नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
06-08-2024
Bacchu Kadu: महायुती सरकारमध्ये सामिल असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही.
शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतो. आमचे 15- 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करू आणि उचलून समुद्रात टाकू, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
ते हिंगोलीत बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले, आमची लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला 12 हजार रूपये महिना मिळतो आणि कलेक्टरच्या गाडीवर असलेल्या माणसाला 25 हजार रुपये मिळतात. तो एका माणसाला घेऊन जातो त्याला 45 हजार आणि 50 लोकांना घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला 12 हजार रुपये मिळतात.
तुमच्या बापाचं राज्य आहे का ? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू. तुमचे बाथरूम 5 लाखांचे आणि आमचे घर सव्वा लाखाचे, तुम्हाला लाज वाटत नाही का? हे कोणी विचारत नाही.
हे देखील वाचा : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये
बच्चू कडू पुढे म्हणाले, तिसऱ्या आघाडीसाठी 25 जागांची चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, एमआयएमसोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्यांवर ज्या ज्या पक्षाचे एकमत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार कडू पुढे म्हणाले, सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुराची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू. शेतकऱ्यांचा त्या मुद्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही, असा इशाराही कडू यांनी महायुतीला दिला.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments