आज त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.. त्याबद्दल त्यांचें अभिनंदन


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 27, 2024

PostImage

अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांचे गडचिरोलीत स्वागत


दि.२७ ऑगस्ट २०२४

गडचिरोली:- गडचिरोली लोकसभेच्या प्रभारी म्हणून आलेले अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांचे गडचिरोली येथे आगमनाने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते तसेच सपत्नीक सौ.अर्चना नेते यांच्यासह निवासस्थानी त्यांचे औक्षवंत करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी भाजपाचे  जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे,  किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष  प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,अविनाश विश्रोजवार,महादेव पिंपळशेंडे,यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत उपस्थित होते.

याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या संबंधित निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 27, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील चौतिसाव्या सत्रात ॲड. पी. डी. काटकर विजयी


  गडचिरोली:        
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे चौत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी ॲड. पी. डी. काटकर  यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "स्वप्नमय वास्तव" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          पुंडलिक धर्माजी काटकर हे गडचिरोली येथील  प्रसिद्ध कवी असून ते 'माणिकपूत्र' या टोपणनावाने कविता लिहीतात. त्यांचे 'मुल्य संस्कार गीते' व 'कळा या लागल्या जीवा'  हे कवितासंग्रह प्रकाशित असून, 'असाही एक जोडीदार' कादंबरी, 'कथा आणि व्यथा' कथासंग्रह,  व 'जीवनगाणी' हा काव्य संग्रह  प्रकाशनाच्या मार्गावर आहे.‌ त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.  विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या चौतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, कृष्णा कुंभारे, प्रेमिला अलोने, मधुकर दुफारे, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, राजेंद्र यादवराव सोनटक्के, वामनदादा गेडाम, पुनाजी कोटरंगे,  तुळशीराम उंदीरवाडे,  केवळराम बगमारे, अजय राऊत, ज्योत्स्ना बन्सोड, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, मुरलीधर खोटेले, माधुरी आमृतकर, पुरुषोत्तम दहिकर, कृष्णा कुंभारे,  प्रिती ईश्वर चहांदे, वकिल शेख, रेखा दिक्षित, वसंत चापले, पी. डी. काटकर, डॉ. मंदा पडवेकर, वंदना सोरते, विलास टिकले,  सुरेश गेडाम, सोनाली रायपुरे, उकंडराव नारायण राऊत, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम लेनगुरे,  खुशाल म्हशाखेत्री, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. असे चुडारामजी बल्लारपूर यांनी कळवले आहे.

 

  गडचिरोली:        
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे चौत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी ॲड. पी. डी. काटकर  यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "स्वप्नमय वास्तव" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          पुंडलिक धर्माजी काटकर हे गडचिरोली येथील  प्रसिद्ध कवी असून ते 'माणिकपूत्र' या टोपणनावाने कविता लिहीतात. त्यांचे 'मुल्य संस्कार गीते' व 'कळा या लागल्या जीवा'  हे कवितासंग्रह प्रकाशित असून, 'असाही एक जोडीदार' कादंबरी, 'कथा आणि व्यथा' कथासंग्रह,  व 'जीवनगाणी' हा काव्य संग्रह  प्रकाशनाच्या मार्गावर आहे.‌ त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.  विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या चौतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, कृष्णा कुंभारे, प्रेमिला अलोने, मधुकर दुफारे, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, राजेंद्र यादवराव सोनटक्के, वामनदादा गेडाम, पुनाजी कोटरंगे,  तुळशीराम उंदीरवाडे,  केवळराम बगमारे, अजय राऊत, ज्योत्स्ना बन्सोड, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, मुरलीधर खोटेले, माधुरी आमृतकर, पुरुषोत्तम दहिकर, कृष्णा कुंभारे,  प्रिती ईश्वर चहांदे, वकिल शेख, रेखा दिक्षित, वसंत चापले, पी. डी. काटकर, डॉ. मंदा पडवेकर, वंदना सोरते, विलास टिकले,  सुरेश गेडाम, सोनाली रायपुरे, उकंडराव नारायण राऊत, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम लेनगुरे,  खुशाल म्हशाखेत्री, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. असे चुडारामजी बल्लारपूर यांनी कळवले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 26, 2024

PostImage

वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न


देसाईगंज :- आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात एस सी एस टी ओबिसींच्या संवैधानिक अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी सातत्याने लढा उभारणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बळ देण्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम यांनी केले.                                         देसाईगंज येथिल सिंधु भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेञातिल वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळु टेंभुर्णे, विधानसभा प्रभारी तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, जिल्हा संघटक भिमराव शेन्डे, जि. के. बारसिंगे, योगेन्द्र बांगरे, विलास केळझरकर, कवडु दुधे, नर्मदा मेश्राम, कोरची तालुका अध्यक्ष सुदाराम सहारे, अशोक कऱ्हाडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष तुळशिराम नंदेश्वर, आरमोरी तालुका अध्यक्ष जगदिश दामले, देसाईगंज तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम, आशिष घुटके, एन. आर. रामटेके, उद्धवराव खोब्रागडे, नानाजी कऱ्हाडे, लक्ष्मण नागदेवते, प्रविन रामटेके, उमाकांत बन्सोड, जगन बन्सोड, अभिमन्यु बन्सोड, शिवाजी मेश्राम, विनोद लांजिकर, ज्योती दहिकर यांचेसह वंचित बहुजन आघाडिचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

     या मेळाव्याला संबोधित करतांना कुशलभाऊ मेश्राम म्हणाले की, कॉंग्रेस व भाजप सातत्याने एससी एसटी ओबिसींची दिशाभुल करुन आरक्षण संपविण्याचे काम करित आहे. लोकसभा निवडनुकित भाजप ने संविधाम बदलायचे आहे, असे वातावरण निर्माण केले तर कॉंग्रेस ने या देशाचे संविधान वाचवायची ही शेवटची संधी असल्याचा भ्रम निर्माण केला. आंबेडकरी समाजाने या देशाचे संविधान वाचवायचे आहे म्हनुण न मागता कॉंग्रेस ला मतदान केले, जेव्हा सर्वोच्छ न्यायालयाने एससी एसटी आरक्षणाचे वर्गिकरण करण्याचा व क्रिमिलेयर लावण्याचा निर्णय जाहिर केला त्याची अमलबजावणी कॉंग्रेस ची सत्ता असलेल्या कर्णाटक व तेलंगाना राज्य सरकारने केली मग कॉंग्रेस पक्ष एससी एसटीं चा हितचिंतक कसा असु शकतो असा सवालही या प्रसंगी उपस्थित केला.

    वंचित बहुजनांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्याने लढा उभारत असुन ओबिसींच्या आरक्षणात मराठ्यांनी ढवळाढवळ करु नये यासाठी ही लढा उभारत आहेत आरमोरी विधानसभा क्षेञात वंचित बहुन आघाडी चा आमदार निवडुन देऊन बाळासाहेब आंबेडकरांना बळ द्यावे असे आवाहन ही या प्रसंगी केले.

     या कार्यक्रमात अनिल दहलानी सरिता भैसारे यांचेसह ३० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सोबतच आंबेडकरी चळवळित सतत कार्य करणाऱ्या ४० वयोव्रूद्ध कार्यकर्त्यांचा शाल श्रिफळ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक मेश्राम व आभार प्रदर्शन शिवदास बन्सोड यांनी केले.                                          

     


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 25, 2024

PostImage

झाडीपट्टी लेखक असोसिएशन वडसा तर्फे लेखकांची कार्यशाळा संपन्न


      आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला युनिव्हर्सल कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी रोड वडसा येथे लेखकांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे ज्येष्ठ नाट्य कलावंत, प्राध्यापक सदानंद बोरकर, विशाल तराळ, मुकेश गेडाम हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सतीश पावडे, महेंद्र सुके, प्रेम कुमार खोब्रागडे, किशोर मेश्राम यावेळी उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर अष्टपैलू कलावंत सुनील अष्टेकर यांना श्रद्धांजली वाहून मोन पाळुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदिका म्हणून ममता गोंगले ह्या होत्या तसेच सूत्रसंचालक म्हणून युवराज गोंगले यांनी कार्यभार पाहिला होता. या कार्यशाळेमध्ये संतोष बारसागडे, धनंजय ढवळे, किशोर भाग्यवान, जितू उपाध्याय, सुनील चडगुलवार, दादाजी चुधरी, वसंत चापले, उपेंद्र रोहणकर, प्रकाश लाडे, बाळकृष्ण ठाकूर त्याचबरोबर अनेक लेखकांनी या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली होती. 

झाडीपट्टी लेखक असोसिएशन तर्फे लेखकांचे उद्बोधन होऊन त्यांच्यातील प्रतिभेला आणि लेखन शैलीला वेगळी एक भरारी मिळावी याकरिता आणि नाट्य लेखन करण्याच्या पद्धती मध्ये सुधारणा व्हावी तसेच ते राज्यस्तरावर घेऊन जाण्यात लेखक वर्गाचा मोलाचा वाटा असतो त्याकरिता लेखकांनी आपल्या पद्धतीने ते करावे असे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच लेखकांची कार्यशाळा आहे. असे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यावेळी आवर्जून सांगितले. नाट्य लेखन कसे करावे आणि नाट्यसंहिता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 24, 2024

PostImage

गडचिरोली येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन


दिनांक २३ ऑगस्ट गडचिरोली

कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाला वाढविण्यासाठी  प्रयत्न करीत असतो परंतु तो जर प्रशिक्षित नसेल तर त्या पक्षाची वाढ होण्यास व पक्ष मोठा होण्यास अडचण निर्माण होते.  त्यामुळे पक्षाला मोठे करण्यासाठी कार्यकर्त्याने प्रशिक्षित होण्याची आवश्यकता असून त्या प्रशिक्षणातूनच  कार्यकर्त्यालाही मोठे होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील  कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या प्रास्ताविक प्रसंगी केली. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पूर्व संघ प्रचारक प्रख्यात वक्ते अमोलजी पुसदकर तसेच भारतीय विचार मंचाचे क्षेत्र संयोजक पूर्व संघ प्रचारक सुनीलजी किटकरू  प्रामुख्याने उपस्थित होते.
*यावेळी मंचावर लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे , भाजपा ज्येष्ठ नेते किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओलारवार, जिल्ह्याच्या महामंत्री सौ योगिताताई पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्षा सौ लताताई पुंगाटी, प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 24, 2024

PostImage

MPSC exam पास गायत्री जांभुळकर यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला


मेंडकी ता.ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर येथे भारतीय बहुउद्देशीय बौद्ध समाज संघटना मेंडकी द्वारा आयोजित नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र  डॉ.नामदेव किरसान व MPSC exam पास गायत्री नामदेव जांभुळकर यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित  खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी सत्कार स्वीकारून सभेला मार्गदर्शन केले. यावेळी महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.थानेश्वर पाटील कायरकर, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, माजी उपसभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी श्यामराव इरपाते,अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी सौ.मंगला लोनबले, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.भावनाताई ईरपाते, सरपंच ग्रामपंचायत मेंडकी सौ.मंगलाताई ईरपाते, महासचिव महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूर नयनाताई गुरनुले, सुधाकर महाडळे, अध्यक्ष मच्छीमार सहकारी संस्था मेंडकी वसंता मारबते, सुरेश चौधरी, मानिकचंद ढवळे, भुपाल खोब्रागडे,सौ.विद्याताई चौधरी, सौ.मोक्षालीताई शेन्डे, सुरेश वाघमारे, गौरव येनप्रेड्डीवार, पदाधिकारी,  कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 23, 2024

PostImage

दैनंदिन तपासणी डायरी उलटली दोन सिस्टरांच्या जीवावर


 

गडचिरोली.दिनांक २२ अगस्ट

पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन उपलेचवार यांनी आपल्या प्राथमिक स्तरावर दैनंदिनी डायरी तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मीटिंग बोलावलेली असताना .पोरला प्राथमिक उपकेंद्रात कार्यरत असलेल्या साखरा येथील सी.एच.ओ.डॉक्टर सीमा ढवळे व कंत्राटी परिचारिका वैशाली कुळमेथे या दोन आरोग्य परीचारीका यांचा दिनांक २२ आगस्ट रोजी साखरा येथे अपघात झालेला असून, अपघातात दोन्हीं गंभीर झाल्याची चर्चा आहे.

 सदर या दोन्ही महिला गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत .तसेच त्यांच्या उजव्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

डॉक्टर गजानन उपलेचवार यांच्या प्रशासनावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त व्यक्त करून,त्यांच्या  बदलीची मागणी सुद्धा केली जात असल्याची चर्चा होत आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 23, 2024

PostImage

चंद्रपुर येथे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न



दिं. २२ ऑगस्ट २०२४
भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमुर लोकसभा विस्तारक, कार्यकारिणी व भाजपा आघाड्यांची संघटनात्मक बैठक चंद्रपुर येथील एन.डी हॉटेल येथे भाजपाचे संघटन मंत्री मान.श्री. शिवप्रकाशजी, माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह फुलस्ते,डॉ. उपेंद्र जी कोठेकर यांच्या अध्यक्षतेतील मार्गदर्शनात व माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

 या बैठकीला प्रामुख्याने म्हणून  आमदार डॉ.देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे,माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,विस्तारक प्रमोद पिपरे,
जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,विस्तारक कादर शेख सर,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,मच्छिमार आघाडी चे जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, अनुजाती आघाडी चे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेशजी वालदे,किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, विस्तारक रोशन ठाकरे, विस्तारक आकाश सातपुते, प्रकाश दत्ता, सुनिल बिशवास, यशवंत आंबोरकर, नागराज गेडाम, साकेत भानारकर, सतिश बोम्मावार,भारत बावणथडे,राजु जेठानी, तसेच भाजपा पदाधिकारी व आघाडयांसह नेते मंडळी उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 22, 2024

PostImage

भाडभिडी मोकासा ( तालोधी ) ग्रा. कार्यालय मध्ये एमएलए कॅम्पचे आयोजन


दिनांक  २१ ऑगस्ट                              

 मा. आमदार डॉ.देवराव होळी साहेब यांचे एमएलए कॅम्पच्या माध्यमातुन शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ  मिळावा करिता या कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून   गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० लोकांची टीम बनवून मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये  घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा  प्रयत्न   गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एमएलए कॅम्पचे शुभारंभ   .

 भाडभिडी मोकासा येथे  शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी एमएलए कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण. योजनांचे फार्म भरून घेण्यात आले. यामुळे निश्चितच जनसामान्यांना याचा लाभ होईल .


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 22, 2024

PostImage

भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा.पोलीस उप अधीक्षक एम. रमेश यांना दिले निवेदन


 

गडचिरोली:-दि.21 ऑगस्ट

  दि.१५ ऑगष्ठ स्वातंत्र्यदिनी आरमोरी शहरातील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.सदर पिडीतेवर अत्याचार होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी.व आरोपीं मुस्लिम युवक त्यांच्या पत्नीवर  कठोर कारवाई करण्यात यावी. याकरिता भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा.भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात  निवेदन मा.पोलीस उपअधीक्षक एम.रमेश गडचिरोली यांना देण्यात आले.

  गडचिरोली पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देतेवेळी भाजपा शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जेष्ट कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी,माजी नप सभापती वैष्णवी नैताम,महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे,शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे,महामंत्री अर्चना चन्नावार,माजी नगरसेविका बेबीताई चीचघरे,माजी नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे,स्वाती चंदनखेडे,पुनम हेमके,निता बैस, अर्चना निंबोड,संगीता भडके,पुष्पा करकाडे व भाजपा गडचिरोली जिल्हा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024

PostImage

माजी खा.अशोक नेते यांचे हस्ते चामोर्शी येथे मोफत खते वाटप कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन



२१ ऑगस्ट २०२४
चामोर्शी:-संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व  निविष्ठा वाटप कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी संताजी क्रीडांगण प्रभाग क्रमांक तीन गोंडपुरा चामोर्शी येथे माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मोफत खते  वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या मचांवर प्रमुख पाहुने म्हणुन माजी.खासदार अशोकजी नेते, माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक  मास्तोडी सर,भाजपा महिला आघाडी च्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस,भाजपा नेत्या डॉ.चंदाताई कोडवते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,जेष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के, प्रतिष्ठित नागरिक कविश्ववर आईंचवार, कृषी विभागाचे पी.पी. गजभिये, मंडळ कृषी अधिकारी बी.बी चापले,कृषी पर्यवेक्षक एच‌.डी यचवाड,बी.एन.गायकवाड, प्रशिल वालदे,सि.एच.जिरतकर  उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांना माजी खासदार अशोकजी नेते,माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी,जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी,प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,सौ.डॉ. चंदाताई कोडवते,व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी या कार्यक्रमाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे  अशोकजी नेते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत बोलतांना केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हिताचे सरकार असून केंद्र आणि राज्य सरकार तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक योजना केंद्र व राज्य शासनाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना  अनेक योजना कार्यान्वित केले आहेत.आपल्या जिल्ह्यात यावेळी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यात हवालदिल झाला असुन अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा हातभार देण्यासाठी यावेळी आशिष भाऊ पिपरे यांनी पुढाकार घेऊन चामोर्शी येथे मोफत खत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला मि उशिरा येऊन सुद्धा अनेक शेतकरी या खत वाटपात उपस्थित आहेत.अशा  कार्यक्रमाची स्तुती करतो तसेच शेतकऱ्यांनी खत घेऊन परिपूर्ण लाभ घ्यावा असे अवाहन करत केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे व  शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत असे प्रतिपादन या खत वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा.खा.नेते यांनी केले.

या प्रसंगी संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे सभासद  तसेच गावातील इतर शेतकरी हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने शुगर व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आले व शेतकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.सोनाली पिपरे , मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे , कंपनीचे संचालक तुळशीदास नैताम,रमेशभाऊ अधिकारी , उमाजी वासेकर,भैय्याजी धोडरे, जिवन पिपरे ,शंकर वासेकर, श्रीधर पेशट्टीवार व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024

PostImage

शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त खुर्सा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न


गडचिरोली -: आजचा युवक हा भरकटलेला आहे. तो जुन्याच आडवाटेने प्रवास करतो आहे.बदलाची गरज ती वाट जर सरळ आणि निश्चित ध्येयाकडे जाणारी निवडल्यास यश तुमचेच आहे. महा.अनिसच्या खुर्सा शाखेने घेतलेल्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रा. तिलेश मोहुर्ले,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुर्सा येथील सरपंचा मंजुळाबाई पदा ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रशांत रामटेके पोलीस पाटील,मा. विलास निंभोरकर राज्य सहकार्य वैज्ञानिक जाणीवा व शिक्षण प्रकल्प महा.अनिस, प्रा. विलास पारखी सर्पतज्ञ, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष .पत्रकार सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते.
                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उपेंद्र रोहनकर.यांनी केले प्रथमतः शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय पाहुण्यांनी फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनिस चळवळीची भूमिका व समाजात होऊन गेलेल्या संत विचारांची परंपरा मांडताना विलास निंभोरकर यांनी सांगितले की लोकांनी प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.समाजात बुवा बाबाची पैदास मोठ्या प्रमाणात  झालेली आहे.त्याला भोळाभाबडा समाज फसत असतो.त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये विवेकवादी विचार असले पाहिजेत.तर प्रा. पारखी सरांनी पावसाळ्यात सापापासून कोणती काळजी घ्यायची. साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे. हे लोकांना पटवून दिले.
             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश झंजाळ,रवींद्र बावणे, दामोदर मेश्राम, रामचंद्र निलेकार, जाणू धुळसे, अविनाश सालोडकर, तुळशीराम दाणे, उद्धव रामटेके, विशाल मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार संदीप आंबोरकर  ह्यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठया संख्येनी उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024

PostImage

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात दिला विश्वास


 

चंद्रपूर,दि.२० - महिला मोर्चाच्या सदस्यांनी एकमेकांना मदत करण्याचा संकल्प करावा. सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. एखादी महिला दुःखी असेल तर तिच्याजवळ समाधान घेऊन पोहोचणारी पहिली व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचीच असली पाहिजे. तरच आपण ‘एकच चर्चा महिला मोर्चा’ अशी घोषणा देऊ शकतो. स्त्रीसन्मान हेच भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे लक्ष्य असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोंभूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अल्का आत्राम, पोंभूर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्ष सविता कांबळे, चंदू मारगोनवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, हरीश ढवस, शहर महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली बोलमवार, गजानन मोडकुलवार यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा यावेळी उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. जीवनदायी योजना, आयुष्यमान भारत, मातृवंदनासारख्या योजना सरकार राबवित आहे. याशिवाय देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. आता ग्रामीण भागात मुलींना सायकल देण्याची देखील योजना आहे, असे ते म्हणाले. बहिणींच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी भाजप परिवारातील प्रत्येक भाऊ त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला. 

आज महाराष्ट्रात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बहिणींच्या पाठिशी भाऊ तर असणारच आहे, पण बहिणींच्या पाठिशी बहिणींनाही खंबीरपणे उभे राहायचे आहे. बहिणींच्या पाठिशी पूर्ण शक्तीनिशी उभे राहायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेंतर्गत २ लक्ष ८१ हजार बहिणींच्या खात्यात २ महिन्यांचे ३ हजार रुपये आले आहेत. काही पक्ष, दुष्ट बुद्धीचे आणि सत्तेसाठी हपापलेले लोक आता निवडणूक तोंडावर आल्यामुळे बाहेर निघाले आहेत. ते कधीही गरिबांना कुठलीच योजना देऊ शकत नाहीत. ४ वर्ष झोपलेले असतात. आता त्यांचे पोट दुखत आहे. बहिणींच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांनी कितीही उड्या मारल्या तरीही ही योजना आमचे सरकार आहे तोपर्यंत कधीच बंद होणार नाही. दुसऱ्या कुणी प्रयत्न केला तर चंद्रपूरचा वाघ म्हणून पहिली डरकाळी मी फोडेन.’ त्यांचा दिल्लीचा नेता आला तरीही योजनेला धक्का पोहोचू शकत नाही, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आपण लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. रक्षाबंधनाच्या दिवशीच पैसे देणार होतो. पण महाराष्ट्रातील १ कोटी २४ लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचायला ४८ तास लागतील. त्यामुळे १५ अॉगस्टलाच सुरुवात केली आणि रक्षाबंधनाच्या आधीत बहिणींच्या खात्यात पैसे यायला लागले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 कोणत्याही जातीची बहीण असेल जात-पात महत्त्वाची नाही. गरीब असेल आणि तुमच्या मुलीची इंजिनियर, डॉक्टर होण्याची क्षमता असेल तर शंभर टक्के फी सरकार भरणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. 

हा पैसा तुमच्या अडिअडचणीत कामात येईल. मुलाला बरं नसेल तर औषध आणायला नवऱ्याची वाट बघायची गरज नाही. मुलाला आईस्क्रीम खाऊ घालायचे असेल तर नवऱ्याची वाट बघावी लागणार नाही. मोबाईलवर रिचार्ज मारायला पतीवर अवलंबून राहायची गरज नाही. आईची आठवण आलीच आणि माहेरी जायचं असेल तर महिलांसाठी बसचे अर्धे तिकीट लागणार आहे. त्यामुळे आता आईला भेटण्यासाठी देखील महिलांना कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

*स्त्रीचा सन्मान महाराष्ट्राचा सन्मान*
आता शेवटच्या बहिणीपर्यंत १५०० रुपये पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. यात्रा करून जनजागृतीचे काम सुरू झाले आहे. सर्व योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जायच्या आहेत. महिला कुटुंबाची जबाबदारी घेते. पोषण करण्याची जबाबदारी ती पार पाडते. ९९ टक्के घटस्फोटांच्या प्रकरणात बाप आपल्या मुलांना टाकून जातो. पण स्त्री कुटुंबाची, मुलांची जबाबदारी कधीही विसरत नाही. त्यामुळे स्त्रीचा सन्मान झालाच पाहिले. स्त्रीचा सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  

 


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024

PostImage

भिशी येथे शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उदघाटन


भिशी ता.चिमूर जि.चंद्रपूर येथे शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान व विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार.  यावेळी माजी आमदार अविनाशभाऊ वारजुकार, समन्व्यक सतीशभाऊ वारजुरकर, धनराज मुगले, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमुर डॉ विजय गावंडे, स्वप्निल कावळे, गजानन बुटके, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी भिशी विजय मेहर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 21, 2024

PostImage

रक्षाबंधना निमित्य गडचिरोलीत शिवसेना च्या महिला भगिनींनी मा.खा.अशोकजी नेते यांना राखी बांधुन औक्षण केले


 

गडचिरोली:-नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन निमित्याने माजी खासदार तथा अनू.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या गडचिरोलीतील निवासी कार्यालयात शिवसेनेच्या   माता-भगिनींनी मा.खा.नेते यांना राखी बांधत औक्षण करत शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे महिलांच्या खात्यात जमा झाल्याचा आनंद महिलांनी व्यक्त करत लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ,उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार  मानले.

तसेच मा.खा.नेते यांनी महिला भगिनींना या योजनेचा फॉर्म भरतांना त्रास होऊ नये यासाठीं गडचिरोली व चामोर्शी या ठीकाणी कार्यालय खोलून आमच्या सारख्या अनेक महिला पात्र होऊन खात्यात रूपये जमा झाले याकरिता माजी खासदार अशोकजी नेते यांचे या रक्षाबंधन निमित्याने शिवसेनेच्या महिलांनी राखी बांधुन अभिनंदन करत आभार मानले...लाडक्या बहिणींचा अशोक भाऊ असे उदगार काढले.

यावेळी शिवसेनेच्या सौ.नीताताई वडेट्टीवार महिला जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग,सौ.कीरण ताई राठोड,कांता म्याकलवार, कांता येरणे,बबिता गौतम,अर्चना चन्नावार,अर्चना गोरघटे,माधुरी घुगरे, व अन्य महिला उपस्थित होत्या.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 20, 2024

PostImage

अखिल भारतीय नाट्य कार्यक्रमांमध्ये नाट्यकर्मी के.आत्माराम आणि कवी प्रल्हाद मेश्राम यांचा सत्कार


 

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (महानगर शाखा) नागपूर शाखा उपनगर क्र.१ व राजाराम सीताराम दिक्षित वाचनालय धरमपेठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , स्मृतिषेश नाट्य महोत्सव दिनांक १९/०८/२०२४ ला पार पडला यामध्ये झाडीपट्टी रंगभूमी वरील योगदानाबद्दल,  उपराजधानी नागपूर येथिल सायंटिफिक सभागृहामध्ये, आदरणिय के. आत्माराम व कवी. प्रल्हाद मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
               या कार्यक्रमाला सिने. निर्माते श्री जिचकार सर, नाट्य शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका, श्री बेंद्रे सर पुणे श्री सलिम शेख नागपुर नाट्य परिषदेचे अध्यक्ष, पुजा पिंपळकर प्रमुख कार्यवाह, मंजुश्री डोंगरे कोषाध्यक्ष, श्री प्रशांत लिखार नाट्य कलावंत व जेष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी प्रामुख्याने उपस्थित होते.

                  


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 20, 2024

PostImage

रेल्वे बांधकामावर काम करणा-या मजुरांची मजुरी लवकरच अदा करा - मा.खा.अशोक नेते


 

दि.१९ ऑगस्ट २०२४

गडचिरोली:- काटली,गोगांव, साखरा, चुरचुरा या परिसरातील रेल्वे बांधकामात काम करणाऱ्या मजुरांचे तिन महिने लोटुनही सुद्धा काम केलेल्या कामाच्या मजुरीचे रुपये न मिळाल्याने हताश होऊन परिसरातील पंधरा विस मजुरांनी  माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांच्या  गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ला सोमवारी  भेट घेतली असता माजी खासदार अशोक जी नेते यांना मजुरांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आम्ही वडसा गडचिरोली या रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरु आहे, काटली, साखरा,चुरमूरा,गोगांव  तसेच अनेक गावाच्या परिसरातील काम करुन लोकांचे मजुरीचे रूपये अजुन पर्यत मिळालेले नाही अशी मजुरांनी आपली आपबीती  मा.खा.नेते यांना सांगितलं असता या बाबत गांभीर्याने लक्षवेधत मा.खा.नेते यांनी तात्काळ रेल्वेचे कंत्राटदार रमन सिंग व इंजिनिअर यांना दुरध्वनी द्वारे  बोलून याबाबत काम केलेल्या मजूरांच्या मजुरी चे रूपये लवकरच देण्यात येईल. असा विश्वास कंत्राटदारांनी मा.खा. नेत


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 19, 2024

PostImage

स्पंदन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य समाजिक दुष्टिने उल्लेखनीय.- मा.खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन.


 

गडचिरोली:- स्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार, महाराष्ट्राचे लाडके ओबीसी नेते तथा माजी राज्यमंत्री मान.डॉ. परिणयजी फुके हे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांशी  ऑनलाईन आभासी द्वारे लाडक्या बहिणीचा देवा भाऊ ह्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीला आले असता यावेळी स्पंदन फाउंडेशनी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी नवेगांव(मुरखळा) सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती मान.डॉ.परिणयजी फुके यांनी बोलतांना म्हणाले एवढा मोठा सत्कार समारंभ या स्पंदन फाउंडेशन संस्थेच्यामार्फतीने केला गेला तसेच मित्र मंडळींनी सत्कारातून माझ्यावर प्रेम भावना दर्शविली हे मी जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गती निर्माण करून हे क्षण अविस्मरणीय हा क्षण लक्षात ठेवीन.असे सुचक वक्तव्य केले.

या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना स्पंदन फाउंडेशन ही एक गडचिरोली जिल्ह्यातील  सेवा भावी संस्था आहे. या संस्थेचे कार्य अतिशय सामाजिकदृष्ट्या उल्लेखनीय कार्यात अग्रेसर असुन या माध्यमातून रुग्णसेवा,आरोग्य सेवा,रुग्णसेवेसाठी मेडिकल,  रक्तदान शिबिर, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थीना मार्गदर्शन, कौशल्य विकास आधारित कार्य असे अनेक विविध सामाजिक उपक्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन करित असते.अशा या सामाजिक उल्लेखनीय संस्थेला पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देतोय असेच काम या संस्थेच्यामार्फतीने निरंतर चालू राहो अशी मी प्रार्थना करतो.तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री परिणयजी फुके यांनी गडचिरोली जिल्हा हा आदिवासी,अविकसित, आकांक्षीत जिल्हा असून या जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपण आवर्जुन लक्ष द्यावे व आपण जनतेच्या सेवेत सदैव राहावे अशी मनोकामना करतो व पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता आपणांस शुभेच्छा देतो असे वक्तव्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून माजी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,आमदार क्रिष्णाजी गजबे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा स्पंदन फाउंडेशन चे संस्थापक व आदिवासी मोर्चा चे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,सतिशजी चिचघरे,डॉ. प्रिया खोब्रागडे तसेच मोठ्या संख्येने संस्थेचे मित्र परिवार व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन भाष्कर बुरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे हितचिंतक कार्यकर्ते व मित्र परिवार यांनी सुरळीत पार पाडले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 19, 2024

PostImage

गडचिरोली येथे लाडक्या बहिणींचा कार्यक्रम संपन्न..


 

दिं. १९ ऑगस्ट २०२४

गडचिरोली:-लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम दि.१८ ऑगस्ट २०२४ रोज शनिवारी  अभिनव लाँन,चंद्रपुर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या  कार्यक्रमाला गडचिरोली  जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेल्या लाडक्या बहिणींशी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र जी फडणवीस यांनी आँनलाईन आभासी पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे रूपये खात्यात जमा झाले का ? यावर उपस्थिती सर्व महिलाच्या वाणीतून एकच सूर गूंजत निघाला आमच्या खात्यात लाडकी बहीण या योजनेचे रुपये जमा झाले आहेत.परत मान.उपमुख्यमंत्री यांनी या योजनेच्या अनुषंगाने महिला भगिनींना प्रतिक्रिया विचारली असता यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील दोन महिला भगिनींनी आँनलाईन बोलत  जिल्यातील एका महिलेनं उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र जी फडणवीस यांच्याशी बोलतांना म्हणाली काँग्रेसवाल्यांनी आमच्या गावातल्या बायांना खटाखट साडेआठ हजार मिळणार म्हणून फसवीलं पण तुम्ही जे सांगितलं ते करुन दाखवलं आज माझ्यासारख्या गरीब बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत यांचा आनंद असून आपणाला धन्यवाद देतोय !

दुसऱ्या महिलेनं उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र जी फडणवीस यांच्या सोबत बोलत माझे पती गेल्यानंतर मी एकटीनेच संसाराचा रहाटगाडा चालवते... यात तुम्ही दिलेली १५०० रूपयांची ओवाळणी मला माझ्या माहेरचा आधार वाटतो… घर कुटुंब व्यवस्थित चालविण्यासाठी छोटे मोठे खर्च, जीवनावश्यक वस्तु इ.खर्च असून खात्यात ओवाळणी म्हणून जमा केली.
देवाभाऊ  हाच माझा लाडकाभाऊ आहे…असे उदगार या महिलांनी व्यक्त केले.

आपण दिलेला शब्द खरोखर पाळला व खात्यात रूपये टाकून बहिणींला एक आधार दिला.मि आपल्या पाठीशी व आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभी आहे.असा शुभाशीर्वाद देत आभार मानले.  

याप्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाला संबोधीत करतांना म्हणाले महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची योजना आहे.या योजनेबद्दल विरोधक उलटसुलट बोलत होते.फॉर्म फक्त भरून घेत आहे पण खात्यात रुपये जमा होतील तेव्हा ना.. अशाही पद्धतीचा अपप्रचार केला जात होता.पण आता महिलांच्या खात्यात रुपये जमा होत आहेत विरोधक दिशाभूल करणारे आहेत. मी सुद्धा गडचिरोली व चामोर्शी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा सर्व प्रथम प्रसार व प्रचार केला.या योजनेचा गडचिरोली व चामोर्शी येथे कार्यालय खोलून महिला भगिनींना याचा त्रास होऊ नये यासाठी स्वतः माझ्या कार्यालयातील वाँर रूमची टीम कामाला लावून महिला भगिनींचे ऑनलाईन फॉर्म भरून अनेक महिला गडचिरोली व चामोर्शी येथील महिला भगिनीं योजनेस पात्र ठरल्या व त्यांच्या खात्यात रुपये ही जमा झाले याचाही मला आनंद आहे.
तसेच गडचिरोली जिल्यातील अनेक महिलां भगिनींनी मा.खा.नेते यांना रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधली. महिला भगिनींच्या पाठीशी सदैव उभा राहीन असा विश्वास मा.खा.नेते यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ ह्यांनी केलेले संचालन अतीशय सुरेख व सुंदर होते.गडचिरोली जिल्ह्याविषयी असलेले विशेष प्रेम ताईच्या संचालन वाणीतून प्रकटतांना दिसुन आले.

यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाला वि.प.आमदार डॉ.परीणयजी फुके,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार क्रिष्णाजी गजबे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे,डॉ.चंदाताई कोडवते,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलींद जी नरोटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर,अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्षअँड. उमेशजी वालदे,तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,तालुकाध्यक्षा लताताई पुंगाटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारतजी खटी, जिल्हा सचिव सौ.रंजिता कोडाप,सौ.वर्षाताई शेडमाके, नगरसेविका रोशनीताई वरघंटे,रहिमा सिद्धीकी तथा बहुसंख्येने जिल्यातील महिला  उपस्थित होत्या.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 18, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेहत्तिसाव्या सत्रात सोनाली रायपुरे (सहारे) विजयी


 

  *गडचिरोली* :          
             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे तेहत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) येथील कवयित्री सौ. सोनाली रायपुरे - सहारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "शब्द नि कविता" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          सौ. सोनाली रायपुरे - सहारे हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे 'भावस्पर्श' व 'काव्यसृष्टी'  हे कवितासंग्रह, 'मनतरंग' चारोळीसंग्रह व 'सुर्यविचार' हा सुविचार संग्रह  प्रकाशित झालेला आहे.‌ त्यांना सामाजिक कार्याची आवड असून विविध वृत्तपत्रांतून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात. विशेष म्हणजे त्या गडचिरोली जिल्ह्यातील माहेरवाशीण आहेत.
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या बत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने,जयराम धोंगडे, सौ. संगीता ठलाल, तुळशीराम उंदीरवाडे, वंदना सोरते, विलास टिकले, वामनदादा गेडाम, प्रिती ईश्वर चहांदे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, रोहिणी पराडकर,गणेश रामदास निकम, मिलींद खोब्रागडे, रेखा दिक्षित, केवळराम बगमारे, वसंत चापले,  उकंडराव नारायण राऊत, पी.डी.काटकर,  
संतोष कपाले, सोनाली रायपुरे- सहारे, मधुकर दुफारे,वकिल शेख, राजरत्न पेटकर, स्वप्नील बांबोळे,खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, सुजाता अवचट, ज्योत्स्ना बंसोड,  कु. भावना रामटेके, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) यांनी अशी माहिती दिली आहे..


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 13, 2024

PostImage

डोळसं व्हायचं समाजाला परिवर्तनाची दिशा देणारा काव्यसंग्रह ठरणार - रोहणकर-


 

     जर मनुष्याचा खऱ्या अर्थाने बौद्धिक विकास झाला तरच त्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो. समाजात काही असेही काळजीवाहू साहित्यिक आहेत की ते त्यांच्या साहित्य कृतींतून समाजाचे कल्याण करू पाहतात. एक जागरूक नागरिक या नात्याने आपला आजूबाजूचा परिसर व तेथील लोकं यांचे ते बारकाईने निरीक्षण करीत असतात. ते निरीक्षण करतांना समाजातील काही अनिष्ट चालीरीती, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा यात गुरफटलेल्या जनतेला उपदेश करून त्यांचे खरे हित कशात आहे हे सांगण्यासाठी वेळोवेळी त्यांना सचेत करून त्यांना चांगल्या मार्गाकडे नेण्याचे कार्य काही 'डोळस' साहित्यिक करीत असतात. साहित्यिकाला समाजाचे भान असणे आवश्यक आहे. समाजातील वास्तविक परिस्थिती दर्शविणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे साहित्यच उत्तम दर्जाचे साहित्य ठरू शकते. 
           गडचिरोली  येथील निवृत्त शिक्षक श्री. उपेंद्र रोहनकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते आहेत. नुकताच त्यांचा "डोळस व्हायचं" हा कवितासंग्रह "झाडीबोली साहित्य मंडळाच्या" साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. समाजाचे अवलोकन करतांना समाजातील अनेक घटनांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. समाजात दिसून येत असलेली अंधश्रद्धा ही कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. त्याने समाजाची प्रगती साधली जाऊ शकत नाही. आजची तरुण पिढी दारू, खर्रा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अंमली पदार्थ याच्या जीवघेण्या भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तरच ते यातून बचाव करू शकतील अन्यथा पुढची पिढी आजच नष्ट होऊन जाईल. अनेक परंपरांच्या विळख्यात सापडलेल्या भगिनींना त्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना विज्ञानाचा मार्ग दाखवून डोळस बनवावे लागेल. बुवाबाजी व कर्मकांडापासून त्यांना परावृत्त करावे लागेल. या दृष्टीकोनातून साकारलेल्या कवी उपेंद्र रोहनकर यांच्या कविता खरोखरच नवी परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या आहेत. व्यभिचार, बलात्कार, ग्रामीण समस्या, शिक्षण, शेती, इ. समस्यांवर देखील त्यांनी कवितांतून प्रकाश टाकला आहे. महिलांचे अज्ञान दूर करण्यासाठी साकारलेल्या कविता या विशेष उल्लेखनीय म्हणाव्या लागतील. 
         राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.नरेंद्र दाभोलकर अशा कितीतरी महान समाजसुधारकांनी समाजाला 'डोळस' बनविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आताच्या आधुनिक युगातही समाजाची पाहिजे तशी वैज्ञानिक व वैचारिक प्रगती झाली नाही ही येथील शोकांतिका आहे. भारतीय समाज जागृत झाला नाही तर तो कायमच अंधाऱ्या गुहेत भटकत राहील. 
        अतिशय चिंतन मनन करून लिहिलेल्या कविता कवीचे संवेदनशील अंतर्मन दाखवते. समाजाबद्दलची कळकळ व तळमळ अनेक कवितांतून प्रकर्षाने जाणवते. "डोळस व्हायचं"  हा कविता संग्रह खरोखरच प्रशंसनीय असून वाचणारा प्रत्येक व्यक्ती हा 'डोळस' झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.

सौ. सुनिता तागवान
कवयित्री, लेखिका, समीक्षिका, सामाजिक कार्यकर्ती
संस्थापिका, रचना प्रकाशन संस्था
आरमोरी जिल्हा गडचिरोली.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

बल्लारपूरच्या सर्वांगिण विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही - ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही


 

 *बल्लारपूर येथे कामगार स्नेहसंमेलन थाटात संपन्न* 

*चंद्रपूर, दि.१२ - देशातील महत्त्वाचे शहर म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. देशातील बल्लारपूरमध्ये छोटा भारत वसलेला आहे. या शहराच्या शिक्षण, आरोग्य, रोजगारासह सर्वांगिक विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.*

बल्लारपूर शहरातील सुभाष टॉकीत बसस्टॉप जवळील सभागृहात आयोजित अजय दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कामगार स्नेहसंमेलनात ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, आयोजक अजय दुबे, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, राकेश सोमाणी, राममिलन यादव, उमेश कुंडले,सुरज सिंग ठाकूर,राममिलन यादव, सेवासिंग कालरा , जसवंत सिंग, धर्मप्रकाश दुबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहराला तहसीलचा दर्जा देण्याबाबत आलेल्या अडचणींचे प्रवास वर्णन केले. ‘बल्लारपूरला तहसीलचा दर्जा देऊ न शकल्यास राजकारण सोडण्याची शपथ घेतली होती. पण बल्लारपूर येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या बळावर असाध्य वाटणारे कार्य देखील साध्य झाले,’ असे ते म्हणाले.

केंद्र आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त भगीनींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ८ हजार भगिनींच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होणार असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

पुढे म्हणाले,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने आता लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना याचा लाभ होणार आहे. शिक्षणात गरिबी अडसर ठरू नये यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना देखील महाराष्ट्र सरकारने आणली आहे. कामगार बांधवांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दर्जेदार हॉस्पिटल तयार करण्यात येत आहेत. बल्लारपूरच्या नजीक १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तयार होत आहे. 

बल्लारपूर मधील अनेकांना घरांचे पट्टे नसल्याची मोठी समस्या आहे. किमान १२ हजार नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यादृष्टीने कार्यवाही होईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना विविध योजना आणि विकास कामांचा लाभ मिळावा यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

एक लक्ष्य, एक विचार’ या भावनेने कार्य करा - ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


 

*बल्लारपूर शहर व ग्रामीण भाजपा संमेलन* 

*चंद्रपूर, दि.१२- देशातील जनतेची दिशाभूल करणे, संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करणे आणि जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने केले. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर द्या. आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे एक लक्ष्य, एक विचार पुढे ठेवून कार्य करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

बल्लारपूर शहरातील एकदंत लॉन येथे बल्लारपूर शहर आणि ग्रामीणमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी (ता.११) पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,लखनसिंह चंदेल,काशी सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, समीर केणे, रणंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, वैशाली जोशी, आशीष देवतळे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

'संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का, वो काम सब किए चलो' या ब्रीदनुसार कामं करायचे आहे. खुर्ची प्राप्त करणे हे आपले ध्येय नाही. भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो. तीच भावना कायम ठेवून येत्या काळात ‘बी फॉर भारत’, ‘बी फॉर बल्लारपूर’, ‘बी फॉर बीजेपी’ याच तत्त्वाने काम करा.’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशात सर्वाधिक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

संविधानाचा खोटा प्रचार आणि अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांची काँग्रेसने केलेली दिशाभूल ही देखील लोकसभेतील पराभवाची कारणे आहेत. भाजपा दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वत: काँग्रेसचा विरोध करायचे. ‘काँग्रेस हे जळते घर आहे. जो यात जाईल तो भस्म होईल,’ असे ते म्हणायचे. त्याच बाबासाहेबांचे नाव वापरून काँग्रेसने खोटा प्रचार केला आणि समाजाची दिशाभूल केली. खरे वास्तव पुढे आणण्यासाठी जनतेत जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. आज काँग्रेस जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. अशात आपले नाव आग लावणाऱ्यांत नाही तर आग विझविणाऱ्यांत घेतले जावे, याच हेतून आणि पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. सोशल मीडिया हे आजच्या युगातील मोठे अस्त्र,शस्त्र आहे. त्याचा उपयोग योग्यप्रकारे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे योग्य नियोजन करावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांना अभियानात सामील करून घ्या, असे आवाहन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

झाडीपट्टी कलावंत संस्था तालुका गडचिरोली समिती गठीत


 

झाडीपट्टी कलावंत संस्था तालुका गडचिरोलीची 11 ऑगस्टला दुपारी अकरा वाजता विश्रामगृह गडचिरोली येथे मीटिंग ठेवण्यात आली होती. या सभेत सर्व सभासद  उपस्थित होते .  यामध्ये श्री जितेंद्र वासुदेव उपाध्याय अध्यक्ष , श्री सुनील काशीराम चडगुलवार उपाध्यक्ष,   श्री राजेंद्र पांडुरंग बोबाटे सचिव ,  श्री राजेंद्र भीमराव चिलगिलवार कोषाध्यक्ष ,  श्री सिद्धार्थ हिरामण  गोवर्धन सहसचिव   व सर्व सदस्यगण   श्री विवेक विरदास मून , श्री वसंत सुधाकर चापले,  श्री दादाजी सिताराम चुधरी , श्री तुलसीराम तुलाराम उंदीरवाडे,  श्री रूमाजी कवडूजी भुरले,   श्री महेंद्र तुळशीराम ठाकरे , सौ उषा युवराज मुळे ,आयेशा अश्फाक अली यांना बहुमताने संघटनेचे कार्यभार सोपविण्यात आले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

नाट्यश्रीच्या उपक्रमाचे बत्तिसावे मानकरी ठरले राजेंद्र यादवराव सोनटक्के



नाट्यश्री उपक्रम -सत्र बत्तिसावे  
-----------------------------------------------
" *रानगर्भ फुलत आहे* " या गृपमधील सर्व कवी व कवयित्रींना कळवितांना हर्ष होतो की, नाट्यश्रीच्या वतीने आम्ही नवीन वर्षात दि. १ जानेवारी २०२४ पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत *बत्तिसाव्या* सत्राचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.

" *आठवड्यातील उत्कृष्ट कवी आणि कविता"* 
 *उत्कृष्ट कवी - राजेंद्र यादवराव सोनटक्के* 
 *कविता - " आई"* 
             नाट्यश्रीच्या उपक्रमाचे *बत्तिसावे* मानकरी *राजेंद्र यादवराव सोनटक्के* यांचे " *रानगर्भ फुलत आहे* " गृपतर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. असेच आपले साहित्य फुलत राहो, ही सदिच्छा.
                   आपले पुरस्कार नाट्यश्रीच्या पुढील नियोजित कार्यक्रमात आपणांस मानाने प्रदान करण्यात येईल. 
                  या उपक्रमात एकूण ३१ कवींनी सहभाग नोंदविला. त्या सर्व कवींचे आम्ही आभारी आहोत. सोमवार पासून सुरू होणाऱ्या पुढील  *तेहत्तिसाव्या* सत्रातील उपक्रमासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
           - *योगेश गोहणे* (कविता विभाग प्रमुख) व
 *चुडाराम बल्हारपुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे.**


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

महाराष्ट्र अंनिस व झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने काव्यमैफीलीचे आयोजन


दिनांक 10 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र अंनिस व झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने  परिश्रम भवन गडचिरोली येथे काव्यमैफीलीचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ३४ व्या  झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. चंद्रकांत लेनगुरे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. विनायक धानोरकर अध्यक्ष  झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा गडचिरोली, उपाध्यक्ष  मा. डॉ. प्रविण किलणाके,  मा. लहुजी रामटेके, अध्यक्ष महाराष्ट्र अंनिस शहर शाखा गडचिरोली, मा. विलास निंबोरकर  राज्य सहकार्यवाह महाराष्ट्र अंनिस, मा. कवी आनंदरावजी बावणे, खेमराजजी हस्ते, वसंत चाफले गोगांव, मिलींद खोब्रागडे,वर्षा राजगडे, नथ्थूजी चिमुरकर,कीरणताई चौधरी, संजीव बोरकर,हरिदासजी कोटरंगे, कमलेश झाडे , प्रेमीलाताई अलोणे,  मालतीताई सेमले, प्रतिक्षा कोडापे, पुरुषोत्तम ठाकरे,डॉ. प्रविण किलणाके,उपेंद्र रोहनकर, मा. जितेंद्र रायपुरे , मा. विठ्ठलरावजी कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस आदी. यावेळी उपस्थित होते. संचलन मा. उपेंद्र रोहनकर यांनी तर आभार जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024

PostImage

जुनी पेन्शन आणि गडचिरोली येथे नाट्यगृहाची मागणी


आज दिनांक 11/08/2024 रोजी रविवारला शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. सुधाकर अडबाले आमदार यांचेशी जुनी पेन्शन व  गडचिरोली येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम बाबत रेस्ट हाऊस गडचिरोली येथे गडचिरोली तालुका संघटना तर्फे ओझरती  चर्चा करण्यात आली. सर्व गडचिरोली झाडीपट्टी तालुका संघटनेच्या सदस्यांनी आमदार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यामध्ये संघटनेचे अध्यक्ष जितू उपाध्ये, उपाध्यक्ष सुनील भाऊ चडगुलवार, सचिव राजू भाऊ बोबाटे, सहसचिव सिद्धार्थ गोवर्धन, आणि सदस्यांमध्ये वसंत चापले, राजू चिलगिलवार, टीकारामजी सालटकर, लाकडे साहेब, रूमाजी भुरले, राज मराठे, आणि संघटनेच्या महिला सदस्य म्हणून उषा मुळे आईशा अल्ली, आणि झाडीपट्टी कवित्री प्रेमीला आलोणे इत्यादी सदस्य उपस्थित होते.