CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
19-03-2024
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला
दोन डीव्हीसिएम (Divisional Commitee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस
गडचिरोल्ली;-दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. याच निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आलेले आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व 05 कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 04 पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. त्यांची प्राथमिक ओळख पटविली असता, 1) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय 28 वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती 2) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय 32 वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती 3) कुरसंग राजू, प्लाटून सदस्य 4) कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य अशी नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण 36 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. यासोबतच घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 02 नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.
सदर अभियान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा., मा. पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. जगदीश मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. रमेश सा. व पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments