ProfileImage
450

Post

9

Followers

0

Following

PostImage

Gadchiroli Varta News

April 16, 2024

PostImage

अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त,अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई


अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त,अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई

 

 मागील वर्षात 2 कोटी 61 लाख दंड आकारणी

 घरकुल योजनांसाठी गावालगतच्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

गडचिरोली दि.16 : जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत. अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री बर्डे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, तलाठी सुधीर बाविस्कर यांच्या पथकाने निवडणुकीच्या व्यस्त कामातही ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या चारही वाहने ट्रॅक्टर असून चालक गणेश यशवंत वार, भारत राऊत, सुभाष मंढरे आणि सचिन राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जिल्हयात मागील वित्तीय वर्षात 172 वाहन जप्त करण्यात येवून त्यातील 248 प्रकरणात 2 कोटी 61 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता, त्यापैकी 1 कोटी 39 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्हयात इंदिरा घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गंत दुर्बल घटकातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी 5 ब्रास पर्यंत रेती विना मुल्य उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हयातील आमगांव, (ता. चामोर्शी), थुटेबोडी व वैरागड (ता. आरमोरी), चोप (ता. देसाईगंज) नगरम-1 (ता. सिरोंचा) या रेती घाटांमधून रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र सदर घाटावरुन प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाणी रेती वाहतूक करणे खर्चीक ठरत असल्याने गावालगतच्या रेती उपलब्ध असलेल्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेती उपलब्ध करुन देण्या साठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे संयुक्त स्वाक्षरीने गावालगत उपलब्ध नदी-नाल्यांचे प्रस्ताव दिनांक 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले आहेत.

00


PostImage

Gadchiroli Varta News

April 16, 2024

PostImage

शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात


शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात

 

 

 

 

कोरपना तालुक्यातील नारांडा मधील राजेश मोहूले हा राजुरा येथे एका छोट्याशा दुकानात नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता हा युवक रमान नगर राजुरा येथे स्थायी झालात त्यांचे विवाह भुरकुंडा येथील एका पूजा शेंडे या युवतीशी जुडला मात्र त्यांनी आपला हा विवाह हा समाजाला एक आदर्श ठरणार असावा व जुन्या रूढी परंपरेनुसार विवाह करण्याचे ठरविले तेव्हा एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा राजुरा शहरात व तालुक्यात सुरू आहे.

 एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डफळे देखील लावण्यात आले . वऱ्हाडी मंडळी डफडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.

अनेक राजकीय मंडळींनी त्या विवाह ला भेटी दिल्या त्यांचाच मोठे बंधू संतोष मोहुर्ले एका राजकीय (भाजपा)पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या या लग्नात अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा


विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

 

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडे सोपविले पाठिंब्याचे पत्र

 

गडचिरोली -: केंद्रातील भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी सरकार असून तेली समाज ओबीसी प्रवर्गात येत असताना आजवर या समाजावर सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे. तर हुकूमशाही धोरणाने चालणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. ती अबाधित राखण्याकरिता आज विदर्भातील 12 तेली समाज संघटनांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व चंद्रपूर- वनी - आर्णी लोकसभा उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांना लेखी पत्रातून पाठिंबा जाहीर केला.

याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ तेली महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष धनराज मुंगले, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान , तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच पाठिंबा दर्शविणारे तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजाला आजवर केंद्र सरकारने कुठल्याही कल्याणकारी योजनांचा लाभ दिलेला नाही. तर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारकडून तेली समाजाची आजवर अवहेलनाच होत आली आहे. देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ हुकूमशाही धोरण राबवून बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचे कार्य करीत आहे. यामुळे देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आल्याची परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. देशाचे सर्वांना समान हक्क देणारे संविधान कायमस्वरूपी टिकावे व देशातील लोकशाही अबाधित राहावी याकरिता विदर्भातील तेली समाजाच्या 12 संघटनांनी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी यांची हात बळकट करण्यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन लेखी पत्रातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

अवैधपणे दारु विक्री करणा­या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा


 

अवैधपणे दारु विक्री करणा­या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा

 

चामोर्शी येथील मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, श्री. एन. डी. मेश्राम यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 23/10/2020 रोजी तापस दिनेश मल्लीक रा. नवग्राम तह. चामोर्शी जि. गडचिरोली हा आपल्या राहते घरी हात भट्टी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहितीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोस्टे चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस पथकाने आरोपी यांचे घराची झडती घेतली असता, घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये अवैध रित्या दहा लिटर मोह फुलांची दारु मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोस्टे चामोर्शी येथे अप क्र. 589/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपासाअंती आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपी विरुद्ध प्रभारी अधिकारी पोस्टे चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोहवा/आर. डी. पिल्लेवान यांनी आरोपीविरुद्ध कलम 65 (ई) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये दोषारोपपत्र तयार करुन न्यायालयात दाखल केले.

 

फिर्यादी व ईतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद मा. न्यायालयाने ऐकल्यानंतर दिनांक 05/04/2024 रोजी आरोपी नामे तापस दिनेश मल्लीक याला तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. एस. एम. सलामे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. तसेच पोअं/4188 श्री. टी. आर. भोगाडे यांनी सरकार पक्षास कोर्ट पैरवी म्हणून मदत केली व कामकाज पाहिले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

लोकसभा निवडणूक 2024 गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या


लोकसभा निवडणूक 2024
गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

               गडचिरोली, दि. 13 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. 
जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रासाठी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे एकूण १९०० शाईच्या बाटल्यांची आवश्यकता होती, त्यासोबतच अतिरिक्त ७१३ मिळून एकूण २६१३ शाईच्या बाटल्या जिल्ह्याकरिता मिळाल्या आहेत. मतदानासाठी आवश्यक साहित्यासोबतच शाईच्या बाटल्या मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत पोहोचत्या करण्यात येणार आहेत. 
मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.
            मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.
            मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला सदिच्छा भेट


पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला सदिच्छा भेट

 

भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरला भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे यांची खेलो इंडिया सेंटर आष्टी येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास भेट घेऊन सेंटर बद्दल सविस्तर माहिती घेऊन धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यावेळी तुलाराम सीताराम नखाते साहित्यिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले सर तथा धनुर्विद्या मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे व महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

April 12, 2024

PostImage

नवं जन्म घेण्यासाठी सचिन मागतो आहे आर्थिक मदत   कुटुंबीयांचे आवहान


नवं जन्म घेण्यासाठी सचिन मागतो आहे आर्थिक मदत

  कुटुंबीयांचे आवहान 

 

लखमापूर बोरी (वा.)

                चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील 28 वर्षीय युवक सचिन घनश्याम वैरागडे , याला कुठलेही व्यसन नसताना सुद्धा चार वर्षा पासून लिव्हर ऑफ सिरोसिस या रोगाने त्रस्त असून लिव्हर कायमचा निकामी (खराब) झाला आहे, त्याला लिव्हर ट्रान्स्फर करण्यासाठी २५ लाखाचा खर्च आहे त्यासाठी त्याला आर्थिक मदतीचा हात पुढे करत मदत करावी असे आवाहन कुटुंबियांकडून केले आहे 

 

 त्याला झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिंनेशन सेंटर, (ZTCC) – नागपूर , NOTTOM ID – R240068155, या संस्थे मार्फत लिव्हर (LIVER TRANSPLANT) देऊन त्याला नवीन जीवनदान देण्यात येणार आहे. परंतु, ऑपरेशन साठी साधारणतः 25 ते 30 लाख इतका खर्च येणार आहे. त्याच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या असून ऍलेक्सिस हॉस्पिटल मानकापूर, नागपूर. येथे ऑपरेशन करणार आहोत. परंतु मागच्याच वर्षी माझ्या वडीलाच्या दीर्घ आजारावर 15 लाख रु पर्यत खर्च करून सुद्धा ते अखेर मरण पावले व माझ्या उपचारासाठी सुद्धा 2020 पासून 18 लाख रु पेक्षा जास्त खर्च झाला आहे त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली असल्यामुळे आम्ही एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्व, मित्र - मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे व अनोळखी अशा सर्वाना सहकार्यासाठी विनंती करतो कि तुमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा... अशी त्यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे.

तुमची छोटी मोठी मदत सुद्धा सचिनला जगण्याची नवी उम्मीद मिळू शकते त्यासाठी 

सचिन मोबाईल नं. वं

फोन पे नं. 8390145784

गूगल पे नं 8390145784.

अधिक माहिती साठी वरील नं वर संपर्क करून आर्थिक मदत करावी असे आवाहन कुटुंबियांकडून केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 12, 2024

PostImage

दुचाकी अपघातातील एका इसमाचा जागीच मूत्यू, तर महिला गंभीर जखमी..!


दुचाकी अपघातातील एका इसमाचा जागीच मूत्यू, तर महिला गंभीर जखमी..!

 

 काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांच्या कडून येगडी कुटुंबियांना मदतीचा हात..!

 

अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील तुषार येगडी आणि त्यांची पत्नी भावनी या,दामपात्यांनी काल काही कामानिमित्त माड्रा येते जात असतांना माड्रा - दामरांचा जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून असलेल्या झाडाला धडक दिल्याने दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तुषार येगडीचा जागीच मूत्यू झालं आहे.भावनिला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

 

याअपघाता बाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले.अपघातात मूत्यू झालेल्या तुषार येगडी यांच्या पोस्ट माडम होई पर्यंत उपस्थित राहत शव घरी पोचण्यासाठी घाडी उपलब्ध करून दिले.तसेच होणाऱ्या कार्यक्रमासाठी येगडी परिवारातील नातेवाईकांना आर्थिक मदत केली आहे.

 

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गणेश नागपूर,राजू दुर्गे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गेस,प्रमोद गोडसेलवार सह येगडी परिवारातील नातेवाईक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके


लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके

गडचिरोली दि. 11 : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपुर्ण तपासणी नाक्यावर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी व दारु, अवैद्य रकम, आणि अंमली पदार्थाची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी वन विभागाला दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होणेसाठी व निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व वन विभाग यांच्यात समन्वय राखणेबाबत काल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष्यतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री दैने बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपवनसंरक्षक मितेश शर्मा (गडचिरोली), राहुल टोलीया (आलापल्ली), शैलेश मीना(भामरागड), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे.आता या मोहिमेत वनविभागाच्या तपासणी नाक्यांचीही मदत होणार आहे.

 तपासणीदरम्यान गैरप्रकार किंवा संशयीत प्रकार आढल्यास वनविभागाच्या तपासणी पथकाने नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांचेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त

जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात 55 हजार 285 लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 95 लाख 47 हजार रुपये आहे. तसेच एक कोटी 25 लाख किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान


गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान

 

शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

 

गडचिरोली दि.11: - महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले. 

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत 85 वर्षावरील 923 मतदार आणि 282 दिव्यांग अशा एकूण 1205 मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

संपूर्ण मतदार संघातून 85 वर्षावरील 1037 व 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले 338 असे 1375 मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री दैने यांनी मंजूर केले आहेत. 

विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षावरील मतदार व झालेले मतदान आणि दिव्यांग मतदार व झालेल्या मतदानाची (कंसात) माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव- 133 पैकी 127(दीव्यांग-38 पैकी 38), आरमोरी -88 पैकी निरंक (दीव्यांग-53 पैकी निरंक), गडचिरोली -132 पैकी 132 (दीव्यांग-70 पैकी 70), अहेरी 23 पैकी 21 (दीव्यांग-13 पैकी 10), ब्रम्हपुरी 224 पैकी 224 (दीव्यांग-63 पैकी 63), चिमुर 437 पैकी 419 (दीव्यांग-101 पैकी 101). याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील 28 मतदारांचेही अर्ज गृहमतदानासाठी मंजूर करण्यात आले आहे.

सिरोंचा येथील 100 वर्षीय किष्टय्या आशालू मादरबोईना आणि किष्टय्या लसमय्या कोमेरा (वय 86) यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार या मतदान अधिकाऱ्यांनी गृह मतदान घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

00


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत


मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत 

 

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील प्रशांत घाम हनुमान मंदीर येथून प्रारंभ होऊन श्री संत कार्तिक स्वामी महाराजांची पालखी सोहळा रामनगट्टा मार्गे तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे दिनांक १० एप्रिल रोजी आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या देवस्थानाचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी स्वतः पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे सारथ्य केले. तसेच पंदिलवार यांनी स्वागत केल्यानंतर भजनाचा आनंद लुटला. ते वारकऱ्यां समवेत भजन करीत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

 

पालखी सोहळ्याचे मार्कंडा कंन्सोबा येथील वनविभागाच्या नाक्याजवळ आगमन होताच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल पंदिलवार, माजी सरपंच गंगाधर पोटवार, सेवानिवृत्त वनरक्षक आत्माराम मस्के यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी स्वागत केले. यावेळी प्रभाकर बावणे, प्रभाकर लोणारे,‌वसंत बावणे, रवी बुग्गावार आदींसह देखील स्वागत केले. टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाच्या जयघोषात संपूर्ण मार्कंडा कंन्सोबा परिसर दुमदुमून गेला होता. दुपारपासून रखरखत्या उन्हात पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणारे भाविक सायंकाळी पालखीचे दर्शन होताच भक्तीरसात तल्लीन झाले होते. मार्कंडा कंन्सोबा येथील पंदिलवार परिवाराच्या निवासस्थानी पालखी सोहळा पोहचताच प्रमुख व विश्वस्तांचे स्वागत पंदिलवार परिवाराच्या वतीने करण्यात आले. दरम्यान अबाल वृद्धांसह भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्कंडा कंन्सोबा गावातील संजय पंदिलवार यांनी वैयक्तिक स्वरूपात वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली.यानंतर पालखी सोहळा चंदनखेडी (खर्डी ) या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली


 सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली 

आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  आष्टी - आलापल्ली महामार्गावरील Ashti ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा  आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता  या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे 
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

मुधोली चक येथील सुरज कोडापे बनलाय फौजदार


मुधोली चक येथील सुरज कोडापे बनलाय फौजदार.

अनु.जमाती मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.

 

        महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक २०२१ परीक्षेत चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र.२ या गावातील सुरज वनिता रमेशजी कोडापे यांनी हे यश मिळवत आपल्या गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

        .

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(एम.पी.एस.सी)

२०२१ साली संबंधित पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३७६ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यासाठी पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली.मुख्य परीक्षा जुलै २०२२ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये शारीरिक चाचणी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात पार पडली.या पदाची मुलाखत मार्च २०२४ मध्ये पार पडली.मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी बराच काळ प्रतीक्षेत गेला. मोठ्या प्रतीक्षेनंतर हा निकाल जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

      

 *शैक्षणिक पार्श्वभूमी* 

सुरज यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले,पुढे जा.कृ.बोमनवार विद्यालय चामोर्शी,विश्वशांती विद्यालय भेंडाळा,जवाहर नवोदय विद्यालय घोट या महाविद्यालयांचा सुरज माजी विद्यार्थी राहिला आहे.विशेष म्हणजे इयत्ता १२ वी जवाहर नवोदय विद्यालय,घोट येथून भूगोल ह्या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाल्यामुळे सूरजला उत्कृष्ट विद्यार्थी सन्मान (Excellent Student Award), भूगोल विषयाच्या मेरिटसह तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवनात सत्कार करण्यात आला.त्यावेळेस देशातील १२० विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी ह्यांनी हितगुज साधले त्यापैकी सुरज एक होता.सूरजने पुढील शिक्षण पुण्यातून राज्यशास्त्र ह्या विषयात घेतले.विशेष म्हणजे सुरजचे नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टरदेखील झाले आहे. 

 

 *सामाजिक पार्श्वभूमी* 

   वडीलांच्या पुरोगामी आणि आईच्या आंबेडकरी विचारात सुरजचे बालपण गेले.त्यामुळे लहानपणापासून सूरजला सामाजिक चळवळीत काम करायची ओढ लागली.सुरजने स्थानिक पत्रकार म्हणून एक वर्ष काम केले.फुले,शाहू आंबेडकर चळवळीतील लोकांसोबत मिळून त्यांनी संविधान जागृतीसह,विद्यार्थ्यांना मोफत शिकविणे,रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम घेतले.मागील काही वर्षात जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक आंदोलनात सुरज अग्रस्थानी राहिला आहे.

     विशेष म्हणजे शिक्षणाचे महत्व केवळ नोकरीपुरते मर्यादित न ठेवता शिक्षणाची व्यापकता त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करत पोलीस वर्दी घालण्याचे त्याने आपले स्वप्न पूर्ण केले.त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते,शिक्षक, मित्रपरिवाराकडून सुरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

        

 

 प्रतिक्रिया

   २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. आईवडील तसेच मित्रांचा कायमच पाठिंबा आणि विश्वास होता.हे यश केवळ माझे नसून माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या माझ्या प्रत्येक समाज बांधवांचे व गुरुवर्य,मित्रपरिवाराचे आहे.यापुढे सुद्धा अभ्यास सुरू ठेवून यापेक्षा चांगल्या पदासाठी तयारी करणार आहे.हा क्षण माझ्याबरोबरच जिल्ह्यातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चैतन्याचा आहे.संयमाने सातत्य ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

 

सुरज वनिता रमेश कोडापे

पोलीस उपनिरीक्षक


PostImage

Gadchiroli Varta News

April 10, 2024

PostImage

देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 प्रचार सभेत नेते हटाव... गडचिरोली बचावचा नारा

 

 हुकुमशाहीतून देश व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधन्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

 

 

देशांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प विकले गेले असुन दोन विकणारे व दोन घेणाऱ्यांनी देशाला उधवस्त करण्याचें कार्य चालविले आहे. देशांत प्रचंड महागाई, व बेरोजगारी यात जनता भरडली जात असताना देशावर वाढलेले कर्ज, देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले वाटोळे यावरून जनतेचे लक्ष विचलित करीत धर्मांधता व जाती -जाती मध्ये विष पेरून भांडणे व दंगलीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. या हुकुमशाही भाजप कडून आता देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कवच असलेल्या पवित्र संविधानाला आता समूळ नष्ट करण्याच्या हेतूने षडयंत्र चालविले जात असून मतदारांनो तुम्ही गाफील राहिल्यास पुढील काळात आपण सर्व बहुजन बांधवांना गुलाम म्हणून जगावे लागेल.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्हयातील चित्तरंजनपूर (येणापुर) येथे इंडिया आघाडी प्रणित, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस मार्गदर्शन बोलतं होते. 

आयोजित सभेस माजी खासदार मारोतराव कोवासे, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट), महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, युवक काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, प्रमोद भगत, बिजम सरकार, के. डी. मेश्राम, अश्विनी कुंभरे, रतन अक्केवार, सुधाकर गद्दे, प्रेमानंद मल्लिक, विकास पोतराजवार, स्वाती टेकाम, नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, निनाद देठेकर, रुपाली निखाडे तसेच महाविकास आघडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.

पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षा पूर्वी सत्तेत आल्यावर भाजपने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड दरवाढ करून अर्थिक शोषणातून जनतेला लुटण्याचे काम केले. देशांत महीला अत्याचार, गुन्हेगारी यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून बड्या व्यापाऱ्यांना कर्ज माफी दिली. तर स्थानिक उद्योगांमध्येही भूमिपुत्रांची अवहेलना केली. देश बुडविनाऱ्यांनी आता अब की बार 400 पार नारा देऊन देशाचे संविधान बदलाविण्याचा घाट रचला आहे. मतदारांनो आता देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच एकमेव पर्याय उरला असून इंडीया आघाडीच्या डॉ. नामदेव किरसान यांना विजयाचा आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

सलग 10 वर्षे खासदार म्हणुन संधी मिळूनही संसदेत मौन धारण करून क्षेत्रातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे, महिलांचे, युवा- युवतींचे प्रश्न सोडविण्यात सपेशल अपयशी ठरणाऱ्या निष्क्रिय खासदाराचा जनतेला काय उपयोग..? असा सवाल उपस्थित करीत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या वर निशाणा साधला.तर संविधानावर घाला घालुन मनुस्मृति विचारांचे हुकुमशाही सरकार चालवू पाहणाऱ्यांना व त्यांना साथ देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करून महाविकास आघाडीलाच संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत द्या. असे आवाहन भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत व रीपाई नेते ॲड. राम मेश्राम यांनी केले.तर महागाईने गरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारला पाय उतार करा.असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) अतुल गण्यारपवार यांनी केले. या प्रसंगी चित्तरंजनपूर (येनापुर) व परिसरातील महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

Gadchiroli Varta News

April 10, 2024

PostImage

दिव्यांगाच्या एका मतासाठी पोहचली यंत्रणा दुर्गम गावात,गृहमतदानातून नोंदविले मत


दिव्यांगाच्या एका मतासाठी पोहचली यंत्रणा दुर्गम गावात,गृहमतदानातून नोंदविले मत

 

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत

 

 

चंद्रपूर :- चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका… त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव….गावातील एकूण मतदार 281…..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.

 

 

 

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.

 

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीसुध्दा उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली.

 

यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.

 

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024

PostImage

गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार


गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार

 

 

अहेरी:-

जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली

 पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाले 

घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे

त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024

PostImage

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.


 

 

आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 

 आलापल्ली:+

 असे काय झाले की, त्याला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे

मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले

त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

 

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 

मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण


ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण

गडचिरोली दि.8: लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर यांच्या हस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समोर आज पूर्ण करण्यात आली. यातून ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्‍चिती झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम ची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. सदर सरमिसळ करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट वापरली जाईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर सरमिसळ प्रक्रिया उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 1891 असून यासाठी 2330 बॅलेट युनिट (बीयू), 2330 कंट्रोल युनीट(सीयू) आणि 2517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी (बीयू – 404, सीयू – 404 आणि व्हीव्हीपॅट - 435), आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रासाठी (बीयू – 362, सीयू – 362 आणि व्हीव्हीपॅट - 392), गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रासाठी (बीयू – 427, सीयू – 427 आणि व्हीव्हीपॅट - 462), अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रासाठी (बीयू – 350, सीयू – 350 आणि व्हीव्हीपॅट - 379), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रासाठी (बीयू – 395, सीयू – 395 आणि व्हीव्हीपॅट - 426) आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रासाठी (बीयू – 392, सीयू – 392 आणि व्हीव्हीपॅट - 423) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी संजय त्रिपाठी, तहसिलदार रविंद्र होळी उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री करण सयाम, राजेंद्र कोडापे, भारत खटी, गोपाळ खानवळकर, दत्तात्रय खरवडे, मिलिंद लांडे, रोशन कोडापे व श्री शेंडे आदी उपस्थित होते.

०००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

अहेरी विधानसभेत दिपक दादा आत्राम ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?


अहेरी विधानसभेत दिपक दादा आत्राम ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?

 

 

गडचिरोली - चिमूर मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांच्यात आहे.

 सध्या या दोन्ही उमेदवारांची विविध संघटना, संस्था, छोटे पक्ष यांच्याकडून पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.

कार्यकर्ते ठरवतील त्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता दिपक दादा आत्राम कोणाकडे झुकते माप देतील, अशोक नेतेंना की किरसानना समर्थन मिळेल हा सस्पेन्स कायम असून जि. प. निवडणुकीप्रमाणे आताही आताही “गेम चेंजर” ठरू शकतात अशी चर्चा आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणारा प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार इतर घटकपक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी वणवण फिरत आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातही हीच स्थिती आहे. समर्थन मिळविण्यासाठी उमेदवार अनेकांचे हातपाय जोडत आहेत. त्यातही ज्यांचा राजकीय प्रभाव किंवा वजन जास्त त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी तर उमेदवार किंवा पक्षश्रेष्ठी त्यांच्यापुढे अक्षरशः लोटांगण घालत आहेत. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेली लोकप्रियता बघता उमेदवारांनी त्यांच्याकडे समर्थनासाठी साकडे घातले आहे. त्यांचे समर्थन मिळाल्यास मतांच्या बेरजेत मोठा फरक पडू शकतो हे माहिती असल्याने भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांना गळ घालत आहेत. मात्र दिपक दादा आत्राम यांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे दिपक दादा आत्राम यांच्या पाठिंब्यासाठी भाजप उमेदवार मनधरणी करीत आहेत. दिपक दादा आत्राम यांच्या समर्थांनामुळेच आविसंला जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित करता आली होती. पण आत्राम भारत राष्ट्र समितीत गेले .मात्र, भारत राष्ट्र समितीचे काम महाराष्ट्रात बंद झाल्यानंतर खचून न जाता त्यांचे सर्व आविसं कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले.असे असले तरी दिपक दादा आत्राम यांचा प्रभाव पाहता या निवडणुकीत त्यांना डावलणे उमेदवारांना परवडणारे नाही. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने पुन्हा दिपक दादा आत्राम यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाठिंबा कुणाला द्यायचा हे आता माझे कार्यकर्तेच ठरवतील अशी दिपक दादा आत्राम यांनी स्पष्ट केली


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

राजकारणात खळबळ ,एकनाथ शिंदे उबाठा गटात


राजकारणात खळबळ ,एकनाथ शिंदे उबाठा गटात

 

 

चंद्रपूर

लोकसभा निवडणुकीची रंगतदार लढत आता सुरु झाली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून इनकमिंग, आऊटगोइंग चे सत्र सुरु झालंय.अशात नुकतीच एक मोठी बातमी हाती आली आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर रित्या प्रवेश केलाय.तुम्हालाही धक्का बसेल पण हि बातमी खरी आहे. शिंदे यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील घाटकुळ येथे एका अतिशय सामान्य कार्यक्रमात शिवसेना उबाठात प्रवेश करीत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता एकच एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उबाठात प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते चंद्रपूरातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत.

 

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.यानंतर राज्यात खोके, गद्दार, मिंधे अशा विविध उपमांच राजकारण सुरु झालं. शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गेलं.आमदार गेले, चिन्हही गेलं. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन आता चांगलाच बदला घेतला आहे.

होय आज रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा उबाठात सार्वजनिक रित्या प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ यां गावात हा कार्यक्रम संपन्न झाला. पण उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.संदीप गिऱ्हे, सुरज माडुरवार, आशिष कावटवार यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

एकुण साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवादी व एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने केले अटक


 

एकुण साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवादी व एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

 

 महाराष्ट्र शासनाने जाहिर केले होते एकुण 5.50 लाख रुपयांचे बक्षिस

 

 

 

माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यास व टिटोळा गावच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास आज दिनांक 07/04/2024 रोजी अटक केले. 

सविस्तर वृत्त असे आहे की, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पाश्र्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी नामे 1) काजल ऊर्फ सिंधू गावडे, वय 28 वर्षे, रा. कचलेर तह. एटापल्ली, जि. गडचिरोली व 2) गीता ऊर्फ सुकली कोरचा, वय 31 वर्षे, रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली ह्रा गडचिरोली-कांकेर (छ.ग.) सिमेवरील पोस्टे पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरात संशयितरित्या फिरत आहेत. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पोस्टे पिपली बुर्गी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -192 बटा. च्या जवानांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपासात असे दिसून आले की, सन 2020 साली मौजा कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलीस - माओवादी चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलीस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते. सदर चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 19/2020 कलम 302, 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सहकलम 5/27, 5/28 भाहका, 3,4 भास्फोका मध्ये अटक करण्यात आलेली आहे. 

 

यासोबतच मागील वर्षी सन 2023 मध्ये मौजा टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या माहे नोव्हेंबर 2023 मध्ये टिटोळा पोलीस पाटीलाच्या हत्येच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल गुन्ह्रातील पाहिजे असलेला आरोपी जनमिलिशीया नामे पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे गट्टा (जां.) पोस्ट पार्टी व केंद्रीय राखीव पोलीस बल ई -191 बटा. च्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्यास पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302, 364, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25 भाहका, 135 मपोका या गुन्ह्रामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया चालु आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

 “बॅनर” लावण्यास मनाई करीत भाजपच्या नेत्यांना हाकलले……!‌ जिल्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसंपादनाचा मुद्दा पेटला


 “बॅनर” लावण्यास मनाई करीत भाजपच्या नेत्यांना हाकलले……!

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसंपादनाचा मुद्दा पेटला

 

Loksabha elections gadchirolli

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस व भाजपात थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांना संधी मिळाली. तर शेवटच्या क्षणी अशोक नेते यांना भाजपच तिकीट देण्यात आलं. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात भूसंपादनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गावाकऱ्यात या मुद्द्याला घेत रोष पसरला आहे.अशातच chamorshi चामोर्शी तालुक्यातील काही गावात “बॅनर” लावण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यांनी भाजपचे बॅनर तर लाऊ दिले नाही. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना परत पाठविले. गावागावात विरोध वाढत असल्याने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

 

गडचिरोली मतदारसंघात मित्रपक्षाची BJP भाजपला पाहिजे तशी साथ मिळत नसल्याची चर्चा आहे.तब्बल दोनदा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळुनही अशोक नेते यांना लोकांची मन जिंकता आली नाही.अशात आता चामोर्शी तालुक्यात भूसंपादनाचा मुद्दा ऐरनीवर आला आहे.जवळपास 25 गावातील जमीन शासनाने संपादित करण्याचे नियोजन केले आहे. परंतु गावकरी याला विरोध करीत आहेत. या मुद्द्याला घेत दोनदा मोर्चा देखील काढण्यात आला.यामुळं सत्ताधाऱ्यांसह अशोक नेते यांच्यावरही गावकर्यांचा संताप आहे.

 

आता लोकसभा निवडूकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. काँग्रेस, भाजप व इतर पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत. अशातच भाजपचे काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत मुधोलीचक व जयरामपूर या गावात प्रचाराला गेले होते.यावेळी संतप्त गावकर्यांनी त्यांना अक्षरशः हाकलून लावले. एवढेच नव्हे तर त्यांना बॅनर बांधण्यास मनाई करण्यात आली. तुमचे खासदार कुठे आहेत. असे खडे बोल गावकऱ्यांनी सुनावले. हा प्रकार समोर येताच आता भाजप गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आधीच मित्रपक्षांची साथ मिळेनाशी झालीय, दुसरीकडे स्वपक्षियातील नेत्यांची सक्रिय भूमिका नसल्याने अशोक नेते यांचं टेंशन वाढलं आहे. अशातच आता गावकरी आपला जाहिररित्या रोष व्यक्त करू लागले आहेत.चामोर्शी तालुक्यातील २५ गावातील गावकरी आता एक बैठक घेऊन आपली पुढील भूमिका घेणार आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक, मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात


प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक,
मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात

 2 दिवस आधी अर्ज सादर करावा


गडचिरोली, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्व प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) स्थापन करण्यात आली. मतदानापुर्वीचा एक दिवस (18 एप्रिल) आणि मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल) मुद्रीत माध्यमाद्वारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट मिडीयातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभुल करणा-या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे.
कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य / जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणीत केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यायची झाल्यास अर्जदारांना सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी  यांनी त्यांच्या दिनांक 5 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये कळविले आहे.
०००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

देवरीत महायुतीचा भरगच्च महिला मेळावा


देवरीत महायुतीचा भरगच्च महिला मेळावा !

 

पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार अशोक नेते यांची उपस्थिती !!

 

गडचिरोली :-भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य आणि महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी शनिवार, 6 एप्रिल रोजी भव्य प्रचारसभा, तसेच महायुतीचा महिला मेळावा देवरीच्या छत्रपती शिवाजी संकुलात आयोजित केला होता. ना.धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महिलांच्या सन्मानासाठी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा उहापोह करण्यात आला.

 

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे. महिला‌ सशक्तीकरण, तीन तलाक, नारी शक्ती वंदन अधिनियम, मातृवंदना, सौभाग्यवती, सुकन्या योजना, महिला प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना अशा अनेक योजना महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्यान्वित करण्यात आल्या. महिलांच्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

 

केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33 टक्के करून महिलांचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांचा सन्मान करणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी येत्या १९ एप्रिलला भाजपला कौल देऊन महायुतीला विजयी करावा, अशी विनंती यावेळी खा.नेते यांनी मेळाव्याला उपस्थित महिलावर्गाला केली.

 

*पालकमंत्री म्हणून विकासकामे मार्गी लावली- ना.धर्मरावबाबा आत्राम*

 

गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले, महायुतीच्या नेतृत्वातील राज्य शासनसुद्धा महिलांच्या सन्मानासाठी कटीबद्ध आहे. लेक लाडकी ही योजना अतिशय चांगली योजना आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे. महिला सशक्तिकरण व मेळावे सुद्धा शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी आयोजित केले गेले. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सहा पुलांचे उद्घाटन केले आहे. याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते सुद्धा सोडवले आहेत. महायुतीच्या सरकारचा दृष्टिकोन विकासात्मक आहे. त्यामुळे या सरकारला संधी दिल्यास आणखी कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी मंचावर प्रामुख्याने महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष अॅड.येशूलाल उपराडे, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, प्रदेश उपाध्यक्ष शालिनी डोंगरे, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सभापती अंबिका बंजार, नगराध्यक्ष संजय उईके, तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, जेष्ठ नेते तथा कृषी ऊबास सभापती प्रमोद संगीडवार, उपनगराध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण तसेच मेळाव्याला महायुतीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकुलता एक मुलगा ठार


दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकुलता एक मुलगा ठार

 

 चामोर्शी तालुक्यातील येणापूर जवळील देशबंधू हिंदी हायस्कूल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन एक युवक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.आयुष सुरेश चोखारे (१८, रा. लक्ष्मणपूर) असे मृतकाचे नाव आहे. आयुष हा आपल्या दुचाकीने येणापूरकडून चामोर्शीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. अपघात होताच शेजारच्या लोकांनी आयुषला येणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पकती चिंताजनक असल्याने

त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शनिवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 6, 2024

PostImage

दुचाकीच्या धडकेत एक ठार, २ जखमी


दुचाकीच्या धडकेत एक ठार, २ जखमी

 

अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यालगतची घटना

 

 अमिर्झा - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज ५ एप्रिल रोजी अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यावर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

नामदेव सेलोटे (७०) रा. मौशी चक असे मृतकाचे नांव आहे. तर जखमीमध्ये सुधीर सेलोटे (३५) रा. मौशी चक, अनिल निलेकार (३६) रा. अमिर्झा यांचा समावेश आहे. नामदेव सेलोटे व

 

 

नातू सुधीर सेलोटे हे अमिर्झा येथील कार्यक्रम आटोपून दुचाकीने स्वगावी मौशीचककडे जात होते तर मौशी वरून अमिर्झाला अनिल निलेकार हा आपल्या दुचाकीने जात असतांना दोन्ही दुचाकींनी एकमेकांना धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

 

दोघे गंभीर जखमी झाल्याने अमिर्झा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 4, 2024

PostImage

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गडचिरोली,दि.4:- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (१९ एप्रिल २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे. 

        12 गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात, सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 19 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 4, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक


गडचिरोली पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक

पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी ०१ एप्रिल २०२४ रोजी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन चोरुन नेले. अशा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर सपोनि. आगरकर व पोस्टे स्टाफ यांचे एक पथक तात्काळ महादेव पहाडी पळसगांव येथे गेले असता, तिथे फिर्यादी नामे जय सहदेव दोनाडकर रा. बरडकीन्ही तह. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांनी सांगीतले की, जय व त्याचा मित्र हर्षल पहाडी चढत असतांना हर्षल यास दम आल्याने तो थोडा वेळ थांबला असता, हर्षलजवळ दोन अनोळखी पगडी बांधुन असलेले सरदार त्यांचेजवळ येतांना दिसुन आल्याने फिर्यादी जय हा हर्षलजवळ आले असता, पगडी बांधून असलेल्या दोन्ही इसमांनी त्यांना मारण्याची धमकी देऊन तुमच्याकडे असलेले पैस आम्हाला द्या असे धमकावल्याने फिर्यादी जय याने नकार दर्शविल्याने त्यापैकी एक मजबूत बांधा असलेल्या इसमाने फिर्यादी जय यांचे कॉलर पकडुन तुला मारुन टाकीन असे म्हणुन खिशात हात टाकुन खिशातील पॉकीटमध्ये असलेले ९५० रु. हिसकावुन घेतले. तसेच हर्षलकडे असलेले एक रिअल मी ७-१ कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे १३ हजार ५०० रु. हिसकावुन घेतले. त्यानंतर तिथे लोकं मदतीला येत असतांना पाहून, ते दोन्ही इसम पैसे व मोबाईल घेऊन पहाडीवर पळून गेले.

 

 

असे फिर्यादीने सांगितल्याने, सपोनि. आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी फिर्यादीस सोबत घेऊन महादेव पहाडी वरील झुडपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. सदर पळुन जाणाऱ्या दोन अनोळखी इसमांना पोलीस पथकांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, सदर संशयित इसमांची नावे १) बादलसिंग नैतरसिंग टाक (३२) व २) अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (२८) दोघेही रा. अर्जुनी मोरगाव सिंगलटोली वार्ड नं. २, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे असून फिर्यादी व इतर प्रथमदर्शी साक्षीदार यांचेकडे प्राथमिक तपास करुन तसेच आरोपीतांकडुन गुन्ह्रात जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोस्टे देसाईगंज येथे अप क्र. १०८/२०२४ कलम ३९२, ३४ भादंवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. आगरकर करीत असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप, सपोनि. संदिप आगरकर, पोअं/५५३८ विलेश ढोके, पोअं/३७५५ शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 3, 2024

PostImage

ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध


ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

 

 

            गडचिरोली, दि. 3 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

 

       राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक कोटी 63 लाखाची दारू व इतर साहित्य जप्त


निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक कोटी 63 लाखाची दारू व इतर साहित्य जप्त

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारसंघात 88 पथके

गडचिरोली दि. २ : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत दारू, अमली पदार्थ व इतर मौल्यवान एवज जप्त करण्यात आला असून याची एकूण किंमत एक कोटी 63 लाख 45 हजार रुपये इतकी आहे.

 जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस विभागामार्फत 46 हजार 318 लिटर दारू व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 3 हजार 975 लिटर अशी एकूण 50 हजार 293 लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 79 लाख 94 हजार रुपये आहे. तसेच 83 लाख 50 हजार किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे. अमली पदार्थांच्या विक्रीवरही पोलिसांचे बारीक लक्ष असून या कारवाईत 93 ग्रॅम तंबाखुजन्य अमली पदार्थ जप्त केले आहेत 

जिल्ह्यात 42 तर लोकसभा मतदार संघात 88 पथके नेमण्यात आली आहेत. यात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी) २९, भरारी पथक (एफएसटी) 24, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) 29 व 6 श्राव्य पथक(अेटी) पथकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष यांचेमार्फतही निवडणूक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कालावधीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणारी रोख रक्कम, मद्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबतच्या घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, जाहिरातींचे पुर्वप्रमाणिकरण करणे, नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करणे आदी कामे या पथकांच्या माध्यमातून केली जात आहे

याशिवाय आचारसंहिता भंग बाबत सिव्हीजिल ॲपवर एक तक्रार नोंदविण्यात आली आहे तर अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सीव्हिजिल ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांतच कार्यवाही केली जात असल्याने, निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सीव्हिजिल ॲपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

000


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

पाऊस आला रे आला... लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या बाटल्या 


पाऊस आला रे आला... लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या बाटल्या 

 

लखमापूर बोरी :- 

         गडचिरोली जिल्ह्यात कठोर दारू बंदी असताना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे जवळपास प्रत्येक गटर नाल्यात मोठ्या संख्येने दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असतात.

      अचानक अवकाळी मुसळधार पाऊस आला रे आला की या सर्व रिकाम्या बाटला गावच्या खाल उतार भागाकडे जाणाऱ्या नालीच्या दिशेने म्हणजेच ग्रा.पं. कार्यालय जवळच्या परिसरात प्लास्टिक घन कचऱ्याच्या स्वरूपात जमा होतात.

पोलीस प्रशासनाचे गावाकडे नेहमी लक्ष्य असताना गावात एवढी अफाट दारू कोण विकत असावी , ही दारू बाहेर गावातून आपल्या गावात येत तर नसेल, प्रत्येक नाल्यातून असंख्य दारूच्या रिकाम्या बाटला पोहताना बघून असे ना-ना प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात.

ग्रा.पं. कार्यालयाकडे अचानक शासकीय कर्मचारी किंवा इतर पाहुणे भेट द्यायला गेले की त्यांना कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात किंवा परिसरात असे असंख्य दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्यास पाहुणे आपल्या गावाबद्दल चांगले विचार करतील की वाईट विचार करतील...?  गावात दारू बंदी असून एवढ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या येतात कुठून असा प्रश्न महिला वर्गाकडून केला जात आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई


पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई

 

दारसह ३,९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

 

आष्टी: आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्रगस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० (तिन लाख छयानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतां विरुध्द पौस्टे आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मंडल करीत आहेत.

 

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे,यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल, जगताप, पोलिस शिपाई राउत, मेंदाळे, येनगंटीवार,यांनी पार पाडली.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­ऱ्या दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा


 

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­ऱ्या दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा ठोठावण्यात आली

 

गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी नामे - मपोउपनि. सोनम नाईक हे आपले हद्दीतील मपोउपनि. सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी दिनांक 27/10/2021 रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलींग करीत असतांना गांधीवार्ड देसाईगंज येथील आरोपी क्र. 1) नामे रजनी रामचंद्र आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज ही तीचे राहते घरी अवैधरीत्या देशी विदेशी दारुची विक्री करते अशी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन, पंचांसमक्ष आरोपी नामे रजनी आत्राम यांचे घराची झ्डती घेत असतांना आरोपी क्र. 2) नामे शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे रा. गांधीवार्ड, देसाईगंज हिने माझ्या आईला दोन मुली पोसायचे आहेत म्हणुन माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलीस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी फिर्यादीचे अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेली मपोउपनि. सुजाता भोपळे यांचे दोन्ही हात पकडुन खाली ढकलुन दिले. तेव्हा पोलीस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आरोपी क्र. 1 व आरोपी क्र. 2 यांनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.

 असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिनांक 27/10/2021 रोजी अप क्र. 579/2021 अन्वये कलम 353,332,504,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीस दिनांक 28/10/2021 रोजी 14.02 वा अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 38/2022 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवून, फिर्यादी पंच व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 01/04/2024 रोजी आरोपी क्र. 1) नामे रजनी आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज व आरोपी क्र. 2) नामे शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली या दोघींना मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 353, 34 भादवी मध्ये दोषी ठरवून 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.

 सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि. राजेश गावडे पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबंधीत साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

चितळाची शिकार प्रकरणी चार आरोपींना‌ वनविभागाने केली अटक...


चितळाची शिकार प्रकरणी चार आरोपींना‌ वनविभागाने केली अटक...

 

कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गिलगाव परिसरात चितळाची शिकार करून मांसाची वाटणी झाली व ते शिजवले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी १: १५ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी गिलगाव येथील संशयित आरोपी पंकज शंकर पिंपळवार यांच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घरून, वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मांस आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा केला.

 

     प्राप्त माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चितळाची शिकार करून मांस घरी नेवून शिजवित असल्याची गोपनीय माहिती वनअधिकारी यांना मिळताच वनअधिकार्यांनी मोठ्या शिताफीने "त्या" आरोपींना त्यांच्या घरी शिजविलेल्या मांसासह घरून ताब्यात घेत शनिवार ३० मार्च रोजी गिलगाव (जमीनदारी) येथे चार आरोपीना अटक करण्यात वन विभागाला यश आले.

या मध्ये आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला. यावेळी त्याने अरुण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दोघेही रा. गिलगाव (जमीनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यातील पंकज, अरूण व रोहिदास यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी तर विलास बोदलकर यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.

 

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत. या कारवाईसाठी अन्य वन कर्मचारी व वनाधिकान्यांचे सहकार्य लाभले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड


पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

 

गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रे) येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी दरवर्षी केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड होत असतो. अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रहिवासी असलेली कन्या ही चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा (रे) येथील जि.प.उच्च.प्रा.कन्या शाळा येथे इयत्ता ५ वी त शिकणारी विद्यार्थ्यांनी क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार हिने नवोदय विद्यालयाचे परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याने हीचा गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणा करिता निवड झालेली आहे. 

यावेळी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी 

मुख्याध्यापक गोटामी,वर्गशिक्षक

निमाई मंडल,रोशन बागडे,गौतम गेडाम,वर्षा गौरकर,रेखा हटनागर,

प्रीती नवघडे,विलास मेश्राम,आई वडील आणि आजी आजोबा

यांना दिले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

नवोदय प्रवेश परीक्षेत कुनघाडा कन्या शाळेतील 5 विद्यार्थिनींची गरुडझेप


नवोदय प्रवेश परीक्षेत कुनघाडा कन्या शाळेतील 5 विद्यार्थिनींची गरुडझेप

 

 

चामोर्शी:-नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्रा.कन्या शाळा कुनघाडा(रै) येथील विद्यार्थिनींनी सलग 4 च्या यशस्वी हॅट्रिक नंतर यावर्षी 5 विद्यार्थिनींनी नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. 

त्यामध्ये

*1)क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार*

*2)आराध्या प्रवेश मेश्राम*

*3)खुशी नीलकंठ टिकले*

*4)समृद्धी रवींद्र कुनघाडकर*

*5)अक्षरा विजय दूधबावले*

इत्यादींची निवड झालेली आहे.

 

 

*पाच वर्षापासून सुरू असलेली यशाची परंपरा यावर्षीही कायम*

 

संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे

2019 पासून नव्या जोमाने आणि नव्या जोशाने सुरू झालेली यशाची परंपरा या वर्षीही कायम असून मागील सलग चार वर्ष चार विद्यार्थिनींची हॅट्रिक आणि या वर्षी आपलाच विक्रम मोडून 5 विद्यार्थिनींची निवड झालेली आहें हे विशेष .....

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,

केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी 

मुख्याध्यापक गोटामी,वर्गशिक्षक

निमाई मंडल,रोशन बागडे,गौतम गेडाम,वर्षा गौरकर,रेखा हटनागर,

प्रीती नवघडे,विलास मेश्राम

यांना दिले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!


 

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ?

 

दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा - वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेत आता योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समीतीची बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 

उल्लेखनीय कि, जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणींना स्थानिक ग्रामसभांच्या असलेल्या खदान विरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवाती पासूनच समर्थन देवून नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभा सोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न, पेसा - वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तिच भूमिका काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची असल्याने जिल्हावासीयांची दिशाभूल होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

तसेच काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टर वर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभा विरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक


दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक

 

बल्लारपूर : येथील गांधी कॉम्प्लेक्स येथून मोपेड दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना बल्लारपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेने अटक केले.

येथील जूना बस स्टँड गांधी कॉम्प्लेक्स येथे २७ मार्च रोजी विशाल दिलीप पिसुडे रा. शिवाजी वार्ड बल्लारपूर यांनी आपली मोपेड वाहन क्र. एमएच ३४ एयु ७९४४ ठेवून कॉम्प्लेक्स मध्ये गेले होते. काही वेळा नंतर ते येऊन बघितल्यास त्यांना आपले गाडी दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केले. पण त्यांना गाडी मिळाली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिले. त्यावरून डी. बी. चे पोहवा सत्यवान कोटनाके, पोहवा रणविजय ठाकूर, पोशि श्रीनिवास वाभीटकर यांना माहिती मिळाली की तीन युवक कारवा रोड कडे मोपेड गाडी घेऊन फिरत आहे.

त्यावरून त्यांना विचारपूस केले असता ती चोरीची वाहन होते. गुलशन मनमित सिंग दलवेद (१९) शिव नगर बल्लारपूर, प्रेम राजेंद्र ढवस (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर, आतिफ मुमताज अली (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर यांना अटक केले. सदर आरोपी वर रामनगर चंद्रपूर तसेच सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. ते नुकतेच २० मार्च रोजी सुटून आले होते. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सत्यवान कोटनाके करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 31, 2024

PostImage

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश


गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

 

दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून आहेत. 

 

यावरून अपर पोलीस अधीक्षक (अभियान )श्री.यतीश देशमुख नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक काल सकाळी 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी माओवादी हे नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते.सदर डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी सापडली ती अभियान पथका द्वारे नष्ट करण्यात आली.सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

      यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात माओवादी सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत,दोन उमेदवारांची माघार


गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत,दोन उमेदवारांची माघार

 

 

गडचिरोली दि. 30 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली. 

 

हे उमेदवार आहेत रिंगणात :

  नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.  

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)

 


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या


नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या

    

     

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर काल पहाटे ही घटना उघडकीस आली. अशोक तलांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्‍या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी  त्याची हत्या केली. दरम्यान, अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. मागील आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी ४ नक्षल्यांना ठार केले होते. त्यामुळे नक्षल्यांनी पोलिस खबरे असल्याच्या संशयावरुन सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद

 

 

देसाईगंज (वडसा) पोलीसांची अट्टल गुन्हेगारावर कारवाई 

 

देसाईगंज (गडचिरोली) :-

 अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी अटक केली आहे देसाईगंज (वडसा )पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले; विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने त्याचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अधिक विचारपूस केली असता, सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले. सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

 

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली. सदर आरोपी वर जळगाव, भुसावळ, चंद्रपूर, भंडारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत. तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

लखमापूर बोरी इथे व्यसनाच्या विचाराची पेटविली होळी


लखमापूर बोरी इथे व्यसनाच्या विचाराची पेटविली होळी

 

 

 

 

  चामोर्शी : लखमापूर बोरी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नेहरू युवा केंद्र प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळातर्फे होळी सणाचे औचित्य साधून व्यसनांची करूया होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वॉर्ड क्रं. 01 मध्ये सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्वांना नशामुक्ती चे माहिती पत्रक हातात देऊन विद्यार्थी, युवकांच्या व बालगोपालांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे घातक व्यसन करणार नाही व दुसर्यांना पण करू देणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणार व व्यसनाचे विचार याच होळीत जाळनार अशी प्रतिज्ञा केली. 

    यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव दिलखुश बोदलकर यांनी मनोगताद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये विविध कारणांनी गुटका, बार, तंबाखू तसेच अन्य व्यसनी पदार्थ बिडी, सिगारेट यांचे सेवन व्यसनांमध्ये रूपांतरित होते. तसेच आजकाल बिअर दारू पिणे ही फॅशन बनली आहे. भविष्यात आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन मंगलताई मेश्राम व उज्वला शेंडे यांनी केले तसेच होळी - रंगपंचमी या सणामुळे समाज परिसरातील सर्व जातीधर्मात , प्रत्येक घरात व मित्र नातेवाईकांत आपुलकीची भावना निर्माण होत असून सर्वजण हे सण आनंदात साजरा करतात त्यामुळे कोणीही भेदभाव न करता सण साजरा करावे असे पण सांगितले. 

    यावेळेस अंनिस शाखा लखमापूर बोरी चे कोषाध्यक्ष टिकाराम शेंडे शिक्षक तसेच कालिदास मेश्राम, कविता केशव बोदलकर, बाबूराव नैताम, कपिल मडावी, दीपक मेश्राम, सुरज बांगरे, चंद्रहार बोदलकर, स्नेहा बोदलकर, देवाजी वासेकर, वैशाली सोनटक्के, उमेश सोनटक्के तसेच महिला व बालकवर्ग आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी


दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी 

 

सिंदेवाही : एकीकडे संपूर्ण तालुक्यात धुलिनंदन साजरा होत असतांना सायंकाळ च्या सुमारास मौजा मेंढा (माल ) च्या समोर दोन दुचाकी एकमेकांना आदलळ्या त्या त्यामध्ये दोन्ही दुचाकी वरील सहा जण जखमी झाले, जखमी मध्ये ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे,मिळालेल्या माहिती नुसार मौजा कोळसा (पांगडी) येथील रहिवासी सचिन शेडमाके वय वर्ष अंदाजे ३५ वर्ष हा आपल्या पत्नी व ३ वर्षाच्या मुलीला घेऊन नागभीड इथे आपल्या दुचाकी वाहन क्रं MH 34 CC 2011याने जात होता, तर विरुद्ध दिशेने मौजा पळसगाव (जाट ) कडून आपल्या स्कुटी या क्रं MH 34 CC 9623

या वाहनाने ट्रिप्पल सीट वैष्णवी अशोक सावसाकडे वय वर्ष २२ हेटी वॉर्ड सिंदेवाही,डिम्पल गुरनुले २० वर्ष सिंदेवाही ख़ुशी कृपा उंदीरवाडे वय १९ ह्या तीन मुली येत होत्या मौजा मेंढा(माल) च्या समोर गाडीवरून नियंत्रण सुटल्याने एकमेंकांना जाऊन धडकल्या,त्या मध्ये ३ वर्ष्याच्या मुलींसह सर्व च जखमी झाले आहेत वृत्त लिहत पर्यंत गंभीर जखमी असल्याने सर्वाना चंद्रपूर ला रेफर केले होते,

*सिंदेवाही पोलीस विभागाची कर्तव्यदक्षता*

या अपघाताची माहिती मिळताची पी एस आय सागर महल्ले,सहकारी 

 रणधीर मंदारे, विनोद बावणे व इतर कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन जखमी ना रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या गाडीत आणून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये भरती केले, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सतत तालुक्यात पेट्रोलिंग करून कुठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी सकाळ पासून दुचाकी वर ट्रिप्पल सीट जाणाऱ्या च्या दुचाकी पोलीस स्टेशन ला जमा करीत होते तरी पण पोलीस प्रशासन न व कायाद्याला न जुमानता भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात ला आमंत्रण दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

 पोलिसांनी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त


 पोलिसांनी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

 

 

गडचिरोली: दि 25/03/2024

गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.

पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.

 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून युवकांनी केली पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, झाडावर बांधले पानवटे


राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून युवकांनी केली पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, झाडावर बांधले पानवटे

 

 

 

आष्टी - सध्या दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांचे हाल होत आहेत. पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव चेतन कोकावार यांनी पुढाकार घेऊन येथील युवकांनी गावातील झाडांना पानवटे बांधून पशु पक्षांच्या पाण्याची सोय केली आहे.

 

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे पक्षु पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भेंडाळा येथील तरुणांनी एकत्र येऊन पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्य हेतुने झाडांना पानवटे बांधून पक्षांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळेल असे योग्य नियोजन करूण गावांतील झाडावर बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थानीही या उपक्रमाला साथ देत नियमित या पानवट्यात पाणी भरून ठेवत आहेत. युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी पक्षांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे असे आवाहन करीत आहेत. दरवर्षी भेंडाळा येथील तरुणांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राहुल वैरागडे मार्गदर्शनातून गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्याच्या विविध भागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार ,आरोग्य,पर्यावरण ,क्रीडा ,मनोरंजन, असे उपक्रम जीवन वासेकर,कृष्णा चलाख, सुबिर मिस्त्री, भूषण नंदगिरीवार, विहान सातपुते, अर्जित दास, यश गुरु, यश, साहिल वासेकर,भैरव चलाख, कार्तिक बोरकुंटवार, अनिकेत वैरागडे, लक्ष्मण चलाख, कुशल मडावी, रोहन वैरागडे , कृष्णा पाटील, सागर जुवारे, कृष्णा कंकलवार, हे उपक्रम घेत असतात.


PostImage

Gadchiroli Varta News

March 24, 2024

PostImage

ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर


ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर

 

 

 

बल्लारपूर : येथील किल्ला वार्ड मध्ये एका ट्रक ने उभ्या असलेल्या ऑटो ला मागून धडक दिल्याने ऑटो चकनाचुर झाला आहे.

२१ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ऑटो ला ट्रक ने मागून धडक दिले. ऑटो चालक मालक उमेश दूपारे हा ऑटो क्र एमएच ३४ डी ६२५६ चा धंदा करून रात्री आपल्या घरा समोर ऑटो ठेवले. रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रक क्र. एमएच ४० सीएम ५६२७ ने मागून धडक दिली. ट्रक मध्ये सामान भरून आहे. ते ट्रक बंगलोर ला जाणार होता अशी माहिती मिळाली. जेव्हा तो ट्रक बंगलोर ला जाणार होता, तर त्या १५ फूट चा गल्ली मध्ये कसा गेला. तेथील नागरिकांनी सांगितले की ट्रक चालक हा दारू पिऊन होता तसेच तो विसापुर मार्गाने आला. ऑटो चे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 24, 2024

PostImage

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात


अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात 

 

 

पोंभूर्णा : - अंधारी नदी भिवकुंड घाटातून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुधवार दि.२० मार्चच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास पोंभूर्णा एमएसईबी ऑफीसजवळ तहसीलदारांनी पकडून तहसिल कार्यालयात जमा केले.

 

तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असताना रेती माफिया अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहतूकीचा सपाटा लावला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी भिवकुंड घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम यांना मिळताच बुधवार दि.२० मार्चला मध्यरात्रीनंतर दिड वाजताच्या सुमारास रुपेश चन्नावार यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ बीएफ-१७७५ व ट्राली क्र. एमएच ३४ बीव्ही ७३७७ पकडुन तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात जमा केली.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 21, 2024

PostImage

चामोर्शी:आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, विस दिवसात १४ लाखांची अवैध दारू जप्त 


चामोर्शी:आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, विस दिवसात १४ लाखांची अवैध दारू जप्त 

 

अवैध दारू विक्रेत्यांचे दणाणले धाबे, नवनियुक्त ठाणेदार विशाल काळेंची धडक मोहीम 

 

    

आष्टी : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या काळात मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था ढासळू नये, म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अहेरी, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी यांनी अवैध धंद्यांवर वेळोवेळी धाडी टाकून त्यांचे विरूद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस पथकाने दिनांक १मार्च २०२४ ते २० मार्च २०२४ पर्यंत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारूविक्रेत्यांवर धडक कारवाई करत दारुबंदी कायद्यान्वये १७ गुन्ह्याची नोंद असुन १८ आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद आहेत व एकूण १४,३१,०२०/- रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे नजिकच्या काळात अवैध धंदे करणारे इसमांविरुद्ध भरपूर प्रमाणात कार्यवाही होत असल्याने पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या इसमांचे धाबे दणाणले आहेत 

 लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्याने, पोलिस यंत्रणेकडून रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करणे, फरार आरोपींचा शोध घेणे, अशा मोहिमा राबवण्यात येत आहेत. त्यात आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक भागांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याने, अशा दारूविक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यात दिनांक २० मार्चला वसंतपूर जंगल परिसरात छुप्या पद्धतीने अवैध गावठी दारू गाळण्यासाठी गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला असल्याची माहिती आष्टी पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करत एकूण १,२०,०००/- एक लाख विस हजार रुपये किमतीची १२०० लिटर प्लॅस्टिक ड्रममध्ये ठेवलेला गुळ मोहाचा सडवा जप्त करण्यात आला आहे. व एक होंडा शाईन कंपनीची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रुपये व ०६ प्लॅस्टिक ड्रम असा एकूण १,६३,०००/- मुद्देमाल अवैधरित्या पोलिसांना मिळून आल्याने या कारवाईत तालुक्यातील वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व पारीतोष प्रफुल्ल मिस्त्री यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी दिली


PostImage

Gadchiroli Varta News

March 20, 2024

PostImage

हत्या करून मृतदेह झाडाला वटकावला; पोलिसांनी ४८ तासात घटनेचा उलगडा केला


हत्या करून मृतदेह झाडाला वटकावला; पोलिसांनी ४८ तासात घटनेचा उलगडा केला

 

एटापल्ली : उसने घेतलेले ७ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

 

 

माहितीनुसार, संपत लुला दुर्वा (३२) रा.पेठा ता. एटापल्ली असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व रा. पेठा यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करायचा. १७ मार्चला तो काही कामानिमित्य पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर, कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर, जोगी मडावी, प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 20, 2024

PostImage

इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : काॅ. अमोल मारकवार


 

इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : काॅ. अमोल मारकवार 

 

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष हा जनहितविरोधी पक्ष आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या राजवटी जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी उध्वस्त झाला आहे. भाजपाने निवडणूक रोखे व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा करुन घेतला. त्या बदल्यात उद्योगपतींचे पंधरा लाख रुपये माफ केले. त्यामुळे देश कर्जबाजारी झालेला आहे.

भाजपा हा संविधान विरोधी,लोकशाही विरोधी असल्याने त्यांचा पराभव करने हे कम्युनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाजप विरोधातील इंडिया आघाडीच्या वतीने जो उमेदवार देण्यात येईल, त्या उमेदवाराच्या प्रचारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताकदीने पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळण्यात येणार आहे .

आरमोरी तालुक्यात मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षातर्फे स्वतः निवडणूक प्रचार कार्यालय उभारुन काम करणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

पुनर्वापरातून पाण्याची बचत करा –विवेक साळुंखे


पुनर्वापरातून पाण्याची बचत करा –विवेक साळुंखे

जल जागृती सप्ताहाचे उद्घाटन

75 हजार विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा

गडचिरोली दि. 16 : पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून पुनर्वापरातून पाण्याची बचत करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी आज केले.

जल जागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलजागृती अभियाना चा शुभारंभ श्री. विवेक साळुंखे यांच्या हस्ते गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. इंगोले, शिक्षणाधिकारी वासूदेव भुसे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव पाटील, जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्त प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट, लायड्स मेटलचे संचालक विक्रम मेहता, बँक ऑफ इंडिया मुख्य प्रबंधक मयुर कडबे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मोरघडे यांनी प्रस्ताविकातून जल जागृती सप्ताहाचा उद्देश व जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत रुपरेषा सादर केली. जल जागृती सप्ताहच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जल प्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे या विषयी जागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरीता जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये जल प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येत असुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हास्तरावर आज 16 मार्च रोजी सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतल्याचे माहिती त्यांनी दिली. जल जागृती अभियान अंतर्गत जिल्हा, तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा, चर्चासत्र, वेबिनार, चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, जलदिंडी, प्रभातफेरी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रकल्पस्थळी भेटी इत्यादी जल जागृती करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. मास्तोळी, श्री. इंगोले, श्री. भूसे, श्री. अर्जुनवार, श्री. हेपट, श्री. मेहता यांनी, तसेच उपकार्यकारी अभियंता कु. पानतावणे यांनी जल जागृती विषयी प्रबोधन केले. कनिष्ठ अभियंता श्री. मंदमुले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन श्री. भांडेकर व आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.

सर्व उपस्थितांनी उद्घाटन समारंभ प्रसंगी सामुहिक जल प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले


सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले

 

 

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

 

 

जवळपास 40 वेळा सर्वोच्च न्यायालयांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विश्वास व्यक्त केला आहे

 

 

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, माननीय न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- INCP ने अशी भीती व्यक्त केली की, 2016-19 दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता.

 

 

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 61A बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना मा. न्यायमूर्ती खन्ना यांनी निरीक्षण नोंदविले की ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर 10 हून अधिक प्रकरणे तपासण्यात आली आहेत. मा.न्यायालयाने वेळोवेळी याचिका फेटाळताना ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विश्वास दर्शविला आहे.

 

 

गेल्या दशकात आणि सुमारे 40 निकालांमध्ये, मा.सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोग EVM आणि या संबंधांतील पारदर्शक प्रक्रिया आणि कठोर प्रशासकीय कार्यप्रणालीवर त्यांची श्रध्दा आणि विश्वास कायम ठेवला आहे, त्यामुळे भारतात EVM च्या बाजूने मिळत असलेल्या न्यायाला प्रचंड मूल्य आणि सामर्थ्य मिळाले आहे. 

 

 

मा.सर्वोच्च न्यायालयाचे नवीनतम निर्णय, मा. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या आदेशांच्या मजबूत आणि वाढत्या प्रतिमेमध्ये आणखीच भर घालतात, ज्यांनी विविध ईव्हीएम प्रकरणांची तपासणी केली आहे आणि भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच हेही लक्षात घ्यावे की अलीकडील एका प्रकरणात (मध्य प्रदेश जन विकास पक्ष विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग, विशेष रजा याचिका (सिव्हिल) 16870/ 2022, सप्टेंबर, 2022), माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जदारास 50,000 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने असे निरीक्षण नोंदवले की, देशात अनेक दशकांपासून ईव्हीएमचा वापर केला जात आहे, परंतु वेळोवेळी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्यात आले आहेत. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने देखील अशाच एका याचिकेवर (सी. आर. जया सुकीन विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग आणि इतर, रिट याचिका (सिव्हिल) 6635/2021, ऑगस्ट 2021) रु.10,000 चा दंड ठोठावला होता. ज्यामध्ये ईव्हीएमचा वापर थांबवण्यास सांगून आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि त्याऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचे अर्जदाराने नमूद केले होते.

तत्पूर्वी, दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयाने, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी लोकसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटसाठी सुरू असलेली प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) प्रक्रिया संपुष्टात आणण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली होती. 

 

 

एनसीआर न्यायालयाने, आपल्या निकालात, विद्यमान कार्यपद्धतीच्या मजबूती आणि पारदर्शकतेवर जोर दिला आणि याचिकाकर्त्यांचे दावे खोडून काढले.

ईव्हीएम मॅन्युअल, स्टेटस पेपर, ईव्हीएम प्रेझेंटेशन, ईव्हीएमच्या 40 वर्षांच्या प्रवासावरील प्रगतीपुस्तक, ईव्हीएमचा कायदेशीर इतिहास यासारख्या प्रकाशनांच्या स्वरूपात ईव्हीएमशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आणि सतत अद्ययावत केलेले EVM प्रश्नावलीबाबत भारत निवडणूक आयोग नेहमीच आघाडीवर आहे.

000


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

योग्य उमेदवारासाठी काम करणार : शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ठराव 


 

योग्य उमेदवारासाठी काम करणार : शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ठराव 

 

गडचिरोली : प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीसह शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीत सहभागी असून आघाडीने योग्य उमेदवार दिल्यास जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी काम करण्याचा ठराव पक्षाच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.

 

जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. भाई रामदास जराते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघठनेचा आढावा घेण्यात आला. गाव शाखांचा विस्तार, बुथ रचना आणि पक्ष सभासदांसाठी सहकारी संस्थांच्या स्थापनेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच इंडिया आघाडीच्या वतीने गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढविण्याची शक्यता असल्याने काॅंग्रेस ने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय असला तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपविरोधी खिंड लढविणाऱ्या आणि माडिया- गोंड समाजातील प्रगल्भ नेतृत्व असलेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने काम करतील असा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. 

 

यावेळी जिल्हा सरचिटणीस भाई रोहिदास कुमरे, जयश्रीताई जराते, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, क्रीष्णा नैताम, दामोदर रोहनकर, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, निशा आयतुलवार, विजया मेश्राम, चिरंजीव पेंदाम, देवेंद्र भोयर, गणेश हुलके, आत्माराम मुनघाटे, बाळकृष्ण मेश्राम, डंबाजी भोयर, रामदास अलाम, मुर्लीधर गोटा, प्रकाश मडावी, देवानंद साखरे, घनश्याम मडावी, लक्ष्मण शेंडे, हरिदास सिडाम, गायताराम हजारे, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, रोहिणी ऊईके, कल्पना टिंगूसले, निरुताई उंदिरवाडे, काजल पिपरे, छाया भोयर, वेणू लाटकर, मनिषा हजारे, रिना शेंडे, खुशाली बावणे, सुमन सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....


जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....

 

 

जिल्हा परिषद शाळेत २० पैकी कमी पटसंख्या असलेल्या ६२,००० शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.यात गोंडपीपरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.२० पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याच्या शासनाचे विचाराधीन आहे.यात तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे.येनबोथला,कोरंबी,चेक विठ्ठलवाडा,तारसा (बुज),नांदगाव,नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळेचा निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता ६ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (दि.१५) रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर भरउन्हात शाळा वाचविण्यासाठी धरणे आंदोलन केलीत.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका गॉडपिपरी अंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून 

या सहाही गावचे पालक,शेतकरी, शेतमजूर व कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता १ ते ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष ६ ते १० या वयोगटातील मुले विठ्ठलवाडा येथे ये-जा करू शकत नाही किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज ६ ते ७ किमी.उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूत ने-आण करू शकत नाही.पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच कोरंबी व चकविठ्ठलवाडा हि दोन गावे विठ्ठलवाडा जिथे की समूह शाळा नियोजित आहे.या गावामधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.सदर महामार्गावरून सुरजागड लोहप्रकल्पाचे कच्च्या माल वाहतुकीचे अनेक हायवा ट्रक ये-जा करतात.यापूर्वी या महामार्गावर विद्यार्थ्यांचे अनेक अपघात झालेले आहे.तेव्हा आमच्या गावची शाळा बंद करून विठ्ठलवाडा येथे आमची ग्रामीण भागातील मुले पाठविणे पूर्णता गैरसोयीचे आहे.तेव्हा गाव तिथे शाळा या तत्वाला अननुसरुन आमची शाळा बंद करु नये व आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित करू नये.अशा विषयाचे निवेदन गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना देण्यात आले.शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे म्हणून सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी,पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या कार्यालयासमोर पालक व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक व विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपूर यांच्या कार्यालय समोर धरणे आंदोलने करणार असल्याचे पालकांनी सांगितले.यावेळी

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम उराडे ,दिपक ठेंगणे , शारदा मांडवगडे ,अंतकला निकोडे , कालिदास सातार ,शरद मेश्राम, अड.वामनराव चटप,शलिक माऊलीकर, मोरेश्वर सूरकर,सोनी दिवसे,अशोक कुडे, यासह अनेकांची उपस्थिती होती.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास  पकडले, 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त


देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास  पकडले, 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

 गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

 


अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी  पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली.पोलिसांनी गोंडपिपरी शहरातील मुख्य मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान शिवाजी चौक गोंडपिपरी येथे एका वाहंनाला अडवून तपासणी केली असता त्या वाहनात  दारू सापडली. अवैध दारू सह 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी प्रकाश विजय बोरकर रा. सिद्धार्थ नगर दुर्गापूर यांच्या वर मदाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
        गडचिरोली जिल्हयाची सीमा गोंडपिपरी तालुक्याला लागून आहे. गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरविली जाते. चंद्रपूर येथून चारचाकी वाहनाने अवैध दारू येतं असल्याची माहिती ठाणेदाराना मिळाली. लागलीच सापळा रचून वाहन क्र. एम. एच.05 सी. एच.1699 या वाहनांची तपासणी केली असता देशी  दारू आढळली. 
 निळ्या रंगाच्या आठ मोठ्या  प्लॅस्टिक पिशवी  मध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे प्रत्येकी ९० एम एल चे ज्यावर आर .व्ही .बिन ४२४ फेब २०२४ असे बॅच नंबर लिहून असलेले एकूण १५०० नग प्रत्येकी किंमत ३५ रुपये प्रमाणे ५२,५०० रुपये व पांढरा रंगाची हुडाई कंपनीची चारचाकी वाहन  किंमत चार लक्ष रुपये असा एकूण ४,५२,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले.  आरोपीचे नाव प्रकाश विजय बोरकर असे आहे. आरोपीची  चौकशी केली असता सदर दारू हि शैलेश वानखेडे रा. तुकुम, चंद्रपूर यांची असून त्यांनी लगामबोरी येथे नेण्यास सांगितले अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपी विरुद्ध  कलम ६५ (अ) मदाका अंतर्गत गून्हा नोंद करन्यात आला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे , पी.एस.आय. मोगरे , वागदरकर, गौरकार, चालक पवार यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

.‘त्या’ नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या,जारावंडी येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण


...‘त्या’ नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या,जारावंडी येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण

    

एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी येथील एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. ही बाब घृणास्पद व मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी नराधम संतोष नागोबा कोंढेकर (50) रा. भेंडाळा यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडितेच्या उपचारात हयगय करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन (नारी शक्ती) यासह विविध आदिवासी सामाजिक संघटनेने आज आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.

त्यांनी म्हटले की, आरोपी संतोष कोंढेकर हा जारावंडी येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी असून तो पीडित बालिकेच्या शेजारी असलेल्या शासकीय वसाहतीस राहत होता. आरोपीने शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहतीते बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडित बालिकेला वेळेवर उपचारही मिळाले नाही. त्यामुळे तिच्या उपचारातही हयगय झाली. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. तसेच आरोपी संतोष कोंढेकर यास भा.द.वि. कलम 376 व अन्य पोट कलम आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्ष अधिनियम 2012 (पोस्को) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार अपराध नोंद करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच सदर पीडित मुलीच्या पुढील शिक्षण व तिच्या घरच्या एकाला शासकीय नोकरीत घेण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने यावेळी केली आहे. पत्रपरिषदेला जयश्री येरमे, रेखा तोडासे, भरत येरमे, विद्या दुग्गा, शामला घोडाम, मंजूषा आत्राम, पुष्पलता कुमरे, वासुदेव शेडमाके, सुनील पोरेड्डीवार, सुनील पोरेड्डीवार, कालिदास गेडाम, अरुण शेडमाके, अमोल कुळमेथे आदी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

चार मुलींनीच वडिलांना खांदा देत केले अंत्यसंस्कार,मुलगा-मुलगी भेद करणार्‍यांना दिली चपराक


चार मुलींनीच वडिलांना खांदा देत केले अंत्यसंस्कार,मुलगा-मुलगी भेद करणार्‍यांना दिली चपराक

   

     

आरमोरी : मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार्‍यांना एक चपराक देणारी घटना चिखली गावात घडली आहे. मुलगा नसलेल्या वडिलांना चारही मुलींनीच खांदा देत अंत्यसंस्कार केले आहे. अलिकडे मुलगी हे परक्याचे धन समजले जात असल्याने दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र देसाईगंज तालुक्यातील चिखली रीठ येथील बाबुराव मडावी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या चार मुली पुढे सरसावल्या. त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. मुलींनी आपल्या आईचाही सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली गावात घडली.

 

 चिखली रीठ येथील रहिवासी बाबुराव आणि केमाबाई याचा सर्वसाधारण परिवार. काबाडकष्ट करणार्‍या बाबुराव यांनी उत्तरा, अनुताई, ललीता, आणि निराशा या चार मुलींना मोठं करून शिक्षण व संगोपण केले. एका एकर जबरान शेती कसुन चारही मुलीचे लग्न केले. मात्र कष्ट झेपत नसल्याने 80 पार केलेल्या आपल्या आई-वडीलांचा सांभाळ या चारही मुली करीत होत्या. गेल्या एक वर्षापासून आजारी वडीलांची अत्यंत गरीब परिस्थिती अशाच परिस्थितीत चार मुलीच्या लग्नाचा कर्जाचा बोजा देतादेता पुणता दिवाळा उडत असताना घराची संपूर्ण जबाबदारी आता या चारही मुलींच्याच खांद्यावर होती. दरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी बाबूराव यांचे आजारपणामुळे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अखेर मुलींनीच तिरडीला खांदा देऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. या घटनेनेने मुलगा, मुलगी असा भेद करणार्‍यांना मात्र चांगलाच चपराक बसली आहे. याची माहिती होताच श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्यावतीने मृतक बाबुराव मडावी यांच्या कुटूंबीयांना अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष शेषराव कुमरे, सचिव गिरीधर नेवारे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे, दिवाकर राऊत उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे मुश्किल करेल!


घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे मुश्किल करेल!

 

ग्रामपंचायत सदस्यानी दिली धमकी.

 

या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

 

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दारव्हा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये घडलेला प्रकारामुळे महाराष्ट्रात खडबड उडाली आहे. माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की, दारवा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये आपरेटर म्हणून कार्यरत असलेले जया लाभशेटवार यांना तेथील ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या शासनाच्या अनेक योजनेचे कागद शासनाच्या नियमानुसार व सरपंच व ग्रामसेवकांच्या आदेशावरून तयार करावे लागत असतात.असेच मी घरकुलाच्या नावाची यादी तयार करत असताना, तळोदा ग्रामपंचायतचे सदस्य प्रल्हाद बरडे व वर्षा बरर्डे माझ्याकडे घेऊन मला त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांचे नावे समाविष्ट करण्यास सांगितली. ती नावे अवैध असल्यामुळे मी ती नावे या घरकुलाच्या नावांच्या यादित समाविष्ट न केल्याने या ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रल्हाद बरडे व त्यांची पत्नी वर्षा बरडे यांनी मला निश्चितच त्रास देणे सुरू केला. त्यांच्या या त्रासाला न जूमानता मी धाडसीने माझे काम सुरूच ठेवले.परंतू माझा सूड घ्यावा या उदात्त्य हेतूने त्यांनी त्यांच्या जवळील लोकांना सह्या घेऊन 26 जानेवारीला मी महामानवाच्या फोटोला चपला घालून माल्या अर्पण केली असा आरोप करून मला त्रास देणे सुरू केले.आता या त्रासाला कंटाळून मी दारव्हा येथे जाऊन तेथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु दारव्हा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी न केल्यामुळे त्यांचे हैसले बुलंद झाल्यामुळे, येणाऱ्या काळात माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे जया लाभसेटवार यांनी मागणी केली. सदर घटनेची चौकशी न झाल्यास यापुढे तिव्र भुमिका घेण्याच्या इशारा जया लाभसेटवार यांनी दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 13, 2024

PostImage

अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर


अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर

कूरखेडा-

           कृषीपंप तसेच घरगूती विद्यूत वाहीणीवर मागील काही दिवसापासून सूरू करण्यात आलेले भारनियमनामूळे त्रस्त येथील हजारोचा संख्येत उपस्थीत शेतकर्यानी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे शाशन व विद्यूत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.

           तालूक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणार्या विद्यूत बिघाडामूळे सूद्धा विद्यूत पूरवठा बंद असतो त्यामूळे‌ विद्यूत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे त्यामूळे संतप्त शेतकर्यानी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कांग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पूकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोचा संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात विज वितरण कंपनी व शाशनाचा विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्याकरीता आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम याना रोषाचा सामना करावा लागला कूरखेडा येथील उपविभागीय विद्यूत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला यावेळी पूर्ववत येथील विद्यूत पूरवठा अखंडित ठेवण्याचा मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते व‌ विद्यूत विभाग व शाशनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांचाशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यानी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यानी तालूक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसाफक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकर्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे , शिवसेनाप्रमुख सुरेंद्र चंदेल, प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम महिला कांग्रेस ता अध्यक्ष आशाताई तूलावी कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे माजी सभापती परसराम टिकले शेतकरी नेते शाम मस्के आदि हजर होते


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

लैंगिक अत्याचार प्रकरणी सईओ पोहचल्या जारावंडीला,जाणून घेतल्या समस्या,दोषींवर करणार कारवाही


लैंगिक अत्याचार प्रकरणी सईओ पोहचल्या जारावंडीला,जाणून घेतल्या समस्या,दोषींवर करणार कारवाही

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला होता व जारावंडीकरांनी जणआक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती.

 

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, कूकर्म करताना एका मुलाने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला सरड गडचिरोलीला आणावे लागले त्यामुळे त्या पीडितेची हेळसांड झाली व तिला वेळीच प्राथमिक उपचार मिळालं नाही हे सर्व कृत्य येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जी पणामुळे झालं असल्याने जारावंडी व परिसरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रांला टाळे ठोकले त्यामुळे आरोग्य विभाग जग उठून बसला दरम्यान ही माहिती कळताच तात्काळ तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली परंतु येथील संतप्त नागरिकांनी रात्रोभर तालुका आरोग्य अधिकाऱ्याला त्याच आरोग्य केंद्रात डांबून ठेवले हि माहिती कळताच सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी,व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जारावंडी ला भेट देऊन संतप्त नागरिकांना समजावत येत्या पाच दिवसात सर्व समस्यांचा निराकरण करणार आधी ग्वाही देत टाळे ठोकलेल्या आरोग्य केंद्राला सुरू करण्यात आलं

 

 

 दोषींवर होणार निलंबनाची कारवाही

 

 

जारावंडी गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकतर याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला प्राथमिक उपचार मिळाले नाही त्यामुळे येथील सर्वच कर्मचारी याला दोषी आहेत असे म्हणत येथील दोषी कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात येईल असे सईओ यांनी सांगितले

 

 

तिसऱ्या दिवशी पोहचले प्रशासन

 

जारावंडी गावात ९ मार्च रोजी एका नराधामाणे ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे संतप्त नागरिकांनी येथील आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आणि संपूर्ण गावात ताणतणाव निर्माण झाला होता परंतु याची दखल प्रशासणांनी घेतली नव्हती परंतु संतप्त नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला डांबून ठेवल्याने प्रशासनात खळबळ माजली व सलग तिसऱ्या दिवशी प्रशासन गंभीर घेत जारावंडी गाठले यात गंभीर घटना घडून तीन दिवस लोटून सुध्दा प्रशासन गंभीर दखल घेत नाही अशा घटनांबद्दल प्रशासन किती गंभीर आहे असा सवाल करत येथील संतप्त नागरिकांनी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरले


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


 

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

 

गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वीस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्वीस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केलेले आहेत. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरीता सर्वीस रोडचे बांधकाम होवू शकलेले. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

 

शहरातील महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषद हद्दीतील सर्वीस रोड व इतर आरक्षित जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविणे गरजेचे असतांनाही त्याठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून आरक्षित आणि सर्वीस रोडवरील जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डींग्ज व इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी


संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

 

 

गडचिरोली - येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्याच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची नियुक्ती झाली. ११ मार्च रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले.

 

लोकसभा तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, संजय मीणा हे ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते कायम राहतील, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती, परंतु ११ मार्चला अचानकच त्यांच्या बदलीचे आदेश धडकले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 19 निर्णय


शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 19 निर्णय

.

 

कॅबिनेट मिटिंग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

 

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

 

बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार

 

एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी

 

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

 

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

 

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

 

एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

 

विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

 

राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

 

अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

 

 

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

 

मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

 

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

 

उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

 

६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

 

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

 

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

 

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता

 

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात नावासमोर आईचंही नाव लावण्याचा प्रघात सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली होती. यासंदर्भात सोमवारी राज्य शासनाने निर्णय घेऊन शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं अनिवार्य केलं आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

'त्या' नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन


 

'त्या' नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन 

 

पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

 

 

गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.

आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह परिसर दणाणून साेडला.

दरम्यान महामहीम राष्ट्रपती,मुख्यमंत्री ,राज्यपाल, महाराष्ट्र शासन गृहमंत्री ,पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा


 

जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा

 

पुलखल येथील बेकायदेशीर रेती वाहतूक प्रकरण

 

गडचिरोली : पुलखल येथील ग्रामसभेने रेतीघाट संबंधात २०२१ - २२ मध्ये प्रशासनाने केलेल्या रेतीघाट लिलावाला विरोध करुन कंत्राटदाराने उत्खनन करून साठवणूक केलेली रेती जप्त करुन ग्रामसभेला नुकसान भरपाई वसूल करुन द्यावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. असे असतांनाही जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी पाचव्या अनुसूचित क्षेत्रातील कायद्यांना धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कंत्राटदाराला रेती वाहतूकीची परवानगी देवून ग्रामसभेच्या वैधानिक अधिकारावर घाला घालण्याचे काम केले असून जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पुलखल येथील ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी दिला आहे.

 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामसभेने कोणताही ठराव केलेला नसतांनाही सन २०२१ - २२ मध्ये प्रशासनाने रेती घाटाचा लिलाव केला होता. १२ मे २०२२ रोजीच्या ग्रामसभेत या लिलाव प्रक्रियेविरोधात ठराव मंजूर करण्यात येवून दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारवाई करुन कंत्राटदारांकडून दंडासह वसुली करुन रक्कम ग्रामसभेकडे जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर २०२२ - २३ वर्षाच्या लिलाव संबंधाने प्रशासनाने ठराव करण्यासाठी दबाव निर्माण केला असता पुलखल ग्रामसभेच्या वतीने आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ग्रामसभेचा निर्णय हा अंतिम असल्याचा निवाडा उच्च न्यायालयाने दिला होता. असे असतांनाही जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी पुलखल ग्रामसभेच्या १२ मे २०२२ आणि २३ ऑगस्ट २०२२ च्या ठरावानुसार कंत्राटदाराकडून बेकायदेशीर उत्खननाबद्दल दंड वसुली न करता उलट पदाचा दुरुपयोग वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी कंत्राटदार विवाण ट्रेडर्स यांना रेती वाहतूकीची परवानगी दिली होती असा आरोपही जयश्रीताई जराते यांनी केला आहे.

 

संजय मिणा गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाल्यापासून लोह खाणी, रेती तस्करी तसेच शेतकरी व आदिवासी विरोधी वातावरण निर्माण झाला होता. याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने वेळोवेळी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी, पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून दबाव निर्माण करण्याचे काम केले होते. नव्या लोह खाणींसाठीच्या जनसूनावण्या तसेच भुमी संपादनाची जुलमी पध्दतही राबवली गेली होती. मात्र आता त्यांच्या बदली नंतर पुलखल रेती घाट, अवैध लोहखाणींसाठीच्या जनसुनावण्या, बळजबरी भूमी संपादन आणि अनुसूचित क्षेत्रातील कायद्यांना धाब्यावर बसवून संवैधानीक तरतूदींची वासलात लावल्याबद्दल जिल्हाधिकारी संजय मिणा यांना वैक्तीश : जबाबदार धरून त्यांच्या विरोधात उच्च न्यायालय आणि मा. राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याची माहितीही शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

लोकसभेची उमेदवारी स्थानिकांनाच द्या,महाविकास आघाडीतील जिल्हा पक्षप्रमुखांची बैठक


लोकसभेची उमेदवारी स्थानिकांनाच द्या,महाविकास आघाडीतील जिल्हा पक्षप्रमुखांची बैठक

 

देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जिल्हा पक्षप्रमुखांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्थानिक व्यक्तीलाच तिकीट देण्याबाबत ठराव घेण्यात आला. तसा ठराव केंद्रीय कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि संभाजी ब्रिगेड आदि पक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने विजय मिळवला. मागील काळात त्यांचे दुखद निधन झाले. त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांचा विकासाचा ध्यास पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या भागामध्ये त्यांच्या प्रति अत्यंत चांगली प्रतिमा आणि उत्साही लाट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो.  

 

बैठकीला शहर (जिल्हा )काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल, शिवसेना (उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटा)चे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता सुनील मुसळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख, संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

जिल्हा हादरला! चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार


जिल्हा हादरला! चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार

 

 

गडचिरोली:-जिल्ह्यातील चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाकणारी घटना जारावंडी येथे घडली आहे ,या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष नागोबा कोंढेकर वय ५० असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

 

सविस्तर वृत्त असे की आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची,

यात आरोपी शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

March 10, 2024

PostImage

दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दूतांचा सत्कार,सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांचा पुढाकार


दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दूतांचा सत्कार,सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांचा पुढाकार

 

सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले

 

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक बांधिलकी जोपासून सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्रातील दुर्लक्षित महिला स्वच्छता दूतांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक गाढवी नदीच्या तीरावरील शिवमंदिर येथे सहृदय सत्कार केला.

 

सर्व प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समाजसेवा क्षेत्रातील अग्रणी महिला भगिणी ज्योती बगमारे,उमा कोंडापे, आशा बोळणे, स्मिता उईके, सीमा मडावी,अल्का पेटकुले,रोशनी झिमटे, लता लोणारे, स्नेहा मडावी,रोहिनी सहारे, स्नेहा बगमारे, लक्ष्मी कोडापे आरती लठ्ठेआदी मान्यवर उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमात जयमाला पिंपळकर, शशीकला सपाटे,जयश्री कांबळे,लता खेडकर, यशोदा रामटेके, निर्मला कांबळे,उषा हेमके, सिंधू नारनवरे,मिरा बेहरे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आरमोरी शहरातील स्वच्छतेचे काम करून आरमोरीकरांना निरोगी व सुदृढ आरोग्य प्रदान करणारे घटक हे नेहमी दुर्लक्षित असतात.त्यांच्यांकडे सामान्यजण हे फक्त हिणकस नजरेने पाहत असतात.स्वच्छतेचे काम झाले की त्यांच्याकडे कुणीही आस्थेने विचारपूसही करीत नाही.अशा दुर्लक्षित परंतु बहुमूल्य असणाऱ्या एक-एक महिलांची निवड सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'हिरकणी'ने म्हणजेच विभाताईने केली.आता उरला प्रश्न त्यांच्या मानसन्मानाचा!तर त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करून सर्व महिला भगिणींचा यथोचित गौरव केला.त्यावेळी 

उपस्थित सत्कारमूर्ती महिला गदगदल्या.सर्व सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले.'आमच्यासारख्या उपेक्षित, दुर्लक्षित स्वच्छता दूतांचा मानपान करून केलेला सन्मान आम्ही जिवंत असेपर्यंत विसरणार नाही.समाजसेवा करणारेही भरपूर आहेत.परंतु वंचित, दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहणारे डोळे व दातृत्वाचे हात मात्र कमी होत आहेत.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.' सत्काररुपी मानसन्मानाने सा-या महिला गदगदून गेल्या व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मान्यवर महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ; तरुण युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ; तरुण युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

गडचिरोली :: 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रा सह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदारी सह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना अश्या परिस्थितीत त्यांचे आरोग्य सुद्धा सुदृढ रहाने अत्यन्त महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र संघटन गडचिरोली च्या वतीने, जिल्हा युवा अधिकारी अमीत पुंडे यांच्या मार्गदर्शनात, जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून, नारी शक्ती अभियाना अंतर्गत "फिटनेस रन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 50 पेक्षा अधिक मुलींनी रनिंग स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविले.  प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टीशर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पूजा नींदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमि गडचिरोली चे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमि गडचिरोली च्या समूहने मिळून सहकार्य केले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

कुलथा यात्रा महोत्सवाला गेलेला युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


कुलथा यात्रा महोत्सवाला गेलेला युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

    

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. 

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.

कुलथा हे गाव गोंडपिपरी - मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.

महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील आकाश अशोक शेडमाके वय २३ याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुळुन मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त


विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त

 

बल्लारपूर /- दि. 07/03/2024 रोजी गोपनिय माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली की, बल्लारशाह कडून चंद्रपूरकडे एक इसम दुचाकीवर काळया बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोडावार यांनी स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथक कारवाई करीता नेमून आदेशीत केले.

       सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे बल्लारशाह रोडवरील विसापूर टोलनाक्या समोरील वळणार सापळा रचला असता खबरे प्रमाणे दुचाकीवर एक इसम पाठीवर बैंग लटकवून दुचाकीवर येताना दिसता त्यास थांबवून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे यय 34 वर्षे व्यवसाय आयुर्वेदीक शॉप रा.112 ईडब्युएस नंदनवन सदभावना नगर प्लॉट नं.112 नागपूर असे सांगीतले. त्यास थांबविण्याचे कारण सांगून आमची पोलीस असल्याची ओळख करून देवून त्यास आमचे ओळखपत्र दाखवून त्याचे जवळील काळया रंगाचे कॉलेज बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे बॅगमध्ये नोटाचे बंडल दिसून आले. ते पंचासमक्ष बॅगमधुन काढून पाहणी केली असता 22.26,000/-रु. ज्यात 500/-रु.च्या 4652 नोटा, 1,49,000/-रु. ज्यात 200/-रु.च्या 745 नोटा असा एकूण 24,75,000/-रू नगदी रक्कम मिळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगदी रोकड मिळून आली सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैध्य मार्गाने प्राप्त केली असा संशय आल्याने कलम 41 (1) (ड) दं.प्र.सं. अन्वये सदर रोकड ताब्यात घेण्यात आली.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि.हर्षल एकरे, पो.उपनि.विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे मदतीने केली असुन सदर रोकड बाबतचा तपास पोउपनि विनोद भूरले, स्था.गु.शा. चंद्रपूर हे करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

चपराळात महाशिवरात्री यात्रा ११ मार्च पर्यंत चालणार, तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती 


चपराळात महाशिवरात्री यात्रा ११ मार्च पर्यंत चालणार, तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती 

 

 

 

आष्टी येथून १२ किमी अंतरावरील वर्धा व वैनगंगा नदीच्या संगमावरील निसर्गाच्या सानिध्यातील श्री हनुमान मंदिर प्रशांतधाम चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार, ८ मार्चपासून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे यात्रा महोत्सव ११ मार्चपर्यंत चालणार असून याठिकाणी भाविकांची गर्दी उसळणार आहे.

 

महाशिवरात्र महोत्सवादरम्यान घटस्थापना, अभिषेक, ब्रह्मलीन परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचे पूजन, स्थानिक भजन मंडळांद्वारे भजन, कीर्तन, भागवत कथा व धार्मिक प्रवचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांतधाम तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदीलवार यांनी दिली आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. सोबतच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेसाठी सेवकांची व्यवस्था, यात्रा परिसरात वीजपुरवठा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नदीवर स्नान करताना, जीवंत विद्युत तारेच्या जवळ फिरताना सतर्कता बाळगावी. तसेच आपत्ती क्षणी पोलीस, विश्वस्त मंडळाला माहिती द्यावी. ११ मार्च रोजी दुपारी वाजता आरती व गोपालकाला तसेच १.३० वाजता मुंबई येथील कल्पना नायर व नायर परिवाराकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण


प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण

 

नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार 

 

आष्टी/ प्रतिनिधी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टी याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर बाहेर गावाहून येणाऱ्या यात्रेकरूंना आष्टी येथील चौकात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

 

महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे, माजी पोलीस पाटील शंकर पाटील मारशेट्टीवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प.पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी शंकर पाटील मारशेट्टीवार यांनी भगवान शिवशंकर (महादेव)व रयतेचे राजे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कोणत्याही संघटना चालवत असताना कसल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींना जो सामोर जातो तो जीवनामध्ये यश संपादन करतो.या चौकात गेल्या ३ वर्षापासून सुरू आहेत हे पुढे सुरळीत चालू ठेवावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन प .पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे प्रसार व प्रचार प्रमुख सुरेश औतकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारीऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. 
 
 
कुरुड गावातील निर्घून हत्येचा पर्दाफाश
(गडचिरोली पोलीसांनी केले आरोपीस जेरबंद)
   
  
  
  
  
  
गडचिरोली : 8 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृतक प्रदिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार, (30) रा. कुरुड (ता. देसाईगंज), यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानुषंगाने देसाईगंज पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक 04/2024 कलम 174 जाफौ. अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करुन मय्यत प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार यांना ठार मारणा­ऱ्या अज्ञात आरोपीविरुध्द पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे 28/02/2024 रोजी अप क्र. 065/2024 कलम 302 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलिस उपनिरीक्षक धनगर, पोलिस अंमालदार ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम विकास जनार्दन बोरकर (50) रा. कुरुड (ता. देसाईगंज याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यास सदर गुन्ह्रामध्ये 6/03/2024 रोज सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली.
 
अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांच्याकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा तसेच त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. दरम्यान, 8/02/2024 रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.
 

 
सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला देसाईगंज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस 7 ते 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना/राऊत, पोअं/ढोके, पोअं/ कुमोटी, पोअं/ सराटे व पोअं/शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

ओबीसी साखळी उपोषनाची सांगता ; मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच करणार तीव्र आंदोलन


ओबीसी साखळी उपोषनाची सांगता ; मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच करणार तीव्र आंदोलन

 

 

गडचिरोली :: ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन ओबीसी समाज संघटनेतील युवक 4 मार्च पासून साखळी उपोषनावर होते. आज दि.8मार्च रोजी, राज्याचे अन्न व औषधं प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम आणि राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 8 मार्च रोजी, ओबीसी युवा समाज संघटना च्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषनास भेट दिली, व उपोषणकर्त्या युवकांशी चर्चा केली. यावेळी ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषण समाप्त केले. शासन ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या बाबत मा. मुख्यमंत्री व ओबीसी कल्याण मंत्री यांच्याशी सोमवारी चर्चा करून मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले.

 राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी युवकांना आश्वसत करून त्यांच्या रास्त असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व साखळी उपोषण मागे घेण्याकरिता विनंती केली असता राज्याच्या दोन प्रमुख नेत्याने आश्वासन दिल्या मुळे ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने साखळी उपोषण मागे घेतले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे मोठे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

 उपोषण कर्ते राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पंकज खोबे, पदंम भुरसे, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, नयन कुनघाडकर, महेंद्र लटारे सह यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सुरेश भांडेकर, मंगला कारेकर, नम्रता कुत्तरमारे, वंदना चपले, चंद्रकांत शिवणकर, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर,आकाश आंबोरकर, बादल गडपायले, रोशन कोहळे, प्रफुल आंबोरकर, साहिल धोडरे, सचिन पिपरे, सत्यवान पिपरे, मोरेश्वर चौधरी, अमित सुरजगाडे, नंदकिशोर भांडेकर, आकाश भोवरे, स्नेहल कुनघाडकर, नितेश कुंनघाडकर, निलेश कुंनघाडकर, पवन बरसागडे, पंकज सातपुते, अक्षय कोठारे, प्राणिल सातपुते , अभिषेक कुंनघाडकर, दीप सातपुते, सुरज कुनघाडकर, मनोरंजन गव्हारे, नरेश आभारे, आकाश सातपुते, आकाश सोनटक्के, रोशन सातपुते, सुहास पिपरे, अक्षय भांडेकर, योगीराज सुरजगाडे, योगेश बरसागडे, नवलेश्व वैरागडे, रमेश मेश्राम, मेघराज वसेकर, विजू उरकुडे, मधुकर नैताम, खोजेंद्र सातपुते, आदी बहुसंख्येने ओबीसी युवा वर्ग उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

चपराळा येथील यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


चपराळा येथील यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

 

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरता बंदोबस्तासाठी तैनात सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्याची घटना दिनांक आठ मार्च ला सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

 

भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरल्ली ता. मुलचेरा असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.

 

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले.आठ मार्च ला चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरल्ली येथे पाठविण्यात आले आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

दुर्दैवी घटना :नाल्यात कोसळलेल्या कारने घेतला पेट; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू


दुर्दैवी घटना :नाल्यात कोसळलेल्या कारने घेतला पेट; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू

 

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर प्रवास करीत असताना एक मारूती इग्नेश कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळी आणि तिने अचानकपणे पेट घेतला. या आगीत होरपळून कार चालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना 8 मार्च रोजी सकाळी अंदाजे 7 च्या सुमारास भद्रावती शहरा जवळील कोंढा नाल्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला.

 

बातमी लिहिस्तोवर सदर घटनेतील मृत चालकाची ओळख पटलेली नव्हती. सदर कार मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरवरून चंद्रपूरकडे येत असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यानंतर कारने पेट घेतला. चालकाने कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याला बाहेर निघता न आल्यामुळे कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. असे अंदाज वर्तविले जात आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट..


 

खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट..

(आष्टी)

दि.०८ मार्च २०२४

आष्टी:- खासदार अशोक नेते यांनी महाशिवरात्री निमित्ताने चपराळा येथे पं.पुज्य संत श्री. कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे विधीवत पुजा अर्चना करत सदिच्छा भेट दिली.

 

याप्रसंगी चपराळा देवस्थान च्या भाविक भक्तांसाठी खासदार अशोक नेते यांच्या विकास निधीतून २० लक्ष (विस लक्ष रूपये) स्वच्छतागृह मंजूर करण्याचे आश्ववासित केले.

 

 चपराळा देवस्थान मंदिराच्या कमेटीने खासदार अशोक नेते व खा.नेते यांच्या अर्धांगिनी सौ.अर्चना अ.नेते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मानसन्माने स्वागत केले.

 

यावेळी खा.नेते यांनी चपराळा देवस्थानात येणाऱ्या समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री यात्रा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी सोबत लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, चपराळा देवस्थान समिती चे अध्यक्ष संजय पंदिलवार,अर्चना अ.नेते, पुष्पाताई लाडवे तसेच मोठ्या संख्येने चपराळा मंदिरातील भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात


4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात

 

चंद्रपूर - महिला तलाठी ला 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी मौजा सिदूर पिपरी येथील शेती पत्नी व मुलांच्या नावे बक्षिस पत्र करून दिले होते, बक्षीस पत्राच्या आधारे शेतीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालयात जात तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडूंरवार यांच्याकडे अर्ज केला, काही दिवस झाल्यावर अर्जाचे काय झाले याबाबत फिर्यादी हे तलाठी कार्यालयात गेले, त्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी फेरफार व सातबारा तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.

फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली, 7 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सापळा रचला, त्यावेळी तलाठी प्रणाली तुडूंरवार यांनी तडजोडीअंती 4 हजाराची लाच मागितली.

तलाठी कार्यालय नागाळा येथे प्रणाली तुडूंरवार यांना 4 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली..तलाठी तुडूंरवार यांना शासनाची सेवा करताना अंदाजे 40 हजार रुपये पगार मिळतो तरी त्यांनी शेतक-याला 4 हजाराची लाच मागितली हे विशेष.

सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 7, 2024

PostImage

ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा


ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा.

 

गडचिरोली :: ओबीसींची जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचे बांधकाम  जिल्ह्यातील ओबीसींच्या कमी झालेले आरक्षण इत्यादी मागण्याकरिता ओबीसी युवा समाज संघटना गडचिरोली कडून दिनांक ४ मार्च पासून साखळी उपोषण सुरु आहे वरील सर्व मागण्या रास्त असून त्या मंजुरीकरिता शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परंतु केंद्र व राज्य सरकार वरील मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने आपल्या जाहीरनाम्यात ओबीसीची जातनिहाय जनगणना, ओबीसीसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय, या प्रमुख मागण्यासह दहा मागण्या समाविष्ट केलेल्या आहेत. 

     या निमित्ताने केंद्र  व राज्य शासनाला विनंती आहे की, ओबीसी युवकांचा पुन्हा अधिक अंत न पाहता त्यांच्या रास्त मागण्या तात्काळ मंजूर कराव्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी,  जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे,ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, शंकरराव सालोटकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष अपर्णाताई राऊत, पुरुषोत्तम बावणे, आकाश निकोडे  सोनालीताई नागापुरे, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, तेजस मडावी, जितेंद्र मुनघाटे,  सुरेश भांडेकर, चारुदत्त पोहने, कपिल पेंदाम , उत्तम ठाकरे, जावेद खान सह इतर काँग्रेस पदाधिकारी सह राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पदम भुरसे, प्रफुल आंबोरकर सह मोठ्या संख्येने उपोषणकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 6, 2024

PostImage

महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती


महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती

 

गडचिरोली:-मागील बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील देवलमरी आणि महागाव-गेर्रा त्यासोबतच गडचिरोली तालुक्यातील पोर्ला उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

 

अहेरी उपविभागात बारमाही वाहणारे नद्या आहेत.मात्र, येथील शेतकऱ्यांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. परिसरातील नागरिकांना या बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शेती करता यावं या उदात्त हेतूने मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गेल्या अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजना आणण्यासाठी प्रयत्नात होते.शिवाय सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी देखील होती.

 

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली.मागील बरेच वर्षांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला.अखेर मागील महिन्यात सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच झालेल्या बैठकीत महागाव/गेर्रा,देवलमरी आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या तीन उपसा सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे.

 

विशेष म्हणजे देवलमरी आणि महागाव/गेर्रा ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर असून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहेत.या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या परिसरातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

 

बॉक्स--

आपल्या जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवर उपसा सिंचन योजना आणल्यास त्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी होईल त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात होतो. जिल्ह्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजनेचा वारंवार पाठपुरावा केल्याने यश मिळालं आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका,रेगुंठा, अहेरी तालुक्यातील देवलमरी,महागाव/गेर्रा आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील शेकडो गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. विशेष म्हणजे रोजगार,शिक्षण आणि सिंचन यावर आपला भर असून जिल्ह्यातील रखडलेले पूर्ण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-धर्मराव बाबा आत्राम

मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.


PostImage

Gadchiroli Varta News

March 6, 2024

PostImage

ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा जाहीर पाठिंबा


ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा जाहीर पाठिंबा.

 

गडचिरोली :: ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन 4 मार्च 2024 पासून, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी युवक साखळी उपोषनावर आहेत. उपोषनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गडचिरोली जिल्हा च्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , प्रदेश सचिव ऍड. संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नहीम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, सुजित राऊत,छत्रपती टेंबरे, तुलाराम मायकलवार ,सुधाकर गद्दे, रमेश भुसारकर ,माधव परसोडे, पंकज बारसागडे खुशाल ठाकरे आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.

ओबीसींच्या सर्व मागण्या आमच्या पक्षांच्या मागण्या आहेत आम्ही पक्षाच्या वतीने ओबीसी मागण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास खंबीर आहोत. पक्षाच्या वतीने हा अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी याप्रसंगी सांगितले.

 

*ओबीसी साखळी उपोषनातील या आहेत प्रमुख मागण्या*

 

१) बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी.

 

२) मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये.

 

३) २७ डिसेंबर २०२३ आणि २६ जानेवारी २०२४, रोजी सामाजिक न्याय विभागाने काढलेली सगे सोयऱ्याची अधिसूचना रद्द करण्यात यावी.

 

४) ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले, वस्तीगृह तात्काळ सुरु करून वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता विनाविलंब आधार योजना लागू करण्यात यावी.

 

५) ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप, परदेशी शिष्यवृत्ती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत शैक्षनिक कर्ज व्याज परतावा योजना इत्यादींचा लाभ मिळन्यासाठी ८ लाखाची उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या विदयार्थ्यांना लाभ देण्याचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा.

 

६) गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीमध्ये आदिवासी उमेदवाराला १००% आरक्षण असल्यामुळे गैरआदिवासी प्रवर्गातील नोकरभरती मधील आरक्षण शून्य टक्के झाले आहे, हा गैरआदिवासीवर खूप मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा.

 

७) पेसा क्षेत्रात ज्या गावातील गैरआदिवासींची लोकसंख्या ५०% च्या वर आहेत,अशी गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात यावी.

 

८) ओबीसी, एससी, एसटी,विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी.

 

९) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे.

 

१०) शेतकऱ्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या.

 

११) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात नव्या 200 बसेस देण्यात याव्या.

 

१२) सुरजागड व कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे.

 

१३) ओबीसी शेतकर्यांच्या वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.

 

१४) राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला देण्यात आलेला निधी अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी.

 

15) सारथी च्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तत्काळ सुरु करण्यात याव्यात.

 

16) महाज्योतीला दरवर्षी १००० कोटीचे अनुदान देण्यात यावे,तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर महाज्योतीचे कार्यालये सुरु करण्यात यावे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 4, 2024

PostImage

महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग ; लाखो रुपयांचे नुकसान


 महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

 

शहरासह काही ग्रागीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत 

 

 

अहमदपू