बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
18-08-2023
अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
चिमूर प्रतिनिधी :-
नेरी पोस्ट ऑफिस मध्ये मागील 6 महिन्यापासून लिंक नसल्याचा तगादा अधिकारी लावत असून नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत होते. त्यातच अधिकारी यांची ग्राहकांशी असभ्य वागणुक व सामान्य ग्राहकांना साधे पिण्याचे पाणी सुध्दा उपलब्ध होत नव्हते यामुळे नागरिक चांगलेच त्रासले होते. त्यातच आज दिनांक 17 ला काही ग्राहक कार्यालयात गेले असता बरडे या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अर्वाच्य भाषेत बोलून हाकलले त्यानंतरही गेलेल्या नागरिकांना हाच अनुभव आल्याने ग्राहकांचा जमाव झाला. त्यानंतर नेरी व्यापारी अशोशियन आक्रमक होत नागरिकांनी कार्यालयाला कुलूप लावण्याची धमकी देत असताना सुध्दा अधिकाऱ्यावर परिणाम होत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले.
त्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी केली असता पोस्ट ऑफिस येथे दारूच्या बाटल्या आढळल्याने एकच खळबळ उडाली सदर वार्तेने शेकडोच्या संख्येनी पोस्टाचे खातेदार तसेच व्यापारी वर्ग नागरिक घटनास्थळी जमा झाले व पोस्टाला घेराव घालण्याचा प्रकार घडला या आफिस मध्ये दोन रिकाम्या तर एक बॉटल भरून दारू आढळून आले यामुळे नेरी येथील नागरिक व्यापारी वर्ग संतप्त झाले त्यामुळे काही तास जमाव जमा होता पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याला अटक करा अश्या घोषणा देऊ लागल्या तेव्हा पोलिसांनी अधिकाऱ्याला ठानेदार गभणे या॓नी ताब्यात घेताच जमाव शांत झाला.
नेरी येथील पोस्ट ऑफिस मध्ये असंख्य नागरिकांचे व्यापारी वर्गाचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे खाते असून नियमित व्यवहार सुरू असायचा मात्र मागील सहा महिन्यांपासून लिंक फेल असल्याने अनेक खातेदार त्रासून गेले होते सदर बाबतीत अनेकदा तक्रारी करण्यात येऊन सुद्धा नेहमीच लिंक फेल यामुळे पोस्ट अधिकारी बरडे याना विचारणा करण्यात आली असता नेहमीच उद्धट उत्तरे पोस्ट अधिकारी बरडे देत होते आणि मनमर्जी कारभार करीत होते मनाला वाटेल तेव्हा सुट्टी ,कधी सुट्टी टाकत नव्हते खातेदारांना मानहानीकारक वागणूक देत होते तेव्हा सर्वच खातेदार कमालीचे नाराज होते असे खातेदार सांगत होते मात्र एक दिवस कार्यालयात दारू पिताना एका खातेदाराला आढळून येताच सदर अधिकारी हा दारुडा असून हेतुपुरस्सर कामकाज करीत नसल्याचा नागरिकांत चर्चा सुरू झाल्या तेव्हा अति महत्वाचे कामानिमित्त व्यापारी वर्ग पोस्टात दाखल झाले असता त्यांना सुद्धा उद्धट बोलून लिंक फेलचा बहाना केला तेव्हा मात्र खातेदार व्यापारी वर्गाणी पोलिसांना पाचारण केले आणि ऑफिस ची चौकशी करण्याची विनंती केली असता ऑफिस मध्ये दोन रिकाम्या बाटल्या व एक भरलेली बाटली आढळून आली त्यामुळे नेहमीच बरडे नामक अधिकारी दारू पिऊन असभ्य वागणूक देत होता असा आरोप नागरिकांनी केला आणि सदर अधिकाऱ्याला अटक करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
पोस्ट मास्टर बरडे या॓ना पोलीसा॓नी ताब्यात घेतल्यानंतर अधिकारी यांनी नागरिकांना शांत राहण्याची सूचना केली त्यामुळे जमाव शांत झाला. सदर कारवाई चिमूर पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या नेतूत्वात करण्यात आली पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.
सदर ग्राहकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे, व पोस्ट ऑफिस चे कार्यालयं खाली आणण्यात यावे अशी मागणी नेरी व्यापारी अशोशियनसह नागरिकांनी केलेली आहे.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments