समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
09-03-2024
कोरची तालुक्यामधून ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशाना अमानुषपणे एकावर एक लादत तेलंगनाकडे वाहतूक करतांना सापळा रचत कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पथकाने कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच ट्रकसह ५७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवार ६ मार्च रोजी केली.दरम्यान ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या १४३ नग गौवंशांची सुटका केली. मात्र यातील आरोपी हे घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाले आहेत,
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा-कोरची मार्गावरून अवैधपणे गोवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहितीवरून बुधवारी रात्रो गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता. मात्र तस्कराना याची पूर्वीच कुणकुण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगानाकडे पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ काढला. पोलिसांनी सर्व जप्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करत ट्रकमध्ये अमानुषपणे पाय बांधून एकावर एक ठेवलेले १४३ गोवंशाची सुटका करण्यातआली . यातील ४ गोवंश दगावली होती. लगेच जनावराना गोशाळेत पाठविण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गोशाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments