STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
30-10-2024
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये फुटीचे वातावरण तयार झाले आहे.
अहेरीत भाजपचे माजी राज्यमंत्री राजे अंबरीश महाराज आत्राम यांनी शक्तीप्रदर्शन करीत दाखल केलाअपक्ष अर्ज... तर गडचिरोलीत विद्यमान आमदार डॉ होळी यांनी केली बंडाची तयारी...
गडचिरोली जिल्हयातील आरमोरी, गडचिरोली व आरमोरी हे तिन्ही मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आरमोरी मतदार संघात भाजपने विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना उमेदवारी दिली.. गडचिरोली मतदार संघात विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांना तिकीट नाकारत डॉ. मिलिंद नरोटे या नव्या चेहऱ्याला संधी दिली तर अहेरीची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्याने येथुन विद्यमान आमदार मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना महायुतीची उमेदवारी मिळाली.
अहेरीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे माजी राज्यमंत्री राजे अंबरीश महाराज आत्राम यांची कोंडी झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अहेरीत मैत्रीपूर्ण लढतीची मागणीही केली.... अखेर अंबरीश आत्राम यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे अहेरी मतदारसंघात महायुतीत ठिणगी पडली असुन त्यांची काका धर्मरावबाबा, व चुलत बहीण भाग्यश्री आत्राम यांच्यासोबत लढत असणार आहे. 2014. साली आपल्या काकांचा पराभव करीत अंबरीश आत्राम हे अहेरीतून भाजपकडून निवडून येत जायंट किलर ठरले त्यांना थेट फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले मात्र 2019साली त्यांना आपल्या काकाकडून पराभव स्वीकारावा लागला... राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी अडथळा निर्माण झाला आणि त्यांनी थेट धर्मराव बाबांना आव्हान देत मैदानातही उतरले.. मतदारसंघातील प्रश्नाबाबत धर्मराव बाबा समोर प्रश्नांची सरबत्ती करत आक्रमक टीकास्त्र सोडल्यामुळे मतदार संघातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.. तर वडील आणि मुलगी यांचे बंड हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून वडील आणि मुलगी यांच्यातील वैर हे नाटक असल्याची टिका केली.येथील मतदार संघातील कळीचा मुद्दा असेलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा फोडीत स्थानिकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.. आता त्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले.
तर दुसरीकडे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार देवराव होळी यांची तिकीट कापून डॉ. मिलींद नरोटे या नव्या चेहऱ्याला संधी दिल्यामुळे नाराज डॉ होळी अपक्ष अर्ज दाखल केला. व चार तारखेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले.माजी खासदार अशोक नेते आणि डॉ होळी यांच्यात विस्तवही जात नव्हते यातून भाजपमध्ये दोन गट पडले. यातुनच त्यांच्या उमेदवारीसाठी एका एका गटाकडून विरोध झाल्याने त्यांचा पत्ता कट करण्यात आला त्यांनी मित्र पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी हे माझ्यासोबत असून भाजपचा कार्यकर्ता माझ्यासोबत असल्याचे सांगत खासदार नेते यांच्यावर टीका करीत विजयाचा विश्वास ही बोलून दाखवला. आमदार डॉ होळी यांच्या बंडाच्या तयारीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली असुन या बंडाचा फटका कितपत बसेल हे निकालानंतर स्पष्ट होणारं आहे..गडचिरोली जिल्ह्याली पालकमंत्री पदाची धुरा सांभाळलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा जिल्हयातील जागांवर लागली असुन या बंडखोरीमुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.. असे असले तरी मतदार नेमके कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात यावर यशापयश अवलंबून असणार आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments