RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
14-07-2024
गडचिरोली:-सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती मैदानी चाचणी करिता येणाऱ्या दुर्गम भागातील उमेदवारांना निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिनांक १८जून ते १३ जुलै पर्यंत प्रति दिन ७० ते ८० असे एकूण १६५० विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. सृष्टी सेलिब्रेशन हॉल सेमाना रोड नवेगाव या ठिकाणी सदर सेवा संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली. या सेवाकार्याला सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव यांनी हॉल उपलब्ध करून देऊन मुला -मुलींची निवास व्यवस्था केली होती.
यासोबतच एक वेळच्या जेवणाकरिता सुरज कोडापे यांनी विशेष प्रयत्न केले महेंद्रजी ब्राह्मणवाडे ,डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री लीलाधर भरडकर डॉक्टर कोवे यांनी यात सहकार्य केले .
सुरज कोडापे यांनी अनेकांशी समन्वय साधून प्रत्येक संध्याकाळी उमेदवारांना भरती विषयीक आवश्यक मार्गदर्शन करून सर्वांचे मनोधैर्य वाढवून स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचे सूत्र सांगितले.
कोडापे यांची पोलिस विभागात PSI या पदावर निवड झालेली आहे, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या सेवा कार्यात संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच इतर सामाजिक संघटनांनी पाठबळ दिले. त्याचप्रमाणे अजब गजब फुडीज चे संचालक सतिश भाऊ , लक्षवेध अकॅडमी संचालक राजीव सर, उमेश उईके, कुणाल कोवे , वनिशाम येरमे, भरत येरमे, अमरसिंग गेडाम, मुकुंदा मेश्राम सुरेश बारसागडे , पुंडलिक शेंडे, जालिंदर भोयर, अमृत किनेकार ,रेवनाथ निकुरे यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले तर सतीश कुसराम यांनी उमेदवारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सहकार्य केले..
या सेवा कार्याकरिता आर्थिक सहकार्य देणाऱ्या तसेच या सेवाकार्यात प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
दिनांक 28 जुलै 2024 ला गडचिरोली येथे होणाऱ्या पोलीस भरती लेखी चाचणी करिता दुर्गम भागातून येणाऱ्या उमेदवारांकरिता एक दिवस निवासाची व भोजनाची मोफत सेवा देण्यात येईल.
यापुढेही वरील दुर्गम भागातून कार्यालयीन काम करिता व शालेय कामाकरिता येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना एक दिवसीय निवास व भोजनाची मोफत सेवा देण्याचा व अशा प्रकारचे उपक्रम निरंतर राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.. संपर्क क्रमांक- ज्योती मॅडम ९४०५८७२३९७ दुर्गे सर ९७६६५८३१६१, सतीश सर ७४९८४५२०७९.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments