STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
23-01-2025
खरपुंडी, बोदली, साखरा घाटावरून वारेमाप उपसा
गडचिरोली : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये सध्या रेतीमाफियांचा धुडगूस सुरू आहे. त्यामुळे नदीपात्र बकाल होत असल्याचे चित्र आहे. गडचिरोली तालुक्यात एकीकडे पोलिसांनी माफियांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडलेली असताना महसूल विभागाने आळीमिळी, गुपचिळीचे धोरण घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रेतीच्या लिलावाला होत असलेल्या विलंबाचा फायदा घेत माफियांनी रेती घाट वाढून घेतले आहेत. गडचिरोली ठाण्याच्या पोलिसांनी कोटगल-विसापूर मार्गावर दोन टिप्पर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कनेरी येथे (ता. गडचिरोली) रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.
'रेटकार्ड'ने खळबळ, तहसीलदारांविरुद्ध तक्रारी
अवैध रेती तस्करांविरुद्ध कारवाईऐवजी पाठराखण केल्याचा आरोप करत गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्याविरुद्ध प्रफुल्ल सिडाम यांनी तक्रार केली. कटाणी नदीतील खरपुंडी, बोदली, जेप्रा, बाह्मणी, वैनगंगा नदीतील मुडझा, कनेरी, कोटगल, साखरा, काटली, पोर्ला या घाटांवरून अवैध रेती उपसा असल्याचा त्यांचा आरोप आहे.
यासाठी ५० हजार ते एक लाखांपर्यंतचे दर ठरलेले असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतच अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समिती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनीही अवैध वाळू उपशाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
रेटकार्डची चर्चा, तक्रारी आल्याने तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेसाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याच्या नावाखाली माफियांकडून सर्रास उपसा होत असल्याचे चित्र आहे.
महसूल प्रशासनाचे पथक सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी कारवायादेखील केलेल्या आहेत. पोलिस व महसूलच्या कारवायांची तुलना करता येणार नाही. मात्र, अवैध रेती उपसा करणाऱ्यांची अजितबात गय केली जात नाही.
- संतोष आष्टीकर, तहसीलदार, गडचिरोली
बेदरकार वाहनांमुळे अपघातसत्र सुरू
गडचिरोली शहाराजवळील गुरवळा घाटावर रेती तस्करी करणाऱ्या वाहनाचा धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात दिवसांपूर्वी गोगाव फाट्यावर मध्यरात्री एका वाळूतस्कराच्या आलिशान वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरुणांचा हकनाक जीव गेला. बेदरकार वाहने सामान्यांच्या जिवावर उठलेले असताना महसूल विभागाची बोटचेपी भूमिका कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments