संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
01-11-2024
आरमोरी:- दि 1/11/2024
दिव्यांग लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यात सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अंधांसाठी असलेल्या आचारनियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरात 'पांढरी काठी दिन' पाळला जातो. दृष्टिहीन लोकांसाठी, पांढरी काठी हे स्वातंत्र्याचे आणि गतिशीलतेचे प्रतिनिधित्व करते आणि आता तर ते मुक्ती, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास यांचेही प्रतिनिधित्व करते.ही काठी दृष्टिहीन व्यक्तीला मुक्तपणे फिरण्यास आणि आपली दैनंदिन कामे पूर्णत्वास नेण्यास मदत करते. याच काठी दिना निमित्त दृष्ट्रीहीन जनकल्याण बहुउद्देशिय संस्था, बल्लारपुर यांच्या वतीने जागतीक पांढरी काठी दिनाचे आयोजन केमीस्ट भवन आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंदू वडपल्लीवार सामजिक कार्यकर्ते तथा माजी उपसभापती प स आरमोरी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विजय लाकडे गर्वहमेंट. कॉन्ट. आरमोरी, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार विलास चिलबुले, सतीश शेंडे अध्यक्ष रा. दृ. संघ नागपूर, जिज्ञासा कुबळे चवलढाल संस्थापक अध्यक्ष आत्मदिपम सोसायटी नागपूर, दिलीप गेडाम तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात दिवाळी निमित्याने अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरणव अंध व्यक्तीना दिवाळी निमीत्य धान्य स्वरूपाची मदत, गरजु अंध व्यक्तींना वस्त्रभेट देण्यात आली यावेळी तालुक्यातील बहुसंख्य अंध महिला व पुरुष उपस्थित होते मंगला लालसरे कोषाध्यक्ष,प्रमोद धात्रक, अर्चना धात्रक यांची अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments