नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
28-06-2024
संस्थाचालक ,शासन व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांचे शोषण करु नये -- प्रोटानची मागणी
गडचिरोली:-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची शाखा प्रोटानच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना कर्मचाऱ्यांवरील होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील अनेक संस्थाचालक संविधानिक मार्गाने संस्था न चालविता शासकीय नियमांचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारे छळ करतात . त्यांचे आर्थिक ,मानसिक, शारीरिक शोषण करतात . यामध्ये कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन करणे , कमी वेतनात जास्त काळ राबवून घेणे , नोकरीतून काढून देणे , नोकरीतून काढून देणे अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशत निर्माण करतात.
संस्थाचालक नेमणूक पत्र न देता अनेक वर्षे अतिशय तुटपुंज्या पगारावर राबवून घेतात . पूर्वसूचना न देता बेकायदेशीर पद्धतीने बडतर्फ करतात .अपमानास्पद वागणूक व अशैक्षणिक कामे करून घेतात. दीर्घकालीन सुट्ट्या दिल्या जात नाही .मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करतात. त्यामुळे अशा संस्थाचालकावर कारवाई करावी व त्यांच्या शाळांची मान्यता रद्द करावे.
या निवेदनात अनेक मागण्या मांडण्यात आले आहेत . महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील २००५ नंतर व केंद्र शासनाच्या एक जानेवारी २००४ नंतरच्या सरकारी , निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावे .नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे खाजगीकरण व उदारीकरणावर आधारित असून बहुजन समाजाला गुलाम करणाऱ्या आहेत . त्यामुळे हे धोरण महाराष्ट्रात लागू करू नये .नवीन चार काळे कायदे हे भांडवलदारांच्या हिताचे आहेत .त्यामुळे हे कायदे लागू करू नये . २००१ पूर्वीच्या ७८ महाविद्यालयांना अनुदान द्यावे. कर्मचारी भरती शंभर टक्के करावे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावर नेमणूक करावे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रम हा नवीन शैक्षणिक धोरणात लागू करू नये.
या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चार चरणात चरणबद्ध आंदोलन करण्यात येईल .निवेदन देतेवेळी बामसेफचे पूर्व विदर्भ प्रभारी प्रमोद बांबोळे ,प्रोटांचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू, सचिव नरेश बांबोळे ,बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अशोक वंजारी ,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन ताकसांडे इत्यादी उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments