ProfileImage
125

Post

3

Followers

0

Following

PostImage

खबरदार महाराष्ट्र

April 18, 2024

PostImage

कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह भामरागड तालुक्यात मतदान जनजागृती.


कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह भामरागड तालुक्यात मतदान जनजागृती.


            भामरागड ता.१८- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मतदार, मतदानापासून वंचित राहू नये.त्यांना मतांचे महत्त्व कळावे या उदात्त हेतूने सांज मल्टी अॅक्टीव्हीटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरीया,बिनागुंडा स्थीत भामरागड या सामाजिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष कुमार रुपलाल मारोती गोंगले या अवलियांनी सायकलवर मतदान जनजागृतीचे फलक लावून व साऊंड सिस्टिम बांधून गावागावात मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने करित आहे.
     "मत आपका अधिकार है, अपने अधिकारपर गर्व करे, मतदान करे."
     "अंगुलीपर लगीन स्याहीका निशान सिर्फ निशानही नही,आपकी शान है, लोकतंत्र की जान है."
       " कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट".अशा आशयाचे घोषणा देत गत आठ दिवसांपासून  रुपलाल गोंगले या अवलियांनी मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने चालविले आहे.त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

April 2, 2024

PostImage

भाजप ची तालुकाध्यक्ष प्रशांतभाऊ आत्राम यांच्या उपस्तिथीत बूथ सभा व प्रचार सभा संपन्न


भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या वतीने मा.श्रीमंत  राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बुथ सभा व प्रचार सभा सम्पन्न,                                                                                 भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी साहेब यांना तिसऱ्यादा प्रधानमंत्री बनविणे आहे,व मा.अशोक भाऊ नेते लाडके लोकप्रिय खासदार तथा लोकसभा उमेदवार

 गडचिरोली चिमुर क्षेत्र यांच्या निवडणुक  प्रचारार्थ मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम, गाव चलो अभियान राबविण्यात आले असुन एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती क्षेत्रातील निवडणुक प्रचार नियोजन बद्ध कार्यक्रम पंचायत समिती क्षेत्र,                1) जारावंडी,(जारावंडी)   2) कसनसुर (घोटसुर)                     या क्षेत्रातील निवडणुक बैठक सभा घेतांना.  रवि भाऊ ओल्लालवार जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी गडचिरोली,

मा. प्रशांत भाऊ आत्राम तालुकाध्यक्ष एटापल्ली, मा मोहन भाऊ नामेवार तालुका महामंत्री,सम्मा जेट्टी तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी, योगेश कुमरे तालुका सचिव,मा संजय पोहनेकर सर,मा दामोदर नरोटे जिल्हा महामंत्री ,सुभम मुनरत्तिवार सदस्य ,मा सुनिल मडावी माजी सरपंच ,मा देवीदास मोहुर्ले , राजु गुरनुले ,  मा. महागुराम उसेंडी ,मा .देवु गावडे,व पंचायत समिती जारावंडी - कसनसुर या क्षेत्रातील बुथ प्रमुख बुथ पालक व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी एटापल्ली.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील अकराव्या सत्रात चरणदास वैरागडे विजयी


 


  गडचिरोली: -स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे अकरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नागपूर येथील ज्येष्ठ कवी  चरणदास वैरागडे या कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "मोगरा " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       चरणदास वैरागडे हे नागपूर येथील ज्येष्ठ कवी असून त्यांच्या 'नाद पैंजनांचा' हा कवितासंग्रह व 'आर्त कथांची सार्थकता' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.  ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.  
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या अकराव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  जयराम घोंगडे, प्रशांत गणवीर , माधुरी अमृतकर, पुरुषोत्तम लेनगुरे, विलास जेंगठे , गणेश रामदास निकम,  भारत झाडे, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम, गजानन गेडाम, संतोष कपाले, बाबाजी व्ही. हुले, प्रभाकर दुर्गे, रेखा दिक्षित, ज्योत्स्ना बन्सोड, तुळशीराम उंदीरवाडे, सुजाता अवचट, सौ. प्रतिभा सुर्याराव  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
 
     


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत "माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी" प्रशिक्षण संपन्न:


 

ब्रह्मपुरी;-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जुलै 29,2020.पासून लागू करण्यात आलेले आहे. शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे नियोजन राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि तालुकास्तर असे करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी व अनुदानित शाळांतील शिक्षकांचे" शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण" पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे साहेब यांचे मार्गदर्शनात व नियोजनात दिनांक 11 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 दरम्यान दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले.
         प्रशिक्षणा दरम्यान इयत्ता बारावी व दहावी च्या बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे व त्यात अनेक शिक्षकांच्या केंद्र संचालक, मॉडरेटर, रनर तसेच पेपर तपासणीची कामे असल्यामुळे, शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील खाजगी व अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ,वरील कामातून मुक्त असलेल्या 120 शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती.सदर शिक्षकांना दिनांक 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 130 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात आले व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
           दिनांक 16 मार्च 2024  रोज शनिवारला प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे साहेब त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघ जिल्हा चंद्रपूरचे सचिव श्री.संजयजी हटवार सर त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून   नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रणदिवे सर; लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.धोंगडे सर; सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चे मुख्याध्यापक श्री .नगराळे सर व महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव चे मुख्याध्यापक श्री.ओमप्रकाश बघमारे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
             नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्याला वैश्विक बनवण्याच्या दृष्टिकोनाचा मार्गपथ असून त्यानुसार शिक्षकांनी मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज व्हावे; असे परखड मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे यांनी प्रदर्शित केले. सोबतच प्रशिक्षणाकरता निवजाबाई हितकारणी एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी सचिव अशोक भैया यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
           दरम्यान दिनांक 11 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 या कालावधीत चाललेल्या दोन्ही टप्प्यात विषय तज्ञ म्हणून भूमिका बजावलेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ओमप्रकाश बघमारे सर; संजय हटवार सर ,राजेंद्र हटवार सर, विजय धांडे सर, आशय पोफळी सर, प्रा.नाशिक गेडाम सर, विषय तज्ञ नरेश रामटेके सर ,पद्माकर रामटेके सर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पद्माकर रामटेके सर यांनी तर आभार विषय तज्ञ नरेश रामटेके सर यांनी मानले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

किष्टापूर येथील आत्राम परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची  उपस्थिती


 

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन आत्राम कुटुंबियांची सांत्वन
        
अहेरी : तालुक्यातील किष्टापूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती,माजी सरपंच भगवान आत्राम यांचे वडील कलमशाई आत्राम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.

या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी  माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह उमेशभाऊ मोहूर्ले उपसरपंच वेलगुर,साईनाथजी नागोसे,आविस सल्लागार हरिदास आत्राम,ग्रामपंचायत सदस्य वामनजी मडावी,अनिल दब्बा,पोलीस पाटील महेश अर्का,राजू येरमे,विनायक बोरूले, शरद मोहूर्ले,संजय चटारे,विजय शेंडे,आनंदराव चहाकाटे,प्रविण रेषे,विनोद कावेरी,जुलेख शेख,माजी सरपंच विजय कुसनाके सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 15, 2024

PostImage

निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे:भाग्यश्री ताई आत्राम


 

स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धा

आलापल्ली: क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी नैपुण्य प्राप्त केले ते यशस्वी झाल्याची दिसून येत आहे. खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता आपल्याला गतिमान चातुर्य टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करायचे असेल तर कठोर परिश्रमाची गरज आहे. जे अडचणीवर मात करून पुढची पायरी शोधतात तेच यशस्वी होतात.त्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ एकता व्हॉलीबॉल क्लब,आलापल्ली तर्फे आयोजित भव्य रात्र कालीन व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह उद्घाटक म्हणून माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, उपसरंच विनोद अक्कनपल्लीवार, माजी जि प सदस्य लैजा चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रा.प.सदस्य पुष्पा अलोने,मनोज बोलूवार,सोमेश्वर रामटेके,स्वप्नील श्रीरामवार,छाया सप्पीडवार, प्रतिष्ठित नागरिक तथा राकॉचे वासुदेव पेद्दीवार,नागेपल्लीचे ग्रा प मलरेड्डी येमनूरवार,सदस्य कैलास कोरेत, सांबय्या करपेत,बालाजी गावडे,पराग पांढरे,सुचिता खोब्रागडे,इरफान शेख,संजय मडावी,इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आपल्या भागात विविध खेळ खेळले जातात.काही खेळाडू विविध खेळात सातत्य ठेवतात तर काही खेळाडू केवळ स्पर्धा असलं की खेळतात.कुठल्याही खेळात नियमित सराव आवश्यक असते.उत्कृष्ट खेळाडूंना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे.व्हॉलीबॉल,कबड्डी आणि क्रिकेट सारख्या खेळांना विशेष महत्त्व आहे.प्रो कबड्डी आणि आयपीएल मुळे खेड्यापाड्यातील खेळाडू समोर येत आहेत.त्यामुळे कुठलही खेळ असो नियमित सराव करा आणि मिळालेल्या संधीचा सोनं करा असे आवाहन भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चमुंनी सहभाग घेतला.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्हॉलीबॉल खेळत मैदान गजविले.दरम्यान पाहुण्यांचा क्रीडा संकुल येथे आगमन होताच एकता व्हॉलीबॉल क्लब तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आयोजकांनी चांगलं नियोजन केले होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले कोडसेपल्ली येथील नागरिकांची समस्या


 

अहेरी : तालुक्यातील कोडसेपल्ली येथील नागरिकांचा समस्या जाणून घेण्यासाठी रात्री ठिक 11 वाजता आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पोहचले कोडसेपल्ली गावात.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नालीसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकी बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी चर्चा दरम्यान महिला वर्गांनी सांगितले की'नवरात्री - बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येते.या'उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.मात्र येथील डीजे सिस्टम उपलब्ध नसल्यामुळे नवरात्री उत्सहात मोठा अडचण निर्माण होते आहे म्हणून सांगितले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हंटले की"आपल्या महिला वर्गांना लवकरत लवकर डिजे सिस्टम उपलब्ध करून देण्यात येईल.तसेच येथील प्रत्येक समस्या सोडवण्यात येईल अशी कोडसेपल्ली ग्रामस्थांना आश्वासन दिले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शैलेश कोंडागुर्ले,पुष्पा आत्राम,रमेश गावडे,मालू तलांडी,सुनीता आत्राम,भिमराव कुंभारे,राजू आत्राम,महेंद्र मडावी,बिजा तलांदी,सूरज तलांडी,राजू आत्राम,बाजीराव तलाडी,इरपा तलांडी,भगवान गोंगले,कारे वेलाडी,रमा आत्राम,मासा आत्राम,चिंना तलांडी,मालू आत्राम,सचीन पांचर्या,चिंटू,सह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

शेवारी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचे भूमिपूजन भाग्यश्री ताई आत्राम यांनी दिलेलं शब्द पाळला


 

एटापल्ली:- तालुक्यातील शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

शेवारी गावात मागील काही महिन्यांपूर्वी भाग्यश्री ताई आत्राम यांनी चावडी सभा घेतली होती.या सभेत या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व विकास कामांची त्यांनी यादीच तयार केली होती. नागरिकांच्या मागण्यानुसार त्यांनी त्या त्या गावात आवश्यक ती विकास कामे केली जाणार असल्याचे ग्वाही दिली होती.अखेर त्यांनी दिलेलं शब्द पाळला आहे.

शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट बासागुडा, कुकेली आणि शेवारी येथे लाखोंच्या निधीतून विविध विकास कामे केली जाणार असून नुकतेच त्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी विकास कामांचे भूमिपूजन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि प सदास्य ज्ञानकुमारी कौशी,साई नामेवार,कुकेलीचे पाटील महादू कोवासे, पंकज गावतुरे,भूमिया मोहन कोमटी, सीता झुरे, रावजी झुरे, सुधाकर गोटा,सुधाकर पडो,मंगलु नैताम, बैजू कोवासे, साईनाथ चटारे, महारु पोटावी, सावजी झुरे, साधू नरोटे,जीवन वड्डे, शिवकुमार लोहंबडे आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

श्री श्री  कालिमाता व वासंती माता मंदिर च्या भव्य देवी गृहप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


 

श्री श्री सार्वजनिक कालिमाता व वासंती माता मंदिर कमेटी गणेशनगर कडून कार्यक्रमाचे आयोजन

मूलचेरा : मूलचेरा तालुक्यात बंगाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून तालुक्यातील प्रत्येक गावात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.धार्मिक कार्यक्रम साजरा करण्याकरिता सुंदर वास्तू ची आवश्यकता असते म्हणून गणेशनगर येथे श्री श्री श्री कालिमाता मंदिर कमेटी च्या पुढाकाराने लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करण्यात आले,त्या मंदिराच्या गृहप्रवेशच्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधीवत पूजा करून बंगाली समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
       
 श्री श्री कालिमाता व वासंती माता मंदिर च्या भव्य देवी गृहप्रवेशच्या कार्यक्रमाला वेलगुर ग्रामपचायत चे उपसरपंच उमेश मोहुर्ले,युधिष्टीर बिस्वास माजी सभापती जिल्हा परिषद, गडचिरोली,बादलजी शाह,भूपती सरदार मंदिर कमेटी अध्यक्ष,विकास घरामी मंदिर कमेटी उपाध्यक्ष,सौ. बसोंना मंडल अध्यक्ष,सौ.इतिका मंडल उपाध्यक्ष,सौ.निकिता मंडल,सौ.अलका सरदार,सौ.कविता बाईनं,सौ.शुभद्रा मिस्त्री,विष्णुपद सरदार,हिरापद मिस्त्री,दिलीप मुजुमदार,प्रमोद बैरागी,वली मंडल,सुबोल मंडल,सुजित मिस्त्री,गुरुपत माल,सुकुमार माल,प्रभास मिस्त्री,जुलेख शेख,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,संदीप बडगे,अंकुश दुर्गे सह तालुक्यातील बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले कोंदावाही येथील नागरिकांची समस्या


 

एटापल्ली : तालुक्यातील कोंदावाही येथील आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंदावाही येथील दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली,लाईन इलेक्ट्रिक,वण जमीनपट्टेसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीबाबत पण चर्चा करण्यात आली आहे.

या चर्चा दरम्यान कोंदावाही येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद पडली आहे.सदर
विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे कोंदावाही गावातील ग्रामस्थांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पिण्याची पाण्याची समस्या,वृद्ध आणि लहान मुला-मुलींना नानाविध त्रास सहन करावा लागत आहे म्हणून अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.तात्काळ अजयभाऊंनी समंधित अधिकाऱ्यांनी दूरद्वानी द्वारे येथील समस्या सांगून लवकर लवकर कोंदावाही येते नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी म्हणून सांगितले आहे.त्यावेळी अजयभाऊंची समस्त नागरिक आभार मानले.

यावेळी चर्चा दरम्यान महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वल नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर आत्राम,चींना आत्राम,मारू तलांदे,साईनु सिडाम,रामजी पुंगाती,रामजी कुड्येती,रुपेश मडावी,मधुकर तलंदी,राजू उसेंडी,संजय आत्राम,बाजू तलंडी,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह स्थानिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार येरामणार येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा संपन्न 


 

अहेरी : तालुक्यातील येरामणार येथील जिल्हा परिषद शाळेचं नवीन वर्गखोलीचे लोकार्पण आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.येरामणार येथील काही वर्षा पासून मुलांना शाळेत बसण्यासाठी त्रास होत होते.

ही बाब शिक्षक वर्ग व पालक वर्ग तसेच गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती दिले असता.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले.सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी पालक व विद्यार्थी गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला होता व पालकवर्गानी या कामाप्रति अजयभाऊंची आभार म्हणले.

यावेळी कैलाश झाडे,मेघा झाडे ग्रा.प सदस्य,राजू मडावी.पो. पा,मडावी साहेब,पठाण सर,अर्का मॅडम,नागोराव मडावी,प्रवीण दुर्गे, जानवं दुर्गे,दोगे आत्राम,रेखा झाडे,निलेश वेलादी.सरपंच मेडपल्ली,दिवाकर तलांडी,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सचिन पांचर्या,चिंटू,सुधाकर तिमा,कवडूजी चल्हावारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली : तालुक्यातील पिडींगुडाम येथील जय माँ काटी वेली पिंडीगुडम तर्फे प्रोढ ग्रामीण व्हॉलीबॉल व कब्बडी स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या स्पर्धेची आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा - शहीद क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके - माता सरस्वती प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातील आगमन होतच येथील स्थानिक नागरिक विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली.

या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार - पिडींगुडाम गाव पाटील वंजा तलांडी - कुले तलांडी - जि.प.प्राथमिक व्यवस्थापक पिडींगुडाम जोगेश गावडे होते.

यावेळी उपस्थित महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार.सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम,उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

ग्लासफोर्डपेठा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
जय भिम सी,सी, क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा भव्य स्वागत करण्यात आला


सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे जय भिम सी,सी, क्रिकेट मंडळाकडून आयोजित  भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.श्री. मदन मस्के साहेब (प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन बामणी) व मा.श्री. दांडे साहेब (PSI उप पोलीस स्टेशन बामणी ) तर प्रमुख पाहुणे म्हणून मादाराम ग्राम पंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,मादाराम ग्राम पंचायत चे माजी सरपंच इरपा मडावी,माजी ग्राम पंचायत उपसरपंच वेंकटस्वामी कार्सपल्ली, आविस सल्लागार तिरुपती वाईल, आविस सल्लागार विजय रेपालवार,आविस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार गणपतजी वेलादी, वेंकटस्वामी रामटेके, सुधाकर कोंडागुर्ले, रवी रामटेके, महेश दुर्गम, जुलेख शेख, विनोद कावेरी, चंद्रमोगली माडेम, रवी बारसागांडी, राहुल कुमरम, करण मडावी, महेश मडावी, सूर्यकांत कुमरम, नवीन गुरनुले, श्रीकांत मडे, संतोष मंदाळे, विजय टाकरे, रोहित आत्राम, श्रावण मडावी,  सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी  आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

भव्य टेनिस बॉल क्रिकेट  सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक जय भिम क्रिकेट क्लब मंडळ ग्लासफोर्डपेठा यांच्या कडून असे एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले.

*जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राणाप्रताप मेडी, यांनी मानले.या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला बामणी,ग्लासफोर्डपेठा,वेंकटापूर  सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी देवराज अल्लूरी, तिरुपती गग्गुरी, राणाप्रताप मेडी, शेखर अल्लूरी, सदानंदम अल्लूरी, मनोहर तलांडी, प्रवीण सोदारी, राजेन्द्र कावरे, सारय्या गंगानबोईना, राम येदासुला, हरीश येदासुला, राजकुमार जूनगरी, सुधीर कावरे सह जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.*


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

वांगेझरी येथे होणार समाज मंदिर बांधकाम;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


 

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल वांगेझरी येथे सुसज्ज समाज मंदिराचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

वांगेझरी येथील नागरिकांनी गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने सुसज्ज असा समाज मंदिर बांधकामासाठी तब्बल दहा लाखांची निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपलब्ध करून दिली आहे. या निधीतून गावात सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार आहे. गावकऱ्यांची बरेच दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नेत्या भाग्यश्रीताई आत्राम यांचे आभार मानले.

नुकतेच वांगेझरी गावात भेट देऊन भाग्यश्री ताई आत्राम यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, भूमिया झुरू झोरे, गणेश झोरे, ज्योती झोरे, मंगलदास शेंडे, सरिता शेंडे,वीणाबाई गेडाम,मनोज कोवासे, शालिक शेंडे, गणेश झुरे, सुरेश शेंडे, जितेंद्र मोहूर्ले, तसेच आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 12, 2024

PostImage

कन्नमवार विद्यालय आर्वी येथे नारी शक्तीचा जागर


 

 


जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्थानिक कन्नमवार विद्यालय आर्वी येथे विद्यार्थ्यांनी निरनिराळे थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, वीर क्रांतिकारक, उत्कृष्ट क्रीडापटू, यांचे वेश परिधान करून मुली सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नव्हत्या व राहणार नाही असा संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, रजिया सुलतान, चांदबिबी, इंदिरा गांधी, मदर टेरेसा, मेरी कोम, इत्यादींच्या भूमिका सादर करून उत्कृष्ट सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक कपिल ठाकूर, सनराइज् इंग्लिश स्कूलचे संचालक प्रशांत कांडलकर, पालक प्रतिनिधी महेश भांड, ज्येष्ठ शिक्षक विलास बोरगमवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वृंदा करंदीकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट नियोजन पद्धतीने केल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक श्री हिराचंद रेवतकर यांनी कौतुक केले


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 12, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून राजन्ना कूम्मरी यांना आर्थिक मदत


 

सिरोंचा:तालुक्यातील गर्कापेठा येथील राजन्ना कूम्मरी आपल्या कुटुंबियासहीत शिवरात्री च्या दिवशी नदीवर गंगास्नान करण्यास गेले असता त्यांचा मुलगा नागराज कुम्मरी हा आपल्या मित्रांसोबत खोल पाण्यात आंगोळीसाठी गेला होता मात्र अचानक तो पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन त्याला जलसमाधी मिळाली ही बाब सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना स्थानिक पदाधिकारी मार्फत माहिती दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी गर्कापेठा येथे राजन्ना कुम्मरी यांच्या घरी भेट देऊन त्यांना सांत्वन करून आर्थिक मदत दिले.


  आर्थिक मदत देतेवेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मादाराम ग्रामपंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली,आवीस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार विजय रेपालवार,गणपतजी वेलादी,समय्या कोंडागोर्ला,रवी रामटेके,अशोक मडावी,सुधाकर दुर्गम,नागेश कुम्मरी,शंकर दुर्गम,मलय्या सडमेक,बन्नी कोंडागोर्ला,अंकुलु दिकोंडा,व्यंकटस्वामी रामटेके,जुलेख शेख,विनोद कावेरी,चंद्रमोगली मोडेम,समीर कोटरंगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 8, 2024

PostImage

अतिदुर्गम भागात भाग्यश्री ताईंच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


 

अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम अश्या छत्तीसगड सीमेवरील गावांत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लाखो रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अहेरी तालुका विस्ताराने मोठा असून या तालुक्याला छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्याची सीमा लागून आहे.तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रयत्न सुरु असून कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली आहे.नुकतेच देचली,वेडमपल्ली,कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यात सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,सभा मंडप आदी कामांचा समावेश आहे.

छत्तीसगड सीमेवरील विविध गावांत विकास कामासाठी मोठी निधी उपलब्ध झाल्याने या परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 7, 2024

PostImage

तालुकाध्यक्ष प्रशांतभाऊ आत्राम यांच्या नेतृत्वात मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम संपन्न


 


एटापल्ली;-                                                                        अम्र्बिशराव माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वात, जिल्हा अध्यक्ष मा प्रशांत भाऊ वाघरे,व  तालुका अध्यक्ष श्री प्रशांत आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे तालुका उपाध्यक्ष श्री. सुरेश आतलामी,व उपाध्यक्ष आदिवासी आघाडी मोर्चा श्री साईनाथ वड्डे, श्री मंगेश नव्हडी सदस्य भाजपा, श्री देवेंद्र गोटा सदस्य भाजपा यांच्या वतीने मौजा गट्टा, वांगेतुरी, गर्देवाडा, मोडस्के, जांबिया या गावात जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्या योजनेचा लाभ घ्यावा असे विनंती करण्यात आली व भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे कॅलेंडर वितरण करण्यात आले आहे,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती


 

गडचिरोली:-मागील बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील देवलमरी आणि महागाव-गेर्रा त्यासोबतच गडचिरोली तालुक्यातील पोर्ला उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

अहेरी उपविभागात बारमाही वाहणारे नद्या आहेत.मात्र, येथील शेतकऱ्यांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. परिसरातील नागरिकांना  या बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शेती करता यावं या उदात्त हेतूने मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गेल्या अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजना आणण्यासाठी प्रयत्नात होते.शिवाय सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी देखील होती.

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली.मागील बरेच वर्षांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला.अखेर मागील महिन्यात सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच झालेल्या बैठकीत महागाव/गेर्रा,देवलमरी आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या तीन उपसा सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे.

विशेष म्हणजे देवलमरी आणि महागाव/गेर्रा ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर असून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहेत.या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या परिसरातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

बॉक्स--
आपल्या जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवर उपसा सिंचन योजना आणल्यास त्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी होईल त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात होतो. जिल्ह्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजनेचा वारंवार पाठपुरावा केल्याने यश मिळालं आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका,रेगुंठा, अहेरी तालुक्यातील देवलमरी,महागाव/गेर्रा आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील शेकडो गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. विशेष म्हणजे रोजगार,शिक्षण आणि सिंचन यावर आपला भर असून जिल्ह्यातील रखडलेले पूर्ण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-धर्मराव बाबा आत्राम
मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

वाढदिवस च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती


 

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुधाकरजी जंबोजवार यांच्या नातूच्या प्रथम वाढदिवसचा कार्यक्रम आलापल्ली येथील दुर्गा मंदिर येथे आयोजित केले होते.
 

 

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सोबत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून चिमुकल्या बाळाला भेट वस्तू देऊन आशीर्वाद दिले.

    यावेळी सौरभजी जंबोजवार,सूचित जंबोजवार,अंकुश दुर्गे,संदीप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कूसनाके उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

माझी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.


 

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद.

मूलचेरा:तालुक्यातील श्रीरामपूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुखरंजन माझी यांची मुलगी चि. सौ.का.उजाला यांचा विवाह सपन मंडल यांचा मुलगा चि. मिथुन यांच्याशी श्रीरामपूर येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
 
   या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवीजी शहा,गोमणी सरपंच उमेश भाऊ कडते,श्रीनगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती लालूजी बिस्वास,हरीपदजी पांडे माजी सरपंच गोमणी,कर्मकारजी काका,आविस सल्लागार कमलजी बाला,परीतोष राय,सत्यवान बोदलवार,साईनाथ चौधरी,गोकुल बेपारी,नरेन घरामी,तपस मिस्त्री,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,मिलिंद अलोने,संदिप बडगे,प्रवीण रेषे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.


सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.

*नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद.एटापल्ली:तालुक्यातील आलेंगा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे सल्लागार खोकन सरकार यांची मुलगी चि. सौ.का.प्रियंका यांचा विवाह बिकास बर यांचा मुलगा चि. विशाल यांच्याशी आलेंगा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
 
  या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले

  यावेळी आविस तालुका सचिव नानेश गावडे,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आलेंगा पोलीस पाटील नानसु मत्तामी,मनोज मत्तामी,मिरवा मत्तामी,बाबुराव बोगामी,बाबुराव गावडे,देवाजी बोगामी,परबल टोप्पो,ननकु लकडा,नंदू लेकामी,सतू कतलामी,राकेश बोगामी,किशोर बोगामी, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,संदिप बडगे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 19, 2024

PostImage

कोरेगाव येथे मोठय़ा उत्साहात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शेकडो च्या संख्येने गावातील नागरिक जयंतीस एकवटले


 

देसाईगंज //. तालुक्यातील कोरेगाव येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्याने ग्रा. प. चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून, हार घालून व बहुसंख्येने उपस्थित नागरिकांनी समक्ष शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती च्या कार्यक्रमात उपस्थित सौ. कुंदाताई गायकवाड सरपंच ग्राम पंचायत कोरेगाव, शाम जी उईके पोलिस पाटील कोरेगाव, तसेच सर्व ग्राम पंचायत चे पदाधिकारी, गावचे प्रतिष्ठित नागरिक, प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी नगर येथील सर्व युवक मंडळी, उपस्थित झाले आणि हा जयंती चा कार्यक्रम पार पडला.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 19, 2024

PostImage

मोयाबिनपेठा येथील उत्कृष्ट खेळाडू घडतील:दिपकदादा आत्राम


 

शिव भिम सेना, क्रिकेट क्लब मोयाबिनपेठा द्वारा ग्रामीण भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

*अहेरी:-* अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोयाबिनपेठा सह विविध गावात व्हॅलीबॉल व क्रिकेट खेळाचा मोठा क्रेज आहे.मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळांना विशेष महत्व देत दरवर्षीच याठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रात तर क्रिकेट स्पर्धेची गेली अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असून या विधानसभा क्षेत्रातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील असा आशावाद मा. बि.आर.एस. नेते, माजी आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्र तथा विभागीय अध्यक्ष आविस दिपकदादा आत्राम यांनी व्यक्त केल्या.

१७ फेब्रुवारी रोजी मोयाबीनपेठा येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा, प्रमुख पाहुणे म्हणून ‌सिरकोंडा ग्राम पंचायत चे सरपंच लक्ष्मणजी गावडे, नरसय्यापल्ली चे उपसरपंच व्येंकटी दुर्गम, आवलमरी-व्येकटापुरचे माजी सरपंच व्येंकन्नाजी कोंडापे, मोयाबीनपेठा चे माजी उप सरपंच व्येंकन्नाजी तोडसाम, आवीस सल्लागार वाईल तिरुपतीजी, विजय रेपालवार, समय्या दुर्गे, स्वामी जाकावार, व्येंकन्नाजी जाकावार, इंदाराम ग्राम पंचायतचे सदस्य शाकिर शेख, आवीस कार्यकर्ते व्यंकटस्वामी रामटेके, आनंदरावजी, अशोक तलाडे, गणपत डुकरे, गायकवाडजी, रमेश अन्ना, आनंद कोटा, मिलिंद अलोने, जुलेख शेख, विनोद कावेरी, रुपेश दुर्गे, रवी कुम्मरी, महेश बोरकुट, सागर दुर्गे, राजेश कावरे, रुपेश बोरे, तसेच भारत राष्ट्र समिती व आविसचे कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

पुढे बोलताना मोयाबीनपेठा असो अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातील कुठल्याही खेळांचे आयोजन असू द्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून चांगले खेळाडू सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ दाखवतात.त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होतो.त्यामुळे असे मोठे स्पर्धा आयोजन केले पाहिजे.त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे दरवर्षी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा यांनी उत्तम असे मार्गदर्शन करून खेळाडूंसोबतच आयोजकांनाही होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३0 हजार १0१ रुपये,व द्वितीय पारितोषिक 20 हजार १0१ रुपये तर तृतीय पारितोषिक हे,१0,हजार १0१ रुपये अशी रोख रक्कम दिले,आणि आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात दिपकदादा आत्राम यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि युवा खेळाडू मध्ये स्फूर्ती निर्माण केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 17, 2024

PostImage

माजी पालकमंत्री आत्राम यांनी घेतली आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या घरी दिली भेट


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज आलापल्ली दौऱ्यावर गेले असतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर यांचे मातोश्रीचे तब्बेत ठीक

 नसल्याची बातमी कळताच त्यांचे घरी सदिच्छा भेट देऊन प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले!


यावेळी ताटीकोंडावर कुटुंबीय व स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते!


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 16, 2024

PostImage

भानापेठ येथील वोडाफोन - आयडिया आउटलेट व हवेली गार्डन येथील २ मालमत्ता मनपाद्वारे सील


 

चंद्रपूर १६ फेब्रुवारी - १,३३,५०१ रुपयांची थकबाकी असणाऱ्या भानापेठ येथील वोडाफोन - आयडिया आउटलेट व नानुसेठ यांच्या मालकीच्या हवेली गार्डन,अपेक्षा नगर येथील प्रत्येक ५४ हजार थकबाकी असणाऱ्या २ मालमत्तांना मनपा कर वसुली पथकाने सील केले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.    
   सील केलेल्या मालमत्ताधारकांना यापुर्वी अनेकदा कर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे जप्तीपूर्वीची नोटीस सुद्धा देण्यात आली होती. त्यानंतरही मोठी मुदत मिळूनही त्यांच्याद्वारे कराचा भरणा करण्यात आला नव्हता. कर भरणा करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे या मालमत्तांना टाळे ठोकण्यात येत आहे.
    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
     www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,पथक प्रमुख अतुल भसारकर,फारुख शेख,मुकेश जीवने,श्रीकांत होकाम यांनी केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 16, 2024

PostImage

समाज मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत  मलेझरी येथे होणार आदिवासी गोवारी समाजासाठी भव्य समाज मंदिर


 

मूलचेरा: मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे,समाजाची प्रगती करायची असेल तर समाज बांधव एकत्र येऊन चर्चा करण्यास स्वतःची हक्काची एक समाजमंदिर असायला हवी अशी समाजातील जेष्ठ व्यक्तींनी बैठक घेऊन समाजमंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले.*
       
  आदिवासी गोवारी समाजमंदिर बांधकामाची माहिती आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना माहिती देताच आलापल्ली येथील निवासस्थानी समाज बांधवांना बोलावून मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाजबांधवासाठी भव्य समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत दिले.व भविष्यात आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी मी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले.
      *समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने आदिवासी गोवारी समाजबांधवांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले. या वेळी गोवारी समाज अध्यक्ष विलासजी राऊत,आविस सल्लागार रामचंद्रजी शेडमाके,रामदास कोसनकार,आकाश नागोसे,सचिन राऊत,राहुल लोहट,आकाश राऊत,लक्ष्मण राऊत,राम राऊत,तुळशीदास नेवारे,गणेश नेव्हारे,शरद ठाकूर,मारोती नेवारे,निफुल गायकवाड,शंकर खंडारे,सुरेंद्र नागोसे,प्रणय शेडमाके,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम सह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 12, 2024

PostImage

बोरकूट परिवारातील पुण्यानुमोदन कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन बोरकूट कुटुंबियांची सांत्वन        
 सिरोंचातालुक्यातील कोटापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती,बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकूट यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते.

 या निमित्य पुण्यानुमोदन चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित राहून बोरकूट कुटुंबियांचे सांत्वन केले.

        यावेळी  माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत झोडे सर,माजी प.स. सदस्या शकुंतलाताई झोडे,गणपत तावाडे,चांगदेव शेंडे ( बसपा नागपूर ),धारने सर,व्यंकटस्वामी कावरे,व्यंकटी दुर्गम,शंकर रत्नम,सादिक भाई,सुरेश कावरे,महेश डुकरे,सत्यम कुम्मरी,शंकर कावरे,दिवाकर बेडकी,दामोधर रत्नागिरी,व्यंकटी कोडागोला॔,सुरेश तोगम,अशोक गोदारी,जुलेख शेख,मिलिंद अलोने,विनोद कावेरी सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 8, 2024

PostImage

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजीक क्रांती गतीमान करण्याची गरज;वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे 


 

गडचिरोली,;-माता रमाबाई आंबेडकर यांना स्वत:च्या संसारापेक्षा करोडो दिन दलीत लोकांच्या संसाराची चिंता होती, चार-चार पोटच्या लेकरांचे बलिदान दिले, अनेक प्रकारच्या मरणयातना भोगल्या, गरिबीचे चटके सोसले परंतु  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्येच्या भूकेत खंड पडू दिला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही या रमाईच्या त्यागातूनच निर्माण झालेल्या सामाजीक क्रांतीला अधिक गतीमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी आंबोली येथिल रमाई जयंती महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
         बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नामदेव मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप बेलखेडे, अशोक उंदिरवाडे, जयाप्रदा रामटेके, करिश्मा गोडबोले आदि उपस्थित होते.
       यावेळी पुढे बोलतांना टेंभुर्णे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत तर रमाबाई या आमच्या आई आहेत यांनी निर्माण केलेलं राजगृह हेच आमच्या सामाजीक, धार्मिक, राजकिय चळवळीचे माहेरघर आहे त्यालाच केंद्रबिंदू मानणारे कार्यकर्तेच चळवळ जीवंत ठेऊ शकतात असेही ते म्हणाले.
         यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा समायोचीत भाषण करून रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक रविंद्र काटकर यांनी तर आभार शारदा चुनारकर यांनी मानले. 
       कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाखा चुनारकर, तेजाबाई उंदिरवाडे, ललिता मेश्राम, कैलास दुर्गे, भास्कर रामटेके यांनी परिश्रम घेतले.

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 8, 2024

PostImage

हिद्दूरजवळ पोलिसांवरती केली नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार


काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर - नारायणपूर - गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत 
     त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री.यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक  हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता - पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 7, 2024

PostImage

शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या केंद्रप्रमुखांची तक्रार मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रणय खुणे यांचा पुढाकार


 

गडचिरोल्ली;-आदिवासी विभागामार्फत आदिवासी महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत चौकशी करण्यासाठी.


थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असो नई दिली प्रदेशअध्यक्ष प्रणय खुणे यांनी निवेदन दिला आहे
सदर निवेदनात अशे म्हटले आहे की

 

आदिवासी महामंडळ मार्फत चालू असलेल्या प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे. 

या बाबत जर कोणी शासनाच्या परिपत्रकाची गोष्ट केली तर केंद्र बंद करण्याची केंद्रप्रमुख शेतकऱ्यांना धमकी देतात. शासनाच्या


 परिपत्रकानुसार प्रति बारदाना ४० किलो ६०० ग्राम खरेदी करावे असे सांगितले आहे तसेच धानाची खरेदी करताना प्रति बारदाना हमाली सुद्धा शासन देणार हे सांगितले आहे.

परंतु आदिवासी महामंडळच्या अभिकर्त्या मार्फत शेतकऱ्यांकडून प्रति बोरा ४१.६०० किलोने खरेदी सुरू आहे. तसेच प्रति बारदाना ६ ते ८ रुपये इतकी हमाली सुद्धा शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जात आहे. आमचे शेतकरी मेहनत करून अगोदर नोंदणी केले

 परंतु अभिकर्त्या मार्फल अगोदर व्यापाऱ्याचा धान खरेदी केला जात आहे त्यामुळे शेतकन्यांचे धान घरी जागा नसल्याने बाहेर उंदीर, घूस यांच्याकडून नासधूस केली जात आहे.


आमचा शेतकरी आक्रमक नसल्याने यांच्या विरोधात जाण्यस घाबरतो कारण आपण जर तक्रार केली तर आपला धान खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे मा. ना. मुख्यमंत्री साहेब आपण या अश्या खरेदी केंद्रांची आपल्या यंत्रणे मार्फत नियंत्रण ठेवून आमच्या शेतकरी बांधवाना न्याय द्याल हि अशी निवेदनातून विनंती केली आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 6, 2024

PostImage

तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम यांच्या प्रमुख उपस्तिथीत हालेवारासह अनेक गावात भाजपची गाव चलो अभियान 


 

                                                                                            एटापल्ली;-अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वात तथा ( अहेरी विधानसभा प्रमुख),जिल्हाध्यक्ष मा. श्री प्रशांत  वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हालेवारा, वट्टेगट्टा, पुन्नुर,जवेली बु, कसनसुर टोला, कसनसुर या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या तालुकाध्यक्ष प्रशांत  आत्राम व तालुका महामंत्री मोहन नामेवार, अध्यक्ष आदिवासी आघाडी मा.सम्मा जेट्टी, तालुका सचिव दिलिप लेकामी, तालुका उपाध्यक्ष योगेश कुमरे,रंजीत उसेंडी,कोषाध्यक्ष मा लिंगु वेळदा यांनी सहकार्य केले व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 6, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून भापडा येथील नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट.        
  एटापल्ली;-तालुक्यातील भापडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व सुधाकर नाईक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.
        या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच स्व सुधाकर नाईक यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन केले व नाईक परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.
       
      स्व सुधाकर नाईक हे सन 2002 मध्ये माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात जारावंडी क्षेत्रातून जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते.

        यावेळी नाईक कुटुंबीय सह बीआरएस व आविस पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 4, 2024

PostImage

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन : नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचे हस्ते भूमिपूजन संपन्न


 

अहेरी : नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचा हस्ते लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.वार्डातील समस्त नागरिक नगराध्यक्षा - उपाध्यक्ष नगरसेवकांचे आभार मानले.

आज अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचा हस्ते अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील वॉर्ड नंबर 13 येथील सीसी रोड आणि नाली बांधकाम - वॉर्ड नंबर 10 येथील नाली बांधकाम - सीसी रोड - स्लॅबड्रेन - नाली कवरसह येथील अनेक लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,बालकल्याण सभापती मिना ओंडरे,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गालबाले,नगरसेविका नौरस शेख,नगरसेविका ज्योती सडमेक,श्याम ओंडरे,दीपक संगमवार,अनुराग जाकूजवार कंत्राटदार,मुकेश रतनावारसह क्षेत्राती आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 4, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी.  पाचव्या सत्रात कवयित्री 'प्रतिभा सुर्याराव' विजयी


  गडचिरोली :  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात *"आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे पाचवे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील  कवयित्री *प्रतिभा प्रविण सुर्याराव* यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  *"डोळे भरून आले तरी'* या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       सौ. प्रतिभा सुर्याराव या नवोदित  कवयित्री असून त्या अंबरनाथ (पुर्व) जिल्हा - ठाणे येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना राज्यस्तरीय काव्यरत्न व काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. 
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या पाचव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  पुरुषोत्तम लेनगुरे, लीना देगलूरकर, सुनील मंगर , कु. तनुजा भोयर, प्रभाकर दुर्गे, हरिष नैताम, जितू निलेकार, प्रशांत गणवीर, संगीता रामटेके, मुर्लीधर खोटेले, अनुराग मुळे -, प्रतिभा सुर्यराव, कृष्णा कुंभारे, पी. डी. काटकर , ज्योत्स्ना बन्सोड, बाबाजी व्ही.हुले, प्रब्रम्हानंद मडावी, अंगुलीमाल मायाबाई उराडे, वंदना मडावी, प्रेमिला अलोने, मनोहर दुधबावरे, तुळशीराम उंदीरवाडे, संजय बन्सल, सत्तू भांडेकर , चरणदास वैरागडे , संगीता ठलाल, उपेंद्र रोहनकर, राजरत्न पेटकर, मिलिंद खोब्रागडे, प्रिती चहांदे, सुजाता अवचट, लता शेंद्रे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भापडा येथील नाईक यांच्या अंतिम संस्कार कार्यक्रमाला माजी जी प अध्यक्ष कंकडालवार यांची उपस्तिथी


 

एटापल्ली : तालुक्यातील भापडा ( जारावांडी ) येथील रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दामजी नाईक (४४) यांचे काल २ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हृदविकराच्या झटक्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले होते.                               त्यांच्या पश्चात पत्नी - दोन मुली - आई - वडील - एकभाऊ - एक बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता भापडा येथील बांदीया नदिजवळील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले.आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कुटुंबियांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी काँग्रेसचे नेते व गडचिरोली विधानसभाचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी,गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हनमंतूजी मडावी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,जिल्हाअध्यक्ष अनुसूचित जाती सेल काँग्रेस रजनीकांत मोटघरे,उपसरपंच सुधाकर टेकांम,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश गंपावार,पंस. सदस्य मंगेश हलामि,काँग्रेस नेते आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागुलवार,न.सेवक निजाम पेंदाम,न.सेवक किसन हिचामी,न.सेवक नामदेव हिचामी,लोकेश गावडे,ग्राप सदस्य अंतुभाऊ नरोटे,भामरागड काँग्रेस नेते आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तीम्मा,काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,दासरवार भाऊ,स्वप्निल कनमवार,सचिन पांचर्या,प्रमोद गोडशेलवारसह जिल्हातील काँग्रेस कार्यकर्ते आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले “गडचिरोली महोत्सव 2024” चे उद्घाटन


 

●    दोन दिवस उत्सवात रंगणार महाराष्ट्राच्या प्रसिध्द कलाकारांच्या कला व रेला नृत्य स्पर्धा.
●    जिल्हयातील अतिदुर्गम भागातील खेळाडु दाखविणार आपल्या अद्भुत खेळाचे प्रदर्शन
●    महोत्सवात मिळणार जिल्ह्रातील हस्तकलाकारांना व्यासपीठ
●    कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूब च्यामाध्यमातून

        
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन विविध शासकिय योजना मिळवुन देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने दिनांक 01/02/2024 ते 03/02/2024 या काळात गडचिरोली पोलीस दलामार्फत “गडचिरोली महोत्सव” व दि. 04/02/2024 रोजी “महामॅरेथॉन 2024” चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले असुन, काल दिनांक 02/02/2024 रोजी गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म. रा. मंुबई. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गडचिरोली महोत्सव हा तीन दिवस चालणार असुन, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, विर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.  तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट आणि विविध संस्था आपल्या उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत.  यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकांरीता उपलब्ध असणार आहेत.  तसेच दि. 02 व 03 फेब्राुवारी रोजी सायंकाळी 06 वा. च्या नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार असून गडचिरोली जिल्हयातील स्थानिक कलाकरांनी सुद्धा यात सहभाग घेतलेला आहे.  यासोबतच आयोजीत करण्यात आलेल्या महामॅरेथॉन 2024 या स्पर्धेत जिल्हयातील अतिदुर्गम भागातील 13000 हुन अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळया वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असुन त्यामध्ये 21 किमी, 10 किमी, 05 किमी, 03 किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म. रा. मुंबई. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करुन ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन गडचिरोली महोत्सवाकरीता अथक परीश्रम घेत असलेले मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली व त्यांच्या संपुर्ण टीमचे मन:पुर्वक व भरभरुन कौतुक केले.  दरवर्षी अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली महोत्सव आयोजीत करावे, जेणेकरुन जिल्हयातील सर्व खेळाडुंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळु शकेल असे सागिंतले.
         या गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म.रा. मंुबई. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम,  मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा, मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप तसेच गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व शाखेतील अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व  सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार अथक परिश्रम घेत आहेत


 गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन हा पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उपक्रमाचा एक अविभाज्य भाग असून, या महोत्सवातून गडचिरोलीतील दुर्गम-अतिदुर्गम भागातील हस्तकलाकार व खेळाडूंना एक  व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा मनोदय आहे. तसेच या महोत्सवातून गडचिरोली जिल्ह्राचे वैशिष्ट¬ असलेल्या रेला नृत्यास राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यास निश्चीतच मदत होईल. गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉनमधील सहभागी सर्व खेळाडु व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता सर्व नागरीकांनी या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
श्री. नीलोत्पल,
पोलीस अधीक्षक, गडचिरोली

 

गडचिरोली पोलीस दल आयोजीत गडचिरोली  महोत्सव व महा मॅरेथॉन 2024 हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, याद्वारे गडचिरोलीतील युवक-युवतींना व हस्तकलाकारांना आपल्या खेळाचे व कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.  या महोत्सवास गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला या करीता मी त्यांचे अभिनंदन करतो व आव्हान करतो की.    
श्री. संजय मीणा,
जिल्हाधिकारी, गडचिरोली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची:भाग्यश्री ताई आत्राम एटापल्ली येथे तालुका स्तरीय बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली: विद्यार्थ्याजन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभवतांना विद्यार्थ्यावर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत.त्यामुळे भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

एटापल्ली तालुका मुख्यालयातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे,प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती सभापती बेबीताई नरोटी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,नगर पंचायतीचे गटनेता जितेंद्र टिकले,येमलीचे सरपंच ललिता मडावी,सहाय्यक प्रशासन अधिकारी टी बी मडावी,सामाजिक कार्यकर्ते राकॉचे शहर अध्यक्ष प्रसाद राजकोंडावार, गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे, मुख्याध्यापक संदीप सुखदेवे,प्राचार्य विनय चव्हाण, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो, त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्तगुण हेरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा असतो. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मात्र कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.तेंव्हाच विध्यार्थ्यांना कुठल्याही स्पर्धेत टिकणे शक्य होणार असल्याचे मत मांडताना होणाऱ्या तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे यांनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 186 शाळा असून जवळपास 725 विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.तीन दिवस चालणाऱ्या बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन अगदी थाटात झाले असून विध्यार्थी आणि शिक्षकांनी मान्यवरांचे जंगी स्वागत केले.तर बाल गोपालांनी झांकीद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन


 

आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा संपन्न

आरमोरी:- पूर्वीच्या काळाप्रमाणे आता आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल या पुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनेचा उपयोग करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांनी आपली प्रगती साधावी व सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केमिस्ट्री भवन येथे महिलांचा सन्मान मेळावा १ फेब्रुवारी २०२५४ रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख किशोर तलमले, माजी प्रदेश संघटन सचिव युनिस शेख, गडचिरोलीच्या युवती शहराध्यक्ष श्रेया कोष्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, आरमोरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमिन लालानी कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी महिला तालुका अध्यक्षा वृषाली भोयर, महिला शहर अध्यक्ष संगीता मेश्राम, सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याला मार्गदर्शन करतांना राजे धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले, महिलाचे सशक्ति करण्याचा शुभारंभ खास महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यातून म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार यांनी हा महिलांचा सन्मान करण्याचा मेळावा सुरू केला. या माध्यमातून महिलांचे विविध योजना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करणे त्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना व मदतीस यांना आता स्मार्टफोन म्हणजे मोबाईल वाटपाचे धोरण सुद्धा हाती घेतलेले आहेत. महिलांच्या योजनांसाठी पुढील काळात आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे मेळावे तयार करणार असून महिलांना सर्वतोपरी आरक्षण देण्याचे कार्य आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेले आहे महिलांसाठी विविध योजना त्यांनी सुरुवात केलेल्या असून आत्ताच नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेला आहे आजपर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा हा आरमोरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा अभूतपूर्व महिला मेळावा झालेला असल्याचे राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या महिलांसाठी मेळावा जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल सर्व महिलांना घरघर पाणी व्यवस्था कशी करण्यात येईल लखपती योजना ही दोन कोटी वरून तीन कोटी पर्यंत सरकारने केलेले आहेत तसेच जिल्ह्यात अतिक्रमण धारकांना वनपट्टे देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन नानाभाऊ नाकाडे यांनी केले त्यावेळी त्यांनी शासनाच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक वृषाली भोयर महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांनी मानले या मेळाव्यात प्रामुख्याने अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये पौर्णिमा राचमलवार, मंगला हजारे, देवका दुमाने, सारिका बांबोळे तसेच राकेश बेहेरे व्सराफा असोसिएशनचे सदस्य यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमराज प्रधान, राजू आकरे, सुरेंद्र बावणकर, योगाजी थोराक, नरेश ढोरे, प्रफुल राचमलवार, सुनील ढोरे, रवींद्र दुमाने, गणेश मंगरे, उदाराम दिघोरे, अनिल अलबनकर, उज्वला मंगरे, जयश्री भोयर, उर्मिला हर्षे, नलू आत्राम, गायत्री भोयर, अरुणा भोयर, कोकिळा गरफडे, मंजुषा हूड, इंदिरा हूड, गीता सपाटे, सारिका बांबोळे, डिम्पल बांबोळे, प्रमिला भोयर यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर


 

एटापल्ली:महिला ही अबला नसून सबला आहे.आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

ते 2 फेब्रुवारी रोजी एटापल्ली येथे संक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला. यावेळी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आले.तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आले.विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा हळदी कुंकू आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी गोंडी गाण्यावर ठेका धरला यावेळी महिलांच्या आग्रहास्तव भाग्यश्री ताईंनी देखील गोंडी गाण्यावर ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणित केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवतींनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून ठाकरे कुटूंबाला उपचारास आर्थिक मदत.


 

  अहेरी:-अहेरी येथील कु. काजल सुनील ठाकरे ही किडनी आजाराने ग्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.
   ही बाब कार्यकर्त्याद्वारे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उपचारासाठी आर्थिक मदत करून सहकार्य केले.
    या वेळी मेघा मारोती मडावी,मंगला शंकर आत्राम,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,विनोद कावेरी,जुलेख शेख,संदीप बडगे,सुधाकर कोरेत उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

वाशीम जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांनी दिल्या वाघमारे यांना शुभेच्छा


 

अहेरी:-येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांचे वाशीम जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची प्रकल्प कार्यालय येथे भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे यांनी जवळपास 6 महिने कामकाज सांभाळली.या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देत विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचविली.

अल्प कालावधीतच त्यांची नियुक्ती वाशीम जिल्ह्यात करण्यात आली असून आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे.अहेरी सारख्या अतिदुर्गम भागात केलेल्या कामाचा अनुभव त्यांना वाशीम जिल्यात कामी येणार असून नक्कीच याही जिल्ह्यात ते उत्तम अशी कामगिरी करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवतील असा आशावाद व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 31, 2024

PostImage

तुमरगुंडा महादेवमंदिर क्रॉसिंग जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकींचा अपघात दुचाकीस्वार जागीच ठार


 

 


एटापल्ली ;- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ 11 वाजता ट्रॅक्टर व दुचाकीचे अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका जबर होता की

 दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा  झालं व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर रित्या जखमी झाली 


सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती बातमी लिहीत पर्यंत मृत व्यक्तीचे 

नाव व कुठला पता चालले नाही जमा झालेल्या नागरिकांना 108 क्रमांकाचा अपघाताची माहिती दिली 

मृत व्यक्तीचे नाव व गाव माहिती होताच सविस्तर बातमी दिली जाईल


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 29, 2024

PostImage

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह उर्स उत्सवाला भेट,चादर चढवून घेतले दर्शन


 

सिरोंचा:राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी होत असलेल्या हजरत वली हैदर शाह उर्स व कव्वाली कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन चादर चढवत दर्शन घेतले.

सिरोंचा तालुक्यात दरवर्षी उर्स महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.येथे होणाऱ्या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या उर्स कडे पाहिले जाते.यानिमित्ताने होणाऱ्या उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी कार्यक्रम व कव्वाली पाहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात.

२८ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्याश्री ताई आत्राम आणि युवानेते ऋतुराज हलगेकर यांनी भेट घेऊन चादर चढवत समस्त जनतेला सुख-शांती,समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केली.

दरम्यान मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी तर्फे पाहुण्यांचे भले मोठे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

गडचिरोलीतील दारूबंदीची समीक्षा का नको  - 'एमटीबीपीए'चा सवाल, जनमत चाचणीची मागणी 


 

 


गडचिरोली : गेल्यास तीस वर्षांपासून गडचिरोलीत असलेली दारूबंदी केवळ कागदावर असून अवैध तस्करी आणि बनावट दारूमुळे अनेकांचा जीव गेला. ही दारूबंदी म्हणजे काही लोकांच्या सुपीक डोक्यातून निघालेले षडयंत्र आहे. म्हणून ते समीक्षेच्या विरोधात आहे. त्यामुळे शासनाने दारूबंदीवर जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पीपल्स ॲक्शन समितीने (एमटीबीपीए) निवेदनाद्वारे केली आहे.

'एमटीबीपीए'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरीब, मागासवर्गीय आदिवासींच्या आरोग्याचे कारण पुढे करून तीस वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. परंतु या काळात बंदीची अवस्था काय, हे तपासणे आता गरजेचे झाले आहे. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूतस्करी सुरू आहे. काही तस्कर बनावट दारूचीही तस्करी करीत आहेत. यामुळे मागील काही वर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबाची वाताहत झाली. त्यामुळे बंदीचा उद्देश खरंच पूर्ण झाला का, याची चर्चा होणे गरजेचे आहे. आणि ज्या जिल्ह्यात दारूबंदी नाही, त्या जिल्ह्यातील सामाजिक आणि आरोग्य स्थिती काय. याचेही एकत्रित समीक्षण झाले पाहिजे. पण याला जिल्ह्यातील काही लोक विरोध करीत आहेत. ज्यांचे जिल्ह्याच्या विकासात कुठलेही योगदान नाही. दारूबंदीमुळे जिल्ह्यात काय बदल झाला हे सुध्दा त्यांना सांगता येत नाही. उलट शेकडोचा रोजगार बुडला. मोहफुलातून मिळणारे उत्पन्न व त्यावर आधारित उद्योगातून मिळणारा रोजगार हिरावला गेला. यातून नफा केवळ काही समाजसेवकांचा झाला. दारूबंदीनंतरही दरवर्षी व्यसनमुक्तीच्या नावावर शेकडो कोटीचा निधी पदरात पाडून घेतला जातो. त्यामुळे दारूबंदीची समीक्षा करून जनमत चाचणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पीपल्स ॲक्शन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे व सदस्य संतोष ताटीकोंडावार अन्वर शेख ऍड संजय गुरु अनिल मेश्राम पुरुषोत्तम भागडकर यांनी केली आहे.

.
ग्रामसभेचे ते ठराव संशयास्पद 
दारूबंदीच्या समर्थनार्थ काही समाजसेवकांनी शासनास ग्रामसभेचे जे ठराव पाठविले ते संशयास्पद आहे. ग्रामसभा घेण्याचे शासन नियम असून त्याआधी पंधरा दिवस आधी नोटीस काढावी लागते. ग्रामसभेच्या ठरावासोबतच, व्हिडीओ शुटींग, सभेकरीता पाठविलेल्या नोटिसची प्रत जोडलेली आहे का? याची शासनाने अभ्यास करून चौकशी करणे आवश्यक आहे. ही सर्व भोंदूगिरी असून आदिवासींच्या शोषणाकरीता वापरलेले सुपीक डोक्यातून निघालेले हे कारस्थान असल्याने शासनाने त्वरीत यावर अभ्यास समिती व समीक्षा समिती नेमून जनमत चाचणी करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'एमटीबीपीए'ने प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
..............


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या:भाग्यश्री ताई आत्राम अतिदुर्गम तांबडा येथे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामने


 

एटापल्ली:आदीवासीबहुल भागातील तरुण,तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा कौशल्य असून आयोजित विविध स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या,असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

 गेदा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांबडा येथे पहिल्यांदाच तरुण आणि तरुणींसाठी आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे बेबीताई नरोटी,सह उदघाटक तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,अध्यक्ष म्हणून गेदा चे सरपंच रीना मडावी,प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,उपसरपंच दसरू मट्टामी, अजय पदा, लक्ष्मण नरोटे,संभाजी हिचामी, जितेंद्र टिकले,शिक्षक कुळमेथे,गणेश धुर्वा, भूमिया, गावपाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील विध्यार्थी शालेय जीवनात विविध स्पर्धेत भाग घेऊन राज्यपातळीवर तालुक्याचा नावलौकिक करीत आहेत.असे अनेक माजी विद्यार्थीही गावागावात आहेत.त्यांच्यासाठी अश्या स्पर्धेची गरज आहे.क्रीडा क्षेत्रातील तरुणांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेत आहोत.येथील तरुणांमधील क्रीडा कौशल्य आणि कला गुण बघून तालुका मुख्यालयात क्रीडा संकुल साठी मोठी निधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आणि त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. याठिकाणी नियमित सराव करून खेळांमध्ये सातत्य ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.

विशेष म्हणजे तरुण आणि तरुणींसाठी एकाच मैदानावर सामने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेसाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात चमुंनी सहभाग घेतला आहे.गावातच खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याने महिला व पुरुषही मैदान गाजवणार आहेत.या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पारितोषिक ठेवण्यात आले आहे.दरम्यान क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनासाठी गावात आगमन होताच मुंगराज क्रीडा मंडळ तांबडाच्या वतीने गावकऱ्यांनी  मान्यवरांचे आदिवासी पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजनरस्ते बांधकामासाठी कोट्यवधींची निधी


 

अहेरी:तालुक्यातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासह सुधारणा करण्यासाठी कोट्यवधींची निधी मंजूर झाले असून नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये बोटलाचेरू फाट्यापासून आलापल्लीकडे पुढे ४ किलोमीटरचे काम केले जाणार असून यासाठी १९९.३७ लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे.दुसरे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नवेगाव ते आपापल्ली ते चिंतलपेठ ९.४० किलोमीटर पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून यासाठी तब्बल ५९०.०० लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे.तर याच परिसरात तिसरे काम ९७.८० लक्ष रुपयांच्या निधीतून नवेगाव ते किष्टापूर (१.७९ किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण काम केले जाणार आहे.सर्व कामांचे टेंडर पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

कोट्यवधींच्या निधीतून नवेगाव,किष्टापूर आणि वेलगुर या तिन्ही गावातील मुख्य रस्ते गुळगुळीत होणार आहे.सदर रस्ते विकास कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून भूमिपूजन निमित्य मंत्री धर्मराव बाबा परिसरात दाखल होताच गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, किष्टापूरचे उपसरपंच पवन आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,जेष्ठ नागरिक श्रीकांत मद्दीवार, मनीषा सडमेक,वेलगुर टोल्याचे, सडमेक महाराज ग्रा.सदस्य रोहित गलबले,जेष्ठ नागरिक राजेश्वर उत्तरवार,ग्रा प सदस्य वामन मडावी,आशण्णा दुधी,आदिल पठाण,अरविंद खोब्रागडे,बाबुराव सोनूले,आलापल्लीचे ग्रा प सदस्य मनोज बोल्लूवार,ग्रा प सदस्य पुष्पा अलोने,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी तसेच नवेगाव,किष्टापूर आणि वेलगुर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

 नाट्यश्री कविता स्पर्धेच्या चौथ्या सत्रात कवयित्री 'वंदना मडावी' विजयी


 

   स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली येथील  कवयित्री वंदना मडावी यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "ज्ञान तुकोबांचे' या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       कवयित्री वंदना मडावी या झाडीपट्टीतील नवोदित कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. ते विविध विषयांवर कवितांचे लेखन करतात. आजवर त्यांनी पन्नास च्या जवळपास कवितांचे लेखन केले असून विविध दैनिकातून त्यांचे लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या चौथ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  राहूल शेंडे, गजानन गेडाम, प्रभाकर दुर्गे, स्वप्निल बांबोळे, मुर्लीधर खोटेले, पी . डी. काटकर , कृष्णा कुंभारे, प्रब्रम्हानंद मडावी,  सुनील मंगर,  वंदना मडावी,  बाबाजी व्ही. हुले, वसंत चापले,  प्रतिभा प्रविण सुर्याराव, मनिषा हिडको, लता शेंद्रे, माधुरी अमृतकर,
संगीता ठलाल, मनोहर दुधबावरे, पुरुषोत्तम लेनगुरे, संजय बन्सल, 
चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के, ज्योत्स्ना बन्सोड, कु. विधी बन्सोड, सत्तू भांडेकर  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 27, 2024

PostImage

प्रावीन्यप्राप्त विदयार्थ्यांचा माजी जी प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार


 

एटापल्ली:तालुका मुख्यालयातील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय येथे माजी जि प अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.

तालुक्यातील आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी 1992 मध्ये येथे भगवंतराव आश्रम शाळेची स्थापना केली.10 वी आणि 12 वी चे शिक्षण झाल्यावर येथील गोरगरीब विध्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते.येथील विध्यार्थ्यांना तालुका मुख्यालयातच पुढील शिक्षण उपलब्ध व्हावं या उदात्त हेतून कला आणि विज्ञान महाविद्यालय सुद्धा सुरू केली.तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

1992 ला लावलेलं छोटंसं रोपट्याचा आज वटवृक्ष झाले असून तालुक्यातील हजारो विध्यार्थी याठिकाणी घडले आहेत.उच्च शिक्षण घेऊन येथील आदिवासी विध्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.एवढेच नव्हेतर येथील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहेत.दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत येथील अनेक विद्यार्थी राज्य स्तरावर चमकतात.याही वर्षी अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न होताच भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यात दिक्षा वाळके,गायत्री बुद्धावार,नीलिमा मेश्राम,मोनिका मडावी,सगुणा कंगाली आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सभापती बेबीताई नरोटे,जेष्ठ नागरिक दत्तात्रय राजकोंडावार,पौर्णिमा श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,प्राचार्य डॉ बूटे,मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 27, 2024

PostImage

शालेय पोषण आहार कर्मचारीच्या मेळाव्याला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


 

शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून आलापल्ली येथे मेळाव्याचे आयोजन

अहेरी:आलापल्ली येथील ग्राम पंचायत च्या सभागृहात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून विविध मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून शालेय पोषण आहार कर्मचारी यांना वेतनवाढ,पदोन्नती,आरोग्यविमा व सेवा निवृत्तीवेतन या विषयांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व शासन दरबारी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
         या मेळाव्याला युनियन राज्य सचिव विनोद जोडगे,जिल्हा संघटक सचिन मोतकूरवर,सूरज जक्कुलवार, जुबेदा शेख,आकाश तेलकुंटलवर,गणेश चापले सह अहेरी उपविभातील शेकडो शालेय आहार पोषण कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 25, 2024

PostImage

तो गाव आजही वाघाच्या दहशधीत


 

मूलचेरा;-गुरुवार हा दिवस कोळीगाव वासीयांसाठी भीतीचे वातावरण घेऊन निघाला वेळ सकाळी ठीक 7 वाजता कोळीगाव हे गाव धुरीने वेधलेला माणूस माणसाला दिसेना अश्यातच

कोळीगाव येथील पियुष आत्राम हा आपल्या घरून शेजारचा मित्र अनिकेत मडावी याच्या घरी विस्त शेकायला म्हणून गेला 

काही वेळाने त्याचा मित्र अनिकेत आनी पियुष हे दोघे मिळून दुकानात गेले 

व पियुष च्या आईला लक्षात आले की आपला मुलगा हा खूप वेळेपासून घरी नाही
मनात शंका घेऊन पियुष ची आई त्याला घरा शेजारी शोधत होती परंतु पियुष कुठेच आढळला नाही आजूबाजूच्या लोकांना विचारले असता लोकांनी त्याला बघितले नाही अशे सागल्यानंतर पियुष च्या आईच्या

मनात पुन्हा भीती निर्माण झाली व जंगलाच्या दिशेने आपल्या मुलाला शोधण्यासाठी आरडा ओरडा करत 

निघाली परंतु काही दूर जंगल परिसरात शोध घेउणंही तो मिळेना 

अश्यातच पियुषच्या आईचे धैर्य सुटले व ती रडायला लागली तिचे रडणे ऐकून शेजारी जमा झाले व त्याला शोधण्यासाठी सुरुवात केली 

जणू काही क्षणासाठी पियुषच्या आईला वाटले की माझ्या मुलाला वाघाने तर उचलले नाही परंतु 

काही क्षणात पियुष आणि अनिकेत हे  दुकानातून परत आले

पियुष आपल्या घरी गेला व अनिकेत जमा झालेल्या लोकांकडे गेला व अनिकेत नी जमा झालेली लोकांना विचारणा केली असता पियुष 

लापता अशे सांगितले तेंव्हा हसून अनिकेत नी उत्तर दिले की तो घरी आले तेव्हा पियुषच्या आईच्या प्राणात प्राण आले व आपल्या मुलाला जाऊन मिठी मारली

पियुष भेटला असला तरी काही वेळ कोळीगाव येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाने जाहीर केले की वाघाला जेरबंद केले तरी संपूर्ण गाव भीतीच्या वातावरणात जगत आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 24, 2024

PostImage

आल्लापल्ली चाणक्यनिवासी मतिमंद विधालय शाळेत फळ व बिस्कीट वाटप


 

 


अहेरी;-शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार 23 जानेवारी रोजी आल्लापल्ली शिवसेनेचा वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम चाणक्य निवासी मतिमंद विद्यालय शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या नेतृत्वात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले याप्रसंगी आल्लापल्ली येथे वृक्षरोपणही करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुख अंकुश मंडलवार,विभाग प्रमुख प्रकाश गदलवार,युवासेना शहर प्रमुख अनिश सानप, शिवसेना शाखा प्रमुख राकेश धोबे, पापा तिवाडे, वेदू अनमूलवार, मयूर त्रिनगरीवार,अमन मेश्राम, संकेत मेश्राम  दिनेश भुसकाटे सर, हंसराज आटे सर, खिलेश जुमनाके, प्रभाकर बावणे व शिवसैनिक उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 21, 2024

PostImage

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही;-सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार


 

 

गडचिरोल्ली;-जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर सर्रार लूट केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना निदर्शनात येताच त्यांनी  

प्रसिद्धी पत्रक जाहीर केले व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर होणारी लूट कदापि सहन करणार नाही सविस्तर अशे की

 

अविका संस्था व फेडरेशन हमीभावाणे धान खरेदी करतात 

आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्ती नुसार हमीभाव धान खरेदी कारावे लागते

शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 घ्यायचे धोरण आहे परंतु सर्रार शेतकऱ्यांकडून 41.600  किव्हा 42 केजी घेतले जाते

जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्यावायून धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केलीजाते व क्विंटलच्या मागे अडीचते तीन किलोची लूट केली जाते


या मुळे शाशन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नी उलट

शेतकऱ्यांचे नुकसान होतांना दिसते 
याच पिळवणुकीला 


थाम्बविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की 

एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबत चा जाब व्यवस्थापक किव्हा सचिवांना विचारावा


त्याच क्षणी संबंधित तुम्ही तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला त्या सचिवावर स्वतःही तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करू शकता.

 किव्हा धान खरेदी केंद्रावर काटा करताना खरेदी वजनाचे फोटो की व्हिडीओ 

9405645963 या नंबर वर पाठवावे किव्हा आम्हाला संपर्क करावे आम्ही तुमची बाजू शासन दरबारी मांडूव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवू


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पूजन करत घेतले आशीर्वाद


 

भगतनगर व परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा करत जाणून घेतल्या स्थानिक समस्या


मूलचेरा:-तालुक्यातील भगत नगर येथील सार्वजनिक श्री श्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगत नगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दिनांक 18 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मंदिरास भेट देऊन विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
       
          यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष मनोमली बिस्वास,संजय बॅनर्जी, पुलोक तालूकदार,परिमल मंडल,सुनील मंडल, तपोष गांगुली,रामपदो मिस्त्री,सुधीर तालुकदार,सुनील कर्णधार,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे सह बीआरएस व आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून नवेगाव येथील नितेश शेंडे यांना उपचारास आर्थिक मदत.


 

    अहेरी;-तालुक्यातील नवेगाव येथील नितेश बाबुराव शेंडे हा युवक  गंभीर आजाराने त्रस्त असून तो त्यांचा घरी कमावता एकुलता एक असल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.ही बाब नवेगाव येथील पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिले.माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना कळताच लगेच नितेश शेंडे यांच्या आईला घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केले.
    या वेळी श्रीमती वंदना बाबुराव शेंडे,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,प्रवीण रेषे,विनोद कावेरी,सुधाकर कोरेत,तुकडोजी शेंडे उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार


 

अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आले.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आविसं - अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकतेच भारत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केले.

या निमित्य अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील अजय कंकडालवार यांना भेट घेऊन शाल श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आगाराती कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 19, 2024

PostImage

गरुडझेप बहुउद्देशीय संस्था आर्वी नगरपालिका हद्दीतील आर्वी पुलगांव रोडवरील कडु लिंबाची वृक्षतोड थांबविण्याबाबत विनंती


 


उपरोक्त विषयान्वये मी आपणांस सविनयपुर्वक अर्ज सादर करतो की, आर्वी शहरात जवळपास १०० ते १५० वर्षे जुनी ८० ते १०० मोठी कडु लिंबाची वृक्ष आहेत. त्यापासुन आर्वीकरांना पर्यावरणाचा फायदा आहे. तसेच या झाडांवर हजारोच्या संख्येत पक्षी (उदा. पोपट, कावळे, बगळे, चिमण्या ) इ. चे घरटे व माकडांचे आवागमन आहे. आपण आपल्या स्वार्थापोटी पक्षांचे घरटे उध्वस्त करीत असल्याचे दिसुन येत आहे. आपल्या कार्यात अतिशय अडथळा निर्माण होत असल्यास आपण नविन वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्याची हमी लेखी स्वरूपात द्यावी अन्यथा आपण ही वृक्षतोड थांबवावी अन्यथा आमच्या संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी ही विनंती. करिता आपल्या सेवेशी नम्र अर्ज सादर. निवेदन देताना गरुडझेप बहुउद्देशीय संस्थेचे संचालक तुषार साबळे अध्यक्ष रमण मेंढे उपाध्यक्ष रवी शिंपेकर सचिव मिलिंद मसराम व सदस्य ओम पारिसे विकी मसराम आशिष मोहेकर रवी आत्राम आशिष डंबारे यश पवार वैभव मेंढे पवन मोकलकर अनिकेत टिपले आयुष अजमिरे शैलेश मेश्राम विशाल उईके हरीश शेंडे लकी कंगाले हे उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 19, 2024

PostImage

बोरी केंद्रावर प्रतिबारदाना एक किलोची लूट


 

कोरची;-आदिवासी विकास महामंडळ उपअभिकर्ता म्हणून जिल्ह्यातील आविका संस्था हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हमीभावाने धान खरेदी करावी लागते. कोरची तालुक्यातील बोरी येथे ४० किलोंवर १ किलो अधिक धानाची भरती घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

आविका संस्था बोरी केंद्रावर अनेक गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते

 शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून  हमीभाव केंद्रावर भेट दिली. असता नियमानुसार बारदाना गृहीत धरून ४०.६०० किलो एवढे धान मोजायला पाहिजे. मात्र, एका शेतकऱ्याचे धान मोजत असताना नोंद केली असता एका बारदाण्यात ४१.६०० किलो धान खरेदी केली जात असल्याचे दिसून आले. म्हणजेच एका क्विंटलमागे अडीच किलो धान अधिक घेतले जात आहेत. शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांपासून तक्रार होती; पण व्यवस्थापकाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हते. याबाबत आता शेतकरी बोलत आहेत.

 कोरची उपप्रादेशिक व्यवस्थापक राजुरे यांना

याबाबत सदर केंद्राची  माहिती मागण्याकरिता फोन  संपर्क केला असता केंद्रावर अधिकची धान घेतले जात आहे याबाबत आपण का लक्ष देत नाही असा विचारताच  फोन कट केला l  पुन्हा आम्ही सम्पर्क केल्या नंतर काय करायच आहे ते तुम्ही करुण टाका अशे उत्तर मिळाले ll व्यवस्थेचे पदाधिकारी आनी कर्मचारिच अरेरावी ची भाषा पत्रकारांशी वापरत आहेत तर दुर्गम भागातील अश्या किती शेतकरी यांच्या भ्रस्टाचारला बळी पड़त असेल


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 18, 2024

PostImage

नवेगाव येथील उपचार ग्रस्ताला माजी पालकमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी केली उपचारासाठी आर्थिक मदत


 

 

अहेरी;-नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे माजी पालकमंत्री आंबरिशराव यांनी पुन्हा एकदा उपचाराग्रस्तला केली आर्थिक मदत

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे वेलगुर नवेगाव येथील बाबुराव शेंडे यांचा मुलाचे चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती आहे 

व त्यांच्या घरची परिस्तिथी हलाकीची आहे

ही बाब नवेगाव येथील बूथ प्रमुख सुरेश शेंडे यांनी आलापल्ली येथील भाजप पदधिकारी

 भाजप सचिव सतीश गोटमवार, अभिजित शेंडे आनंदराव रालबंडीवार अंकुश शेंडे दीपक तोगरवार यांच्या निदर्शनात आणून दिली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री आत्राम यांच्या शी संपर्क साधून परिस्तिथी कळवली या वेळी वेळेचा विलंब न करता माजी पालकमंत्र्यांनी आर्थिक मदत केली

व समोर काही अडचणी पडल्यास समोरची मदत करणार अशी ग्वाही दिली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 15, 2024

PostImage

शिवसेना शिंदे गटात इंनकमिंग चालू अनेक युवकांनी केला पक्षात प्रवेश


 

 

 

गडचिरोल्ली;- कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.लक्ष्मणजी (भाई) ज.तांडेल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या वाढदिवसच्या निमित्ताने

 

,दिनांक 14 जानेवारी 2024 रोज रविवारला,अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागातील मौजा खमनचेरू तालुका अहेरी येथे, शिवसेना कामगार संघटना जिल्हा गडचिरोली च्या वतीने,कामगार उपजिल्हा प्रमुख श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे,

 

अंकुश मंडलवार अहेरी व एटापल्ली शिवसेना कामगार तालुका प्रमुख,श्री.अविनाशजी पूच्छलवार शिवसेना कामगार चामोर्शी तालुका प्रमुख यांच्या शुभहस्ते

 

 आणि त्यांचे प्रमुख उपस्तितीत,मौजा खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला श्री. प्रकाश गड्डलवार या शिवसैनिकाने विशेष परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 15, 2024

PostImage

अहेरी तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
 जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ किष्टापुर (वेल) कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

 अहेरी;-:तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

       या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे सरपंच किशोर आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे उपसरपंच उमेश मोहूर्ले,किष्टापुर ग्रामपंचायत चे उपसरपंच जीवन आत्राम,पोलीस पाटील महेश अर्का,माजी सरपंच भगवान आत्राम,हरिदास आत्राम,काशिनाथ दब्बा,अनिल दब्बा,मधुकर सडमेक,अजय मडावी,ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले,बंडुजी नागोसे,साईनाथ नागोसे,जुलेख शेख,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

           टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम तसेच तृतीय पुरस्कार सरपंच किशोर आत्राम व उपसरपंच उमेश मोहूर्ले यांच्या कडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

           जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हरिदास आत्राम यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला किष्टापुर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
    सामन्याच्या यशस्वीतेसाठी केतन मडावी,गौतम गावडे,प्रकाश दब्बा,रोहित अर्का,कमलेश अर्का,जीवन आत्राम,भगत आत्राम,अनिकेत सडमेक,यश दब्बा,आदर्श आत्राम,करण दब्बा सह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 13, 2024

PostImage

बोरी येथील भोई समाज बांधवांना मिळणार सुसज्ज सभा मंडप माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


 

अहेरी:तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभा मंडप बांधकाम होणार असून शुक्रवार (12 जानेवारी) रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

बोरी येथे मोठ्या प्रमाणात भोई समाजबांधव वास्तव्याने आहेत. समाजाचा कुठलही कार्यक्रम घेण्यासाठी सभा मंडप नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांनी सभा मंडपाची मागणी केली होती.भोई बांधवांची अडचण लक्षात घेऊन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरली. अखेर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 7 लाख 50 हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून येथे सुसज्ज सभा मंडप बांधकाम केले जाणार आहे.

नुकतेच शुक्रवारी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी राकॉचे तालुका अध्यक्ष  श्रीनिवास विरगोनवार,महेश बाकीवार,साईनाथ अलवलवार,नागेश पुल्लीवार,अशोक वासेकर,विजय कोकीरवार, गव्वा कपेलवार,शंकर सुर्लावार,पोचम बाकीवार,संजय येल्लेलावार,भिमराव कपेलावार,सुरेश बाकीवार,राजन्ना सगांर्तीवार,रामन्ना गन्लावार,सिनू कपेलावार,संजय येल्लावार,पोचम मंचर्लावार,मल्ला कपेलावार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

येचली रेती प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावणार - संतोष ताटीकोंडावार यांचा 'अल्टीमेटम'
भामरागड;- तालुक्यातील येचली घाटातून रेती वाहतूकीसाठी केलेल्या करारनाम्यानुसार रेतीचे उत्खनन न करताच प्रशासकीय अधिका-यांशी संगनमत करुन तिथूनच रेतीचा उपसा केल्याचे दाखवून हजारो ब्रास रेतीची अफरातफर करुन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार, निवेदन सादर करुनही वर्षाचा कालावधी लोटूनही या प्रकरणी कोणतीच कारवाई न करता संबंधितांना अभय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या तीन दिवसात तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून दिला आहे.
    सन 2021-22 साठी येचली रेती घाट उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागांतर्गत जीएसडी इंडस्ट्रीज भामरागड यांचेसोबत करारनामा करण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने सदर रेती घाटातून रेतीचे उत्खनन करताच प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरुन बनावट वाहतूकीचा परवाना तयार करुन 2115 ब्रास रेतीची वाहतूक केल्याचे दाखविण्यात आले. करारनाम्याचे भंग झाल्याचे तसेच रेती प्रकरणात कंत्राटदाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने ताटीकोंडावार यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतरही भामरागडचे तहसिलदार यांनी संबंधित अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. तर कंत्राटदारावर केवळ 563 ब्रास रेती परवानावर 1 कोटी 19 लाख रक्कमेचा दंड आकारला. मात्र उर्वरित बेकायदेशीर रेतीवर दंड आकारला नाही. यासंदर्भात सप्टेंबर 2023 व डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज केला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही कार्यालयाद्वारे कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवर कार्यवाही करण्यात आली नाही.
    गैरप्रकार करणा-या कंत्राटदासह संबंधित अधिकारीवर कारवाई करण्यास बराच विलंब होत असल्याचा आरोप करीत तक्रार संतोष ताटीकोंडावार यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिका-यांनी निवेदन सादर केले आहे. येत्या तीन दिवसात संबंधित कार्यवाही न झाल्यास मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करुन प्रकरणाच्या चौकशीकरिता दाद मागणार असल्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

गांधी चौकातील डॉ कुंभारे यांच्या निवस्थानी कुत्तरमारे यांचे स्वागत


गडचिरोल्ली;-.सौं.वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) शिवसेना महिला संपर्क प्रमुख यांची, दिनांक 10 जानेवारी 2024 रोज बुधवारला,श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी गडचिरोली येथे सदिच्छा भेट घेतली,"शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे" महाराष्ट्र अध्यक्ष मा.लक्ष्मण (भाई)ज.तांडेल साहेब यांचेवतीने, "शिवसेना गडचिरोली कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख" पदी श्री. सत्यपाल परशुराम कुत्तरमारे यांची निवड झाल्याबद्दल,पुष्पागुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री.सत्यपाल कुत्तरमारे यांनी मा.सौं. मोरे (कुंभारे ) मॅडमचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी श्री.प्रभाकर सातार चामोर्शी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

विद्यार्थ्यांनी जीवनात एक तरी कला जोपासली पाहिजे;सामाजिक कार्यकर्ते साई चंदंखेडे                 
अहेरी;-अभ्यासाबरोबरच आपणास ज्या कलेविषयी आवड आहे; ती जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यामधून तुम्हाला आनंद तर मिळेलच, परंतु त्याचबरोबरच त्या कलेत नैपुण्य मिळविले तर करिअर ही करता येऊ शकते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते साई चंदनखेडे यांनी  काल १० जानेवारी २०२४ आलापल्ली येथे तालुका पत्रकार संघेटने तर्फे राणी दुर्गावती विद्यालयात विद्यार्थी सत्कार समारंभात विद्यार्थांना व्यक्त करत असताना गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार भाग हा महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कला जोपासण्याची आज गरज आहे. मला लहानपणापासूनच नाटकाची आवड असल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. भूमिका समजून अभिनय करण्यात खरा आनंद आहे अशे सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

"पत्रकारांची सामाजिक बांधिलकी" - समाज प्रगतीचे लक्षण अति. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मत.


 

पेरमिली;-पत्रकार" समाज विकासाचा अविभाज्य अंग आहे. तालुका पत्रकार संघटना अहेरी येथील पत्रकारांनी 19 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप,बारा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्काराने सामाजिक बांधिलकी घट्ट केली. यानेच समाजाची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी उद्घाटनीय स्थानावरून केले.
       आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या औचित्याने अध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका पत्रकार संघटना अहेरीच्या वतीने तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा गुणवंतांचा  व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार काल आयोजित करण्यात आला .
      अध्यक्ष म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे, प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, प्राचार्य लोणबले उपस्थित होते.
     विचारमंचावर सत्कारमूर्ती म्हणून जिल्ह्यातील विविध गरजूंना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा  मानवाधिकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष प्रणयभाऊ खुणे, तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश मोहुरले तथा गुड्डीगुड्डमचे उपसरपंच प्रफुल्ल नागुलवार यांचा शाल, श्रीफळ देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
     तालुका पत्रकार संघटनेने तालुक्यातील पेरमिली व देवलमारी केंद्रातील 19 जिल्हा परिषद शाळांमधील 912 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक, पेन व कंपासचे वाटप केले होते. त्यानंतर तालुक्यातील सर्व बारा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा १हजार ७८२   विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली .कार्यक्रमाला शाळेतील वर्ग ५ते १२ विचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्राध्यापक,मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते ,प्रत्येक केंद्रावरील शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होतें. स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातून प्रथम राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीची विद्यार्थिनी अर्पिता मंचालवार, द्वितीय राजे धर्मराव क. महाविद्यालय आलापल्लीची समीक्षा मडावी तर तृतीय सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापलीची विद्यार्थ्यांनी मिताली दिवटीवार यांनी क्रमांक पटकाविला. सर्व बाराही परीक्षा केंद्रावरील प्रत्येक केंद्र प्रावीण्यप्राप्तकांना सुद्धा शिल्ड, प्रशस्तीपत्र, रोख व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
    कार्यक्रमावेळी मंचावर मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते ज्ञानेंद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, गौतम मेश्राम, ओम चूनारकर उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ पठाण, कोषाध्यक्ष नीलिमा  बंडमवार, सहसचिव मुकुंदा दुर्गे, सल्लागार सदाशिव माकडे, डॉ. शंकर दुर्गे, उमेश पेंड्याला, बबलू सडमेक, राहुल दुर्गे, शहाजी रत्नम , व्यंकटेश चालूरकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच प्रशांत ठेपाले, अनिल गुरणुले, मुन्ना कांबळे, श्रीधर दुगिरालापाठी, दिपक चूनारकर, संजय गज्जलवार, साहिल वाळके, बोम्मावर , गांग्रेडिवर व ईतर पत्रकार बंधुनीही सहकार्य केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, संचालन संघटनेचे सचिव रमेश बामणकर तर आभार संघटक साई चंदनखेडे यांनी मानले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 10, 2024

PostImage

प्रशासनच नियमांचे उलंघन करणार असेल, तर आता नोटीस कुणाला बजावणार जिल्ह्यात कलम 37 ( 1 ) लागू असूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सभा


 

गडचिरोल्ली;-मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 2 जानेवारी पासून 16 जानेवारी 2024 पर्यंत, महाराष्ट्र पोलीस अधिनयम 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे, त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोक जमणे, जाहीर सभा घेणे सारख्या अनेक गोष्टीवर बंदी लावण्यात आलेली आहे. विरोधी पक्षातील लोकांनी मोर्चा, आंदोलन किंवा सभा घायचे झाल्यास प्रशासनाकडून कायम विरोधकांना नोटीसी बजावल्या जाते, मात्र आता जिल्ह्यात कलम 37 लागू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची जाहीर सभा जिल्ह्यात घेतली जात आहे?

प्रशासनाकडून प्रशासकीय कायद्याची पायमल्ली केल्या जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे आपले गाहाने मांडावे? की फक्त विरोधकांचा आवाज दाबण्याकरीता प्रशासनाच्या वतीने अश्या पद्धतीचे नोटीस दिल्या जात आहे, असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित केला आहे. हे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न असून राज्यातील आणि केंद्रातील सरकार हुकूमशाह प्रमाणे वागत असून सार्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केल्या जात आहे.


बॉक्स


दिनांक 2 ते 16 पर्यंत जिल्ह्यात कलम 37 ( 1) लागू होती त्या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोक जमणे किव्हा जाहीर सभा घेणे याच्यावर बंदी होती तरीही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची काल सभा झाली त्यात हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्तिथी लावली हे नियम सत्तेत असणाऱ्यांना लागू नाही का विरोधी पक्षात असलेल्यांना नोटीस बजावता हे सरासरी लोकशाहीची हत्या आहे 

 

    महेंद्र ब्राम्हणवाडे
काँग्रेस कमिटी गडचिरोल्ली
जिल्हाध्यक्ष 

    


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 10, 2024

PostImage

किष्टापुर (दौड) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
 जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ किष्टापुर (दौड) कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आला

 अहेरी:तालुक्यातील किष्टापुर (दौड) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.क्रिकेट सामन्याच्या उदघाटन पूर्वी गावात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काडून राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा जन्मगाव असलेले किष्टापुर येथे त्यांच्या पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

       या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ग्रामसेवक सुधीर मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जयवंत मडावी,ग्राप सदस्या वनिता मडावी,माजी ग्राप सदस्य ईश्वर कोटा,आविस सल्लागार किशोर मडावी,सुधाकर मडावी,रमेश वेलादी,कारे मडावी,मदना येलाम,पेंटा तलांडी,अनिल मडावी,वंगाराम मडावी,रमेश मडावी,कारे वेलादी,बंडू तलांडी,इर्शाद शेख,आविस सल्लागार माधव कुडमेथे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी  उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

           टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार व द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

           जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश वेलादी यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला किष्टापुर,दोडगेर,पत्तीगाव सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी चिना वेलादी,संतोष सिडाम,राहुल मडावी,अशोक सिडाम,संतोष मडावी,बापू मडावी,विनोद मडावी,मोहीम शेख,मोनू सय्यद,आसिफ सय्यद यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 9, 2024

PostImage

एटापल्ली शिवसेना शिंदे गट कामगार तालुका प्रमुख पदि अंकुश मंडलवार यांची नियुक्ती


 

 

शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे... 
तर अहेरी आणि एटापल्ली शिवसेना कामगार तालुका प्रमुख पदी श्री.अंकुशजी मंडलवार,तसेच
 चामोर्शी तालुका प्रमुख पदी श्री.अविनाश पुच्छलवार यांची वर्णी... 
प.
     शिवसेना पक्षाचा प्रमुख घटक (पाया) असलेल्या,"भारतीय कामगार संघटनेची" पक्षात महत्त्वाची भुमिका आहे.हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुरूवातीला,कामगारांना भेडसावणाऱ्या ज्वलंत  प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन, महाराष्ट्रभर पक्षाची पाळेमुळे रोवली.त्याला महाराष्ट्रातील कामगारांची अभुतपूर्व साथ मिळाली. 
         पुढे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असतांना,महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील,कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून,ना.शिंदे सरकार सतत कामगारांच्या कल्याणासाठी,त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे.
   गडचिरोली जिल्ह्यासह, चामोर्शी तालुक्यात,शिवसेना पक्षासाठी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाने केलेल्या अविरत कार्याची दखल घेऊन,शिवदुत तयार करणे,शिवसेना सदस्य नोंदणी,शिवसेना संघटनात्मक कार्यकारिणी तयार करणे,आनंद दिघे साहेब रुग्णालय शिबीर,भव्य रक्तदान शिबीर यासारखे उपक्रम राबविण्यात आले,या कार्याची दखल घेऊन,शिवसेना भारतीय कामगार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) तांडेल साहेब यांनी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाची,भारतीय कामगार संघटना महाराष्ट्राच्या,गडचिरोली जिल्ह्याचे कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी म्हणून दिनांक ०६ जानेवारी २०२४ रोज शनिवारला,निवड करण्यात आली,या निवडीचे शिवसेना जनसंपर्क अधिकारी मा.गौरवजी नागपूरकर आणि मा.महेश कुथे सरांनी सुभेच्छा दिल्या तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि कामगारांनी आनंंद व्यक्त केला आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 9, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

 

 

अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर ( वेल ) येथील जय सेवा व्हाॅलीबाॅल क्लब किष्ठापूर ( वेल ) तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक आविसं - काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत किष्ठापूर ( वेल ) यांच्या कडून देण्यात येत आहे.

रोहित गलबले ग्रामपंचायत सदस्य वेलगुर,शैलू मडावी ग्रामपंचायत सरपंच खमनचेरू,वामन मडावी,स्वप्नील मडावी,गीताताई चालुरकर पं.स अहेरी माजी उपसभापती,प्रगवानजी आत्राम,महेशजी अर्का पोलीस पाटील,पवनकुमार आत्राम ग्रामपंचायत उपसरपंच किष्टपुर,नरेश मडावी ग्रामपंचायत सदस्य किष्टापुर,हरिष आत्राम,विस्तारी दब्बा, कासीनाथ दब्बा,माजी ग्रामपंचायत सरपंच,सोमाजी आत्राम,निलाबाई मडावी,मायाबाई आत्राम,राधाबाई आत्राम विजय मडावी,पापय्या पोरतेट,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंचसह आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

दामरंचा ते दुब्बागुडम रस्त्याचे कंत्राटदाराकडून काम बळजबरीने


 

 

 


अहेरी ;-अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील दामरंचा ते दुब्बागुडम रस्त्यावर जुण्या सर्व्ह नुसार शेतकऱ्यांच्या शेतात


जाण्याकरीता व इतर कामा करीता पांदनरस्ता पुर्वी पासुन आहे. व त्या रस्त्यावर 7 ते 10 मीटर नविन रस्ता बांधकाम सदर कंत्राटदारा कडून बळजबरीने सुरु आहे. 


सदर पांदन रस्त्याचे रुपांतर नविन राज्य महामार्ग तयार करण्यासाठी शासनाने त्यांच्या स्तरावर व ग्राम सभेच्या सहमतीने असे अनिवार्य असतांना


पांदण रस्त्याचे रुपांतर राज्य महामार्गाने झाल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांचे शेत जमीन जात असुन सदर कंत्राटदाराने व संबंधीत विभागाने शेतकऱ्यांच्या जमीनीतील कोणतेही सर्व्हे न करता 


शेतकऱ्यांना कसलीही नुकसान भरपाई न करता बळजबरीने काम सुरु आहे. सदर काम अतितात्काळ थांबवुन चौकशी करुन चौकशी अंती शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई केल्यानंतर 


नियमानुसार परवानंगी घेउन सदर काम करण्यात यावे अशी मागनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार  यांनी केले आहे

 

 अन्यथा अन्यायगस्त शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभे करावे लागेल असेही म्हटले आहे


सदर निवेदनाची प्रत तहसीलदार तहसील कार्यालय अहेरी

 


प्रतीलीपी :-1) मा. श्री डी.व्ही. गवई, संस्थापक अध्यक्ष जन कल्याण समाजोन्न्ती अन्याय, भ्रष्टाचारनिवारण समीती, महाराष्ट्र राज्य. मुंबई

2) मा. जिल्हाधीकारी साहेब गडचिरोली 

3) मा. पोलीस अधीक्षक साहेब गडचिरोली 

4) मा. उपविभागीय पोलीस अधीकारी जिमलगट्टा 

5) मा. उपपोलीस स्टेशन दामरंचा उपविभाग जिमलगट्टा 

वरील अधिकाऱ्यांना सादर केले आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

चिंतलपेठ येथील वाघाच्या हल्ल्याची घटना दुःखद वनविभागाणे तातडीने आर्थिक मदत करावे ;सा.का.ताटीकोंडावार


 


अहेरी;-तालुक्यातील चिंतलपेठ येथे महिलेला वाघाने ठार केल्याची घटना काल सकाळी दिनांक 7/1/2024 रोजी रविवार ला घडली 


या वेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दुःख व्यक्त करत 
मनोगक्त व्यक्त केले की अहेरी विधानसभेत घडलेली घटना ही दुःख मन हेलावून टाकणारी आहे 


गेल्या काही महिन्यापासून गडचिरोल्ली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे मागील हप्त्यात महिला सरपण गोडा करण्यासाठी गेली


असता वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले इतक्यातच पुन्हा एकदा अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसर भीतीच्या वातावरणात आहे 

तरी या वाघांचा बंदोबस्त करून ठार झालेल्या महिलेला वन विभाग आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष तातीकोंडावार यांनी केली आहे 

जर का तातडीने या वरती उपाययोजना केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद.मुधोली चक न.२ येथील सभेत आमदारांना साकडे.


 

 


चक न 2;- "मला दोन एकर जमीन आहे माझे दोन मुलं आहेत एक मुलगा अपंग आहे.आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. जमीन आहे तर जमिनीच्या भरोषावर आम्ही आमचे पोट भरू शकतो.पैसा आज आहे उद्या नाही.साहेब तुम्हाला कितीही पगार असला तरी पण तुम्ही पैसा खात नाही शेवटी भातच खाता...."अशी भावनिक साद घालत विद्या कष्टी नावाच्या शेतकरी महिलेसह परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या वेदना आमदरांपुढे मांडल्या.
      ७ जानेवारी रोजी मुधोली चक नं.२ येथे भूमि अधिग्रहणाच्या बाबतीत पीडित असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आले असता मुधोली चक नं.२,जयरामपूर, सोमनपल्ली, गणपुर, मुधोली तुकूम लक्ष्मणपुर येथील शेतकऱ्यांनी आमदारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत  जमिनी  देणार नाही असे म्हणत सरकारकडे आमचे मुद्दे मांडा असे निवेदन देत वेगवेगळ्या मागण्या केल्या.
 *प्रमुख मागण्या*
१)शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण करणारा आदेश रद्द करावा.
२) शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी शासनाचे जे अधिकारी येत आहेत त्यांना तात्काळ थांबवा.
३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा वेळोवेळी धाक सांगत पोलीस निरीक्षक परिसरातल्या गावकऱ्यांवर जमावबंदीचा आदेश काढतात,हे लोकशाही असलेल्या देशात घातक आहे ज्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे,कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहे त्यासाठी पोलीस प्रशासननाला सूचना कराव्या..
४)आजपर्यंत चर्चा,निवेदन आणि अर्ज यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आमचे हक्क हिरावून घेऊ.
   यावेळी परिसरातले शेकडो शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन 


 

गडचिरोली:शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ६९ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुरुष व महिला २०२३-२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी २०२४ रोज रविवारला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभाचे अध्यक्ष शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, वाय राजाराम महासचिव बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, प्रशांत दोंदल जिल्हा क्रीडा अधिकारी, लीलाधर भराडकर जिल्हा नियोजन समिती सदस्य, डॉक्टर पि.के. पोटाला अध्यक्ष महाराष्ट्र दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन, डी. एस गोसावी कार्याध्यक्ष, अतुल इंगळे महासचिव आणि डॉक्टर सुरज येओतिकर संचालक क्रीडा विभाग, डॉक्टर दर्शना येवतीकर जिजामाता पुरस्कार प्राप्त, राजेंद्र भांडारकर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, युनूस शेख, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया चे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वप्रथम भारतातून आलेल्या ३० पुरुष २४ महिला संघातील खेळाडू प्रशिक्षण व्यवस्थापक यांच्या अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रात बॉल बॅडमिंटन खेळाला ५ टक्के आरक्षणात समावेश करून संघटनेच्या अडचणी सोडून पुन्हा गत वैभव मिळवून देण्याच्या आश्वासन उपस्थित खेळाडूंना दिले.

याप्रसंगी समस्त राज्याच्या संघाने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बँड सोबत सुंदर पथसंचालन करून सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधले तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आशिष निजाम यांनी मशाल घेऊन मैदानाला वंदन केले. तसेच या स्पर्धेला यशस्वी आयोजनासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी आयोजन समिती अध्यक्ष रशिकांत पापळकर, सचिव अतुल इंगळे, बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडकिलचे अध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे, प्राध्यापक रूपाली पापडकर, आशिष निजाम, कपिल बागडे, प्रशांत मशाखेत्री, प्रवीण पोयाम, संजय मानकर इत्यादींचे विशेष कौतुक केले. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉक्टर श्रीराम पवार ठाणे व रमण गागापुरवार प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर पि.के. पटेल तर आभार राजेंद्र भंडारकर यांनी मांडले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी"या"घटना स्थाळी धाव


 

अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील आज कापसाच्या शेतात काम करत असताना वाघाच्या हल्यात मृतक सुषमा देवदास मंडल यांची जागीच ठार झाले आहे.प्राप्त माहिती नुसार सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून.

मागील 30 ते 35 वर्षीपासून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येते स्थायी झाली आहे.त्यांच्या घरी एक किराणा दुकान असून चिंतलपेठ गावात त्यांची शेती पण आहे.सुषमा देवदास मंडल यांनी आज सकाळी शेतात कापूस वेचणी करतांना.अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केली वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार झाली.मंडल परिवारावार दुःखाचे डोंगर कोसळले आहे.ही माहिती स्थानिक आविसं - काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अजयभाऊंनी घटना स्थळी धाव घेतली.

घटनास्थळी असलेल्या नागरिक आणि त्यांचे नातेवाईकांनी 10 मिनिट समोर वनविभागचे कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येते पोस्ट मोडम साठी हलवण्यात आली म्हणून सांगितल्याने.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तीतून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते जाऊन मंडल परिवाराचा नातेवाईकांना भेट घेतली. फ़ॉरेस्ट विभागाचे अधिकारी मा.उपवनक्षक साहेबांना ब्रह्मणद्वणी द्वारे नरभक्षक वाघाला त्वरित जरबंद करण्याची विनंती केली.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली मा.हनमंतूजी मडावी,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगर सेवक,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊसह आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची मागणी


 

उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मंडल कुटुंबियांची घेतली भेट

अहेरी: तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला ही अत्यंत दुःखद घटना असून यानंतर असे दुःखद घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम केली आहे.

चिंतलपेठ येथे आज सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. एवढेच नव्हे तर सध्या शेतीचे काम सुरू असून या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे पुढे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.शेतीचे कामे खोळंबणार असून याचा फटका थेट सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित त्या नरभक्षक वाघाला जेर बंद करावा अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे.

दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत धीर दिला.उपस्थित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची माहिती घेऊन प्रस्ताव तयार करून वारसांना त्वरित अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी केली.

थेट फोन करून दिले निर्देश

उपजिल्हा रुग्णालय येथे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी थेट उपवनसंरक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात घडणाऱ्या वन्य प्राण्यांच्या घटनेमुळे अनेकांना यात जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वन विभागाची तात्पुरती मदत

वन विभागातर्फे सध्या तात्पुरत्या स्वरूपात मंडल कुटुंबियांना तीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी ही रक्कम माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आली.!


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून डोळ्याच्या ऑपरेशन साठी आर्थिक मदत


 

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत किस्टापुर ( दो )अंतर्गत येत असलेल्या दोडगिर येथील रहिवासी संतोष सम्मा वेलादी यांना डोळ्याच त्रास असल्यामुळे यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाण्याकरीता व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी उपचाराकरिता त्यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना डोळ्याच्या ऑपरेशन साठी अडचण भासत होती.

ही अडचण आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देचलीपेठा दोऱ्यावर असताना त्यांचे नातेवाईक व स्वता आजारी असलेले संतोष वेलादि यांनी आपली समस्या सांगताच अजयभाऊ यांनी रुग्णांस अहेरी जनसंपर्क कार्यालय येते बोलवून संपुर्ण उपचारकरिता आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊ त्या नातेवाईकांना सांगितले की पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून सांगितले . वेलादी परिवारातील  सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,नरेश गर्गम,सन्नी वेलादि,संमा वेलादी,प्रकाश दुर्गे कुमार गुरनुलेसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून भोगापूर येथील सिडम कुटुंबाला आर्थिक मदत


 

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर अंतर्गत येत असलेल्या भोगापूर येथील रहिवासी नागेश सिडम यांच्या काही दिवसांपूर्वी अल्प आजराने निधन झाले होते."ही"माहिती आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मिळताच लगेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठवून सांत्वन करून आर्थिक मदत केली.

यावेळी नारायणपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक हरी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगिली,संपत कडेकरी,वेंकटेश हरी,संतोष नीलम,साई नीलम,गड्डाम राजू,संपत हरी,येलाय्या इंगिली,कडेकरी गट्टू,साई नौसेट्टी,संपत दादा,अशोक इंगिळी,वेंकटेश इंगिली,पोचम गोमासी,येल्लय्या नौसेट्टी,सदानंद कडेकरीसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 6, 2024

PostImage

पोलिसांनी पकडली 42 ओल्या गांजाची झाडे हिंगणघाट पोलिसांची कारवाही


 

 

वर्धा;-दिनांक 05/01/2024 रोजी मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने जगन्नाथ वार्ड हिंगणघाट येथे राहणारा आरोपी नामे आकीब शेख सलाम वय 31 वर्ष यांचे घराचे छतावर गांजा अमली पदार्थ चे हिरवे ओले दोन ते अडीच फूट उंचीचे 42 झाडे मिळून आल्याने खालीलप्रमाणे गांजा अमली पदार्थ चे हिरवे ओले दोन ते अडीच फूट उंचीचे 42 झाडे वजन 369 ग्रम जूमला कि. 4500 रू. चा माल मिळून आल्याने एन डी पी एस कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात असून आरोपीस अटक करण्यात आली. पूढील तपास पोउपनि/रमेश मिश्रा पो.स्टे. हिगणघाट करीत आहे.                                                                                                                      
    सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. डाँ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. रोशन पंडित उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. मारुती मुळुक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउपनि/रमेश मिश्रा पो.हवा. प्रविण देशमुख,  सुनील माळणकर पोना/ नरेंद्र आरेकर, दिपक हाके, विजय हरणुर, सागर सांगोळे,यांनी केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 6, 2024

PostImage

शव स्वगावी नेण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत


 

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत पेरमिली येथील रंजु रामू मडावी वय 35 वर्षे यांची आकस्मित मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह पेरमिली वरून उपजिल्हा रुग्णालय अहेरी पोस्टमोडम करण्यासाठी घरच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.सदर माहिती आविसंचे माजी सरपंच प्रमोद आत्राम यांनी दूरध्वनी द्वारे त्यांचेपरिस्थिती आविसं - राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच त्यांनी एका क्षनांचा सुद्धा विलंब न करता मृतकांचे मृतदेह हे पेरमिली ला नेण्यासाठी अहेरी येथील शववाईका बोलेरो वाहन उपलब्ध करून देत आर्थिक मदत केली आहे.

यावेळी अहेरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गेसह आविसं राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 5, 2024

PostImage

भ्रष्ट अधिका-याला घडली अद्दल;-संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते


 

 

अहेरी;-अतिदुर्गम, संवेदनशील क्षेत्रात आधीच विकासाच्या नावे बोंब आहे. अशास्थितीत काही धाडसी कंत्राटदार नक्षल प्रभावीत जीव मुठीत घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशास्थितीत वनविभागाने कंत्राटदाराने नियमानुसार कंत्राटदारांना सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र प्रमोद जेनेकर यांचेसारखे भ्रष्ट अधिकारी पदाचा दुरुपयोग करुन खंडणी वसूल करीत विकास कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्गम भागात विकास कामे करणा-या कंत्राटदारांना त्रास देणा-या भ्रष्टाचारी वनाधिका-यांविरोधात आमचा लढा सुरु राहणार आहे. लाच प्रकरणी अटकेतील आरएफओ प्रमोद जेनेकर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची चौकशी करण्यात येऊन तपासाअंती त्याचेवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 5, 2024

PostImage

अखेर तो सेटिंगबाज वनपरिक्षेत्र अधिकारी जेणेकर फसला एसीबीच्या जाळ्यात 10 लाखाची केली होती मागणी 


 

 

अहेरी;_आलापल्ली वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आली आहे

सदर वनपरिक्षेत्र अधिकारी हा सेटिंगच्या कामात वस्तात होता 

गोरगरिबांना लुटमार करणारा या नावाने क्षेत्रात त्याचे नाव प्रसिद्ध होते 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की प्रमोद जेणेकर नामक वनपरिक्षेत्र अधिकारी हा तुमीरगुंडा कासमपल्ली रस्त्याच्या कामावरील काही वाहने पकडली होती व त्यावर आकारलेलं दंड कमी करन्यासाठी जेणेकर याने संबंधित कंत्राटदाराला 10 लाखाची मागणी केली होती अनंता 5 लाखात सेटिंग फिक्स झाली परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा न्हवती 

व तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली 

त्या अनुशंगाने सापडा रचून दिनांक 4/1/2024 रोजी  पेरमिली येथे रात्र 5 लाख रुपये स्वीकारताना प्रमोद जेनेकर याला रंगेहात पकडले


या वेळेवर लाच लुचपत विभागातील संपूर्ण कर्मचारी उपस्तीत होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


 

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांचे हस्ते करण्यात आली आहे.

या क्रिकेट स्पर्धेचे सहउदघाटक म्हणून येल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम - कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येल्ला ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 21001/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शाळा येल्ला - सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम यांच्या कडून 15001/- देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक विमलाताई ओल्लालवार शाळा - येल्ला येथील ग्रामसेवक प्रदीप गेडाम - प्र.ना.लिंगाजी टेकुलवार - प्र.ना.साईनाथ पानेमवार यांच्या कडून देण्यात येत आहे.

यावेळी आविसं - काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक - मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

लाहेरी येथील गुरांच्या गोट्याचे पैशे मिळवून देण्याकरिता लाभार्थ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी 


 

भामरागड : नरेगा अंतर्गत गुरांचे गोट्याचे पैसे मागील चार वर्षे पासुन ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थीना मिळत असल्याने आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

"सदर निवेदनात अशे म्हटले आहे की..!

भामरागड पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थींना नरेगा अंतर्गत मागील चार वर्ष पासून गुरांचे गोठयाचे पैसे देण्यास टाळटाळ करत आहे.मागील चार वर्ष पासून पंचायत समिती भामरागड ला येण्या जन्य करीता अंदाजे 20.000 हजार रुपये खर्च झाले तरी पण आमच्या कडे नरेगा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार या योजनेचे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही.तरी कृपया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आम्ही तुम्हास विनंती करतो की आमच्या हक्काचे पैशे मिळवून देण्यास मदत करावे अशे म्हटले आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

अल्लापल्ली येथील वाहन चालक संघटनेचे वतीने केंद्र सरकारच्या जाहीर निषेध


 

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निषेध सभेला भेट देत पाठिंबा दिले

आलापल्ली : केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा पारित केला असुन या कायद्यामुळे
99 अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे.अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.

त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात.परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे
मारण्याचा प्रयत्नही केला जातो.त्यामुळे स्वत:च्या संरक्षना करीता काही वाहन चालक
घटनास्थळावरून पळ काढतात.त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना“हिट अँड रन”कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे.असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे.हा कायदा केन्द्र सरकारने तात्काळ रद्द करावा या करीता अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी - आलापल्लीच्या वतिने मौजा आलापल्ली येथील विर बाबुराव सडमेक चौकात काल पासुन केन्द्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले.

लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रस्ता रोको करुन केन्द्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.जर का केन्द्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळा तिव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन चालकांनी
सांगीतले.त्यावेळी निषेध सभेला आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी भेट घेऊन वाहन चालकांची समस्या जाणून घेऊन जाहीर पाठिंबा दिले.

त्यावेळी आविसं काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक - असंख्य वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

नायलॉन मांजाची विक्री भोवणार मनपा भरारी पथकांची नजर कडक कारवाईचे निर्देश


 

 

 

चंद्रपूर;- राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
      मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग,मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु - पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  
      महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

देसाईगंज तालुक्यात बूथ कमेंट्या स्थापित करून पक्ष संघटन मजबूत करा; जिल्हाअध्यक्ष रवी वासेकर


 


देसाईगंज;-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या रूपाने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व प्राप्त झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री यांच्या सारखे कर्तृत्वान, जिल्ह्याच्या विकाशा साठी सदैव तत्पर असणारे, जिल्ह्यामध्ये विविध उद्योग आणणारे असे नेतृव आपल्या जिल्ह्याला प्राप्त झाले अश्या नेत्यांचा फायदा घेऊन कार्यकऱ्यांनी तालुक्यात पक्ष मजबूत करण्या करता गावा गावात बूथ कमेंट्या तयार करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर यांनी केले आहे.
       स्थानिक विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देसाईगंज तालुका व शहर कार्यकरणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी. जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर होते. प्रमुख उपस्थिती प्रदेश संघटन सचिव युनूसभाई शेख,जिल्हा परिषदेचे माजी सभापती केशरी पाटील उसेंडी, अल्पसंख्यांक चे जिल्हा अध्यक्ष आरिफ भाई पटेल,तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष लतीफ भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, जिल्हा संघटन सचिव मनोज तलमले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटवार, सेवादलचे जिल्हा अध्यक्ष. पायधन, जिल्हा संघटन सचिव प्रल्हाद वाघारे, जिल्हा डाकराम वाघमारे, जिल्हा संघटक सचिव हंसराज लांडगे अंबादास कांबळी, युवक चे विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, तालुका अध्यक्ष चिराग भागडकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, विलासभाऊ ठाकरे, सुरेंद्र नाकाडे, नामदेव मेश्राम रामचंद्र ठाकरे यादवजी भुरले, लीलाधर भर्रे, ममिता आळे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 3, 2024

PostImage

बाबलाई माता वार्षिक पुजा व पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा संपन्न


 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून बाबलाई माता वार्षिक पुजा व पारंपारिक संमेलनासाठी मदत


भामरागड तालुक्यातील बेजुर या गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच्या मंदिर आहे.
 
  येथे दर वर्षी आदिवासी व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट बघत असतात.

  १ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.

   माता बाबलाई ही आदिवासी बांधवांचे प्रमुख देवता आहे. शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्रा येत असतात. क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते. आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते. धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे. म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.

  या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेच्या पुजा करतात आज या बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कतिक संम्मेलनात उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन या पूजासाठी मदत केली

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 3, 2024

PostImage

शिक्षण हे चारित्र्य घडविण्याचे एक साधन - डॉ. नामदेव किरसान.


 


   देसाईगंज;- मौजा कुरुड ता. वडसा जि. गडचिरोली  येथे   जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेंट कुरुड यांच्या वतीने " शालेय सांस्कृतिक कार्यक्रम " उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना सांगितले की, ज्या शिक्षणामुळे चारित्र्य घडविता येते तेच खरे शिक्षण. पालकांनी आपल्या मुलांसमोर चालतांना बोलताना, वागताना काळजी घ्यावी. मुलांमध्ये संस्कारी आईवडिलांपासूनच घडत असतात. मुलांसमोर आई वडील खोटं बोलले तर मुलं ही खोटं बोलायला शिकतात. शिक्षणाविना प्रगती शक्य नाही त्यामुळे आपल्या पाल्यांना योग्य प्रकारचे शिक्षण प्रत्येक पालकांनी द्यावे. असे त्यांनी स्पष्ट केले.
               यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे,  जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनरावजी सावसाकडे, प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी मनोजभाऊ ढोरे,  प्रदीपभाऊ उरकुडे, सरपंच प्रशालाताई गेडाम,  माजी सरपंच मनोहरभाऊ निमजे, अविनाश गेडाम, पो. पा.मंगेश मडावी, रमेशभाऊ ठाकरे, विजय कुंभलवार, विलासभाऊ गोटेफोडे, पिंटूजी दिघोरे, हरिभाऊ ढोरे, मा.पो.पा. रघुनाथजी खरकाटे, नकटुजी सोनकुसरे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने पालक प्रेषक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 2, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली : तालुक्यातील नारानूर व रेंगावाही येथील जय महादाखंडी क्रीडा मंडळ नारानूर - रेंगावाही यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले असता.सदर या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पुरस्कार देण्यात येत आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांची गावात आगमन होताच नागरिकांनी आदिवासी रेला नूत्य करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.कंकडालवार यांनी प्रथम सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून.आदिवासीचे जंननायक बिरसा मुंडा आणि स्त्री शिक्षणाचे जनणी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या स्पर्धेचे उदघाटक आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी व आविसं तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते.सहउदघाटक आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार व ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.