ProfileImage
170

Post

1

Followers

0

Following

PostImage

MH 33 NEWS

Dec. 4, 2024

PostImage

गडचिरोली : जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने


तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड तालुक्यासह अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. भूकंपाचे धक्के ७:२९ मिनिटांनी गडचिरोली शहरातील काही शहर वासियांनी सुद्धा जाणवले आहे.या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.

संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली 

अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Dec. 3, 2024

PostImage

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप


 

गडचिरोली:-

३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो.
जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना 'सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे' ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता विविध प्रकारचे पुनर्वसनात्मक शिक्षण व प्रशिक्षनात्मक कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद द्वारा वर्षभर आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जागतिक दिव्यांग दिनाचे' आयोजन करण्यात आले.
 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित सदस्य रामदास मसराम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकीत्सक माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सतिश साळूंखे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजीत राउत उपस्थित होते.

या 'जागतिक दिव्यांग दिनाचे' औचित्य साधुन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचेद्वारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना यु. डी. आय. डी. कार्ड, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, विविध साहित्य व उपकरणे तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सामूहिक तथा वैयक्तिक विविध कल्याणकरी योजनेचे लाभ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली यांचेद्वारा दिव्यांग युवकांकरीता निःशुल्क आयोजित करण्यात येत असलेल्या 'कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमा'चे उद्घाटन श्री रामदास मसराम व श्री. आर. आर. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रशिक्षण निवड प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. 
यावेळी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


PostImage

MH 33 NEWS

Dec. 3, 2024

PostImage

बालकांमधील जन्मता आजाराकरिता शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर 48 बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया


 

गडचिरोली:-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, उपचार करिता “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून सदर डीईआयसी मध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार, व इतर आढळलेल्या बालकांच्या आरोग्य  तपासण्या व उपचार केले जातात.
             बालकांच्या शस्त्रक्रियेच्या निदान व नियोजनकरिता जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ सतीशकुमार साळुंखे, डॉ. बागराज धुर्वे, सामान्य रुग्णालय गडचिरोली, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर, बाल आरोग्य विभाग गडचिरोली तर्फे बालकांमधील जन्मता असणारे दोष बाबत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर व बालकांमधील शस्त्रक्रिया या विषयावर सीएमई-प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी डीईआयसी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले.  जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, अति जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बालरोग तज्ञ डॉ. तारकेश्वर उईके व डॉ. प्रशांत पेंदाम, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बाल तपासणी शिबीर व प्रशिक्षण पार पडले. संदर्भित विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी सीएमई-प्रशिक्षणाकरिता नागपूर येथील प्रसिद्ध डॉ.राउत वरिष्ठ बालरोग शल्य चिकित्सक तज्ञ व चमू  लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथील तज्ञ उपस्थित झाले.
           शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील शालेय तपासणी दरम्यान आढळून आलेले तसेच इतर ठिकाणाहून संशयित संपूर्ण संदर्भित बालके/विध्यार्थी यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी उपस्थित विषेशज्ञ यांच्याकडून निदान निश्चिती करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ विद्यार्थी/बालके यांनी लाभ घेतला. यामध्ये हर्निया, हायपोस्पाडीस, हायड्रोनेफ्रोसीस, अनडीशेंडेड टेस्टीस, फायमोसीस, व इतर पात्र बालकांची शस्त्रक्रियेसाठी तृतीय स्तरावर संदर्भ सेवे करिता नियोजन करण्यात येणार आहे.  सदर सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. राज्य सामंजस्य करार असलेल्या रुग्णालयाशी समन्वय साधून वेळोवेळी उच्च स्तरीय शल्यचिकित्सक विशेषज्ञ सल्ला सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय विशेष चाचण्या व इतर प्रक्रिया चे सनियंत्रण करून डीईआयसी मार्फत शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित करण्यात येणार आहे.
           यापूर्वी जन्मजात आजाराच्या निदान निश्चिती करिता तपासणीसाठी गडचिरोलीच्या रुग्णाला नागपूर, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे. परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसतात. त्यामुळे बऱ्याच बालकांना निदान व उपचारासाठी मुकावे लागत होते. बालकांमध्ये जन्मता असणारा आजार आहे किंवा नाही हे ओळखून पालकांना लक्षात यायला खुप उशिर लागतो. जितके लवकर निदान तितका लवकर उपचार, परंतु डीईआईसीमुळे या निदान निश्चितीसाठी आता जिल्हातील रुग्णाला व त्याच्या पालकांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही. लहान मुलांमधील जन्मता असणारे  व इतर आजारासाठी डीईआयसी एक पर्वणीच ठरली आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Dec. 3, 2024

PostImage

कांतारा फेम ऋषभ शेट्टी दिसणार शिवरायांच्या भूमिकेत, कधी येणार चित्रपट ? कोण आहे चित्रपटाचा दिग्दर्शक?


 

मुंबई - 'कंतारा' या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेला अभिनेता ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.  ‘द प्राईड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचं नाव आहे. संदीप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. निर्मात्यांनी अलीकडंच या चित्रपटाचं एक लक्षवेधी पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि इतर तपशील जाहीर केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'ऋषभ'चा नवा लूक

निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीचा लूक समोर आला आहे. छत्रपती शिवाजीच्या लूकमध्ये ऋषभ कमालीचा शांत दिसत आहे. हातात तलवार घेऊन ऋषभ आपल्या पारंपारिक रूपातील शिवाजी महाराजांचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमचा सन्मान भारताचा महान योद्धा राजा - प्राइड ऑफ इंडिया: द एपिक गाथा ऑफ छत्रपती शिवाजी महाराज".

चित्रपट कधी प्रदर्शित होणार

निर्मात्यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्येच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. त्यांनी पुढे लिहिलंय की, "हा केवळ एक चित्रपट नाही - हा एका योद्धाच्या सन्मानार्थ एक युद्धगर्जना आहे. ज्या छत्रपतींनी सर्व अडचणींशी लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि कधीही विसरता येणार नाही असा वारसा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांची अनोळखी कहाणी उलगडत असताना एका वेगळ्या सिनेमॅटिक अनुभवासाठी आणि मॅग्नम ऑपस अ‍ॅक्शन ड्रामासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे."


PostImage

MH 33 NEWS

Dec. 3, 2024

PostImage

मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल’, ‘मातोश्री’वरील बैठकीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?


 

मुंबई:-मुंबई पालिका निवडणूक होईपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल आणि निवडणुकीतील हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं ते करेल, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. तर सध्या सुरू असलेल्या नाट्यात एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपची मोठ्या शक्ती असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंचं करतील. आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे. उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


PostImage

MH 33 NEWS

Dec. 2, 2024

PostImage

डीईआयसी येथे ‘बालकांच्या डोळ्यांचे आजार’ तपासणी शिबीर संपन्न


 

गडचिरोली,(जिमाका):-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय चाचणी/तपासणी व शस्त्रक्रिया करिता तृतीय स्तरीय संदर्भ सेवा इत्यादींकरिता राज्यशासनाच्या मार्गदर्शकानुसार “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून बालआरोग्य  विभाग  “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित आहे.
       सदर डीईआयसीयेथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणाहून प्राथमिक तपासणी दरम्यान आढळून आलेले बालके/विद्यार्थी ज्यांना पुढील तपासणी, निदान निश्चिती, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, उच्चस्तरीयउपचार, अश्या द्वितीय स्तरीय सेवांची गरज असते अश्या बालकांची डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी केली जाते. डोळ्याचे आजार असलेल्या बालकांच्या डोळ्याचे निदान निश्चिती साठी बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला आवश्यक असणाऱ्या बालकांकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये साराक्षी नेत्रालय नागपूर येथील उच्च स्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ चमू उपस्थित झाली. शिबिर मध्ये जिल्ह्यातील एकूण ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यांचा पालकांना डोळ्यांच्या आजाराबाबत, शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी ज्या  बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे या बालकांच्या विशेष चाचण्या करून शस्त्रक्रियेकरिता पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन होणार असून काही नवजात बालकांना शिघ्र हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर या चिमुकल्यांना शस्त्रक्रियेकरिता उच्चस्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन झालेले आहे. 
       या सर्व सेवा निशुल्क आणि मोफत तसेच बाहेरील तज्ञ जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने बालकांचे पालक समाधानी आहेत. 
        लहान बालकांच्या डोळ्यासंदर्भात, दृष्टीसंदर्भात वेळीच आणि लवकर हस्तक्षेप करणे गरजेच आहे. तसे न केल्यास मूल्यांच्या वाढीच्या टप्प्यावर परिणाम होण्याचे संकेत असते. व भविष्यात मोठ्या संकटांना समोर जाव लागू शकतो.   
         सदर ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके,  डॉ.धुर्वे सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या नियोजनाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डीईआयसीतील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Dec. 2, 2024

PostImage

जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन समानतेने जगण्याचा संदेश


 

गडचिरोली : १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महावि‌द्यालयाच्या  सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. तर  डॉ नागदेवते  यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले.  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी "मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे. डॉ. दुर्वे, डॉ. साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, CSO डॉ. अभिषेक गव्हारे, जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका, एआरटी, ICTC व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महावि‌द्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या वि‌द्यार्थिनीनी एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली  येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाटय सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली. 

कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.


PostImage

MH 33 NEWS

Dec. 2, 2024

PostImage

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्या.   खासदार डॉ. नामदेव किरसान यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे मागणी


 

गडचिरोली : गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सितारामन यांची दिल्ली येते संसद भवनाच्या कार्यालयात भेट घेतली.
 गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास क्षेत्र असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही, बऱ्याच गावात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे  अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागते. लोकसभा क्षेत्रात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्याने लोकसभा क्षेत्रात  बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अश्या परिस्थिती गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणा करीता केंद्र शासनाच्या वतीने किमान 10 हजार कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेज ची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या भेटी दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे केली.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 22, 2024

PostImage

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्‍या, गडचिरोतील 26 फेऱ्या आणि अहेरीत 22 फेऱ्या निवडणूक निरीक्षक यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी


 

गडचिरोली, दि.22 :- 23 जून रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा  व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर 69-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत  त्यांनी सूचना दिल्या.
मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ : 
67-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 23 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 88 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
68-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 26 फेऱ्या, 10 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 80 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
69-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी 14 इव्हीएम टेबल, 22 फेऱ्या, 9 टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी 2 टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण 89 मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात असून यात 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत. 

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध: मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 22, 2024

PostImage

मतदानात पाच टक्के वाढ 


 

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाले आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तीन दशकानंतर राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे आता वाढलेली मते नेमकी कुणाच्या पारड्यात गेली आणि याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, याची उत्कंठा आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.२९ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राज्यात मतदानाची टक्केवारी ६१.१ होती. या दोन्हीच्या तुलनेत यावेळी पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल ७५.२६ टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले आहे. सर्वांत कमी ५२.०७ टक्के मतदान हे मुंबई शहर जिल्ह्यात झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार नगर (७१.७३), बुलढाणा (७०.६०टक्के), चंद्रपूर (७१.२७टक्के), हिंगोली (७१.१०टक्के), जालना (७२.५३टक्के), नंदुरबार (७०.५१टक्के), परभणी (७०.३८ टक्के), सांगली (७१.८९ टक्के), सातारा (७१.७१ टक्के), यवतमाळ (७०.८६ टक्के) या दहा जिल्ह्यांनी सात दशकी टक्केवारी गाठली आहे.


मुंबईतील कुलाबा (४४.४४ टक्के) हा सर्वांत कमी मतदान झालेला मतदारसंघ ठरला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५.७७ टक्के तर ठाणे जिल्ह्यात ५६.०५ टक्के मतदान झाले आहे. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा ७१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्वाधिक मतदान हे या वेळी झाले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 21, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान


 

गडचिरोली :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात  76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले. 

आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार होते त्यापैकी एक लाख 2 हजार 720 पुरुष, 99 हजार 546 महिला व 1 तृतीयपंथी असे एकूण दोन लाख 2 हजार 267 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 54 हजार 610 पुरुष मतदार , 1 लाख 52 हजार 610 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार होते. यातील 1 लाख 16 हजार 704 पुरुष मतदार, 1 लाख 13 हजार 469 स्त्री मतदार तर 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 30 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 26 हजार 481 पुरुष मतदार , 1 लाख 24 हजार 974 महिला व 6 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 51 हजार 461 मतदार होते. यातील 95 हजार 511 पुरुष मतदार, 90 हजार 281 महिला मतदार तर 3 तृतीयपंथी असे एकूण 1 लाख 85 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यात एकूण 4 लाख 12 हजार 151 पुरुष मतदार, 4 लाख 9 हजार 294 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 8 लाख 21 हजार 455 मतदार होते. त्यापैकी 3 लाख 14 हजार 935 पुरुष, 3 लाख 3 हजार 296 महिला व 5 तृतीयपंथी असे एकूण 6 लाख 18 हजार 236 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 21, 2024

PostImage

आदर्श , दिव्यांग ,सखी व युथ मतदान केंद्रात सजावटीने मतदार भारावले  गडचिरोली विधानसभा मतदारसंघ :उत्साहाने केले मतदान


 

 

गडचिरोली :-६८-गडचिरोली(अ.ज.) मतदारसंघात प्रत्येकी एक असे आदर्श मतदान केंद्र,दिव्यांग मतदान केंद्र , सखी(महिला) मतदान केंद्र व युथ मतदान केंद्र यावेळी स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारापासून ते मतदान कक्षापर्यंत आकर्षक व उत्कृष्ट सजावट केली होती. या सजावटीमुळे मतदार भारावले. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांने आनंदाने व उत्साहाने मतदान केले.
           गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक १ मध्ये आदर्श मतदान केंद्र  (मतदान केंद्र क्रमांक १२२) स्थापना केले होते. यामध्ये एकूण ८२६ मतदारांपैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
       धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालय मध्ये खोली क्रमांक १ मध्ये दिव्यांग मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित दिव्यांग मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ९२)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ७२८ मतदारांपैकी ४८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
         गडचिरोली येथील पंचायत समिती कार्यालयातील बचत भवन मध्ये महिला मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी(पिंक बूथ) मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ८८)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ५७० मतदारांपैकी ३२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
         चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील खोली क्रमांक ४ मध्ये युवा मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित युथ मतदान केंद्र(मतदान केंद्र क्रमांक २२३) स्थापना करण्यात आली होती. यामध्ये एकूण १ हजार १५९ मतदारांपैकी ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 21, 2024

PostImage

मोठी बातमी! १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


 

 


गडचिरोली :-निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा सुरू होईल. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. याबरोबरच इयत्ता बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमासाठीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.दरम्यान, सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.in/mr या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 16, 2024

PostImage

आदिवासी परधान समाज मंडळा तर्फे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी...!


 

गडचिरोली :- दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आदिवासी परधान समाज मंदीर गडचिरोली येथे आदिवासिंच्या  जल, जंगल, जमीन यासाठी इंग्रजांविरुद्ध  प्रखर संघर्ष करणाऱ्या भगवान बीरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून 
प्रियदर्शन मडावी, जिल्हाअध्यक्ष आदिवासी टाइगर सेना, अध्यक्षस्थानी आदीवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी , प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. किर्तिकुमार उईके ,महेश गेडाम,मुल, ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, सुरज शेडमाके , गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह, विनोद सुरपाम, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे, महेंद्र मसराम हे होते.
 सर्वप्रथम आदिवासी जननायक क्रांतीसुर्य, धरतीआबा, भगवान बिरसा मुंडा  यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी समाज मंडळाचे युवा सदस्य अजय सुरपाम, आदिवासी एकता युवा समितीचे उपाध्यक्ष सुधीर मसराम,युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, नंदकिशोर कुंभारे,गणेश मेश्राम, टाइगर ग्रूप सदस्य आकाश कुळमेथे, अनिकेत बांबोळे, मुकुंदराव उंदीरवाडे, राज डोंगरे, राकेश कुळमेथे, विक्की मसराम,योगेश कोडापे,नितीन शेडमाके,अंकित कुळमेथे, सुरज गेडाम, साहिल शेडमाके,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,ताजिसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम, शोभा शेडमाके, गंगा सलामे, सुनिता मसराम, प्रफुला जुनघरे,वनिता कोडापे, निरुता कोडापे, सोनाली सुरपाम, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर मसराम यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 16, 2024

PostImage

४५ जमाती आदिवासी समाज एसटी आगार गडचिरोली यांच्यातर्फे बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी


 

गडचिरोली:- राज्य परिवहन आगार गडचिरोली येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे राकडे साहेब आगार व्यवस्थापक,विठ्ठल रावजी गेडाम,प्रियदर्शनी मडावी आदिवासी टायगर सेना जिल्हाध्यक्ष गडचिरोली,अमोलभाऊ कुळमेथे,कुवरलालजी तिलगामे, यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरावजी कोवे,भास्करभाऊ आत्राम,नितेश मडावी,सुधीर मसराम,महेश गेडाम ,माणिक मळावी,महेश कुमरे,मणिराम कुडेती,विजय मडावी,विलास गेडाम,यश मडावी,प्रवीण तलांडे, व आगर व विभागातील कर्मचारी व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 8, 2024

PostImage

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी



           गडचिरोली दि. ८ :- येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.  
उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमूद केले आहे.
००००


PostImage

MH 33 NEWS

Nov. 7, 2024

PostImage

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद  जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आदेश


 

गडचिरोली,दि.7:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री दैने यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024

PostImage

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम


दि

गडचिरोली:-दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला.

महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवण्याकरिता सुचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या लोकमंगल या स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांसोबत दिवाळीतील एक दिवस जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची भेट घेवून दीपावली उत्सव साजरा करण्यात आला.
              दिनांक 05 नोव्हेबर 2024 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या दालनात बालकांसोबत भेट घेवून दिवाळी उत्सव साजरा करण्यात आले.  उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, तहसिलदार सुरेंद्र दांडेकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिरीश कावळे यांनी बालकांसोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेली आवड, निवड, छंद, जाणून घेतली व व्यक्तीमत्व विकास, प्रेरणादायी पुस्तकाचे नाव सांगुन वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करुन बालकांचा आंनद द्विगुणित करण्यात आला.
               त्यानंतर जिल्हा परिषद गडचिरोली येथे भेट देण्यात आली. अतिरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी बालकांना दिपावलीच्या शूभेच्छा देवून प्रशासकीय कामकाजाविषयक माहिती देवून आयुष्याला दिशा देणारी पुस्तकाचे वाचन करावे तसेच चांगल्या सवयी लावावे असे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या निवासस्थानात भेट घेण्यात आली. श्रीमती आयुषी सिंह यांनी प्रत्येक बालकासोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेलल्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यानंतर बालकांनी आयुषी सिंह यांच्या सोबत स्हेन भोजनाचा आनंद घेतला. बालकांना फराळ देवून एक दिवशीय दिपावली उत्सवाचा आनंद घेतला. 
        जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी सहकुटुंब सर्व बालकांना डायरी, पेन भेटवस्तू व फराळ देवून सहकुटुंब बालकांसोबत दिपावली उत्सव साजरा केला.
          सदर उपक्रम जिल्हाधिकारी संजय दैने व मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या नियंत्रणात राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अर्चना इंगोले उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जि.प., बाल कल्याण समितीचे सदस्य काशिनाथ देवगळे, सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, उदधव गुरनुले विस्तार अधिकारी जि.प., लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष शायनी गर्वासीस, अहिल्यादेवी बालसदन घोट येथील अधिक्षिका ललिता कुज्जुर, बाल सरंक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुर, पियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
           अशा प्रकारे दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवून प्रशासकीय कामकाज बद्दल माहिती देवून बालकांना संबोधन केले. आणि त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने संवाद साधून प्रशासकीय अधिकारी होण्याकरिता काय करावे लागते त्याची संपूर्ण माहिती बालकांनी जाणून घेतली अशा आगळावेगळा कार्यक्रम घेवून बालकांना खरी दिपावली उत्सवाचा आनंद घेता आला. सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास विभागाने सदर उपक्रम राबविला.
0000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षक यांची आरमोरी विधानसभा मतदान केंद्रांची पाहणी


निवडणूक निरीक्षक यांची आरमोरी विधानसभा मतदान केंद्रांची पाहणी

गडचिरोली,(जिमाका),दि.6: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य), विनीतकुमार यांनी काल 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील विसोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 101, 102, 103 व 104 तसेच देसाईगंज येथील महिला (पिंक) मतदान केंद्र क्रमांक 132 (नैनपूर वार्ड) तसेच दिव्यांग मतदान केंद्र क्रमांक 125 इत्यादी मतदान केंद्रांनी भेटी देऊन मतदान केंद्रांची पाहाणी केली व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्रुटींबाबत मार्गदर्शन करुन सदर त्रुटी दुर करणेबाबत निर्देश दिले.
 यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी, उपविभागीय अधिकारी कुरखेडा, रणजीत यादव, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांचे संपर्क अधिकारी ए.के.बकालिया, नायब तहसिलदार, विलास तुपट, निवडणूक महसुल सहायक महेंद्र मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. असे स्विप व मीडिया नोडल अधिकारी, देसाईगंज श्रीमती प्रणाली खोचरे यांनी कळविले आहे.
0000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024

PostImage

हे केवळ पुस्तक नाही, ते भारताचं व्हिजन, नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य


 

नागपुर:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला आता वेग चढला आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी राज्यातील प्रचारात स्फोटक वक्तव्याने वातावरण तापवले आहे. जातनिहाय जनगणनेबाबतच आता संविधान बचावचा पुन्हा नारा त्यांनी दिला आहे. नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा नारळ फुटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातनिहाय जनणना, ओबीसींचा सत्तेतील वाटा आणि संविधान बचाव या तीन मुद्यांना हवा दिली आहे. राज्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्फोटक विधानाने वातावरण तापले आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये पुन्हा त्यांचा प्रचाराचा रोख काय असेल, याची झलक दाखवली. संविधान सन्मान संमेलनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी भाजपाविरोधात आरोपांची राळ उडवली. काय म्हणाले राहुल गांधी?

त्यांनी दुसऱ्यांच्या वेदना मांडल्या

आता तुम्ही आंबेडकर आणि गांधींचा विषय काढला. प्रत्येक संमेलनात आंबेडकर आणि गांधींजींचा विचार होतो. शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्धाचे विचार मांडले जातात. त्यांचा उल्लेख होतो. प्रत्येक राज्यात तुम्हाला असे दोन तीन नावे सापडतील. आपण त्यांचं स्मरण करतो. गांधीजी अमर रहे, आंबेडकर अमर रहे म्हणतो, पण वास्तव हे आहे की जेव्हा गांधी आंबेडकरांवर बोलतो तेव्हा व्यक्तीवर बोलत नाही. आपण आंबेडकरांवर बोलायचं झालं तर ते एक फॉर्म होते, एक शरीर होते. पण आंबेडकरांच्या तोंडून केवळ त्यांचा आवाज येत नव्हता. जेव्हा ते बोलायचे तेव्हा कोट्यवधी लोकांची आवाज त्यांच्या तोंडून यायची. फक्त आंबेडकरांचा आवाज आला असता तर आपण त्यांची आठवण केली नसती. ते जेव्हा बोलायचे तेव्हा दुसऱ्यांचं दुख वेदना, ते त्यांच्या तोंडून यायच्या. मी त्यांची पुस्तके वाचली आहे. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट असेल, बुद्धिझमवरील अनेक पुस्तके वाचले. जेव्हा तुम्ही आंबेडकर वाचता तेव्हा असं दिसतं ही व्यक्ती आपलं म्हणणं मांडत नाही, दुसऱ्यांच्या वेदना मांडत आहे, असे गांधी यांनी सांगितले.

हे पुस्तक तर भारताचं व्हिजन

प्रत्येक नेत्यामध्ये एक द्व्ंद असतं. मला काय हवं आणि जनतेला काय हवं. यात द्वंद्व होतं. पण आंबेडकर आणि गांधी सारखे लोक आपली आवाज बंद करतात. त्यांच्या तोंडून आपलं दुख वेदना येत नाही. दुसऱ्यांच्या वेदना येतात. जेव्हा आपण हे संविधान भारतात केवळ काँग्रेस पक्षाने नाही,. केवळ नेहरू आणि गांधींनी नव्हे भारताने आंबेडकरांना सांगितलं तुम्ही हे संविधान तयार करा. तेव्हा देश त्यांना सांगत होता. आम्हाला वाटतं या संविधानात जे या देशात कोट्यवधी दलित आहे. त्यांची वेदना आहे, त्यांना रोज ती सहन करावी लागते. ते दुख तो आवाज या संविधानात गुंजला पाहिजे. ते काम आंबेडकरांनी केलं.

आता लोक म्हणतात आंबेडकरांनी हे संविधान स्वातंत्र्याच्या एकदम नंतर बनवलं. मी तुम्हाला विचारतो, त्यात फुल्यांचा आवाज नाही का, बुद्धाचा आवाज नाही का, बसवन्नाचा आवाज नाही का, सावित्रीबाईंचा आवाज नाही का. याची आपण रक्षा करत आहोत. ही हजारो वर्ष जुनं पुस्तक आहे. यातील विचार आहे… आपण हे मॉडर्न व्हर्जन आहे. २१व्या शतकातील व्हर्जन आहे. पण यातील विचार हजारो वर्ष जुने आहेत. जे यात सांगितलं तेच बुद्धाने, अशोकाने सांगितलं. सर्वच महापुरुषांनी सांगितलं. तेच आंबेडकर आणि गांधींनी सांगितलं. हे केवळ पुस्तक नाही. ते भारताचं व्हिजन आहे. हे जगण्याची पद्धत आहे. हे पुस्तक म्हणजे मरण्याची पद्धत आहे. आम्ही जगू तर देशासाठी जगू. एकमेकांचा आदर करू. आणि दुसऱ्यांना देणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024

PostImage

विजय वडेट्टीवार यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार


 

:- लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून राहुल गांधी कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. अशातच याच मुद्यावरुन आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत जोरदार पालटवार केला आहे.

राहुल गांधींना अर्बन नक्षल म्हणणे म्हणजे सामाजिक संस्थांचा अपमान करणे होय. आता हे घाबरले आहे. त्यामुळे फडणवीस असे बोलत आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री असेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांनी चौकशी करावी. असे थेट आव्हानही विजय वडेट्टीवार यांनी  दिले आहे.

तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय?

सामाजिक संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कुठलाही राजकीय अथवा पक्षाचा कार्यक्रम नाही. या सगळ्या संस्थांनी राहुल गांधींना आमंत्रित केलं आणि त्यांचे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं, म्हणून राहुल गांधी नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. राहुल गांधी यांचा आजचा नागपूर दौरा हा अराजकीय कार्यक्रम आहे. नागपूरमधून आज प्रचाराच नारळ फोडला जात नाहीये. प्रचारच नारळ फोडायला वेळ आहे. ओबीसी युवा एकता मंच या सामाजिक संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान, आपला नेता येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज राहुल गांधी दीक्षाभूमी येथे जात आहे.  कारण संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरक्षा कवच दिले. तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्पष्टोक्ती दिली आहे. तर आज मुंबई येथे जाहीर होणारा जाहीरनामा हा ऐतिहासिक राहणार असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

गेल्या दहा वर्षापासून सरकारला या गोष्टी का आठवल्या नाही? गृहमंत्री अमित शहा शेतकऱ्यांचा कर्जमाफीला उघड विरोध केलेला आहे.  जर देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचा कर्जमाफीला विरोध करत असतील आणि तिथे कर्ज मुक्तीच्या घोषणेला राज्यातील भाजपचा पाठिंबा आहे का? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. त्याचा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही. सर्वात जास्त घोटाळे शिंदे सरकारच्या काळात झाले आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांचे १० मोठे आश्वासनं


 

 :- महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच दिनांक ५ नोव्हेंबर रोजी महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ हजार महिलांची पोलीस भरती अशी १० मोठी आश्वासने दिली आहेत.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“२०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात याच ठिकाणावरून आम्ही केली होती. आता देखील या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत. आता २३ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सांगत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ 
हजार १०० रुपये करणार असल्याचं आश्वासन आम्ही देत आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी कोणते १० आश्वासन दिले?


-लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन.
– २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचं आश्वासन.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसह राज्य आणि केंद्राचे मिळून आता १५ हजार करणार.
– तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत.
– वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करण्यात येणार आहेत.
– २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन.
– २५ हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास
करण्याचं आश्वासन
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन.
– विजबिलामध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.
– महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन २०२९’ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासन.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज एकत्र कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखवली. तसेच हे फक्त ट्रेलर असून सविस्तर जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण



गडचिरोली :- निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे खर्चाचे लेखे किमान तीन वेळा तपासणी करीता निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना खर्च तपशिलाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके भरण्याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यावेळी उपस्थित होते.            
या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक विषयक सादर करावयाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके यांचे नमुने कोणते व कशाप्रकारे भरल्या गेले पाहिजे, याबाबत प्रात्याक्षिकाचे माध्यमातून सहायक खर्च निरीक्षक तथा अप्पर कोषागार अधिकारी दीपक उके, पथक प्रमुख (लेखा) तथा सहायक लेखाधिकारी महेश कोत्तावार यांनी समजावून सांगीतले. तसेच उपस्थित उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली.  67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक खर्च विषयक तपासणी दिनांक 7, 13 व 19 नोव्हेंबर रोजी नगर परीषद सभागृह देसाईगंज येथे होणार आहे. ठरलेल्या दिनांकास मुळ नोंदवहया व प्रमाणके तपासणीकरीता सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मुळ नोंदवहया व प्रमाणके सादर न केल्यास निवडणूक आयोगाद्वारे होणारी संभाव्य कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप


 

गडचिरोली :-विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: 
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात). 
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :  चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : 
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :   जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना  गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट). 
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचेकडून माध्यम कक्षाची आकस्मिक पाहणी



गडचिरोली:- निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांना आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम  प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षास आकस्मिक भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी त्यांना कामकाजाची माहिती दिली. याबाबत निवडणूक निरीक्षक श्री कटारा यांनी समाधान व्यक्त केले.
 यावेळी श्री कटारा यांचे संपर्क अधिकारी उपकार्यकारी अभियंता संजय भंडारकर, माध्यम कक्षातील प्रा. रोहित कांबळे, प्रा. चैतन्य शिनखेडे, प्रा. प्रितेश जाधव, महादेव बसेना, स्वप्नील महल्ले आदि उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

व्हॉलीबॉल खेळातून खेळाडूंनी स्वतःचे  करिअर करावे - आमदार कृष्णा गजबे  शंकरपुर येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे  भव्य उद्घाटन 


 

:-देसाईगंज तालुक्यापासून 10 किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर येथे 5 नोव्हेंबर ला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य उद्घाटन  आमदार कृष्णा गजबे हस्ते दीप प्रज्वलन व रिबीन कापून  करण्यात आले.
व्हॉलीबॉल खेळ हा राज्यातच नाही तर देशात खेळला जात आहे.  व्हॉलीबॉल खेळातून  खेळाडूंनी स्वतःच नाव लौकिक करून खेळाडूंनी खेळ खेळताना आपले  ध्येय  निच्छित करून आवडत्या खेळात उंच भरारी घ्यावी  असे प्रतिपादन शंकरपुर येथे उद्घाटन प्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांनी केले. यावेळी शंकरपुर येथील स्थानिक पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते .


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

बल्लारपूर मतदारसंघात तिहेरी लढत, सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा अवघड जाणार?


 


बल्लारपूर :- एखाद्या अपक्ष उमेदवाराची फार चर्चा होत असेल तर तो उमेदवार प्रस्तापित उमेदवाराला टक्कर देणारा आहे, हा संदेश दुरवर पोहचतोय. लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कदाचित त्याचमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्याची स्पर्धा रंगली होती. आता बल्हारपूर मतदार संघातून बंडखोर आणि काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणाऱ्या या मतदार संघात डॉ. अभिलाषा गावातूरे यांच्यामुळे तिहेरी लढत होण्याचं चित्र निर्माण झालं आहे.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोष सिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. गावातूरे अशी इथे लढत होणार आहे. डॉ. गावतुरे यांनी लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. केवळ काँग्रेसही त्यांची ओळख नाही. सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या नावाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. याचा फायदा त्यांना निवडणूकीत होताना दिसत आहे. संतोष सिंह रावत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे परंपरागत मते त्यांना मिळणार आहेत. मूल आणि पोंभुर्णा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत. याचा फायदा त्यांना होवू शकतो. बल्हारपूर मतदारसंघ मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला ठरला आहे. या क्षेत्रात त्यांनी भरीव विकासकामे केली आहेत. मात्र त्यांचा विकास अनेकांना रुचलेला दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती जिल्हाला आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने कलावंत यांची चंद्रपुरात लोकसभा निवडणुकीत मोठी रेलचेल दिसली होती. मात्र त्याचा फायदा मुनगंटीवारांना झालेला नाही. त्यामुळे लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणूक मुनगंटीवार यांना जरा अवघडचं झालेली दिसत आहे . या मतदारसंघात तिहेरी लढत होईल, अशी चर्चा सुरु आहे. तसे झाले तर मुनगंटीवार यांना ती धोक्याची सूचना ठरणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024

PostImage

देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा


 


:-विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात पार पडणार आहेत. तर त्याचे निकालही २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील कोल्हापुरातील महायुतीच्या सभेसाठी हजर राहणार आहेत. तर आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला असून राज्यभरात फडणवीस हे ६ दिवसांमध्ये २१ सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात २१ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रासह अर्धा महाराष्ट्र ढवळून काढणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही सभा होणार आहेत. दरम्यान, येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण चार ठिकाणी देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात 11 उमेदवारांची माघार 29 उमेदवारांमध्ये लढत आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात


गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरीतून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
 67-आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी, 68-गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ. देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी आणि 69- अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. 

हे उमेदवार आहेत रिंगणात : नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष पुढीलप्रमाणे आहे
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: 
रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस, कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी, आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष, शिलू प्रविण गंटावार- अपक्ष, मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी, चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष.


68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:  मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी, संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी, जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी, योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना  गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष, बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष, डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष 


69- अहेरी विधानसभा मतदार संघ:  आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी, संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी, आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष, कुमरम महेश जयराम- अपक्ष, गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष, नितीन कविश्वर पदा- अपक्ष, राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष, लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष, हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024

PostImage

ऍड. विश्व्जीत कोवासे यांची विधानसभा निवडणूकीतून माघार ; पक्षश्रेष्ठीशी चर्चेनंत्तर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय


 


गडचिरोली :: महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडूणूक 2024 करीता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले होते, मात्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी , राष्ट्रीय आदिवासी सेलचे उपाध्यक्ष तथा लोकसभा निरीक्षक बेलई नाईक यांनी ऍड. विश्व्जीत मारोतराव कोवासे यांच्या निवासस्थानी भेट देऊन समजूत काढली दरम्यान कुणाल चौधरी यांनी भ्रमनध्वनी द्वारे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेशजी चेन्निथल्ला, तसेच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गहलोत, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेशजी बघेल, अ. भा. कॉंग्रेस कमिटी सचिव अविनाश पांडे यांच्याशी ऍड. विश्व्जीत कोवासे यांचे बोलणे करून दिले असता पक्षहिताचा व्यापक विचार करून ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 
यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतांना त्यांच्या सोबत लोकसभा निरीक्षक बेल्लई नाईक, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम सह  गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024

PostImage

कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालावी, नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र


:-कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना 22 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या 11 लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

सध्या कापसाचे भाव 6500 ते 6600 रुपये प्रति क्विंटल असून हा भाव 7122 रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. शेतकऱ्यांकडे कापूस आहे तसेच सीसीआयकडेही कापूस गाठी पडून आहेत. देशात एवढया मोठ्या प्रमाणात कापूस असताना कापसाची आयात केल्याने कापूस बाजार कोलमडून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाच बसेल आणि या निर्णयाचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहे, कमी भाव, शेती अवजारांवर 12 ते 18 टक्के जीएसटी आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात कापूस उत्पादक शेतकरी सापडला असून खराब हवामानामुळे यावेळी 19 लाख हेक्टरील कापूस क्षेत्राचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाईही अद्याप कागदावरच आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापूस आयातीवर बंदी घालावी, असे नाना पटोले यांनी पत्रात नमूद केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024

PostImage

मतदान अधिकाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 972 मतदान केंद्रासाठी 1084 पथके



गडचिरोली दि.4 :-विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.
  67- आरमोरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनित कुमार,  68- गडचिरोली निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी आदी यावेळी उपस्थित होते.  
मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक २ व मतदान अधिकारी क्रमांक ३ यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात 10 टक्के अधिकाऱ्याची अतिरिक्त निवड करण्यात आली आहे.  आरमोरी विधानसभा मतदार संघात 310 मतदान केंद्रासाठी 346 मतदान पथके, गडचिरोली विधानसभा मतदार संघात 362 मतदान केंद्राकरिता 403 मतदान पथके आणि अहेरी विधानसभा मतदार संघाकरिता 300 मतदान केंद्रासाठी 335 मतदान पथके असे जिल्ह्यात एकूण 972 मतदान केंद्रासाठी 1084 पथकांची निवड करण्यात आली. एका पथकात 4 अधिकारी राहतील.
आरमोरी क्षेत्राकरिता 1376 पुरूष, 8 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली क्षेत्राकरिता 1604 पुरूष व 8 महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता 1332 पुरूष व 8 महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024

PostImage

गडचिरोली: आमदार देवराव होळी यांनी घेतला नामांकन अर्ज मागे  आमदार डॉ. देवराव होळी प्रदेश उपाध्यक्षपदी


 

गडचिरोली :-अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवण्याचे काम केले होते. पण पक्षाच्या वरिष्टानी लक्ष घालून डॉ. देवराव होळी यांची यांना समज देऊन आपला नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले. आज आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपला अर्ज मागे घेतला त्याप्रसंगी विधानसभा प्रभारी प्रमोद पिपरे व गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे हजर होते.

विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी हे पक्षातच राहून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रचार करणार आहेत व पक्ष विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.

आमदार डॉ.देवराव होळी प्रदेश उपाध्यक्षपदी

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 3, 2024

PostImage

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणार 'संविधान संमेलन.


 

नागपूर:-भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लोकसभेचे  विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहे.

नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी स्वीकारले आहे. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. ओबीसी युवा मंच यांनी संमेलनाचे निमंत्रण दिले होते. उमेश कोर्राम आणि  अनिल जयहिंद यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना  कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. हा पूर्णतः अराजकीय कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन करूनच कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत, हा देशाला मोठा धोका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. संविधानाने आपले  रक्षण केले आहे. देशातील प्रत्येक माणसाला  संविधानामुळे हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली  तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे. 

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संविधान संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात मनुवाद,  संविधान, मनुस्मृती महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे यावर चर्चा होणार आहे.
#rahulgandhi  #RahulGandhiVoiceOfIndia


PostImage

MH 33 NEWS

Nov. 3, 2024

PostImage

नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार


 


नागपूर:-येत्या सहा नोव्हेंबरला नागपूरात संविधान संमेलन होणार आहे. या संमेलनाला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंच या संघटनेने केलेले आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. ओबीसीचा जनगणना न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आम्ही धुळ्याला राहुल गांधी यांना भेटायला गेलेलो होतो. भारत जोडो दरम्यान 13 मार्च रोजी आम्ही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांना विर्दभात येण्याचे आमंत्रण दिले होते असे ओबीसी युवा अधिकार मंचाचे संयोजक उमेश कोरम यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत असेही उमेश कोरम यांनी म्हटले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 30, 2024

PostImage

निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक रूजू



गडचिरोली दि. 30 : विधानसभा निवडणुक-2024 ही शांततापुर्ण व भयमुक्त वातावरणात नि:पक्षपातीपणे पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 
67-आरमोरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून के. आरीफ हफीज  (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संबंधात जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी  सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत  श्री. के. आरीफ हफीज  यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 7588134720 यावर संपर्क करावा.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर शासकिय निवडणुक निरीक्षक म्हणुन श्री. ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असुन, ते गडचिरोली जिल्हयामध्ये हजर झालेले आहे. ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास आहे. विधानसभा निवडणुक अनुषंगाने जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी  सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजे पर्यंत व सायंकाळी 04.00 ते 06.00 वाजे पर्यंत श्री. ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची भेट घेवुन  तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 9404306040 यावर संपर्क करावा.
69- अहेरी विधानसभा मतदार संघाकरीता पोलीस ऑब्झर्वर म्हणून अनुपम शर्मा  (भा.पो.से.) (9404306035) यांची नियुक्ती करण्यात आली असुन,  ते कर्तव्यावर रूजू झाले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 30, 2024

PostImage

सामान्य निवडणूक निरीक्षकांनी केली सोयी सुविधांची पाहणी 


 

गडचिरोली:- ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा(भा.प्र.से.)यांनी आज दिनांक ३०ऑक्टोबर २०२४ रोजी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील गडचिरोली येथील धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ९२ या दिव्यांग मतदान अधिकारी संचलित मतदान केंद्राला भेट देऊन सोयी सुविधांची व स्वच्छतेचे पाहणी केली. तसेच त्यांनी पारडी नाका येथील स्थिर निगराणी पथकाला भेट देऊन सदर नाक्यावरील वाहन तपासणी बाबत आढावा घेतला व निवडणूक संदर्भात नियमांचे पालन करून योग्य प्रकारे वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भाप्रसे)यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्षाची सुद्धा पाहणी करून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोली विधानसभेसाठी नियुक्त झालेले कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक हृदय कांत (भापोसे),खर्च निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम(भाप्रसे), अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश(भापोसे), गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी)अमित रंजन व अन्य अधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट


 

गडचिरोली दि.२४ : 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त  निवडणूक निरीक्ष राजेंद्र कुमार कटारा यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. वृत्तपत्रातील राजकीय जाहिराती, पेड न्यूज यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील राजकीय जाहिरातींवर २४ तास करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यावेळी उपस्थित होते. श्री जाधव यांनी निवडणूक‍ निरीक्षक श्री कटारा यांना राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूज आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली.  
000


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा



गडचिरोली दि. २९ : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे भेट देऊन निवडणूकीसबंधाने पूर्वतयारीचा आढावा घेतला.  
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, तहसिलदार प्रिती डूडूलवार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
  श्री विनीतकुमार यांनी  नामनिर्देशन स्विकारण्याच्या कार्यवाहीची पाहणी केली तसेच तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन आचारसंहिता उल्लंघनाच्या आणि निपटारा करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. सिव्हीजिल ॲप वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा 100 मिनीटांच्या आत निपटारा करण्याच्या सुचना त्यांनी आचारसंहिता कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. आचारसंहितेच्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या आणि परवाने अर्ज तसेच ऑनलाईन अर्ज विनाविलंब त्याच दिवशी निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  इव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनकरीता असणारे सुरक्षा कक्ष आणि साहित्य वाटप तसेच मतमोजणी व्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक श्री विनीतकुमार यांनी निरीक्षण करुन त्याअनुषंगाने संबंधीतांना आवश्यक सूचना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 29, 2024

PostImage

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट


 

 गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा  यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील  स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्ष तसेच मतदान केद्रांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी 68-गडचिरोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, उपविभागीय अधिकारी चामोर्शी तथा सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संजय भांडारकर व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
निवडणुक निरीक्षक श्री कटारा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. 
श्री कटारा यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच मतदारांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मीना आणि सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

जनतेच्या उद्धारासाठी मी लढणारच:राजे अम्ब्रिशराव आत्राम जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल.!


 

अहेरी:- आपल्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती,वाढलेली बेरोजगारी,रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी मी लढणार असल्याचं संकल्प करीत माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

२८ ऑक्टोबर रोजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारोंच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढत 'हम भी किसींसे कम नहीं' हे दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी कै. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळाला अभिवादन केले.त्यानंतर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत त्याच चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.यावेळी राजामाता राणी रुख्मिणी देवी,युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम,विक्की बाबा आत्राम,राजे समर्थक आणि पाचही तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यावर तोफ डागली.गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मोठा गेम केला.पैशाने तिकीट विकत घेऊन पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असले तरी ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतली आहे.त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात तुम्ही कितीही फटाके फोडा २३ तारखेला आम्ही फटाके फोडणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.एका खाजगी कंपनीच्या मांडीवर बसून पैशाने आणि माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटत असेल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असून तुमच्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी विरोधकांना योग्य धडा शिकवा असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंचा भाषण ऐकून त्यांच्या समर्थनार्थ एकच जल्लोष केला.

दरम्यान कै.राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात आणि आदिवासी पारंपरिक नृत्याने भव्य शक्ती प्रदर्शन करत पोलीस स्टेशन समोर पर्यंत रॅली काढण्यात आली.त्यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात जल्लोषाने 'राजे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है' चे नारे देत समर्थन जाहीर केले.

*जनता हीच माझी तिकीट*

मला पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचा चिन्हही नको.माझी जनता हीच माझी तिकीट आहे.जनता आशीर्वाद दिल्यास मला विधिमंडळ गाठता येणार आहे.विद्यमान मंत्र्यांनी कितीही पैसा, पॉवर,कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी

'मै झुकेगा नही साला' असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक प्रकारचा चॅलेंज दिला आहे.!


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार – आमदार डॉक्टर देवराव होळी


 

गडचिरोली:- पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय मी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेईन याविषयी माहिती दिली.

आमदार डॉक्टर देवराव होळी पुढे म्हणाले जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो आहोत.

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे , भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

काँग्रेसचे ऍड. विश्वजीत कोवासे गडचिरोलीतून अपक्ष लढणार


 

गडचिरोली:- विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात विश्वजीत मारोतराव कोवासे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आपली लढाई लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उद्या दिनांक २९ ऑक्टोबरला नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज सादर करणार आहेत.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री ताई अत्राम यांचे नामांकन, रॅलीला अपार जनसमर्थन


 

 

अहेरी:-आज अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार  च्या उमेदवार भाग्यश्री ताई अत्राम यांनी आपले नामांकन दाखल केले. इंडियन फंक्शन हॉल, भुजंगरावपेठा, अहेरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित रॅलीला मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये अहेरीतील नागरिकांनी भाग्यश्री ताई अत्राम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला.

भाग्यश्री ताई अत्राम यांनी या अद्भुत प्रेमासाठी आणि मिळालेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहेरी समृद्धी, विकास, आणि आनंदाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. या बदलाच्या नव्या विचारांना त्यांनी सलाम केला आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 28, 2024

PostImage

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची  चौथी यादी जाहीर! कुणाकुणाला मिळाली संधी?


 

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत शरद पवारांनी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 76 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आता आणखी 9 उमेदवारांची घोषणा करण्याता आली आहे.

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी 

माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील अनिल देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरूणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मैंद
सिंदखेडा- संदीप बेडसे


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज गडचिरोली विधानसभा क्षेत्र: ईव्हीएम प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण


 

गडचिरोली: ६८-गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे.२६व २७ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या  प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले. 

       ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्र असून एकूण  १ हजार ८१९ मतदान अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी  कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतले.यावेळी मतदान प्रक्रियेतील मतदान अधिकारी ,केंद्राध्यक्ष यांना नेमून दिलेले कामकाज, कर्तव्य व  जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली. मतदान केंद्र तयार करणे, मतदानाची पूर्वतयारी, मतदान युनिट तयार करणे, नियंत्रण युनिट तयार करणे, अभिरुप मतदान घेणे ,कागदी मोहर लावणे, प्रत्यक्ष मतदानासाठी मतयंत्र तयार करणे, मतदारांची ओळख पटविणे ,प्रदत मत,आक्षेपित मत, मतदान प्रक्रिया संबंधित कायदे, विविध प्रपत्रे व संपूर्ण मतदान प्रक्रिये बाबत विस्तृत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींच्या मनात उपस्थित झालेल्या शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी करण्यात आले. 

      प्रशिक्षण स्थळी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी अमित रंजन,गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे , गडचिरोलीचे नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान,अनिल सोमनकर,महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

मतदान पथकांचे दोन दिवसांचे पहिले पूर्वप्रशिक्षण संपन्न


 

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहीर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने
दिनांक – २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार ६७ - आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी
(भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात आरमोरी विधानसभा मतदार संघामधील मतदान पथकांकातील एकूण १६००
अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता Theory व EVM/VVPAT Hands On पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक - २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवन नगर परिषद, देसाईगंज येथे करण्यात आलेले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडव्याच्या कामगिरीबाबत श्री. रणजीत यादव
(भा.प्र.से.) उपविभागीय अधिकारी कुरखेडा, श्रीमती प्रिती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज, श्रीमती उषा चौधरी तहसीलदार आरमोरी, यांचे द्वारा  प्रशिक्षणाचे माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारा
EVM/VVPAT Hands On चे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान पथकातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी EVM/VVPAT ची प्रत्यक्ष हाताळणी केली. व त्यांचेकडून मतदान यंत्र हाताळणी व सिलिंग प्रक्रिया याबाबत तसेच मतदानाचे दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता कोणतीही अडचण येणार नाही असे प्रमाणपत्र घेण्यात आले. याकामी ६७ - आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील ३४ क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे द्वारा विचारण्यात आलेल्या शंकांचे निराकरण वेळीच
करण्यात आले. मतदान पथकांचे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी व फार्म नं. १२ (Postal Ballot) व फार्म नं.१२ A (EDC) भरून घेणेकरीता एकूण १६ टेबल ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदान पथकातील अधिकारी / कर्मचारी यांना मतदार यादितील नाव शोधण्याकरिता मतदान कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

शरद पवार गटाचे आणखी 9 उमेदवार रिंगणात


 

 मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.

 

शरद पवार गटाचे उमेदवार

वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी

 चिंचवड – राहुल कलाटे

 माजलगाव – मोहन जगताप

 परळी – राजेसाहेब देशमुख

 हिंगणा – रमेश बंग

 अणुशक्तीनगर – फहद अहमद

 मोहोळ – सिद्धी कदम 

भोसरी – अजित गव्हाणे

 हिंगणघाट – अतुल वांदिले


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

आमदार किशोर जोरगेवार यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश


 

चंद्रपूर :-भाजप, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष असा राजकीय प्रवास असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष प्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व शेवटी आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार भाजपात स्थिरावले. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला कालपर्यंत तीव्र विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवगीर्य आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जोरगेवार यांचा भाजप प्रवेश येथील हॉटेल ए. डी. मध्ये पार पडला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नम्रता आचार्य यांनी प्रवेश घेतला. या दोघांच्या भाजप प्रवेशाने भाजपची शक्ती या जिल्ह्यात वाढली आहे असे या प्रवेशाच्या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत भाजपला व महायुतीला यश मिळेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहे. आज दुपारपर्यंत चंद्रपूर मतदारसंघातील सहाव्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा व गडचिरोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण नऊ जागा भाजप व महायुती जिंकणार आहे. जाहीरनामा व वाचानाम्यात चंद्रपूर जिल्ह्याला झुकते माप राहील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजप हा परिवार आहे, या परिवारात जोरगेवार व आचार्य यांचे स्वागत आहे असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पूर्णशक्तीने काम करतील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. दिल्ली येथे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते ब्रिजभुषण पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेलो होतो. जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नका यासाठी गेलो नव्हतो असेही मुनगंटीवार म्हणाले.
पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे सांगण्यात येत असले तरी नाराज व अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तसे आश्वासन दिले आहे. भाजपचा आत्मा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल, कुणावर अन्याय होणार नाही, अन्यथा कार्यकर्त्याची अवस्था बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटसारखी होईल. कार्यकर्ते नाराज होईल मात्र भाजपमध्ये कार्यकर्ता नाराज होईल पक्षाचा विचार सोडणार नाही. त्यामुळे पाझारे बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. कार्यकर्त्याला हवेवर सोडणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. मला जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची चिंता आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार येईल असाही विश्वास व्यक्त केला. यावेळी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?


 

 

मुंबई:-विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीतील पक्षांसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

भाजपकडून डॉ. मिलिंद नरोटे, काँग्रेस कडून मनोहर पोरेटी रिंगणात...


गडचिरोली : भाजपने अखेर बहुप्रतिक्षित गडचिरोली मतदार संघातून पक्षाचा उमेदवार जाहीर करताना विद्यमान आमदार डॅा.देवराव होळी यांना डच्चू देत डॅा.मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकीटसाठी डॅा.होळी यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही रात्री उशिरा माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डॅा.नरोटे विरूद्ध पोरेटी असा सामना या मतदार संघात रंगणार आहे.

काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांच्यासह युवा नेते आणि माजी खा.मारोतराव कोवासे यांचे पूत्र विश्वजित कोवासे हे तिकिटच्या स्पर्धेत होते. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही सोबत काम करू असा समंजसपणा या दोघांनी आधीच बोलून दाखविला होता. ग्रामीण भागात असलेला जनसंपर्क आणि नम्र स्वभावामुळे पोरेटी हे पक्षाच्या दृष्टिने सरस ठरले.

डॅा.मिलिंद नरोटे हे वैद्यकीय व्यवसायाला बाजुला सारत जवळपास वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सक्रिय झाले. तत्पूर्वी स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरू होते. राजकारणात नवीन असल्याने फ्रेश चेहरा म्हणून आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहून भाजपने त्यांच्यावर डाव लावला आहे.

डॅा.होळी उमेदवारी मागे घेणार?

डॅा.होळी यांनी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुका भाजपच्या तिकीटवर जिंकल्या आहेत. मात्र मधल्या काळातील त्यांची वागणूक, व्यवहार आणि गटबाजीमुळे त्यांच्याबद्दल पक्षातून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. याची दखल घेत भाजप श्रेष्ठींनी त्यांना तिसऱ्यांदा संधी नाकारली. मात्र जिंकण्याची क्षमता माझ्यातच आहे आणि महायुतीमधील इतर पक्षांचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला. परंतू प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा होईपर्यंत कोणीही अर्ज दाखल करू नये असे सूचित केले असताना त्याकडे दुर्लक्ष करत डॅा.होळी यांनी वाजतगाजत नामांकन भरणे पक्षाला आवडले नाही. अखेर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा शेवटपर्यंत विश्वास व्यक्त करताना डॅा.होळी यांनी आपण पक्षाचा आदेश पाळू, असे सांगितले होते. त्यातून तिकीट नाकारल्यास बंडखोरी न करण्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. आता डॅा.होळी माजी खा.नेते यांच्याप्रमाणे पक्षकार्यात स्वत:ला वाहून घेणार, की बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024

PostImage

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर


 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची चिन्ह आहे. ठाकरे गट, पवार गटाच्या नंतर आता काँग्रेसनेही आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. एकूण 16 जणांची यादी आहे.

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून पेच निर्माण झाला होता. 
दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला.  शिवसेना ठाकरे गटाने दोन याद्या जाहीर केल्या. त्यापाठोपाठ शरद पवार गटानेही आपली २२ जणांची यादी जाहीर केली. आता काँग्रेसकडूनही 16 उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर केले आहे.

काँग्रेसची तिसरी यादी

कामगाव - राणा सानादा
मेळघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रास - मानिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनरान आंबडे
देगलुर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव सेंटर - एजाज बेग एजिज बेग
चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
एक्वतपुरी - लाकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - ध्यानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील


PostImage

MH 33 NEWS

Oct. 26, 2024

PostImage

भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळालं तिकीट?


 

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आता आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. आज (26 ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर करताना  भाजपने 22 जागांवरील उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत जवजवळ सर्व विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच तिकीट जाहीर केलं. मात्र, आता या यादीत भाजपने काही नवी नावं जाहीर केली आहेत. ज्यामुळे आता नवं राजकारण पाहायला मिळू शकतं.

पाहा भाजपची दुसरी यादी 

राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती- मलकापूर
प्रकाश भारसाकले- अकोट
विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
श्याम खोडे- वाशिम
केवलराम काळे- मेळघाट
मिलींद नरोटे - गडचिरोली
देवराव भोंगले- राजुरा
कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
करन देवतळे- वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेण
भिमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासणे- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत


PostImage

MH 33 NEWS

Oct. 26, 2024

PostImage

काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला मिळाली संधी?


 

 :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेस  पक्षाने आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 80 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. 

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

दरम्यान, आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.


आतापर्यंत महाविकास आघाडीतील पक्षांनी जाहीर केले उमेदवार
 शिवसेना ठाकरे गट - 80 
 काँग्रेस पक्ष  - 71 
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 45


PostImage

MH 33 NEWS

Oct. 25, 2024

PostImage

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद


 

गडचिरोली दि.25:-     विधानसभा  सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. 

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

*वैशिष्ट्य*

            सीव्हिजिल ॲप हा नागरिकांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देवून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

*वापर कसा करायचा*

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

*अचूक कृती व देखरेख*

            या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते

*लाईव्ह फोटो, व्हिडिओ*

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

*तातडीने होते कारवाई*

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

*डाटा सुरक्षा*

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 25, 2024

PostImage

_केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख कामकाजावर महायुतीचे सरकार येणारचं मा.खा.अशोकजी नेते यांचे भव्य महायुती अहेरी विधानसभा क्षेत्र बैठकीत प्रतिपादन......_


 

अहेरी विधानसभा क्षेत्राची भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी  सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे संपन्न....

 

अहेरी दि.२५ आक्टोंबर:- भाजपा -शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच अहेरी विधानसभा क्षेत्रातुन महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यानिमित्तानेे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व  माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख उपस्थितीत तसेच अहेरी या विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे सन्मानित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे आयोजित करण्यात आली होती. 

या भव्य महायुतीच्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असतांना अनेक विकासाभिमुख कामे करत नागरिक जनतेपर्यंत अनेक योजना आमलात आणुन  विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन काम केले.याबरोबरच महिला भगिनींच्या सन्मानासाठी  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महिलांसाठी आणली.असे अनेक योजना लोकोपयोगी सरकार राबवित आहे.

पुढे बोलतांना मागील दहा वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केलेली आहे.जसे रेल्वे वडसा गडचिरोली तसेच रेल्वेचे जिल्ह्यात ब्रॉडगेज सर्व्हे लाईन मंजुर,चिचडोह, कोटगल बँरेजेस,मेडिकल काँलेज,कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प,कोनसरी प्रकल्प तसेच साडे चौदा हजार कोटीचे विविध रस्त्यांची कामे  असे अनेक विकासात्मक कामे केले् आहेत,ऐवढे विकासकामे करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यात आपण कमी पडलोय का? यांची खंत व्यक्त करत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा  अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले. पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल.

असे विस्तृत व सविस्तर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामावर  महायुतीचेच सरकार येईल.असा विश्वास व्यक्त करतोय. अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम  यांना पुन्हा निवडून आणण्यात विजयाचा संकल्प करावे.असे प्रतिपादन या बैठकीच्या महामेळाव्याला मा.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मराव बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओल्लालवार,मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, राष्ट्रवादीचे नेते रियाजभाई शेख, हर्षवर्धन राव आत्राम, राष्ट्रवादी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,राष्ट्रवादीचे नेते रिंकुभाऊ पापडकर, तालुकाध्यक्ष अर्जुनजी आलाम,युवा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार, विजयभाऊ नर्लावार, बाबुराव गंफावार, विनोदभाऊ आकनपल्लीवार, सुनील विश्वास,सागरभाऊ डेकाटे, शिवसेनेचे नेत्या पौर्णिमा ईटॅाम्, अंकुश मंडल, तसेच महायुतीचे सन्मानित मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

Congress List : काँग्रेसची  48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर


 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा  समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. 

48 उमेदवारांची पहिली यादी

1.कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे
40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जाहिरातींवर ठेवा विशेष लक्ष निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट


 

गडचिरोली दि.२४ :-वृत्तपत्रांसोबतच इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक विषयक जाहिराती व पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज दिल्या.
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य विलास कावळे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सदस्य प्रा. रोहित कांबळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी रमेश मडावी, लेखाधिकारी संजय मतलानी, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा माध्यम कक्षातील प्रा. प्रितेश जाधव, महादेव बसेना, दिनेश वरखेडे, स्वप्नील महल्ले, विवेक मेटे, प्रज्ञा गायकवाड, वामन खंडाईत, गुरूदास गेडाम आदी यावेळी उपस्थित होते. 
निवडणूक‍ निरीक्षक श्री कल्याणम यांनी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करुन देणे आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज बाबींची माहिती घेतली. 
यावेळी निवडणूक विषयक वृत्तपत्रांतीय कात्रणे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावरील फेक न्यूज व पेड न्यूज बाबत अहवाल, समाज माध्यमांवर पोलिस सायबर सेल च्या सहकार्याने ठेवण्यात येणारे बारीक लक्ष, राज्य समितीशी समन्वय याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 24, 2024

PostImage

सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी


मुंबई दि.24:-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून बारामती मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. शरद पवार बारामतीत मोठा गेम खेळणार आहेत. शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. 

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेहबूब शेख, राणी लंके, भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील अशा नावांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील, सररजित घाटगे, उदगीरचे सुधाकर भालेकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे तीनही नेते भाजपमधून शरद पवार गटात आले आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वाचा उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भामरे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
किरोडा – रविकांत गोपचे
अहिरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप


PostImage

MH 33 NEWS

Oct. 23, 2024

PostImage

अहेरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन


 

गडचिरोली दि.23:- जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ६९-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आज भेट देऊन निवडणूक तयारीचा यंत्रणेकडून आढावा घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय नामनिर्देशन, छाननी, चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल शाखेत निवडणूक कामकाजाची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम, अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.


*निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन*
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी तहसिल कार्यालय अहेरी येथे निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष देण्याचे व खर्चाच्या लेखानोंदी घेण्याबाबत तसेच एसएसटी व एफएसटी पथकाला करावयाच्या कार्यवाहीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 
यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, भामरागड चे तहसीलदार किशोर बागडे, सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमारे तसेच संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

जिंकून येणाऱ्या  आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून एकमुखाने मागणी


२५ ऑक्टोंबरला भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे होणार

गडचिरोली:-आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास  करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्या डॉक्टर देवराव होळींनाच आमचा पाठिंबा असून  भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस  व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
दिनांक २५ ऑक्टोंबरला  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे ,उपजिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंबेवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर , प स उपसभापती विलास दशमुखे,  ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख , साईनाथजी बुरांडे,  चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री , ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा  महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई , आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनाशी , प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले . यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज , अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली,  जिल्ह्यात रस्ते पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात मागील ५० वर्षात न झालेली विकासकामे   करून  या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे.
अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे . त्यामुळे आमदार होळी हे जिंकून येणारे उमेदवार आहेत करिता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निवडणुकीत जिंकून घेण्याची क्षमता असणाऱ्या डॉ होळीनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

जिल्ह्यात कलम ३६ लागू


 

गडचिरोली दि.22:-जिल्ह्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासुन विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाच्या प्रचार फेऱ्या सभा मेळावे इ. कार्यकमांचे आयोजन होणार आहे. निवडणूक मतदान प्रकिया शांत, निर्भय व निपःक्षपाती वातावरणात पार पाडावी याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३६ लागू केले आहे.

 यानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढील नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहे. अ) रस्त्यावरुन जाणा-या जमावाचे अगर मिरवणुकीतील व्यक्तीचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे ब) ज्या मार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ते वेळ व मार्ग निश्चीत करणे क) सार्वजनिक ठिकाणी अगर निवडणूक प्रचारासाठीचे कार्यक्रमाचे वेळी वापरण्यात येणा-या ध्वनीपेक्षकाच्या ध्वनीची तीव्रता, वापराची विहीत वेळ यावर नियंत्रण करणे ड) निवडणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा, रॅली, इ कार्यक्रम घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियत्रण करणे. 
सदरचा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक २१ ऑक्टोबर  २०२४ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक २५ नोव्हेंबर  २०२४ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी


आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 गडचिरोली दि.22: -सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ क्षेत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज भेट देवुन निवडणुक बाबतच्या तयारीचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी, यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच, देसाईगंज येथील स्ट्रांग रूमची तपासणी करून आवश्यक सुचना दिल्या. देसाईगंज तहसिल कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणुक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणुक कर्तव्य व जबाबदारी चोख पणे पार पाडण्याचे सुचना अधिकारी व कर्मचारी यांना दिले. 
यावेळी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्राच्या निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी तसेच, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 22, 2024

PostImage

पहिल्या दिवशी अहेरीतून एक नामनिर्देशन पत्र दाखल 


 

गडचिरोली दि.22-: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.  67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
आज 22 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 20 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 9 व्यक्तींनी 25 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 11 व्यक्तींकडून 12 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.  

 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

२२ ऑक्टोबर  पासून गडचिरोली जिल्हयातील  विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन स्विकारणार


 

गडचिरोली दि.21:-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार  गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनाक 29 ऑक्टोबर 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात  स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंतची मुदत असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजनी दिनांक 23  नोव्हेंबर 2024 ला होईल.
 वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

निवडणूक कामाच्या जबाबदाऱ्या अचूक पार पाडा – श्रीमती मानसी निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण


 

गडचिरोली दि.२१ :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अधिकारी व कर्मचारी यांना सोपविलेल्या विविध जवाबदाऱ्या विहित वेळेत अचुक पार पाडण्याचे निर्देश 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांनी आज दिले.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतीक भवन नगर परीषद देसाईगंज येथे निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधीत बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
 
 मतदान पथके, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदानयंत्र व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, निवडणुक कार्य प्रमाणपत्र, आदर्श आचारसंहिता,  एक खिडकी योजना, चिन्हांकित मतदार यादी बनवणे इत्यांदी विविध विषयावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

गडचिरोली येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली


 

गडचिरोली:- आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सुरज शेडमाके, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, नंदू मडावी, विनोद सुरपाम, महेंद्र मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत  यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी  युवा सदस्य अजय सुरपाम, रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे, सुरज गेडाम, यश खोब्रागडे, महादेव कांबळे, आदित्य केळझरकर,सुधीर मसराम, नेहाल मेश्राम,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन,अंकुश बारसागडे, विक्की मसराम,महिला सदस्य शालू सुरपाम, गंगा सलामे उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024

PostImage

राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमीत्त अभिवादन...!


 


गडचिरोली:- राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री राकडे साहेब.बस स्थानक प्रमुख रामटेके साहेब,प्रमुख पाहुणे गुलाबराव मडावी,अरूनभाऊ पेंदाम वा.निरी.पूजा सहारे.नितेश मडावी,भास्कर आत्राम,तुळशीराम मेश्राम,विष्णुदास कुमरे,सुधीर मेश्राम,रामचंद्र सोयाम,गणेश कोडापे,जयभारत मेश्राम,सुरेश सिडाम,सुरेश कोवे,नामदेव मेश्राम, पवन वनकर,अशोक सुत्रपवर,प्रकाश मडावी, स.वा. निरी. धाडसे,नरड मॅडम,गीता मेश्राम,सुलोचना जुमनाके,माणिकशाह मडावी,दीपक मांडवे,अशोक नैताम,राजू मडावी,सुनील कुंभमवार उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश



ग‍डचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने 15  ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. यावेळी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्री दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
 निवडणूकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे. 
जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.  
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या विविध सूचना



गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024

PostImage

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी संजय दैने


 


गडचिरोली  :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील देतांना निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर,  नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, मतदान २० नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने काल जाहिर केले असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील 972 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत. 
मतदान केंद्र : मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : जिल्ह्यात एकूण 8 लाख 19 हजार 570 मतदार असून यात पुरुष मतदार 4 लाख 11 हजार 384, स्त्री मतदार 4 लाख 8 हजार 132, इतर मतदार 9 यांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 130820, स्त्री मतदार – 131347,  इतर -1, एकूण -262168), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार –154284, स्त्री मतदार – 152086,  इतर -2, एकूण -306417), अहेरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 126280, स्त्री मतदार – 124699, इतर-6, एकूण -250985) . जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या- पुरूष 9639, स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. मतदार नोंदणी प्रक्रीया नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.

सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल
सोशल मीडियावर लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

पोलिस विभागाची माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सांगितले की विविध दलाचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी निवडणूक शांततने पार पाडण्यासाठी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी ५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली  आहे तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्यसिमेवर 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले

००००००


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी


 

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मतदारांसाठी काही सुविधा दिल्या आहेत.


२४ तास चेकींग होणार

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.

गर्दी असल्यास खुर्ची देणार

मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

ज्येष्ठ लोकांना घरुन मतदानाची सुविधा

८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना….

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होणार

निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान


 


:-केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.


देशातील लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

भाजपपुढे आदिवासींच्या नाराजीचे आव्हान?


 


गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी समाजाच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या धनगर आरक्षणविरोधी मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या आदिवासींनी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी भाषणाला उभे राहताच ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींची नाराजी दूर करण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. जिल्ह्यात असलेली आदिवासींची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. त्यामुळे ही मते आपल्याकडे कशी वळवता येईल याकडे प्रत्येक पक्षाचा कल असतो. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेत ही मते खेचण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आले होते. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार भाजपपासून दुरावला गेला. तत्पूर्वी, कधी नव्हे ते आदिवासी समाजाच्या युवकांनी एकत्र येत गडचिरोली शहरात भाजपचे तत्कालीन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी आणि आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. निमित्त होते आमदार होळी यांच्या वादग्रस्त विधानाचे. तेव्हापासून आदिवासी तरुणांमध्ये भाजपविषयी दुरावा निर्माण झाला आहे. त्यानंतर झालेल्या आंदोलन आणि मोर्चात आमदार डॉ. देवराव होळी यांना आदिवासी समाजातून मोठा विरोध झाला.

काही दिवसांपूर्वी धनगरांना आदिवासींतून आरक्षण नको ही मागणी घेऊन गडचिरोलीत हजारो आदिवासींनी एकत्र येत मोर्चा काढला होता. यात देखील आमदार होळी भाषणासाठी उभे झाले असता त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर आदिवासी तरुणांनी ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. यावरून आदिवासींमध्ये भाजपविषयी असलेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हेच दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ही नाराजी कशी दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

 नाराजी भाजपविषयी की होळींविषयी?

मागील वर्षभरापासून विविध मोर्चात, आंदोलनात एकत्र जमलेल्या आदिवासींमध्ये भाजपविरोधी सूर दिसून आला. दुसरीकडे, यात आमदार देवराव होळी यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे आदिवासींची नाराजी ही भाजपवर नसून आमदार होळींवर आहे, असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपमधील एका गटाचा आमदार होळी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवार बदलाचीदेखील मागणी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 15, 2024

PostImage

आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपच्या हालचालींना वेग    भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं?


आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्य


:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली ज्यामध्ये विद्यमान आमदारांना सरसकट तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजतंय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील १२ भाजप नेत्यांची बैठक झाली. ज्यात भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावाही घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननी झाली. दरम्यान, बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ‘मविआ’ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल? 


 


मुंबई:-आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाविकासआघाडीची पत्रकार परिषद झाली. मुंबईत महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद आज झाली. यावेळी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.


मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळी झाडून रात्री हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही’, असं शरद पवार म्हणाले. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ‘गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. बाबा सिद्दीकीची काल जी हत्या झाली. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?’ असा सवाल करत तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला भेट!


 

अहेरी : शहरातील ब्राम्हमगरु मंदिर येथे पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शारदा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन देवीची दर्शन घेतले.दर्शना दरम्यान सोनालीताईंनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी सोनालीताई सोबत शहरातील समस्त महिला वर्ग उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन!


 

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार असून याचे भूमिपूजन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी या दोघांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकाम सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य गर्गमताई,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ओमकार पोट्टे,व्यंकटेश धानोरकर,अरविंद निखाडे,सुरेश आत्राम,हनुमंतू डोके,शंकर आर डोके,मधुकर सांमरे,सदाशिव धानोरकर,श्रीनिवास डोके,अशोक जुनघरे,प्रवीण पिपरे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,श्रावण पोटे,विनोद डोके,सत्यनारायण सामरे,सुनील चापले,राहुल निखाडे,आनंदराव धानोरकर,अक्षय पोटे,चंपत चौधरीसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी गिताली येथील जय मॉ दुर्गा मंडळाला भेट!             कंकडालवारांनी विधिवत पूजा अर्चना,आरती देऊन जय मॉ दुर्गा मातेचे दर्शन घेतले..!


 

मुलचेरा : तालुक्यातील गिताली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही जय मॉ दुर्गा मातेचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार गिताली येथील दुर्गा मंडळाला भेट घेऊन दुर्गा मातेचे विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दुर्गा मातेच्या दर्शन घेतले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांची जय मॉ दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांकडून अजयभाऊंची स्वागत केले.तसेच अजय कंकडालवार दुर्गा मंडळाला वर्गणी दिले.दर्शना दरम्यान कंकडालवारांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच स्थानिक नागरिकांना समस्या जाणून घेतले.

यावेळी मंडळाचे गोपाल कविराज सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,प्रशांत संजीत बिश्वास,अमित मुजुमदार,बासू मुजुमदार,आशिम अधिकारी,तेजन मंडल,परतो मंडल,जोतिष मंडल,महादेव पाईक,सुरज सरकार,विवेक बिश्वास,विजय शील,धीरज शील,दीपक बिश्वास,विजय सरकारसह आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद  शाळा राज्यात तृतीय  



 
गडचिरोली :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर  ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
 
मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 98 हजार शाळांमधून सुमारे 1 कोटी 91 लाख विद्यार्थी तर सुमारे 6 लाख 60 हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
 विजेत्या शाळांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविलेल्या गडचिरोलीच्या शाळेला 21 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर झाले आहे. राज्यस्तर, विभागस्तर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासकीय व खाजगी गटात एकूण ६६ शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Oct. 13, 2024

PostImage

धम्म चक्र प्रवर्तन दिनी अहेरीत भीम रॅली मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाला अभिवादन केले जय घोषणी अहेरी नगरी दुमदुमली


 

अहेरी:- येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने शनिवार 12 ऑक्टोबर रोजी 68 वे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आले.
   सकाळी पंचशील ध्वजचे ध्वजारोहण पुष्पा चांदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या नंतर सामूहिक रित्या त्रिशरण -,पंचशील ग्रहण करण्यात आले.
     सायंकाळी शहरातून भीम रॅली काढण्यात आले. जय भीम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणी अहेरी राजनगरी दुमदुमली. दरम्यान मुख्य चौकात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे शुभेच्छा दिले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 11, 2024

PostImage

फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित...!


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गाचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल नवदुर्गा मंडळ येथे महाआरती कार्यक्रम आयोजित केले.आयोजित महाआरती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून दुर्गा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.

विशेष म्हणजे या वर्षी फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ जवळ माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा कडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.महाप्रसाद कार्यक्रमला परिसरातील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद आस्वाद घेतले.त्यावेळी आरती दरम्यान अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी दुर्गा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.तसेच नवदुर्गा मंडळाला वर्गणीही देण्यात आली.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेझालवार,स्वप्नील मडावी,बबलू शेख,चिंटू आत्राम,जावेदभाऊ,रिंकू आत्राम,वाहन चालक सचिन पंचार्य,वाहन चालक प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

गडचिरोलीच्या आय टी आय ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जी यांचे नाव आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश


नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

 

गडचिरोली:-गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी  यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर  यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे .   या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११  ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश काँग्रेस नेते अजय कंकडलवार व मडावी यांनी केले कार्यकर्त्यांचे स्वागत...!*


 

 

अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

 

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आवलमरी येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच मारोती मडावी,ग्रामपंचायत सदस्य देवाजी आत्राम,बक्कय्या तलांडी, वेंकटी मोंडी,संद्रम लवंन्ना, मुल्ला तलांडी,अरुण तलंडी,आनंदराव तलांडी,पोचम चटारे, रजनीकांत तमाजुलवार,शंकर मडावी,वसंत तोरेम,वेंकटस्वामी तिरून्हारीवर,मल्लय्या दोंतुलवार,धनंजय सूनतकर आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

 

पक्षप्रवेशा दरम्यान आवलमरीचे ग्रामपंचायत सरपच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजिव मिरवेलवार,येरमनार येथील उपसरपंच विजय,शैलेश कोंडगोरले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चल्लावर काका,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्या वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी आगामी विधानसभा निवडणूक बाबत शांतीनगर येथे नागरिकांसोबत चर्चा...!


 

मुलचेरा : तालुक्यातील शांतीनगर येते काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शांतीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुक बाबत तसेच गावातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच गावातील युवक,नागरिकांना सांगितले की'काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.शांतीनगरसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.

आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान काँग्रेसचेनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,श्रीकांत हलदर माजी उपसरपंच शांतिग्रम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024

PostImage

भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला, रतन टाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास


 


:- भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024

PostImage

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित ब्रह्मपुरी तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत ४४७ घरकुलांना मंजुरी


 


ब्रम्हपुरी:-महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण ४४७ घरकुलांना मंजूरी मिळाली. यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उदांत हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली. सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून ब्रह्मपुरी तालुक्यात ४४७ नव्याने घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे . सत्ता काळ ते विरोधी बाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 9, 2024

PostImage

ओबीसीत 15 जाती येणार... लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?; उघड झालेली संपूर्ण यादी तुम्ही वाचली का?


ओबीसीत