बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
05-09-2024
दिनांक 4 सप्टेंबर – चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची समिती गठीत करुन या कामास गती देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या. मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments