बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
26-06-2024
गडचिरोली -- जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले की , मुस्लिमांवरील होणारे माबलींचींग व हत्या त्वरित थांबवण्यात यावे .अन्यथा भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला. मागील दहा वर्षापासून मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत . कधी माबलिंचींच्या नावावर , कधी गोहत्या च्या नावावर , कधी लव-जिहादच्या नावावर तर कधी पोलीस कष्टडी मध्ये तर कधी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून हत्या केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी त्यांची दुकाने, मकाने तर कधी त्यांच्या वस्तीमधून बुलडोजर चालविले जात आहे . 19जून ला उत्तर प्रदेशात प्रदेशातील अलिगड येथील मोहम्मद फरीद वय 35 वर्षे याला रात्री दहा वाजता रस्त्यात पकडून हत्या करण्यात आली .7 जूनला रायपूर येथील गुड्डू खान ,चांद खान, सय्यद कुरेशी यांची गोरक्षक हत्या च्या नावावर हत्या करण्यात आली .8 जूनला उत्तर प्रदेश मध्ये सोनपूर गावातील मौलाना फारुख यांची हत्या करण्यात आली .अशाप्रकारे भारतभर अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या हत्या करण्यात येत आहे. हे त्वरित थांबवण्यात यावे. असे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे कळविण्यात आले. दोषींवर फास्टट्रॅक कोर्ट मध्ये मुकदमा चालवण्यात यावे . दोषींना फाशी किंवा आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात यावी. पिडीत कुटुंबांना प्रत्येकी एक करोड रुपये व नोकरी देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. अशा विविध मागण्या मागण्यात आल्या . या मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले.
निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , पुर्व विदर्भ प्रभारी प्रमोद बांबोळे ,एमएन टीव्ही चे प्रमोद राऊत , आरएमबीकेएसचे
प्राध्यापक अशोक वंजारी , प्रोटानचे नरेश बांबोळे , बामसेफचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू , बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम उपस्थित होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments