अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
27-10-2024
मनोहर पोरेटी यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढविण्याची पूर्वतयारी नव्हती त्यांची इच्छा आरमोरी मतदार संघातून निवडणूक लढविण्याची होती त्यांनी आरमोरी क्षेत्रात जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली मात्र आरमोरी क्षेत्रात काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊगर्दी बघता त्यांनी निवडणुक तीन ते चार महिने बाकी असताना आपला मोर्चा गडचिरोली विधानसभा क्षेत्राकडे वळविला. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या भाजप प्रवेशानंतर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे हाच चेहरा काँग्रेस समोर होता विश्वजित कोवासे यांनी विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढवून मतदार संघ पिंजून काढला... आणि निवडणुकीची तयारी सुरु केली... मात्र काँग्रेस च्या गटबाजीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विश्वजित कोवासे यांच्याविरुद्ध पक्षात डॉ सोनल कोवे, यांना शब्द देवून प्रतिस्पर्धी निर्माण केले दुसरीकडे ते मनोहर पोरेटी यांच्यासाठीही अनुकूल होतें.... गडचिरोलीची जागा विश्वजित कोवासे यांना जाणार अशी स्थिती होती.. विजय वडेट्टीवार यांचा विरोध असला तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पाठिंबा असल्याने विश्वजित कोवासे यांना उमेदवारीची आशा होती मात्र विजय वडेट्टीवार यांच्या तीव्र विरोधामुळे मनोहर पोरेटी यांना उमेदवारीची लॉटरी लागली..... ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. तुळशीराम पाटील पोरेटी यांचे पुत्र असून त्यांच्या वडिलांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढविली होती.. मनोहर पोरेटी यांनी गडचिरोली जिल्हापरिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले असून आता.... भाजपचे उमेदवार डॉ मिलिंद नरोटे, काँग्रसचे मनोहर पोरेटी, व अपक्षउमेदवार माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्यात सामना रंगणार असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments