ProfileImage
128

Post

5

Followers

0

Following

PostImage

pramod abhiman raut

Feb. 16, 2024

PostImage

Gramsabha News ; ग्रामपंचायत बोरगाव (शिवणफळ) येथील बचत गटातील महिलांनी ग्रामसभेत घेतले विविध ठराव 


चिमूर प्रतिनिधी :-

       ग्रामपंचायत बोरगाव (शिवणफळ) अंतर्गत असलेल्या सिंदोळा गावात महिलांनी ग्रामसभा आयोजित केली सदर  ग्रामसभेत गटग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावातील घटस्फोटीत, विधवा, परितक्ता, प्रोढकुमारी यांची ऐकल म्हणून ग्रामपंचायतने स्वतंत्र नोंद वेगळ्या प्रोसेडींग बुकवर करावी तसेच ऐकल महिलाना ग्रामपंचायत हद्दीत व शालेय पोषण आहारामध्ये असणाऱ्या जागांसाठी ऐकल महिलांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी ग्रामसभेत निवेदन देवून करण्यात आली आहे.
        यावेळी सदर ग्रामसभेला गटग्रामपंचायत बोरगाव (शि) चे सरपंच संतराज खुळसंगे, उपसरपंच अ‌मिल झाडे, ग्रामसेवक रमेश एकूडे, ग्रामपंचायात सदस्य संगिता चौधरी, ताडू उपरे, उषा खडसंग, अशोक खंगार तसेच गावातील महिला बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा स्वयसेविका, आशा सुरेश मडावी, माजी ग्रा.प. सदस्य दिलीप कोंगरे, शाळा समितीचे अध्यक्ष कुंदा कचरू मडावी आदी गावातील मंडळी पुरुष व महीला मोठया प्रमाणात उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Feb. 14, 2024

PostImage

Sports News ; राज्यस्तरीय  टेनिस क्रिकेट १४ आतील मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सातारा संघ विजेता


द्वितीय क्रमांक पालघर  जिल्हा तृतीय क्रमांक  पिपरी चिचवड  

 चिमूर प्रतिनिधी :-

              टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 थि  सबज्युनिअर  टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा . नाशिक यथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये  प्रथम क्रमांक सातारा
 दुतिय क्रमांक पालघर जिल्हा तृतीय क्रमांक पिपरी चिचवड तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक नाशिक, द्वितीय क्रमांक धारासिव,तृतीय क्रमांक मूबंई व आहमदनगर संघयांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत    या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, महेश मिश्रा, विलास गिरी, परभणी जिल्हा  सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार  कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर  सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे, सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख  औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद सर अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप धाराशिव रिप्रेझेंटिव्ह इंद्रजीत वाले व जिल्हा सचिव, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होत, महाराष्ट्र राज्य  टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी  यांनी खेळाडूंना  टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. 
                4 राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मैदानावर  येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 24 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना सातारा विरुद्ध पालघर जिल्हा यांच्या झाला . सातारा संघाने विजयश्री मिळवला तर पालघर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तसेच पिंपरी चिंचवड संघाला तिसरा क्रमांक 
 मिळाला व  मुलींमध्ये पहिला क्रमांक नासिक , दुसरा क्रमांक धाराशिव तिसरा क्रमांक मुंबई यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज  मॅन ऑफ द सिरीज मिळवल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल  महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी, स्वप्निल ठोंबरे, महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड   योगिता महाजन यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच. सन्मानचिन्ह, गौरवपदक,  मानाचा फेटा असे स्वरूप होते मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्तेबक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून. संदीप पाटील, धनश्री गिरी लखन देशमुख, श्रीपाद, अर्जुन, सोमनगवडा बिरादार, मोहित ओके, प्रीत केन सागर मोरे, धनंजय लोखंडे, सुनील मोरय यांनी काम बघितले.


PostImage

pramod abhiman raut

Jan. 25, 2024

PostImage

Taigr Attac ; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार


चिमूर प्रतिनिधि :-

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निमढेला गेट जवळ एका शेतकऱ्यावर वाघाचे हल्ला केला असून जागेवरच ठार केले.. अशी माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर बातमी काही वेळातच 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

(फोटो :- संग्रहित छायाचित्र)


PostImage

pramod abhiman raut

Jan. 23, 2024

PostImage

Taiger Death Tadoba ; वाघांच्या झुंजीत दोन वाघांचा मृत्यु ; ताडोबा अभयारण्यातील घटना


 

चिमूर प्रतिनिधी :-

         सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी कोळसा वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र संगम, उपक्षेत्र झरी कक्ष क्र. 338 पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षकास गस्ती दरम्यान दोन वाघांचे मृतदेह आढळुन आले. एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुस-या वाघाने अंशता मांस भंक्षण केलेले दिसले. पूर्णपणे शाबुत असलेला वाघ हा टी 142 नर असुन अदाजे वय 6-7 वर्षे आहे. कमी वयाचा दुसरा वाघ हा T-92 या वाघीणीचा मादी बच्चा आहे, अंदाजे वय 2 वर्षे आहे.
         दिनांक 20/01/2024 ते दिनांक 21/01/2024 चे रात्री झालेल्या वाघाच्या झुंजीत सदरील दोन वाघांचा मृत्यु झाल्याचा कयास आहे. परिसराची कॅमेरा ट्रॅपच्या द्वारे अधीक माहिती गोळा करण्यात येत आहे. यावेळी वाघाचे मृतदेह टी टी सी चंद्रपुर येथे पाठविले आहे. दिनांक 23/01/2024 रोजी सकाळी टी टी सी चंद्रपुर शवविच्छेदना दरम्यान मृत्युचे नेमके कारण काय त्यांचा अंदाज येईल नमुने डी एन ए चाचणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.
        मौका पंचनामा करते वेळी नंदकिशोर काळे उपसंचालक (कोर), वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), कोळसा, रुदंन कातकर व बंडु धोतरे, एन टी सी ए प्रतिनिधी व डब्लू पी एस आय चे मुकेश भांदककर, वन्यजीव संशोधक क्रीष्णन डब्लु आय आय, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी खोब्रागडे व जीवशास्त्रज्ञ यशस्वी राव व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Jan. 7, 2024

PostImage

Chandrapur News ; श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवनिमित्त धनराज मुंगले यांची उपस्थिती 


 

चिमूर प्रतिनिधी :-

        ७ जानेवारी रोज रविवार ला चंद्रपूर येथे तेली युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव तसेच वर वधू परिचय मेळावा , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री . धनराज भाऊ मुंगले केंद्रीय उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज तथा प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी.
          याप्रसंगी उपस्थित मान्यवर श्री . किशोर भाऊ जोरगेवार  आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, श्री रघुनाथ जी शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, श्री देवराव भांडेकर माजी आमदार, श्री बबनराव फंड ज्येष्ठ नेते तेली समाज ,श्री सूर्यकांत जी खनके अध्यक्ष तेली युवक मंडळ चंद्रपूर जिल्हा ,श्री अनिल घुमरे शहर अभियंता , सौ .मीनाक्षीताई गुजरकर महिला अध्यक्ष , श्री गंगाधर कोकापडकर महासचिव तेली समाज महासंघ श्री विश्वास झाडे उपाध्यक्ष  शेकडो समाज बांधव व समाजातील प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Jan. 7, 2024

PostImage

Woman killed in tiger attack ; वाघाच्या हल्ल्यात महीला ठार 


चिमूर प्रतिनिधी :-

         सकाळच्या सुमारास शेतात काम करीतअ सताना अचानकपणे वाघाने हल्ला करून एका 50 वर्षीय महिलेला ठार केल्याची घटना 7 जानेवारी रोजी अहेरी तालुक्यात घडली आहे. सुषमा देवदास मंडल रा. चिंतलपेठ ता. अहेरी, असे महिलेचे नाव असल्याचे कळते. घटनेच्या दिवशी सदर महिला शेतात कापूस वेचणी करताना अचानकपणे वाघाने तिच्यावर हल्ल करून ठार केले आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून महिलेच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी टिमसह घटनास्थळ गाठला.

         मुलचेरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाने दहशत माजवली असून पाळीव जनावरांवर हल्ले चढवत असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी कोठारी ते कोपर अल्ली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते. आता चिंतलपेठ येथे वाघाने महिलेला ठार केल्याची घटना समोर आली असून वनविभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त


PostImage

pramod abhiman raut

Jan. 6, 2024

PostImage

1256 Recruitment of Forest Guards cleared ; १२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा


 

  सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झालेली पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
 शासनाचा मोठा निर्णय

चिमूर प्रतिनिधी :-

          वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. 

           एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टिसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्याने प्रयत्नरत होते. वनमंत्र्यांच्या या सततच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

             ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख ९५ हजार ७६८ परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख ७१ हजार ८३८ परीक्षार्थी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएच आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची २५ कि.मी. आणि १६ कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया दि.१७ जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार १५ दिवस ते ४४ दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात ४४ दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात ४० दिवसात तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी २० दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे.  शासनाच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवा उमेदवारांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Jan. 5, 2024

PostImage

Tennis Cricket ; सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाल्या संपन्न


 

चिमूर प्रतिनिधी :-

       जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे सम्पन झाले  14 ,17 ,19 वर्ष  मुले-  मुलींच्या एकूण सर्व गटातून 57 संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, कार्याध्यक्ष - परवेज गडीकर ,उपाध्यक्ष - अझहर शेख , सचिव-  विजय बिराजदार ,खजिनदार - स्वप्नील सुर्वे पंच म्हणून सोमु बिरादार ,सागर मोरे, सुमित जगदने ,ऐश्वर्या कर्जवाड, प्रियांका मातगी ,राजमा तांबोळी , साक्षी अभंगे हे सर्व मान्यवर उपस्तीत होते जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अत्यंत नेटक्या नियोजन मध्ये सम्पन झाले  या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमचे आधारस्तंभ अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन चे संस्थापक कन्हैया गुजर सर व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मॅडम यांचे प्रेरणा मिळाले व महाराष्ट्र टेक्निकल कमिटीचे स्वप्नील सर,महेश मिश्रा ,धनश्री गिरी ,गणेश भालेराव,संदीप पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले

14 वर्ष मुलांच्या गटामध्ये प्रकाश पब्लिक स्कुल स्कुल इस्लामपूर संघाने प्रथम क्रमांक मिळवला 

14 वर्ष वयोगट मुलींच्या गटामध्ये एम व्ही हायस्कुल उमदी ता जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला

17 वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कुल जत ने प्रथम क्रमांक मिळवला 

17 वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत लायन्स स्कुल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला 

19 वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत यशवंतराव हायकुल देवराष्ट्रे ता कडेगाव या संघाने प्रथम क्रमांक मिळवला 

19 वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायकुल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला 

वरील सर्व संघाचे सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे या सर्व संघाचे संघ मार्गदर्शक व खेळाडू यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्व स्पर्धा संघटनेचे सचिव विजय बिराजदार यांनी यशस्वी पार पाढले .


PostImage

pramod abhiman raut

Jan. 4, 2024

PostImage

Infantry rally from Vitthal Mouli's Bhisi Nagar to Sant Gajanan Maharaj's Karmabhumi ; विठ्ठल माऊलीच्या भिसी नगरीतून संत गजानन महाराजांच्या कर्मभूमीत पायदळ रॅली 


 

श्री संत गजानन माऊली भक्त मंडळाचा उपक्रम

चिमूर प्रतिनिधी :-

        भिसी ते शेंगाव पायदळ रॅलीचे आयोजन श्री. संत गजानन माऊली भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले. या भव्य रॅलीमध्ये भिसी परिसरातील अनेक महिला पुरुषांचे भजन मंडळ, गजानन महाराज यांची पालकी यांचा समावेश होता. या रॅलीत भिसी तथा परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी विठ्ठल माऊलीच्या भिसी नगरीतून संत गजानन महाराजांच्या कर्मभूमीत पायदळ प्रस्थान झाले.
         या रॅलीच्या स्वागतासाठी नागरीकांनी आपआपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. काही ठिकाणी डिजे सुद्धा वाजविन्यात आले. गजानन महाराज यांची प्रतिमा ठेऊन पुजा करण्यात आली. या रॅलीमध्ये अरविंद रेवतकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, धनराज मुंगले काँग्रेस पार्टीच जेष्ठ नेते, घनश्याम डूकरे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते तथा ममता डुकरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जेष्ठ नेत्या, विजय घरत जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जेष्ठ नेते, सचीन गाडीवार, नारायण बानकर अध्यक्ष संत गजानन माऊली भक्त मंडळ, विणेकरी रामाजी धोंगडे, माजी पंचायत समीती सदस्स प्रदिप कामडी, व्यापारी मंडळ तथा अनेक सामाजीक मंडळ, भावीक भक्त यांच्या उपस्थितीत या भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
         या रॅली दरम्यान घनशाम डुकरे, धनराज मुंगले व जयअम्बें दुर्गा मंडळ, राममंदिर ट्रस्ट यांच्याकडुन थंड पाणी तथा चहाची व्यवस्था करण्यात आली तसेच हनुमान व्यायाम मंडळ जोड मारोती रोड, राममंदिर व वाढोणा रोड येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. या पायदळ भिसी ते शेंगाव रॅलीत एकूण ४५ नागरीकांचा समावेश आहे. ऋषिकेश येरुणकर, रोशन तेलमारे पवनी, धर्माजी डांगरे, सारंग धोंगडे, प्रभाकर बोरकर, राजेश कुंभले, शांताराम नान्हे, राजू नंदुरकर, श्रीकृष्ण डुकरे, राजेंद्र रंदई, विकास चौधरी,  शामराव नरुले मालेवाडा, रोशन राकडे नवरगाव, रामू कावळे, अमित चाचरकर, ईश्वर चौधरी, सुरेश कामडी, देविदास कोटनाके, गुलाब देशमुख, दिलीप कापसे जामगाव, अंकुश मुरकुटे, शंकर येवले सिर्शी, प्रमोद हिवरे, नारायण बानकर, वामन अहेर, ज्ञानेश्र्वर गंधरे, संतोष मुरकुटे, विलास नागपुरे, जगदीश बोम्मेवार, रामाजी धोंगडे, मोहन राऊत, श्रावण धोंगडे, श्रावण निमजे, प्रकाश नागपुरे, उल्कर्ष चिंचुलकर, पांडुरंग उईके, सुरेंद्र घाटुरकर, महेश मुंगले, विठ्ठल बानकर, जयदेव भुजबळ, यशवंत येरुणकर,प्रकाश नागपुरे, रोशन देशमुख, विठ्ठल बानकर, प्रा.राजेश आष्टणकर यासह आदी भिसी येथील वारकरी पायदळ रॅलीत सहभागी झालेले होते. यासह आदी भिसी येथील वारकरी पायदळ रॅलीत सहभागी झालेले होते.
       यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे भिसी ते शेंगाव रॅलीत जाणाऱ्या नागरीकांसाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी राजू देवतळे, मनिष तुम्मपल्लीवार, गोलु पिसे, गोपाल बल्दुआ, किशोर मुंगले, प्रशात चिडे, निलेश गभने, लीलाधर बन्सोड, किशोर नेरलवार, आकास ढबाले, सतीश वानखेडे, बंडू तूबेकर आदी सह भारतीय जनता पार्टीचे नेते तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Jan. 4, 2024

PostImage

Kyc News ; शेतकऱ्यांनो..! पीएम किसानची ई केवायसी करा..! 


 

अनेक शेतकरी वंचित

चिमूर प्रतिनिधी :-

        पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई केवायसी झालेली नाही. त्यामुळे ते शेतकरी आगामी 16व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ही ई केवायसी कशी पूर्ण करावी, हे समजून घेऊया. साधारण अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 1.90 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी तब्बल 14 हजार 421 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्ण असल्याने ते शेतकरी आगामी 16 व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, आता कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र व्यक्तींना करून देण्यासाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती असून, या मोहिमेंतर्गत गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे.


अकोला जिल्ह्यात काय स्थिती?

        कोला जिल्ह्यात 6 डिसेंबर 2023 पर्यंत 1 लाख 90 हजार 648 शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेली असून त्यापैकी जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई- केवायसी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण 14 हजार 421 लाभार्थी प्रलंबित आहेत. पीएम किसान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पीएम किसान पोर्टल व मोबाइल अॅपची सुविधा विकसित केली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित 16 वा हप्ता वितरित करण्यापूर्वी ही संपृक्त्तता मोहीम गावपातळीवर राबवत आहे. शेतकयांनी तत्काळ जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बैंक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे.

ई-केवायसी कशी करावी ?
         तर पहिल्यांदा पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यात तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 


PostImage

pramod abhiman raut

Jan. 4, 2024

PostImage

Chimur News ; येरखेडा येथे आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी घेतले राष्ट्रसंतांचे दर्शन 


Chimur News ; येरखेडा येथे आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी घेतले राष्ट्रसंतांचे दर्शन 

 चिमूर प्रतिनिधी :-

       आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ, येरखेडा येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आमदार बंटी भांगडियानी सर्वप्रथम श्री हनुमानजी व राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व संत महात्म्यांना विनम्र अभिवादन करून उपस्थित गुरुदेव भक्तांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, समस्त येरखेडा ग्रामवासीयांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले.
        यावेळी आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मोझरी ह.भ.प. अशोकरावजी चरडे, ग्रामगीताचार्य हेमंतजी मेश्राम, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजपा नेते विनोद खेडकर, किशोर नेरलवार, सरपंच ग्रा.पं. येरखेडा संजय गेडाम, उपसरपंच्या ग्रा.पं. येरखेडा वर्षाताई येलेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रदीप देवतळे, पोलीस पाटील येरखेडा अमृताताई देवतळे, सचिव ग्रा.पं. येरखेडा ढोपरे सर, माजी संचालक - खापरी सेवा सह. संस्था कवडूजी कुबडे, पुंडलिक देवतळे, गोवर्धन नानाजी देवतळे, भालचंद्र नरुले, नीलकंठ देवतळे,  उद्धवजी कुबडे, योगिताताई देवतळे, दामुजी कुबडे, मोहन देवतळे, परशुराम नन्नावरे, पुंडलिक नन्नावरे, विनोद खवसे, हर्षल डुकरे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 31, 2023

PostImage

Chimur News ; खापरी (धर्मु) येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व सामुदायिक प्रार्थना 


 

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती

चिमूर प्रतिनिधी :-

        आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, देवस्थान व श्री गुरुदेव सेवा मंडळ, खापरी (धर्मु) येथे भारतीय जनता पार्टी व समस्त ग्रामवासीयांच्या वतीने आयोजित सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व सामुदायिक प्रार्थना कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी सर्वप्रथम श्री हनुमानजी व राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले आणि समस्त भाविकांसोबत श्री हनुमान चालीसा पठण व राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना करून महापूजा-आरती करण्यात आली. तसेच, या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी उपस्थित भाविकांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या बांधकामाकरिता आर्थिक मदत केली, भाविकांसोबत पंगतीत (महाप्रसाद) भोजन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 30, 2023

PostImage

Taiger Attack ; वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार...


 

चिमूर प्रतिनिधी :-

     वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार झाल्याची घटना (दि.२९) सकाळी जिल्ह्यातील मूल तालुक्यात उघकीस आली. जानाळापासून जवळच असलेल्या फुलझरी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सुभाष लिंगाजी कडपे (वय ४२) असे या शेतमजुराचे नाव आहे. तो जानाळा येथील रहिवासी होता.

       सुभाष कडपे हे जंगलालगत असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर त्यांना फुलझरीच्या दिशेने ओढत नेले. सुभाष हे घरी आले नसल्याने घराच्यांनी शोध सुरू केला. आज सकाळी सातच्या सुमारास फुलझरी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर, क्षेत्रसहायक औमकार थेरे, व पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा झाल्यानंतर सुभाष यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वनविभागाने सुभाषच्या कुटुंबियांना तातडीने तीस हजार रूपयांची मदत केली आहे. मूल तालुक्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे वनविभागाने वाघांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

 

 

(संग्रहित छायाचित्र)


PostImage

pramod abhiman raut

Dec. 26, 2023

PostImage

Chimur News ; आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची सातारा येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती


 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण 

चिमूर प्रतिनिधी :-

        आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील सातारा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व सार्वजनिक समाज मंडळाच्या वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा व अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

         याप्रसंगी आमदार बंटी भांगडियानी उपस्थित मान्यवरांसह सर्वप्रथम शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले व फीत कापून अनावरण केले. त्यांनंतर गावातील अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे जाऊन राष्ट्रसंतांचे मनोभावे दर्शन घेतले व कार्यक्रम स्थळी सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित गुरुदेव भक्तांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, सातारा वासीयांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले व शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

         यावेळी प्रामुख्याने ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, चिमूर कृ.उ.बा. समिती उपसभापती रविंद्र पंधरे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशजी बोकारे, भाजपा तालुका कोषाध्यक्ष रमेशजी कंचर्लावार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष तथा सरपंच ग्रा.पं. सातारा गजानन गुडधे, भाजपा नेते विलास कोराम, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री श्रेयश लाखे, सरपंच ग्रा.पं. कन्हाळगाव विजय घरत, भाजपा बूथ अध्यक्ष भाग्यवान ढोणे, वर्षाताई नन्नावरे, जे.आर. गुप्ता, रतिराम कोडापे, रविंद्र चौधरी, वामन बावणे, योगेश सहारे, कैलास जांभुळे, दिनेश कोडापे, सूरज ढोणे, बबन शेरकुरे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 22, 2023

PostImage

Tenis criket ; राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट 19 आतील मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रत्नागिरी संघ विजेता


द्वितीय क्रमांक सातारा  जिल्हा तृतीय क्रमांक  नाशिक

 चिमूर प्रतिनिधी :-

        टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 री ज्युनिअर  टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा . सय्यद पिंपरी क्रीडा संकुल उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये  प्रथम क्रमांक रत्नागिरी द्वितीय क्रमांक सातारा  जिल्हा तृतीय क्रमांक नाशिक तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, द्वितीय क्रमांक नंदुरबार, तृतीय क्रमांक नाशिक संघयांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

          या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी  ,नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड,महेश मिश्रा ,विलास गिरी, परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख  सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार, कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र व  जिल्हा सचिव, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य  टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी  यांनी खेळाडूंना  टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. 

          3 री राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मधील सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल।मैदानावर  येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 21 संघ  व  मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना  रत्नागिरी  विरुद्ध सातारा  जिल्हा यांच्या झाला. रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवला तर सातारा संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तसेच नाशिक संघाला तिसरा क्रमांक मिळाला व मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, दुसरा क्रमांक नंदुरबार तिसरा क्रमांक नाशिक, यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज  मॅन ऑफ द सिरीज सत्यम पांडे (नाशिक,) मिळवल्याबद्दल  व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल  महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी, स्वप्निल ठोंबरे, महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानाचा फेटा असे स्वरूप होते मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण  करण्यात आले पंच म्हणून संदीप पाटील, धनश्री गिरी विजय उंबरे, लखन देशमुख, श्रीपाद, अर्जुन सिद्धेश गुरव, सोमनगवडा बिरादार, शुभम जगताप, पंकज सुर्वे, धनंजय लोखंडे,, सुनील मोरय यांनी काम पाहिले.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 22, 2023

PostImage

Accident of two wheeler and ST bus near iron bridge ; लोखंडी पुलाजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात


चिमूर प्रतिनिधी :-

       मुरपार मिंझरी कडून चिमूरकडे प्रवासी घेऊन येत असलेली बस एमएच 31 एफसी 3690 असा नंबर असून प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बस व दुचाकी एमएच 34 वी 4146 नंबर असलेल्या दुचाकीची समोरा समोर धडक दिल्याने दुचाकी चालक व मागे बसून असलेला व्यक्ती गंभीर जखमी झालेला असून त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे तात्काळ हलविण्यात आले आहे. शरद शंकर आदे (वय २५) व सोमेश्वर लक्ष्मण पंचवटे (वय ४९) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जखमी व्यक्ती हिरापूर येथील असल्याचे सांगितले जातेय.
       सदर घटना अंदाजे ७:४० वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 16, 2023

PostImage

Nashik News ; नाशिक शहरात रंगणार  राज्य स्तरीये  टेनिस क्रिकेट स्पर्धा


(रविवार पासून स्पर्धेस प्रारंभ, सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन आयोजन)

चिमूर प्रतिनिधी :- 

          महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने U19  वर्षातील जूनिअर  राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य अशा राज्य  टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन नाशिक च्या मैदानावर 17 से 20 डिसेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होणार  असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव मिनाक्षी गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड   यांनी दिली.महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातील 24 संघ  या स्पर्धेत समावेश होणार आहे त्यामध्ये यजमान संघ नाशिक पण सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन  सोमवार  (18 डिसेंबर)  सायंकाळी 5.00. वाजत संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर कन्हैया गुजर सर उपस्थित राहणार आहेत. खेळाडू ची राहन्याची व्यवस्था ,पदाधिकारी व पंच यांची व्यवस्था  जनार्दन स्वामी पर्णकुटी नाशिक  येथे करण्यात आली


PostImage

pramod abhiman raut

Dec. 16, 2023

PostImage

Ram ; भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना..!


 

चिमूरप्रतिनिधी :-

          ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य, संगीत, चित्रपट, मालिका, ओटीटी क्षेत्रातील मान्यता प्राप्त जनसंपर्क व्यवस्थापन संस्था आहे. गेली २२ वर्षे ही संस्था मनोरंजन क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून शेकडो मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी जनसंपर्कासोबतच 'खंडोबाच्या नावानं', 'सैल', 'दशक्रिया' आणि  बंदिशाळा या चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीचे कामही केले आहे. 

        'राम पब्लिसिटी'ने एका नव्या मल्टीस्टारर व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती सुरु केली असून या चित्रपटात आर्थिक आर्थिक गुंतवणूक करून भागीदारी व्यावसायिक होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक व्यावसायिकांची मराठी चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा असते, परंतु  या व्यवसायाचे ज्ञान नसल्याने ते चित्रपट निर्मितीत उद्योगात येण्याचे टाळतात. अश्या निर्मात्यांना त्यांचे दर्जेदार चित्रपट निर्मितीचे स्वप्न साकार करता येणार आहे. भागीदारीमध्ये अश्या व्यावसायिकांना राम पब्लिसिटीसोबत मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी विश्वसनीय जाणकार दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मातीची अभूतपूर्व संधी प्राप्त होणार आहे. 

           अनेक दर्जेदार विषय असलेले, लोकप्रिय कलाकारांचा, अनुभवी तंत्रज्ञांचा सहभाग असलेल्या मराठी चित्रपटांना जगभरात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असून, अनेक चित्रपट कोटींची उड्डाणे पार करण्यात यशस्वी होत असून अश्या कलाकृतींमुळे मराठी चित्रपट व्यवसाय तेजीत असल्याने मराठी चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्यासाठी राम पब्लिसिटीने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेता येईल.  चित्रपट निर्मितीत रस असलेल्या उद्योजकांनी अधिक महितीसाठी rampublicity@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 3, 2023

PostImage

FDCM NEWS ; एफडीसीएम कर्मचाऱ्याचे सलग तिसऱ्या दिवशी अन्नत्याग सत्याग्रह सुरूच...


 

चिमूर प्रतिनिधी :-

       महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरक शासन स्तरावरून मंजुरी मिळावी याकरिता 01 डिसेंबर पासून महामंडळातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी  नागपूर, चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,यवतमाळ,नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे,पालघर या जिल्ह्यात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आज सत्याग्रहाचा तिसरा दिवस आहे. सदर आंदोलनकर्ते 25 कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची प्रकृती खालावली असून त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता सूचना वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या आहेत. परंतु कर्मचारी यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दर्शवून जोपर्यंत थकबाकी मंजूरीची मागणी मंजूर होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवणार असा निर्धार कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत.
          वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविणेकरिता 4 डिसेंबर पासून पूर्णपणे काम बंद आंदोलन करून मागणी पूर्ण होईपर्यंत महामंडळ बंद ठेवणार आहेत. महामंडळचे कर्मचारी यांच्या अन्नत्याग सत्याग्रह व कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील महामंडळाचे 14 वन प्रकल्प विभाग, 03 प्रदेश कार्यालयातील कामकाज बंद होणार आहे. तसेच महामंडळाचा  बल्लारशहा, डोंगरगाव या मोठ्या डेपोसह सर्व लाकूड विक्री आगार बंद राहणार आहेत, त्यामुळे महामंडळाचे कोट्यावधीचे राजस्व व राज्यातील फर्निचर मार्ट व बांबू व्यावसायिक, छोटे-मोठे व्यावसायिक यांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचे कामबंद आंदोलनामुळे वनसंरक्षण व क्षेत्रीय कामे बंद पडणार आहेत. महामंडळाचे क्षेत्र दुर्गम व अतिदुर्गम भागात असल्याने लाखो लोकांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. 
           त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 2 हजार कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यास शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढवणार हे नक्की आहे. तसेच सदर आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ शासनाने महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात तात्काळ मंजुरी द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करु अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेने घेतली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील कार्याध्यक्ष बी.बी.पाटील, सरचिटणीस श्री रमेश बलैया, उपाध्यक्ष राहुल वाघ, रवी रोटे, सचिव कृष्णा सानप, अभिजीत राळे, गणेश शिंदे, सुधाकर राठोड, श्याम शिंपाळे, मनोज काळे, दिनेश आडे, प्रतीक्षा देवलकर यांनी मांडली. तसेच महामंडळातील कर्मचारी यांच्या हक्काचे लढाई करिता या सत्याग्रह आंदोलनाकरिता सर्व वनउपज वाहतूक ठेकेदार, लाकूड, फर्निचर खरेदीदार यांनी  सहकार्य करावे असे आवाहन वनविकास महामंडळा तर्फे करण्यात आले.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@

         शासनाचे व प्रशासनाने अन्न त्याग सत्याग्रह कडे दुर्लक्ष केलं आहे तीन दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रहासाठी 150 कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रात बसलेले त्यापैकी सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी 25 जणांची प्रकृती खराब झाली आहे 4 डिसेंबर पासून परत अन्नत्याग सत्याग्रहासाठी जवळपास नव्याने 500 च्या वर कर्मचारी बसणार आहेत आता लढा अधिक तीव्र करणार सातव्या वेतन आयोगाचा फरक बाबतचा लढा आमच्या हक्काचा आहे त्यामुळे शासनाने तात्काळ याच्यावर योग्य निर्णय घ्यावा व आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा 
     *रमेश बलैया, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना*


PostImage

pramod abhiman raut

Dec. 3, 2023

PostImage

Aamdar Banti Bhangdiya ; आमदार कीर्तिकुमार  भांगडीया यांच्या शुभहस्ते  चिमूर येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ


 

योजनेतील लाभार्थी शेतकरी बांधवांना धनादेश वितरित

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. सदर योजना कृषि उत्पन्न बाजार समिती, चिमूर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पूणे यांचे अर्थसहाय्याने राबविण्यात येत आहे. याप्रसंगी आमदार बंटी भांगडिया यांनी उपस्थित मान्यवरांसह सर्वप्रथम फीत कापून उद्घाटन केले, त्यानंतर वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. तसेच, शेतमाल तारण योजनेतील लाभार्थी शेतकरी उद्धवराव दूधनकर व यशवंत अरसोडे यांना धनादेश प्रदान करीत त्यांचा शाल-श्रीफळ, भगवी टोपी भेट देऊन सत्कार केला.

दरम्यान, कृषि उत्पन्न बाजार समिती, चिमूर च्या वतीने आमदार बंटी भांगडीया व सहकार नेते संजय डोंगरे यांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि भगवी टोपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.

        यावेळी सहकार नेते संजय डोंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, उपसभापती रविंद्र पंधरे, संचालक - संदिप पिसे, प्रकाश पोहनकर, अनिल वनमाळी, दिनकरराव सिनगारे, कैलास धनोरे, राजू बानकर, मनोहर पिसे, भास्कर सावसाकडे, भरत बंडे, रेखाताई मालोदे, गीताताई कारमेंगे, तसेच प्रभारी सचिव दिनेश काशीवार, अरविंद देठे, राजकुमार मेश्राम, सारंग साळवे, निशांत बिरजे, सुमित भिदेकर व अन्य मान्यवर आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 2, 2023

PostImage

Gadachitoli  Chandrapur News ; रिपब्लिकन पार्टी चे राज्यस्तरीय अधिवेशन ७ जानेवारीला चंद्रपूरात


 

चिमूर प्रतिनिधी :-

            रिपब्लिकन पार्टी चे राज्यस्तरीय अधिवेशन दि. ७ जानेवारी २०२४ ला प्रियदर्शनी लॉन चंद्रपूर येथे आयोजन करावयाचे ठरविण्यात आल्यामुळे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या कार्यकारणीची बैठकीत रिपाईचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली रेस्ट हाऊस चंद्रपूर येथे पार पडली. सदर राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेद्र गवई , राष्ट्रीय अध्यक्ष एस.के. राजेद्रन कर्नाटक , गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम यांची प्रमुख उपस्थितीतीत राहणार असुन मार्गदर्शन लाभणार असल्याची माहीती प्रकाश कुंभे यांनी दिली.                                           सदर बैठकीला रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष गोपालजी रायपूरे, नागपूर प्रदेश सरचिटणीस शिध्दार्थ सुमन , रिपाईचे जेष्ठ नेते नामदेवराव पिंपळे ,महासचिव मोरेश्वर चंदनखेडे , जिल्हा कोषाधक्ष गुरुदास रामटेके ' जिल्हा उपाध्यक्ष गोपाल रामटेके , कोरपना तालुकाध्यक्ष ईश्वर पडवेकर, महिला आघाडी अध्यक्षा लिनता जुनधरे, सचिव डि.डी. खोबागडे चंद्रपूर, राजुरा तालुकाध्यक्ष शामसुंदर मेश्राम, बंल्लारसा तालुकाध्यक्ष अजय चव्हाण, सावली तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे, भद्रावती तालुकाध्यक्ष संतोष रामटेके , वरोरा तालुकाध्यक्ष अनिल वानखेडे, चंद्रपूर तालुकाध्यक्ष संजय खोब्रागडे, बम्हपुरी तालुकाध्यक्ष विजय रामटेके , शिंदेवाही तालुकाध्यक्ष राजकुमार रामटेके , चिमुर तालुकाध्यक्ष अँड. जनदेव मुन, नंदाबाई रामटेके, डॉ. दिपा चंहादे, प्रियंका चव्हाण, अपेक्षा पिंपळे ' अनुसया रायपूरे आदिची उपस्थिती होती.


PostImage

pramod abhiman raut

Dec. 2, 2023

PostImage

Pik Vima ; चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा योजनेचा लाभ :- शेतकरी नेते विनोद उमरे यांच्या मागणीला यश


चिमूर प्रतिनिधी :-


          चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एका रुपयात पीक विमा काढला मात्र नुकसान होऊन अजून पर्यत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता अनेक शेतकरी लाभापासून वंचित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार पीक विमा काढला. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठे नुकसान झाले. अनेकांची शेती पिके खरडून गेली. त्यामुळे यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली. यानंतर पीकविमा प्रतिनिधी कडून नुकसनाची पाहणी देखिल केली होती. शेतकऱ्यांना विम्याचा त्याचा लाभ  मिळण्यात यावे. यासाठी शेतकरी नेते विनोद उमरे हे सत्तत पाठपुरावा करत आहेत. त्याची प्रशासने  दखल घेत चंद्रपूर जिल्हातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे असे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी सांगितले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 30, 2023

PostImage

Ballarsha Relwe  ; बल्ल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस नवीन वर्षा आधी सुरु करा :- रोहन कळसकर यांची मागणी 


 

चिमूर प्रतिनिधी :-

        बल्लारशाह व्हाया वर्धा मुंबई चंद्रपुर जिल्हातुन मुंबई ला जानारी एकमेव ट्रेन बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस दोन वर्षा पासुन बंद आहे. चंद्रपुर व गडचिरोली जिल्हातील हजारो प्रवाश्यांना वर्धा, अमरावती,अकोला,शेगांव, शिर्डी, नाशिक, त्रिंबकेश्वर, मुंबई ला जाण्याकरीता सोईची होती ती अध्याप बंद आहे. त्यामुळे लोकांना नागपुर ला जावे लागते त्यात पैसा व वेळ विनाकारण वाया जात असल्याने हजारो प्रलाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे हि बाब लक्षात घेत  बल्लारपूर शहरातील झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत या वर ताबडतोब योग्य प्रकारे कार्यवाही करुन हि ट्रेन परत
नविन वर्षाच्या आधी सुरू करण्यात यावी अशी विनंती केली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 28, 2023

PostImage

Blood Donation ; रक्तदान करून राष्ट्रपिता ज्योतिबा महात्मा फुले यांना वाहिली आदरांजली


 

पोलिस स्टेशन शेगाव (बू) येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम

प्रमोद राऊत खडसंगी  :-

     पोलिस स्टेशन शेगाव (बू) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान करून आदरांजली वाहिली. ठाणेदार अविनाश मेश्राम हे नेहमीच सामाजिक उपक्रम शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत राबवित असतात. बहुजन समाजातील मुल शिकून पुढे मोठया पदावर गेली पाहिजेत हा उद्देश नेहमी ठाणेदार अविनाश मेश्राम हे डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळे सामाजिक अनोखे उपक्रम राबवित असतात आज सुद्धा महात्मा फुले यांची पुणयतिथी असून या दिनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
           यावेळी श्रीकांत येकुडे यांनी आधुनिक शेती करून उत्पन्न कसे वाढवावे यावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारत हा कृषिप्रधान देश असून 75% लोक हे शेतीवर अवलंबून आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्या शिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. शेतकरी यांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहावे, स्वतःची बाजारपेठ तयार करावी, एक पीक पद्धती न राबवता बहु पीक पद्धती राबवावी जणे करून एक पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकामुळे नुकसान भरून काढता येईल. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी, सोबतच शिकणाचे महत्व सांगून शेती बद्दल वाचन करून सरकारी योजना चा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले.
प्रा संजय बोधे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती बद्दल काय विचार होते,  त्यानी शेतकरीसाठी त्यांचे लिखाणात लिहून ठेवलेले याबदल सर्विस्तर माहिती दिली. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समज आणि गैरसमज या वर मार्गदर्शन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी कसे कार्य केले यावर मार्गदर्शन केले. तर ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी फुले शाहू आंबेडकर यांचे कार्य अनमोल असून त्यांचे विचाराने आपण आपली प्रगती करून समाजाची सुध्दा सेवा करू शकते असे प्रतिपादन केले. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील कोटबाळा येथील नीभ्रट यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलिस पाटील राळेगाव थुल यांनी मानले. कार्यक्रम चे आयोजन पोलिस स्टेशन शेगाव बु, सर्व पोलिस पाटील शेगाव बू, शांतता कमिटी शेगाव बू यांनी केले


PostImage

pramod abhiman raut

Nov. 27, 2023

PostImage

Taiger News ; शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत वाघाने केले बैलाला ठार 


 

बरडघाट शेतशिवारातील घटना ; गावकरी भयभीत

चिमूर प्रतिनिधी :-

      खडसंगी जवळील हाकेच्या अंतरावर बरडघाट असून या शेतशिवारात शेतकरी आपले बैल घेऊन शेतात नागरणीचे काम करीत असताना हातात बैलाचे कासरे असतानाच वाघाने झडप घेऊन बैलाला ठार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
       तालुक्यात मागील आठ दिवसाआधी वाहानगाव येथील एका शेतात दोन वाघाची झुंज झालेली होती यात बजरंग नावाचा वाघाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सध्या खरीप हंगाम संपलेला असून, रब्बी पिकांना सुरवात झालेली आहे. शेतात चना, गहू पिकाची पेरणी केली जात आहे. त्यामुळं शेतात शेतकरी नागरणी, वखरणी असे कामे करीत आहेत. 
       आज दुपारच्या सुमारास बरडघाट येथील कवडु पेंदाम हे शेतात नागरनी करीत असताना बैलाचे कासरे हातात असतानाच वाघाने झडप घालून शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बैलाला ठार केले. ऐन रब्बी पिकाच्या हंगामात बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात जवळपास ९० हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळं वनविभागांनी तात्काळ शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

      वनविभागचे बफर झोन क्षेत्र लागून असून परीसरात छोटा मटका वाघ फिरत आहे. याआधी सुद्धा या वाघाने अनेक बैल मारले आहेत. त्यामुळं जंगलाशेजारी शेती असलेल्या ठिकाणी जाळीचे सुरक्षा कवच लावन्यात यावे. तसेच पांढरपौनी भागांतील गावाशेजारी गवताचे प्लानटेशन असून यामुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी जागा होत असते त्यामुळं ते प्लानटेशन तात्काळ हटविण्यात यावे. 
      प्रमोद श्रीरामे, माजी उपसरपंच
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

      या छोटा मटका वाघाचा बफर झोन परीसरात वावर असून जंगलालगत शेती असलेल्या परीसरात नेहमी फिरत असून या छोटा मटका वाघाने अनेक बैल ठार केले आहेत. यामुळं शेतकरी हैराण झाले असून छोटा मटका वाघाने शेतकऱ्यांचे जीवन हैराण करीत आहे असे नागरीक चर्चा करीत होते. त्यामुळं या वाघाचा वन विभागने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 26, 2023

PostImage

Mobail ; फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास 'या' टिप्सचा वापर केल्यास होईल फायदा


 

चिमूर प्रतिनिधी :-

14422 हेल्पलाइन नंबर 

जर तुमचा फोन हरवला असल्यास सर्वात आधी तुम्ही 14422 या हेल्पलाइन नंबरवर फोन करून सूचना द्यायला हवी. यामुळे फोन लवकर शोधता येऊ शकतो. यानंतर फोनला शोधणे सुरू होते. दूरसंचार मंत्रालयाकडून या सर्विसला देशभरात उपलब्ध करण्यात आले आहे.

CIRR पोर्टल 
दूरसंचार प्रौद्योगिकी केंद्राकडून एक सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर तयार करण्यात आला आहे. यात प्रत्येक नागरिकाचे मॉडल नंबर, सिम नंबर आणि आयएमईआय नंबरची नोंदणी केली जाते. चोरीचा मोबाइल शोधण्यास सरकारी एजन्सी मोबाइल मॉडल आणि IMEI नंबरची माहिती मिळते.

Mobile Tracking System 
सरकारकडून मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम आणली जात आहे. या सिस्टमला देशभरातील लोकांना एक ऑप्शन मिळतो. यावरून चोरी झालेल्या मोबाइल फोनला ब्लॉक करण्यात येते. या सिस्टमला भारतात १७ मे रोजी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने यूजर्स आपल्या हरवलेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासोबतच ब्लॉक सुद्धा करू शकतो.

 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 25, 2023

PostImage

Taiger Attack ; शेतात धानाचा सरवा वेचायला जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार


 

चिमूर प्रतिनिधी :-

       धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लोंबी (सरवा) वेचण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

           इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लोंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगोटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात होत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ होऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शोध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंड आहेत.

           धोका पत्करून शेतीची कामे केली जात आहेत. हिरापूर परिसरात चार ते पाच वाघांचा वावर असल्याचं सांगितलं जातेय. याच भागात अनेकांची शेती आहे. सध्या धान कापणी, बांधणी व मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाघाच्या दहशतीत धोका पत्करून शेतीची कामे करावी लागत आहेत.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 24, 2023

PostImage

Makarand Anaspure :- मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ


 

चिमूर प्रतिनिधी :-

        अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे.

           ‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

            ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

              तूर्तास पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर बरोबरच प्रत्येक रसिकाच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं चित्रपटातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं प्रदर्शित झाले असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरमसाठ प्रतिसाद येत आहे. गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

        “महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्याच्या आवडीचं मनोरंजन अनुभवता यावं यासाठी आम्ही ‘छापा काटा’ सारखा संपूर्ण धमाल विनोदी मनोरंजन असणारा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटालाही जोरदार प्रतिसाद असणार यात शंका नाही.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 23, 2023

PostImage

Aapla Davakhana Started ST station ; आता प्रत्येक एसटी स्थानकावर सूरु होणार आपला दवाखाना


 

शिंदे सरकारचा निर्णय 

चिमूर प्रतिनिधी :-

          राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिले आहेत.

           तसेच एकूण एसटी स्थानकांपैकी 10 टक्के ठिकाणी मृत्यू झालेल्या माजी सैनिकांच्या पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल द्यावा आणि यासाठी योजनाबद्ध अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील  मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 21, 2023

PostImage

Taiger Attac ; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार चिमूर प्रतिनिधी :-


Taiger Attac ; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार

चिमूर प्रतिनिधी :-

       चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. मात्र कधी नव्हे ते आता वाघांनी चंद्रपूर शहराच्या दिशेने कूच केली आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शनी मंदिरात, एक व्यक्ती पुजा करण्यासाठी गेला असता त्यावर वाघाने हल्ला करून ठार केलं आहे. मनोहर वाणी (वय 53) असं मृतकाचे नाव आहे.
        चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ वस्तीला लागून जुनोना जंगल सुरू होते. याच परिसरात शनी मंदिर आहे. मृतक मनोहर वाणी येथील मंदिरात दररोज पूजा करण्यासाठी जातात. आज सकाळी ते पूजा करण्यासाठी गेले असता त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला केला. वाघाने मृत झालेल्या वाणी यांना शनी मंदिरापासून तब्बल 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. मनोहर वाणी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना दोन मुली आहेत. वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 19, 2023

PostImage

Pm Kisan News ; खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करा 'हे' काम; अन्यथा...


 

चिमूर प्रतिनिधी :-

 केंद्र सरकारनं 15 नोव्हेंबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील कार्यक्रमात या हफ्त्याचे वितरण करण्यात आले. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जमा झाला नसेल त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.

अशा प्रकारे तक्रार दाखल करु शकता
● सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
● आता "रजिस्टर कंप्लेंट" पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
● तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
● तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.

 पैसे न येण्याची अनेक कारणे
तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. ई-केवायसी नसल्याचीही शक्यता आहे. याशिवाय, असे देखील होऊ शकते की आपण अजिबात अर्ज केला नाही. जर तुम्ही ही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली असतील तर तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.

 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 19, 2023

PostImage

Maya Taiger News ; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघाचा सांगाडा सापडला ; ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण


Maya Taiger News ; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघाचा सांगाडा सापडला; ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण

चिमूर प्रतिनिधी :-

         ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘सेलिब्रिटी वाघीण’ अशी ओळख असलेल्या ‘माया’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात एका वाघाचा सांगाडा सापडला.
           ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘सेलिब्रिटी वाघीण’ अशी ओळख असलेल्या ‘माया’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात एका वाघाचा सांगाडा सापडला. त्यामुळे पुन्हा एकदा या वाघिणीच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात येणार असून त्यानंतरच हा सांगाडा कोणत्या वाघाचा आहे, हे कळू शकेल. मात्र, ही ‘माया’च असावी, अशी दाट शक्यताही वनखात्याच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
           राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन पावसाळ्यानंतर एक ऑक्टोबरला सुरू झाले. मात्र, ‘ताडोबाची राणी’ अशीही ओळख असलेली १३ वर्षाची ‘माया’ ही वाघीण पर्यटकांना आतापर्यंत दिसली नव्हती. २५ ऑगस्टला ती शेवटची पंचधारा या लोकेशनवर मंजुरांना दिसली होती. तिच्या मृत्यूची चर्चा सुरू झाल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. तब्बल १२५ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या व्याघ्रप्रकल्पातील पांढरपौनी हे तिचे अधिवास क्षेत्र. मायाचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, १७ नोव्हेंबरला तीन दिवसांची पायी गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यात वनखात्याचे १०० हून अधिक कर्मचारी सहभागी होते. जवळपास १०० चौरस किलोमीटर क्षेत्र पालथे घातल्यानंतर तिच्याच अधिवासात शनिवारी, कर्मचाऱ्यांना वाघाच्या हाडाचा सापळा आढळला. त्यामुळे ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण आले. दरम्यान, बंगळुरू येथील प्रयोगशाळेत डीएनए विश्लेषणासाठी नमुने पाठवले जाणार असून त्यानंतरच मृत्यूचे कारण आणि वाघाची ओळख पटणे शक्य होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 18, 2023

PostImage

12 Th Pass Student 51 Thausand Rupees ; 12 वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपयाचा भत्ता 


 

कोणाला मिळणार लाभ ? कुठं करणार अर्ज ?

 चिमूर प्रतिनिधी :-

         दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे. ज्याप्रमाणे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे त्याच धरतीवर या दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे.

 योजनेचे स्वरूप कस आहे ?

          या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी 51 हजार रुपयांपर्यंतचा भत्ता पुरवला जातो. यामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण 51 हजार रुपये दिले जातात.

 या योजनेची सुरवात का करण्यात आली ?

          बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ज्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात जागा मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.

 योजनेचे उद्दिष्ट काय ?

          या योजनेअंतर्गत धनगर समाजातील मुलांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. शिक्षणादरम्यान धनगर समाजातील मुलांना पैशांची निकड भासू नये हे एक या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

          या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्याना लाभ दिला जातो. 
▪️ज्या विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश मिळालेला नाही अशाच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. 

योजनेच्या अटी काय ?

   • सदर विद्यार्थी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
   • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. 
▪️लाभार्थी विद्यार्थी हा 28 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. 
▪️शिक्षणात खंड पडला असेल अथवा मध्यावधी प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरतील.

 योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

         विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्कूल मार्क पत्रके, बोनाफाइड प्रमाणपत्र, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, एनआयसीआर कोडं.

अर्ज कुठं करणार ?

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतो. जे विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाइन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे..


PostImage

pramod abhiman raut

Nov. 17, 2023

PostImage

Chota Mataka Taiger News ; दोन वाघांच्या झुंजीतील जखमी झालेला "छोटा मटका" अखेर वनविभागाला गवसला


गंभीर जखमी नसून किरकोळ जखमी वनविभागाचा दावा

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथे दि. 14 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र चिमुर (प्रादेशिक) परिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतामध्ये बजरंग व छोटा मटका (T- 126 व T-44) या दोन वाघांच्या झुंजीत बजरंग (T-44) या वाघाचा मृत्यु झाला होता. या वाघांचा झालेल्या झुंजीवरुन असे वाटत होते की, छोटा मटका हा सुद्धा गंभीर जखमी झालेला असावा. सदर घटनास्थळवरुन छोटा मटका हा जंगलात निघून गेला होता. या छोटा मटका वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभाग यांनी दहा ट्रॅप कॅमेरे व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध घेतला जात असता दोन दिवस लोटून सुद्धा छोटा मटका वाघाचा थांगपत्ता लागलेला नव्हता.
       वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर व उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांचे आदेशान्वये दि. 15 ऑक्टोंबर 2023 व दि. 16 ऑक्टोंबर 2023 ला खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्रातील किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सोबत बी. आर. रंगारी, क्षेत्र सहाय्यक निमढेला, आर. जे. गेडाम, क्षेत्र सहाय्यक, खडसंगी जी. एम. हिंगणकर, वनरक्षक निखील बोडे, वनरक्षक संतोष लोखंडे, वनरक्षक, चेतन कोटेवार, वनरक्षक तसेच एसटीपीएफ कर्मचारी, पिआरटी कर्मचारी कुटी मजुर, रोजंदारी मजुर, अलिझंजा व निमढेला निसर्ग पर्यटन गेट वरील गाईड, जिप्सी चालक मालक असे एकुण 65 वनकर्मचारी मिळुन पायदळ गस्त करुन व बजरंग (T-44) वाघाचा मृत्यु झालेल्या ठिकाणा पासुन कक्ष क्र. 57 व कक्ष क्र. 55 मध्ये एकुण 15 ट्रॅप कॅमेरे लावुन झुंजीमध्ये जखमी झालेला छोटा मटका (T-126) या वाघाचा शोध अखेर वनविभागांनी घेतला असता छोटा मटका (T- 126) हया वाघाच्या शरीरावर किरकोळ जखमा असुन वाघाची प्रकृती चांगल्या अवस्थेत आहे. असे वनविभागांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये सांगितले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 17, 2023

PostImage

Taigar attac Nivedan ; वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा :- वाहणगाव येथील नागरिकांची मागणी 


 

चिमूर प्रतिनिधी :-

        आज दि 16/11/2023 ला "वन परिक्षेत्र अधिकारी ( प्रादेशिक) कार्यालय चिमूर ब्रह्मपुरी  वनविभाग" यांना खडसंगी परिसर मध्ये होत असलेल्या वन्यजीव व मनुष्यजीव , तसेच पाळीवप्राणी  संघर्ष त्यामुळे होणारी जीवितहानी, वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच नुकत्याच वाहनगाव शेतशिवारात सुभाष दोडके यांच्या शेतात दोन वाघांच्या झुंजी मध्ये एक वाघ मृत पावला त्यामुळे त्या परिसरात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे  सध्या स्थितीत शेतात कापूस वेचणी सुरू आहे, खडसंगी परिक्षेत्र मध्ये बेंबडा गावात 8 दिवसा अगोदर ईश्वर हजारे हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात मरण पावला, मसळ परिसरातील विहीरगाव येथे पण वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मृत पावले, तसेच बैल, मैस, गाय, शेळी नेहमीच वाघाच्या हल्ल्यात मारल्या जात आहे. याकडे वन विभागाने जातीने लक्ष देऊन अश्या घटना पुन्हा होणार नाही यासाठी विशेष  बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली

            यावेळी सुभाष दोडके, शंकर ननावरे, गौरव दोडके, निकेश मसराम, कान्हाजी सावसाकडे, राजू कुलमेटे, अविनाश दोडके, दशरथ सवसाकडं, रोशन गुळध्ये, संकर दडमल,  गजानन गायकवाड


PostImage

pramod abhiman raut

Nov. 15, 2023

PostImage

Ration Dukan ; रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी


 

 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना लाभ ; दरवर्षी एक असे वाटप

चिमूर प्रतिनिधी :-

        रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप होणार आहे.
           चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात् रेशन दुकानातून 'आनंदाचा शिधा देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
          त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासननिर्णय जारी केला. राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
          वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 11, 2023

PostImage

Nitin in uniform created a vision of humanity. ; वर्दीतल्या नितीनने घडविले माणुसकीचे दर्शन...


Nitin in uniform created a vision of humanity. ; वर्दीतल्या नितीनने घडविले माणुसकीचे दर्शन...

ट्रॅफिक पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी ...

चिमूर प्रतिनिधी :-

          ट्रॅफिक पोलिस अधिकारी दिसला की अनेक दुचाकी स्वारास घाम फुटतो परंतु ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांची कामगिरी ही कौतुकास्पद असून  जन सेवेकरिता रस्त्यावर उन, वारा, पाऊस अश्या अनेक संकटाचा सामना करीत आपले कर्तव्य बजावत असतात. जर छोटा मोठा अपघात झाल्यास जीवाची पर्वा न करता अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर इलाज करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम सुद्धा करीत असतात. इतकेच नव्हे तर पोलीस कर्मचारी सदैव जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
           अशीच आज एक कौतूकास्पद असलेली बाब शेगाव येथील ट्राफिक पोलीस अधिकारी नितीन कुरेकार यांनी केली आहे. आज सकाळ पासून शेगाव परिसरात एक मनोरुग्ण महिला विवस्त्र फिरत होती. सर्व तिच्याकडे एक मनोरुग्ण म्हणून संकुचित नजरेने पाहण्याचे काम करीत होते. ही माहिती शेगाव पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅफिक हवालदार या पदावर काम करीत असलेले नितीन कुरेकार यांना माहिती झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर २ तसा नंतर सदर मनोरुग्ण महिला वरोरा चिमूर रोड वर चालताना त्यांना दिसली असता त्यांनी ट्रॅफिक ची कामगिरी बजावत असतानाच ते काम बाजूला ठेऊन सर्वात आधी त्या महिलेला स्वखर्चाने शर्ट आणि पॅन्ट घेऊन दिला. व त्या महिलेला तो व्यवस्थित करुन दिला. त्या वेळी त्यांच्या सहकार्याला शेगाव पोलीस स्टेशन येथील होमगार्ड हेमंत पाटील हे सुद्धा होते. एरवी ट्रॅफिक पोलीस म्हंटल तर सर्वांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. पण शेगाव चे नितीन कुरेकार यांनी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन शेगाव वासियांना घडवून दिले. त्यामुळे त्यांच्या या कार्याला व वर्दीतल्या या माणुसकीला एक सलाम.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 11, 2023

PostImage

Chimur News ; डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात 'शेतकरी धडक मोर्चा संपन्न


Chimur News ; डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात 'शेतकरी धडक मोर्चा संपन्न

चिमूर प्रतिनिधी :-

         विविध मागण्यासाठी काँग्रेस पक्षाचा चिमूर उपविभागीय कार्यालयावर दि. १० नोव्हेंबर २०२३ ला शेतकऱ्यांना सोबत धडक मोर्चा नेण्यात आला, चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ. सतिश वारजूकर 'शेतकरी धडक मोर्चा'चे नेतृत्व केले श्री. बालाजी देवस्थानापासून मोर्चाची सुरूवात झाली असून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय चिमूर येथे मोर्चाची सांगता करण्यात आली 

           शेतक-यांना सोयाबीनची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, गोसीखुर्दचे पाणी शेतक-यांना मिळाले नाही व नविन दराने शेतक-यांच्या जमिनीचा मोबदला यावा, रस्त्यांच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करा, शेतकऱ्यांना टोल फ्री नंबर वर पिक विमा कंपनी कडून प्रतिसाद मिळत नाही व प्रचंड भ्रष्टाचार करून पिक विमा कंपन्या मालामाल झालेल्या आहे, शेतकऱ्यांनी कापूस धान ई. पिकाचा विमा उतरविला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पाऊस उशीरा सुरु झाल्यामूळे कापसाचा विमा काढला. सोयबीनचा पेरा केला, सोयाबीनचा विमा काढला व कापूस पेरला. खते, बी, बियाने किटकनाशके ई. महागडया औषधी वापरुनही बुरशीजन्य रोगाने सोयाबीन पिकले नाही,  पशुवैद्यकीय दवाखाण्यामध्ये जनावरासाठी औषधी उपलब्ध नाही, पशु आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, ती दुरुस्त करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्यासह अनेक मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले या वेळी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य सेवादलाचे सहसचिव प्रा. राम राऊत, महासचिव महाराष्ट्र प्रदेश डॉ. नामदेवराव किरसाण,महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटक धनराज मुंगले, चंद्रपुर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, तालुका किसान सेल अध्यक्ष हेमंत उर्फ राजु कापसे चिमुर तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष विलास डांगे, माजी अध्यक्ष जि.म. सह. बँक चंद्रपूर संजय डोंगरे, किशोरबापू शिंगरे अध्यक्ष सेवादल,शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर , मा. पं.समिती सदस्य स्वप्निल मालके , डॉ.रहेमान पठाण, पप्पुभाई शेख, माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर , अरुण दुधणकर, नितिन कटारे , देविदास मोहीनकर, विलास मोहीनकर ,  सईश वारजुकर , नागेंद्र चट्टे , राकेश साटाने, मंगेश घ्यार ,मंगेश रांद्ये , शुभप पारखी , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 10, 2023

PostImage

Weather Update ; राज्यात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता, पहा कुठं पडणार पाऊस


चिमूर प्रतिनिधी :-

       अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात मोठा बदल दिसून येत आहे - अशातच आता राज्यासह देशात पुढील 24 तासात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. 

             पहा कुठं पडणार पाऊस

 येत्या 24 तासात राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली लातूर या सह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.11 नोव्हेंबरनंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पात पावसाचे प्रमाण कमी होईल. तर पुढील दोन ते तीन दिवस गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता असणार, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 8, 2023

PostImage

 A young man was arrested in connection with the death of a newborn ; नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी तरुणाला अटक


 

चिमूर प्रतिनिधी :-

       बोळधा गावातील नालीत फेकून दिल्यामुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी भिसी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. घटनेच्या सहा दिवसांनी पोलिसांनी कारवाई केली आहे. मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी ( 1 नोव्हेंबर) ला सायंकाळी चारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील बोडधा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली होती. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसांची आहे. 
     चिमूर तालुक्यातील बोडधा गावात नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी वाहत असलेल्या नालीत नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला. याची माहिती भिसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नवजात अर्भकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी लगेच त्या निर्दयी मातेचा शोध घेणे सुरू केले होते. अनैतिक संबंधातून झालेल्या नवजात बाळामुळे गावात व समाजात बदनामी होईल भीतीपोटी निर्दयी मातेने नवजात अर्भकाला गावातीलच नालीत फेकून दिल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 6, 2023

PostImage

Where to complain if private travel charges high fare during Diwali? ; दिवाळीत खासगी ट्रॅव्हलने जास्त भाडे आकारल्यास कुठे कराल तक्रार?


Where to complain if private travel charges high fare during Diwali? ; दिवाळीत खासगी ट्रॅव्हलने जास्त भाडे आकारल्यास कुठे कराल तक्रार?

चिमूर प्रतिनिधी :-

       दिवाळीत हंगामात जादा भाडे आकारणी करु नका असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जादा भाडे आकारणी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

         महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या 50 • टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत.

         दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 4, 2023

PostImage

Khasdar Ashok Nete News ; खासदार अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक-


 

चिमूर प्रतिनिधी :-

         गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.

            खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही,

          यानंतर दुसऱ्या वाहनाने खा.नेते गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा.नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दुखापत झालेली नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.
लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या  हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त करतो.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 4, 2023

PostImage

1 lakh rupees will be received from the 'Lake Ladki' scheme for the future of the girl child ; मुलीच्या भविष्यासाठी 'लेक लाडकी' योजनेतून मिळणार 1 लाख रुपये - अशी करा नोंदणी


 

चिमूर प्रतिनिधी :-

            महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली. या योजनेला 'लेक लाडकी' योजना असे नाव देण्यात आले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी देखील दिली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेत गरीब कुटुंबांना त्यांची मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यात ही रक्कम दिली जाईल. 

 पहा कोणाला मिळेल या योजनेचा लाभरा

            ज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना मिळेल. जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच या योजनेचा लाभ मिळेल.

            यामध्ये मुलीच्या जन्मावर 5000 रुपये मिळतील. शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये, सहावी वर्गात गेल्यावर 7000 रुपये, अकरावीला जाण्यासाठी 8000 रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये दिले जाणार आहेत. 

 आवश्यक कागदपत्रे

▪️ पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका, मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासी, 

▪️ पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ई - मेल आयडी आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. दरम्यान या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकता. 


PostImage

pramod abhiman raut

Nov. 2, 2023

PostImage

Eight-month-old baby in the drain..!  ; आठ महिन्याचे अर्भक नालीत!


 

चिमूर प्रतिनिधी :-

       आठ महिन्याचे मृत स्त्री अर्भक नालीत आढळल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्यातील बोडधा येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. त्या अज्ञात निर्दयी मातेविरुद्ध गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
        बोडधा येथील मंदिराजवळ बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुई- कुई असा आवाज येत होता, मात्र, हा आवाज श्वानाच्या पिल्लाचा असेल म्हणून कुणी लक्ष दिले नाही. सायंकाळी एक महिला कचरा टाकण्यासाठी नालीकडे गेली असता, मृत अर्भक आढळले. ही माहिती पोलिस पाटलांनी भिसी पोलिसांना दिली. त्यांनी अर्भकाला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके म्हणाले, मृत स्त्री अर्भक आठ महिन्यांचे असून, वजन २ किलो १०० ग्रॅम आहे. या अर्भकाची उत्तरीय तपासणी करण्याची स्वतंत्र समिती आहे. त्यामुळे हे अर्भक चंद्रपूर येथे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले. भिसी पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध भादंवि ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रकाश राऊत व उपनिरीक्षक सचिन जंगम करत आहेत.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 1, 2023

PostImage

Chimur News ; ...अन् सरपंचांनी साधला चिमुकल्या बालकांशी संवाद     चिमूर प्रतिनिधी :-


...अन् सरपंचांनी साधला चिमुकल्या बालकांशी संवाद

    चिमूर प्रतिनिधी :-
         
      चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर पेठ भान्सुली गाव येत  असुन, गट ग्रामपंचायत आहे. पेठ भान्सुली गावातील प्रथम नागरिक सरपंच तुळसा देविदास श्रीरामे यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन चिमुकल्या बालकांशी संवाद साधला आहे. चिमुकल्या बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणाबददल चर्चा करून चिमुकल्या बालकांना योग्य ते आहार लाभार्थ्यंपर्यंत पोहचते की नाही याबाबत आहार विषयक माहिती घेऊन आढावा घेण्यात आला.
         यावेळी शाळेतील उपस्थित चिमुकल्या बालकांशी संवाद साधला. पेठ भान्सुली येथील अंगणवाडीची स्थापना १९८२ मधे झाली असून आता पेठ भान्सुली येथील अंगणवाडी मध्ये ० ते ६ वयोगटातील मुले - १२ व मुली-१२  असे एकूण २४ मुले/ मुली आहेत. त्या सर्वांशी संवाद साधून आहार बाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पेठ भान्सुली गावचे प्रथम नागरिक 
सरपंच तुळसा श्रीरामे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई रासेकर, अंगणवाडी सेविका शिलाताई बघेल, मदतनीस व युवा समाजीक कार्यकर्ते आकाश श्रीरामे तथा गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 31, 2023

PostImage

A four-year-old girl was lured to eat bhaji and taken to her home and... ; चार वर्षाच्या चिमुकलीला भजी खाण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि...


 

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूरपासून १५ किलोमीटर  असलेल्या  ३५ वर्षाच्या युवकांनी एका साडेचार वर्ष बालीकेवर बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी घडलेली आहे पोलिसात तक्रार दाखल झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपीचे नाव अमोल खोब्रागडे वय ३५ असे आहे.
       भिसी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दाबकाहेटी येथील साडेचार वर्षाची बालिका आपल्या मैत्रिणीच्या घरी खेळत होती त्या मैत्रिणीच्या घराजवळ आरोपी चे घर आहे. आरोपी अमोल खोब्रागडे वय 35 यांनी तिला भजी खाण्याचे आम्हीस दाखवून स्वतःच्या घरी नेले व त्या मुलीवर स्वतःच्याच घरी अत्याचार केला त्यामुळे मुलगी घाबरून जाऊन रडत रडत आपल्या घरी येऊन आजीला सांगितलं घरचे आई-वडील शेतमजुरी करणारे असल्याने ते सर्वजण शेतावर गेलेले होते त्यामुळे आई-वडिलांना घरी आल्यावर ही घटना माहिती झाली लगेच भिसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली  पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे तर आरोपी फरार झालेला होता आरोपीच्या शोधार्थ पोलीस विभाग फिरत होते आरोपीला सोमवारी पहाटे अटक करण्यात आली आहे तर मुलीला उपचारासाठी  रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहेत.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 30, 2023

PostImage

Taiger Attac ; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; चंद्रपूर जिल्हयातील चोवीस तासातील दूसरी घटना 


 

चिमूर प्रतिनिधी :-

       तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर बेंबळा गावातील शेतकरी सूर्यभान हजारे (वय अंदाजे ७० वर्ष) शेतात बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासात दूसरी घटना घडली आहे.
        खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन जंगल असलेल्या शेत शिवारात बैल चारत असताना अचानकपणे वाघाने हमला करत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यातील २४ तासातील हि दूसरी घटना घडली आहे. नवेगाव (रामदेगी) बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे अन् मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत असते. शेतकऱ्याला ठार करणारा वाघ हा भानुसखिंडीचा बच्चा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. या बच्चानी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची शिकार केली असल्याचेही सांगीतले जातेय. काल पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत विहीरगाव येथील एका गुरख्याला वाघाने ठार केले होते. हि घटना ताजी असतानाच आज खड संगी वन परिक्षेत्र अंतर्गत बेंबळा येथील शेतकरी सूर्यभान हजारे यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.
        सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून वन विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाले आहे. समोरील घटनेचा पंचनामा चौकशी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

    यावेळी नागरिकानी मागणी रेटून धरली असल्यामुळं दिड लाख रुपये कॅश व १० लाख रुपयांचा चेक बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या हस्ते कुटुंबीयांना देण्यात आला. असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किरण धनकुटे यांनी सांगितले 


PostImage

pramod abhiman raut

Oct. 29, 2023

PostImage

Tiger Attac ; वाघाच्या हल्यात विहिरगाव येथील गुराखी ठार


विहिरगाव येथील घटना

चिमूर प्रतिनिधी :-

      दबा धरून बसलेल्या वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून गुराखीला ठार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना पळसगाव वनपरिक्षेत्र मधील बेलारा येथे दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसें (४९ ) रा.विहिरगाव,ता. चिमूर, जि. चंद्रपूर) अशी मृतकाचे नाव आहे.
    पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात सफारी साठी पर्यटकांची पाहुले वळत असतात. गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हे आळीपाळीने गुरे चराईसाठी पाच ते सहा व्यक्तीच्या समूहाने नेत असतात रविवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान मधुकर धाडसे हे आपल्या सहा गुराखी सोबत गावातील गुरे चारण्याची त्यांची पाळी असल्याने ते आपल्या ६ सहकाऱ्यांसह मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे चारणासाठी गेले होते. गुराखी गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. जनावरे हंबरु लागल्याने बाकी असलेल्या गुराखी यांनी धाडसे यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा शोध घेतला असता नाल्याजवळ काही अंतरावर त्याचे फरकडत नेल्याच्या पाहुल खुणा आडल्याने त्या खुणा बघत बघत जात त्याचे प्रेत नाल्याजवळ मिळाले आहे.
        या हल्ल्यात मानेच्या खाली शरीराचा काही भाग हल्ला केल्याचे दिसून आले. वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे विहिरगाव बेलारा या गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत होते. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालया चिमूर येथे नेण्यात आले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 25, 2023

PostImage

दोन-तीन दिवसांनंतर या शेतकऱ्यांना मिळू शकते अग्रीम भरपाई; सचिवांचाही पीक विमा कंपन्यांना दणका


 

चिमूर प्रतिनिधी :-

       काल सचिवांपुढे बीड, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याची सुनावणी झाली. सचिवांनी विमा कंपन्यांना दणका देत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले. तर जालना, परभणी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई देण्यास कंपन्यांनी तयारी दर्शविली. इतर जिल्ह्यांमध्येही पीक विमा कंपन्या आणि प्रशासनामध्ये तोडगा काढण्याचे काम सुरु असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
          विमा कंपनीने बीड, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याच्या अग्रीम भरपाईच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला सचिवांकडे आव्हान दिले होते. काल या अपीलावर सचिवांनी सुनावणी घेतली.
          या सुनावणीत सचिवांनी विभागीय आयुक्तांचा म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. म्हणजेच विमा कंपन्यांचे अपील फेटाळले. यामुळे या कंपन्या सचिवांचे आदेश मानतात की केंद्राकडे अपील करतात ते पाहावे लागेल.
          कृषी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिवांनी बीड, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याचे कंपन्यांचे अपील फेटाळले. त्यानंतर विमा कंपनी बुलडाणा जिल्ह्याच्या अग्रीम भरपाईबाबत साम्यंजस्याची भुमिका घेण्याची शक्यता आहे.
            बुलडाणा जिल्ह्यात अग्रीम भरपाईच्या सचिवांच्या आदेशाला विमा कंपनी केंद्राकडे अपील करण्याची शक्यता कमी आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तसेच काल विमा कंपनीने जालना जिल्ह्यातही अग्रीम भरपाई देण्याची तयारी दर्शविली.
            जालना जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि मका पिकाला अग्रीम भरपाई द्यावी, अशी अधिसूचना काढली होती. पण विमा कंपनीने फक्त सोयाबीन पिकासाठीच अग्रीम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे.
          केवळ जालना जिल्ह्यातच नाही तर इतर जिल्ह्यातही अग्रीम भरपाईबाबत मधला मार्ग काढण्यावर जोर दिला जात आहे. विमा कंपन्या आणि प्रशासन दोन्ही बाजूंनी साम्यंजस्याची भुमिका घेतली जात आहे. दोन्ही बाजूंनी आता स्थानिक पातळीवरच तोडगा काढण्यावर जोर दिला जात आहे, असेही कृषी विभागाने सांगितले. पण कोणत्या जिल्ह्यात काय तोडगा निघाला, हे निर्णय झाल्यावर कळेलच.
           पण सध्या एकापेक्षा जास्त पिकांसाठी अधिसूचना काढल्या असतील तर कंपन्या एखाद्या पिकालाच अग्रीम देण्यासाठी तयार होत आहेत. जसं जालना जिल्ह्यात झाल्याची माहिती आहे. कापूस, मका आणि सोयाबीनसाठी अधिसासूचना असतान फक्त सोयाबीनसाठी अग्रीम मिळण्याची शक्यता आहे.
            यासोबतच नुकसानीच्या टक्केवारीवरूनही मतभेद होते. त्यावरही तोडगा काढला जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्या अग्रीम भरपाई देण्यास तयार आहेत, त्या जिल्ह्यातील पात्र मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अग्रीमची रक्कम जमा होण्यास मदत होईल, असेही कृषी विभागाने सांगितले.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 23, 2023

PostImage

Taigar Attac ; आंबोली येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार 


 

शेतकऱ्याचे ऐन हंगामात नुकसान

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर तालुक्यातील आंबोली येथील पांडुरंग कवडू ठाकरे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात 22 ऑक्टोबरच्या रात्री वाघ शिरला व गोठ्यात बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. त्यात बैल ठार झाला. वाघाने बैलाचे बरेच मांस खाल्ले व निघून गेला. 23 ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पांडुरंग ठाकरे शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली.
       भिसी उपवन क्षेत्राचे वनरक्षक भानुदास बोरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाघाने पाळीव जनावरांना ठार केल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आंबोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पांडुरंग ठाकरे यांचा पन्नास हजार रु. किमतीचा बैल ऐन हंगामात वाघाने मारला. त्यामुळे वन विभागाने तत्काळ पांडुरंग ठाकरे यांना नुकसान भरपाई द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरे यांनी केली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 21, 2023

PostImage

Bhoomipujan was done for facilities, beautification and essential construction in the cemetery at Bhisi ; भिसी येथे स्मशानभूमी मध्ये सोयी-सुविधा, सौंदर्यीकरण आणि अत्यावश्यक बांधकामाचे झाले भूमिपूजन


 

चिमूर प्रतिनिधी :-


        कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना सन - २०२२-२३ नगरपंचायत भिसी अंतर्गत असलेल्या स्मशानभूमी मध्ये सोयी-सुविधा, सौंदर्यीकरण आणि अत्यावश्यक बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. (कामाची किंमत: १९१.८१ लक्ष रुपये) यावेळी आमदार बंटीभाऊंनी भूमिपूजन स्थळी उपस्थित मान्यवरांसह कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून बांधकामाचा शुभारंभ केला.
         या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 21, 2023

PostImage

Inauguration of Veterinary Hospital Category-II and Complex Building at Bhisi ;  भिसी येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ व संकुलाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा


 

चिमूर प्रतिनिधी :-


        कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ व संकुलाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. (कामाची किंमत - रूपये ६२.४५ लक्ष) यावेळी आमदार बंटी भांगडियानी सर्वप्रथम श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आसनाचे व श्री संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांसह फीत कापून दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण केले. दरम्यान, आमदार बंटीभाऊंचे विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
           या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. बांधकाम उपविभागीय अधिकारी माथनकर, पशुवैद्यकीय अधिकारी चिमूर एस. के. राऊत मॅडम, डॉ. एस. सी. देशमुख मॅडम, बिडीओ राठोड तसेच, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, हर्षल डुकरे, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 21, 2023

PostImage

Dhanraj Mungale In Present Garba Dandiya ; धनराज मुंगले यांच्या हस्ते गरबा दांडिया स्पर्धेचे बक्षिस वितरण


 

चिमूर प्रतिनिधी :-

          चिमूर तालुका युवक काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित चिमूर नवरात्र उत्सव तथा भव्य गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गरबा दांडिया स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी यांच्या शुभहस्ते पार पडला.
         यावेळी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित गजानन भाऊ बुटके, जिल्हा सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी माजी जिल्हा परिषद सदस्य, माधव बापू बिरजे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,  विजय गावंडे पाटील तालुकाध्यक्ष तालुका काँग्रेस, अविनाश अगडे शहर अध्यक्ष शहर काँग्रेस, प्रदीप तळवेकर अध्यक्ष ओबीसी विभाग, विलास मोहिंनकर, अक्षय लांजेवार, पप्पू शेख तसेच तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 20, 2023

PostImage

Chimur warora mahamarg ; चिमूर वरोरा महामार्ग बांधकामात होत असलेल्या गैरप्रकारची यांनी केली चौकशी


 

युवक काँग्रेस चिमूर च्या माध्यमातून खडसंगी गावातून जात असलेल्या वरोरा चिमूर महामार्ग बांधकामात होत असलेल्या गैरप्रकारची चौकशी...

चिमूर प्रतिनिधी :-

          आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोज शुक्रवार ला खडसंगी गावातील गावकरी व युवा मंडळी यांचे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वरोरा ते चिमूर महामार्ग बांधकाम सुरू आहे हा महामार्ग खडसंगी गावातून चिमुरकडे जातो. खडसंगी गावातून जे महामार्गाचे बांधकाम होत आहे हे शासनाने ठरविलेल्या इष्टीमेट नुसार होत नसून त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार होत असल्याताबाबत खडसंगी येथील गावकरी व युवा मंडळी यांचेकडून युवक काँग्रेस ला माहिती प्राप्त झाली. तसेच युवा मंडळी कडून विनंती करण्यात आली कीं या कामाची पाहणी करून होत असलेला गैरप्रकार उघडकीस करून आमच्या गावातून जाणारा महामार्ग हा व्यवस्थितरित्या बांधकाम व्हावा अशी गावकऱ्यांनी चिमूर युवक काँग्रेसला विनंती केली.
            खडसंगी गावकऱ्यांच्या विनंती ला मान देऊन युवक काँग्रेस चिमूर यांनी गावातील नागरिकांसोबत खडसंगी गावात सुरू असलेल्या कामाच्या मोक्क्यावर जाऊन संबंधित साईड इंजिनिअर यांचेकडून कामाची रूपरेषा जाणून घेऊन शहानिशा करून चौकशी केली असता सुरू असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा ज्या अंडरग्राउंग झाकीव नाल्या बांधण्यात आल्या त्या दोन्ही नाल्यांचे अंतर हे ऐकून 24 मीटर इष्टीमेटवर दिले आहे. परंतु प्रत्तेक्षात पाहणी केली असता महामार्गाच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या नाल्यांचे अंतर हे 24 मीटर नसून काही ठिकाणी 22 मीटर तर काही ठिकाणी 23 मीटर आहेत. तसेच महामार्ग मध्य भागातून उजव्या-डाव्या दोन्ही बाजूंचे 12-12  मीटर अंतर इष्टीमेंटवर दिले आहे तसे असायला हवे परंतु तसे न होता एका बाजूला कमी व एका बाजूला जास्त असा फरक मोजमाप केल्यानंतर दिसून आला.
           सूरु असणारे बरेच काम पूर्ण झाले असून झालेल्या कामात असा गैरप्रकार दिसून आला. परंतु सध्या खडसंगी गावाच्या मध्य भागात कामाला सुरूवात झाली असून त्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी मार्किंग करण्यात आली आहे. परंतु जी मार्किंग करण्यात आलेली आहे ती चुकीची मार्किंग असून जोपर्यंत झालेली मार्किंग दुरुस्त होत नाही. तोपर्यंत सदर मार्किंग झालेल्या ठिकाणी काम करू नये. तसेच सुरू असलेले महामार्गाचे बांधकाम हे दर्जेदार व पारदर्शक व्हावं. अन्यथा होत असलेल्या कामावर सर्व गावकऱ्यांचे समवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रस चिमूर पदाधिकारी यांचेकडून कंत्राट असलेल्या KCC कंपनीला देण्यात आला आहे.
            तसेच सदर कामाचे सर्व दस्तऐवज व कामाचे इष्टीमेट हे माहितीच्या अधिकाराखाली मागणी करून झालेल्या कामाची पूर्ण चौकशी करून ज्या-ज्या ठिकाणी कामात गैरप्रकार झाला असेल अथवा भ्रष्टाचार झाला असेल त्या ठिकाणी कामात दुरुस्ती करून सदर कंत्राट असलेल्या कंपनीवर कार्यवाही व्हावी यासाठी आवाज उठवला जाईल व शासनाला धारेवर धरल्या जाईल. असा विश्वास खडसंगी गावातील जनतेला देण्यात आला.
             या सर्व आज रोजी झालेल्या घटनेत प्रमुख भूमिका प्रशांत डवले, विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा चिमूर तथा माजी. तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर व नागेंद्र चट्टे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर यांनी पार पाडली असून कुणाल रामटेके, विवेक खोब्रागडे,  राजू गेडाम, अक्षय केमये, रोहित खोब्रागडे, अनिल जांगळे, सुनील गुडधे आमडी बेगडे आदी युवा वर्ग तथा गावकरी वर्ग यांची साथ मिळाली असून सर्वांच्या उपस्थितीत वरोरा-चिमूर महामार्ग खडसंगी येथील कामाची चौकशी करण्यात आली.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 17, 2023

PostImage

Tomaro chimur Jan akrosh morcha; उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा


उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा

सर्व समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन भंते धम्मचेती यांनी केले आहे

चिमूर प्रतिनिधी :-

        उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ ऑक्टोंबर २०२३ ला  दुपारी १२ ते ५ वाजेपर्यत मोर्चा प्रारंभ होणार असून, सदर मोर्चा संविधान चौक, नविन पोलीस स्टेशन जवळून निघणार असून, या मोर्च्या चे मार्गदर्शक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य यांच्या मार्गदर्शनात निघणार आहे.
        महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेतील सर्व कर्मचारी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी "ईव्हीएम हटाव, संविधान बचाव'"  या विषयावर भव्य मोर्चाचे चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चाला संविधान मानणाऱ्यांना लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य व भंते डॉ. धम्मचेती यांनी केले आहे.
      *या मोर्चाचे प्रमुख मागण्या*
        भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. तीन पिढ्यांची अट रद्द करून जबरानजोत धारक शेतकन्यांचे तात्काळ पट्टे वाटप करावे. के.जी. ते पि.जी. शिक्षण मोफत करण्यात यावे. ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे. सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटीकरणाच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्या. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. शेतकन्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही सुरु करावे. दुष्काळग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व देण्यात यावी. गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद करावी. चिमूर तालुक्यातील अपात्र झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ जाहीर कराव्या. शेतकयांच्या कापसाला रू. १५०००/- हमीभाव द्यावा. चिमूर तालुक्यातील शेतातील पांदणरस्ते तात्काळ मंजूर करावेत. शेतकयांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करावे. धान उत्पादन शेतकऱ्यांना रू. ५०००/- प्रति किंटल देण्यात यावे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित हमे त्वरीत देण्यात यावे. असे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
       मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक  भदंत धम्मचेती संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य असून सर्व समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 16, 2023

PostImage

Kolara grampnchayat loc ; कोलारा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचातला ठोकले कुलूप


 

 ग्रामपंचयतीवर संपूर्ण ग्रामवासीयाचा जन आक्रोश    

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी कोलारा ग्रामपंचायत असून, येथील सरपंच तथा सदस्य संपूर्ण कमिटीने मिळून कोलारा ग्रामवाशी यांचा विश्वासघात केला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
      कोलारा येथील सरपंच तथा कमिटी यांनी परस्पर आपसात आपल्या स्वार्थासाठी नवीन जिप्सी लावण्यासाठी वनविभागाला आपली आन - शान - बाण विकून वनविभाग ताडोबा यांचे व ग्रामवाशीयांचे प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी सरपंच ग्रामपंचायत कमिटी आपसात आर्थिक व्यवहार करून परस्पर आपसात कोलारा ग्रामवासीयांच्या डोळ्यात तिखट टाकून संपूर्ण ग्रामवासियाचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करण्यात आला. त्या कारणामुळे वनविभागाच्या आर्थिक व्यवहारामुळे व नवीन जिप्सी रोटेशनला लावण्याचे प्रलोभनापोटी संपूर्ण ग्रामवासी यांचा विश्वासघात करण्याचा प्रकार आज कोलारा येथील ग्रामवासी यांच्या लक्षात आल्यामुळे हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला व संपूर्ण गावकरी एकत्रित होऊन एक होऊन ग्रामपंचायत कोलारा येथील ग्रामपंचायत कमिटी मुर्दाबाद विश्वासघाती ग्रामपंचायत सरपंच असे नारे देऊन   15 ऑक्टोंबर 2023 ला संपूर्ण गावकरी सायंकाळी जवळपास 8 वाजताच्या दरम्यान एकत्र होऊन एकमताने कोलारा ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावातील महिला मंडळ' संपूर्ण युवक' संपूर्ण गावातील जेष्ठ नागरिक व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व कमिटी व संपूर्ण इको डेव्हलपमेंट समिती व गावातील युवक मंडळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच व कमिटी यांचा निषेध म्हणून संपूर्ण गावाकडून ग्रामपंचायतला कुलूप ठोकून निशेष दर्शविण्यात आला.    
          येणाऱ्या गावकऱ्यांचे वनविभागाकडील प्रश्न मार्गी न लागल्यास कोलारा येथील ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा घेण्याचा निर्धार ग्रामवासीयांनी घेतला आहे. व गावकऱ्यांकडून सरपंच सहित ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे असे संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

  अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊ
      ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करून नव्याने कमिटी स्थापन करावी अशी संपूर्ण गावकरीची मागणी आहे. व वन विभाग  ताडोबा यांच्याकडून कोलारा येथील ग्रामवासियांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास कोलारावाशी आंदोलन तीव्र करतील असे कोलारा ग्रामवासीयांचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने त्वरित प्रश्न मार्गी लावावे नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण गावकरी मोर्चा घेऊन जाणार अशी गावकऱ्यांची चर्चा होत आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 14, 2023

PostImage

Soyabin pikavar firavala tractor ; या शेतकऱ्याने ९ एकरातील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर


 

वाचा सविस्तर वृत्त

चिमूर प्रतिनिधी :-

       शेतकऱ्याने सोयाबीनची लागवड केली. रोपटे फुलले.... बहरले.... डोलू लागले... समाधानकारक पीक हातात येईल, या आशेने शेतकरी आंनदीत झाला. अचानक यलो मोझॅक, खोडकिडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केले. दोन ते तीन दिवसात होत्याचे नव्हते झाले. सोयाबीनला शेंगा आहेत पण त्यामध्ये दाणे नाहीत. हातात येणारे सोयाबीन डोळ्यादेखत किडीने नष्ट झाल्याने हतबल झालेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील किरण शेंडे या शेतकऱ्याने तब्बल ९ एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून उरले सुरले पिकच नष्ट केले. सुमारे दोन लाख रुपये सोयाबीन लागवडीवर त्याने खर्च केला होता
       धानाला अल्प भाव, त्यातही किडींचा प्रादूर्भाव त्यामुळे पिकाच्या पेऱ्यात घट येवून सोयाबीनला अनुकूल वातावरण दिसू लागल्याने जिल्हाभरात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी सोयाबीनची लागवड करण्यात आली. सोयाबीन पिकाचा सर्व हंगाम तयार केल्यानंतर बियाने लागवड करण्यात आली. रोपटे फुलले, बहरले, डोलू लागले होते. अख्खा हंगाम गेला पण किडीचा पत्ता नाही.. परंतु अवघ्या काही दिवसात पिक हातात येणार होते तोवर अचानक येलो मोझॅक आणि खोडकिड्याने पिकांवर आक्रमण केले आणि शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरले. अवघ्या दोन ते तीन दिवसातच किडीने पिक फस्त केले. अचानक किड लागल्याने शेतकऱ्यांनी पिक वाचविण्याकरीता पुरेपूर प्रयत्न केले. परंतु योग्य मार्गदर्शनाभावी पीक वाचविण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. त्यावर प्रचंड खर्चही झाला. परंतु यलो मोझॅक किडीचा बंदोबस्त शेतकरी करू शकले नाहीत.
       जिल्हयातील कोरपना तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये कापूस, साडेआठ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर तूर चार हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. सध्या शेतात सोयाबीन दिसत आहे. पण त्या सोयाबीन पिकाच्या शेंगाच भरलेल्या नाहीत. काही शेंगामध्ये दाणेच नाहीत. काहीमध्ये दाणे आहेत परंतु त्याचा आकार मुगाच्या आकाराएवढा आहे. कापसाची स्थिती वेगळी नाही. कापसाला बोंडच आले नाहीत. आले तेही नष्ट झाले आहेत. शेतीचा हंगाम लागवडीपासून तर आतापर्यंत पिकावर प्रचंड खर्च झाला. परंतु आता शेतातील सोयाबीन सवंगाला लागणारा खर्चही निघणार नसल्याने नारंडा येथील किरण या शेतकऱ्याने उद्गविग्न होवून तब्बल नऊ एकरात उभ्या सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 12, 2023

PostImage

विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलीये 'ही' योजना


 

चिमूर प्रतिनिधी :-

 आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात सदर योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे

 एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे 

शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे.
वीज वितरण प्रणालीतील वीज हानीचे योग्य मोजमाप करण्यासाठी रोहित्र फिडर यावर योग्य क्षमतेचे मीटर लावणे.
 शहरी भागातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसाठी वीज जोडण्या देण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे.
 शहरी भागातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण/आधुनिकीकरण करणे.

 


PostImage

pramod abhiman raut

Oct. 11, 2023

PostImage

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता 13 ऐवजी 12ऑक्टोबरलाच होणार


 

चिमूर प्रतिनिधी :-

         सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 13 ऑक्टोबररोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता अलीकडे घेण्यात आली असून 13 एवजी 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

        नवीन वेळापत्रकानुसार, 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे नवीन वेळापत्रक ईमेल द्वारे शिंदे गट व ठाकरे गटाला पाठवण्यात आले आहे. जी 20 संदर्भात 13 ऑक्टोबरला दिल्लीत बैठक होत आहे. बैठकीत राज्यातील महत्त्वाचे नेते, अधिकारी जाणार असल्याने सर्वांच्या सोईसाठी आता सुनावणी एक दिवस आधी ठेवल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 5, 2023

PostImage

महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी महत्वाच्या आहेत 'या' योजना


 

चिमूर प्रतिनिधी :-

       *पब्लिक पोव्हिडेंट फंड*
पीपीएफ गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गंत सरकारकडून 7.1 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. यात कोणताही व्यक्ती जास्तीतजास्त 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतो. यात कर सवलतदेखील मिळते. 

         *महिला सन्मान बचत योजना*
केंद्र सरकारने केंद्रीय आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअतंर्गंत 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. यात महिला 2 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतात. आणि त्यांचा कार्यकाळही २ वर्षांचा आहे.

       *सुकन्या समृद्धी योजना*
ही योजना खासकरुन मुलींसाठी राबवण्यात आली आहे. यात 10 वर्षांपर्यंत मुलगी असल्यास तिच्यानावाने खाते सुरु करता येऊ शकते. तुम्ही यात 250 पासून ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 8 टक्के व्याज देण्यात येते. 

         *नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट*
महिलांसाठीही ही योजना अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये किमान रु. 1000 ते त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. या ठेवीवर ७.७ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणूकदार पाच वर्षांच्या कालावधीसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकतात.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 4, 2023

PostImage

Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुन्हा लांबणीवर ; 28 नोव्हेंबरला होणार सुनावणी


 

चिमूर प्रतिनिधी :-

         राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणी केवळ पुढील दिनांक मिळत आहे. या प्रकरणी दीड वर्षात एकदाही सुनावणी झाली नाही. या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत सांशकता कायम आहे.

          मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीकडे राजकीय मंडळी आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणासाठी न्यायालयाने सुनावणीसाठी यापूर्वी 20 सप्टेंबर तारीख निश्चित केली होती. 

          मात्र, त्या दिवशी या प्रकरणात सुनावणी झाली नाही. त्यानंतर पुढची तारीख देण्यात आली होती. आता पुन्हा 28 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुनावणीमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यानंतर सुनावणी होईल. त्या वेळी न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केला तरी, एका महिन्यात सर्व तयारी शक्य वाटत नाही.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 3, 2023

PostImage

Anandacha Shidha : दिवाळीत मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यात आता आणखी दोन गोष्टींचा झाला समावेश


 

चिमूर प्रतिनिधी :-

        राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय झाला. यावेळच्या आनंदाचा शिधा देताना त्यामध्ये मैदा, पोह्याचा देखील समावेश केला जाणार आहे. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

         पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 वस्तू होत्या. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖


PostImage

pramod abhiman raut

Oct. 3, 2023

PostImage

Akshy Kumar OMG 2 : अक्षय कुमारचा बहुचर्चित 'OMG 2' चित्रपट 'या' तारखेला होणार ओटीटीवर रिलीज


 

 चिमूर प्रतिनिधी :-

       अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी 2' चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. लैंगिक शिक्षणावर आधारित हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता OTT वर देखील पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. येत्या 8 ऑक्टोबरला हा चित्रपट NETFLIX या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. ,

          'OMG 2' सोबत 'गदर 2' देखील 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. 'गदर 2' कमाईच्या बाबतीत जिंकला असला तरी प्रेक्षकांनी अक्षयच्या 'OMG 2' ला भरभरून प्रेमही दिले. चित्रपटाची संकल्पना लोकांना खूप आवडली. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने त्याच्या खर्चानुसार चांगली कमाई केली होती. अक्षय कुमारच्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 150.17 कोटींची आजीवन कमाई केली.

 


PostImage

pramod abhiman raut

Oct. 3, 2023

PostImage

आरक्षण संपविण्याचा घाट :- कवडू लोहकरे


खाजगीकरण व कंत्राटीकरण भरतीला कडाडून विरोध

चिमूर प्रतिनिधी :-

        राज्य सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून  6/9/2023 रोजी शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतला.त्यामुळे लाखो सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीचे संकट येणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करणारा निर्णय आहे. संविधानातील समान काम , समान वेतन पायदळी तुडविल्या जाईल. लगेच 18/9/2023 रोजी शासणाने एक शासणनिर्णय काढुन शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. 65 हजार शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला.पुन्हा लगेच 20/9/2023 ला 20पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला.यामुळे सर्वसामान्य गरीब व होतकरू तसेच हुशार  विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.ग्रामीण भागातील मुले दुरवरच्या शाळेत जाणे शक्य नाही.
    शाळा बंद, नोकर भरती बंद,शाळांचे खाजगीकरण, नोक-यांचे कंत्राटीकरण करूण शिक्षण व शाळा संपविण्याचा विडा उचलला आहे. कंत्राटी भरतीमूळे वाशीलेबाजी, आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभार, अपारदर्शकता असे प्रकार घडू शकतात.सध्या तहसीलदार पदांची कंत्राटी भरती केली जाणार आहे तर काही दिवसांनी जिल्हाधिकारी यांची सुद्धा पदभरती होऊ शकते
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

         राज्य सरकारने विकासकामांना  पुरेसा निधी उपलब्ध व्हावा व प्रशासकीय खर्चात काटकसर व्हावी यासाठी रिक्त जागेवर बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.या निर्णयामुळे आरक्षण , शिक्षण , नोकरी, पेंशन संपविण्याचा घाट घातला जात आहे. अन्यायकारक शासण निर्णय रद्द न केल्यास प्रचंड जन आक्रोशाला समोरे जावे लागेल.

         कवडू लोहकरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 30, 2023

PostImage

अरविंद रेवतकर यांनी मुलीच्या लग्न कार्य समारंभाकरिता अल्पशी भेट म्हणून केला किराणा वाटप


 

चिमूर प्रतिनिधी :-

       राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर व मित्र परिवारा तर्फे सामान्य नागरिकांच्या मुलीच्या लग्न कार्य समारंभाकरिता अल्पशी भेट म्हणून किराणा वाटप भिसी येथील युवराजजी दिघोरे यांचे निवासस्थानी भेट देऊन देण्यात आला. 
        अरविंद रेवतकर यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात अनोखा सामाजिक उपक्रम राबविला जात असून, अनेक गरजू व गरजवंत गोरगरीब जनतेला आर्थिक मदत, कुठं किराणा वाटप तर कुणाच्या दुःखात सहभागी होत आधार देत असतात. तर कोरोणा काळात सुद्धा त्यांनी अनेकांना एक हात मदतीचा म्हणून दिला होता. त्यामुळं कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता. 
          असाच आज आर्थिदृष्टया कमजोर असलेल्या गरीब मुलीच्या लग्न कार्य समारंभाकरिता अल्पशी भेट म्हणून किराणा वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा घुटके, जगतजी तांबे, विजय नन्नावरे, मनोज दिघोरे, हरीश डुकरे, रोशन रेवतकर, सौरभ कामडी, शैलेश आजबलकर, अक्षय नागपुरे, फैयाज शेख, अक्षय सातपैसे, राहूल कामडी, यश कोथळे, राहूल दिघोरे, आशिष श्रीरामे, श्रीकांत वाघ,  तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता गण आदी उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 29, 2023

PostImage

चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपूर व राजूरा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय पईतवार यांची नियुक्ति.


 

       तालुका प्रतिनिधी :-

         शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.  एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना पक्षाच्या संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय पईतवार यांची नियुक्ति करण्यात आली.
              वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे  कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसाला मिळावा.
          तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची परिस्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्याकड़े विशेष लक्ष कसे देता येईल. त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणून शिवसेना पक्ष कसा मजबूत करता येईल, याअनुसंगाने सदर नियुक्ति करण्यात आली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 29, 2023

PostImage

गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा सत्कार सोहळा व संगीतमय कार्यक्रम सोहळा* 


चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त.....

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राहुलजी गांधी यांच्या जनसंवाद यात्राचे ओीचित्य साधुन चिमूर शहरात  दि. 2 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारला  इंदिरा गांधी चौक चिमूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाला बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा प्रमुख  मान्यवरांचा उपस्थित सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
           या कार्यक्रम प्रसंगी देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम स्वप्नील बन्सोड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आवाज मुझिकल नाईट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे उद्घाटक  डॉ. नामदेव किरसान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे सहउद्घाटक डॉ. सतिश वारजुकर समन्वयक 74/ चिमूर विधानसभा श्रेत्र तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी राम राऊत, सहसचिव सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, धनराज मुंगले संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर मनोज गभणे पोलीस  निरीक्षक चिमूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर, माधवबापु बिरजे माजी सभापती कुर्षी उत्पन्न बाजार समिती, विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, संजय डोंगरे माजी अध्यक्ष जि. म. स. बैंक चिमूर, भिमरावजी ठावरी माजी शहराध्यक्ष तालुका काँग्रेस श्रीमती वनिता मगरे अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस किशोरबापु शिंगरे, अध्यक्ष तालुका काँग्रेस सेवादल, राजेंद्र लोणारे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ओबीसी, माननीय  कदीरचाचा माजी बांधकाम सभापती तथा गटनेता नगर परिषद, गोपाल झाडे माजी अध्यक्ष नगर परिषद चिमूर, विलास डांगे अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी विभाग, साईश सतीश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रदीप तळवेकर अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, आरिफभाई शेख अध्यक्ष तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, हेमंत उर्फ राजु कापसे अध्यक्ष तालुका काँग्रेस किसान सेल विभाग, लोकनाथ रामटेके अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु.जाती. भरत बंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे, सुधीर पोहनकर माजी सचिव तालुका काँग्रेस कमिटी डॉ. रहमान पठाण सचिन महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस, स्वप्निल मालके माजी उपसभापती प. स. चिमूर, बालाजी कोयचाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु .जमाती, नर्मदा रामटेके अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस अनु.जाती, राजू चौधरी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, राजू हिंगणकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, तर या कार्यक्रमाचे विनीत आहे. अविनाश अगडे,अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, गितांजली थुटे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस कमिटी चिमूर, मोहम्मद शफिक शेख उर्फ पप्पूभाई मिडिया प्रमुख, धनराजजी मालके संपर्कप्रमुख चिमूर शहर, अमोल जुनघरे उपाध्यक्ष शहर काँग्रेस, विनोद ढाकुणकर, उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, गौतम पाटील जिल्हा महासचिव युवक काँग्रेस , रोशन ढोक अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक काँग्रेस, जावाभाई शेख अध्यक्ष ता .काँग्रेस अल्पसंख्यक विभाग,  प्रशांत डवले उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस ओबीसी विभाग, नागेंद्र चट्टे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, अक्षय लांजेवार संघटक तालुका युवक काँग्रेस, उमेश हिंगे माजी नगरसेवक, राकेश साटोने उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. असे आव्हान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे. व शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 27, 2023

PostImage

पोलिस स्टेशन शेगाव (बू ) आणि पैगामे रजा सेवा संस्था शेगाव बू यांचे संयुक्त विद्यमाने रोग निदान शिबीर


 

चिमूर प्रतिनिधी :-

        पोलिस स्टेशन शेगाव (बू ) आणि पैगामे रजा सेवा संस्था शेगाव बू यांचे संयुक्त विद्यमाने हजरत पैगंबर साहेब यांचे जयंती निमित्त भव्य रोग निदान शिबिर चे आयोजन नेहरू शाळा शेगाव बू आज दिनाक 26.09.2023 रोजी सकाळी 9.00 वा ते 14.00 वा पर्यंत करण्यात आले.
          कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा चे आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि ठाणेदार अविनाश मेश्राम पोलिस स्टेशन शेगाव (बू) यांनी केले.  ठाणेदार मेश्राम यांनी जयंती लोकभिमुख कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने जयंती साजरी होते असे बोलून सर्व मुस्लिम बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती च्या शुभेच्या दिल्या. तसेच गणपती उत्सव सुध्दा असेच कार्यक्रम घेऊन साजरी करावी असे आवाहन केले.  
          आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला हवे. शिबिराचा उद्देश जनतेला निरोगी ठेवण्याचा आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच रीबिन कापून रीतसर सर्वरोग निदान व उपचार शिबिर चे उद्घाटन केले. 
            या शिबिर करीता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली होती. यामध्ये मेडीसिन तज्ञ, नेत्ररोग , सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, स्वशन रोग, दंत व मुख रोग , त्वचा रोग तज्ञ डॉ यांनी तपासणी केली. या शिबिराचा 560 लोकांनी लाभ घेतला. कार्यक्रम करीता नेहरू शाळेचे मुख्यध्यापक ढाकुनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे माजी अध्यक्ष राजू चिकटे, शेगाव बू माजी सरपंच यशवंत लोडे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे, शांतता समिती शेगाव बू चे उमेश माकोडे इत्यादी हजर होते.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पठाण यांनी केले तर आभार मुज्जू शेख यांनी मानले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी पैगामे रजा सेवा संस्थाचे सर्व सदस्य आणि पोलिस स्टेशन शेगाव बू चे सर्व अधिकारी आणि अमलदार यांनी प्रयत्न केले.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 23, 2023

PostImage

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील 14 हजार शाळा बंद होणार


 

चिमूर प्रतिनिधी :-

       राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. तसेच याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.                 त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे.

 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 20, 2023

PostImage

थेट सीईओंच्या खुर्चीत बसला, पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलवून स्वागत केले; असं काय केलं सोहमने, वाचा…


 

चिमूर प्रतिनिधी :-

        दररोज आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत चर्चा आणि आठवड्याला एक चित्रपट हा आयएएस होण्याचा सुकर मार्ग आहे अशी चर्चा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी करण्याऱ्या सोहम सुरेश उईक या आठव्या वर्गातील विद्यार्थीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट आपल्या खुर्चीत बसवले तर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कार्यालयात बोलवून त्याचा सत्कार केला.                                                                                           चंद्रपूर हा ओघोगिक आदिवासी जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची कमी नाही, अनेक हुशार विद्यार्थी आज अधिकारी, डॉक्टर, अभियंता तसेच इतर मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरहळदी पंचायत समिती पोंभुर्णा या शाळेतील सोहम सुरेश उईके या विद्यार्थ्याने मागील आठवड्यात सकाळच्या सुमारास सायकलिंग करताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी सोहम उईके याने पोलीस अधीक्षक यांना भविष्यात आयएएस होण्याचे स्वप्न बोलून दाखविले. नियमित आठ तास अभ्यास, आठ तास झोप, एक तास मित्रांसोबत गप्पा आणि आठवड्याला एक चित्रपट या मार्गाने गेल्यास प्रत्येकाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईल असे सांगितले.                         सोहम सुरेश उईक या आठव्या वर्गातील विद्यार्थीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट आपल्या खुर्चीत बसवले तर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कार्यालयात बोलवून त्याचा सत्कार केला. दररोज आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत चर्चा आणि आठवड्याला एक चित्रपट हा आयएएस होण्याचा सुकर मार्ग आहे अशी चर्चा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी करण्याऱ्या सोहम सुरेश उईक या आठव्या वर्गातील विद्यार्थीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट आपल्या खुर्चीत बसवले तर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कार्यालयात बोलवून त्याचा सत्कार केला.                                    चंद्रपूर हा ओघोगिक आदिवासी जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची कमी नाही, अनेक हुशार विद्यार्थी आज अधिकारी, डॉक्टर, अभियंता तसेच इतर मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरहळदी पंचायत समिती पोंभुर्णा या शाळेतील सोहम सुरेश उईके या विद्यार्थ्याने मागील आठवड्यात सकाळच्या सुमारास सायकलिंग करताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी सोहम उईके याने पोलीस अधीक्षक यांना भविष्यात आयएएस होण्याचे स्वप्न बोलून दाखविले. नियमित आठ तास अभ्यास, आठ तास झोप, एक तास मित्रांसोबत गप्पा आणि आठवड्याला एक चित्रपट या मार्गाने गेल्यास प्रत्येकाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईल असे सांगितले.                              आठव्या वर्गातील मुलाच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि इतक्या लहान वयात ग्रामीण आदिवासी भागातील आदिवासी समाजातील एक मुलगा आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे हे बघून पोलीस अधीक्षक अक्षरशः भारावले. त्यांनी सोहम ला पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे मन जिंकनाऱ्या सोहमला या दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यालयात बोलवून मनमोकळ्या गप्पा केल्या. त्याच्याशी पोलिस अधीक्षक यांच्याशी रस्त्यावर सहज चर्चा केली असता त्याने जीवनात काय करणार, किती अभ्यास करतो, त्याचे दैनंदिन वेळापत्रक काय या बाबीवर दिलखुलास उत्तरे दिली.

        त्याच्या बौद्धिक चातुर्यावर खुश होऊन त्याला आपल्या कार्यालयात बोलावून आपल्या खुर्चीवर बसण्याचा मान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्याच्या आईवडिलांशी चर्चा केली, सोहम याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्याला ध्येय प्राप्तीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 18, 2023

PostImage

डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी केली पूर परस्थितीत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी


 

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव जवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीला सततच्या मुसळधार पावसाने तुडुंब वाहत आहे यामुळे पिंपळगांव व आजूबाजूच्या परिसरात येथे पूर परस्थिती निर्माण झाली घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे,पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले संपूर्ण शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले गावातील अनेक घरात पाणी शिरल्याने वर्षभराचे साठवलेले धान्य, कपडे जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने गावातील नागरीक मोठ्या संकटात सापडले आहेत या ची माहिती मिळताच ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी पिंपळगांव गाठून पूर परस्थितीत नुकसान झालेली शेतीची पाहणी केली

            यावेळी चिमूर विधानसभा ब्रह्मपुरी विभाग तालुका अध्यक्ष नेताजी मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, ग्रामपंचायत  सरपंच सुरेश दुणेदार, ग्रामपंचायत सरपंच कालेता रामाजी पिल्लारे, ग्रामपंचायत उपसरपंच चांदली उपसरपंच संदीपजी बगमारे,माजी सरपंच खंडाळा, ग्रामपंचायत उपसरपंच पिंपळगांव जगदीशजी बनकर,कांग्रेस कार्यकर्ते गुड्डू बगमारे,तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सेशरावजी ठाकरे, अनिलजी शेबे,जयपालजी पारधी,दादाजी मिसार, गिरधर भाजीपाले, मनोहरजी ठाकरे, बंडूजी विधाते,बाळकृष्ण बागळे, संदीप मिसार, योगराज ठाकरे, भक्तप्रल्हाद शेंडे, गजाजन राऊत, व गावकरी मंडळी, कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते


PostImage

pramod abhiman raut

Sept. 17, 2023

PostImage

आता गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी


 

चिमूर प्रतिनिधी :-

          उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना आता पुढील पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला आहे. 

        या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.

 पहा काय सांगितले नगर विकास विभागाने

▪️ या निर्णयानुसार यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना 

▪️ पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांना करावी लागणार.

▪️ महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देतांना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेता येईल. 

▪️ तसेच उत्सवाकरिता यापूर्वी वेळोवेळी विहित केलेल्या शासन निर्णय, आदेश यानुसार अटी, शर्तीचे पालन मंडळांना करावे लागेल.

▪️ मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 17, 2023

PostImage

विघ्नहर्त्यासमोरच खराब रस्त्यांचे विघ्न..!


 

या वर्षीही गणरायाचे खड्डड्यांतूनच आगमन; रस्त्यांची डागडुजी करण्यात प्रशासन हतबल

चिमूर प्रतिनिधी :-


       गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही चिमूर वरोरा राज्य महामार्ग व तालुक्यांतील बाम्हणी, काग या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवणे प्रशासनाला अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे या वर्षीसुद्धा गणरायाचे आगमन खराब रस्त्यांतूनच होणार की काय, अशी परिस्थिती आहे. विघ्नहर्त्यांसमोरच असलेले हे खराब रस्त्यांचे विघ्न दूर करण्यासाठी तालुक्यांतील चिमूर वरोरा या राज्य महामार्गवरून व बामणी, काग येथील ज्या मार्गावरून गणरायाचे थाटामाटात आगमन होते अशा मार्गाची तरी डागडुजी करावी, अशी मागणी चिमूर वरोरा या राज्यमहामार्गावरील व बामणी, काग येथील वाहतूकदार नागरीक जोर धरू लागली आहे.


       चिमूर वरोरा या राज्य महामार्गावरील व तालुक्यातील बामणी, काग प्रमूख मंडळाच्या श्रीचे आगमन भव्य दिव्य मिरवणुकीने केले जाते. यामध्ये प्रामुख्याने बामणी, काग या मार्गावरून मिरवणुकी काढली जाते. मागील अनेक वर्षापासून चिमूर वरोरा व बामणी, काग या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. मात्र आता जास्तच रस्ता खराब झाल्यामुळे गणेशाच्या आगमनापूर्वी चिमूर, वरोरा, व बामणी, काग या प्रमुख रस्त्यांची डागडुजी तात्काळ करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. 


      येत्या मंगळवारी गणेश चतुर्थी असली तरी त्याच्या एक दिवस अगोदरच मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. काही मंडळांचे गणपती त्याच्याही अगोदर आणले जातात. त्यामुळे किमान आता येत्या एका दिवसांमध्ये चिमूर, खडसंगी, वरोरा, बामणी, काग रस्त्यावरील खड्डे भरले पाहिजेत. सध्या पावसानेही उघडीप दिली असल्याने रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याकडे प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने कानाडोळा न करता तात्काळ खड्डे पडले आहेत तर ते बुझविण्यात यावे. अशी मागणी गावकऱ्यांनी व हो को को ये - जा करणाऱ्या वाहतूकदारानी  केली आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

प्रत्येकवेळी रस्ते खराब का होतात?
      दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गणरायाच्या आगमनावेळी खराब रस्त्यांचा विषय चर्चेला येतो. पावसाळ्यापूर्वी तयार केलेले रस्ते चार-सहा महिन्यांतच खराब होतात. एका पावसातच बहुतांश नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची चाळण होते. खरे तर हा विषय गंभीर आहे. एकीकडे ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी त्या रस्त्याची जबाबदारी तीन ते सहा वर्षांपर्यंत दिली जाते. असे असताना जर प्रत्येकवेळी पावसाळ्यात रस्ते खराब होत असतील तर त्याच्या मागचे कारणही शोधण्याची गरज आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 15, 2023

PostImage

Gas Agency Dealership : गॅस एजन्सी सुरू करून लाखों रुपये कमवा, त्यासाठी ही आहे प्रक्रिया


 

चिमूर प्रतिनिधी:-

          Gas Agency Dealership : प्रत्येकाच्या घरात आज स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर करत आहे. देशात गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागात देखील चुलीचे प्रमाण कमी होऊन गॅसचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही देखील गॅस एजन्सी उघडून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायातून नोकरीपेक्षा जास्त कमाई होईल, असा हा व्यवसाय आहे.

        गॅस एजन्सीचे चार प्रकार आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम आणि निमशहरी गॅस वितरक. जर तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायची असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तसेच गॅस एजन्सी घेण्यापूर्वी तुम्हाला त्या क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल. म्हणजेच ती जागा कोणत्या परिसरातील आहे. जेणेकरून तुम्हाला त्या प्रकारच्या गॅस एजन्सीचा परवाना घेता येईल.
@@@@@@@@@@@@@@@@

lpg gas agency गॅस एजन्सी घेण्यासाठी पात्रता
         एलपीजी गॅस एजन्सी घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय असावा आणि त्याचे वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी पास असणं गरजेचं आहे.
कुटुंबातील कोणताही सदस्य तेल विपणन कंपनीचा कर्मचारी नसावा. गॅस एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी, 10 हजार रुपये आकारल्या जातील परंतु, हे शुल्क तुम्हाला परत मिळणार आहे.
तसेच गॅस एजन्सी उघडण्यासाठी तुमच्यासाठी 15 लाख रुपये असणं आवश्यक आहे. हे पैसे संपूर्ण गॅस एजन्सी बनविण्यासाठी, वापरले जाईल.

एलपीजी गॅस कनेक्शनच्या या कंपन्या Gas Agency Dealership
        gas agency भारतामध्ये भारत गॅस, इंडियन गॅस आणि एचपी गॅस, या तीन सरकारी कंपन्या आहेत ज्या गॅस सिलिंडर उपलब्ध करून देतात. या सरकारी कंपन्यांकडून गॅस एजन्सी करिता जाहिरात काढण्यात येत असते. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

गॅस एजन्सी कशी मिळवायची?
        गॅस एजन्सी मिळविण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठी तुम्हाला https://www.lpgvitarakchayan.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर अर्जदाराची मुलाखत घेतली जाईल. gas agency dealership 2023 मुलाखत घेतल्यानंतर चौकशी केल्या जाईल. चौकशी झाल्यानंतर लेटर ऑफ इंटर दिले जाते. यानंतर, तुम्हाला ज्या कंपनीची गॅस एजन्सी घ्यायची आहे, त्या कंपनीमध्ये तुम्हाला Security जमा करावी लागते. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या नावावर गॅस एजन्सी दिली जाईल.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 13, 2023

PostImage

आता एसटीबस च तिकीट बुक करण झालं सोप


 

चिमूर प्रतिनिधी :-

        एसटी महामंडळाने प्रवाशांना एक गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे आता IRCTC च्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट काढता येणार आहे. 

        प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी IRCTC ने हा निर्णय घेतला आहे. तसेच IRCTC आणि एसटी महामंडळ यांच्यातील एकत्रीकरणामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 12, 2023

PostImage

नागरिकांनो हॉस्पिटलच्या बिलाची चिंता करतायं! केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ठरतेय फायद्याची


 

चिमूर प्रतिनिधी :-

 

      केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या मार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते. केंद्र सरकारने ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 साली सुरु केली आहे.

      या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेतून 10 कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

     जर नागरिकांकडे आयुष्मान भारत योजनेंच कार्ड असेल तर त्या नागरिकाला भारतातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतो. जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्डधारक असाल आणि या योजनेत असणाऱ्या हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर तुम्ही तातडीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल करु शकता. यासंदर्भात तक्रार करायची असल्यास नागरीक राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14555 वर नोंदवू शकतात.

 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 12, 2023

PostImage

आता हि काही महत्वाची पदे भरली जाणार कंत्राटी पद्धतीने... जाणून घ्या कोणती पदे


राज्य सरकारचा मोठा निर्णय....

चिमूर प्रतिनिधी :-

       राज्य सरकारने सर्वच महत्त्वाच्या पदांवरील भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ९ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील काही कंपन्या राज्याबाहेरच्या आहेत आणि यात आरक्षणाला थेट कात्री लावण्यात आली आहे.

       सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण आता सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. 

       दोन कंपन्याना हे काम देण्यात आले होते. यामध्ये शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. 

       त्यानुसार यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आला असून तो सरकार देणार आहे. त्यातील पंधरा टक्के कमिशन कंपन्यांना मिळणार आहे.

       त्यामुळे सरकारी कार्यालयात आता अधिकारी ते शिपायापर्यंत सर्वच कंत्राटी पदे असणार आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


PostImage

pramod abhiman raut

Sept. 12, 2023

PostImage

साहेब सोयाबीन पिकाला लागलेल्या करपा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश केव्हा द्याल..?


 

प्रहार सेवक विनोद उमरे यांचा प्रशासनाला प्रश्न

चिमूर प्रतिनिधी :-

        चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील काही भागा मधील सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावामुळे संपल्यात जमा आहे. हा रोग झपाट्याने पसरत असल्याने शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन पीक ऐन जोमात असताना नुकत्याच आलेल्या अनोळखी रोगाला शेतकरी बळी पडले आहे. या रोगाची लक्षणे झाडे पिवळी पडणे व संपूर्ण झाड वाळत जाणे हे दिसून येत.यामुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पिकांची उपाययोजना संदर्भात पांढरी माशीच्या प्रभावामुळे करप्या रोग वाढत असुन बुरशीजन्य रोग आणि पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून  सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी या रोगामुळे व पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. झोपी गेलेल्या शासनाला जाग येईल काय? व शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे करतील काय? असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.

       चंद्रपूर जिल्ह्यात आधी पावसामुळं पिकांचे नुकसान तर आता सोयाबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे तरी झोपी गेलेल्या शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देतील काय? असा प्रश्न विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. चंद्रपूर येथील प्रहार सेवक यांनी शेतकरी राजांवर संकट येताच शेताची पाहणी केली आहे.

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळं खरिपातील उत्पादनात घट होणार असून, पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

         हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिप पिक जोपसताना शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. गतवर्षी खरिप पिकांचे नुकसान झाले होते यावर्षी देखील सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तालुक्यातील बाजारपेठ आणि नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे. मध्यंतरी पावसामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेच परंतु, आता ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवामानातील आर्द्रता वाढत असून बुरशी वाढीस वातावरण तयार झाल्याने सोयाबानची पाने ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात  सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पिकाची फेरपालट ही गरजेची आहे. मात्र, उत्पादनापोटी शेतकरी हे सोयाबीनलाच पसंती देत आहेत. खरिप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. यानंतर किडीची प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीची कामे करावी लागली होती. आता सोयाबीन बहरत असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघडीप दिली तर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023

PostImage

आमदार बंटी भांगडिया म्हणजे कलीयुगातील द्रौपदीचे रक्षण करणारा कृष्ण :- अभिनेत्री अमृता खानविलकर


 

भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमुरात भव्य दहीहांडी स्पर्धा संपन्न

चिमूर प्रतिनिधी :-

       चिमूरात भव्य दहीहंडी स्पर्धा नेहरू विद्यालयाच्या भव्य पटांगणावर पार पडला यावेळी चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर या मंचावर उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना अमृता खानविलकर यांनी म्हंटले की, महाभारत काळात द्रौपदीच्या अब्रूचे रक्षण भगवान श्रीकृष्णाने केले. आजच्या काळात आई बहिणींचे रक्षण करणारे आमदार म्हणजे बंटी भांगडिया हे कलीयुगातील कृष्णासारखेच आहेत. असे यावेळी सांगितले.

     पुढे म्हणाले की, आताच्या काळात स्वतःच्या पदरचे पैसे खर्च कोणी कोणासाठी करत नाहीत. मात्र बंटी भांगडिया हे आपल्या बहिणीला कुठं आर्थिक मदत कुठं शिक्षणासाठी मदत तर कुणाला स्वतःच्या पायावर रोजगार करता यावा यासाठी मदत असे आपल्या विधानसभा क्षेत्रात करीत असतात. तर विधानसभा क्षेत्रातील कोणाच्याही घरी जन्मलेल्या मुलींसाठी एफ. डी. च्या रूपात मदत करतात. आमदार बंटी भांगडिया करीत असतात. बंटी भांगडिया यांचा कार्यकर्ता अजूनही जीवंत आहे. त्यांनी स्वतःच्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली तेव्हापासूनचा कार्यकर्ता आजही जीवंत ठेवला. म्हणूनच ते मोठे नेता झाले. या नेत्याला आपण कितीही काही झालं तरी सर्व आई बहिणींनी साथ द्यायची असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर ( चंद्रमुखी फेम ) यांनी केले.

      भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या भव्य पटांगणावर 10 सप्टेंबर रोज रविवारला सायंकाळी सात वाजता 'दहीहंडी स्पर्धेचा' भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याच्या मुख्य अतिथी म्हणून मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर (चंद्रमुखी फेम) उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.

       यावेळी मंचावर चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (ओबीसी मोर्चा) राजू पाटील देवतळे, भाजपा चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, जेष्ठ नेते मनोहर मुंगले, माजी जि. प. सदस्य ममता डुकरे व भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

      सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या संबोधनानंतर प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहास्तव अमृता खानविलकर यांनी चंद्रमुखी चित्रपटातील 'सुंदरा' नृत्याची एक झलक सादर केली. त्यांच्या नृत्य अदांनी चिमुरकर व उपस्थित तरुण - तरुणी घायाळ झाले. दहीहांडी कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृता खानविलकर, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया यांनी गोविंदाच्या स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या दही हांडीचे विधिवत पूजन केले. आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते मंचावरील दहीहांडी फोडण्यात आली. त्यानंतर गोविंदांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023

PostImage

इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असल्याने राज्यातील काही मराठी शाळा इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय


 

चिमूर प्रतिनिधी :-

           इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तीत कराव्या लागणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करीत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांचीदेखील भरती केली जाणार आहे,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

        जिल्हा परिषदेच्या वतीने अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी या वेळी उपस्थित होते.

         इंग्रजी ही ज्ञानाची आणि जागतिक संवादाची भाषा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023

PostImage

चिमूर तालुक्यात कृषी महाविद्यालय दया :-


 

युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांची मागणी 

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर तालुका हा जिल्ह्याच्या उंबरठयावर आला असून तालुका शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळं चिमूर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी चिमूर युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांनी केली आहे. 

       चिमूर तालुका हा क्रांती तालुका असून आता अप्पर जिल्हा झालेला आहे. अनेक शासकीय कार्यालय चिमूरात आहेत. चिमूर हा आता  जिल्ह्याच्या उंबरठयावर आहे. येथे उपविभागीय कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय असून बीए, एमए, आठवले समाजकार्य महाविद्यालय, विज्ञान विषय असलेले महाविद्यालय सुद्धा आहे. मात्र विद्यार्थ्यांना कोणताही डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर बाहेरील तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असते. त्यामुळं जाण्यायेण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागत असतो. चिमूर हा क्रांती जिल्हा होण्याच्या मार्गावर असून आजुबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा शिक्षण घेण्यासाठी बाहेर जिल्ह्यात तालुक्यात जाता येऊ नये आपल्याच जिल्ह्यात शिक्षण घेउन डिप्लोमा कोर्स पूर्ण करता यावा. याकरिता चिमुर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी युवक कांग्रेस चे माजी विधानसभा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप कावरे यांनी केली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 9, 2023

PostImage

उद्या चिमुरात भव्य दहीहांडी स्पर्धेचे आयोजन


 

सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती

भांगडिया फॉउंडेशन चे आयोजन

चिमूर प्रतिनिधी :-

       चिमूर विधानसभा क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय असणाऱ्या भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने उद्या 10 सप्टेंबर रोज रविवार ला सायंकाळी 4 वाजता नेहरू विद्यालय चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       या निमित्त मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चंद्रमुखी फेम सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार मितेश भांगडिया यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया राहणार आहेत.

         चिमूर विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात भांगडिया फॉउंडेशनचे मोठे योगदान आहे. फॉउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, क्रीडासह अनेक क्षेत्रात विविध जनतेची कामे करण्यात येत आहे. तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा यांच्या मार्फतीने करण्यात येते. दरवर्षी चिमूर शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा उद्या 10 सप्टेंबर रोज रविवार ला नेहरू विद्यालय चिमूर येथे सायंकाळी चार वाजता भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस 33,333 रुपये तर द्वितीय बक्षीस 22,222 रुपये रोख असे ठेवण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेचे विशेष आकर्षण  मराठी चित्रपटातील नामवंत सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार मितेश भांगडिया यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडी स्पर्धेला जास्तीत जास्त गोविंदा पथकानी नोंदणी करण्याचे आवाहन भांगडिया फॉउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 8, 2023

PostImage

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी..! शेतीसाठी या योजनेतून मिळतेय भरघोस अनुदान


चिमूर प्रतिनिधी :-

            महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2015-16 पासून राबवण्यात आली आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जाते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. 
              प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी 45 टक्के अनुदान दिले जाते. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.                                            शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, शेतकऱ्याच्या जमिनीचं कागदपत्र, बँक पासबूक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आवश्यक आहे. तसेच इच्छुक आणि पात्र शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 8, 2023

PostImage

भिसीत भर पावसात जनसंवाद यात्रेचा उत्स्फूर्त प्रतिसाद


चिमूर प्रतिनिधी :-

         महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार तसेच तालुका काँग्रेस कमिटी चिमुर यांच्या नेतृत्वात भिसी येथील जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली तसेच नागरिकांशी संवाद साधला आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयाने जनता त्रस्त आहे. समाजातील सर्वच घटक नाराज असल्याने गरीब लोकांचे कसे हाल होत आहेत याबाबत लोकांना समजावून सांगितले.

         जनसंवाद पदयात्रा भिसी येथे सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आगमन झाले असता जोराचा पाऊस सुरू झाला मात्र याही परिस्थीतीमध्ये भर पावसात मोठ्या संख्येने नागरिक जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्तपणे सहभागी होत मोठया प्रमाणात पाठिंबा दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी कसा नागरिकांचा छळ व उद्योजकांना कश्या सवलती तसेच नवनवीन शासनाच्या योजना पुरवत असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून लोकांना पटवून देण्याचे काम या पदयात्रेत सुरू आहे. याप्रसंगी प्रामुख्याने मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक धनराज मुंगले यांनी सत्ताधारी पक्षाची पोलखोल केली.

       यावेळी मंचावर तसेच पदयात्रेत उपस्थित सतीश वारजूरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रा राम राऊत सेवादल काँग्रेस, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय गावंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मेहर, शहर काँग्रेस कमिटी चिमूर अविनाश अगडे, चंद्रशेखर गिरडे शहर काँग्रेस कमिटी, कृष्णा जी तपासे, विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, कादरभाई शेख ज्येष्ठ नेते काँग्रेस भिसी, पप्पू शेख, तुळशीरामजी बनसोड माजी जिल्हा परिषद सदस्य, घनश्याम  येरुंनकर ज्येष्ठ नेते,  शमीजी शेख, वामन गेडाम ज्येष्ठ नेते, प्रदीप तळवेकर शहराध्यक्ष ओबीसी, राजू दांडेकर, नागेंद्र चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, रामदास चौधरी, किसनजी कुंमले, संजू मुंगले, किशोर कामडी, जितु ठोंबरे, मधु मुंगले, मुरलीधर जी निमजे, शत्रुघ्न डोये, सुरेश वंजारी, तसेच असंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 7, 2023

PostImage

वैदर्भीय कलावंत संमेलनात विदर्भातील अकारा जिल्ह्यातील कलावंतांची उपस्थिती


 

चंद्रपुरात पार पडले पाहिले वैदर्भीय कलावंत सम्मेलन

चिमूर प्रतिनिधी :-

       झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील नाटयपंढरी म्हणून ओळखली जाते. विदर्भात सर्वात जास्त मनोरंजन कर हा झाडीपट्टी रंगभूमीमधूनच राज्य शासनाला प्राप्त होतो. तरीही झाडीपट्टी रंगभूमी ही ग्रामीण आदिवासी बहुमुलखातील हौशी रंगभूमी असल्यामुळे येथील कलावंत मुंबई - पुण्यापर्यंत कधीच पोहचू शकला नाही. येथील ग्रामीण कलावंतांच्या कलेला जागं करुन वैदर्भीय लोककला जिवंत ठेवण्याचे काम मायबोली झाडीपट्टी रंगभूमी गेली दोनशे वर्षा पासून करीत आहे.
      येथिल हौशी कलावंतांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कलेला प्रसिद्धी मिळावी, स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, या हेतूने दिनांक पाच सप्तेबर रोजी चंद्रमणी नॅशनल पार्क येथे पहिले 'वैदर्भीय कलावंत संमेलन' आयोजीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला विदर्भातील अकरा जिल्ह्यातील कलावंत हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार तथा पद्मश्री डॉ.परशुराम खुने यांचे हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. इसादासजी भडके, पमार्गदर्शक प्रसीद्ध कव्वाल सोमनाथदादा गायकवाड, तर प्रमुख अतीथी म्हनुन जेष्ट कलावंत के.आत्माराम, मुकेश गेडाम, कार्यक्रमाचे आयोजक सारिका उराडे स्वागताध्यक्ष म्हणून राहुल पेंढारकर उपस्थित होते.
          याप्रसंगी झाडीपट्टी रंगभुमीवर सेवा देना-या रंगकर्मींसोबतच भजन मंडळ, तमाशा, गोंधळ, आदिवासी दंडार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक विदर्भातील विवीध लोककलावंतांचा सत्कार करन्यात आला. प्रसंगी पद्मश्री डॉ.परशुराम खुने, के.आत्माराम, मुकेश गेडाम, पंकज भाऊ खंदारेअकोला, जयंत साठे नागपूर, भारती हिरेखन नागपूर, देवा कावळे, आर्गनवादक गुरु कुमरे, तबलावादक पृथ्वी लोखंडे, गायीका जया बोरकर, गायीका प्रतीभा लोखंडे, युवराज प्रधान, एक्टोपॅडवादक जॉली मेश्राम, गायक शनी मेश्राम, तबलावादक चन्द्रमनी मेश्राम, नालवादक राजेन्द्र गेडाम सोबतच विवीध क्षेत्रात काम करना-या कलावंतांचा सन्मान भारत सरकार मान्यता प्राप्त कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने करण्यात आला.

'कुरमाघर' हे नाटक समाज परिवर्तनाचे माध्यम - पद्मश्री डॉ. परशुराम खुणे 

         वैदर्भीय कलावंत संमेलनात कुरमाघर या दोन अंकी नाटकाचे डॉ परशुराम खुणे यांचे हस्ते पोस्टर प्रकाशित करण्यात आले. आदिवासी अतिदुर्गम भागात महिलांच्या मासिक धर्माच्या दरम्यान, त्यांना गवत, बांबू, ताटव्यानी बनलेल्या मातीच्या घरात ठेवण्याची प्रथा-परंपरा काळानुरुप प्रचलित आहे, ह्यालाच कुरमाघर असे म्हणतात. पावसाळ्यात अनेक आदिवासी स्त्रियांना पायपीट करावी लागते, अशावेळेस अस्वच्छतेमुळे जंतू-संसर्ग, साप विंचू चावून कुरमाघरात स्त्रिया मृत्यू मुखी पडल्याच्या अनेक घटना  घडल्या आहेत. अशा प्रथा परंपरांना नाहीत जमा करण्यासाठी, आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ प्रस्तुत, राहुल पेंढारकर लिखीत "कुर्माघर" अर्थात मुक्त झाले मी ?  हे दोन अंकी गोंडी झाडीबोली नाटक समाज परिवर्तनाचे माध्यम ठरत रंगभूमीवर पदार्पण करीत आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 7, 2023

PostImage

म.रा.शि.प. जिल्हा चंद्रपुरच्या वतीने धरणे आंदोलन


 

चिमूर प्रतिनिधी :- 

           राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शिक्षक दिनाच्या दिवशी  5 सप्टेंबर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर च्या वतीने जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमो धरणे आंदोलन करण्यात आले. ५ सप्टेंबरला संपूर्ण भारतभर शिक्षकदिन साजरा होत आहे . त्यानिमित्ताने शिक्षकांना ब्रम्हा , विष्णु ,महेश संबोधून त्यांचा सत्कार करण्यात येणार ? दुसरीकडे मात्र याच शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कां पासून त्यांना वंचित ठेवण्याचं पातक शासन करीत आहे .
(1) राज्यातील संपूर्ण राज्य शासकीय कर्मचार्यांना १०, २०, ३० ( सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना )  लागू करण्यात आली आहे . मात्र शिक्षकांना जाणीवपूर्वक या योजनेपासून वंचित ठेवून शिक्षक समुदायाचा अपमान करण्यात आला आहे .
 2)२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजनेच्या न्याय हक्कापासून वंचीत ठेवण्यात आले आहे .
३) - प्रशांत बंब यासारखे अविचारी आमदार शिक्षकांप्रती गरळ ओकत असताना शासनमात्र मुग गिळून गप्प बसले आहे .
४)- शिक्षकांना शिक्षणाचे कार्य सोडून विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामात गुंतवून एक प्रकारे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देवून अनुदानित मराठी / हिंदी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा छुपा अजेंडा राबविला जात आहे .
५) - अंशत : अनुदानित शाळांना अनुदान घोषीत केल्यानंतरही जाणीवपूर्वक आदेश वितरीत करण्यात   येत नाही . त्यांच्या नियमित वेतनाचाही प्रश्न प्रलंबित आहे .
६) - शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून राज्यातील सर्व वेतनपथक कार्यालयाचे महालेखाकार यांचे मार्फत लेखा परीक्षण झाल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश नक्कीच होईल.
७) - त्याच प्रमाणे शिक्षकांना कॅशलेश मेडीकल योजना सुरू करणे , संचमान्यता दुरुस्ती प्रकरणे . विद्यार्थ्यांना आधार सक्ती न करणे आदी  विविध न्याय मागण्याचे संदर्भात शिक्षक दिनाचे दिवशीच शिक्षकांनी न्यायासाठी रस्यावर उतरावे यासारखे दुर्दव्य ते काय ?
      महाराष्ट्र  शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी  मंगळवार दि .५ सप्टेंबर २०२३ ला दु . ३ ते ५ या वेळात जिल्हा परिषद  व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे शांततेच्या मार्गाने मुक धरणे आंदोलन करण्यात आले .
          यावेळी विलास खोंड जिल्हाध्यक्ष ,दिलीप मॕकलवार जिल्हाकार्यवाह ,वंसत वडस्कर शहर कार्यवाह ,विवेक आंबेकर काॕन्व्हेंट विभाग प्रमुख ,चवले सर ,पेचे सर ,बुटले सर ,संदिप बद्दलवार ,रविंद्र टिकले ,तथा म.राशि.प.चे पदाधिकारी ऊपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 5, 2023

PostImage

...म्हणून आजच्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो; वाचा संपूर्ण इतिहास..!!


 

चिमूर प्रतिनिधी:-

 `गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. चला तर मग जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास आणि महत्त्व...

शिक्षक दिनाचा इतिहास

      डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर1888 रोजी झाला. ते एक विद्वान शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून भारताचे भविष्य सुधारण्यात घालवले. शिक्षक म्हणून त्यांचे योगदान आणि मोलाचे काम लक्षात राहील म्हणून प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

 शिक्षक दिनाचे महत्त्व

       विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेच आहे. यावरून शिक्षणाची महती अधोरेखित होते.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 4, 2023

PostImage

आधी पावसामुळं पिकांचे नुकसान तर आता सोयाबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव


 

 तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या.. प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

चिमूर प्रतिनिधी :-

        शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. चिमूर येथील प्रहार सेवक यांनी शेतकरी राजांवर संकट येताच शेताची पाहणी करुन अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनादवारे केली आहे.

       मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळं खरिपातील