संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
23-01-2025
गडचिरोली दारूविक्री बंदीच्या जिल्ह्यात राजरोस दारूविक्री काही नवीन बाब नाही. आता तर या अवैध धंद्याची व्याप्ती आणखी वाढलेली आहे. जिल्ह्यात राजरोसपणे कोंबड्यांच्या झुंजी लावून मोठ्या प्रमाणात पैशांची पैज लावली जाते. चक्रीसारखा जुगारही खेळला जातो. दारूविक्रीसह कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी खेळविल्या जात असल्याने शांतता व सुव्यवस्था बिघडलेली आहे.
पाळीव प्राण्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ करणे, त्यांना अमानुष वागणूक देणे व जिवे मारणे हे प्राणीक्लेश कायद्यानुसार अपराध आहे. यात कोंबड्यांच्या झुंजींचाही समावेश आहे. जिल्हा मुख्यालयापासून १७ किमी अंतरावर असलेल्या चित्तेकन्हार तसेच गुजनवाडी गावात तर राजरोसपणे कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी लावून प्राणीक्लेश कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
जंगलाचा आश्रय घेऊन कोंबड्यांच्या झुंजीसाठी जागा तयार केली जाते किंवा गावापासून दूर अंतरावर शेतात किंवा मोकळ्या जागेत कोबडचांच्या झुंजीचा बाजार भरविला जातो.
हा बाजार भरविण्यात गावातीलच काही प्रमुख लोकांचा पुढाकार असतो. यासाठी ते पोलिसांना मॅनेज करतात. झुंजीसाठी तयार केलेले कोंबडेसुद्धा पोलिसांच्या जेवणाच्या मेजवाणीत पोहोचविले जातात, अशी माहिती आहे. या संदर्भात कठोर कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
झुंजताना कोंबड्याचा जातो जीव, हा कसला आनंद ?
जिल्ह्यात विजयादशमी सणानंतर कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात. रंगपंचमी सणापर्यंत या झुंजीना भर असतो. या झुंजींना 'कौबड़ा बाजार' असे गोंडस नाव देऊन अवैध व तेवढाच जीवघेणा खेळ रक्ताच्या थारोळ्यात खेळविला जातो. झुंजता झुंजता कोंबड्यांचा जीव कसा जातो, हे पाहणारे तेथे आबालवृद्धसुद्धा असतात.
मद्यविक्री, जुगार, पैजेचाही बोलबाला
कोंबड्यांच्या झुंजी लावताना प्रत्येक जोडीवर पैज लावली जाते. जो कोंबडा जिंकेल त्या कोंबड्यावर पैसे लावणारा मालामाल होतो. याशिवाय चक्री (जुगार) त्याच ठिकाणी लावला जातो. नऊ घरांपैकी एकाच घरावर पैसे लावणारा यात जिंकतो. याशिवाय झंडीमुंडीसुद्धा लावली जाते. यात अनेकांना दारूचे व्यसनही जडले आहे.
म्हणे, मी सगळ्यांना 'मॅनेज' करतो !
गडचिरोली तालुक्यातील चितेकन्हार गावात दर मंगळवारी, जडेगाव येथे बुधवारी तसेच बेनोली परिसरातही कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात, चित्तेकन्हार येथे बाजार भरविणारा तर विरोध करणाऱ्यांनाच थेट आव्हान देतो. तो म्हणतो, मी सर्वांनाच म्हणतो मॅनेज करतो. येथे पोटेगाव पोलिसांच्या वरदहस्तामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे.
याबाबत पोटेगावचे प्रभारी पोलिस अधिकारी भास्कर कांबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, या गावात असा काही प्रकार होत असेल तर माहिती घेण्यात येईल. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोटेगाव बनले अवैध धंद्यांचे केंद्र
तालुक्यातील पोटेगाव हे गडचिरोलीसह चामोर्शी, एटापल्ली आदी तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागाचे मध्यवर्ती केंद्र आहे; परंतु अलीकडे हा परिसर अवैध धंद्याचे केंद्र बनलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. गोवंशाची तस्करीसुद्धा येथून होते. मात्र येथील पोलिसांची कारवाई शून्य आहे
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments