ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
29-10-2024
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्ष तसेच मतदान केद्रांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी 68-गडचिरोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, उपविभागीय अधिकारी चामोर्शी तथा सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संजय भांडारकर व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणुक निरीक्षक श्री कटारा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली.
श्री कटारा यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच मतदारांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मीना आणि सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments