ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
19-04-2024
Gadchiroli News : रामनवमीनिमित्त गावातील मिरवणुकीसाठी गेलेला तरुण अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावालगतच्या एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचा संशय असून कारण अस्पष्ट आहे. ही खळबळजनक घटना 18 एप्रिल रोजी आरमोरी तालुक्यातील बोडधा येथे उघडकीस आली.
प्रशांत ऊर्फ राकेश रामदास उरकुडे (वय 24, रा. बोडधा) असे मृताचे नाव आहे. तो शेती व्यवसाय व मजुरीकाम करीत असे. 17 एप्रिलला गावात रामनवमीनिमित्त मिरवणूक होती. यासाठी प्रशांत हा त्याच्या मोठ्या भावासोबत गेला होता. मिरवणुकीत ते दोघे सामील झाले होते. संपल्यावर मोठा भाऊ घरी परतला; पण प्रशांत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता, तो कोठेही मिळून आला नाही. अखेर गुरुवारी, दि.18 रोजी गावालगत विजय राऊत यांच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळला.
आरमोरी ठाण्यातील उपनिरीक्षक ज्योती राक्षे, हवालदार रजनीकांत पिल्लेवान, शिपाई उत्तम वयस्कडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृताचा उजवा हात मोडलेला असून डोक्याला जबर दुखापत आहे. यावरून त्याची हत्या केल्याचा अंदाज आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा.👇👇👇
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments