अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
14-11-2024
गडचिरोली -
महाराष्ट्राची उपराजधानी व संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "महापूजा " या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहार संस्थेचे सचिव सौ. मंदा खंडारे व अध्यक्षा सौ. आशाताई पांडे यांनी पत्राद्वारे कळविले असून ३० नोव्हेंबरला दु. २ ते ५ या वेळात बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रतिथयश शिक्षणतज्ञ डॉ. विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते तसेच ज्ञानयोगी सन्मानाचे मानकरी डॉ. म. रा.जोशी व साहित्य विहार च्या अध्यक्ष ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
'महापूजा' हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे . झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" व "धरती आबा क्रांतीसुर्य - बिरसा मुंडा" या दोन नाटकांना विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'महापूजा' या महानाट्यास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments