RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
06-11-2024
गडचिरोली -
कोकण प्रदेशातील स्वदेशी भारत बचत गट व श्री काळेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान,आसू, ता. फलटण, जिल्हा - बारामती या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या साहित्यिकांना नामवंत मराठी साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम व सिंधुदुर्ग येथील दत्तात्रय हिर्लेकर यांना ठुमकत मुरडत या नाटकाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे श्री काळेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह तसेच पुरस्कार समिती सदस्य, साहित्यिक व कवी प्रकाश दिनकर सकुंडे यांनी पत्राद्वारे कळविले असून हुतात्मा राष्ट्रबंधू राजीव भाई दिक्षित यांची जयंती व पुण्यतिथी चे निमित्ताने दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री काळेश्वर मंदिर, आसू (ता. फलटण) येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी साहित्य सेवा प्रज्ञामंच , पुणे यांचा 'उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार - २०२३' (प्रथम पुरस्कार) व मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांचे श्री स्थानक पुरस्कार - २०२४ (प्रथम पुरस्कार) प्राप्त झाले आहे.
यापुर्वी त्यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार - २०२३, मौजा फलटण (जिल्हा- सातारा येथील धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ व तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचे तितिक्षा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार- २०२४,झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा- गडचिरोली यांचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार-२०२४ इ. पुरस्कार प्राप्त झाले आहे . या नाटकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १५ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा - क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा - क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments