आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
26-12-2024
पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व सडवा केला नष्ट
आरमोरी :आरमोरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी दोन मोहफुल हातभट्टीवर धाड टाकून पाच लाख रुपयांची मोहफुल दारू व मोहफुल सडव्याची होळी करून नष्ट केल्याची कारवाई दिनांक २४ डिसेंम्बर रोजी दुपारी २ ते ५ च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील वनतलाव व कोसरी डॅम जंगल परिसरात केली. ईश्वरदास देविदास खेडकर (४०) व कैलास विठ्ठल वाढणकर (३४) दोन्ही रा. देलनवाडी ता. आरमोरी अशी फरार आरोपींची नावे आहेत.
आरमोरी तालुक्यातील मौजा देलनवाडी वनतलाव परिसरात तसेच कोसरी डॅम परिसरात मोहफुल हातभट्टी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच आरमोरी पोलीस पथक, पंच व मुक्तीपथ संघटनेचे पदाधिकारीयांनी मोहभट्टीवर धडक दिली असता ईश्वरदास खेडकर हा आरोपी देलनवाडी वन तलाव परिसरात अवैद्यरित्या मोहा दारू काढीत असल्याचे दिसून आला. पोलिसांनी ४ हजार रूपये किमतीची २० लिटर हातभट्टी मोहा दारू, २ लाख २५ हजार रूपये किमतीचे ४५ नग निळ्या रंगाचे १०० लिटर क्षमतेचे ४५०० लीटर मोहसडवा भरलेले प्लास्टिक ड्रम असा एकूण असाएकूण ०२ लाख २९ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा मिळून आला. कोसरी डॅम येथील जंगल परिसरात आरोपी कैलास वाढणकर याची मोहभट्टी असल्याचे कळताच पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला.
या ठिकाणावरून पोलिसांनी ०२लाख ६५ हजार रुपयांचा हातभट्टी मोहा दारू व मोहा सडवा जप्त केला. दोघाही आरोपिकडूनएकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आरमोरीपोलिसांनी घटनास्थळी नष्ट करून वापरण्यात आलेल्या सर्व मालाची, प्लास्टिक कॅनांची होळी केली. फिर्यादीचे लेखी फिर्याद वरून दोन्ही फरार आरोपीवर म. दा. का. कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल केला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. कैलास गवते, सपोनि. प्रताप लामतूरे, पो. हवा. विशाल केदार, पो.अं. सुरेश तांगडे, पोअं. हंसराज धस यांनी केली.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments