अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
12-06-2024
Gadchiroli News: भामरागड : लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसोबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविताना भाउजीचाही मृत्यू झाल्याची घटना 11 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (27) रा. चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके (39) रा. आरमोरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
हे देखील वाचा : Pune News : पति ने निकाला पत्नी का अश्लील वीडियो, और किया ये घिनौना काम
नवनीत यांचे 7 जून रोजी लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यामध्ये पल्ली गावच्या ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले होते. नवनीत हा धबधब्यात आंघोळ करत असताना खोल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
हे देखील वाचा : Gadchiroli News: प्रेमप्रकरणातून लग्नासाठी घरजावई बनण्याची अट, तरुणाची आत्महत्या
मृतक नवनीतला पोहता येत नव्हते. तरीही तो खोल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न बादल यांनी केला. बादल यांनाही पोहता येत नव्हते. दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला.
बिनागुंडा येथील धबधबा दिसायला अतिशय लहान आहे. मात्र या धबधब्यात उन्हाळ्यातही जवळपास १५ ते २० फुट पाणी असते. धबधब्याची ख लक्षात येत नाही. त्यामुळे धबधब्यात बुड्न मृत्यू होतात. वर्षभरापूर्वी भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या नागालँड येथील डॉक्टरचा मृत्यू झाला होता. भविष्यातही अशा घटना घडू शकतात. प्रशासनाने या ठिकाणी लोखंडी खांब उभारावेत. जेणेकरून नागरिक खोल पाण्यात जाणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments