निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
07-07-2024
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' घोषित केली होती. या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. मात्र, हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल.
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
कुटुंबातील कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) असेल तर
1. सर्व प्रथम प्लेस्टोर वर जाऊन नारीशक्ती दूत हा अॅप डाऊनलोड करा:
2. मोबाईल नंबर प्रविष्टकरा आणि टर्म एंड कंडीशन ला एक्सेप्ट करुन लॉगिन करा.
3. प्रोफाइल अपडेट करा : पूर्ण नाव, ईमेल आइडी, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती चा प्रकार लिहा आणि सबमिट करा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला इ.) अपलोड करा.
5. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती भरून, कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करा.
प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा भरावा?
उत्तर: अर्ज भरताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी नरीशक्ती दूत अॅप डाऊनलोड करा, त्यात तुमची सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
प्रश्न 2: कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो?
उत्तर: महाराष्ट्रातील रहिवासी विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेची पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
प्रश्न 3: योजनेचे अर्ज कुठे आणि कसे भरू शकतो?
उत्तर: योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरू शकतो. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
प्रश्न 4: अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्रश्न 5: अर्जाच्या अंतिम सबमिशननंतर काय करावे?
उत्तर: अर्जाच्या अंतिम सबमिशननंतर, तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा. अर्ज स्वीकृती किंवा अस्वीकृतीसाठी तुम्हाला सूचित केले जाईल.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments