संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
21-08-2024
गडचिरोली -: आजचा युवक हा भरकटलेला आहे. तो जुन्याच आडवाटेने प्रवास करतो आहे.बदलाची गरज ती वाट जर सरळ आणि निश्चित ध्येयाकडे जाणारी निवडल्यास यश तुमचेच आहे. महा.अनिसच्या खुर्सा शाखेने घेतलेल्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रा. तिलेश मोहुर्ले,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुर्सा येथील सरपंचा मंजुळाबाई पदा ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रशांत रामटेके पोलीस पाटील,मा. विलास निंभोरकर राज्य सहकार्य वैज्ञानिक जाणीवा व शिक्षण प्रकल्प महा.अनिस, प्रा. विलास पारखी सर्पतज्ञ, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष .पत्रकार सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उपेंद्र रोहनकर.यांनी केले प्रथमतः शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय पाहुण्यांनी फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनिस चळवळीची भूमिका व समाजात होऊन गेलेल्या संत विचारांची परंपरा मांडताना विलास निंभोरकर यांनी सांगितले की लोकांनी प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.समाजात बुवा बाबाची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली आहे.त्याला भोळाभाबडा समाज फसत असतो.त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये विवेकवादी विचार असले पाहिजेत.तर प्रा. पारखी सरांनी पावसाळ्यात सापापासून कोणती काळजी घ्यायची. साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे. हे लोकांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश झंजाळ,रवींद्र बावणे, दामोदर मेश्राम, रामचंद्र निलेकार, जाणू धुळसे, अविनाश सालोडकर, तुळशीराम दाणे, उद्धव रामटेके, विशाल मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार संदीप आंबोरकर ह्यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठया संख्येनी उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments