ProfileImage
135

Post

1

Followers

0

Following

PostImage

MH 33 NEWS

Yesterday

PostImage

निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक रूजू



गडचिरोली दि. 30 : विधानसभा निवडणुक-2024 ही शांततापुर्ण व भयमुक्त वातावरणात नि:पक्षपातीपणे पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 
67-आरमोरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून के. आरीफ हफीज  (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संबंधात जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी  सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत  श्री. के. आरीफ हफीज  यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 7588134720 यावर संपर्क करावा.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर शासकिय निवडणुक निरीक्षक म्हणुन श्री. ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते गडचिरोली जिल्हयामध्ये हजर झालेले आहे. ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. विधानसभा निवडणुक अनुषंगाने जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी  सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत व सायंकाळी 04.00 ते 06.00 वाजे पर्यंत श्री. ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 9404306040 यावर संपर्क करावा.
69- अहेरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून अनुपम शर्मा  (भा.पो.से.) (9404306035) यांची नियुक्ती करण्यात आली असुन,  ते कर्तव्यावर रूजू झाले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Yesterday

PostImage

सामान्य निवडणूक निरीक्षकांनी केली सोयी सुविधांची पाहणी 


 

गडचिरोली:- ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा(भा.प्र.से.)यांनी आज दिनांक ३०ऑक्टोबर २०२४ रोजी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील गडचिरोली येथील धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ९२ या दिव्यांग मतदान अधिकारी संचलित मतदान केंद्राला भेट देऊन सोयी सुविधांची व स्वच्छतेचे पाहणी केली. तसेच त्यांनी पारडी नाका येथील स्थिर निगराणी पथकाला भेट देऊन सदर नाक्यावरील वाहन तपासणी बाबत आढावा घेतला व निवडणूक संदर्भात नियमांचे पालन करून योग्य प्रकारे वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे)यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्षाची सुद्धा पाहणी करून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोली विधानसभेसाठी नियुक्त झालेले कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक हृदय कांत (भापोसे),खर्च निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम(भाप्रसे), अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश(भापोसे), गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी)अमित रंजन व अन्य अधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट


 

गडचिरोली दि.२४ : 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त  निवडणूक निरीक्ष राजेंद्र कुमार कटारा यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. वृत्तपत्रातील राजकीय जाहिराती, पेड न्यूज यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील राजकीय जाहिरातींवर २४ तास करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यावेळी उपस्थित होते. श्री जाधव यांनी निवडणूक‍ निरीक्षक श्री कटारा यांना राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूज आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली.  
000


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा



गडचिरोली दि. २९ : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे भेट देऊन निवडणूकीसबंधाने पूर्वतयारीचा आढावा घेतला.  
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, तहसिलदार प्रिती डूडूलवार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
  श्री विनीतकुमार यांनी  नामनिर्देशन स्विकारण्याच्या कार्यवाहीची पाहणी केली तसेच तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन आचारसंहिता उल्लंघनाच्या आणि निपटारा करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. सिव्हीजिल ॲप वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा 100 मिनीटांच्या आत निपटारा करण्याच्या सुचना त्यांनी आचारसंहिता कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. आचारसंहितेच्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या आणि परवाने अर्ज तसेच ऑनलाईन अर्ज विनाविलंब त्याच दिवशी निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  इव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनकरीता असणारे सुरक्षा कक्ष आणि साहित्य वाटप तसेच मतमोजणी व्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक श्री विनीतकुमार यांनी निरीक्षण करुन त्याअनुषंगाने संबंधीतांना आवश्यक सूचना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट


 

 गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा  यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील  स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्ष तसेच मतदान केद्रांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी 68-गडचिरोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, उपविभागीय अधिकारी चामोर्शी तथा सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संजय भांडारकर व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
निवडणुक निरीक्षक श्री कटारा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. 
श्री कटारा यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच मतदारांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मीना आणि सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

जनतेच्या उद्धारासाठी मी लढणारच:राजे अम्ब्रिशराव आत्राम जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल.!


 

अहेरी:- आपल्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती,वाढलेली बेरोजगारी,रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी मी लढणार असल्याचं संकल्प करीत माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

२८ ऑक्टोबर रोजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारोंच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढत 'हम भी किसींसे कम नहीं' हे दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी कै. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळाला अभिवादन केले.त्यानंतर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत त्याच चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.यावेळी राजामाता राणी रुख्मिणी देवी,युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम,विक्की बाबा आत्राम,राजे समर्थक आणि पाचही तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यावर तोफ डागली.गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मोठा गेम केला.पैशाने तिकीट विकत घेऊन पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असले तरी ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतली आहे.त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात तुम्ही कितीही फटाके फोडा २३ तारखेला आम्ही फटाके फोडणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.एका खाजगी कंपनीच्या मांडीवर बसून पैशाने आणि माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटत असेल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असून तुमच्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी विरोधकांना योग्य धडा शिकवा असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंचा भाषण ऐकून त्यांच्या समर्थनार्थ एकच जल्लोष केला.

दरम्यान कै.राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात आणि आदिवासी पारंपरिक नृत्याने भव्य शक्ती प्रदर्शन करत पोलीस स्टेशन समोर पर्यंत रॅली काढण्यात आली.त्यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात जल्लोषाने 'राजे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है' चे नारे देत समर्थन जाहीर केले.

*जनता हीच माझी तिकीट*

मला पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचा चिन्हही नको.माझी जनता हीच माझी तिकीट आहे.जनता आशीर्वाद दिल्यास मला विधिमंडळ गाठता येणार आहे.विद्यमान मंत्र्यांनी कितीही पैसा, पॉवर,कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी

'मै झुकेगा नही साला' असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक प्रकारचा चॅलेंज दिला आहे.!


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार – आमदार डॉक्टर देवराव होळी


 

गडचिरोली:- पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय मी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेईन याविषयी माहिती दिली.

आमदार डॉक्टर देवराव होळी पुढे म्हणाले जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो आहोत.

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे , भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

काँग्रेसचे ऍड. विश्वजीत कोवासे गडचिरोलीतून अपक्ष लढणार


 

गडचिरोली:- विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात विश्वजीत मारोतराव कोवासे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आपली लढाई लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उद्या दिनांक २९ ऑक्टोबरला नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज सादर करणार आहेत.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री ताई अत्राम यांचे नामांकन, रॅलीला अपार जनसमर्थन


 

 

अहेरी:-आज अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार  च्या उमेदवार भाग्यश्री ताई अत्राम यांनी आपले नामांकन दाखल केले. इंडियन फंक्शन हॉल, भुजंगरावपेठा, अहेरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित रॅलीला मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये अहेरीतील नागरिकांनी भाग्यश्री ताई अत्राम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला.

भाग्यश्री ताई अत्राम यांनी या अद्भुत प्रेमासाठी आणि मिळालेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहेरी समृद्धी, विकास, आणि आनंदाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. या बदलाच्या नव्या विचारांना त्यांनी सलाम केला आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची  चौथी यादी जाहीर! कुणाकुणाला मिळाली संधी?


 

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत शरद पवारांनी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 76 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आता आणखी 9 उमेदवारांची घोषणा करण्याता आली आहे.

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी 

माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील अनिल देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरूणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मैंद
सिंदखेडा- संदीप बेडसे


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज गडचिरोली विधानसभा क्षेत्र: ईव्हीएम प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण


 

गडचिरोली: ६८-गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे.२६व २७ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या  प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले. 

       ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्र असून एकूण  १ हजार ८१९ मतदान अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतले.यावेळी मतदान प्रक्रियेतील मतदान अधिकारी ,केंद्राध्यक्ष यांना नेमून दिलेले कामकाज, कर्तव्य व  जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली. मतदान केंद्र तयार करणे, मतदानाची पूर्वतयारी, मतदान युनिट तयार करणे, नियंत्रण युनिट तयार करणे, अभिरुप मतदान घेणे ,कागदी मोहर लावणे, प्रत्यक्ष मतदानासाठी मतयंत्र तयार करणे, मतदारांची ओळख पटविणे ,प्रदत मत,आक्षेपित मत, मतदान प्रक्रिया संबंधित कायदे, विविध प्रपत्रे व संपूर्ण मतदान प्रक्रिये बाबत विस्तृत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींच्या मनात उपस्थित झालेल्या शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी करण्यात आले. 

      प्रशिक्षण स्थळी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी अमित रंजन,गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे , गडचिरोलीचे नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान,अनिल सोमनकर,महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

मतदान पथकांचे दोन दिवसांचे पहिले पूर्वप्रशिक्षण संपन्न


 

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहीर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने
दिनांक – २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार ६७ - आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी
(भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात आरमोरी विधानसभा मतदार संघामधील मतदान पथकांकातील एकूण १६००
अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता Theory व EVM/VVPAT Hands On पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक - २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवन नगर परिषद, देसाईगंज येथे करण्यात आलेले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडव्याच्या कामगिरीबाबत श्री. रणजीत यादव
(भा.प्र.से.) उपविभागीय अधिकारी कुरखेडा, श्रीमती प्रिती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज, श्रीमती उषा चौधरी तहसीलदार आरमोरी, यांचे द्वारा  प्रशिक्षणाचे माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारा
EVM/VVPAT Hands On चे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान पथकातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी EVM/VVPAT ची प्रत्यक्ष हाताळणी केली. व त्यांचेकडून मतदान यंत्र हाताळणी व सिलिंग प्रक्रिया याबाबत तसेच मतदानाचे दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता कोणतीही अडचण येणार नाही असे प्रमाणपत्र घेण्यात आले. याकामी ६७ - आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील ३४ क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे द्वारा विचारण्यात आलेल्या शंकांचे निराकरण वेळीच
करण्यात आले. मतदान पथकांचे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी व फार्म नं. १२ (Postal Ballot) व फार्म नं.१२ A (EDC) भरून घेणेकरीता एकूण १६ टेबल ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदान पथकातील अधिकारी / कर्मचारी यांना मतदार यादितील नाव शोधण्याकरिता मतदान कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

शरद पवार गटाचे आणखी 9 उमेदवार रिंगणात


 

 मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.

 

शरद पवार गटाचे उमेदवार

वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी

 चिंचवड – राहुल कलाटे

 माजलगाव – मोहन जगताप

 परळी – राजेसाहेब देशमुख

 हिंगणा – रमेश बंग

 अणुशक्तीनगर – फहद अहमद

 मोहोळ – सिद्धी कदम 

भोसरी – अजित गव्हाणे

 हिंगणघाट – अतुल वांदिले


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

आमदार किशोर जोरगेवार यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश


 

चंद्रपूर :-भाजप, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष असा राजकीय प्रवास असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष प्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व शेवटी आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार भाजपात स्थिरावले. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला कालपर्यंत तीव्र विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवगीर्य आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जोरगेवार यांचा भाजप प्रवेश येथील हॉटेल ए. डी. मध्ये पार पडला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नम्रता आचार्य यांनी प्रवेश घेतला. या दोघांच्या भाजप प्रवेशाने भाजपची शक्ती या जिल्ह्यात वाढली आहे असे या प्रवेशाच्या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत भाजपला व महायुतीला यश मिळेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहे. आज दुपारपर्यंत चंद्रपूर मतदारसंघातील सहाव्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा व गडचिरोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण नऊ जागा भाजप व महायुती जिंकणार आहे. जाहीरनामा व वाचानाम्यात चंद्रपूर जिल्ह्याला झुकते माप राहील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजप हा परिवार आहे, या परिवारात जोरगेवार व आचार्य यांचे स्वागत आहे असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पूर्णशक्तीने काम करतील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. दिल्ली येथे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते ब्रिजभुषण पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेलो होतो. जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नका यासाठी गेलो नव्हतो असेही मुनगंटीवार म्हणाले.
पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे सांगण्यात येत असले तरी नाराज व अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तसे आश्वासन दिले आहे. भाजपचा आत्मा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल, कुणावर अन्याय होणार नाही, अन्यथा कार्यकर्त्याची अवस्था बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटसारखी होईल. कार्यकर्ते नाराज होईल मात्र भाजपमध्ये कार्यकर्ता नाराज होईल पक्षाचा विचार सोडणार नाही. त्यामुळे पाझारे बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. कार्यकर्त्याला हवेवर सोडणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. मला जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची चिंता आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार येईल असाही विश्वास व्यक्त केला. यावेळी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?


 

 

मुंबई:-विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीतील पक्षांसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

भाजपकडून डॉ. मिलिंद नरोटे, काँग्रेस कडून मनोहर पोरेटी रिंगणात...


गडचिरोली : भाजपने अखेर बहुप्रतिक्षित गडचिरोली मतदार संघातून पक्षाचा उमेदवार जाहीर करताना विद्यमान आमदार डॅा.देवराव होळी यांना डच्चू देत डॅा.मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकीटसाठी डॅा.होळी यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही रात्री उशिरा माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डॅा.नरोटे विरूद्ध पोरेटी असा सामना या मतदार संघात रंगणार आहे.

काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांच्यासह युवा नेते आणि माजी खा.मारोतराव कोवासे यांचे पूत्र विश्वजित कोवासे हे तिकिटच्या स्पर्धेत होते. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही सोबत काम करू असा समंजसपणा या दोघांनी आधीच बोलून दाखविला होता. ग्रामीण भागात असलेला जनसंपर्क आणि नम्र स्वभावामुळे पोरेटी हे पक्षाच्या दृष्टिने सरस ठरले.

डॅा.मिलिंद नरोटे हे वैद्यकीय व्यवसायाला बाजुला सारत जवळपास वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सक्रिय झाले. तत्पूर्वी स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरू होते. राजकारणात नवीन असल्याने फ्रेश चेहरा म्हणून आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहून भाजपने त्यांच्यावर डाव लावला आहे.

डॅा.होळी उमेदवारी मागे घेणार?

डॅा.होळी यांनी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुका भाजपच्या तिकीटवर जिंकल्या आहेत. मात्र मधल्या काळातील त्यांची वागणूक, व्यवहार आणि गटबाजीमुळे त्यांच्याबद्दल पक्षातून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. याची दखल घेत भाजप श्रेष्ठींनी त्यांना तिसऱ्यांदा संधी नाकारली. मात्र जिंकण्याची क्षमता माझ्यातच आहे आणि महायुतीमधील इतर पक्षांचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला. परंतू प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा होईपर्यंत कोणीही अर्ज दाखल करू नये असे सूचित केले असताना त्याकडे दुर्लक्ष करत डॅा.होळी यांनी वाजतगाजत नामांकन भरणे पक्षाला आवडले नाही. अखेर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा शेवटपर्यंत विश्वास व्यक्त करताना डॅा.होळी यांनी आपण पक्षाचा आदेश पाळू, असे सांगितले होते. त्यातून तिकीट नाकारल्यास बंडखोरी न करण्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. आता डॅा.होळी माजी खा.नेते यांच्याप्रमाणे पक्षकार्यात स्वत:ला वाहून घेणार, की बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर


 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची चिन्ह आहे. ठाकरे गट, पवार गटाच्या नंतर आता काँग्रेसनेही आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. एकूण 16 जणांची यादी आहे.

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून पेच निर्माण झाला होता. 
दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला.  शिवसेना ठाकरे गटाने दोन याद्या जाहीर केल्या. त्यापाठोपाठ शरद पवार गटानेही आपली २२ जणांची यादी जाहीर केली. आता काँग्रेसकडूनही 16 उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर केले आहे.

काँग्रेसची तिसरी यादी

कामगाव - राणा सानादा
मेळघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रास - मानिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनरान आंबडे
देगलुर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव सेंटर - एजाज बेग एजिज बेग
चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
एक्वतपुरी - लाकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - ध्यानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील


PostImage

MH 33 NEWS

Oct. 26, 2024

PostImage

भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळालं तिकीट?


 

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आता आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. आज (26 ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर करताना  भाजपने 22 जागांवरील उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत जवजवळ सर्व विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच तिकीट जाहीर केलं. मात्र, आता या यादीत भाजपने काही नवी नावं जाहीर केली आहेत. ज्यामुळे आता नवं राजकारण पाहायला मिळू शकतं.

पाहा भाजपची दुसरी यादी 

राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती- मलकापूर
प्रकाश भारसाकले- अकोट
विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
श्याम खोडे- वाशिम
केवलराम काळे- मेळघाट
मिलींद नरोटे - गडचिरोली
देवराव भोंगले- राजुरा
कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
करन देवतळे- वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेण
भिमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासणे- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत


PostImage

MH 33 NEWS

Oct. 26, 2024

PostImage

काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला मिळाली संधी?


 

 :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेस  पक्षाने आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 80 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. 

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

दरम्यान, आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.


आतापर्यंत महाविकास आघाडीतील पक्षांनी जाहीर केले उमेदवार
 शिवसेना ठाकरे गट - 80 
 काँग्रेस पक्ष  - 71 
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 45


PostImage

MH 33 NEWS

Oct. 25, 2024

PostImage

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद


 

गडचिरोली दि.25:-     विधानसभा  सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. 

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

*वैशिष्ट्य*

            सीव्हिजिल ॲप हा नागरिकांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देवून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

*वापर कसा करायचा*

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

*अचूक कृती व देखरेख*

            या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते

*लाईव्ह फोटो, व्हिडिओ*

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

*तातडीने होते कारवाई*

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

*डाटा सुरक्षा*

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 25, 2024

PostImage

_केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख कामकाजावर महायुतीचे सरकार येणारचं मा.खा.अशोकजी नेते यांचे भव्य महायुती अहेरी विधानसभा क्षेत्र बैठकीत प्रतिपादन......_


 

अहेरी विधानसभा क्षेत्राची भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी  सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे संपन्न....

 

अहेरी दि.२५ आक्टोंबर:- भाजपा -शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच अहेरी विधानसभा क्षेत्रातुन महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यानिमित्तानेे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व  माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख उपस्थितीत तसेच अहेरी या विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे सन्मानित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे आयोजित करण्यात आली होती. 

या भव्य महायुतीच्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असतांना अनेक विकासाभिमुख कामे करत नागरिक जनतेपर्यंत अनेक योजना आमलात आणुन  विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन काम केले.याबरोबरच महिला भगिनींच्या सन्मानासाठी  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महिलांसाठी आणली.असे अनेक योजना लोकोपयोगी सरकार राबवित आहे.

पुढे बोलतांना मागील दहा वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केलेली आहे.जसे रेल्वे वडसा गडचिरोली तसेच रेल्वेचे जिल्ह्यात ब्रॉडगेज सर्व्हे लाईन मंजुर,चिचडोह, कोटगल बँरेजेस,मेडिकल काँलेज,कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प,कोनसरी प्रकल्प तसेच साडे चौदा हजार कोटीचे विविध रस्त्यांची कामे  असे अनेक विकासात्मक कामे केले् आहेत,ऐवढे विकासकामे करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यात आपण कमी पडलोय का? यांची खंत व्यक्त करत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा  अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले. पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल.

असे विस्तृत व सविस्तर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामावर  महायुतीचेच सरकार येईल.असा विश्वास व्यक्त करतोय. अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम  यांना पुन्हा निवडून आणण्यात विजयाचा संकल्प करावे.असे प्रतिपादन या बैठकीच्या महामेळाव्याला मा.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मराव बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओल्लालवार,मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, राष्ट्रवादीचे नेते रियाजभाई शेख, हर्षवर्धन राव आत्राम, राष्ट्रवादी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,राष्ट्रवादीचे नेते रिंकुभाऊ पापडकर, तालुकाध्यक्ष अर्जुनजी आलाम,युवा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार, विजयभाऊ नर्लावार, बाबुराव गंफावार, विनोदभाऊ आकनपल्लीवार, सुनील विश्वास,सागरभाऊ डेकाटे, शिवसेनेचे नेत्या पौर्णिमा ईटॅाम्, अंकुश मंडल, तसेच महायुतीचे सन्मानित मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

Congress List : काँग्रेसची  48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर


 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा  समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. 

48 उमेदवारांची पहिली यादी

1.कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे
40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जाहिरातींवर ठेवा विशेष लक्ष निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट


 

गडचिरोली दि.२४ :-वृत्तपत्रांसोबतच इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक विषयक जाहिराती व पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज दिल्या.
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य विलास कावळे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सदस्य प्रा. रोहित कांबळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी रमेश मडावी, लेखाधिकारी संजय मतलानी, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा माध्यम कक्षातील प्रा. प्रितेश जाधव, महादेव बसेना, दिनेश वरखेडे, स्वप्नील महल्ले, विवेक मेटे, प्रज्ञा गायकवाड, वामन खंडाईत, गुरूदास गेडाम आदी यावेळी उपस्थित होते. 
निवडणूक‍ निरीक्षक श्री कल्याणम यांनी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करुन देणे आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज बाबींची माहिती घेतली. 
यावेळी निवडणूक विषयक वृत्तपत्रांतीय कात्रणे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावरील फेक न्यूज व पेड न्यूज बाबत अहवाल, समाज माध्यमांवर पोलिस सायबर सेल च्या सहकार्याने ठेवण्यात येणारे बारीक लक्ष, राज्य समितीशी समन्वय याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी


मुंबई दि.24:-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून बारामती मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. शरद पवार बारामतीत मोठा गेम खेळणार आहेत. शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. 

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेहबूब शेख, राणी लंके, भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील अशा नावांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील, सररजित घाटगे, उदगीरचे सुधाकर भालेकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे तीनही नेते भाजपमधून शरद पवार गटात आले आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वाचा उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भामरे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
किरोडा – रविकांत गोपचे
अहिरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप


PostImage

MH 33 NEWS

Oct. 23, 2024

PostImage

अहेरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन


 

गडचिरोली दि.23:- जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ६९-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आज भेट देऊन निवडणूक तयारीचा यंत्रणेकडून आढावा घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय नामनिर्देशन, छाननी, चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल शाखेत निवडणूक कामकाजाची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम, अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.


*निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन*
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी तहसिल कार्यालय अहेरी येथे निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष देण्याचे व खर्चाच्या लेखानोंदी घेण्याबाबत तसेच एसएसटी व एफएसटी पथकाला करावयाच्या कार्यवाहीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 
यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, भामरागड चे तहसीलदार किशोर बागडे, सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमारे तसेच संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

जिंकून येणाऱ्या  आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून एकमुखाने मागणी


२५ ऑक्टोंबरला भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे होणार

गडचिरोली:-आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास  करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्या डॉक्टर देवराव होळींनाच आमचा पाठिंबा असून  भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस  व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
दिनांक २५ ऑक्टोंबरला  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे ,उपजिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंबेवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर , प स उपसभापती विलास दशमुखे,  ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख , साईनाथजी बुरांडे,  चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री , ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा  महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई , आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनाशी , प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले . यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज , अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली,  जिल्ह्यात रस्ते पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात मागील ५० वर्षात न झालेली विकासकामे   करून  या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे.
अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे . त्यामुळे आमदार होळी हे जिंकून येणारे उमेदवार आहेत करिता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निवडणुकीत जिंकून घेण्याची क्षमता असणाऱ्या डॉ होळीनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

जिल्ह्यात कलम ३६ लागू


 

गडचिरोली दि.22:-जिल्ह्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासुन विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाच्या प्रचार फेऱ्या सभा मेळावे इ. कार्यकमांचे आयोजन होणार आहे. निवडणूक मतदान प्रकिया शांत, निर्भय व निपःक्षपाती वातावरणात पार पाडावी याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३६ लागू केले आहे.

 यानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढील नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहे. अ) रस्त्यावरुन जाणा-या जमावाचे अगर मिरवणुकीतील व्यक्तीचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे ब) ज्या मार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ते वेळ व मार्ग निश्चीत करणे क) सार्वजनिक ठिकाणी अगर निवडणूक प्रचारासाठीचे कार्यक्रमाचे वेळी वापरण्यात येणा-या ध्वनीपेक्षकाच्या ध्वनीची तीव्रता, वापराची विहीत वेळ यावर नियंत्रण करणे ड) निवडणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा, रॅली, इ कार्यक्रम घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियत्रण करणे. 
सदरचा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक २१ ऑक्टोबर  २०२४ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक २५ नोव्हेंबर  २०२४ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी


आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 गडचिरोली दि.22: -सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ क्षेत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज भेट देवुन निवडणुक बाबतच्या तयारीचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी, यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच, देसाईगंज येथील स्ट्रांग रूमची तपासणी करून आवश्यक सुचना दिल्या. देसाईगंज तहसिल कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणुक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणुक कर्तव्य व जबाबदारी चोख पणे पार पाडण्याचे सुचना अधिकारी व कर्मचारी यांना दिले. 
यावेळी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्राच्या निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी तसेच, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

पहिल्या दिवशी अहेरीतून एक नामनिर्देशन पत्र दाखल 


 

गडचिरोली दि.22-: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.  67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
आज 22 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 20 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 9 व्यक्तींनी 25 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 11 व्यक्तींकडून 12 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.  

 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

२२ ऑक्टोबर  पासून गडचिरोली जिल्हयातील  विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन स्विकारणार


 

गडचिरोली दि.21:-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार  गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनाक 29 ऑक्टोबर 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात  स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंतची मुदत असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजनी दिनांक 23  नोव्हेंबर 2024 ला होईल.
 वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

निवडणूक कामाच्या जबाबदाऱ्या अचूक पार पाडा – श्रीमती मानसी निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण


 

गडचिरोली दि.२१ :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अधिकारी व कर्मचारी यांना सोपविलेल्या विविध जवाबदाऱ्या विहित वेळेत अचुक पार पाडण्याचे निर्देश 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांनी आज दिले.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतीक भवन नगर परीषद देसाईगंज येथे निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधीत बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
 
 मतदान पथके, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदानयंत्र व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, निवडणुक कार्य प्रमाणपत्र, आदर्श आचारसंहिता,  एक खिडकी योजना, चिन्हांकित मतदार यादी बनवणे इत्यांदी विविध विषयावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

गडचिरोली येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली


 

गडचिरोली:- आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सुरज शेडमाके, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, नंदू मडावी, विनोद सुरपाम, महेंद्र मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत  यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी  युवा सदस्य अजय सुरपाम, रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे, सुरज गेडाम, यश खोब्रागडे, महादेव कांबळे, आदित्य केळझरकर,सुधीर मसराम, नेहाल मेश्राम,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन,अंकुश बारसागडे, विक्की मसराम,महिला सदस्य शालू सुरपाम, गंगा सलामे उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमीत्त अभिवादन...!


 


गडचिरोली:- राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री राकडे साहेब.बस स्थानक प्रमुख रामटेके साहेब,प्रमुख पाहुणे गुलाबराव मडावी,अरूनभाऊ पेंदाम वा.निरी.पूजा सहारे.नितेश मडावी,भास्कर आत्राम,तुळशीराम मेश्राम,विष्णुदास कुमरे,सुधीर मेश्राम,रामचंद्र सोयाम,गणेश कोडापे,जयभारत मेश्राम,सुरेश सिडाम,सुरेश कोवे,नामदेव मेश्राम, पवन वनकर,अशोक सुत्रपवर,प्रकाश मडावी, स.वा. निरी. धाडसे,नरड मॅडम,गीता मेश्राम,सुलोचना जुमनाके,माणिकशाह मडावी,दीपक मांडवे,अशोक नैताम,राजू मडावी,सुनील कुंभमवार उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश



ग‍डचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने 15  ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. यावेळी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्री दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
 निवडणूकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे. 
जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.  
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या विविध सूचना



गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी संजय दैने


 


गडचिरोली  :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील देतांना निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर,  नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, मतदान २० नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने काल जाहिर केले असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील 972 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत. 
मतदान केंद्र : मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : जिल्ह्यात एकूण 8 लाख 19 हजार 570 मतदार असून यात पुरुष मतदार 4 लाख 11 हजार 384, स्त्री मतदार 4 लाख 8 हजार 132, इतर मतदार 9 यांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 130820, स्त्री मतदार – 131347,  इतर -1, एकूण -262168), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार –154284, स्त्री मतदार – 152086,  इतर -2, एकूण -306417), अहेरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 126280, स्त्री मतदार – 124699, इतर-6, एकूण -250985) . जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या- पुरूष 9639, स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. मतदार नोंदणी प्रक्रीया नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.

सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल
सोशल मीडियावर लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

पोलिस विभागाची माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सांगितले की विविध दलाचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी निवडणूक शांततने पार पाडण्यासाठी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी ५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली  आहे तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्यसिमेवर 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले

००००००


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी


 

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मतदारांसाठी काही सुविधा दिल्या आहेत.


२४ तास चेकींग होणार

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.

गर्दी असल्यास खुर्ची देणार

मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

ज्येष्ठ लोकांना घरुन मतदानाची सुविधा

८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना….

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होणार

निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान


 


:-केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.


देशातील लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

भाजपपुढे आदिवासींच्या नाराजीचे आव्हान?


 


गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी समाजाच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या धनगर आरक्षणविरोधी मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या आदिवासींनी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी भाषणाला उभे राहताच ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींची नाराजी दूर करण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. जिल्ह्यात असलेली आदिवासींची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. त्यामुळे ही मते आपल्याकडे कशी वळवता येईल याकडे प्रत्येक पक्षाचा कल असतो. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेत ही मते खेचण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आले होते. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार भाजपपासून दुरावला गेला. तत्पूर्वी, कधी नव्हे ते आदिवासी समाजाच्या युवकांनी एकत्र येत गडचिरोली शहरात भाजपचे तत्कालीन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी आणि आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. निमित्त होते आमदार होळी यांच्या वादग्रस्त विधानाचे. तेव्हापासून आदिवासी तरुणांमध्ये भाजपविषयी दुरावा निर्माण झाला आहे. त्यानंतर झालेल्या आंदोलन आणि मोर्चात आमदार डॉ. देवराव होळी यांना आदिवासी समाजातून मोठा विरोध झाला.

काही दिवसांपूर्वी धनगरांना आदिवासींतून आरक्षण नको ही मागणी घेऊन गडचिरोलीत हजारो आदिवासींनी एकत्र येत मोर्चा काढला होता. यात देखील आमदार होळी भाषणासाठी उभे झाले असता त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर आदिवासी तरुणांनी ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. यावरून आदिवासींमध्ये भाजपविषयी असलेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हेच दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ही नाराजी कशी दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

 नाराजी भाजपविषयी की होळींविषयी?

मागील वर्षभरापासून विविध मोर्चात, आंदोलनात एकत्र जमलेल्या आदिवासींमध्ये भाजपविरोधी सूर दिसून आला. दुसरीकडे, यात आमदार देवराव होळी यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे आदिवासींची नाराजी ही भाजपवर नसून आमदार होळींवर आहे, असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपमधील एका गटाचा आमदार होळी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवार बदलाचीदेखील मागणी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपच्या हालचालींना वेग    भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं?


आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्य


:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली ज्यामध्ये विद्यमान आमदारांना सरसकट तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजतंय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील १२ भाजप नेत्यांची बैठक झाली. ज्यात भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावाही घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननी झाली. दरम्यान, बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ‘मविआ’ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल? 


 


मुंबई:-आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाविकासआघाडीची पत्रकार परिषद झाली. मुंबईत महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद आज झाली. यावेळी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.


मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळी झाडून रात्री हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही’, असं शरद पवार म्हणाले. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ‘गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. बाबा सिद्दीकीची काल जी हत्या झाली. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?’ असा सवाल करत तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला भेट!


 

अहेरी : शहरातील ब्राम्हमगरु मंदिर येथे पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शारदा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन देवीची दर्शन घेतले.दर्शना दरम्यान सोनालीताईंनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी सोनालीताई सोबत शहरातील समस्त महिला वर्ग उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन!


 

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार असून याचे भूमिपूजन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी या दोघांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकाम सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य गर्गमताई,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ओमकार पोट्टे,व्यंकटेश धानोरकर,अरविंद निखाडे,सुरेश आत्राम,हनुमंतू डोके,शंकर आर डोके,मधुकर सांमरे,सदाशिव धानोरकर,श्रीनिवास डोके,अशोक जुनघरे,प्रवीण पिपरे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,श्रावण पोटे,विनोद डोके,सत्यनारायण सामरे,सुनील चापले,राहुल निखाडे,आनंदराव धानोरकर,अक्षय पोटे,चंपत चौधरीसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी गिताली येथील जय मॉ दुर्गा मंडळाला भेट!             कंकडालवारांनी विधिवत पूजा अर्चना,आरती देऊन जय मॉ दुर्गा मातेचे दर्शन घेतले..!


 

मुलचेरा : तालुक्यातील गिताली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही जय मॉ दुर्गा मातेचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार गिताली येथील दुर्गा मंडळाला भेट घेऊन दुर्गा मातेचे विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दुर्गा मातेच्या दर्शन घेतले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांची जय मॉ दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांकडून अजयभाऊंची स्वागत केले.तसेच अजय कंकडालवार दुर्गा मंडळाला वर्गणी दिले.दर्शना दरम्यान कंकडालवारांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच स्थानिक नागरिकांना समस्या जाणून घेतले.

यावेळी मंडळाचे गोपाल कविराज सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,प्रशांत संजीत बिश्वास,अमित मुजुमदार,बासू मुजुमदार,आशिम अधिकारी,तेजन मंडल,परतो मंडल,जोतिष मंडल,महादेव पाईक,सुरज सरकार,विवेक बिश्वास,विजय शील,धीरज शील,दीपक बिश्वास,विजय सरकारसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद  शाळा राज्यात तृतीय  



 
गडचिरोली :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर  ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
 
मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 98 हजार शाळांमधून सुमारे 1 कोटी 91 लाख विद्यार्थी तर सुमारे 6 लाख 60 हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
 विजेत्या शाळांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविलेल्या गडचिरोलीच्या शाळेला 21 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर झाले आहे. राज्यस्तर, विभागस्तर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासकीय व खाजगी गटात एकूण ६६ शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

धम्म चक्र प्रवर्तन दिनी अहेरीत भीम रॅली मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाला अभिवादन केले जय घोषणी अहेरी नगरी दुमदुमली


 

अहेरी:- येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने शनिवार 12 ऑक्टोबर रोजी 68 वे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आले.
   सकाळी पंचशील ध्वजचे ध्वजारोहण पुष्पा चांदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या नंतर सामूहिक रित्या त्रिशरण -,पंचशील ग्रहण करण्यात आले.
     सायंकाळी शहरातून भीम रॅली काढण्यात आले. जय भीम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणी अहेरी राजनगरी दुमदुमली. दरम्यान मुख्य चौकात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे शुभेच्छा दिले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 11, 2024

PostImage

फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गाचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल नवदुर्गा मंडळ येथे महाआरती कार्यक्रम आयोजित केले.आयोजित महाआरती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून दुर्गा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.

विशेष म्हणजे या वर्षी फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा कडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.महाप्रसाद कार्यक्रमला परिसरातील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद आस्वाद घेतले.त्यावेळी आरती दरम्यान अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच नवदुर्गा मंडळाला वर्गणीही देण्यात आली.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेझालवार,स्वप्नील मडावी,बबलू शेख,चिंटू आत्राम,जावेदभाऊ,रिंकू आत्राम,वाहन चालक सचिन पंचार्य,वाहन चालक प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

गडचिरोलीच्या आय टी आय ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जी यांचे नाव आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश


नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

 

गडचिरोली:-गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी  यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर  यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे .   या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११  ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश काँग्रेस नेते अजय कंकडलवार व मडावी यांनी केले कार्यकर्त्यांचे स्वागत...!*


 

 

अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

 

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आवलमरी येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच मारोती मडावी,ग्रामपंचायत सदस्य देवाजी आत्राम,बक्कय्या तलांडी, वेंकटी मोंडी,संद्रम लवंन्ना, मुल्ला तलांडी,अरुण तलंडी,आनंदराव तलांडी,पोचम चटारे, रजनीकांत तमाजुलवार,शंकर मडावी,वसंत तोरेम,वेंकटस्वामी तिरून्हारीवर,मल्लय्या दोंतुलवार,धनंजय सूनतकर आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

 

पक्षप्रवेशा दरम्यान आवलमरीचे ग्रामपंचायत सरपच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजिव मिरवेलवार,येरमनार येथील उपसरपंच विजय,शैलेश कोंडगोरले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चल्लावर काका,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्या वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी आगामी विधानसभा निवडणूक बाबत शांतीनगर येथे नागरिकांसोबत चर्चा...!


 

मुलचेरा : तालुक्यातील शांतीनगर येते काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शांतीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुक बाबत तसेच गावातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच गावातील युवक,नागरिकांना सांगितले की'काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.शांतीनगरसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.

आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान काँग्रेसचेनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,श्रीकांत हलदर माजी उपसरपंच शांतिग्रम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला, रतन टाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास


 


:- भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024

PostImage

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित ब्रह्मपुरी तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत ४४७ घरकुलांना मंजुरी


 


ब्रम्हपुरी:-महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण ४४७ घरकुलांना मंजूरी मिळाली. यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उदांत हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली. सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून ब्रह्मपुरी तालुक्यात ४४७ नव्याने घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे . सत्ता काळ ते विरोधी बाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024

PostImage

ओबीसीत 15 जाती येणार... लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?; उघड झालेली संपूर्ण यादी तुम्ही वाचली का?


ओबीसीत 15 जाती येणार... लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?; उघड झालेली संपूर्ण यादी तुम्ही वाचली का?


:-महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावी, अशी मागणी केली जात आहे. मनोज जरांगे आपल्या मागण्यासाठी वारंवार आक्रमक होताना दिसत आहेत. राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केला नाही तर महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांची मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे आणखी एक मोठा बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व 15 जातीच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे.

या जातींचा होणार ओबीसीत प्रवेश

१)बडगुजर
२)सूर्यवंशी गुजर
३)लेवे गुजर
४)रेवे गुजर
५)रेवा गुजर
६)पोवार, भोयार, पवार
७)कपेवार
८)मुन्नार कपेवार
९)मुन्नार कापू
१०)तेलंगा
११)
१२)पेंताररेड्डी
१३)रुकेकरी
१४)लोध लोधा लोधी
१५)डांगरी


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024

PostImage

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालये नागरिकांसाठी सेवा केंद्र ठरतील - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


 

गडचिरोली,दि.9 (जिमाका) :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गडचिरोलीसह राज्यातील एकूण 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री यांची  दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार नामदेवराव किरसान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की राज्यात सुरू होत असलेल्या नवीन 10 वैद्यकीय महाविद्यालयामुळे महाराष्ट्रामध्ये 900 वैद्यकीय प्रवेशक्षमता वाढून ती आता सुमारे 6 हजार होत आहे. ही वैद्यकीय महाविद्यालये स्थानिक व लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी सेवा केंद्र बनतील. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामुळे युवा वर्गासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधीचे दरवाजे उघडले गेले असल्याचे ते म्हणाले. 
शासनाने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे सांगितले. युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन  डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2014 मध्ये राज्यात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती ती आता 706 झाली असून सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात असल्याचे व महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अव्वल होत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत आज राज्यात 10 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत असल्याचे व याचा आपणास मनस्वी आनंद असल्याचे सांगितले.
नियोजन भवन येथे मार्गदर्शन करतांना प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील व लगतच्या परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. .
अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले की  गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेश् क्षमतेची परवानगी मिळाली असून चालू सत्रातच निट प्रवेश परिक्षेच्या तीसऱ्या फेरीत गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. 85 जागा या महाराष्ट्रातील रहिवासी यांच्यासाठी राखीव असतील तर 15 जागा या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.  एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष अध्यापनासाठी नागपूर व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा गडचिरोली येथे वर्ग करण्यात आल्या असून नियमित अध्यापनासाठी कोणतीही अडचण नसल्याचे डॉ. टेकाडे यांनी सांगितले.
 कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील व इतर संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होते.
नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभ
 राज्यात नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये गडचिरोलीसह, अमरावती, मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, भंडारा आणि अंबरनाथ (ठाणे) अशा वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 7, 2024

PostImage

आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी केले उरेत परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक मदत...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून घाम गाळून दीपकला ऑपरेशनसाठी पैसे ठेवले होते.मात्र उरेत परिवार अंत्यत गरीब असून त्यांना पुढील उपचार व औषधसाठी खूपच अडचण भासत होती.

आलापल्ली येथील त्यांचे नातेवाईकांना संपर्क करून त्याची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.आज उरते कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे नातेवाईक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी यांना भेटून त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.मडावी साहेबांनी उरेत कुटुंबाची अडचण बघून दीपकला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित... अजू पठाण माजी सरपंच आलापल्ली,बालाजी मडावी, प्रभाकर मडावी,रोशन ऊरेत,राकेश उरेत,विनोद अर्का, अमोल उरेत,बाबुरावजी मडावी, बीटपल्लीवार,


PostImage

MH 33 NEWS

Oct. 7, 2024

PostImage

आदिवासी समाजाचा बोगसांन विरोधात अभुतपूर्व मोर्चा  -सर्व पक्षातील नेत्यांची उपस्थिती  -आमदार डॉ. देवराव होळी यांचा राजीनाम्याचा इशारा  -जिल्ह्यातील २५ हजाराच्या वर आदिवासी बांधवांची उपस्थिती 


 


गडचिरोली - आज दि. ६ आक्टोंबर ला आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली च्या वतीने  धनगर तसेच बोगस आदिवासी, १२५०० हजार नौकर भरती, रडखडलेली पेसा भरती या प्रमुख मागण्या सोबतच जिल्ह्यातील अन्य मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहून आपल्या एकतेच प्रदर्शन दाखवत जिल्हा प्रशासनाला हादरवून सोडले. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत शहरातील चारही बाजुला ट्राफिक जाम चे दृश्य दिसत होते. यावेळी  मोर्चाची तिव्रता बघुन पोलिस विभाग सुद्धा सतर्कता बाळगत  पोलिसांची मोर्चेकरांना सांभाळतांना दमछाक होतांनी दिसून आली. सदर मोर्चाची सुरवात  शिवाजी महाविद्यालय येथुन दुपारी १.३० झाली. सदर मोर्चाची तीव्रता इतकी होती की मोर्चाच एक टोक जिल्हाधिकारी कार्यालय तर दुसर टोक इंदिरा गांधी चौक असा होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या मोर्चास व उपस्थित जनसमुदायस मार्गदर्शन करतांना खासदार डा. किरसान साहेब यांनी सांगितले की भारतीय संविधाना अंतर्गत आदिवासींना संविधानिक आरक्षण प्राप्त झालेला आहे. परंतु महाराष्ट्रातील राज्य सरकार असवैधानिकरित्या बोगस धनगराला खऱ्या आदिवासींमध्ये समावेश करू इच्छितो आहे. याविरुद्ध लेखी निवेदन राज्य सरकार केंद्र सरकारकडे सादर केले आहे. तरी येत्या संसदेत याबाबत आवाज उठविणार असं जाहीर केले. तसेच गडचिरोली विधानसभा चे आमदार 
मा. डॉ. देवराव होळी यांनी सांगीतले कि खऱ्या आदिवासींवर हा अन्यायकारक निर्णय असून धनगरांना जर आरक्षण लागू झाला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असे जाहीर केले. खऱ्या आदिवासींचा हा महा आक्रोश मोर्चा राज्य शासनाला इशारा देण्याकरिता प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्यात येत असून जर शासनाने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन राज्य भर आदिवसी समाजाच्या वतीने केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवानी एकसंघ भावनेने आंदोलनात सामील व्हायचे तेव्हा आपण तीव्र आंदोलनासाठी तयार राहावे असे उपस्थित समस्त बंधू-भगिनींना आव्हान करण्यात आले. या मोर्चाला जाहीर पाठिंबा शेतकरी कामगार पक्ष,
आझाद समाज पार्टी,
 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, रिपब्लिकन पार्टी 
बहुजन समाज पार्टी,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राज्य सरकारी कर्मचारी संघटना इत्यादी जिल्ह्यातील पक्ष व संघटना यांनी या आयोजित खऱ्या आदिवासींच्या महा आक्रोश मोर्चाला व मागणी ला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यावेळी मोर्च्यास उपस्थित आदिवासी बांधवांना माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे, माधुरी मडावी, डॉ. शिलू चिमुरकर, भाग्यश्री आत्राम, डॉ. आशिष कोरेटी, रामदास मसराम, डॉ. नीलकंठ मसराम, गोविंद टेकाम, विनोद मडावी, एन झेड कुमरे, सैनू गोटा, नंदू नरोटे,भरत येरमे, कोवे महाराज, क्रांती केरामी, लालसु नागोटी, जयश्री वेळदा, वसंत कुलसंगे, ऋषी पोर्टेट, फरेंद्र कुतिरकर, धीरज मडावी नितीन पदा यानी सुद्धा मार्गदर्शन केले.
सदर निघालेल्या आदिवासी महा आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सौ पुष्पलता कुमरे, गुलाबराव मडावी, सदानंद ताराम, अमरसिंग गेडाम, उमेश् उईके, आनंद कंगाले, वनिशाम येरमे, आनंद मडावी, देवराव अलाम, नामदेव उसेंडी, ऋषी होळी, गणेश कोवे, शिवराम कुमरे, अमोल कुडमेथे, सुरज मडावी, चरणदास पेंदाम, आरती कोल्हे, जयश्री येरमे, माधवराव गावड, प्रशात मडावी, डॉ मनोहर मडावी यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम प्रास्ताविक सदानंद आराम आभार प्रदर्शन गुलाबराव मडावी


PostImage

MH 33 NEWS

Oct. 7, 2024

PostImage

जिनिलिया वहिनीची सूरजसाठी खास पोस्ट; रितेशचंही केलं कौतुक


 

मुंबई:- ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणसाठी जिनिलिया वहिनीची खास पोस्ट
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री जिनिलिया देशमुखने खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियाचा पती आणि अभिनेता रितेश देशमुख या सिझनचं सूत्रसंचालन करत होता.

फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये एण्ट्री करणारा सूरज चव्हाण आता या सिझनचा विजेता ठरला आहे. गुलिगत सूरजची अनोखी स्टाइल सोशल मीडियावर हिट होतीच, पण आता बिग बॉस  मराठीमुळे त्याला आणखी लोकप्रियता मिळाली आहे. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांना मात देत सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (6 ऑक्टोबर) या सिझनचा ग्रँड फिनाले धूमधडाक्यात पार पडला. फिनालेपूर्वी दोन आठवडे शोमधून गायब असलेल्या रितेश देशमुखने अंतिम सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी हा फिनाले बघण्यासाठी रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसुद्धा तिथे पोहोचली होती. ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर जिनिलियाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

जिनिलियाची पोस्ट-
‘यातूनच स्वप्ने बनतात, मोठी स्वप्ने पाहा. बिग बॉस मराठीची ही ट्रॉफी तुझीच होती,’ अशा शब्दांत जिनिलियाने सूरजचं कौतुक केलं. यानंतर तिने पती आणि ‘बिग बॉस मराठी 5’चा सूत्रसंचालक रितेश देशमुखसाठीही दोन ओळी लिहिल्या आहेत. ‘रितेश हा शो जबरदस्त होता. तू ज्या पद्धतीने हा शो पुढे नेलास, ते कमालीचं होतं. तू बेस्ट आहेस’, असं तिने म्हटलंय त्याचसोबत बिग बॉस मराठीच्या पुढच्या सिझनसाठीही तिने उत्सुकता व्यक्त केली आहे.

बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावल्यानंतर सूरजच्या फॉलोअर्सचा आकडा आणखी वाढला आहे. सूरज हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर त्याचे 21 लाख फॉलोअर्स आहेत. आपल्या विनोदी आणि अनोख्या स्टाइलमुळे सूरजला लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना त्याला खेड्यापाड्यातील चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. याच लोकप्रियतेच्या जोरावर सूरजने ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता, तर निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानी राहिली. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आणि अंकिता वालावलकर पाचव्या स्थानी होती. बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच विजेता सूरज चव्हाणला 14.6 लाख रुपये कॅश प्राइज मिळाली. इतकंच नव्हे तर त्याला 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर आणि एक बाईकसुद्धा मिळाली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 6, 2024

PostImage

वंचितचे सावली शहर अध्यक्ष, उपाध्यक्षासह कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश


सावली:- वंचितचे धडाडीचे कार्यकर्ते शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांसह कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे सावली शहरात इतर पक्षातून इन्कमिंग सुरु असल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्यात वाढता प्रभाव व शहरातील विकास कामांचा झंझावात बघता इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा इन्कमिंग सुरु असून वंचित बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर उपाध्यक्ष नितीन दुधे यांनी प्रवेश केला. तर शहरातील भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांनीही कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसाण यांचे हस्ते पुष्पगुछ देऊन करण्यात आला. यावेळी सोनी नितीन दुधे, मीनाक्षी मिलिंद वाळके, लोमेश दासरवार, रोहित आलेवार, प्रज्वल पवार, विशाल लाटेलवार, सौरभ गोरडवार, निलेश येनुगवार, रवी वाढई, सुमित लेनगुरे, हर्षद मोहुर्ले, गणेश वाढई, महेश मांदाडे, मिलिंद शेंडे, सुरज लेनगुरे यांनी प्रवेश केला.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 6, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उरते परिवाराला आर्थिक मदत...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून दीपकला ऑपरेशनसाठी पैसे ठेवले होते.मात्र उरेत परिवार अंत्यत गरीब असून त्यांना पुढील उपचार व औषधसाठी खूपच अडचण भासत होती.

आलापल्ली येथील त्यांचे नातेवाईकांना संपर्क करून त्याची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.आज उरते कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे नातेवाईक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना भेटून त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवारांनी उरेत कुटुंबाची अडचण बघून दीपकला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,व्येकटेश धानोरकर तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत चुटूगुंटा,बालाजी मडावी,प्रभाकर मडावी,संतोष कोरेत,विनोद तलांडी,राकेश उरेत,अमोल उरेत,कपिल अर्का,दीपक मडावी,अविनाश आत्राम,महेश,रुपेश आत्राम,भूषण डेकाटेसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 6, 2024

PostImage

मोहुर्ले येथील बजरंगबली भजन मंडळाला भजन साहित्य खरेदीसाठी कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत...!


 

मुलचेरा : तालुक्यातील मोहुर्ली येथील बजरंगबली भजन मंडळाचे कलावंतांना भजन साहित्य खरेदी साठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी आपल्यापरीने आर्थिक मदत दिली.

मोहुर्ली येथे गणेश उत्सव आणि दुर्गा नवरात्री उत्सव मोठ्या थाटात पार पडतात.दरम्यान विविध मंडळाकडून भजन कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.मोहुर्ली येथील बजरंगबली भजन मंडळाकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना भजन कार्यक्रमावेळी अडचण भासत होती.

म्हणून आज बजरंगबाली भजन मंडळाचे कलावंतांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांना भजन साहित्य खरेदीसाठी होत असलेली आर्थिक अडचण सांगितले असता यावेळी कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता भजन मंडळाना साहित्य खरेदी करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत केली.

यामदतीप्रती मोहुर्ली येथील बजरंगबाली भजन मंडळाचे कलावंतांनी अजय कंकडालवार यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.आर्थिक मदती दरम्यान अनिल चंदागीरीवार,बालाजी भदावार,कार्तिक पिलीलवार,मुन्ना नैताम,भास्कर देशीवड,सुनील चंदागीरीवार,पार्वता चंदागीरीवारसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 6, 2024

PostImage

मुखडीटोला येथील युवकांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल - नेट दिली भेट..!


 

मुलचेरा : तालुक्यातील मुखडीटोला येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य युवकांनी घेऊ शकत नव्हते.आज येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कंकडालवार यांनी त्या युवकांची अडचण लक्षात घेऊन युवकांना क्रीडा साहित्य खरेदी करून दिले.त्यामध्ये व्हॉलीबॉल,नेट आणि इतर काही वस्तू आहे.या साहित्यामुळे मुखडीटोला येथील क्रीडा युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी गावातील समस्त क्रीडा युवकांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.

जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,दीपक साईनाथ सडाम,प्रदीप पुनाजी उरेते,अजित सुरेश मडावी,सागर दिनेश उरते,सुरज दिवाकर नैताम,केशव शंकर गुरुनुलेसह मुखडीटोला येथील युवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 4, 2024

PostImage

कुंदरमपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा( अजित पवार गट)कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षात प्रवेश...!


 

मुलचेरा : तालुक्यातील कुंदरमपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( अजित पवार गट ) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केले.या पक्षप्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( अजित पवार गटचे ) सुकुमार दास,विजय मुजुमदार,सुरजन दास,संजय मंडल,रुपचंद दास,तपेश दास,मिथुन दास,सुब्रत साना,विवेक दाससह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.त्यांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे हात धरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात तर काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी कमलेश सरकार,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,सुनीता कुसनाके माजी जि.प.सदस्य,अशोक येलमूले माजी उपसरपंच,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पेरमल्ली,वंदना दुर्गे सदस्य ग्रामपंचायत महागाव,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,नरेंद्र गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 4, 2024

PostImage

त्या नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या तसेच संबंधित कात्रदारावर गुन्हा दाखल करा..!          काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी....!


 

अहेरी : तालुक्यातील खमणचेरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकूलगुडम येथील लगु पाठबंधारे तलाव आहे.कंत्राटदारांनी विना परवानगीने पाणी सोडल्याने शेतकऱ्याचे उभे पिक नष्ट होऊन अतोनात नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे त्या लगू पाठबंधारेतील पाणी परिसरातील नागरिक शेतात वापरून धान पिकवत होते.धान व कापूससह अनेक पीक तोंडावर आल्याने आता त्या शेतातील पाणी वापरण्यासाठी बंधारातील पाणी नसल्याने शेतकरी  हतबल झाले आहे.

आज टेकूलगुडम,महागाव,खमनचेरू येथील समस्त शेतकरी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्याची समस्या बाबत सांगितल्याने कंकडालवार लगेच त्या शेतकऱ्यांना घेऊन तलावाच्या लगू पाटबंधारे विभागाची तलाव पाहणी केले.तसेच त्या शेतातील सुद्धा पाहणी करून सद्या होणाऱ्या नुकसानाची मोका पंचनमे करून कंत्राटदाराकडून भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार.तसेच ठेकेदार केलेल्या कृत्यामुळे शेतकरी अतोनात नुकसान झाल्याने तात्काळ त्या ठेकेदारला गुन्हा दाखल करण्यात यावी अशी कंकडालवार यांनी मागणी केले.

यावेळी कंकडालवार सोबत खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सायलू मडावी,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,दिवाकर मडावी,सुधाकर तलांडे,मदनय्या वेलादी,लालू वेलादी,प्रवीण दुर्गे,मोरेश्वर तलांडे,एनकुलू वेलादी,पोचा तलांडे,शंकर वेडा,पुष्पा आत्राम,सुमन तलांडे,सुनीता तलांडेसह महागाव,टेकुलगुडा,खमनचेरू येथील समस्त शेतकरी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 3, 2024

PostImage

धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून  आरक्षण  देऊ नका आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे महामहीम राज्यपालांना निवेदन


धनगर समाजाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने करण्यात आलेला सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सार्वत्रिक करण्याची केली विनंती

गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल महोदय यांना भेटून दिले निवेदन

 

गडचिरोली:-ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या वतीने  आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनावर दबाव टाकून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे .  परंतु राज्यातील महायुतीचे सरकार अनुसूचित जमाती  मधून धनगर समाजाला आरक्षण देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.  परंतु तरीही  यतकदाचित तसा निर्णय झाल्यास  आदिवासी समाजाची मोठी नाराजी सहन करावी लागेल. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी यांची गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन देऊन केली.

 धनगर समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या  माध्यमातून करण्यात आलेला अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशीही  विनंती केली. मात्र आदिवासींमधून आरक्षण देण्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना आदिवासीं नेतृत्वाला व आमदारांना विश्वासात घ्यावे अशी मागणी करीत कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी विनंती या भेटी प्रसंगी आमदार महोदयांनी राज्यपालांना केली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 3, 2024

PostImage

स्व. सुनील कोवे यांना झाडीबोली शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित


 

बल्लारपूर :-झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी. बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे. बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे. लिहित्या हातांना बळ मिळावे .या उदात्त हेतूने दरवर्षी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे झाडीबोली शब्दसाधक पुरस्कार दिला जातो .यावर्षी जिल्ह्यातील प्रतिभावंत बोली साहित्यिकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील स्वर्गीय सुनील कोवे यांना शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

स्व. सुनील कोवे यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत राहून अनेक विषयावर काव्यरचना केलेल्या आहेत.


त्यांचा काव्यसंग्रह उरलो जरासा मी त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती शालिनी कोवे यांनी प्रकाशित करून समाजासमोर आणला आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाज जागृती देखील केलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळा ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हॉलमध्ये संपन्न झाला.

या सोहळ्यात रीताताई उराडे माजी नगराध्यक्ष ब्रह्मपुरी, डॉ. धनराज खानोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, प्राचार्य देवेंद्र कांबळे ,कुंजीराम गोंधळे जिल्हाध्यक्ष भंडारा, पवन पाथोडे जिल्हाध्यक्ष गोंदिया, प्रा. विनायक धानोरकर जिल्हाध्यक्ष गडचिरोली प्राचार्य रत्नमाला भोयर आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांच्या पत्नी शालिनी कोवे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. शालिनी कोवे यांनी झाडीबोली मंडळाचे खूप खूप आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 26, 2024

PostImage

जिल्ह्यातील आदिवासी समाजाची बैठक संपन्न    बैठकीला जिल्ह्यातील शेकडो बांधव उपस्थित



गडचिरोली-  दि. २५/८/२४ रोजी श्रृष्टी सेलिब्रेशन हॉल नवेगाव, गडचिरोली येथे राज्यात रडखडलेली पेसा भरती व अन्य समस्यांना घेऊन जिल्ह्यातील आदिवासी बांधव, समाजसेवक, ग्रामसभां चे प्रमुख पदाधिकारी, सरपंच  तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांची सभा आदिवासी समाज सेवक देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये खालील मुद्यांवर  1. दि. 6 जुलै 2017 रोजीच्या मा. SC च्या बोगस आदिवासी संदर्भात दिलेल्या निर्णयाचे पालन करावे 2. 12500 पदभरती तात्काळ करावी. 3. पेसा पद भरती तात्काळ बिना अटी मध्ये पूर्ण करावी. 4. आदिवासी समाजाचे बोगस जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी घेतलेल्यांवर कडक कारवाई करून फौजदारी खटला दाखल करावा. 5. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या st, sc, obc आरक्षण वर्गीकरण निर्णय, 6. संसदेने परित केलेल्या नविन वन अधिनियम कायदा, 7. TRTI आयुक्त राजेंद्र भारुड साहेब यांची बदली करू नये. व खोटा गुन्हा रद्द करावा. आदि विषयांवर चर्चा करुन लवकरच मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. राज्यपाल यांना डेलीगेशन देण्याचे ठरविण्यात आले. सभेला उमेशभाऊ ऊईके, लालसु नागोटी, एड. ताराम सर, कुणाल कोवे, नितीन पदा, गुलाबराव मडावी, प्रियदर्शन मडावी, आदिनी मार्गदर्शन केले. सभेला मुकुंदा मेश्राम, गणेश मट्टामी, ज्ञानेश्वर राणे, एस. बी. कोडापे, सतिश कुसराम, अनिल केरामी, प्रदिप बोगा, स्वप्निल मडावी, शिवाजी नरोटे, नंदू मट्टामी, रामा तुमरेठी, केशव कुळयेटी, बाजीराव हिचामी, सुधाकर गोटा, शाम कुळमेथे, संजय कुमरे, सनकु पोटावी, कोतुराम पोटावी, रविन्द्र कोवे, छबिलदास सुरपाम, अनिल नरोटे, बाजीराव नरोटे, मयुर कोडापे, बाजीराव वाल्को, इरपा मडावी, तेजस गव्हारे, मयुर कुनघाडकर, काशीनाथ कांदो, गिरीष जोडे, शुभम किरंगे, धिरज जुमनाके,  संतोष गोसावी, मोहन कुमरे, सुरेखा मडावी, पुष्पा कुमरे, चेतना कन्नाके, मिना किरंगा, ज्योती जुमनाके, निरुपा आत्राम, बादल मडावी, अक्षय वाढई, आदित्य येरमे, विक्रांत आतला, एड. विवेक मसराम, गणेश वरखडे, नुतन वड्डे, अमिता हलामी, मधुकर पोटावी, देवाजी मट्टामी व कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, कुरखेडा, चामोर्शी, गडचिरोली, अहेरी, तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 10, 2024

PostImage

गोंडवाना एस टी सगाजन तर्फे जागतीक आदिवासी दिन साजरा


 

गडचिरोली:- गोंडवाना एस टी सगाजन तर्फे 9 ऑगस्ट जागतिक मूलनिवासी आदिवासी दिन राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली आगारा येथे मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकडे साहेब साहेब विभागीय वाहतूक अधिकारी, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष व्यवहारे साहेब हे  होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी मडावी सर, विनोदभाऊ मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी,प्रकाशभाऊ गेडाम हे  होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाला समाजाला प्रबोधनात्मक भाषण केले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 
श्री देवरावजी कोवे,सुधीर मसराम, प्रवीण तलांडे,भास्कर भाऊ आत्राम, लोमेश पदा, माणिक मळावी, किशोर आत्राम, विलास गेडाम,विजय मडावी, निलेश मळावी,विनोद सलामे, विकास उईके,विष्णुदास कुमरे, गीता मेश्राम,सोनू गेडाम,सुषमा आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 10, 2024

PostImage

शहरातील आदिवासी परधान समाज मंडळातर्फे "जागतिक आदिवासी दिन" साजरा


 


गडचिरोली:- आदिवासी परधान समाज मंदिर गडचिरोली येथे  दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोज शुक्रवारला जागतिक आदिवासी दिन समाजातील बंधु व भगीनिंच्या तथा आदिवासी  परधान समाज मंडळ, गडचिरोलीच्या पदाधिकराच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, शहिद स्वातंत्र्यविर बाबुराव शेडमाके, समाजाचे प्रेरणास्थान तथा जिल्ह्याचे शिल्पकार स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना  माल्यार्पन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी जागतिक आदिवासी दिनाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी प्रामुख्याने समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, मानसिंग सुरपाम,सुरज शेडमाके  गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, महेंद्र मसराम, अजय  सुरपाम, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, अंकित कुळमेथे, आकाश कुळमेथे, अजय सिडाम, राकेश कुळमेथे, विवेक वाकडे, रोहित आत्राम, महादेव कांबळे, अनिकेत बांबोळे,वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,माणिक आत्राम, साहिल शेडमाके, ताजीसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम,गंगा सलामे, भारती कोडापे, सुनिता मसराम, पौर्णिमा कुळमेथे, गिता कुळमेथे, रेखा आत्राम उपस्थीत होते.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 1, 2024

PostImage

आलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरा! काँग्रेस आदिवासी जिल्हाध्यक्ष हनमंतु  मडावी यांची अधिक्षक अभियंता,महावितरण यांना निवेदनातून मागणी..!


 

अहेरी : क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सिरोंचा,अहेरी,भामरागड, एटापल्ली,मुलचेरा या पाच तालुक्यात विद्युत विभागाचा समस्यामुळे नाहकत्रास सहन करावा लागत असल्याने सदर समस्या मार्गी लावून आलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी काँग्रेस आदिवासी जिल्हाध्यक्ष हनमंतु गंगाराम मडावी यांनी अधिक्षक अभियंता,महावितरण यांना निवेदनातून केली आहे. 

अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुके भौगोलीक दृष्ट्या जास्त, क्षेत्रफळाने अतिदुर्गम, अतीसंवदेनशील आणि मागासलेल्या असल्यामुळे नेहमी येथील जनतेला विद्युत विभागाचा समस्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असतो.प्रत्येक वेळेस या-त्या कारणामुळे विजेचा लंपडाव सुरुच असते.तसेच सध्यास्थितीत सदर विभाग कार्यकारी अभियंता,उप अभियंता,शाखा अभियंता आणि लाईनमन स्तरावरील बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे येथील जनतेला उन्हाळा असो की पावसाळा असो विज पुरवठा तसेच वाढीव विज बिलाबाबतची समस्या नेहमीच असते.

रिक्त पदामुळे या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणीही उपलब्ध राहत नाही.नादुरुस्त टान्सफार्मर,अंदाजीत व मनमानी विद्युत बिले, गाव-खेडेचा विद्युत पुरवठा चार-पाच दिवस बंद असते सततचे विजेचा लंपडाव तसेच अहेरी सारख्या उपजिल्हाच्या ठिकाणी बरेच वर्षापासुन ( AE DY )ची इंजीनीअरची पद रिक्त असल्यामुळे येथील जनतेला विद्युत विभागा विषयी संताप व्यक्त करीत आहे.अशी बिकट व्यवस्था एटापल्ली आणी भामरागड तालुक्याची सुध्दा आहे.तसेच सिरोंचा तालुक्यातील अभियंताची मनमानी कारभारामुळे तेथील जनता आणी शेतकरी त्रस्त आहे.

त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील विजेच्या समस्या निकाली काढून तसेच संबंधीत विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावे.अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही हनमंतु गंगाराम मडावी यांनी निवेदनातून दिला आहे.

यावेळी निवेदन देतांना मा.सरपंच सतीश आत्राम,चंदू भाऊ बेझलवार,रज्जाक भाई पठाण,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Aug. 1, 2024

PostImage

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे  – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह


 

गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup  हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले असून लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.  
या योजनेसाठी 31 जुलैअखेरपर्यंत 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 37 हजार 564 अर्ज मंजूर झाले असून 1 लाख 11 हजार 692 अर्ज तपासणीमध्ये आहेत.95 अर्ज नामंजूर झाले असून 3564 अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईवर संदेश पाठविण्यात येत आहे. त्रुटीचा संदेश प्राप्त होताच संबंधीत महिलांनी आवश्यक त्रुटीची पुर्तता करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी एकवेळेसाठीच मिळणार असल्याने त्रुटीची पुर्तता काळजीपुर्वक करावी.
ज्या इच्छुक पात्र लाभार्थीनी अद्याप अर्ज भरले नसल्यास त्यांनी  https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup या संकेतस्थळावर क्रियेट अकांउंट वर क्लीक करून आपले अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षीका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र, अशा वर्कर, बचत गटाचे समुहसाधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून /केंद्रावरून अर्ज भरून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत या ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रीया लाभार्थ्यांसाठी मोफत असल्याने त्यासाठी कोणालाही पैसे देवू नये असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.
000


PostImage

MH 33 NEWS

Aug. 1, 2024

PostImage

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळा


 

गडचिरोली दि. 1 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी यावेळी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी या योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयात व औद्योगिक आस्थापनेत रुजू झालेल्या  प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केले असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
000


PostImage

MH 33 NEWS

Aug. 1, 2024

PostImage

पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.या ठिकाणी नागरिकांना आवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. 

अहेरी तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलंचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर काम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं अलगाता आहे.

परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.त्याकरीता या दोन्ही मार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व होणाऱ्या त्रासाला जवाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. 

१५ दिवसात कार्यवाही व पक्का रस्त्याचे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट २०२४ पासून आलापल्ली - सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

अप्पर जि्हाधिकारी श्री. विजय भाकरे साहेब यांना निवेदन देताना श्री.अजयभाऊ कंकडालवार सहीत माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलाडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच अशोक येलमुले राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

July 29, 2024

PostImage

कंकडालवार दाम्पत्यांनी गंगा देवी पूजेला उपस्थित ..!


**

अहेरी : नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14  भोई मोहोला येथील गंगा देवी मंदिर येथे सुमार 40 ते 50 वर्षींपासून मंदिरात भोई समाजा कडून पूजेचा कार्यक्रम आयोजित केले जात आहे.यावर्षी सुद्धा गंगा देवी पूजा कार्यक्रम दोन दिवस मोठया थाटात संपन्न झालं आहे.

भोई समाजा कडून पूजेच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निमंत्रण देण्यात आली होते निमंत्रनाला मान देऊन आज गंगा देवी पूजा कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेस नेत्या तसेच माजी अहेरी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सपत्नीक उपस्थित राहून गंगा देवीची विधिवत पूजा अर्चना करून देवीची दर्शन घेतले.

त्यावेळी कंकडालवार दामपात्यांनी देवीच्या चरणी  गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली तसेच येथील स्थानिक समस्या जाणून घेत गंगा देवी मंडळाला वर्गणी देण्यात आली.

यावेळी नारायण मगडीवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,कृष्णा मंचर्लावारसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अहेरी नगरीतील भक्त गण  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 29, 2024

PostImage

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे गडचिरोली विधानसभेकरीता वर्षा आत्राम यांचा उमेदवारी अर्ज दाखल


 

गडचिरोली:- गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळण्यात यावी या करीता उमेदवारी अर्ज शिवम फाउंडेशनचे संचालक तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद, महिला राज्यकार्याध्यक्ष वर्षाताई अशोकजी आत्राम यांनी गडचिरोली- चीमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. नामदेवजी किरसान साहेब,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. महेंद्रजी ब्राम्हणवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. 


यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव केशव तिरानिक, अरविंद परचाके, गीता सलामे, कुणाल कोवे, सुरज मडावी,अतुल कोडापे, बादल मडावी, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे,विठ्ठल कोडापे, छत्रपती मडावी, विद्या मसराम,रेखा आत्राम यांच्यासह ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सौ. वर्षाताई अशोकजी आत्राम ह्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महिला राज्यकार्याध्यक्ष,
 सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा  शिवम नागरी पतसंस्थेचे संचालक आहेत.

ताई सेवा परमो धर्म या व्रताचे पालन करत समाजातील दुःख गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

जनसेवेचे व्रत घेऊन जनसामान्य नागरिकांचे समस्या त्या सोडवित आहेत.


PostImage

MH 33 NEWS

July 23, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या!                 आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची मागणी..!


 

अहेरी : मागील  ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.अतिवृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.अहेरी तालुक्यातील अतिवृष्टीने अनेक मार्ग ठप्प पडले होते.

काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्या              काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांची  मागणी 



    
अहेरी : मागील चार - पाच  दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक  नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व  संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी काँगेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आह.
  
संततधार पावसामुळे नुकसान झालेल्यांची आणि पूरजन्य परिस्थितीत अडकलेल्यांची अजयभाऊ कांकडलवार यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेटी देत आपल्यापरीने मदत कार्याला सुरुवात केली आहे.तसेच त्यांनी नागरिकांसाठी आपल्या स्वतःची चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुध्दा सुरू केली आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतले.तसेच अनेक नुकसान ग्रस्तांना आपल्यापरीने आर्थिक मदतीचे हात दिले.

पूरग्रस्त गावांची पाहणी दरम्यान कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदारमचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी


 

अहेरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली. 

आहेरी तालुक्यात मागील पाच-सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे देवलमरी - मोद्दूमतूरसह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडलवर यांनी सदर पूर्वग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व सतर्क राहण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे  - लहुजी क्रांती मोर्चाची मागणी.


 

गडचिरोली :- लहुजी क्रांती मोर्चा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने   जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री  यांना निवेदन देण्यात आले . हे निवेदन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे .देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत  त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे साहित्य जगातील २७ भाषेमध्ये प्रकाशित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी साता समुद्रापलीकडे गायन केला आहे .त्यामुळे १ ऑगस्टला त्यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावे . १ ऑगस्टला सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावे .अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी  निधी उपलब्ध करून देण्यात यावे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी जाचक अटी शिथिल करावे. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर निकाली काढावे .मातंग व तत्सम जातीवरील होत असलेले अन्याय व अत्याचाराच्या घटनाचा तपास एसआयटीकडे देऊन खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.
   या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले. निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर बावणे , भोजराज काणेकर , प्रमोद बांबोळे ,प्राध्यापक राजेंद्र लांजेकर ,आनंद अलोणे, यज्ञराज जनबंधू उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 20, 2024

PostImage

जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचीही उपस्थिती


जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे स


गडचिरोली ::  जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते. 
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे 
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.


PostImage

MH 33 NEWS

July 20, 2024

PostImage

बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा कार्यकारिणी गठित


 

गडचिरोली:- बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे  कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु   पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके  यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे  कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु   पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके  यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.


PostImage

MH 33 NEWS

July 19, 2024

PostImage

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!         कंत्राटदारांची चौकशी करण्याची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी!


 

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे. 

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे. 

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

July 17, 2024

PostImage

आदिवासी काँग्रेस सेलचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मोहरम कार्यक्रमाला उपस्थित!


अहेरी :- तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लालशाहा / ईमामे कासिम सार्वजनिक मोहरम कमिटी पुनागुडम तर्फे आलापल्ली येथे मोहरम कार्यक्रम आयोजित केली आहे.आयोजित मोहरम कार्यक्रमला काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवले.दरम्यान मडावी साहेबांनी कमिटी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यक्रमा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  
यावेळी कमिटी सदस्य चिंटू आत्राम,जावेद पठाण,रिंकू आत्राम,बबलू आत्राम,दिलीप सिडाम,सीताराम कोरेत,नाना कोरेत,महेश सल्लम,पिट्टू अर्का,अमन गंजीवर,श्रीकांत आत्राम,गणेश आलाम,अमोल सडमेक,रोहित अर्का,आकाश येरकलवार,आकाश सिडाम,योगेश सडमेक,योगेश कोत्तावार,सुरज आत्राम,दिग्विजय आत्राम,जिम्मी आत्राम,रचित अर्का,पंकज गेडाम,विक्की बडगेल,स्वप्निल सारकेवार,अज्जुभाऊ पठाण मा.सरपंच ,स्वप्नील मडावी ,सचिन पंचाऱ्या,आशिष तलांडेसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कमिटी पदाधिकारी - सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 17, 2024

PostImage

शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा*   *अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांची मागणी


 

अहेरी :- शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी मा. डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत  निवेदनातून केली आहे.

 एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या शा आश्राम शाळेतील मुले मुलीचे वस्तीगृह अहेरी आलापल्ली हे मुलचेरा सिरोंचा, भामरागड, एटापल्ली अहेरी या मार्गाच्या मध्यभागी असून उच्च शिक्षण घेण्यातील
पाचही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी येथे येत असतात. 
परंतू शा. आदिवासी वस्तीगृह इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत वस्तीगृह उर्वरित ५०% जागेसाठी बि.ए बि.कॉम बि.एस.सी २ ते ३ एम.ए. साठी प्रवेश देवून ५०% कोटा पूर्ण करतात.
बि.एड व एम.ए. साठी सर्वाधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशित असून सुद्धा वस्तीगृहाला प्रवेश मिळत नाही तसेच आदिवासी विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या शासकीय आश्रमशाळा अनुदाणित आश्रम शाळा एकलव्य आश्रम शाळा नामांकीत शाळा १ ते १२ पर्यंत असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रवेश देवून उच्च शिक्षण घेण्याच्या बि.ए., बि.कॉम, बि.एस.सी. एम.ए. बि.एड शिक्षण घेण्या-या विद्यार्थाना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.
 या पाचही तालुक्यामध्ये अहेरीला एकमेव बि.एड महाविद्यालय असून १० ते १५ वर्षात एकही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाही.

 तसे दिनदयाल उपाध्यय स्वयम योजना तालुक्याच्या ठिकाणी लागु होत नाही म्हणून लाभ देत नसल्याने या भागातील नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, डोंगर-दऱ्यात राहणारे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित विकासापासून कोसो दूर जात आहेत.
 त्यामुळे या भागातील आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ८ ते १२ च्या विद्यार्थाच्या प्रवेश प्रक्रिया राबवून किंवा वस्तीगृहात प्रवेश क्षमता वाढवून बि.ए. बि.कॉम, बि.एस.सी, एम.ए. बि.एड करण्या-या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकिया पूर्ण करून तात्काळ प्रवेश देण्यात यावी अन्यथा प्रकल्प कार्यालय अहेरी समोर धरणे आंदोलण करण्यात येईल.
असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.


PostImage

MH 33 NEWS

July 15, 2024

PostImage

खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम! माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार,आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित.!


 

अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते व गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवस निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडले.

दरम्यान अहेरी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप,नागेपल्ली सेवासदन दवाखान्यात रुग्णांना फळ,बिस्केट वाटप तसेच अहेरी शाळेतील विध्यार्थी - विध्यार्थींना पेन बुक चॉकलेट,कंकडालवार,मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेला साडी वाटप तसेच काही जनतेला आर्थिक मदत सुद्धा करण्यात आले.

यावेळी रज्जाक खान पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,चंद्रशेखर बेज्जलवार,बग्यश्रीताई बेज्जलवार ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली,हनिप शेख,मधुकर सडमेक अहेरी विधानसभा एस.टी.सेल,सतीश कोरेत,जगताप कोरेत,किशोर सडमेक माजी पेसा अध्यक्ष,जावेद शेख,सतीश मडावी,विनोद मडावी,कोशोर सडमेक,जगपती सडमेक,संतोष येनगंटीवार,सचिन पंचार्य,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

July 14, 2024

PostImage

आदिवासी एकता युवा समिती तर्फे वृक्षारोपण व फळवाटप


 


गडचिरोली- आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य स्थानिक बिरसा मुंडा चौकात वृक्षारोपण व वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना फळवाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने वृद्धाश्रमातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके यांनी संस्थेस दिले. याप्रसंगी समितीचे सचिव प्रदिप कुलसंगे, माजी जिप सदस्य कुसुम अलाम, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, एम्प्लॉईज फेडरेशन चे रुषी होळी सर, समितीचे सल्लागार मुकूंदा मेश्राम सर, वृद्धाश्रमाचे लिपीक लोणारे साहेब,  प्रा. किरकीरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री मुकुंदा सर यांनी वृद्धाश्रमास १००० रु देणगी स्वरूपात दिले. यानंतर समितीच्या वतीने पेसा भरतीमधील युवकांची पेसा भरती संदर्भात बैठक घेण्यात आली. पेसा भरतीतील युवकांची बैठक घेऊन रडखडलेली पेसा भरती कशा प्रकारे सुरू करण्यात येईल यासंदर्भात मा. धिरज मडावी सर, मा. सदानंद ताराम सर यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला.  व पेसा भरती व रडखडलेली पदभरती संदर्भात आंदोलनात्मक भुमिका घेण्याची भुमिका ठरवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समितीचे कार्याध्यक्ष संजय मसराम, सुरज मडावी, स्वप्नील मडावी, मयुर कोडापे, बादल मडावी, अक्षय वाढई, सुमित कुमरे, स्वप्नील मडावी, प्रफुल कोडाप, संजय भोयर, डेव्हिड पेंदाम, कृपाली दुर्वा, नुतन वड्डे, सुनिता उसेंडी, समिर उसेंडी, खुशाल हुर्रा, गिरीश उईके, आदि युवक युवतीं उपस्थित होते,


PostImage

MH 33 NEWS

July 14, 2024

PostImage

सार्वत्रिक बहुउद्देशीय  संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती उमेदवारांना समारोप


 

गडचिरोली:-सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती मैदानी चाचणी करिता येणाऱ्या दुर्गम भागातील उमेदवारांना  निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिनांक १८जून  ते १३ जुलै  पर्यंत प्रति दिन ७० ते ८० असे एकूण १६५० विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. सृष्टी सेलिब्रेशन हॉल सेमाना रोड नवेगाव या ठिकाणी सदर सेवा संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली. या सेवाकार्याला सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव यांनी हॉल उपलब्ध करून देऊन मुला -मुलींची निवास व्यवस्था   केली होती.
यासोबतच एक वेळच्या जेवणाकरिता सुरज कोडापे यांनी विशेष प्रयत्न केले महेंद्रजी ब्राह्मणवाडे ,डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री लीलाधर भरडकर डॉक्टर कोवे यांनी यात सहकार्य केले . 
सुरज कोडापे यांनी अनेकांशी समन्वय साधून प्रत्येक संध्याकाळी उमेदवारांना भरती विषयीक आवश्यक मार्गदर्शन करून सर्वांचे मनोधैर्य वाढवून स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचे सूत्र सांगितले.
 कोडापे यांची  पोलिस विभागात PSI या पदावर निवड झालेली आहे, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या सेवा कार्यात संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच इतर सामाजिक संघटनांनी पाठबळ दिले. त्याचप्रमाणे अजब गजब फुडीज चे संचालक सतिश भाऊ , लक्षवेध अकॅडमी संचालक राजीव सर, उमेश उईके, कुणाल कोवे , वनिशाम येरमे,  भरत येरमे, अमरसिंग गेडाम,  मुकुंदा मेश्राम सुरेश बारसागडे , पुंडलिक शेंडे, जालिंदर भोयर, अमृत किनेकार ,रेवनाथ निकुरे  यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले तर सतीश कुसराम यांनी उमेदवारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सहकार्य केले..
या सेवा कार्याकरिता आर्थिक सहकार्य देणाऱ्या तसेच या सेवाकार्यात प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष   सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. 

दिनांक   28 जुलै 2024 ला गडचिरोली येथे होणाऱ्या पोलीस भरती लेखी चाचणी करिता दुर्गम भागातून   येणाऱ्या उमेदवारांकरिता  एक दिवस निवासाची व भोजनाची मोफत सेवा देण्यात येईल.
यापुढेही वरील दुर्गम भागातून कार्यालयीन काम करिता व शालेय कामाकरिता येणाऱ्या  गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना एक दिवसीय निवास व भोजनाची मोफत सेवा देण्याचा व अशा प्रकारचे उपक्रम निरंतर  राबविण्याचा संस्थेचा  मानस आहे.. संपर्क क्रमांक- ज्योती मॅडम ९४०५८७२३९७ दुर्गे सर ९७६६५८३१६१, सतीश सर ७४९८४५२०७९.


PostImage

MH 33 NEWS

July 12, 2024

PostImage

महागाव येथील येरोजवार कुटुंबाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत!


 

अहेरी :  तालुक्यातील महागाव येथील सुरेखा येरोजवार यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने ते चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे.येरोजवार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना बाहेरची औषध व इतर कमांसाठी आर्थिक अडचण भासत होती. 

सदर बाब काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यां कडून कळताच त्यांनी चंद्रपूर गाठून नातेवाईकांना भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली तसेच रुग्ण सुरेखा येरोजवार यांना तब्येतीची आस्थेने विचारपूस करून येरोजवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.

दरम्यान यावेळी कंकडालवार म्हणले कि यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य ते मदत करेन म्हणून येरोजवार कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी महागाव येथील येरोजवार कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.


PostImage

MH 33 NEWS

July 1, 2024

PostImage

लाडकी बहीण योजनेच्या कालावधीत वाढ करा. - खासदार प्रतिभा धानोरकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी.


 

गडचिरोली:- महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेची नुकतीच पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. सदर योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी फक्त 15 दिवस असल्याने व त्या कालावधी आवश्यक कागदपत्राची पुर्तता होत नसल्याने सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा निवडणूका डोळîासमोर ठेवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सदर योजनेचा अर्ज भरण्याची दि. 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यत असून या करीता अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्या  मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र व रहीवासी दाखल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दोन शासकीय कागदपत्रांसाठी शासनाकडे किमान पंधरा दिवस लागतात. अशा वेळेस या योजनेचा लाभ कमीत कमी महीलांना मिळावा हा तर शासनाचा हेतू नाही ना? अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केली. त्यामुळे सदर योजना खरचं तळागळातील महिलांपर्यंत पोहचवायची असल्यास या योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी किमान 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

मा. खा.अशोक नेते यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार...


 

पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे आयोजन

गडचिरोली : भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा.श्री अशोक जी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १ जुलै रोजी सोमवारी काही सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात सकाळी ९ वाजता सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा व वृक्षारोपण, त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ब्लँकेटचे वाटप व वृक्षारोपण, 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत अशोक नेते यांच्या निवासस्थानामागील खुल्या जागेत, तसेच कॅम्प एरियामधील हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी १ वा ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे फळ वाटप, दुपारी ४ वाजता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे वृक्षारोपण व फळ वाटप, तर सायंकाळी ७ वाजता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. 

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या कार्यक्रमांला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

ग्रंथालय चळवळीने वाचन संस्कृती समृद्ध केली - आ. किशोर जोरगेवार


 

 


चंद्रपूर :- वाचन हे ज्ञानाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पुस्तकांमधून आपल्याला विविध विषयांवरील माहिती मिळते. ग्रंथालय चळवळीने ही वाचन संस्कृती समृद्ध केली असून ग्रंथालयीन चळवळीचे प्रश्न सोडविण्याकरिता मी विधीमंडळामध्ये संसदीय आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दि. ३० जून २०२४ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या सहयोगाने श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार बोलत होते.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर, डॉ. सुधीर आष्टूंकर, डॉ. संजय भुत्तमवार, रत्नाकर नलावडे, प्राचार्य संतोष शिंदे आदीची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलो तरी वाचन नियमित केल्याने आपली त्या-त्या क्षेत्रात विशेष प्रगती होते. आपण मतदार संघात ११ सुसज्ज अभ्यासिका तयार करत असून हा ग्रंथालय चळवळीचा भाग आहे. वाचनामुळे आपल्या विचारशक्तीला धार येते. आपल्याला विविध लेखकांच्या विचारसरणीचे आणि तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते. त्यामुळे आपल्या तर्कशक्तीमध्ये वाढ होते. वाचनामुळे आपल्या भाषेचा विकास होतो. नवीन शब्द, वाक्यरचना आणि व्याकरणाच्या नियमांचे ज्ञान आपल्याला यातून मिळते. वाचन हे मानसिक स्वास्थ्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. वाचनामुळे आपल्याला विविध समाजांची, संस्कृतींची आणि परंपरांची माहिती मिळते. यामुळे आपली सामाजिक जाणीव वाढते, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये अनिल बोरगमवार यांनी ग्रंथालयाची समृद्ध वाटचाल व तिच्या समस्यांविषयी भाष्य केले. तर वाचनामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन उन्नत समाजाची निर्मिती होते, असे मत कवयित्री पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष शिंदे यांनी केले. संचालन प्राध्यापक श्रीकांत साव यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. दीपाली दांडेकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक वृंद, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

🏆गड आला पण दोन्ही सिंह गेले!


 

⭕विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माचीही निवृत्तीची घोषणा

 

मुंबई:- टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेला हरवून 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला. यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र साऊथ आफ्रिका विजयाचे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. ज्यामुळे टीम इंडियाने 7 धावांनी हा सामान जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे

फायनल सामन्यात विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना विराटने आपला हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप आहे असे जाहीर करून यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे गडचिरोलीत आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत:- विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


*गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू*

 

*गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे*

 

*गडचिरोलीत आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत*

*विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

मुंबई दि.29:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाला रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. 

वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती तर मुलाचा जीव वाचला असता. या घटनेची माहिती घेतली असता. गडचिरोलीत आरोग्य विभागाची 70 टक्के पदे रिक्त आहेत अशी माहिती मिळाली. ही पदे रिक्त असल्याने डॉक्टर उपस्थित राहत नाही. रूग्णांना योग्य ती सेवा मिळत नाहीत. रूग्णवाहिकेच्या वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी  श्री. वडेट्टीवार यांनी  केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 29, 2024

PostImage

जिल्हा परिषद -नगर परिषद निवडणुका फक्त जिंकण्यासाठी लढणार - कार्यकर्त्यांचा संकल्प 


 

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय स्तरावर फुले आंबेडकरी चळवळीची स्थिती आणि भविष्यातील राजकीय भूमिकेवर स्थानिक सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी राज बन्सोड हे होते. विशेष अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, ॲड. मेश्राम, विनोद मडावी  उपस्थित होते.

जिल्ह्यात बिरसा फुले आंबेडकर चळवळ राजकीय स्तरावर मजबूत करायची असेल आणि अस्तित्व निर्माण करायचे असल्यास आंबेडकरी पक्षांनी आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका केवळ पक्षाचे अस्तित्व ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविल्या पाहिजेत अशी भूमिका ठेवत उपस्थित सर्वांनी एकमताने ॲड. चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वात आझाद समाज पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जनसंपर्क व जन आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, नागरिक सोयी सुविधा या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी ठरविले.

नुकताच लोकसभेमध्ये इंडिया किंवा महायुती मध्ये सामील न होता *चंद्रशेखर आझाद रावण* यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून सुद्धा 1 लाख 51 हजार मताधिक्याने विजय मिळविला असून गेल्या 10 वर्षात जन आंदोलनातून आंबेडकरी राजकारणात देशभरात एक तरुण नेतृत्व म्हणून लोकप्रियता मिळविली. कांशीरामजी नंतर देशभरात संघर्षातून व आंदोलनातून तयार झालेला युवा नेतृत्व म्हणून खासदार रावण नावरूपास येत आहेत. त्यामुळे BRSP तुन बाहेर पडलेले सर्व पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच नविन लोकांना सोबत घेऊन आझाद समाज पार्टी मध्ये प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या उपस्थितीत 13 जुलै रोजी पक्ष प्रवेश करणार असून लवकरच चंद्रशेखर आझाद गडचिरोली मध्ये जाहीर सभा होणार असल्याचे राज बन्सोड यांनी सांगितले. पक्षात काम करायची इच्छा असणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार प्रितेश अंबादे यांनी केले. यावेळी जितेंद्र बांबोळे, नागसेन खोब्रागडे, हेमंत रामटेके, तारका जांभुळकर, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, किशोर नरुले, घनश्याम खोब्रागडे, प्रकाश बन्सोड, पवन माटे, राजपाल खोब्रागडे, प्रणय दरडे, राहुल मेश्राम, मंगेश कांबळे, प्रतीक डांगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 


PostImage

MH 33 NEWS

June 28, 2024

PostImage

लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरीता निधी उपलब्ध करुन द्या.- खासदार प्रतिभा धानोरकर


 

रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट.

 

चंद्रपूर:-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.

 

चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली. तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली. यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.

 

 

--


PostImage

MH 33 NEWS

June 28, 2024

PostImage

संस्थाचालक ,शासन व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांचे शोषण  करु नये --      प्रोटानची मागणी


संस्थाचालक ,शासन व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांचे शोषण  करु नये --      प्रोटानची मागणी


गडचिरोली:-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची शाखा प्रोटानच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना कर्मचाऱ्यांवरील होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील अनेक संस्थाचालक संविधानिक मार्गाने संस्था न  चालविता शासकीय नियमांचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारे छळ करतात . त्यांचे आर्थिक ,मानसिक, शारीरिक शोषण करतात . यामध्ये कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन करणे ,  कमी वेतनात जास्त काळ  राबवून घेणे , नोकरीतून काढून देणे , नोकरीतून काढून देणे अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशत निर्माण करतात.
        संस्थाचालक नेमणूक पत्र न देता अनेक वर्षे अतिशय तुटपुंज्या पगारावर राबवून घेतात . पूर्वसूचना न देता बेकायदेशीर पद्धतीने बडतर्फ करतात .अपमानास्पद वागणूक व अशैक्षणिक कामे करून घेतात. दीर्घकालीन सुट्ट्या दिल्या जात नाही .मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करतात. त्यामुळे अशा संस्थाचालकावर कारवाई करावी व त्यांच्या  शाळांची मान्यता रद्द करावे.
या निवेदनात अनेक मागण्या मांडण्यात आले आहेत . महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील २००५ नंतर व केंद्र शासनाच्या एक जानेवारी २००४ नंतरच्या सरकारी , निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावे .नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे खाजगीकरण व उदारीकरणावर आधारित असून बहुजन समाजाला गुलाम करणाऱ्या आहेत . त्यामुळे हे धोरण महाराष्ट्रात लागू करू नये .नवीन चार काळे कायदे हे भांडवलदारांच्या हिताचे आहेत .त्यामुळे हे कायदे लागू करू नये . २००१ पूर्वीच्या ७८ महाविद्यालयांना अनुदान द्यावे. कर्मचारी भरती शंभर टक्के करावे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावर नेमणूक करावे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रम हा नवीन शैक्षणिक धोरणात लागू करू नये.
        या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चार चरणात चरणबद्ध आंदोलन करण्यात येईल .निवेदन देतेवेळी बामसेफचे पूर्व विदर्भ प्रभारी प्रमोद बांबोळे ,प्रोटांचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू, सचिव नरेश बांबोळे ,बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अशोक वंजारी ,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन ताकसांडे इत्यादी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 26, 2024

PostImage

सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगावच्या वतीने पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी करिता येणाऱ्या मुलांची राहण्याची व भोजनाची सोय


 

गडचिरोली:-सृष्टी सिलेब्रेशन सभागृह येथे सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगाव  (मुरखेडा) च्या वतीने पोलीस भरतीचे मैदानी चाचणी२०२४ करिता उपस्थित राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना मुप्त जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या जिल्ह्यात गरीब आणि होतकरू असलेले तरुण यांना आर्थिक परिस्थितीमुळे गडचिरोलीमध्ये राहण्याची गैरसोय असताना या संस्थेने ही व्यवस्था केली आहे .
या संस्थेचे अध्यक्ष ज्योती जुमनाके ,सचिव एस .एम. दुर्गे ,कोषाध्यक्ष डी.जे . जुमनाके  , समाज सेवक सुरज कोडापे  , सामाजिक कार्यकर्ते सतीश कुसराम व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे .या ठिकाणी दररोज ५० ते ६० सुशिक्षित बेरोजगार उमेदवार येऊन या संधीचा फायदा घेतात . असाच फायदा इतर उमेदवारांनी घ्यावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे . हा उपक्रम पोलीस भरती प्रक्रिया २०२४ ची मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील असे कळविण्यात येत आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 26, 2024

PostImage

देशभरातील मुस्लिमांवरील   होणारी माबलींचिंग  व हत्या थांबवा -- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा ची मागणी


गडचिरोली --  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले की , मुस्लिमांवरील होणारे माबलींचींग व हत्या त्वरित थांबवण्यात यावे .अन्यथा भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला. मागील दहा वर्षापासून मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात हत्या  होत आहेत . कधी माबलिंचींच्या नावावर , कधी गोहत्या च्या नावावर , कधी लव-जिहादच्या नावावर तर कधी पोलीस कष्टडी मध्ये  तर कधी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून हत्या केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी त्यांची दुकाने, मकाने तर कधी त्यांच्या वस्तीमधून बुलडोजर चालविले जात आहे . 19जून ला उत्तर प्रदेशात प्रदेशातील अलिगड येथील मोहम्मद फरीद वय 35 वर्षे याला रात्री दहा वाजता रस्त्यात पकडून हत्या करण्यात आली .7 जूनला रायपूर येथील गुड्डू खान ,चांद  खान, सय्यद कुरेशी यांची गोरक्षक हत्या च्या नावावर हत्या करण्यात आली  .8 जूनला उत्तर प्रदेश मध्ये सोनपूर गावातील मौलाना फारुख यांची हत्या करण्यात आली .अशाप्रकारे भारतभर अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या हत्या करण्यात येत आहे. हे त्वरित थांबवण्यात यावे. असे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे कळविण्यात आले.  दोषींवर फास्टट्रॅक कोर्ट मध्ये मुकदमा चालवण्यात यावे . दोषींना फाशी किंवा आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात यावी. पिडीत कुटुंबांना प्रत्येकी एक करोड रुपये व नोकरी देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. अशा विविध मागण्या मागण्यात आल्या . या मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले.
      निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , पुर्व विदर्भ प्रभारी  प्रमोद बांबोळे ,एमएन टीव्ही चे प्रमोद राऊत , आरएमबीकेएसचे 
 प्राध्यापक अशोक वंजारी , प्रोटानचे नरेश बांबोळे , बामसेफचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू , बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 22, 2024

PostImage

आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा सत्कार...


 

गडचिरोली:-आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी संघटनेच्या वतीने पेसा भरती, MPSC, UPSC करणार्या विद्यार्थ्यांना पुर्ण वेळ मार्गदर्शक, ६ जून २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या १२५०० हजार पद भरती करण्याबरोबरच गोंडवाना विद्यापीठातील समस्ये संदर्भात व अन्य समस्यांन संदर्भात चर्चा करण्यात आली.


 यावेळेस संघटनेचे अध्यक्ष उमेश उईके, उपाध्यक्ष सुधिर मसराम, सचिव प्रदिप कुलसंगे, कार्याध्यक्ष संजय मसराम, मुकूंदा मेश्राम, आकाश कोडाप, स्वनिल मडावी, माया पेंदोर, भारत आराम, विक्रांत आतला, सुरज मडावी, आदि उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 9, 2024

PostImage

 जननायक बिरसा मुंडा चौकात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन



गडचिरोली- स्थानिय गडचिरोली येथील जननायक बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी एकता युवा समिती च्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या १२४ वा शहिद दिन साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक कुसूम अलाम, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, नायब तहसिलदार वनिश्याम येरमे हे होते.

सर्व प्रथम मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या संघर्ष लक्षात घेऊन समाज एकजुटीचा प्रयत्न करावा असे आव्हान उपस्थित समाज बांधवांना केले.

 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप कुलसंगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय मसराम, अमोल कुळमेथे, आकाश कोडाप, कुणाल कोवे, सतिश कुसराम, देवराव अलाम, डॉ. मसराम व समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

April 17, 2024

PostImage

*लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन*


 

 *रॅलीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी नृत्यात भाग घेतला*

*उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार*

 

 *गडचिरोली* -: 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून पाच किमी रॅली काढण्यात आली. उन्हाच्या कडक्यात पण काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला. यात शहरातील अभिनव लॉन, आठवडी बाजार,हनुमान मंदिर,भडांगे मोहोल्ला,भोई, माळी व वंजारी समाज मोहोल्ला,राममंदिर,इंदिरा गांधी चौक,शिवाजी महाराज विद्यालय ते अभिनव लॉन अशी पदयात्रा रॅली काढण्यात आली.

या पदयात्रा रॅलीचे नेतृत्व राजाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले..रॅलीत गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत मांदरी वाद्य वाजवले. हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली.इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना साथ दिली, त्यांनी देखील पक्षाचा झेंडा घेऊन नृत्यात भाग घेतला.


जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भाऊ कात्राटवार, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस  इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचे तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने रॅली सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातून रॅली जात असताना जागोजागी नागरिकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅली मार्गस्थ होताना नागरिकांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडी उमेदवार डॉ. किरसान यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या रॅलीची सांगता अभिनव लॉन येथे सभा घेऊन करण्यात आली. सांगता सभेत डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, भाजपची आता पायाखालची जमीन सरकली असून सर्वत्र जनतेत आक्रोश आहे. कार्यकर्त्यांनी आता गाफील न राहता येत्या 19 एप्रिल रोजी मतदान करावे.   रॅलीच्या सांगता सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला, नागरिकांनी सावधानता बाळगावी. आता हे भाजपवाले विविध आमिषे दाखवून तुमचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करतील आपण मात्र जागरूक राहून इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.


PostImage

MH 33 NEWS

April 4, 2024

PostImage

राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात*


 

'या' ठिकाणी होणार जाहीर सभा*


नागपूर:- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला सभा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे १९ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विधानसभासंघ साकोली आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राहुल गांधी येत आहेत.

तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी चंद्रपूर येथे सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचार समिती आणि इथर समित्यांची बुधवारी बैठक झाली. यावेळी या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या पूर्व विदर्भात सभा घेऊन वातावरण निमिर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.


PostImage

MH 33 NEWS

April 4, 2024

PostImage

*विरोधकांना संपवून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  - विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार* 


 

 *दडपशाही धोरणातून भाजपला सत्तेची लालसा - डॉ. अविनाश वारजुरकर* 

 *लोकशाही वाचविण्यासाठी जागरूक रहा - डॉ. नामदेव किरसान* 

 *नागभिड येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व सभेचे आयोजन*

 

नागभिड:-देशांतील प्रत्येक नागरिकांला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणुन जगावे लागेल.हि अंतीम निवडणुक समजून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून हद्दपार करा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ नागभिड येथे आयोजीत सभेत बोलत होते.

आयोजीत प्रचार सभेस प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर , इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव गावंडे, काँग्रेस अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, हसन गिलानी,,काँग्रेसचे चीमुर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुरकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले,   ॲड. गोविंद भेंडारकर, नरेंद्र हेमने, डॉ.कावळे , मंगेश सोणकुसरे, भास्कर शिंदे, डॉ. रघुनाथ बोरकर, विनोद बोरकर, खोजराम मरस्कोल्हे, साहिस वारजुरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांतील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग व सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असुन आता विरोध करणार्या विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केल्या जात आहे. अश्या निष्ठूर सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देश सुरक्षित नाही, देशांतील महीला सुरक्षित नाही, महीला खेळाळूचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे. अशी अवस्था देशाची झाली आहे.तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अश्या मौनी बाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात हि हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.तर
देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असुन देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही. . देशांत तानाशाही सुरु असुन पक्ष  फोडल्या जात असल्याचे माजी आ. डॉ. अविनाश वारजुरकर यांनी यावेळी सांगितले. देशात सत्तापीपासून्नी  बहुजनांना धर्म जातीमध्ये विभागून तसेच स्वतःचा पराभव दिसताना पुलवामा सारखे कांड घडवून निष्पाप सैनिकांचा बळी घेतल्याचे व त्यातून सत्ता काबीज केल्याचे पाप केले गेले आहे. अशा निष्ठावर निर्णय सरकारला अर्ज पार करण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांनी केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली - चिमूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.  या प्रसंगी नागभिड  तालुक्यांतील व परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

MH 33 NEWS

March 26, 2024

PostImage

*तरुणाने केली विहिरीत उडी मारून आत्महत्या*


*तरुणाने केली विहिरीत उडी मारून आत्महत्या*

गडचिरोली दि,२६ मार्च :- गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतर असलेल्या नवेगाव, मुरखळा येथील शेत शिवारातील विहिरीत २४ वर्षीय तरुणाचे प्रेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक मनोज सुधाकर जेंगठे (वय २४ वर्ष) हा तरुण होळी च्या दिवसापासून बेपत्ता होता,दि,२६ मार्च ला विहिरीच्या समोर चप्पल आढळून आल्याने त्याचा शोध घेतला असता विहिरीत त्याचा मृतदेह मिळाला. मृतक हा अविवाहित होता.मृतक हा वाहन चालवण्याचे काम करीत होता.

पोलीस पंचनाम्यानंतर शवउत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आला आहे.पुढील तपास गडचिरोली पोलीस निरीक्षक अरुण फेंगडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 22, 2024

PostImage

बिआरएसपी कडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल



बिआरएसपी कडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

 

गडचिरोली :-(दि,२२ मार्च)
लोकसभा  निवडणूक २०२४ गडचिरोली-चिमूर या क्षेत्रात १९ एप्रिल ला पहिल्या टप्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आज गडचिरोली-चिमूर (अ. ज.)मतदारसंघात आज दोन नावनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले.

लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्याने आणि बहुजन – आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याने बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघा करीता आज युवा नेते विनोद गुरुदास मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या वाळके, रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतिश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 19, 2024

PostImage

*उद्यापासून गडचिरोली- चिमूर मतदार संघाचा नामनिर्देशनास होणार सुरुवात* 


 

गडचिरोली, (जिमाका) दि.19:भारत निवडणूक आयोगाने 12- गडचिरोली-चिमुर (अज) लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार लोकसभा निवडणूकीची सुचना दिनांक 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून दिनांक 20 मार्च 2024 ते दिनांक 27 मार्च 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, 12- गडचिरोली-चिमुर (अज) मतदार संघ, जिल्हा नियंत्रण कक्ष, पहिला मजला (जुने नियोजन भवन), जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 28 मार्च 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची वेळ दिनांक 30 मार्च 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत असून दिनांक 19 एप्रिल 2024 ला मतदान घेण्यात येईल. मतदानाची वेळ पुढीलप्रमाणे राहील.
 66-आमगांव (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 67- आरमोरी (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 68- गडचिरोली (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 69- अहेरी (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 73- ब्रम्हपूरी वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, 74-चिमुर वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, मतमोजनी दिनांक 04 जून 2024 ला होईल.
 वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 19, 2024

PostImage

*गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत*  *चार जहाल माओवादी ठार*


 

 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला 

दोन डीव्हीसिएम (Divisional Commitee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस
 गडचिरोल्ली;-दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. याच निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आलेले आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व 05 कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.  त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.  

      चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 04 पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले.  त्यांची प्राथमिक ओळख पटविली असता, 1) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय 28 वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती 2) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय 32 वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती 3) कुरसंग राजू, प्लाटून सदस्य 4) कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य अशी नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण 36 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.  यासोबतच घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 02 नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.  

      सदर अभियान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा., मा. पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. जगदीश मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. रमेश सा. व पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे.  तसेच सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 18, 2024

PostImage

*गोंडवाणा गणतंत्र पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार:- प्रशांत  मडावी* 


*गोंडवाणा गणतंत्र पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार:- प्रशांत  मडावी* 


गडचिरोली- गोंडवाना गणतंत्र पार्टी येणाऱ्या निवडणूका स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही अशी माहीती गो.ग.पा जिल्हाअध्यक्ष प्रशांत भाऊ मडावी यांनी दिली. आज दि.१८/०३/२०२४ रोजी गो.ग.पार्टी ची कोर कमिटीची बैठक पार पडली, सदर बैठकीत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र हे गो.ग.पा स्वबळावर लढवणार आहेत हे सर्वानुमते ठरवण्यात आले या बैठकीत.
गो.ग.पा जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ मडावी,जि. उपाध्यक्ष डॉ. साईनाथ कोडापे,जि. महामंत्री किशोर मात्लामी,जि. महासचिव रमेश कोरचा सर,सतीश कुसराम,  कुणाल भाऊ कोवे जिल्हाध्यक्ष अ.भा.आ.वि.परिषद, तथा गो.ग.पा तालुकाध्यक्ष वडसा क्रिष्णा उईके, धाणोरा ता. अध्यक्ष तुमरेटी, ता.उपाध्यक्ष धाणोरा नारायण सयाम, अमीत शेख ता. संघटक धाणोरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 17, 2024

PostImage

*जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत*


*जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत*

 

सावली :- तालुक्यातील मौजा.जिबगांव येथे दोन कॅन्सरग्रस्त रुग्णांना राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कर्करोग, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तसेच इतर रुग्णांना विविध प्रसंगी आर्थिक मदत देणे सुरू ठेवले आहे,त्यांचे जनसेवा हिच ईश्वर सेवेचे व्रत सर्वांना प्रेरणादायी आहेत विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही नागरिक असो विजय वडेट्टीवार त्यांना नेहमी सहकार्य करतात त्याच माध्यमातून जिबगांव येथिल कॅन्सरग्रस्त रुग्ण सौ.मालताबाई शेंडे वय ५६ वर्षे व शारदाताई बारसागडे वय ३४ वर्षे यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, सौ.मालताबाई शेंडे व शारदाताई बारसागडे हे दोन्ही रुग्ण राहणार जिबगांव अत्यंत गरिब कुटुंबातील व्यक्ती आहेत मागील बऱ्याच दिवसापासून प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्राथमिक उपचार घेत होते, उपचारा दरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. स्व.शारदाताई बारसागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सौ.मालताबाई शेंडे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाहिजे असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली,त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.

  आर्थिक मदत देताना जिबगावचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी, उपसरपंच सौ.मोनीताई उंदीरवाडे,ग्रामपंचायत सदस्या सौ.इंदिरा भोयर,सौ.लिलाबाई भोयर,सौ.दिक्षाताई भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 16, 2024

PostImage

*हिरापूर येथे २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे  भूमिपूजन संपन्न.*


*हिरापूर येथे २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे  भूमिपूजन संपन्न.*  

 

 

दिनांक :- १६ मार्च २०२४ 
                  
सावली :- सावली तालुक्यातील मौजा. हिरापूर येथे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून २५ लक्ष रुपयाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे काम मंजूर झालेले आहे. त्या कामाचे भूमिपूजन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व हिरापुरचे सरपंच्या सौ.प्रीतीताई गोहने यांच्या हस्ते पार पडले.

हिरापुर येथे सामाजिक सभागृहाची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांच्या सतत पाठपुराव्यामुळे २५१५ अंतर्गत विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून आज ते साकार झाले. राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात संदर्भाधिन क्र. २ ते ८ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

या प्रसंगी हिरापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा.शरद कन्नाके,बोथलीचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार,ग्रामपंचायत सदस्य हिरापूर मा.रुमाजी कोरडे,माधुरीताई आत्राम,निताताई मुनघाटे,सरिताताई भोयर,मा.आशिष पुण्यपवार आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

*मान्यता न घेताच घेतली पदभरती कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा यांचा प्रताप - काँग्रेस तालुका अध्यक्ष सिरोंचा श्री. सतीश जवाजी यांचा आरोप* 


*मान्यता न घेताच घेतली पदभरती कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा यांचा प्रताप - काँग्रेस तालुका अध्यक्ष सिरोंचा श्री. सतीश जवाजी यांचा आरोप* 

सिरोंचा; दिनांक 21जानेवारी रोजी 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा तर्फे  विविध पदांसाठी परीक्षा घेण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. परंतु हे कंत्राट मान्यतेशिवाय देण्यात आले ही बाब आता समोर आली आहे. पदभरती सरळ सेवेने करण्याअगोदर मा. जिल्हा उपनिबंधक यांची पूर्वपरवानगी घेऊनच पुढची कारवाई कारवाई करावी लागते परंतु बाजार समिती द्वारा अशी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी पत्रकार परिषदेत केला. दि. 13/02/2024 रोजी विश्राम गृह सिरोंचा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच ज्या एजन्सीने परीक्षा घेतली ती शासनमान्य नसून अशा प्रकारे परीक्षा घेण्याकरिता नियमानुसार एजन्सीला शासनमान्यता असणे अनिवार्य असते असे त्यांनी सांगितले व त्याविषयी पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.
मुळात कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील पदभरती पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे या पूर्विदेखील 2021 सा झालेल्या परीक्षेत गैरप्रकार होऊन एका विद्यार्थ्यावर गुन्हादाखल  देखील झाला होता परंतु त्याच विद्यार्थ्याची निवड यावेळी देखील झाल्यामुळे या पदभरतीवरच प्रश्नचिन्ह आहे. 
अशा प्रकारे परीक्षेत गैरप्रकार करून आपल्या निकटवर्तीयांनी निवड करने हा बाजार समिती संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे ही संपूर्ण पदभरती अवैध असून ती रद्द करण्यात यावी व संबंधितांची व परीक्षा घेतलेल्या एजन्सीची पोलिस विभागाद्वारे कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर


अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर
कूरखेडा-
           कृषीपंप तसेच घरगूती विद्यूत वाहीणीवर मागील काही दिवसापासून सूरू करण्यात आलेले भारनियमनामूळे त्रस्त येथील हजारोचा संख्येत उपस्थीत शेतकर्यानी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे शाशन व विद्यूत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.
           तालूक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणार्या विद्यूत बिघाडामूळे सूद्धा विद्यूत पूरवठा बंद असतो त्यामूळे‌ विद्यूत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे त्यामूळे संतप्त शेतकर्यानी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कांग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पूकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोचा संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात  विज वितरण कंपनी व शाशनाचा विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्याकरीता आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम याना रोषाचा सामना करावा लागला  कूरखेडा येथील उपविभागीय विद्यूत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला यावेळी पूर्ववत येथील विद्यूत पूरवठा अखंडित ठेवण्याचा मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते व‌ विद्यूत विभाग व शाशनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांचाशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यानी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यानी तालूक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसाफक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकर्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे , शिवसेनाप्रमुख सुरेंद्र  चंदेल, प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम महिला कांग्रेस ता अध्यक्ष आशाताई तूलावी कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे माजी सभापती परसराम टिकले शेतकरी नेते शाम मस्के आदि हजर होते


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

*कुमराम भीम चौक येथे राष्ट्रीय शहीद बाबुरावजी शेडमाके  यांची जयंती साजरी* 


*कुमराम भीम चौक येथे राष्ट्रीय शहीद बाबुरावजी शेडमाके  यांची जयंती साजरी* 

 


गडचिरोली:-  कुमराम भिम चौक जिल्हा न्यायालय परिसर येथे आदिवासी समाज बांधवा तर्फे १८५७ चे शहीद योद्धा क्रांतिवर बाबुरावजी  पूलेसुर सडमेक यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधीर मसराम यांनी केले. प्रियदर्शन मडावी सर यांनी बाबुरावजींचा ऐतिहासिक वारसा समाजाला कसा दिला याबद्दल मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.


 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश नैताम,देवरावजी कोवे, प्रवीण तलांडे,संजय मेश्राम, रुपेश सलामे, गिरीश उईके, निलेश कोडापे समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 12, 2024

PostImage

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश. 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.


आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.
61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.

चंद्रपूर:-समाजातील विविध क्षेत्रातील नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदार प्रतिभा धानोरकर सतत करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विभागाअंतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये श्रेणी वाढ व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्नशील होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आदिवासी विभागाच्या 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुला-मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांनी परिपुर्ण शिक्षक घ्यावे या करीता त्यांना जिथे शिक्षण घेत आहेत त्याच ठिकाणी समोरील शिक्षणाची संधी निर्माण व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तथा विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित साहेब वारंवार भेटून आदिवासी अनुदानित आश्रम शाळेत श्रेणी वाढ व्हावी अशी मागणी केली होती. त्यासोबतच अधिवेशनादरम्यान श्रेणी वाढ चा मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच या संदर्भात शासन निर्णय जारी होईल. 17 उच्च प्राथमिक शाळांना माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येईल तसेच 44 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनुदानित आश्रम शाळा संस्था चालकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 12, 2024

PostImage

*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा नागपूर / चंद्रपूर / मुंबई जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.*


 

*मंगळवार, दिनांक १२ मार्च, २०२४.*

*सकाळी ११.०० वा.*
*डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, पोंभुर्णा यांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.*
*स्थळ: डॉ श्यामाप्रसाद वाचनालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर.*

*सकाळी ११.१५ ते १२.३० पर्यंत*
*खालील लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.*
*१) आदिवासी मुली व मुले यांच्या शासकीय वसतीगृहाचे भूमीपूजन.*
*२) पोंभुर्णा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ०८ पुलांचे भूमिपूजन.*
*३) भूमी अभिलेख कार्यालय, पोंभुर्णा याचे लोकार्पण.*
*४) दुय्यम निबंधक कार्यालय, पोंभुर्णा याचे लोकार्पण.*
*स्थळ: तहसिल कार्यालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर*

*दुपारी १२.३० ते १.३०वा.*
*जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित पोंभुर्णा तालुक्यातील महिला मेळाव्यास उपस्थिती.*
*स्थळ: आबाजी पाटील बुरांडे यांच्या खुल्या प्रांगणात, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर.*

*सायं. ०६.१५ वा.*
*फिरते जनसंपर्क कार्यालय उदघाटन समारंभास उपस्थिती.*
*स्थळ: बॉटनिकल गार्डन जवळ, विसापूर, जि. चंद्रपूर.*

*सायं. ०६.३०वा.*
*श्रध्देय अटलबिहारी वाजपेय बॉटनिकल गार्डन, विसापूर पाहणी.*

*सायं. ०७.०० वा.*
*मा. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत खालील उदघाटन/भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.*
*१) श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैवविविधता उद्यान उदघाटन समारंभ.*
*२) श्री. नाथीबाई ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठ, मुंबई संचलित महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या भूमीपूजन कार्यक्रम.*
*३) अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या मलनि:स्सरण प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम.*
*४) अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम.*
*स्थळ: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) उपकेंद्राची नियोजित जागा, बॉटनिकल गार्डनजवळ, विसापूर, जि. चंद्रपूर.*

*रात्री मुंबई येथे मुक्काम*


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*तारका जांभुळकर यांची बिआरएसपी महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड...*


 

गडचिरोली:-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची महिला आघाडी कार्यकारिणी नुकतीच नियुक्त करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्यां तारका जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

जांभुळकर ह्या सामाजिक क्षेत्रात जिकरीने कार्यरत असणाऱ्या मूलनिवासी महिला संघ जिल्हाध्यक्ष नंतर महिला मैत्री संघ संयोजक असा प्रवास करत आता राजकीय स्तरावर आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याच्या उद्देशाने BRSP जिल्हाध्यक्ष पदी त्या विराजमान झाल्या.
त्याचप्रमाणे महिला आघाडी जिल्हा सचिव म्हणून शोभा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी विभा उमरे व करुणा खोब्रागडे, जिल्हा संघटक पदी प्रीती इंगळे यांची निवड करण्यात आली.

लवकरच महिला आघाडीच्या वतीने भव्य महिला क्रांती मेळावा गडचिरोली मध्ये आयोजित करणार असून, आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांना सक्रिय होण्याचे आवाहन यावेळी तारका जांभुळकर यांनी  प्रसिद्धी पत्रकातून केले.

पक्षाचे विदर्भ महिला सह संयोजक डॉ. पूनम घोनमोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित नारीशक्ती फिटनेस स्पर्धेत धावल्या नारी* 


 

गडचिरोली : 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदाऱ्यांसह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन केले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती अभियानांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 50 पेक्षा जास्त मुलींसह काही युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टी-शर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पुजा निंदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमी गडचिरोलीचे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमीच्या समुहाने मिळून केले.


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

चार वर्षीय चिमुरडीवर पन्नास वर्षीय नारधमाकडून लैंगिक अत्याचार...


 

 

जारावंडी येथील घटना, परिसरात हळहळ व्यक्त 

                                    

जारावंडी:- चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाककणारी घटना जारावंडी येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष नागोबा कोंढेकर (५०) असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

 

सदर आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे. दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची, यात आरोपी शनिवारी सायंकाळी ४ ते५ च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला. अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला, परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूर ला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.

 

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे. आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत.


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्कंडेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेला भेट*


मुलचेरा : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रेला आविसं काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँगेसच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चना भगवान मार्कंडेश्वरांचे दर्शन घेतले.

खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान येथील माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी महाशिवरात्री निमित्त भेट दिली.मार्कंडेश्वर च्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चना केली.

महाशिवरात्री निमित्त खुदीरामपल्ली येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेत भक्ती भावाने आलेल्या भक्तगणांशी सवांद साधला.यावेळी त्यांनी मंदीर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात्रेत केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त करीत मंदीर व्यवस्थापनाला आर्थिक मदतही केली.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,विजय विस्वास,रविन बैरागी,सुभाष दास,अशोक मदक,हरिपद दास,सुकमार दास,मिथुन बमेन,समीर दास,प्रदीप दास,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच गावातील नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*देवदर्शनासाठी गेलेल्या भक्ताचा नदीपात्रात बुडून मृत्यू* 


 

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त अंधारी व वैनगंगा नद्यांचा संगमात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. ९ दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. आकाश अशोक शेडमाके (२३, रा. धानापूर) असे मृताचे नाव आहे.

कुलथा येथील हनुमान मंदिर परिसरात महाशिवरात्र व आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. कुलथा हे गाव गोंडपिपरी-मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर अंधारी व वैनगंगा नद्यांच्या मधोमध वसलेले आहे. धानापूर येथील आकाश शेडमाके हा युवक आंघाेळीसाठी नदी पात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. कुलथा येथील यात्रा मंगळवार (दि. १२) पर्यंत सुरू राहणार असल्याने या घटनेनंतर पोलिसांनी नदी पात्रात चोख बंदोबस्त लावला आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थीक मदत.!*


*कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थीक मदत.!*

*अहेरी:-* कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी हे झाडाची छाटणी करायला चढले असता पडल्याने मणक्यांमध्ये गंभीर दुखापत झाली.किष्ट व गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याने नागपुरला रुग्णालयात भरती करण्यात आले.हलाखीची परिस्थिती असल्याने ऊपचाराचा खर्च झेपणारा नव्हता.माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी कुटूंबीयांना मोठी आर्थीक मदत करुन सहारा दिला व पुढेही पुर्णपणे सहकार्य करण्याचे शब्द देवून आश्वस्त केले.कूटूंबीयांनी तसेच गावकर्‍यांनी राजे साहेबांचे मनःपुर्वक आभार मानले.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न*


 

*महाराष्ट्र राज्याचे माजी खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस मा. आ. डॉ. अविनाश बारजुकर यांची उपस्थिती*

सावली:-सावली तालुका सर्व कलार समाजाच्या वतीने उपवधू-वर परिचय मेळावा व जेष्ठ नागरीक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी राज्य मंत्री तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर प्रकाश मारकवार,विशेष अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष कलार समाज चंद्रपूर श्रीमती चित्राताई डांगे,
माजी सभापती जि.प. चंद्रपूर श्री.विनोद अहिरकर,से. नि. शिक्षक श्री. तुकारामजी बोमनवार श्री. चंदू पा. मारकवार उपसरपंच राजगड,विजय शेंडे,श्री. दिनेश पा. चिटनूरवार  श्री. दामदेवजी मंडलवार मा. पो. निरीक्षक, श्री. राजू पा. मारकवार, श्री. राधाकिसनजी एगोलपवार, श्री. नारायण गौड सिलेवार, वि. अध्यक्ष कलार समाज, श्री. विठ्ठल गौड गुरमवार, जि. अध्यक्ष कलार समाज, श्री. प्रशांत समर्थ मूल अध्यक्ष कलार समाज, श्री. निरंजन पा. वासेकर, श्री. आशिष जयस्वाल, श्री. शांत पा. चिटनूरवार, संचालक कृ. बा.स. सावली श्री. नरसिंग गणवेनवार, श्री. प्रकाश नंदाराम,श्री.अनंत चिटनूरवार,श्री.रवींद्र वासेकर, से. नि. तहसीलदार श्री. सुनील चडगूलवार,श्री.दिलीप गडपल्लीवार, व समस्त समाज बांधव उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

बाबुपेठ रेल्वे गेट जवळ धुळीचे सम्राज्य


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की कित्येक वर्षाच्या कालावधी नंतर कित्येक लोकांचे उपोषण, आंदोलन, मोर्चे व बाबुपेठ वासियांच्या प्रयत्नाने बाबुपेठ उडानपुलाचे गेल्या चार वर्षांपासून काम सुरु ते आज ही काम सुरूच आहे आणि याच कामाच्या दरम्यान तिसऱ्या रेल पटरी चे काम देखील सुरु आहे आणि याच तिसऱ्या रेल पटरी च्या कामासाठी म्हणून jcb लावून खुदाई चे काम सुरु आहे आणि खुदाई ची माती आठ ते 10 डम्पर (ट्रक ) ने ती माती महाकाली कॉलरी दिशेने रेल्वे च्या कामासाठी नेण्यात येते या दरम्यान जे आठ ते दहा डम्पर (ट्रक ) जे माती नेण्यासाठी आहेत ते रेल्वे गेट जवळील टरनिंग वर मोठया प्रमाणात धुळ निर्माण होते आणि रेल्वे गेट जे पाच पाच मिनिटांनी बंद होते आणि गेट बंद असल्यामुळे तेथे जी लोकांची अफाट गर्दी होते व तेथे जमा झालेल्या अफाट विषारी धुळी मुळे कित्येक लोकांची तबेत खराब होत या परिसरात राहणाऱ्या लोकांची व येथील व्यापारी, लहान मोठे दुकानदाची सुद्धा तबेत खराब होऊन राहिली आहे आणि लोकांच्या तबेती खराब व्हायला नको म्हणून रेल्वे गेट जवळील लोकांनी तेथील सुपरवाईजर ला कित्येकदा त्या धुळी साठी पाणी मारण्याची विनंती देखील केली परंतु त्या सुपरवाईजर ने आज उदया करून अजून ही पाणी मारून राहिला नाही आणि लोकांच्या गोष्टी कडे कानाडोळा करत आहे आणि आता तर ती संपूर्ण धूळ रोडवर आली आहे त्यामुळे अपघाताला निमंत्रण सुद्धा मिळाले आहे काही दिवसापूर्वी तर एक बाईक वरून एक तरुण व तरुणी डम्पर च्या चाकाखाली येता येता वाचले त्याची टू व्हीलर बाईक चा सायलेंसर पूर्ण तुटण्याच्या अवस्थेत झाला होता रोडवर पडणाऱ्या धुळी मुळे कित्येक लोकांच्या टू व्हीलर बाईक स्लिप होऊन लोक त्या ठिकाणी पडत आहेत पण त्या कंत्राट दाराला व त्यांच्या सुपरवाईजर काही एक लेणंदेणं राहील नाही ते आपलं काम सर्रास व जोरात करत आहेत त्यांना लोकांच्या जीवाशी काही फरक पडत नाही असच दिसून येत आहे.
या परिसरातील लोकांना तर त्या धुळीमुळे जीवावर चे झाले आहे या परिसरातील लोकांच्या घस्यात या धुळी मुळे आवाज बदलून दुखायला पण लागले आहे जर लवकरात लवकर या धुलीचा विल्हेवाट लवण्यात आले नाही तर या परिसरातील लोकांना धुळी मुळे जीव गमवावा लागेल यात शंकाच नाही.
या बातमी च्या माध्यमातून प्रशासनाला व महानगर पालिका आयुक्त साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या कंत्राटदार चे काम बंद करावे जोपर्यंत त्या रोडवरील धूळ साफ व तेथे दिवसातून तीन वेळा टँकर ने पाणी मारणार नाही तोपर्यंत व या धुळी साठी काही तरी उपाय योजना केल्या शिवाय कामाची परवानगी देऊ नये अशी या परिसरातील जनता निवेदनातून मागणी करणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दुतांचा सत्कार


आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक बांधिलकी जोपासून सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्रातील दुर्लक्षित महिला स्वच्छता दूतांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक गाढवी नदीच्या तीरावरील शिवमंदिर येथे सहृदय सत्कार केला.

 

सर्व प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समाजसेवा क्षेत्रातील अग्रणी महिला भगिणी ज्योती बगमारे,उमा कोंडापे, आशा बोळणे, स्मिता उईके, सीमा मडावी,अल्का पेटकुले,रोशनी झिमटे, लता लोणारे, स्नेहा मडावी,रोहिनी सहारे, स्नेहा बगमारे, लक्ष्मी कोडापे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमात जयमाला पिंपळकर, शशीकला सपाटे,जयश्री कांबळे,लता खेडकर, यशोदा रामटेके, निर्मला कांबळे,उषा हेमके, सिंधू नारनवरे,मिरा बेहरे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आरमोरी शहरातील स्वच्छतेचे काम करून आरमोरीकरांना निरोगी व सुदृढ आरोग्य प्रदान करणारे घटक हे नेहमी दुर्लक्षित असतात.त्यांच्यांकडे सामान्यजण हे फक्त हिणकस नजरेने पाहत असतात.स्वच्छतेचे काम झाले की त्यांच्याकडे कुणीही आस्थेने विचारपूसही करीत नाही.अशा दुर्लक्षित परंतु बहुमूल्य असणाऱ्या एक-एक महिलांची निवड सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘हिरकणी’ने म्हणजेच विभाताईने केली.आता उरला प्रश्न त्यांच्या मानसन्मानाचा!तर त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करून सर्व महिला भगिणींचा यथोचित गौरव केला.त्यावेळी 

उपस्थित सत्कारमूर्ती महिला गदगदल्या.सर्व सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले.’आमच्यासारख्या उपेक्षित, दुर्लक्षित स्वच्छता दूतांचा मानपान करून केलेला सन्मान आम्ही जिवंत असेपर्यंत विसरणार नाही.समाजसेवा करणारेही भरपूर आहेत.परंतु वंचित, दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहणारे डोळे व दातृत्वाचे हात मात्र कमी होत आहेत.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.’ सत्काररुपी मानसन्मानाने सा-या महिला गदगदून गेल्या व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

मान्यवर महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रक्षिक्षन....


गडचिरोली:-
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकां साठी जादूटोणाविरोधी कायद्याचे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण कार्यक्रम नागपुर पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .
त्यासाठी शासनाने महा.अनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांना जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना क्रमाक्रमाने प्रशिक्षण देऊन समाजात अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती करण्याचे लेखी आवाहन केले आहे . त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुर दुरच्या खेड्या पाड्यातून आलेल्या तब्बल 139 अंगणवाडी सेविकांनी सभागृह खचाखच भरलेला होता.या प्रशिक्षण कार्यक्रमा च्या अध्यक्षा बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. उज्वला ढोके या होत्या .जिल्हा विविध उपक्रम कार्यवाह चंद्रशेखर मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करुन कार्यक्रमाची शुरुवात केली. जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.देवानंद बडगे यांनी चळवळीचे 'हिच अमुची प्रार्थना' हे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली .या प्रसंगी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो कसा लागू होतो, कायद्याचे प्रावधान व त्याची कलमें कोणती  याचे सविस्तर प्रशिक्षण चित्र पोस्टर सहीत जिल्हा प्रधान सचिव डॉ प्रा सुनील भगत यांनी समजावून सांगितले.
त्यानंतर जादुटोणा चे प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण उत्तर नागपुर शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी संयुक्तपणे सादर केले ,तेव्हा अंगणवाडी सेविका अक्षरशः भारावून गेल्या होत्या. प्रत्येकांनी सदर प्रयोगा मागील खरं विज्ञान समजून घेतलं व आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा निर्धार केला. अंधश्रद्धा निर्मूलना बाबतीत उपस्थितांच्या सर्व  प्रश्नांचे निराकरण रामभाऊ डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षिका शर्मिला जाधव व त्यांची पुर्ण टीम उपस्थित होती. संचालन चित्तरंजन चौरे यांनी तर  आभार पर्यवेक्षिका तारा बोराडे यांनी मानले.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

जिल्ह्यातील कायदा व सुवस्था सुधारण्यावर भर द्या. - आमदार प्रतिभा धानोरकर


 

चंद्रपूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून महारष्ट्रात ओळखला जातो. परंतू अलिकडे सतत होत असलेल्या हत्यांमुळे नविन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करण्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृह मंत्री तथा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

 

मागील दोन महिन्यांच्या काळात विविध कारणातून जवळपास 15 जणांच्या हत्या झाल्या आहेत. यापैकी काही गुन्हे हे कौटुंबिक वादातून तर इतर गुन्हे वेगवेगळ्या कारणातून झाले आहे. कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन मधे समुपदेशन कक्ष उभारल्यास होणाऱ्या घटना टाळता येईल, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता अवैध धंद्यावर आळा बसविणे गरजेचे आहे. कारण यातूनही अनेक गुन्हे घडतांना दिसुन येत आहे. युवकांना देखील गुन्ह्यापासून दुर करण्याकरीता योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाविद्यालयीन स्तरावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून युवकांना योग्य असे मार्गदर्शन झाल्यास भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालता येईल यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी महीला सुरक्षतेच्या संदर्भाने देखील चर्चा करणार असल्याचे सांगितले.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!  


 
 
 
 
उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
 

  
  
  
  
  

 
Sugarcane Juice उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. उसाचा रस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उसाचा रस प्या. उसाचा रस रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. अनेकदा कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपण आजारांना सहज बळी पडतो. अशा परिस्थितीत उसाचा रस प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

 
 
 
 
उसाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी Sugarcane Juice तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही सर्दी आणि फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गापासून सुरक्षित राहू शकता. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होऊ लागतात, अशा वेळी उसाचा रस प्यायल्यास हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि हाडांशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

अशक्तपणा आणि सुस्ती जाणवत असताना एक ग्लास उसाचा रस प्यायल्यास फायदा होतो. कारण उसामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. वाढलेले वजन अनेक आजारांना जन्म देऊ शकते, अशा परिस्थितीत जर तुम्ही उसाचा रस प्यायल्यास त्यात असलेले फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 
 
 
हा उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

यात्रेत बंदोबस्त तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यु


चामोर्शी;- तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरता बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्याची घटना दिनांक 8 मार्च ला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरल्ली ता.मुलचेरा असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले 8 मार्च ला 4:30 वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे.मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरल्ली येथे पाठविण्यात आले आहे.मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

कुरखेडा:- अवैधरीत्या गोवंश तस्करी, पाच ट्रकसह ५७ लाखाचा मुद्देमाल जप्त


कोरची तालुक्यामधून ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशाना अमानुषपणे एकावर एक लादत तेलंगनाकडे वाहतूक करतांना सापळा रचत कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व  पथकाने कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच ट्रकसह ५७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवार ६ मार्च रोजी केली.दरम्यान ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या १४३ नग गौवंशांची सुटका केली. मात्र यातील आरोपी हे घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाले आहेत,
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा-कोरची मार्गावरून अवैधपणे गोवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहितीवरून बुधवारी रात्रो गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता. मात्र तस्कराना याची पूर्वीच कुणकुण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगानाकडे पळून‌ जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ‌ काढला. पोलिसांनी सर्व जप्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करत ट्रकमध्ये अमानुषपणे पाय बांधून एकावर एक ठेवलेले १४३ गोवंशाची सुटका करण्यातआली . यातील ४ गोवंश दगावली होती. लगेच जनावराना गोशाळेत पाठविण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गोशाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 7, 2024

PostImage

आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील प्राध्यापक डॉ. नोमेश मेश्राम यांच्या कविता संग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


गडचिरोली _
विदर्भातील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे या महाराष्ट्रातील मातब्बर प्रकाशन संस्थेतर्फे जुलै २०२३ मध्ये प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांकडून आजपावेतो उत्कृष्ट साहित्यकृती अंतर्गत १२ राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असलेले प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम हे आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला शेगाव येथील स्व.बाबुराव पेटकर काव्य सन्मान,नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,मुक्ताईनगर जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आर्वी येथील देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ जुन्नर, अॅग्रोन्यूज साहित्य संस्था फलटण,साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक संघटना ठाणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई,सूर्योदय साहित्य पुरस्कार जळगाव, डॉ.शिवाजीराव चव्हाण ग्रंथमित्र राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे महाराष्ट्रातील विविध भागातील प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्याबद्दल त्यांचे राजहंस प्रकाशन पुणे,मित्रपरिवार व अनेक साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 7, 2024

PostImage

दही खाण्याचे ' हे ' आहेत फायदे..


Health tips:-सध्याच्या काळात फिट (Health) राहणं फार गरजेचं झालं आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करून पाहतात. तुम्हाला देखील तुमच्या दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करायची आहे? तर दह्याशिवाय (Curd) चांगला पर्याय नाही. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. दही खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

 *जाणून घ्या सकाळी दही खाण्याचे फायदे* 

 *1* . दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. हे कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी 12, बी 2 पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे. हे पोषक तत्त्वे हाडांच्या आरोग्यास मजबूती देतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
 *2* . प्रोबायोटिक्स दह्यामध्ये आढळतात. हे प्रोबायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरिया आहेत जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात. हे पचनास मदत करतात आणि पोषक तत्व सुधारतात. प्रोबायोटिक युक्त दह्याने तुमचा दिवस सुरू केल्याने पचनसंस्था संतुलित राहण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

3. ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा काही इंच कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले उच्च प्रथिन घटक तुम्हाला दीर्घ काळासाठी पोट भरून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दुपारचे जेवण करण्याची इच्छा कमी होते. दिवसभर खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास प्रोत्साहन देते.

 *4* . दह्याचा वापर आहारात तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही दही साधेही खाऊ शकता किंवा ग्रॅनोला सारख्या टॉपिंगसह खाऊ शकता. दही तुमच्या चव आणि आरोग्यानुसार असंख्य फायदे देऊ शकते.

 *5* . अनेकांना व्यस्त जीवनशैलीतून सकाळचा नाश्ता करणं फारसं जमत नाही. अशा वेळी तुम्ही दही खाऊ शकता. यासाठी दह्याबरोबर वेगेवळ्या प्रकारचे टॉपिंग करून तुम्ही दही अगदी सहज खाऊ शकता. यामुळे तुमची टेस्टी रेसिपीही तयार होईल आणि तुम्ही हेल्दीही राहाल.

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन*


*छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन*

*चंद्रपूर, दि.०६*- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड-१, ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज, ‘महाराष्ट्र - गोंड समुदाय’ हे महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर यांचेही प्रकाशन या सोहळ्यामध्ये होणार आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, माँ जिजाऊ यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन झालेले आहे. याशिवाय ना. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी तत्कालीन सरकारसमोर मागणी लावून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी कार्य पूर्णत्वास येणार असल्याची भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

*राज्याभिषेक सोहळा अन् अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविले!*
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पुढाकार घेतला. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. ५ नोव्हेंबर २०२२ ला हे अतिक्रमण हटविण्यात आले. आग्रा येथील किल्ल्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात साजरी करण्यात आली. २ जून २०२३ ला रायगडावर साजरा झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. यासोबतच जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरलेल्या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले.


*आणि दांडपट्टा ‘राज्यशस्त्र’ झाले!*
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. १९ फेब्रुवारी २०२४ ला पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच घोषित केला. याशिवाय रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर आदी कल्पक कामे ना.सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने करण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित मडवेल्ली येते आगामी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा..!*


 

भामरागड : तालुक्यातील मडवेल्ली येते काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी मडवेल्ली येथील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांन सोबत आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुक बाबत चर्चा करण्यात आली आहे.

 

त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले की"आविसं काँग्रेस पक्षा सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मडवेल्लीसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी आविसं काँग्रेस पक्षा कटिबद्ध आहे.

 

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा - विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी आविसं काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.तसेच त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.

 

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,भामरागड तालुका काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मीकांत बोगामि,आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,भामरागड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्षा राजू वड्डे,मेडपली ग्रापसरपंच निलेश वेलादी,कोठारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सडमेक भाऊ,मडवेली ग्रापसरपंच मलेश तलांडे,उपसरपंच परमेश मडावी,ग्रामपंचायत सदस्य कुसुम वेलादी,ग्रामपंचायत सदस्य महेश मडावी,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,सामाजिक कार्यकर्ते चिनू सडमेक,सामाजिक कार्यकर्ते दिनेश जुमडे,पोलीस पाटील रावजी येरमा,बिरजू तेलामी,श्रीहरी मडावी,सामाजिक कार्यकर्ते शामराव सडमेक,धीरज वेलादी,काशिनाथ मडावी,संदिप वेलादी,साईनाथ इष्टाम,सागर वेलादी,चंद्रकांत मडावी,विश्वनाथ सोयांम,अजय वेलादी,देवाजी मडावी,ताणू सोयाम,शिवलाल सोयाम,दोलत मडावी,दसरथ मडावी,देसू सडमेक,बाजीराव सडमेक,प्रदीप तलांडे,विजय सडमेक,विशाल सोयाम,श्रीनिवास वेलादी,भास्कर सडमेकसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार असल्याचा दावा अमेठी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे. नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी बुधवारी सांगितलं की, राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील, यासंबंधित घोषणा लवकरच केली जाईल.

प्रदीप सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडण्याची तयारी केली आहे. राहुल गांधी 2002 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राहुल गांधी सध्या केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. शाजापूरमध्ये राहुल गांधी म्हणाले की," पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत ​​असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे."

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"

"कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षांनंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती?" असा सवाल देखील विचारला आहे.  शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ." मध्य प्रदेशात राहुल गांधी म्हणाले आहेत की, "देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील सुमारे 90% लोक आहेत."

"गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले”

"देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात तुम्हाला ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील एकही व्यक्ती सापडणार नाही. हा सामाजिक अन्याय आहे, जो देशातील जवळपास प्रत्येक संस्थेत होत आहे. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. परीक्षेचा पेपर फुटतो. म्हणजे आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत."


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

*प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार*


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील गोल्डन सी.सी.क्रिकेट क्लब संड्रा द्वारे ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची उदघाटन काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समीर सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन करतांना अजयभाऊ मानले की'आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी - नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे - उपसरपंच शानगोंडावार कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक कंत्राटदार विशाल रापेल्लीवार - कंत्राटदार महादेव लंगारी कडून देण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने फटाकेची अतिशय बाजी करत जंगी स्वागत केली.उदघाटन संपलेवार येथील नागरिकांची संवाद साधात येथील समस्या जाणून घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.सहउदघाटक म्हणून नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे होते.कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच रमेश शानगोंडावार - सामाजिक कार्यकर्ते पोशालू चौधरी - ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे - सदस्य मंजुषा गावडे होते.

यावेळी अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,विशाल रापेल्लीवार,लक्ष्मण कोडापे,रमेश शानगोंडावार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गुलाबराव सोयाम,राकेश कुळमेथे,बि.जी.गावडे सर,पोशालू चौधरी,अशोक गावडे,चिन्ना गावडे,सुदेव पेंदाम,विनोद सडमेक,विनोद येरमा,गणपती गावडे,अंजना पेंदाम,मंजुषा गावडे,बीमनपल्लीवार सर,पास्पूनुरवार वनरक्षक व्येकाटरावपेठा,बंदेला सर,कुमरे वनरक्षक इंदाराम,दोतरे वनरक्षक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 5, 2024

PostImage

नोकरीच्या मुलाखतीत घालण्यासाठी सर्वोत्तम पोशाख कोणता आहे?


नोकरीच्या मुलाखतीत घालण्यासाठी सर्वोत्तम पोशाख कोणता आहे?

तुम्ही ज्या नोकरी आणि कंपनीची मुलाखत घेत आहात त्यानुसार उत्तर बदलू शकते.

 

तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम छाप पाडण्यासाठी पोशाख करणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही निवडलेला पोशाख तुम्ही औपचारिक ड्रेस कोड असलेल्या कंपनीमध्ये मुलाखत घेत आहात, कॅज्युअल स्टार्ट-अप किंवा तात्पुरती नोकरी करत आहात यावर अवलंबून असते.

योग्य कपडे घालणे महत्त्वाचे आहे, कारण मुलाखत घेणारा पहिला निर्णय तुम्ही कसा दिसतो आणि तुम्ही काय परिधान करता यावर आधारित असेल.

समजा तुम्ही अशा कंपनीत मुलाखतीला जात आहात जिथे कोणीही सूट घालत नाही – अगदी CEO देखील नाही.

आपण अद्याप या प्रसंगी औपचारिकपणे कपडे घालावे, किंवा आपण जागेच्या बाहेर पहाल?

आणि जर तुम्ही अधिक कॅज्युअल लूकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही अजूनही व्यावसायिक आणि आदरणीय दिसत आहात याची खात्री कशी कराल?

व्यावसायिक / व्यवसाय मुलाखत पोशाख

सामान्यतः, नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला व्यावसायिक किंवा व्यावसायिक पोशाख घालण्याची आवश्यकता असते.

तुम्ही तुमच्या आउटफिटमध्ये काही आधुनिक स्टाईल ट्रेंड देखील समाविष्ट करू शकता.

मुलाखतीचा पोशाख निवडताना तुम्ही रंगाचा विचार केला पाहिजे आणि कामावर घेणाऱ्या व्यवस्थापकाचे लक्ष विचलित करणारी कोणतीही गोष्ट खूप चमकदार किंवा चमकदार परिधान करणे टाळावे.

जेव्हा शंका असेल तेव्हा थोडे कपडे घाला

ड्रेस कोड बदलतात.

उदाहरणार्थ, एक टेक स्टार्ट-अप अशा एखाद्या व्यक्तीला घाबरवू शकते जो खूप औपचारिक कपडे घालतो, तर फॉर्च्यून 500 कंपनी अशा एखाद्या व्यक्तीला घाबरवू शकते जो खूप अनौपचारिक कपडे घालतो.

तुमचा पोशाख योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी कॉर्पोरेट संस्कृतीची जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे.

तथापि, कंपनीतील इतर सर्वांनी काय परिधान केले आहे याची पर्वा न करता, नोकरीच्या मुलाखतीदरम्यान आपल्या देखाव्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. छान साधा शर्ट आणि टाय घातलेला माणूस, किंवा छान पोशाख आणि कमी टाच घातलेली मुलगी, जीन्स आणि फ्लिप-फ्लॉप घातलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक चांगली छाप पाडेल.

कोणत्याही परिस्थितीत, स्वच्छ, अविच्छिन्न कपड्यांसह सुसज्ज असणे नेहमीच आवश्यक असते.

पुरुषांच्या मुलाखतीचा पोशाख

कॉर्पोरेट जगतातील पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट मुलाखत पोशाख हे पुराणमतवादी असतात. पुरुषांनी नेहमी नीटनेटके, तयार केलेला शर्ट आणि पँट परिधान करणे आवश्यक आहे. सर्व कपडे चांगले बसले पाहिजेत आणि डागांपासून मुक्त असावेत. लक्षात घेण्यासारख्या इतर गोष्टी आहेत,

नेव्ही, काळा किंवा गडद राखाडी किंवा तपकिरी यासारख्या ठोस रंगांना कॉर्पोरेट पसंती देतात
पांढरा किंवा साधा रंगाचा लांब बाही असलेला शर्ट आणि जुळणारी पँट
फॉर्मल लेदर बेल्ट आणि एक टाय जो खूप मजेदार नाही
गडद मोजे आणि पुराणमतवादी लेदर शूज
थोडे किंवा नाही दागिने
एक औपचारिक घड्याळ
व्यवस्थित, व्यावसायिक केशरचना
आफ्टरशेव्हची मर्यादित रक्कम - जबरदस्त परफ्यूम नाहीत
सुबकपणे सुव्यवस्थित नखे
पोर्टफोलिओ
शक्य असल्यास, तुमचे टॅटू झाकून टाका – असल्यास
महिलांच्या मुलाखतीचा पोशाख

सर्वसाधारणपणे, कॉर्पोरेट नोकऱ्यांमधील महिलांसाठी मुलाखतीची फॅशन पुरुषांपेक्षा अधिक क्लिष्ट आणि वैविध्यपूर्ण असते.

वाढलेल्या पर्यायांमुळे मुलाखतीचा पोशाख एकत्र करणे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी थोडे अधिक आव्हानात्मक बनते.
महिलांनीही मुलाखतीच्या सामानाचा विचार करून योग्य पर्स निवडणे आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट इंटरव्ह्यू बॅग अशा आहेत ज्या व्यावसायिक आहेत आणि रेझ्युमे बसवण्याइतपत मोठ्या आहेत परंतु चमकदार नसतात.

व्यावसायिक मुलाखतीसाठी महिलांनी काय परिधान करावे याचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स येथे आहेत:

एक व्यवस्थित फिट ड्रेस जो खूप ट्रेंडी किंवा चमकदार नाही
कंझर्व्हेटिव्ह शूज नाहीत किंवा कमी टाच
अत्यंत मर्यादित दागिने
एक औपचारिक घड्याळ
व्यावसायिक केशरचना
हलका मेकअप आणि मर्यादित प्रमाणात परफ्यूम
स्वच्छ, सुबकपणे मॅनिक्युअर केलेले नखे
पोर्टफोलिओ
शक्य असल्यास, तुमचे टॅटू झाकून टाका – असल्यास
मुलाखतीला काय आणायचे?

आदल्या रात्री तुमच्या मुलाखतीसाठी तयार होण्याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्यासोबत काय आणायचे आहे ते देखील गोळा करा:

मुलाखतीचे ठिकाण/दिशानिर्देश
तुम्ही भेटत असलेल्या व्यक्तीचे संपर्क नाव आणि नंबर
तुमची ओळख
नोटपॅड आणि पेन
तुमच्या रेझ्युमेच्या अतिरिक्त प्रती
संदर्भांची यादी (विचारल्यासच द्या)
तुमचे काम दाखवण्यासाठी लॅपटॉप किंवा टॅबलेट (नोकरीवर अवलंबून)
इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी वापरण्यासाठी ब्रेथ मिंट्स तुमच्यासोबत ठेवा
तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणू शकता परंतु तुमच्या मुलाखतीदरम्यान तो निःशब्द आहे आणि कॅमेरा-लेन्स झाकलेला असल्याची खात्री करा. हे विचलित करणारा मोठा मजकूर अलर्ट किंवा मुलाखतीच्या मध्यावर फोन कॉल होण्याचा धोका टाळते.

मुलाखतीला काय आणू नये

नोकरीच्या मुलाखतीत तुम्ही काही गोष्टी आणू नयेत:

चघळण्याची गोळी
कॉफी किंवा सोडा
जर तुम्ही भरपूर दागिने घालत असाल तर त्यातील काही दागिने घरी ठेवण्याचा विचार करा (फक्त कानातले हा एक चांगला नियम आहे)

 

 

महत्वाचे मुद्दे

 

.तुमची मुलाखत घेण्यापूर्वी कॉर्पोरेट संस्कृती जाणून घ्या:

पारंपारिक उद्योग अधिक कॉर्पोरेट पोशाखांची मागणी करतात, तर स्टार्ट-अप्सना कॅज्युअल आरामदायक वाटू शकतात.

 

.ते स्वच्छ आणि दाबून ठेवा:

तुम्ही काहीही परिधान केले तरी ते नवीन किंवा चांगले दिसते याची खात्री करा. घट्ट फिट, जिम किंवा स्पोर्ट्सवेअर वगळा.

 

.तुमच्या ग्रूमिंगकडे लक्ष द्या:

तुमचे केस व्यवस्थित ठेवा आणि कोणत्याही ॲक्सेसरीज किंवा मेकअपला कमी लेखा.

 

लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या टॅलेंटला चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहात:

मुलाखतकाराने तुमची कौशल्ये आणि अनुभव लक्षात ठेवावे, तुमचा पोशाख नाही.