अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
29-06-2024
आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक,कर्मचाऱ्यांची बडतर्फी हा उपाय नाही...
सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांचे पत्रकातून आवाहन..
गडचिरोली : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांनी सबंधित डॉक्टरांना निलंबित केले.पण गडचिरोली जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डॉक्टरांना निलंबित करणे हा पर्याय नाहीच.त्याऐवजी कारणांची चौकशी करून चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे हे जास्त हितावह ठरेल.
निवेदनात सादर केलेले बाकीचे मुद्दे प्रशासन किती गांभीर्याने हाताळते ते बघणे महत्वाचे आहे.कारण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने तडकाफडकी संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याला बडतर्फ केले मात्र हे न्याय्य नसून आरोग्य सुविधांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे एकंदरीत जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था ही वरिष्ठांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गांभीर्याने तपासणी आणि उपचार केले जात नाही शिवाय रुग्णवाहिका सुविधाही दिल्या जात नाही याबरोबरच स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना कागदोपत्री,शासनाचे अनावश्यक योजना प्रक्रिया आणि ऑनलाईन कामाचा भडिमार केला जातोय त्यामुळे मूळ सुविधा लोकांपर्यंत पोहचविणे हे आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ह्यावर पर्याय काढून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आरोग्य व्यवस्थेत मूलभूत बदल होऊन जिल्ह्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात जेणेकरून जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती आरोग्य मिळण्याच्या हक्कापासून वंचित राहणार नाही.जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात दिलेल्या मुद्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी,असे आवाहन सुरज कोडापे यांनी केले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments