STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
15-06-2024
Chandrapur News: वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात माती उत्खनन करणाऱ्या सी. M. P. L. कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांनी न्यायासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून 10 जून 2024 पासून राजुरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने पाच दिवसांनंतरही दखल न केल्याने न्याय मिळेपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दिला आहे.
हे देखील वाचा : Gadchiroli News: लग्नाच्या चौथ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू
राजुरा तालुक्यातील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात विविध कोळसा खाणींत माती उत्खननाचे काम सी. M. P. L. कंपनीला देण्यात आले. या कंपनीत शेकडो स्थानिक कामगार कार्यरत होते. कंपनीने अचानक केवळ स्थानिक कामगारांनाच पत्र पाठवून कामावरून काढून टाकले. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. या अन्यायाविरुद्ध अनैशा वाहनचालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात १० जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही, असा कामगारांचा आरोप आहे.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी स्वतःच्या या आंदोलनात आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साइफ मोगलीवार, राकेश चेनमेंनवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पाझारे, माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे, राहुल राठोड, विशाल सल्लम, संकेत भादीकर, शंकर काळे, प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेनवार आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले आहेत.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments