संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
09-09-2023
सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती
भांगडिया फॉउंडेशन चे आयोजन
चिमूर प्रतिनिधी :-
चिमूर विधानसभा क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय असणाऱ्या भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने उद्या 10 सप्टेंबर रोज रविवार ला सायंकाळी 4 वाजता नेहरू विद्यालय चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चंद्रमुखी फेम सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार मितेश भांगडिया यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया राहणार आहेत.
चिमूर विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात भांगडिया फॉउंडेशनचे मोठे योगदान आहे. फॉउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, क्रीडासह अनेक क्षेत्रात विविध जनतेची कामे करण्यात येत आहे. तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा यांच्या मार्फतीने करण्यात येते. दरवर्षी चिमूर शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा उद्या 10 सप्टेंबर रोज रविवार ला नेहरू विद्यालय चिमूर येथे सायंकाळी चार वाजता भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस 33,333 रुपये तर द्वितीय बक्षीस 22,222 रुपये रोख असे ठेवण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेचे विशेष आकर्षण मराठी चित्रपटातील नामवंत सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार मितेश भांगडिया यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडी स्पर्धेला जास्तीत जास्त गोविंदा पथकानी नोंदणी करण्याचे आवाहन भांगडिया फॉउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments