बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
14-07-2024
गडचिरोली- आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य स्थानिक बिरसा मुंडा चौकात वृक्षारोपण व वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना फळवाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने वृद्धाश्रमातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके यांनी संस्थेस दिले. याप्रसंगी समितीचे सचिव प्रदिप कुलसंगे, माजी जिप सदस्य कुसुम अलाम, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, एम्प्लॉईज फेडरेशन चे रुषी होळी सर, समितीचे सल्लागार मुकूंदा मेश्राम सर, वृद्धाश्रमाचे लिपीक लोणारे साहेब, प्रा. किरकीरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री मुकुंदा सर यांनी वृद्धाश्रमास १००० रु देणगी स्वरूपात दिले. यानंतर समितीच्या वतीने पेसा भरतीमधील युवकांची पेसा भरती संदर्भात बैठक घेण्यात आली. पेसा भरतीतील युवकांची बैठक घेऊन रडखडलेली पेसा भरती कशा प्रकारे सुरू करण्यात येईल यासंदर्भात मा. धिरज मडावी सर, मा. सदानंद ताराम सर यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. व पेसा भरती व रडखडलेली पदभरती संदर्भात आंदोलनात्मक भुमिका घेण्याची भुमिका ठरवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समितीचे कार्याध्यक्ष संजय मसराम, सुरज मडावी, स्वप्नील मडावी, मयुर कोडापे, बादल मडावी, अक्षय वाढई, सुमित कुमरे, स्वप्नील मडावी, प्रफुल कोडाप, संजय भोयर, डेव्हिड पेंदाम, कृपाली दुर्वा, नुतन वड्डे, सुनिता उसेंडी, समिर उसेंडी, खुशाल हुर्रा, गिरीश उईके, आदि युवक युवतीं उपस्थित होते,
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments