निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
08-09-2024
आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना संस्था गडचिरोली यांच्या वतीने सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला विदर्भ स्तरीय गीत गायन स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहे त्यासंबंधी त्या गीतगायन समारंभाचा नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली या सभेमध्ये झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे अध्यक्ष जितेंद्र वासुदेव उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. प्रथमता कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन यांनी आपले विचार मांडले. नियोजन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. त्यानंतर झाडीपट्टी कलावंत संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ चडगुलवार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेले जितु भाऊ यांनी सुद्धा कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल कोणाकडे कोणकोणती जबाबदार राहील ही माहिती त्यांनी दिली. गीत गायन स्पर्धेचे त्या दिवशी चे सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ गोवर्धन व आयेशा अली यांच्यावर सोपविण्यात आली. नोंदणी विभागाची जबाबदारी श्री भगवान गेडाम व सदानंद उईके यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच स्टेज मॅनेजमेंट यांची जबाबदारी उषा मुळे, वर्षा गुरूनुले दिलीप मेश्राम, प्रकाश मेश्राम आणि राजेंद्र बोभाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. आभार प्रदर्शनाची जबाबदारी विवेक मून यांच्याकडे सोपविण्यात आली. पाहुण्यांचे नियोजन हे सुनील चडगुलवार व राजेंद्र चिलगिलवार यांच्यावर सोपविण्यात आली .तसेच भोजन व्यवस्था पाणी व्यवस्था व त्या कार्यक्रमास लागणारी जी काही व्यवस्था असेल ती जितेंद्र जी उपाध्याय व तुळशीरामजी उंदीरवाडे यांच्याकडे सोपविण्यात आली प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रकाश लाडे व वसंत चापले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली व या कार्यक्रमास वेळेवर आलेली जबाबदारी त्याची व्यवस्था संपूर्ण झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका च्या सदस्य हे अचूक बजावतील असे ठरविण्यात आले या सभेला जितेंद्र वासुदेव उपाध्याय, सुनील चडगुलवार, दिलीप मेश्राम , राजेंद्र बोबाटे , विवेक मून , भगवान गेडाम, टिकाराम सालोटकर, सिद्धार्थ गोवर्धन , प्रकाश मेश्राम, तुळशीराम उदिरवाडे, सदानंद उईके, उषा मुळे आयेशा अली, वर्षा गुरनुले, अशोक सूत्रपवार ,राजेंद्र चिलगिलवार, वसंत चापले,आणी प्रकाश लाडे इत्यादी कलावंत बंधू हजर होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments