निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
13-06-2024
दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार
एटापल्ली : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना एटापल्ली पासून 5 किमी अंतरावरील जिवनगट्टा ते डोड्डी गावादरम्यान बुधवारी (दि. 12) घडली. मैनू चैतू बोगामी (वय 17) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मैनू बोगामी हा अल्पवयीन मुलगा बुधवारी दुपारी उडेरावरून एमएच 33 एक्स 7154 क्रमांकाच्या दुचाकीने डोड्डी गावाकडे जात
होता. दरम्यान, त्याचवेळी डोड्डी गावाकडून येणाऱ्या दुचाकीची चैतूच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. यात मैनू याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अपघात घडताच 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच, मैनूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविण्यात आला. अधिक तपास एटापल्ली पोलिस करीत आहेत.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments