संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
15-09-2024
गोंदिया: गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्कस मैदान, गोंदिया येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अध्यक्षता केली. त्यांच्या सोबतच महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चैन्नीथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, सुनील केदार, आणि नाना गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात गडचिरोली-घिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया माजी आमदार दिलीप बनसोड, आमदार सहेसराम कोरोटे, विधानसभा अध्यक्ष हिनाताई कावरे, आमदार मधुभाऊ भगत, आमदार विवेक पटेल, काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई काळे, इसुलालजी भालेकर, बाबा कटरे, रुपेश टिकले, जितेंद्र कटरे, गप्पु गुप्ता, जितेश राणे, नीलम हलमारे आणि प्रमोद अबुले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी आपली हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले, आणि काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ही एक नवी दिशा ठरली आहे. या सोहळ्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी काळात पक्षाची वाढ आणि विस्तारासाठी याचा मोठा उपयोग होईल, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments