संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
25-10-2024
अहेरी विधानसभा क्षेत्राची भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे संपन्न....
अहेरी दि.२५ आक्टोंबर:- भाजपा -शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच अहेरी विधानसभा क्षेत्रातुन महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यानिमित्तानेे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख उपस्थितीत तसेच अहेरी या विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे सन्मानित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या भव्य महायुतीच्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असतांना अनेक विकासाभिमुख कामे करत नागरिक जनतेपर्यंत अनेक योजना आमलात आणुन विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन काम केले.याबरोबरच महिला भगिनींच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महिलांसाठी आणली.असे अनेक योजना लोकोपयोगी सरकार राबवित आहे.
पुढे बोलतांना मागील दहा वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केलेली आहे.जसे रेल्वे वडसा गडचिरोली तसेच रेल्वेचे जिल्ह्यात ब्रॉडगेज सर्व्हे लाईन मंजुर,चिचडोह, कोटगल बँरेजेस,मेडिकल काँलेज,कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प,कोनसरी प्रकल्प तसेच साडे चौदा हजार कोटीचे विविध रस्त्यांची कामे असे अनेक विकासात्मक कामे केले् आहेत,ऐवढे विकासकामे करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यात आपण कमी पडलोय का? यांची खंत व्यक्त करत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले. पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल.
असे विस्तृत व सविस्तर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामावर महायुतीचेच सरकार येईल.असा विश्वास व्यक्त करतोय. अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा निवडून आणण्यात विजयाचा संकल्प करावे.असे प्रतिपादन या बैठकीच्या महामेळाव्याला मा.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मराव बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओल्लालवार,मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, राष्ट्रवादीचे नेते रियाजभाई शेख, हर्षवर्धन राव आत्राम, राष्ट्रवादी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,राष्ट्रवादीचे नेते रिंकुभाऊ पापडकर, तालुकाध्यक्ष अर्जुनजी आलाम,युवा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार, विजयभाऊ नर्लावार, बाबुराव गंफावार, विनोदभाऊ आकनपल्लीवार, सुनील विश्वास,सागरभाऊ डेकाटे, शिवसेनेचे नेत्या पौर्णिमा ईटॅाम्, अंकुश मंडल, तसेच महायुतीचे सन्मानित मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments