STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
03-10-2023
खाजगीकरण व कंत्राटीकरण भरतीला कडाडून विरोध
चिमूर प्रतिनिधी :-
राज्य सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून 6/9/2023 रोजी शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतला.त्यामुळे लाखो सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीचे संकट येणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करणारा निर्णय आहे. संविधानातील समान काम , समान वेतन पायदळी तुडविल्या जाईल. लगेच 18/9/2023 रोजी शासणाने एक शासणनिर्णय काढुन शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. 65 हजार शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला.पुन्हा लगेच 20/9/2023 ला 20पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला.यामुळे सर्वसामान्य गरीब व होतकरू तसेच हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.ग्रामीण भागातील मुले दुरवरच्या शाळेत जाणे शक्य नाही.
शाळा बंद, नोकर भरती बंद,शाळांचे खाजगीकरण, नोक-यांचे कंत्राटीकरण करूण शिक्षण व शाळा संपविण्याचा विडा उचलला आहे. कंत्राटी भरतीमूळे वाशीलेबाजी, आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभार, अपारदर्शकता असे प्रकार घडू शकतात.सध्या तहसीलदार पदांची कंत्राटी भरती केली जाणार आहे तर काही दिवसांनी जिल्हाधिकारी यांची सुद्धा पदभरती होऊ शकते
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
राज्य सरकारने विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध व्हावा व प्रशासकीय खर्चात काटकसर व्हावी यासाठी रिक्त जागेवर बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.या निर्णयामुळे आरक्षण , शिक्षण , नोकरी, पेंशन संपविण्याचा घाट घातला जात आहे. अन्यायकारक शासण निर्णय रद्द न केल्यास प्रचंड जन आक्रोशाला समोरे जावे लागेल.
कवडू लोहकरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments