RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
07-09-2023
चिमूर प्रतिनिधी :-
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर च्या वतीने जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमो धरणे आंदोलन करण्यात आले. ५ सप्टेंबरला संपूर्ण भारतभर शिक्षकदिन साजरा होत आहे . त्यानिमित्ताने शिक्षकांना ब्रम्हा , विष्णु ,महेश संबोधून त्यांचा सत्कार करण्यात येणार ? दुसरीकडे मात्र याच शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कां पासून त्यांना वंचित ठेवण्याचं पातक शासन करीत आहे .
(1) राज्यातील संपूर्ण राज्य शासकीय कर्मचार्यांना १०, २०, ३० ( सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ) लागू करण्यात आली आहे . मात्र शिक्षकांना जाणीवपूर्वक या योजनेपासून वंचित ठेवून शिक्षक समुदायाचा अपमान करण्यात आला आहे .
2)२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजनेच्या न्याय हक्कापासून वंचीत ठेवण्यात आले आहे .
३) - प्रशांत बंब यासारखे अविचारी आमदार शिक्षकांप्रती गरळ ओकत असताना शासनमात्र मुग गिळून गप्प बसले आहे .
४)- शिक्षकांना शिक्षणाचे कार्य सोडून विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामात गुंतवून एक प्रकारे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देवून अनुदानित मराठी / हिंदी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा छुपा अजेंडा राबविला जात आहे .
५) - अंशत : अनुदानित शाळांना अनुदान घोषीत केल्यानंतरही जाणीवपूर्वक आदेश वितरीत करण्यात येत नाही . त्यांच्या नियमित वेतनाचाही प्रश्न प्रलंबित आहे .
६) - शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून राज्यातील सर्व वेतनपथक कार्यालयाचे महालेखाकार यांचे मार्फत लेखा परीक्षण झाल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश नक्कीच होईल.
७) - त्याच प्रमाणे शिक्षकांना कॅशलेश मेडीकल योजना सुरू करणे , संचमान्यता दुरुस्ती प्रकरणे . विद्यार्थ्यांना आधार सक्ती न करणे आदी विविध न्याय मागण्याचे संदर्भात शिक्षक दिनाचे दिवशीच शिक्षकांनी न्यायासाठी रस्यावर उतरावे यासारखे दुर्दव्य ते काय ?
महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि .५ सप्टेंबर २०२३ ला दु . ३ ते ५ या वेळात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे शांततेच्या मार्गाने मुक धरणे आंदोलन करण्यात आले .
यावेळी विलास खोंड जिल्हाध्यक्ष ,दिलीप मॕकलवार जिल्हाकार्यवाह ,वंसत वडस्कर शहर कार्यवाह ,विवेक आंबेकर काॕन्व्हेंट विभाग प्रमुख ,चवले सर ,पेचे सर ,बुटले सर ,संदिप बद्दलवार ,रविंद्र टिकले ,तथा म.राशि.प.चे पदाधिकारी ऊपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments