संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
17-07-2024
अहेरी :- शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी मा. डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत निवेदनातून केली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या शा आश्राम शाळेतील मुले मुलीचे वस्तीगृह अहेरी आलापल्ली हे मुलचेरा सिरोंचा, भामरागड, एटापल्ली अहेरी या मार्गाच्या मध्यभागी असून उच्च शिक्षण घेण्यातील
पाचही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी येथे येत असतात.
परंतू शा. आदिवासी वस्तीगृह इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत वस्तीगृह उर्वरित ५०% जागेसाठी बि.ए बि.कॉम बि.एस.सी २ ते ३ एम.ए. साठी प्रवेश देवून ५०% कोटा पूर्ण करतात.
बि.एड व एम.ए. साठी सर्वाधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशित असून सुद्धा वस्तीगृहाला प्रवेश मिळत नाही तसेच आदिवासी विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या शासकीय आश्रमशाळा अनुदाणित आश्रम शाळा एकलव्य आश्रम शाळा नामांकीत शाळा १ ते १२ पर्यंत असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रवेश देवून उच्च शिक्षण घेण्याच्या बि.ए., बि.कॉम, बि.एस.सी. एम.ए. बि.एड शिक्षण घेण्या-या विद्यार्थाना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.
या पाचही तालुक्यामध्ये अहेरीला एकमेव बि.एड महाविद्यालय असून १० ते १५ वर्षात एकही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाही.
तसे दिनदयाल उपाध्यय स्वयम योजना तालुक्याच्या ठिकाणी लागु होत नाही म्हणून लाभ देत नसल्याने या भागातील नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, डोंगर-दऱ्यात राहणारे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित विकासापासून कोसो दूर जात आहेत.
त्यामुळे या भागातील आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ८ ते १२ च्या विद्यार्थाच्या प्रवेश प्रक्रिया राबवून किंवा वस्तीगृहात प्रवेश क्षमता वाढवून बि.ए. बि.कॉम, बि.एस.सी, एम.ए. बि.एड करण्या-या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकिया पूर्ण करून तात्काळ प्रवेश देण्यात यावी अन्यथा प्रकल्प कार्यालय अहेरी समोर धरणे आंदोलण करण्यात येईल.
असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments