ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
28-12-2023
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकुण किंमत १६,००,०००/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात आला.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्हयातील जप्त मुद्येमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन असे एकुण ३७,९९४ बाटलाचे मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख
सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी श्री. किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments