संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
05-09-2024
गडचिरोली -:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध अध्यासन केंद्राचे काम सुरू झाले आहे.त्यांचेमार्फत नेहमी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.परंतू आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन झाले असुनही गोंडवाना विद्यापीठाला वारंवार पत्रव्यवहार करून,भेटी देऊन सुद्धा आदिवासींच्या व विशेषत महिलांच्या विकासासाठी अजुन कोणताही उपक्रम राबवलेला नाही.आदिवासी महिलांचे स्वतंत्र अध्यासनाची मागणी आदिवासी महिला संघटनांनी वारंवार केली.सतत भेटी चर्चा केल्या पण त्याकडे दूर्लक्ष केले जाते यावर महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली.आदिवासी महिला विकासासाठी कार्यक्रम घेऊन आदिवासी महिला अध्यासनाचे उद्घाटन व्हावे व आरोग्य शिक्षण रोजगार आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीचे संशोधन व्हावे यासाठी मा कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई चौधरी, ज्योती मेश्राम महिला राजसत्ता आंदोलन समन्वयक, कुसुम ताई अलाम माजी जि प सदस्य तथा साहित्यिक, सुधाताई चौधरी, उपेंद्र रोहनकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती,आशा ताई वेलादी, सुनिता उसेंडी उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments