नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
13-08-2024
जर मनुष्याचा खऱ्या अर्थाने बौद्धिक विकास झाला तरच त्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो. समाजात काही असेही काळजीवाहू साहित्यिक आहेत की ते त्यांच्या साहित्य कृतींतून समाजाचे कल्याण करू पाहतात. एक जागरूक नागरिक या नात्याने आपला आजूबाजूचा परिसर व तेथील लोकं यांचे ते बारकाईने निरीक्षण करीत असतात. ते निरीक्षण करतांना समाजातील काही अनिष्ट चालीरीती, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा यात गुरफटलेल्या जनतेला उपदेश करून त्यांचे खरे हित कशात आहे हे सांगण्यासाठी वेळोवेळी त्यांना सचेत करून त्यांना चांगल्या मार्गाकडे नेण्याचे कार्य काही 'डोळस' साहित्यिक करीत असतात. साहित्यिकाला समाजाचे भान असणे आवश्यक आहे. समाजातील वास्तविक परिस्थिती दर्शविणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे साहित्यच उत्तम दर्जाचे साहित्य ठरू शकते.
गडचिरोली येथील निवृत्त शिक्षक श्री. उपेंद्र रोहनकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते आहेत. नुकताच त्यांचा "डोळस व्हायचं" हा कवितासंग्रह "झाडीबोली साहित्य मंडळाच्या" साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. समाजाचे अवलोकन करतांना समाजातील अनेक घटनांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. समाजात दिसून येत असलेली अंधश्रद्धा ही कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. त्याने समाजाची प्रगती साधली जाऊ शकत नाही. आजची तरुण पिढी दारू, खर्रा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अंमली पदार्थ याच्या जीवघेण्या भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तरच ते यातून बचाव करू शकतील अन्यथा पुढची पिढी आजच नष्ट होऊन जाईल. अनेक परंपरांच्या विळख्यात सापडलेल्या भगिनींना त्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना विज्ञानाचा मार्ग दाखवून डोळस बनवावे लागेल. बुवाबाजी व कर्मकांडापासून त्यांना परावृत्त करावे लागेल. या दृष्टीकोनातून साकारलेल्या कवी उपेंद्र रोहनकर यांच्या कविता खरोखरच नवी परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या आहेत. व्यभिचार, बलात्कार, ग्रामीण समस्या, शिक्षण, शेती, इ. समस्यांवर देखील त्यांनी कवितांतून प्रकाश टाकला आहे. महिलांचे अज्ञान दूर करण्यासाठी साकारलेल्या कविता या विशेष उल्लेखनीय म्हणाव्या लागतील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.नरेंद्र दाभोलकर अशा कितीतरी महान समाजसुधारकांनी समाजाला 'डोळस' बनविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आताच्या आधुनिक युगातही समाजाची पाहिजे तशी वैज्ञानिक व वैचारिक प्रगती झाली नाही ही येथील शोकांतिका आहे. भारतीय समाज जागृत झाला नाही तर तो कायमच अंधाऱ्या गुहेत भटकत राहील.
अतिशय चिंतन मनन करून लिहिलेल्या कविता कवीचे संवेदनशील अंतर्मन दाखवते. समाजाबद्दलची कळकळ व तळमळ अनेक कवितांतून प्रकर्षाने जाणवते. "डोळस व्हायचं" हा कविता संग्रह खरोखरच प्रशंसनीय असून वाचणारा प्रत्येक व्यक्ती हा 'डोळस' झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.
सौ. सुनिता तागवान
कवयित्री, लेखिका, समीक्षिका, सामाजिक कार्यकर्ती
संस्थापिका, रचना प्रकाशन संस्था
आरमोरी जिल्हा गडचिरोली.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments